दोष कुणाचा? Bharti Shah द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

दोष कुणाचा?

सकाळची प्रसन्न वेळ होती. नेहमीच्या कार्यालयीन कामाला सुरवात झाली होती. नेहमीप्रमाणेच ओ.पी. डीत महीलांची प्रसुतीपूर्व तपासणीसाठी गर्दी होती. त्यात पूर्वी तपासणीसाठी आलेल्या गरोदर महिला एच. आय. व्ही. रिपार्ट घ्यायला आलेल्या होत्या. ठरावीक सरावाने रिपोर्ट देणे आणि आवश्यक मार्गदर्शन देणे सुरू होते. त्यात रीपोर्ट लिहीता लिहीता माझा हात अडखळला 'पॉझेटीव्ह' भी मान वर करून पाहील. साधी सरळ, मोठ्या डोळ्यांची निरागस चेहरा, लाजाळू व्यक्तीमत्वाची नुकतच लग्न झालेली 20 वर्षाची तरुणी माझ्याकडे पाहात होती. चेहरा हसरा होता. तीला रीपोर्टबद्दल कसं सांगाव ? याबद्दल मी विचार केला व हळूच तीला नेहमीच्या सरावाने विचारल "उमा ! त्या दिवशी मी जी माहीती दिली ती कशाबद्दल आठवते ? "हो बाई, एड्सबद्दल " .तुला ती व्यवस्थीत समजली होती ? तिने नुसतीच होकारार्थी मान हलवीली. मग तुला माहीत आहे की चार प्रकारे एच.आय.व्ही जंतूचा संसर्ग होऊ शकतो. एकतर असुरक्षित लैंगिक संबंधाद्वारे, किंवा एच. आय व्ही. संक्रमीत रक्त व स्क्त पदार्थ घेतल्याने, कींवा निर्जंतूक न केलेल्या सुया । सिरिंजेस / लॅन्सेट्स वापरल्याने आणि एच आय व्ही संक्रमीत मातेकडून तिच्या बाळाला. हो मॅडम तुम्ही मागच्या आठवड्यात हे सांगीतल होत. उमा, त्यावेळी मी तुम्हांला परीणामांचीही कल्पना दिली होती ? होना! ती शांतपणे म्हणाली "हो मॅडम"'. मला तीच्यात थोडीही घबराहट चलबीचल जाणवली नाही. जणू ती आश्वत होती की आपल्याला हा संर्संग होणारच नाही.

'उमा तुझे लग्नापूर्वी कोणावर प्रेम होते का ?" "नाही मॅड़म "; मी जास्त शिकली नाही फक्त दहावी शिकले नंतर घरीच राहात होती. उमा लग्ना पूर्वी तुझे कोणाशी शारीरीक संबंध आले का? किंवा तुझ्यावर लहान असतांना जबरदस्ती वैगरे कोणी नातेवाईकानी केली का ? ती फक्त नाही म्हणाली. आता तीचा चेहरा एकदम निर्विकार होता . उमा तुला एच. आय. ही जंतूसंसर्ग झालेला आहे. हे सांगीतल्यावर मी थांबले, तिच्याकडे पाहाले. ती हसली आणि तीने रीपार्ट हातात घेतला. हे अगदीच अनपेक्षीत होत. एच. आय. व्ही पॉझेटीव्ह रिपोर्ट कोणी हसत स्वीकारू शकतो ? तिला, तीच्या नवऱ्याला पुढच्या आठवड्यात तपासणीसाठी घेऊन येण्याचा सल्ला दिला. ती शांतपणे पुढच्या प्रसुतीपूर्व तपासण्या करण्यासाठी गेली. मीच एका चक्रव्युहात अडकले ती गेली तरी तीचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नव्हता. मी विचार केला तिला आणखी वेळ दयायला हवा होता. कदाचीत यापूर्वी केलेले समुपदेशन तिच्यापर्यंत पोहचले नसावे. तीला त्याच्या गांभीर्याची कल्पनाच नसावी. परंतू तीच्या चेहरा आणि देहबोलीवरून ती अज्ञानी असावी असही वाटत नव्हत. नक्कीच काहीतरी वेगळ होत. असं नाही की , ती पहीलीच पांझेटीव्ह केस होती. आठवड्यात 2-3 केसेस येत होत्या. रीपोर्ट अनपेक्षीत आणि दुःखदायक म्हणूनच स्विकारला जात होता कारण बहुतेक वेळा त्यांच्या हातून धोक्याच वर्तन घडले नव्हत. त्यांना रिपोर्ट निगेटीव्ह येईल अशी खात्री असतांना अनपेक्षीत पणे पॉसेटीव्ह रिपोर्ट हातात आल्याच क्लेशकारक दुःख स्पष्ट दिसत असे. अशावेळी त्यांना स्वतःवर संयम ठेवण कठीण जायच. अश्रुंना वाट मोकळी करून दिली जायची. आघात ओसरल्यावर कार्यकर्ती आवश्यक मानसीक आधार, सांन्तवण देऊन पुढे घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत असे. पण आजची उमाची प्रतीक्रीया मलाच अनपेक्षीत होती. १५ दिवसांनी उमा तिच्या नवऱ्याला सोबत घेऊन आली. दोघही अतिशय सामान्य होते. मी तिच्या नव-याशी संवाद साधल्यावर माहीती मिळाली ती अशी , "मॅडम मी लग्नापूर्वीय उमाच्या घरच्यांना मी एच. आय. व्ही संसर्ग ग्रस्त आहे हे स्पष्ट सांगीतल होत. आणि हे माहीत असुनही त्यांनी तीच लग्न माझ्याशी लावलं" हे सांगतांना त्याने त्याचे लग्नापूर्वी वेश्यागमन झाले होते अशी माहीती दिली. परंतू ही गोष्ट त्याने उमाला सांगीतली नव्हती आणि कार्यकर्तीनेही ही माहीती तिला सांगु नये अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. अर्थात त्यांची विश्वासहार्यता पाळण मला भाग होत. तिच्या नव-याच्या मते तिने स्वखुषीने माझ्याशी लग्न केले आहे. या पार्श्वभुमीवर मी अर्न्तमुख झाले. असं का झाल असाव ? त्यांच हे प्रेमलग्न नव्हत तर रितसर लग्न झालं होत. मी तिच्या नवऱ्याला विचारल की 'तुम्हाला असं नाही वाटत का, की तुम्ही स्वतःच्या चुकीसाठी दुसऱ्याच जीवन पणाला लावता आहात ? त्यावर तो फक्त हसला म्हणाला माझी चुक नाही मी त्यांना आधीच कल्पना दिली होती, कुठलीही जबरदस्ती नव्हती' कदाचीत 'त्यांना 'एडस' बद्दल माहीती नसेल? माझी चौकशी ."माझ्या एच.आय.व्ही पॉझेटीव्ह असल्याबद्द सांगीतल्यावर त्यांनी संपूर्ण माहीती मिळवीली होती. तिला आई, वडील, भाऊ, बहीणी सर्वच आहेत. हे लग्न सर्वांच्या संमतीने झालेल आहे. माझा आरोप त्याला झोंबला होता. त्याच्या स्पष्टीकरना नंतर बोलायला किंवा विचारायला काही शिल्लक नव्हत. तरी मनात कुठेतरी सलत होत, शंका होती, सर्व माहीती असतांना स्वतःच्या हातांनी आईवडील मुलीला असं सर्वनाशाकडे कसे लोटू शकले ? काय कारण असाव? अशी कोणती मजबुरी असावी की त्यांनी तिला मृत्यूच्या दाढेत ढकललं. तिच वयही जास्त नाही.

दुसऱ्या महिण्यात जेव्हा पुन्हा ती प्रसुतीपूर्व तपासणीसाठी आणि नवऱ्याचा रिपोर्ट घ्यायला आली तेव्हा मी परत तीला समुपदेशनाला घेऊन बसले. यावेळी मी ठरवल होत की सत्य काय ते जाणून घ्यायचच .तिच्या प्रकृतीची चौकशी केली तीला खाण्या पिण्याविषयी मार्गदर्शन केले. नंतर तिला विश्वासात घेऊन विचारले की "उमा तुझ्या नवयोशी बोलल्यावर कळल की त्यांनी ते एच. आय व्ही बाधीत आहेत हे तुम्हांला लग्नापूर्वीच सांगीतल होत. हे खर आहे का? उमा हो म्हणाली. मी तिला विचारल त्यावेळी तुला एच. आय व्ही ची लागण झाली म्हणजे काय? याबद्दलची माहीती होती का? " त्यावर ती म्हणाली की यांनी सांगीतल्यावर घरच्यांनी ती मिळवली. "आणि तरही तु आणि घरच्यांनी लग्नाला संमती दिली? उमा, माझ्यावर विश्वास असेल तर मला तुझ्या मनाताल सांग त्यांने तुला बर वाटेल. तुझ हे वरवरच हसण आतमध्ये अनंत दुःख लपवित आहे. असं करू नकोस इथे आम्ही तुम्हाला आधार दयायला आहोत , हे सांगतांना मी तिचा हात हातात घेतला. आणि यावेळी उमा ढसाढसा रडायला लागली. मी फक्त तीच्या पाठीवरून हात फिरवत होते. तिला रडण आवश्यक होत. सतत मनात दुःख दाबुन तिने मनाचा कोंडमारा सहन केलेला होता. काही वेळ रडल्यावर ती सावरली. पाणी पिल्यावर मी फक्त तीच्याकडे विश्वासाने पाहात होते. तिला स्वत:हुन बोलायचं होत. मी तिच्यावर कोणताही दबाव आणला नव्हता, फक्त तीला आधार दिला होता. आणि तीने तो पकडला होता. दोन मिनिटांनी तीने सावकाश बोलायला सुरुवात केली. ताई, आम्ही पांच बहीणी, एक भाऊ. घरी शेती आहे, अगदी थोडीशी. त्यात मी सर्वात मोठी. शिक्षण अर्धवट. बऱ्याच खटपटीनंतर लग्न जमल. या लोकांनी हुंडा मागीतला नाही. आमच्यात खुप हुंडा मागतात. देण्याघेण्याच्याही कुठल्याच अटी नव्हत्या. इतर बऱ्याच स्थळांचा नकार हुंड्यामुळेच आला होता. त्यामुळे घरच्यांनी लगेच लग्न नक्की केल साखरपुडा झाला. त्यानंतर १५ दिवसांनी ते घरी आले आणि माझ्या वडीलांना एच. आय. व्ही संसर्गाबद्दल सांगीतलं. मी तर सुन्नच झाले. घरच्यांनी माहीती काढली. मला कोणी विचारलच नाही. घरच्यांच्या चाललेल्या चर्चेतून माझ्या लक्षात आल की, आता लग्न मोडल तर ? साखरपुडा झालेला आहे, लोक मुलीतच खोट काढतात. खालच्या चार बहीणीं च्या लग्नाच काय? हिच एकदा लग्न मोडल्यावर पुन्हा लग्न कस जुळेल ? घरची गरीबी, हुंड्याला पैसा नाही. शेवटी लग्न करायच ठरल. आणि मी मन पक्क केल. तुम्ही त्या दिवशी माहिती दिली त्यानंतर मला माझ्याबद्दल नाही पण माझ्या बाळाबद्दल चिन्ता लागुन राहीली आहे. माझ्या बाळाला ही लागण व्हायला नको. माझ काहीही हो पर्वा नाही, स्वतःसाठी मी काहीही सहन करायला तयार आहे. माझ्या बाळाला निरोगी जिवन मिळालं पाहिजे. कार्यकर्तीने तिला चाचणीपश्चात समुपदेशन केल. तिला सांगीतल की बाळांतपणापुर्वि तुला 'नेव्ही रॅपीन' नावाच औषध लगेच देण्यात येईल व जन्मानंतर बाळाला लगेच हे औषध पाजण्यात येईल त्यामुळे आपण बाळाला संपर्क होण्याच टाळू शकु. ती आश्वस्त झाली. आता फक्त तु तुझ्या जेवण खाण्याकडे लक्ष हे. चिन्ता करू नको इत्यादी. तिने तिच्या शंकांच समाधान करून घेतल आणि ती गेली.

अशा कितीतरी उमा आज आपल्या समाजात आपल दुःख गीळून वरवर हसत जिवन जगत आहेत. त्यात त्यांचा दोष काय ? मुलगा हुशारीन वागला तो स्वतः एच. आय. व्ही बाधीत असतांना त्याने विवाह करायला नको होता. स्वतः बाधीत असल्याची माहीती त्याने साखरपूडा होईपर्यंत लपवली अशीच मुलगी शोधली जीच्या लहान बहीणी लग्नाच्या आहेत. गरीबीची परीस्थीती आहे. साखरपुडा झाल्यावर मी एच. आय. व्ही बाधीन आहे हे सांगण्यात मी त्यांना पुर्वकल्पना दिली होती, हे मानसिक समाधान त्याने मिळवल. त्याला लग्न तोडायच नव्हत. जर असं असत तर त्यांनी विवाह ठरविण्याच्या वेळीच हे सांगीतल असत. कुंटुंबातील आई, वडील लाचार, सामाजिक राढी, बंधन, संस्कांर यांनी जखडलेली. त्यात गरीबी आणि कौटुंबीक जवाबदा-यांनी घेरलेले. त्यांनी एकप्रकारे आपल्या मुलीचा बळीच दिला. खालच्या चार बहीणींसाठी तीही वेदीवर चढायला तयार झाली, अगतीकपणे आज २१ व्या शतकातही मुलीला विशेष महत्व दिल्या जात नाही. तिचा निर्णय तोही लग्नासारख्या महत्वाच्या, तिच्या जिवनाला कलाटणी देणा-या घटणेबाबतही तीला विचारलं जात नाही. 'मुलगा हवा यासाठी कुटुंबात मुलींची संख्या वाढत जाते. स्वतःचा मान अपमान, अब्रु, लोक काय म्हणतील ? यावरच जास्त भर दिला जातो. मुली स्वतः सक्षम नसल्याने अपूऱ्या शिक्षणाने स्वतःतही आत्मविश्वासाची कमी, सतत दुसऱ्यांवर अवलंबुन होण्याची सवय तीला स्वयंपूर्ण बनुच देत नाहीत. त्यात दोष कुणाचा ? याचा निर्णय मी वाचकांवर सोडते तुम्हीच ठरवा.