Rakt Pishachchh - 3 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ - भाग 3

॥ रक्त पिशाच्छ ॥ भाग 3

लेखक :जयेश झोमटे( जेय)

ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीता बनवली गेली आहे,

गरोदर स्त्री किंवा हदयाविषयी त्रास असणा-यांसाठी ही कथा नाही.������

वर आकाशातुन काळ्या ढगांमधुन पाण्याचा मारा सुरु होता.टप-टप आवाज करत थेंब घोडागाडीच्या मागच्या डब्ब्या वर आदळत होते.

जैक आणि रीना दोघांचही रोमान्स त्या मशालीच्या तांबड्या उजेडात

सुरु झाला होता.तो मशालीचा तांबडा प्रकाश रिनाच्या पांढरट त्वचेच्या पुर्णत शरीरावर मादकपणे झलकत होता. जैकने रिनाच्या ड्रेसच्या खांद्यावर असलेल्या पट्टीला दातात धरुन खाली-खाली आणायला सुरुवात केली होती.तसे-तसे तिच्या दुग्ध त्वचेच शरीर नी वक्षस्थळांवरचा भाग दिसायला सुरु झाल होत.तिच्या मध्यमआकाराच्या

वक्षस्थळांचा उभार मादकपणे दिसत होत.आणि पुढच्याचक्षणाला ते शरीर निवस्त्र होणार.की तोच छम-छम आवाज करत पुढे-पुढे जाणारी ती घोडागाडी एक छोठासा धक्का लागून थांबली गेली.

" घोडागाडी का थांबली?" रिना अचानक म्हणाली. आणि तिच्या ह्या वाक्यासरशी त्या घोडागाडीच्या दरवाज्यावर एक जोराची थाप पडली.त्या अचानक पडलेल्या त्या थापेने ते दोघेही काहीक्षण दचकळेच.परंतु पुढच्याचक्षणाला दोघेही सावरले.रिनाने आपले कपडे निट केले.तसे जैकने हळुच दरवाजा उघडला.दरवाजा उघडताच

कंदीलाच्या तांबड्या प्रकाशात पावसात उभा सुरकुतलेल्या चेह-याचा म्हातारा त्या दोघांच्या नजरेस दिसुन आला.त्या म्हाता-याच पुर्णत शरीर पाण्याने भिजल होत.क्षणाला.-क्षणाला विज चमकत होती, ज्याने आजुबाजुची झाड सर्वकाही नजरेस दिसुन येत होती.

" साहेब! राहाझगड गावात जाण्यासाठी लागणार पुल पाण्याखाली गेलाय, म्हणून गाडी पुढ जाऊ शकत नाय.थोडवेळ थांबलो तर काहीतरी होऊ शकत.!" तो म्हातारा खोल गेलेल्या आवाजात म्हणाला. तसे त्याच्या ह्या वाक्यावर

जैकने फक्त" ठिक आहे "अस म्हंणतच , त्या म्हाता-याच्या दिशेने पाहिल.जैकला त्या म्हाता-या कडे पाहताच त्याच्या मागे तीस-पस्तीस मीटर अंतरावर झाडाझुडपांजवळ एक तबेला दिसला.मोठ-मोठ्या फळ्यांच्या लाकडांपासुन बनवलेला तबेला.एकवेळ जैकने त्या तबेल्याकडे पाहिल मग रिनाकडेपाहील, त्याच्या मनात काय आहे हे रिना लागलीच समजुन गेली.आणी पुन्हा गालातच हसली.जैकने हळुच आपला कोट काढला आणि रिनाच्या डोक्यावर ठेवला.

" तुम्ही खुप भिजला आहात! ह्या घोडागाडीत बसा!आम्ही तों पर्यंत त्या तब्याळ्यात आहोत."

जैक त्या म्हाता-याला म्हणाला.आणि त्याच्या ह्या वाक्यावर त्या म्हाता-याने फक्त होकारार्थी मान हलवली.आणि जैक व रिना दोघेही त्या तबेल्याच्या दिशेने निघुन गेले.

=====================

काळ-जल नदीच्या दुस-या बाजुला असलेल्या, त्या झाडाझुडपांनी वेढलेल्या गुहे आत वयगु कपाळाला हात लावुन विव्हळतच खालून जमिनीचा आधार घेऊन उभा राहिला.त्याच्या कपाळाला थोडासा मार लागला होता.परंतु त्या थोड्याश्या मारानेही कपाळातुन रक्त ओघळत होत.

" स्स्स ! आई-आई ," वयगुने कपाळाला हात लावतच एकवेळ मागे वळून पाहिल, जिथे विज पडली होती आणि तो झाड ही कोसळला होता.

" च्यायची आ××ची ×××ड ह्या विजेच्या भें×××××त" वयगुने एक शिवी हासडली, लागलीच वळुन पुढे पाहिल.समोर काजळी फासल्या सारखा असुरा राक्षसासारखा चौहीदिशेचा अंधार उभा होता. वयगुने एकवेळ त्या अंधारात पाहिल.बाजुला भिंतीवर मशाल जळत होती.परंतु अंधाकाराजकाची सीमा इतकी गडद -शक्तिशाली होती, की तो तांबडा प्रकाश त्या अंधारी सीमेला भेदू शकत नव्हता.वयगुने पुन्हा एकवेळ हळूच त्या अंधारात पाहिल मग पुन्हा बाजुला जळत असलेल्या त्या मशालीकडे पाहून तीला भिंतीवरुन आपल्या हातात काढुन घेतली.मशाल हातात घेऊन त्याने हळुच अंधारात निट दिसाव ह्याकरीता ती मशाल चेह-या पासुन थोडी जवळ आणली. तसा त्या मशालीच्या तांबडया प्रकाशाने वयगुचा चेहरा ऊजळून निघाला. गुहेच्या द्वारा बाहेर एकावर एक कानठळ्या बसवणा-या विजा चमकल्या जात होत्या. जणु त्या वयगुला पुढील धोक्यापासुन सावध करत होत्या. की नको जाऊस आत ! आतमध्ये तो सैतान आपल्या गाढ निद्रेत निजला आहे, त्याला निजलेलच असुदे.अन्यथा त्याला उठवलस, तर तो तुझ रक्त नी रक्त लुचुन टाकेल.रक्ताचा एकनी एक घोट हवरटा सारखा पिऊन टाकेल.मशाल हाती घेऊन त्या मशालीच्या खाली पडलेल्या तांबड्या प्रकाशात पाहत-पाहत वयगु गुहे आत निघाला.परंतु कशासाठी?त्या गुहेत आपण का चाललो आहोत? त्या गुहेत आपन कशासाठी आलो आहोत? नक्की आपल्याला काय पाहायचंय ? आपन काय करतोय? हे सर्व विचार वयगुच्या डोक्यात येत नव्हते. एका बधिर संमोहित झालेल्या मानवासारखा तो गुहेआत सावजासारखा शिरतच चालला होता.त्याच्या नशीबात नियतीने आज काय लिहील होत. ह्या पासून तो पुर्णत अजाण होता.पुढे जाऊन त्या बिचा-याच काय घडणार होत, हे त्या भाबड्या वयगुला ठावुक ही नव्हत.एका विषारी सापाच्या बिळात हात घातला, तर तो साप डसल्याशिवाय सोडत नसतो.एक दोन मिनीट मशालीच्या तांबड्या प्रकाशात चालुन झाल्यावर वयगुला खाली जमिनीवर पडणा-या मशालीच्या तांबड्या उजेडात दगडाच्या दोन पाय-या दिसल्या. वयगुने हळुच आपल्या हातातली मशाल त्या पायरीच्या दिशेने वाढवली.त्या मशालीच्या प्रकाशात वयगुला अजुन पाय-या दिसुन आल्या आणी त्या सर्व दगडाच्या पाय-या खाली घेऊन जात होत्या.ह्याचा अर्थ खाली नक्कीच तळघर असाव.हातात मशाल घेऊन वयगुने मागचा-पुढचाविचार न करता त्या दगडाच्या पायरीवर पाय ठेवला , आणि ज्याक्षणी त्या पायरीचा स्पर्श वयगुच्या पायाला झाला आकाशात एक जोरदार वीज कडाडली.जंगलातली झाडे हवेने हेलकावे खावु लागली.वातावरणाने जणु क्रोधींत रौद्रअवतार धारण केल.

मशालीच्या तांबड्या प्रकाशात वयगु तळघराची एक-एक पायरी

उतरू लागला.आणि त्या पुढे पुढे पड़णा-या पावलासरशी वयगुच्या डोळ्यांसमोर एक वेगळच दृश्य दिसल जात अंगाला थंडी झोंबु लागली.

खाली एक दगडांपासुन साकारलेल जुन्या काळातल तळघर होत.

मोठ-मोठे दगडी खांब होते, ज्यांवर मशाली-टिटव्या पेटल्या होत्या.

आजुबाजुला साप, विँचु, कोळीष्टके यांच दर्शन घडत होत, परंतु ते सर्व आपल्या जागेवरुन एकटक वयगुकडे शांतपणे पाहत होते बस्स.ज्याने त्यांचा धोका नव्हता.वातावरणात थंडीचा मालकी हक्क कायम पसरलेला, पाय-या संपवुन वयगुने हळुच तळघरात प्रवेश केला.

चौही दिशेना , भिंतींवर आणि खांबांवर लावलेल्या मशालींचा तांबडा प्रकाश तळघरातल दृश्य नजरेस पाडण्यास मदत करत होत.बाहेर

होणा-या विजांचा कड-कडाट आणि पावसाच्या रप रपीचा आवाज ता तळघरात येत नव्हता.त्या तळघरात कधीही न अनुभवलेली विलक्षण शांतता होती.हा तस्ं म्हणायला अधून-मधुन त्या विलक्षण शांततेत सापांच्या फिसकारण्याचा आवाज काय तो येत होता.वयगुची उत्सुकतेने भरलेली नजर त्या तळघरात चौहीदिशेना फिरत होती. तोच त्या फिर-फिरणा-या नजरेस पुढे मंद गतीने वाहणा-या धुक्यात काहीतरी दिसल.वयगुच्या कमरे ऐवढा एक मोठा चौकोनी दगड

पुढे होता आणि त्या दगडावर एक चौकोनी आकाराची लाकडाची कबर होती.कोणी ठेवली होती? का ठेवली होती? आणी आत नक्की होत तरी काय ? आणि ते नक्की जिवंत तरी होत का? त्या लाकडाच्या कबरेला पाहता-पाहताच पुढच्या क्षणाला वयगुने एका संमोहित झालेल्या माणसासारखी त्या दिशेने पावल उचलायला सुरुवात केली. तळघरात पसरलेल्या त्या विलक्षण शांततेने बाहेरचे आवाज कानी येत नव्हते.त्या थंड गारठ्याने वयगुच्या मुखातुन वाफा बाहेर येत होत्या.

पाच-सहा पावल चालुन वयगुने ती कबर गाठली.वयगुने हळुच त्या कबरेच्या खालच्या दिशेने मशाल पुढे सरकवली आणि हळूहळू वर-वर घेऊन येऊ लागला.त्या तांबड्या प्रकाशाने त्या कबरीच रुप दिसुन येत होत.चौकलेटी रंगाची शाही पद्धतीने बनवलेली भक्कम अशी कबर होती.वर-वर येणा-या त्या मशालीच्या तांबड्या प्रकाशात

वयगुला, कबरीची चौकलेटी रंगाची फळी दिसुन येत होती बस्स, की तोच वयगुला त्या प्रकाशात कबरीवर काहीतरी सपाट अस चिकटवलेल दिसल , एक प्राण्याची आकृती होती ती.

" वटवाघळू ?" वयगुला त्या कबरेवर एका वटवाघळूची आकृती दिसली, ती आकृती जरा वेगळी असल्यानेच वयगुला जरा नवल वाटल.कारण समोर कबरेवर असलेली ती वटवाघळूची आकृती, काळी नसुन रक्तासारखी लाल होती.जणु साक्षात रक्ताने न्हाऊन निघाली होती.वयगुने त्या वटवाघळुच्या डोळ्यांत पाहताच ते पिवळ्या रंगाने वमकले.आणि क्षणात तो प्रकाश नाहीसा झाला.जणु समोरच्याला ते भास आहे असं वाटायला हवं! वयगुला ते चमकणारे डोळे दिसले, परंतु जसा प्रकाश नाहिसा झाला त्याला ही हेच वाटलं की आपला भास झाल असेल.मानवाच मन काही अमानविय घटना, दृश्य अनुभवल्या वर नेहमी ह्या आविर्भावात जगत असत, आपल्याला भास झाला असेल.परंतु ते खरच भास असत का? स्मशानात चालताना आप्ल्या मागुन कोणीतरी पाठलाग करत आहे अशी चाहूल लागते , आणि मागे वळून पाहिल्यावर कोणीही नसत.मग हा मानव त्या घटनेला भास समजतो.परंतु ते मुळीच भास नसत,जर त्या नजरेने तुम्ही पाहाल तर त्या जागी तुम्हाला काही अमानविय लहरींची चाहूल दिसुन येईल.परंतु त्याकरीता मनाची तयारी असायली हवी! आहे का तुमच्यात? बरं असूद्या पुढे वाचा. त्या लाल रंगाच्या विचीत्र वटघाळुच्या आकृतीला पाहतच वयगुने उत्सुकतेने त्या दिशेने हात वाढवायला सुरुवात केली. की तेवढ्यातच मागुन एका हवेचा झोत आला आणी एक दोन मशाली झपा-झप विझल्या.मशाली विझताच त्यांचा विशिष्ट पद्धतीने झप असा आवाज झाला जो की त्या शांततेत घुमला गेला.नी मग वयगुच्या कानांवर पडला , तसे त्याने वेगाने गर्रकन मागे वळुन पाहिल. भिंतीवरच्या मशाली विझताच त्यातुन निघणारा तो पांढरट धुर हवेत विरताना वयगुला दिसला. त्या आवाजाने वयगुच्या छातीत कस धस्स झालेल -श्वास फुलले गेलेले.एक भय आवंढा गिळून वयगुने भिर-भिरती नजर त्या तळघरात भिरकवली, त्याचक्षणी त्याच्या मनात काही प्रश्ण उमटले.हा तळघर नक्की असेल कोणाचा? कोण राहत असेल इथे आणी ते ही ह्या अश्या भयंकर गारठ्यात.? ह्या असल्या भयावह विचित्र जागेत? त्या भयकारीक विचारांनी वयगुच्या कपाळावरुन एक घामाचा ओघळता द्रवबिंदू हळकेस खाली-खाली येऊ लागला.जो की वयगुने हळूच आपल्या हाताने पुसला,तो द्रव बिंदू हातानेच पुसताक्षणी त्या जखमेतुन वाहिलेल कालपट रक्त थोडस वयगुच्या हाताला लागल होत.जे की घामावाटे पुन्हा पातळ झाल होत.आणि हाताला लागल होत.व तोच हात वयगु पुन्हा त्या लाल रंगाच्या वटवाघळुच्या मूर्तीच्या दिशेने घेऊन निघाला.आणि पुढच्याक्षणाला वयगुच हात त्या मूर्तीला लागला.अगदी मुलायम जणु खरी असल्या सारखी ती मूर्ती वयगुला भासली.वयगुच्या हाताच्या स्पर्शाने त्या मूर्तीने वयगुच्या हाताला लागलेल रक्त लागलीचशोषुन घेतल ह्याचा थांगपत्ता सुद्धा वयगुला लागला नव्हता.वयगुच्या मागे तळघरातल्या भिंतीवर आणि खांबावर पेटलेल्या मशाली कोणि अदृश्य शक्तिने फुंकर माराव्या तश्या विझल्या जात होत्या.कोणीतरी येत आहे

ज्याला प्रकाश अनिवार्य होत. त्याचा दरारा इतका होता की त्याच्या आगमनाने साक्षात प्रकाशही विझला जात माघार घेत होता.

बाहेर आकाशात विजेंचा हल्ला कल्लोळ माजलेला, निसर्गाच्या नियमांना तोडुन काहीतरी येत होत. वयगुने तळघरात चौहीदिशेंना नजर फिरवली, एका-पाठोपाठ फूंकर माराव्या तश्या मशाली विझत होत्या.

ना कसला वारा येत होता, तरीही त्या मशाली विझल्या जात होत्या.

वयगुच्या मनाला कसलातरी अघटीताची चाहूल लागली, काहीतरी अपशकुनी,विपरीत घडनार आहे असे राहून-राहुन मनात विचार येऊ लागले.की तोच त्याचक्षणी निसर्गाच्या नियमांची पायमल्ली करून अमानविय शक्तिने आपल रुप बाहेर काढायली सुरुवात केली.वयगुच्या पुढ्यात असलेल्या कबरीच झाकण आपो-आप कर-कर आवाज करत उघडायला सुरुवात झाली,तो आवाज त्या शांततेत बेसूरपणे वाजला गेला. ज्याप्रकारे एका शवघरातुन एका प्रेताची पेटी बाहेर काढताच

त्या पेटीतुन थंड , कुजकट घाणेरड्या वासाची सफेद वाफ बाहेर निघते, त्याच प्रकारे त्या उघडल्या जाणा-या झाकनासरशी कबरेतुन सफेद वाफा बाहेर येऊ लागल्या.आणि त्या वाफांसरशी तो घाण असहनीय वास.काहीवेळ ती वाफ बाहेर येत राहिल आणि नाहीसी झाली त्सा तो वास ही निघून गेला.

" शी काय आहे आत! कीती घाण वास येतोय.!"

वयगुने नाकावर हात ठेवला. आणि ती मशाल हाताने कबरीच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी पुढे सरसावली.मशालीच्या तांबड्या प्रकाशात वयगुला एक पांढ-या मेलेल्या प्रेताच्या त्वचेसारखा एक माणुस त्यात डोळे बंद करुन पहुड़लेला आहे हे दिसल,त्याच्या चेह-यावर एक मायावी तेज होत.पुर्णत चेह-यावर खड्डा किंवा धार-धार पातळ भुवया सोडुन दाढीसारख केसही उगवल नव्हत. त्याचे ते ओठ रक्तासारखे लाल होते जणु ओठांत रक्त भिर-भिरत होत.डोक्यावरचे वाढलेले काळे केस मागे चोपुन बसवले होते. त्या माणसाची ऊंची साधारण माणसापेक्षा जरा मोठीच होती.त्याच्या अंगात एक चक-चकीत काळोखाच्या काजळीने नटलेला कोट घातलेला होता.

नी त्या कोटला लागुनच एक ताठ कॉलर दिसुन येत होती. रक्तासारखी लाल. पाठीमागे अंगाखाली एक लाल रंगाची शाल (कपडा ) अंथरलेला.त्याच्या काळ्या कोटात एक चक-चकीत प्रेताला झाकणा-या कपड्यासारख एक सफेद शर्ट आणि गळ्यात एक लाल दोरा बांधलेला ज्यात एक सुर्याच सोन्याच लॉकिट होत. इंग्रजांच्या परंपरेत माणुस मेल्यावर प्रेताचे हात कबरीत ठेवल्यावर गुणाकार रुपात छातीवर ठेवले जातात तसे त्याचे हात गुणाकार आकारात छातीवर ठेवलेले होते.

त्याच्या सर्व हातांची नख विषासारखी काळी-निळी पडली जात वाढलेली होती.त्या नखांना जणु अशी काही धार होती की एका वाराताच पुढील सावजाच राम-नाम झाल असत.आणि खाली एक काळी चक-चकीत पेंट आणि पायांत दोन काळे बुट असा त्याचा पेहराव होता. वयगुने ती हातातली मशाल त्या पांढ-याफट्ट चेह-याच्या इसमाच्या पुर्णत शरीरावरुन फिरवुन पुन्हा त्या इसमाच्य चेह-याच्या दिशेने आणली व म्हणाला.

" अर बापरे ! जिता हाई का मेलाय ह्यो ! :" वयगु ती पेटती मशाल त्या इसमाच्या चेह-याच्या दिशेने ठेवतच म्हणाला. की तोच अचानक वयगुच्य चेह-यावर कसलातरी प्रकाश झलकल , सोनेरी रंगाचा प्रकाश.

वयगुने एक हात हळूच डोळ्यांवर ठेवुन , दोन तीन सेक्ंदानंतर समोर पाहिल.तसं वयगुला त्या मशाली च्या उजेडात त्या इसमाच्या गळ्यात असलेला लाल दो-यात ओवळेला गोळ सुर्याच्या आकृतीचा एक सोन्याचा लॉकेट दिसला. त्या सोन्याच्या लॉकेटला पाहताच वयगुचे

डोळे हव्यासाने चमकले.लोभ हव्यास लालसेने मेंदूला गंज चढु लागली.

एक-दोनवेळा आजुबाजुला तिरकस नजरेने ओठांवरुन जीभ फ़िरवुन वयगुने पुर्णत तळघरात नजर फिरवली.वयगुच्या मते कबरीत पहुडलेला तो इसम मृत होता, ह्याचा अर्थ त्या तळघरात मी एकटाच आहे अशी भावना त्याच्या चोर मनात जागृत होऊ लागली.तो लॉकेट विकुन भरपुर पैक मिळेल ह्या पापी भावनेने त्याने हळूच पुन्हा आजुबाजूला पाहिल.कोणीही नाही ही खात्री होताच त्याने हात हळूच त्या लॉकेटच्या दिशेने वाढवल. तळघरात असलेले साप-विँचु सर्व विषारी किटक भीतिने आप-आप्ल्या बिळात घुसू लागली. बाहेर एकापाठोपाठ वीजा चमकल्या जात ढग फाटले गेलेले ज्यातुन धोधो करत पाऊस बरसत होता.वयगुला काडीचीही कल्पना नव्हती की तो काय करायला निघाला आहे, पैश्याच्या लोभाने आंधळा झालेला वयगु अश्या एका सैतानाला

त्याच्या हजारो वर्षाच्या गाढ निद्रेतुन उठवायला निघालेला. की तो उठताच रक्ताचा पाट वाहाणार होता.वयगुच्या हाताचा स्पर्श ज्यासरशी

त्या लॉकेटवर झाला त्याचक्षणी त्या इसमाचा दातांजवळचा जबडा थोडासा सुजळ्यासारखा वर आला गेला. परंतु सोन्याच्या लोभाच्या हव्यासात बुडालेल्या वयगुच्या नजरेने ते दृश्य टीपल नाही. लॉकेटला न कसली गाठ बांधळी होती की काय ज्याने तो लाल दोरा आणि त्यात ओवलेला तो सोन्याचा सुर्याचा बिल्ला थेट त्या वयगुच्या हाती आला.

त्या गोल आकाराच्या सोन्याच्या बिलल्याला हाती घेऊन तो गोल-गोल फिरवत पुन्हा पुन्हा पाहु लागला.त्याच्या डोळ्यांत पाहता हव्यास झळकत होती, तोंड लालसेने वासलेल ज्यातुन लाल टपकत होती.

की तोच कबरेत झोपलेल्या त्या इसमाने आपल्या नाकपुड्या फुगवुन जोरात एक श्वास घेतला " स्स्स ! अहाहा !"नी बंद पापण्यांन आडून बुभळांची हालचाल केली. आवाजासरशीच वयगुने त्या इसमाकडे पाहिल, आणी त्याचक्षणी त्या इसमाने खाडकन वेगाने आपले दोन्ही डोळे उघडले. लेझर टॉयचे दोन टीपके चमकावे तसे ते दोन डोळे चमकले , नी त्या चमकणा-या लाल रक्तरंजित डोळ्यांत एक काला टीपका दिसला. ते लाल चक-चकीत डोळे पाहताच वयगुच्या हातुन तो तो लॉकेट खाली पडला, खाली पडताच त्या लॉकेटचा आवाज झाला नी त्याचक्षणी त्या सैतानाने आपला जबडा वासला नी त्या जबड्या आतुम वरुन दोन , आणी खालुन दोन अशे एकुन मिळुन चार धार-धार सुळ्यासारखे दात बाहेर आले.व खाडकन त्या सैतानाने वयगुच्या दिशेने वळुन पाहिल. त्याचे ते लाल खूनशी डोळे आपल्यावर स्थिरावले हे पाहुन वयगुचा श्वास घश्यात अडकला. व अखंड भीतीच्या छायेने त्याची पळता भुई थोडी होत पावले मागे-मागे जाणार की तोच त्या सैतानाने आपला बलाढ्य धार-धार काळी-निळी पडलेला हात वाढवुन वयगुची मान पकडली.

नी अलगद त्याला कबरेच्या दिशेने खेचुन घेतल. व गळ्याभोवतीच्या आजुबाचा नाकपुड्या फुगवून फुगवून वास घेऊ लागला.

" हा स्स्स्स! ताज आहे रक्त , गरम-गरम पातळ रक्त स्स्स हा!" एक घोगरा आवाज त्या सैतानाच्या सुळ्यासारखे दात बाहेर आलेल्या मुखातून निघाला.वयगुचे हात पाय सुटकेसाठी धडपडत होते,परंतु पकड काही सामान्य मानवाने घातली नव्हती साक्षात सैतानाने नरडी पकडली होती.

जी अशीच थोडीना सुटणार होती जो पर्यंत रक्त लुचल जाणार नव्हत.

" ए सैतान, ए सैतान ! वाचवा मला, वाचवा!" वयगुच्या मुखातुन एकापाठोपाठ मोठ-मोठ्याने उच्चारलेले शब्द बाहेर पडले.परंतु दुर-दुर पर्यंत मानवाचा मागमूस ही नव्हता मदत मिळणार तरी कोठून. इकडे त्या सैतानाने पुन्हा आपला जबडावासला तसे खालून वरुन एकुण मिळुन चार धार धार सुळ्या सारखे दात पुन्हा बाहेर आले. नी पुढच्याक्षणाला ते चारही दात वयगुची त्वचा फाडुन नरडीत घुसले. गट-गट आवाज करत तो सैतान वयगुच रक्त प्राशन करु लागला, तसे वयगुच्या हातापायांची हालचाल जलद गतीने वाढु लागली व काहीवेळाने ती थांबली ती कायमचीच.रक्त संपताच त्या सैतानाने वयगुच प्रेत अलगद कापसासारख अंधारात भिरकावुन दिल, धप्प आवाज झाला.

=================

लहान-लहान काड्यांपासुन बनवलेली शेकोटी जळत होती.आणि त्या जळणा-या शेकोटी बाजुलाचा जैक आणि रिनाचा प्रणय सुरु होता.

दोघेही नग्न अवस्थेत होते.

 

 

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED