एक सैतानी रात्र - भाग 3 jay zom द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 3

 
12 तासान अगोदर
 
वेळ सकाळी 9:00 am
 
एका मोठ्या प्रशस्त अशा बंगल्या समोर .एक MG Hector black colur कार ऊभी होती. त्या कार समोरच एक युवक ऊभा राहून फ़ोनवर बोलत होता.
 
 
एक साधारन 19 वर्षाचा युवक होता तो. केस जेल लावून ऊभे केले होते .
व अंगात एक सफेद रंगाची टीशर्ट घातली होती आणि खाली एक निळ्या रंगाची जीन्स पँट घातली होती.व पायात nike कंपनी चे लाल रंगाचे shoes घातले होते. व उजव्या हातात एक smart watch घातली होती. असा हा त्याचा लूक होता . त्या युवका चे नाव होते
जय मधुकर झोमटे (काल्पनिक नाव ) जय हा एक श्रीमंत
घराण्यातला युवक होता त्याचे पिता एका प्रसिद्ध हॉटेल चे मालक होते.
पैशांची बिलकुल कमी नव्हती. पण जय ला त्या सर्व श्रीमंतीचा बिलकुल गर्व नहव्ता . जय हा मनाने प्रेमळ व हुशार प्रवृतीचा होता.कधी ही आपल्या माता-पित्याच्या शब्दापुढे जात नसायचा. त्याचा हाच स्वभाव त्याच्या माता पित्या ना खुप आवडायचा .
 
[ मित्रानो आताची craze झालीये स्मार्ट वॉचची style म्हणून हो की नाही]
 
(तुम्हा सर्वांना वाटत असेलच की अरे हा तर तोच युवक आहे. तुमच म्हणण बरोबर आहे हा तोच युवक आहे जो जंगलात आपण सर्वांनी पाहिला)
 
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>पुढे
 
ए झाला का सर्वांच. सगळ सामान घेतलय ना मी पोचलोच थोड्या वेळात आणि हो मी माझ्या पप्पांची mg hector car घेतलीये आपल्या ट्रिप साठी.चालेल ना . जय म्हणाला. .
 
तस जय च्या पाठीमागुन अवाज आला.
 
अरे चलेगा नाही भाई दौडेगा. 2 मुल -3 मुली असा 5 जणांचा ग्रुप होता व त्या ग्रुप मधुनच एक जेमतेम 20 -21 वर्षाचा युवक म्हणाला
त्याने अंगात एक निळी फिकट टीशर्ट घातली होती.व खाली black जीन्स घातली होती .व त्याच्या उजव्या हातात एक महागडी
[TITAN EDGE ceramic analog blck dial men 's watch ]
की जिची price 21,146 होती.
 
 
पायात black shoes होते. आणि ह्या युवकाच नाव होत गूंजण.
गूंजण हा जय चा लहानपणीचा मित्र होता. दोघांनी शाळेपासून ते कोलेज
एकत्रच केल येवढ्या वर्षात ते बेस्ट ऑफ़ बेस्ट freind झाले होते.
आणि हो ह्या दोघाना एका गोष्टीच खुप वेड होत ते म्हणजे wwe
होय wwe जय ला roman reigns आवडायचा तर गूंजण ला seth rolins
ते दोघे स्वताला shield चे सदस्यच मानयचे.आणि त्या दोंघांच्या आवडीनिवडी खुपच मिल्त्या जूल्त्या होत्या म्हणुनच की त्या दोघांची मैत्री खुपच घट्ट होती .
>>>>>>>>>>>पुढे
 
hey bro what surprise hh. मीच येणार होतो आता तर.जय सर्वांना पाहत एक स्माइल देत म्हणाला .
अरे यार झाल अस की मी माझ्या आत्या च्या मुलीला आण्यासाठी गेलो होतो कारण काल रात्री मॉम ला आत्याच कॉल आला होता तर ती म्हणली की बरेच दिवस झाले वैशाली lockdown मुळे कुठे फिरायला नाही गेली घरीच आहे तर bor झालीये खुप .तर तिला उद्याच सकाळी नेहायला ये थोडे दिवस राहूदे मामा कडे बर वाटेल तिला म्हणाली आणि मग वैशू ला
मी घेन्यासाठी सकाळीच गेलो होतो तर गाडीतच आमच बोलन सुरू होत बोलता बोलत विषय ट्रिप चा निघला तर मी स्वताहून हिला म्हणल आमच्या बरोबर ट्रिप ला येतेस का पहीले तर नाही म्हणली पन . गूंजण हळूच जय च्या जवळ येत कानात म्हणाला की तू स्वता गाडी घेऊन येणारस ट्रिप ला जाण्यासाठी तर लगेच तयार झाली गूंजण ने हळूच एक डोळा मारत जय ला चिडवल . आणि तिला घेऊन आल्या नंतर रस्त्यात ही.
सरिखा ,महेश ,राहुल भेटले मग घेऊन आलो इकडेच सर्वाना म्हंटल गाडी इथेच पार्क करेन बंगल्या जवळ.काय मग आवडली की नाही वैशू.
हो आवडली ना खुप.जय वैशालीकडे पाहातच थोड हसतच म्हणाला
तस गूंजण मस्करितच म्हणाला काय वैशाली आवडली.😂😂
तसे सर्व जण हसु लागले😂😂😂😂
तस जय ला थोड लाजल्या सारख झाल आणि हळुच गूंजण च्या पाठीत रट्टा बसवला .
तशी वैशाली जय कडे पाहून लाजेने लाल झाली .आणि हळुच
जय कडे पाहत हसत होती. जय सुद्धा तिच्या कडे पाहतच राहिला होता कारण तीने two pieace dress घातला होता जो black रंगाचा होता.
त्या two peace ड्रेस मधे ती खुपच छान दिसत होती.
वैशाली (वैशू) गणपत मुरबे. गूंजण च्या आत्याची मुलगी जय ला ती खुप आवडायची.जय चा मनमिळाऊ स्वभाव व त्याच बोलन त्याची हुशारी दिसायला सुद्धा stylish आणि स्वभावाने प्रेमळ जय ही वैशाली ला खुप आवडायचा. पण कोणाची हिम्मत होत नह्व्ती सांगायची की ते तीन
 
 
अक्षर बोलायची . i love यू..............❤ .
 
मित्रानो खरच हे तीन अक्षर किती ताकतवर वर आहेत . जे परस्पर दोन जीवाना एकत्र जोडण्याचा काम करतात खरच किती ताकद उर्जा भरलीये ह्या तीन शब्दांमध्ये हो की नाही मित्रानो.
असो आता पुढे >>>>>>>>>>>>>>>>>>
hii वैशाली कशी आहेस.सरिखा म्हणाली
सरिखा जय ची कोलेज मधलीमैत्रिण.
तस त्या दोघींच बोलन सुरू झाल.
 
इकडे मुलांच्यात
thnx गूंजण ब्रॉ वैशाली ला आणल्या बदल.जय म्हणाला
अरे ये बाबा मी नाय आणली तिला ती स्वताहून आलीये तू येतोयस म्हणून
चाललय मोठ thnx म्हणायला गूंजण जोरात हसतच म्हणाला 😂😂hahahahha तस जय सुद्धा हसायला लागला 😁😁😁😁😁 दात दाखवत. हिहिहिही
बस आता तिला प्रपोज कधी करतोस सांग.गुंजन हसु थांबवत म्हणाला.
प्रपोज जय च्या चेहर्यावर थोड्या आठ्या जमा झाल्या.
आरे वेड्या ती सुद्धा तुला लाइक करते माहितीये का तुला.
नाही तर मीच सांगतो तिला आता जाऊन थांब .गूंजण तसा जायला निघाला की
जय ने त्याचा हात धरत त्याला आडवल .
तु असाच रहा रे फटू कुठचा मग तू तिचा लग्न झाल्यावर मग काय करणारेस हा त्या पोपटलाल सारखा रहा मग कुंवारा गूंजण अजुन चिडवणार की तोच.
जय तसा फिल्म style मद्धेच म्हणाला नहि..................
आज रात्रीच प्रपोज करतो तिला बग तू .जय ने आता ठरवलच होत रात्री वैशालीला प्रपोज करायच.
यह हुई ना शेरवाली बात मेरे शेर करुन टाक आज फिक्स लगिन.गूंजण म्हणाला व तसाच हसु लागला जोरजोरा हाहाहाहाहा 😆😆😆😆😆😆
तसा जय ही हसु लागला 😁😁😁😁😁 ह्ह्ह्ह्ह्ह
 
तस त्या दोघांच्या ही मागुन आवाज आला .काय रे काय झाल हसताय खुप
काही जोक झाल का आम्हाला पन सांगा आम्ही पन हासतो. महेश हा जय चा गूंजण सारखाच बेस्ट फ्रेंड.बर का आणि सरिखाचा बॉयफ्रेंड् दोंघाच एकमेकांवर खूप प्रेम होत.व राहुल हा सिंगल होता तो थोडा कमीच बोलायचा.
 
hiii maya ब्रॉ दोघानी handshake केल.व असच थोडा ऊशीर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व.
 
बंगल्याच्या मोठ्या डोर मधुन एक नव्वारी साडि घातलेली 45 वयाच्या आस्पास्ची एक बाई बाहेर आली.
अरे आलात तुम्ही सर्व .मिस झोमटे म्हंणाल्या.
कशा आहात काकू .गूंजण म्हणाला
मी बरी आहे बाकी तुमची घरची सर्व मंडळी बरी आहेत.मिस झोमटे म्हणाल्या
हो सर्व ठिक आहेत काकू काका नाहीत का घरात.गूंजण म्हणाला
अरे ते त्यांना होटेल मध्ये अर्जंट काम आल म्हणुन लवकरच गेले होटेल ला
असेच 5 मिनीट बोलण्यात विचारपूस करन्यात निघुन गेले.
 
जय ने काल रात्री सांगितल होत ट्रिप बदल तर मी आमच्या घरातल्या नोकराना चांगले पदार्थ बनवायला सांगितलेत.जे तुम्हा मुला मुलीना आवडत सर्व.
चला या तुम्ही सर्व आतमध्ये नाश्ता बनवूनच ठेवलाय डाइनिंग टेबलवर .मिस झोमटे म्हणाल्या .
 
तसे सर्व हो म्हणाले व दरवाजातून बंगल्यात जाऊ लागले
तस मिस झोमटे यांची नजर वैशाली वर पडली.
ही नविन मुलगी कोण ह्या अगोदर तर नाही पाहिली मी हिला.
तस मिस झोमटे नी प्रेमाने तीच्या खांद्यावर हात ठेवला.
काय ग नाव काय तुझ किती छान दिसतेस ह्या two peace drese मधे
तस मिस झोमटे नी हळुच कलंगडीने बोट डोळया खाली लावलेल्या काजळातून फिरवल व वैशाली च्या गालावर लावल . व म्हणाल्या नजर न लागो कोणाची तुला .
तसा गूंजण म्हणाला की काकू ही माझी आत्याची मोठी मुलगी वैशाली घरी बोर होतय तर थोड्या दिवस राहायला आलीये आमच्याकडे तर मीच म्हणालो की आम्ही सर्व ट्रिपला चाललोय तर तू पन चल आमच्या बरोबर.
 
बर केलस तू . चला थोड खावुन घ्या आनि मग निघा तुमच्या ट्रिप साठी मिस झोमटे म्हणाल्या.
तसे सर्व नाश्ता वगेरे करुन 1 तासात निघाले.
 
वेळ 1 :00
थंडीचा महीना असल्या मुळे ऊन जास्त पडल नव्हत व
ह्या gang ने ट्रिप साठी 1 बेगेत खाण्याच सामान घेतल होत
तर दुसर्या बेगेत टेंट च सामान होत. आणि तिसर्या बेगेत चादर ब्लँकेट होत
लाईट साठी स्पेशल charge केलेल्या 10 tubes घेतल्या होत्या.
व फोन साठी 3 power banks. व एक wifi घेतला होता.
 
महेश व राहुल कार मधे सामान ठेवण्याच काम करत होते.
 
तिकडून जय ने आवाज दिला ठेवल का सर्व सामान boyz
 
येस्स बॉस मया व राहुल एकदाच हसतच म्हणाले.
 
इकडे मिस झोमटेना थोडी चिंता होत होती कसली तरी चाहुल लागत होती
मन म्हणत होत की नको जाऊन देउस त्या मुलाना त्या जंगलात.
तस मिस झोमटे एकदा म्हणाल्या सुद्धा की नका जाऊ म्हणून पन आताची मुल ती ऐकनार थोडीना होती. इकडे सर्व गाडीत बसले गाडी ला एकुण 6 सीट होते
लास्ट 3 नंबर सीट वर 2 जण बसले महेश सरिखा
व 2 नंबर सीटवर राहुल वैशाली बसले
driving सीटवर तर जय बसला आणि त्याच्या बाजूला गूंजण
जय driving सीटवर बसला एक वेळ miror मधुन त्याने पाठिमागे वैशाली कडे पाहिल ती सुद्धा त्याच्या कडेच पाहत होती.अचानक दोघांची नजरानजर झाली आणि वैशू ने दुसरीकडे नजर फिरवली.पन जय मात्र तिला अजून पाहतच होता. की तोच गूंजण ने हळुच जय चा एक चिमटा काढला
व म्हणाला बोस निघायचय आपल्याला दिड वाजलेत तिकडे पोचायला आप्ल्याला साडे पाच वाजतील .आणि आपल्याला तिकडे जाऊन आपल्याला राहण्यासाठी टेंट व रात्री शेकोटीसाठी लाकड सुध्दा शोधायचीयेत तर चला लवकर. तस जय ने कार ला चावी लावली.गाडी भ्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र भ्र्र्र्र्र्र्र्र्र्भ्र् आवाज देत गाडी स्टार्ट झाली.
आणि जय गियर टाकणार की तोच राहुल चा आवाज आला.
थांब जरा तसा राहुल कार चा दरवाजा खोलून बाहेर आला व त्याने त्याच्या
शर्ट च्या खिस्यातून एक पिवळा लिंबू बाहेर काढून घेतला आणि टायर
खाली ठेवला व कार मध्ये येऊन पुन्हा आपल्या जागी बसला .
 
इकडे बंगल्याच्या दारा मधुन मिस झोमटे हे सर्व पाहत होत्या.
 
जय ने हळुच कारच फ़र्स्ट गियर टाकल व गाडी तो लिंबू चीरत जाऊ लागली.
जय ने मिस झोमटे ना हात दाखवत by केल.काल धुर उडवत गाडी गेटमधुन निघुन गेली .
 
मिस झोमटे तो लिंबू पाहण्यासाठी पुढे जाऊ लागल्या की तोच
mam सरांचा चा कॉल आलाय त्याना काय तरी urgent बोलायचय तुम्च्याशी एक नोकर म्हणाला
हो चला मिस झोमटे फ़ोन वर बोलन्यासाठी आतमधे निघुन गेल्या
 
इकडे त्या लिंबूतून जाड़ जाड़ रक्त निघत होत.
जे चाहुल दे होत अपशकुनाची एका भयाची
सैतानाचा नंगा नाच माजनार............... आता
 
 
 
.
 
 
 
क्रमशः