रक्षाकवच - (भाग-1) Dhanshri Kaje द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रक्षाकवच - (भाग-1)

आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. काही नात्यांना नावे असतात तर काही नाती ही अशी असतात जी मनात घर करून जातात. त्यांना नाव नसतं पण तरी ती खूप जवळची असतात.
आपलं आयुष्य हे नात्यांनी भरलेल आहे आणि हीच नाती आपल्याला जगणं शिकवत असतात. 'रक्षकवच' ही एक अश्याच नात्याची कथा आहे.
एक अल्लड महत्वकांक्षी स्वभावाची मुलगी आणि एक स्ट्रगलिंग छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम करणारा वयाने मोठा असलेला मुलगा आणि त्यांच सुंदर निरागस नात.
हे नातं आपल्याला एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकवत.
काय आहे त्यांच नात? ती दोघ कशी एकमेकांना भेटली? कस जुळल त्यांच हे नात? जेव्हा तुम्ही ही कथा वाचाल "खरच असही नातं असतं?" हा प्रश्न तुम्हाला पडल्या शिवाय राहणार नाही. खर तर आपल्या अवती भवती अनेक व्यक्ती असतात काही व्यक्ती आपल्या मनात घर करून जातात ती आपली प्रेरणास्थान बनतात असच काहीस त्यांच नातं आहे. मग वाचायला तयार व्हा मला खात्री आहे तुम्हाला हा विषय आणि ही कथा नक्कीच आवडेल कदाचित तुम्ही सुद्धा नव्याने नात्यांवर विश्वास ठेवु लागाल तेव्हा नक्की वाचा नात्याची अनोखी कथा. "रक्षाकवच"
आज रोहीत खूपच खुश होता. कारण आज त्याच्या नव्या प्रोजेक्टच्या शूट चा पहिला दिवस होता. त्याला एक मोठ्या बॅनरच प्रोजेक्ट मिळाल होत त्यामुळे आज तो प्रत्येक काम अगदी उत्साहाने करत होता. जस काही त्याची सगळी स्वप्नच पूर्ण झाली होती.
रोहीत खूप फेमस होता अस नाही पण त्याच्या ही नकळत त्याचे खूप सारे चाहते बनलेले होते. रोहीत एक स्ट्रगलिंग ऍक्टर होता त्यांनी आपल्या आयुष्यात खूप खस्ता खाल्या होत्या खूप काही बघितल होत अनुभवल होत. पण तरी कधी खचला न्हवता. वाईट मार्ग तर त्याला स्वप्नात देखील माहीत नव्हते. म्हणूनच की काय आज त्याला खूप मोठी संधी चालून आली होती. तो आपल्याच विचाराने पुढे जाणारा मुलगा होता.
त्याला लोक नेहमी बोलायचे. "रोहीत अरे तु या इंडस्ट्रीत काम करतोस थोड तरी स्वतः मध्ये बदल कर. इथे काही दिल्या शिवाय कुठलच काम होत नाही कसा निभाव लागेल रे बाबा तुझा."
आणि तो मात्र हसून फक्त एवढच बोलायचा. "ती माणस खूप वेगळी असतात जी देतात ही आणि घेतात ही पण मी त्यातला नाहीये. माझ्या नशीबात एखादी चांगली संधी असेल तर ती माझ्या जवळ चालून येईल त्या साठी मी कधीच कुठलीही तडजोड करणार नाही. मी त्यातला नाहीये मी कधीच कुणाला काही देणार नाही आणि कुणा कडून काही घेणार नाही. आपल्या मेहनतीने आणि ऑडिशन्स देऊनच काम करेल मग भलेही वेळ लागला तरी चालेल."
या बोलण्यावर लोक नेहमी त्याच्या मागे त्याच्यावर हसायचे त्याची खिल्ली उडवायचे पण तो मात्र आपल्या विचारांवरच आपल्या मूल्यांवरच ठाम होता. त्याला कधी जगाची पर्वा नव्हतीच. तो नेहमी म्हणायचा. "मी हा असा आहे आणि कायम असाच राहणार तुम्हाला माझ्या बद्दल जो विचार करायचा आहे खुशाल करा मला काही फरक पडत नाही."
रोहीतच्या अश्याच दमदार स्वभावामुळे की काय त्याला हे प्रोजेक्ट मिळाल होत.
रोहीतची सुरुवात नाट्यक्षेत्रा पासून झाली. त्याने कॉलेजच्या प्रत्येक फेस्टिव्हल्स मध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप टाकली होती तसेच तो एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक ही होता. त्याने बरीच नाटक, कथा, कविता ही लिहिल्या होत्या त्याची चार पुस्तक प्रकाशित झालेली होती. तर त्याने कॉलेजसाठी काही नाटकांचं दिग्दर्शन ही केल होत आणि शाळेतल्या लहान मुलांची नाटक देखील बसवली होती. तसेच लहान मुलांसाठी नाटक लिहिली ही होती.
पण त्याचा जास्त कल अभिनय क्षेत्राकडे होता त्यामुळे इतका हरहुन्नरी कलाकार असून देखील त्याने आपल्या अभिनयाशी कधीच तडजोड केली नाही. आणि सरळ साधा ऑडिशनचा मार्ग निवडला.
त्याला समजल या या ठिकाणी ऑडिशन आहे की तो लगेच जायचा तिथे आपली कला दाखवायचा आणि तिथून निघून जायचा अगदी उत्तराची वाट न बघता.
रोहीत कुठल्याही ठिकाणी जास्त वेळ थांबत नसे. त्याच्या म्हणन्या नुसार. "एखाद्या ठिकाणी आपण जास्त वेळ थांबलो तर तिथे नकारात्मकता निर्माण होते. त्या पेक्षा आपण आपल काम करून निवांत घरी आराम केलेला बरा." अस तो समजायचा आणि वागायचा सुद्धा त्याचेच त्याला हे फळ मिळाले होते.
रोहीत खूपच सुंदर देखणा दिसत होता अगदी पहिल्यांदा पाहताक्षणी कुणीही प्रेमात पडेल असा. गोरापान सुंदर बांधा एकदम स्टायलिश दिसत होता. आज त्याच्या वागण्यात बोलण्यात देखील एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता.
त्याच्या घरात तो एकटाच रहात असे. त्याची कामवाली बाई 'सरला ताई' सकाळीच सगळी काम उरकून जायची मग काय याचच राज्य.
पण आज मात्र रोहीत ने सरला ताईंना घरी लवकर बोलावून घेतल होत. सरला ताईंनी लगेच सगळ आवरून घेतल आणि नाश्त्याची तयारी केली. तस रोहीतच कुटुंब यु. एस.ला असल्या कारणाने त्याला सरला ताईनीच लहानाच मोठ केलं होत त्याचा सांभाळ केला होता. त्यामुळे रोहीत सरला ताईंचा खूप लाडका होता. त्या रोहीतची प्रेमाने काळजी घ्यायच्या आणि रोहीत सुध्दा त्यांच्या घरच्यांचं आणि त्यांचं अगदी आपुलकीने करायचा. आणि म्हणूनच आज सरला ताईंनी सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ बनवलेले होते. ते सगळ बघून त्यांचं प्रेम बघून रोहीतच्या तर डोळ्यातच पाणी आलं. त्याने लगेच आपल्या शेजारी त्यांचं एक ताट तयार केलं आणि आपल्या शेजारी जेवायला बसवलं.
दोघ नाश्ता करायला बसणार तेवढ्यात दाराची बेल वाजली. सरला ताईंना जेवायला बसवत रोहीत दरवाजा उघडायला गेला. दार उघडून बघतो तर काय समोर गार्गी.
गार्गी ही कोल्हापूरची अस्सल मराठ मोळी मुलगी होती. दिसायला सुंदर देखणी उच्च शिक्षीत स्टायलिश आत्मविश्वासी मुलगी. ती स्वतः ड्राइव्ह करून मुंबई शहरात आली होती. गार्गीची एक खोड होती. ती म्हणायची. "प्रत्येक गोष्ट अशी ठरवून कधीच करता येत नसते. आपल्या आयुष्यात जे काही होत असत ते तो करत असतो. तो म्हणजे 'परमपिता परमेश्वर' मग आपण ठरवणारे कोण?"
गार्गी सुद्धा एक लेखिका होती आपल शिक्षण पूर्ण करता करता तीने बऱ्याच वर्तमान पत्रातून लेख लिहीलेले होते तसेच तिच्या कादंबऱ्या ही प्रकाशित झालेल्या होत्या आणि आता मुंबईत राहून आपला एक वेगळाच ठसा उमटवायचा या विचाराने गार्गी कोल्हापूरहुन मुंबईत आली होती.
पण तिच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे रहायचा.
गार्गीच असच होत. आधी कुठलीही तयारी करायची नाही मग सगळी धावपळ व्हायची.
यावेळीही असच झाल. तीने तडकाफडकी निर्णय घेतला बॅग भरली आणि गाडी काढून थेट मुंबईचा रस्ता धरला. बर कुणाचा विचार नाही की कसली तयारी नाही. तिला ठाम विश्वास होता. "मुंबईत पोहोचल्यावर आपल्यासाठी तिथे कुणी न कुणीतरी धावून येईलच." आणि अगदी झाल ही तसच.
मुंबईत पोहोचल्यावर एका सिग्नलजवळ पोहोचताच कस कोण जाणे तिच्या गाडीत एक न्यूज पेपर येऊन पडला आणि तो पेपर त्याच दिवशीचा होता. 'यालाच म्हणतात नियती' हो अगदी गार्गीने जो विचार केला होता मदतीचा ती मदत नियतीनेच केली होती तिच्या गाडीत न्यूज पेपर टाकून. गार्गीने तो पेपर हातात घेतला आणि जरा गाडी बाहेर एक नजर टाकली पण तिथे कुणीच नव्हत.
ती पेपर बघते आणि तिची नजर पेपर मधल्या एका जाहिरातीवर पडते आणि का कोण जाणे ती तेच घर निवडते जे रोहीतच असत. ते म्हणतात न. "करता करविता तोच असतो." अगदी तसच. सगळं काही पहिलेच ठरलेल.
गार्गी रोहीतच्या घरी जाते व त्याला भेटते.
"नमस्ते मी गार्गी. मी कोल्हापूरहुन मुंबईत आलीये तुमची पेपरमध्ये जाहिरात वाचली तुम्हाला पेंगगेस्ट ची गरज आहे कळाल म्हणून आले मला रूम हवी होती."
टीप: -
'रक्षाकवच' रोहीत आणि गार्गीच्या एका अनोख्या नात्याची कथा.
आपण नेहमी मुलगा आणि मुलगी म्हणल की त्यांच्या नात्याला एकाच चष्म्यातून पाहातो पण त्यांच हे नात एक वेगळ नात ही असू शकत हेच आपण विसरतो. ही कथा असाच विचार करायला लावणारी आहे तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा