संघर्ष - 1 Akash द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संघर्ष - 1

माणसाच्या जन्मा पासून त्याच्या जीवनाचा शेवटच्या स्वासापर्यंत त्याचा संघर्ष चालू असतो. प्रत्येकाच्या जीवनातील संघर्ष हा वेगळा वेगळा आणि कमी जास्त असतो पण असतोच.या संघर्ष पासून कोणाचीच सुटका नाही.खुद्द देवाला पण हे टाळता आला नाही मग आपण सामान्य माणूस कोण.? असा विचार मला येतो....
आसाच एका मुलाच्या जीवनातील त्याचे संघर्षमय जीवन
त्याची
मी तुम्हाला कथा किवा त्याचे जीवन कसे संघर्षमय होते ते सांगतो..
अमन हा
गरीब घरा मध्ये जन्मला आला होता. गरीब मंजे झोपडपट्टी च होती ती. वडील
दारू पिण्या मध्ये गेलेले कसाबस त्याचे घर चालत होते.त्याचे आजोबा तर कधीच वारलेले आज्जी धूनी भांडी करत होती आणि आई पण तेच काम करत होती.त्याची खूप इच्छा होती की याने शिकून खूप मोठे व्हावे
आई काय शिकली न्हवती आज्जी तर जुन्या काळा मधली त्या मुळे तिचा आणि शिक्षणाचा काय दूर दूर पर्यंत समंध न्हवता राहिले त्याचे वडील मंजे सदा अमन चा वडलाचे नाव सदाराम होते.त्यांनी सातवी मध्येच शाळा सुंडून कामाला लागला होता.त्याचे वडील अपघाता मध्ये वारल्या मुळे सदाच्या घरची परिस्थिती ही तेवढी काय चांगली न्हवती.त्याला शिकायचे होते पण त्याच्या आई चे कान कोणी तरी भरवले होते .शिकून कोण मोठा झाले आहे. सदाला कामाला पाठव मंजे पैसे पण कमविल आणि कोणाच्या वाईट संगतीत पण पडणार नाही.असे सदाचा आई ल कोणी काय तर सागितले आणि ती ने त्याचे शिक्षण बंद करून त्याला कामाला पाठवले.एका हॉटेल मध्ये लोकांची उष्टी चहा कप उचलायला. आता तो काम करत असल्या मुळे त्याच्या हातात पैसा येऊ लागला होता.ज्या वय मध्ये त्याच्या हाता मध्ये वही पेन पाहिजे होता त्या वयात पैसा आला आणि जे नको व्हायला होतं तेच झाले.तो त्या पैशा मुळे वाईट संगतीला लागला होता. आणि त्यातून तो कधी बाहेर पडूच शकला नाही .
त्याच्या आईला कळले होते की पैश पेक्षा जास्त महत्त्वाचे मंजे आपले संस्कार आणि शिक्षण आहे पण आता काय खूप उशीर झाला होता.सदा काय सुधारण्याच्या परिस्थिती मध्ये न्हवता
सदा ला तरी कसा दोष द्याचं जा वयामध्ये त्याला शाळे मध्ये असायला हवे होते त्या वय मध्ये तो हॉटेल मध्ये काम करत होता.जा हाता मध्ये पुस्तक असायला हवे होते त्या हातामधे लोकाची उष्टी खरकटी होती.जा वया मध्ये पाठीवर शाळेचे दप्तर पाहिजे होते त्या वयात त्याच्या खांद्यावर जबाबदारीचा ओझ टाकण्यात आले होते. तो हे ओझ झेलू शकेल की नाही याचा विचार न करता.
त्याच्या आईला किंवा सदाला समजाऊन सांगणारे कोणी नाही ना शिक्षणाचे महत्व पटवून देणारे कोणी
त्याच्या मनाला त्या लहान वयात होणारे वेदना आपण समजू नाही शकत कारण जाला ते होते तोच तो वेदना समजू शकतो.त्या कमी वयात तेवढी मोठी जिम्मेदारी आणि त्यात ते संगत वाईट लोकाची काय होणार होते मग.
मी पहिला बोल्या प्रमाणे प्रत्येकाचे संघर्ष हे वेगळे काही त्यात लढून पुढे जातात तर काही त्यात मारून तिथेच राहतात त्यातला हा सदा लहानपणीच या संघर्ष मध्ये हरला
आता रोज घरी येऊन आई आणि बायको सोबत युद्ध करायचा . शेजारच्या ना ते खूप गमतीचे वाटायचे सोडवायला तर कोणी येत न्हवते पण लांबूनच माजा बघायचे त्याची आई आणि बायको सदा दारू पीत असल्या मुळे त्याला कधी समजूनच नाही घेतले त्यांना तो दारू पितो येवढेच माहिती होते.
दारू पिणे हे खूप वाईटच गोष्ट आहे. पण तो दारू का पितो याचा त्यांनी कधी विचारच केला नाही.ते तरी कसे करणार त्याची तेवढी समज न्हवती त्याच्या मध्ये. काम करणे पोट भरणे हेच त्याचे जीवन कोण समजाऊन सांगणार त्यांना समजाऊन सागितले तरी त्यांना समजणार होते का ? जा परिस्थितीत त्यांनी त्याचे पूर्ण आयुष काढेल ते तसेच होते जसे त्यांनी सुरुवात केली होती
एक दिवस तसेच सदा खूप दारू पिऊन घरी आला अमन अभ्यास करत बसला होता . सदा त्याच्या जवळ जाऊन बसला