अ परफेक्ट मर्डर - भाग १ ऋषिकेश द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अ परफेक्ट मर्डर - भाग १

अ परफेक्ट मर्डर - भाग १

प्रवीण इंजिनीअरिंग करून जॉबला लागला, 1 वर्ष झाले असेल की अचानक त्याच्या काकांनी त्यांच्या नात्यातील मुलीचे स्थळ आणले. पहिल्यांदाच न पाहता नकार देणे हे प्रभाकरराव म्हणजेच प्रवीण चे वडील याना पटेना. त्यांनी अश्विनी म्हणजेच प्रवीण च्या आई बरोबर बोलायचे ठरवले. 2-3 दिवस प्रवीणच्या नकळत त्यांची चर्चा चालू होती. शेवटी ठरले की कमीतकमी मुलगी तरी पाह्यला जाऊयात.

"प्रवीण आज ऑफिस मधून यायला उशीर झाला" अश्विनी

"हो आई, आज क्लायंट सोबत मीटिंग होती, त्यामुळे जर उशीर झाला"

"मला खूप भूक लागली आहे, पोहे कर ना गरमागरम" प्रवीण

"हो करते लगेच तू फ्रेश होऊन घे आधी"

"हो आलोच 2 मिनिटात" असे म्हणून प्रवीण त्याच्या रूम मध्ये गेला. बॅग जागेवर ठेवली, मोबाइल चार्जिंग ल लावला आणि बाथरूम मध्ये जाऊन अंघोळ करून बाहेर निघाला.

"अरे व पोह्यांचा वास मस्त येतोय, पटकन दे आई पोटात कावळे ओरडायला लागलेत"

"हो झालेत बाबांना आवाज दे आणि टेबल वर बसून घ्या"

"बाबा पोहे खायला या, झालेत" प्रवीण

"काय प्रवीण कसा चाललंय जॉब?" काहीतरी बोलायचे म्हणून प्रभारकररावांनी सुरवात केली

"चाललाय रुटीन प्रमाणे, कंपनी बदलाचा विचार चाललंय बेसिक सर्व शिकून झालाय" प्रवीण

इतक्यात कंपनी नको बदलूस अजून निदान 1 वर्ष अनुभव घे मग विचार कर, करण तुझ्या रेझ्यूम वर बॅड इम्प्रेसशन पडेल. समोरील कंपनी विचार करते या बारीक गोष्टींचा असा सल्ला प्रभाकररावांनी दिला.

हे घ्या पोहे असे म्हणत ट्रे मधून 3 डीशेस आणत आई खुर्चीवर बसली. आज पोहे मस्त झालेत आणि वरती कुरकुरीत तळलेल्या पोह्यांनी तर खूप मस्त चव येतेय, एव्हाना प्रवीण ने पोह्यांवर ताव मारायला सुरुवात केली. प्रवीण तुझ्या मित्राचा लग्न कधी आहे रे? आईने प्रश्न केला. "पुढच्या महिन्यात आहे 20 तारखेला." प्रवीण

"तुझा काय विचार आहे?....लग्नाचा" बाबांनी आढेवेढे न घेता डायरेक्ट अटॅक केला😎. करणार आहे की अजून मला 25 वे वर्ष चालू आहे, थोडा सेटल झालो की पाहू पण बाबा आज अचानक लग्नाचा प्रश्न? या प्रश्नावर प्रभाकरराव थोडे गडबडले, नाही रे सहज विचारलं म्हणून त्यांनी पोहे खायला सुरवात केली.

"अरे आपले पंडित काका नाही का शिरूर चे, त्यांच्या चुलत भावाची मुलगी डिप्लोमा लास्ट इयर ला आहे, ते विचारात होते तुझ्याबद्दल" आता आईने डायरेक्ट पॉईंट मांडला.

आई नको ना एवढ्या लवकर अजून मला सेटल व्हायला थोडा वेळ पाहिजे....नंतर पाहू की...अजून मला 25 वे वर्ष चालू आहे... अशी करणे देऊन प्रवीण पोहे खाऊ लागला.

"अरे फक्त मुलगी पाह्यला तर जायच आहे कुठे, लगेच उद्या लग्न कारायचा आहे?" आणि असेही आम्ही रविवारी पाहायला येणार आहोत असे कळवले आहे असे बोलून आई आणि बाबा प्रवीणकडे पाहू लागले.

असे मला न विचारता प्लॅन नाका बनवत जाऊ, या संडे ला आम्ही मित्र ट्रेकिंग ला जाणार होतो प्रवीण नाराजीच्या सुरात म्हणला. अरे 3 तासाच लागणार आहे आपल्याला हे गेलो की हे आलो बाबांनी सुरवात केली. ठीक आहे, तुम्ही रविवार सांगितला आहे म्हणून आपण जाऊयात पण पुढच्या वेळी मी अचानक असा नाही माझे प्लॅन कॅन्सल करणार. ठीक आहे असे बोलून आई आणि बाबा दोघेही हसले.

◆◆◆◆◆◆◆

आई मी पल्लवी कडे चाललेय नोट्स आणायला, मी जेवयाला येईल 8 वाजेपार्यंत असे म्हणत कविताने स्कुटी ला स्टार्ट केली. ठीक आहे उशीर नको करुस असे म्हणत वनिता म्हणजे कविताची आई बाहेर येईपर्यंत कविता निघाली पण.

"अहो ऐकता का?"वनिता

"आतापर्यंत ऐकतच आलोय" असे म्हणत रामराव खुर्चीमधून उठले.

"पंडित भाऊजी काही म्हणले का म्हणजे तसे कविता ला सांगायला"

"अगं हो तुला सांगायचे विसरलो, मूलाकडचे घेऊन ते रविवारी येणार आहेत"

"बरा झाला आज सांगितलं अजून 5 दिवस आहेत"वनिता

"हो आज कवीता अली की तिच्याबरोबर बोलूया" रामराव

संध्याकाळी कविताला घरी यायला 7:30 वाजले. फ्रेश होऊन ती बेडरूममध्ये बसली होती.

"कविता जर बाहेर ये" रामराव

"आले बाबा"

कविता बाहेर येऊन सोफ्यावर बसली, आपल्या घरी रविवारी पाहुणे येणार आहेत...रामरावांनी सुरवात केली. मग?
रामरावांनी वनिता कडे पाहिले, अरे बाळ तुला पाह्यला येणार आहेत.

'बाबा नको ना अजून मला शिक्षण पूर्ण कारायच आहे, एवढ्या लवकर नको ना लग्न'

अग लगेच थोडी होते लग्न, आवडणे, स्वभाव, परिस्तिथी आशा खूप गोष्टी असतात. पाहायला के हरकत आहे, आईने पुष्टी केली.

बरं तुमचा ठरलं आहे तर ठीक आहे, पाहुयात रविवारी असे म्हणून कविता मोबाईल खेळत बसली....

■■■■■■■