एक खेळ असाही - भाग 3 PrevailArtist द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

एक खेळ असाही - भाग 3

अमिता एका शांत जागी बसलेली असते , तिच्या चेहऱ्यावर आपल्या सोबत काही तरी झालाय हे दिसत असत आणि म्हणूनच ती कोणाला कळून नाही देत. अक्षया तिच्या बाजूला जाते आणि तिला विचारते ,” काही झाल आहे काय तू प्रवीण सोबत आल्यापासून शांत आहेस “
“ तू इकडून जा मला कोणाशी काही बोलायचं नाही मला एकटीला राहायचं आणि मी सांगून काय होणार आहे ग चूक माझी पण होती पण मी विश्वास ठेवला ना ग म्हणूच हे झाल आता बोलून काही फायदा नाही ग ह्या त्यामुळे जाऊदे “ हे बोलताना अमिता आतून खूप तुटली होती.
मला समोर असलेल्या समुद्राचा आस्वाद घेऊ देत. अक्षया पण उठून जाते आणि ,” काय वाटल तर मला सांग अस बोलून निघून जाते”
इथे सारा एकटीच सगळ्यांपासून लांब चांदण्याच्या चादरीखाली, मध्येच येणारा थंडगार वारा,शांत जागेमध्ये फक्त येणारा समुद्रच्या लाटांचा आवाज त्यात सारा कधी झोप लागते हे तिला कळतच नाही. आपण कोणाला तरी बसलेलं आहे त्या व्यक्तीला आपण मारलं आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई असते आणि तीच सतत रक्त आपल्याला का दिसत आहे हे सगळ बघून सारा इतकी घाबरते , डोळे उघडते तेव्हा बघते तर तिला सगळे जण मारण्यासाठी आले असतात आणि हे बघून तिला काही सुचत नाही प्रेमेय आणि ओंकार तिला पकडून असतात , अरविंद तिला विचारतो ,” तू का मारलस प्रवीणला हां?” “मी.. मी कुठे मारलं प्रवीणला मी नाही मारलं ओ खरच आणि तर ती वाळूत पडते आणि सगळे जण तिला मारायला लागता तिला कळत नसत,आपल्यासोबत हे काय होतंय. ति मग समोर असलेल्या प्रवीणच्या बोडीकडे तिला घेऊन जातात तेव्हा बघते तर तिचा चाकू कोणी तरी वापरलेला असतो आणि म्हणूनच तीला सगळे जण मारतात. आपला चाकू इथे कसा आला ह्याचा विचार करत ती मागे मागे जाते आणि ” ती मागे मागे जात असते तेव्हा अरविंद मागून तिच्या जोरात बांबू तिच्या डोक्यावर मारतो आणि ती तिथल्या तिथे खाली कोसळते.

सारा जेव्हा जागी होते तेव्हा ति स्वताला बेड वर बघते आणि उठते तेव्हा बघते तर आई तिला खूप ओरडत असते आणि “काय ग तुला काही कळत नाही काय ग रात्रभर त्या मोबईल वर गेम खेळत असते आणि उशीरा उठतेस ”, , मुलीच्या जातीने पटपट आवरायचं आणि जायचं तर ते नाही, ती आईला बघून रडायला लागते आणि आईला अचानक मिठी मारते आणि बोलते आई,” मला कधी सोडून नको जाऊस, आणि काय झाल तर मला सांगत जा प्लीज”.
“हे काय झालय तुला आणि अशी काय बोलतेस , मी ओरडते म्हणून अग तुझ्या भल्यासाठीच बोलते त्यात काय रडतेस” साराची आई बोलते. सारा चला आता अंघोळीला पळ| आणि रडू नकोस नाष्टा कर” सारा आंघोळीला जाताना एकदम घट्ट मिठी मारते आईला आणि जाते.
तेव्हा तिच्या मोबईलचा आवाज येतो आणि ती बघते तर ती जो गेम खेळते त्यात एक विडोओ आलेली असते , ती घाबरत घाबरत तो विडीओ प्ले करते त्यात कोणीतरी माणूस दिसतो पण त्याचा चेहरा दिसत नसतो , अंधुक अंधुक तिला दिसत असत , तिला आवज येतो तो खूप घोगरा असतो.
तो : hello सारा Good Morning
सारा : कोण आहेस तू ? आणि तुला माझ नाव कस माहिती ?
तो : नाव कस माहिती ते महत्वाच नाही आहे. तुला झोप कशी लागली ते सांग.
सारा: म्हणजे तुला काय करायचं माझ्या स्वप्नाच हं.
तो : सांग तर खर झोप लागली का निट?
ती त्याला विचारते ,” तू कोण आहेस..?? आणि मला हे काय अस स्वप्न पडल“
ती व्यक्ती फक्त इतक बोलते ,” ते तुला कळेलच तुझ आवरून झाल कि कॉलेजमध्ये ये आणि तिथे एक ब्लक सुट मध्ये एक व्यक्ती दिसेल तिला आता ह्या गेम मध्ये तुला आमच्याकडून एक आयडी पाठवतो ते दाखवायचं म्हणजे ती व्यक्ती तुला एका प्रयोगशाळेत घेऊन जाईल. आता तुला जेवढे सांगीतल तेवढेच ऐक. आणि तिथेच तुला उत्तर मिळतील”. साराला कळत नसत की तिच्या सोबत काय झालाय आणि अस का होतय म्हणून ती काही विचार न करता ती ते एकते. तयारी करते.
कॉलेजला जाण्यची तयारी करते तेवढ्यात तिचा मोबाइल मधून आवाज येतो आणि बघते तर त्यात तिला एक आयडी मिळत आणि ती ते सेव करून ठेवते. कोलेजला जाते तेव्हा ती कॉलेजच्या आयडीने प्रवेश मिळतो आणि खूप गर्दी असते तर बघते तर तिला कोणी एक ब्लक सूट मधला माणूस तिची वाट बघत असतो आणि ती त्यच्याकडे जाते त्याच्या समोर मोबईल मधल आयडी दाखवते. तो तिच आयडी व्यरीफाय करतो आणि तिला आपल्या मागुन यायला सांगतो. ती पण त्याच ऐकते आणि मागे मागे जाते. पण तिला एक प्रश्न पडतो कि, “ आपण बाकीच्यांना दिसत कसे नाही आहोत सगळे ह्या धिप्पाड माणसाच्या समोर एवढे बिन्दास्त कसे काय जातात , नक्की काय झालय आणि काय होतंय आपल्यासोबत. “ तिच्या ह्याच प्रश्नाची उत्तर तिला शोधण्यासाठी ती त्या माणसाच्या मागे मागे जाते. ती मागे मागे जात असताना तिला ते वेगळ विश्व दिसत त्यात अर्ध गोलाकार अस कवच दिसत, त्या खाली आपण चालतोय, वरती बघते तर अवकाशाचे रंग बदलत असतात. त्यात तिला कधी पक्षी दिसतात ते पाहून तिला बर वाटल आणि अचानक एक भयानक पपक्षी येतो आणि आग भडकून जातो, तेव्हा सारा घाबरते, ती अक्षरशा खाली पडते. पुढे बघते तर तिच्या सोबतचा माणूस असतो तो तिला दिसत नाही. तो कुठे तरी निघून गेला असतो. “ मिस सारा तुमच आमच्या गेम मध्ये स्वागत आहेत, आता तुम्ही रूम नंबर A-444 मध्ये तुम्ही प्रवेश करा, तुमच्या सोबत आमचे सर बोलायला येतील “. आता हा कोणता गेम आहे हे सारा ला कळत नसत, तिला सगळ्या प्रश्नाची उत्तर हवी होती आणि तिला काय कराव सुचत नसत, तिच्या समोर त्यांनी भरपेठ नास्ता ठेवला असताना पण तिला काही खायची इच्छा होत नव्हती. कारण तिला आता ह्या मधून उत्तर हवी होती.
अचानक रूम चा दरवाजा उघडतो आणि बघते तर कोणी तरी धिप्पाड,वजनदार, काळ्या रंगाचा सूट ब्राऊन रंगाची Pant, लाल रंगाचा टाय घालून असतो , डोक्यावर एक मोठी टोपी असते जेणेकरून तो आपले कमी केस लपवेल असे , माणूस तिच्या समोर हळू हळू चालत येतो , “Welcome to Game dear Saara” त्याचा तो घोगरा आवाज ऐकून तिचा जीव धडधडायला लागला. आपण कुठे आलोय आणि आपल्यालाच का अस बोलावलय हे तिला कळत नसत.
तो माणूस : अग काहीतरी घे ना?
सारा : नाही नकोय मला भूक नाही आहे
तो माणूस : अस कस अजून तर तुला खूप खडतर प्रवास करायचं म्हणून पोट भरलेलं राहू दे
सारा : म्हणजे मला काही समजल नाही मला समजेल अस बोला ना....(थोडी संतापून बोलते )
तो माणूस: अरे आता एवढ्यातच काय संपतातेयस अजून तर खूप काही करायचं
सारा : आता बस झाल तुम्ही मला काही सांगणार आहात कि नाही ..??

(सारा तीची बग घेते आणि निघायला सुरुवात करते तिला दिलेल्या आयडी वरून ती बाहेर जायच तरी करते पण तिला समजत नसते कि आपण का जात नाही तेव्हड्यात तिच्या समोरची व्यक्ती बोलते )
तो माणूस : सारा तुझे आयडी तात्पुरते ब्लोक केले आहेत त्यामुळे तुला जाता येणार नाही.

(साराला काही सुचत नसत तिला पूर्ण पणे तिच्यासमोर अंधार दिसत असतो आता सारा काय