अनोखे प्रेम - 3 Priya द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनोखे प्रेम - 3

Hello friends.. मागच्या 2nd part मध्ये आपण पाहिलं कि दोघांनीही एकमेकांना विसरून जायचं ठरवलं परंतु हे शक्य होईल का.. ते खरंच एकमेकांना विसरून जातील का.. कि नशीब पुन्हा त्यांची भेट घडवून आणेल..या story मध्ये थोडासा twist आहे. अशीच स्टोरी वाचत राहा... Enjoy करताय कि नाही ते नक्कीच comment मध्ये कळवा.. धन्यवाद 🙏🏻
घरी आल्यानंतर सोनूच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते..राहून राहून मुक्तारचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. मुक्तारच कोणी नाव जरी घेतलं तरी तिला समजेनास झालं होत... तिला मुक्तार शिवाय काहीच सुचत नव्हतं... आणि मुक्तारची ही condition तीच होती. तो ही विचार करत होता आजपर्यंत मला अस कधीच झालं नाही.. तिच्या नसण्याने मला एवढा का त्रास होत आहे. त्याला ही खूप त्रास होत होता.
काही दिवस असेच लोटले. दोघेही एकमेकांना हळूहळू विसरण्याचा प्रयत्न करत होते.. दोघांनीही आपल्या कामावर concentrate केल होत. योगायोगच समजावा लागेल कि काही दिवसांनी मुक्तार शो वरून घरी जात असताना सोनूची ताई बघते आणि त्याला घरी बोलवते. तो ही घरी येतो. त्याची द्विधा मनस्थिती झालेली असते. आणि सोनू ही जेव्हा मुक्तार ला घरी आलेलं पाहते.. तेव्हा तिला काय करू हे सुचत नाही. पण त्याच्यासमोर यायचं तिला कोडं पडलं होत.. कारण तिच्या चेहऱ्यावर्ती mosquito चावल्यामुळे तिचा चेहरा थोडासा सुजलेला होता. तरीही तिला खूप आनंद झाल्याने ती त्याला पाहुणचार देण्यासाठी पाण्याचा glass घेऊन जाते. त्यालाही सोनू समोर आल्यानंतर खूप आनंद होतो. जणू त्याचा आनंद गगनात मावत नाही. तो आतमध्ये येतो.. सोनूची mummy चहा घेऊन येते आणि सोनू biscuit😁... तो घरी आल्यानंतर काय करू काय नको असेल होत होत सोनूला. दोघेही एकमेकांना पाहून स्मिथ हास्य देत होते.. दोघेही थोडेसे लाजून स्मित हास्य देत होते. थोडा वेळ थांबून परत मुक्तार घरी जायला निघाला. तस सोनूचा चेहरा पडला... ती परत नाराज झाली😔... आणि तोही काही खूप नव्हता बर.. त्याला तरी कुठे घरी जायचं होत. परंतु, आपल्या घरी हे जावं लागणारच होत. त्यामुळे सर्वांना सांगून मुक्तार घरी गेला.. सोनूची अवस्था परत तीच. रडून रडून तिचे डोळे सुजले होते.. तापाने अंग भाजत होते.. पण याच कारण कोणाला माहिती नव्हतं... थोडे दिवस दवाखाना केल्या नंतर सोनू पुन्हा पहिल्यासारखी ठणठणीत झाली... ती दिसायला जरी ठणठणीत झाली होती पण आतून ती पूर्ण तुटून गेली होती.. स्वतःच दुःख कोणाला सांगू पण शकत नव्हती 😥... शेवटी तिने स्वतःशीच पक्का निर्णय केला. कितीही काहीही झालं तरी आता परत मुक्तार चा विषय डोक्यात घ्यायचा नाही. आपण आपल्या study वरती concentrate करायचं. आणि तिने तस करायचं ठरवलं... तिने आपला study करण्यास सुरुवात केली.
मुक्तारच नाव जरी घेतलं तरी तिला आतून खूप दुःख होत होत. पण तिने स्वतःवर खूप control केल होत. आणि आता हळूहळू ती मुक्तार ला विसरली होती. पण ही कंडिशन accept करायला मुक्तार तयार नव्हता.. त्याला खूप त्रास होत होता. नेमकं त्याच्यासोबत काय होतय हे त्यालाच समजत नव्हतं. पण त्यालाही सोनूला विसरण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण दोघे ही एकमेकांना like करत होते हे नक्कीच.. परंतु, दोघांनीही ती गोष्ट एकमेकांना कळू दिलेली नव्हती.. त्यामुळे दोघांनाही clear समजत नव्हतं. 8 महिन्यात खूप change झाला होता. दोघेही एकमेकांना विसरून गेले होते. परंतु म्हणतात ना पहिलं प्रेम कधीच विसरता येत नसत. तशीच काहीशी अवस्था या दोघांची होती😊.
Friend's आजचा part कसा वाटला हे नक्कीच comment मध्ये कळवा🙏🏻.. असेच मजेत राहा.. खुश राहा 😊😘.. येणारे parts वाचून enjoy करत राहा.