Rakt Pishachchh - 5 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ - भाग 5

रक्तपिपासु मृत्युचा थरात.

रक्त पिशाच्छ भाग ५

ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथेवाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीता बनवली गेली आहे,

गरोदर स्त्री किंवा हदयाविषयी त्रास असणा-यांसाठी ही कथा नाही.������

 

भाग 5

त्या सैतानाच पृथ्वीवर आगमन होत-होतं म्हणुनच काय तो त्यावेळेस निसर्गाने अक्षरक्ष रौद्र अवतार धारन केलेल.जणु कोणितरी निसर्गाचे ते धोक्याचे लक्षण ओळखेल आणि त्या सैतानाशी दोन हात करायला पुढे सरसावेल, त्याला थांबवेल त्याचा नायनाट करेल.पण झाल वेगळ्ंच, कालोखाच्या मितीवर राज करणारा तो सैतान ह्या अखंड भुतळावर बघ्याची भुमिका ठेवुन बसलेल्या त्या दगडातल्या देवताच्या डोळ्यांसमोर अलगद सुटला ! त्याची सुटका एका मानवाच्या बळीने झाली, मानवाच्या गरम रक्ताने लुचुन झाली.त्याच आगमन होताच हा निसर्गादेवता नरमला. अक्षरक्ष पळता भुई थोडी झाल्यासारखा पळुन गेला. कडकडणा-या विजा तो पाऊस सर्वकाही थांबल.

आता काय होणार पुढे ? अंधार पडताच किती सामान्य मणुष्यांचे बळी जातील? आणखी काय विध्वंस घडणार आहे पुढे? नियतीच्या चक्राला तड्या पाडून तो सैतान अंधकाराला ह्या पृथ्वीतलावर प्रस्थापित करेल का? मनात असंख्य प्रश्णांनी घों-घों करत वादळ घातलेल ज्या वादळांरुपी प्रश्णांना शेवटपर्यंत उत्तरच नसली तर.       काय अनर्थ घडेल. विचार करुनच अंगावर सर्रकन काटा उभा राहतो.

जंगलातल्या मोठमोठ्या झाडांच्या वरच्या शेंड्यांवर राखाडी धुक साचलेल. झाडाच्या फांदीवर पाऊसाच्या पाण्याने भिजलेली घुबड पंख फड-फडवत घुत्कारत होती.रातकिड्यांची किरकिर काळ्या पडलेल्या झुडपांआतुन ऐकु येत होती.कालोखात तिंम-तिंम करत काजवे आपल्या परतीच्या वाटेला निघालेले.जंगलातल्या एका गुहेचा आसरा घेऊन त्यात लपलेला जाड-जुड शरीर यष्टीचा लांडगा

मोठ-मोठ्याने विव्हळ फोडत होता.त्या विलक्षण अशा गारठायुक्त वातावरणात ती विव्हळ थंड हवेमार्फत दुर-दुर पर्यंत पोहचत होती.

जंगलातल्या झाडाझुडपांमधुन एक लाल प्रकाशीत आकार वेगाने पुढे-पुढे सरकत होता.निट लक्ष देऊन पाहता, तो आकार एका वटवाघळु सारखा दिसुन येत होता.त्या वटवाघळुच शरीर लाल रक्तासारख आहे , डोळ्यांत असलेल्या खोबण्या पिवळ्या रंगाने चमकुन निघाल्या जात त्यात एक गोळ काळासा टिपका आहे. हा अद्भूत , विळक्षण, सुंदर दिसणारा वटवाघळू पाहुन कोणीही त्याच्या सुंदरतेवर प्रफुल्लित होईल.परंतु जेव्हा त्याला कळेल की हाच सुंदरतेने नढलेला जीव एक रक्तपिपासु सैतान आहे. रक्तासाठी तहानलेला आहे, ज्याची तहान

कायम अतृप्त आहे. पंख फड-फडवत तो ड्रेक्युला रुपी वटवाघळु

वेगाने पुढे-पुढे जात होता, की तेवढ्यातच त्याच्या पिवळ्याजर्द डोळ्यांना. खाली रात्रीच्या अंधारात जंगलातल्या काळ्या निल्या पडलेल्या झाडांमधुन निघालेल्या चौकलेटी रंगाच्या रस्त्यावर दोन काळ्या घोड्यांची, आणि मागे एक डब्बा असलेली घोडागाडी दिसली, ती घोडागाडी पाहुन तो वटवाघळु पंख फड-फडवत वेगाने खाली येऊ लागला.

□□□□□□□□□□□□□□□

राहाझगड जंगलातल्या झाडाझुडपांन मधुन निघालेल्या मातीच्या रस्त्याबाजुला, मंद वेगाने वाहणा-या धुक्यात एक घोडागाडी ऊभी असलेली दिसत होती. घोडागाडीला पुढे दोन घोडे बांधलेले, आणी घोड्यांमागे लाकडापासुन बनलेली एक खुर्ची होती, चालकासाठी असावी.खुर्चीच्या डाव्या आणी उजव्या बाजुला तांबड्या रंगाचा एक-एक कंदील जळत होता. त्या लाकडाच्या खुर्चीमागे एक लाकडापासुन बनलेला डब्बा होता. डब्ब्याच्या आतमध्ये जाण्यासाठी एक अर्धा लाकडाचा आणि त्यावर काच असा एक दरवाजा होता.

त्या काचेमधुन आत एक तांबडया रंगाचा कंदील पेटला आहे असं दिसुन येत होत.त्या डब्ब्यात डाव्या आणी उजव्याबाजुला असं मिळुन एकूण दोन सीट होते. त्या सीटच्या मधोमध खाली एक म्हातारा माणुस फळीला डोक टेकवुन डोळे मिटून बसलेला की झोपला होता माहीती नाही.वाचक मित्रहो ह्या म्हाता-याच नाव होत, आंबो.त्यांच्या सुरकुतलेल्या चेह-यावरुन त्यांच वय पन्नाशीच्या पुढे आहे हे समजत होत.त्यांच शरीर म्हणायला छातीचा पिंजराच होता. डोक्यावरचे केस पांढरट होऊन पिकलेले गेलेले डोळे मिटुन थकलेल्या चेह-याचे आंबो घोडागाडीच्या फळीला पाठ टेकवून काहीक्षण पहुड़ले होते.बाहेर थंड गाढ हवेचे वारे आणि विळक्षण शांतता पसरलेली.एका हॉस्पिटलमध्ये असलेल्या बंद मुर्दाघरात पसरणारी गारठायुक्त शांतता. त्या शांततेत आंबोना छानपैकी झोपेची अमळ चढली होती.ते त्यांच्या ओठांवर पसरलेल्या समाधानी मंद स्मितहास्या वरुन समजुन येत होती.मानवाचा शेवटचा घटका जेव्हा भरायला सुरुवात होते , तेव्हा त्या समवेत काही चांगल्या गोष्टी घडतात.जसे की आंबोची ही झोप शेवटची झोप तर नव्हती ना? कायमचे डोळे तर मिटणार नव्हते ना.?

बाहेर काजळी-फासल्यासारखा गुढ अंधार : पांढरट धुक गडड व्हायला सुरुवात झालेली.रात्रीची विळक्षण शांतता अशी काही पसरलेली , टाचणी पडली तरी तीचा आवाज ही मोठ्या टाळांसारखा ऐकु येईल.

गरीब बापडया आंबोच्या चेह -यावर निद्रादेवी प्रसन्न झालेली , त्यांच्या चेह-यावर एक निर्मळ हसु पसरलेल.की तेवढ्यातच अचानक बाहेरुन घोड्यांचा खिंखाळण्याचा आवाज आला, बाहेर पसरलेल्या विळक्षण शांतते मुळे तो आवाज एका प्रेतयात्रेत वाजवल्या जाणा-या फटाक्यासारखा वातावरणात घुमला हवेमार्फत आंबोंच्या कानांतल्या अंधा-या खोल खड्डयांत जाऊन मग असा काही आतळ्या पातळ पड़द्यावर आदळला की तेवढ्यातच आंबोंनी खाडकन डोळे उघडले.

एकवेळ डावी-उजवीकडे पाहुन मग कटाक्ष थेट त्या काचेच्या दरवाज्यावर टाकला.तशी आकाशात एक लक्ख बिना आवाजाची विज चमकली, विजेचा निळा प्रकाश त्या काचेतुन आत येत पुर्णत डब्बा निळ्या प्रकाशाने चमकुन उठाला.घोड्यांच खिंखाळण अद्यापही सुरुच होत." ह्यांना काय झाल?" आंबो स्व्त:शीच बोलले आणि खाली हात टेकवुन उभे राहीले उभ राहताच त्यांनी हळुच पुढील अर्ध्या काचेच्या खिडकीतुन बाहेर पाहिल.गुढघ्यांन इतक जाड धुक जमिनीवरुण वाहत होत. त्यांनी एककटाक्ष तब्याळ्याच्या दिशेने टाकला तसा आंबोच्या डोळ्यांना एक कंदीलासारखा तांबडा प्रकाश त्यात जळताना दिसला.

तेवढ्यातच एक विज कडाडली, लक्ख असा निळा प्रकाश पसरला:न चौही दिशेनी असलेली जंगलातली झाडे तो तबेला सर्व काही निळ्या प्रकाशाने चमकुन निघाल,नी त्या निळ्या प्रकाशात धाऊला त्या खिडकीतून थोडदूर खाली, घोडागाडीच्या डब्ब्याच्या उमटलेल्या काळ्या आकृतीत डब्ब्यावर काहीतरी विचित्र उभ असलेल दिसलं.

आठ फुट अस मोठ, गोल डोक्याच व त्या आकृतीच्या हातांजागी दोन -दोन मोठ मोठे पंख असलेल,जे की धाउंना दिसताच आत घेतले गेलेले व पंख आत जाताच त्या जागी दोन धार-धार तीक्ष्ण नख उमटलेले बलदंड फुगीर हात दिसले.तो आकार अजुन निट दिसावा ह्याकरीता आंबोनी आपल डोक त्या काचेचे अजुन जवळ-जवळ घेऊन जाइला सुरुवात केली.परंतु विजेचा प्रकाश विझला गेला,आंबो हळूहळू आपल डोक काचेजवळ घेऊन गेले, नी तेवढ्यातच पुन्हा लक्ख प्रकाशमय वीज चमकली सर्वकाही पुन्हा झळकल गेलं.त्या प्रकाशात पुन्हा घोडागाडीच्या डब्ब्याची आकृती उमटली, नी त्या काळ्या आकृतीत वरच्या डब्ब्यावर जे काही पुन्हा पहिल्या सारख भयानक , कल्पना न केलेला, मन हेलावुन टाकणारा आकार उभ होत ते आता ह्या क्षणी दिसल नाही.

" हुश्श्श्शऽऽऽऽऽ!" आंबोनी काचेजवळच चेहरा ठेवतच आपल्याला भास झाल हे समजुन एक सुटकेचा निश्वास सोडला, त्यासमवेतच डोक्यावरच काही ओझ हलक झाल्यासारख त्यांना वाटल गेल , नी त्यांच्या सुरकुतलेल्य चेह-यावर एक हास्य पसरल.परंतु त्यांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण त्याचक्षणी जास्त वेळ न घालवता पुन्हा आकाशात एक वीज कडाडली नी त्या निळ्या लक्ख प्रकाशात आंबोंना खाली उमटलेया त्या डब्ब्याच्या काळ्या आकृतीत पुन्हा तो अवाढव्य आकार दिसला नी त्या काळपट आठफुटी आकृतीचे पंख जे की काहीक्षणा पुर्वी आत गेले होते, ते झप आवाजसरशी पुन्हा उघडले , ती कृती तो दृष्य पाहुन आंबोंच्या गळ्यात श्वास अडकला.हे काहीतरी विपरीत आहे मानवाच्या तर्कापल्याड आहे हे समजायला , त्यावर विचार करायला त्यांना वेळ मिळणार की तोच अफाटवेगाने वरुन काळपट रंगाचा केसाळ , धार-धार तीक्ष्ण नख असलेला एक पंजा वेगाने त्यांना आपल्या दिशेने येताना दिसला.काहीहालचाल ते करणार आपला जीव वाचवणार, तेवढ्यात एक मोठा काचफुटल्याचा आवाज झाला , आवाज होताच आंबोंच लक्ष पुढे गेल , तस पुढे पाहणा-या त्या डोळ्यांसमोर शेवटचा तो धार धार पंजा त्यांना डोळ्यांच्या काही इंचावर आलेला दिसला.नी पुढच्याक्षणाला त्या धार -धार तीक्ष्ण नख असलेल्या पाचही बोटांमधली दोन बोट एक रक्ताची चिलकांडी उडवत एक विशिष्ट प्रकारचा चिपिक आवाज करत त्या डोळ्यांच्या पातळ बुभळांना फाडत आत घुसली.ह्या भयंकर असहनीय वेदनेने त्या मुखातुन एक किंचाळी निघणार की तोच त्यांच देह अलगद त्या खिडकीतून वर खेचल गेल.

तसे वरुण रक्त लुचल्याचा आवाज ऐकु येऊ लागला.

□□□□□□□□□□□□□□□

शेकोटी बाजूला , त्यातुन निघणा-या उष्ण उर्जेसहित जैक आणि रिनाचा

प्रणय सुख रंगात आला होता.जैक आणि रिना दोघांनीही एकमेकांच्या

नग्ण शरीराला मीठीत धरल होत.जैकचे दोन्ही पाय खाली बसलेल्या अवस्थेत पुढे होते, रिनाच्या दोन्ही मऊशार वक्षस्थळांचा स्पर्श जैकच्या छातीला होत-होता. रिनाच्या दोन्ही पायांनी जैकच्या कमरेला विळखा घातलेला व ती जैकच्या शिस्नावर बसली होती. तिने आपले दोन्ही हात जैकच्या पाठिवर ठेवले होते, आणी तिच्या हाताची नख उत्तेजित होऊन जात मुखातून निघणा-या मादक सुस्का-यांसरशी वेगाने त्याच्या पाठिवर टोचत फिरत होती.पुर्णत तबेल्यात ते स्वर दणाणुन निघाले होते दोघांचेही शरीर एकरुप झाले असल्याने , शरीर उत्तेजित होऊन तापली होती.त्या उष्ण स्पर्शाच अनुभव दोघांनाही सुखदायक होत-होता.नाका-तोंडावाटे गरम श्वास बाहेर पड़त होते. काहीवेळाने दोघांच्याही शरीराची हालचाल वेगाने होऊ लागली , छातीची धड-धड श्वास, डोळ्यांत उमटलेली शृंगारीक चमक, ओठांवर सुखदायक स्मित हास्य उमटायला सुरुवात झाली. दोघांच्याही मेंदूच्या उत्तेजक नसेवर दाब पडला जात दोघांचही वीर्यस्खलन झाल. दोघांचेही शरीर कामतृप्तीच्या भावनेने विलग झाले आणि खाली जमिनीवर पहुडले.की तेवढ्यातच पांच-सहा मिनीटांनी बाहेरुन एक मोठा आर्तकिंकाळीने भरलेला आवाज आला.

" वाचवाऽऽऽऽऽ!" आवाज ऐकताच जैक-रिना दोघांनीही एकमेकांच्या चेह-याकडे पाहिल.दोघांच्याही चेह-यावर एक भय-प्रश्ण असा मिश्रित

भाव पसरलेला.

" थांब मी पाहतो !" जैकने लागलीच अंगावर कपडे चढवले व तडक तबेल्या बाहेर पडला. आता रिनाच काय ती एकटी त्या तब्याळ्यात होती.तिने आपला काळ्या रंगाचा ड्रेस छातीशी कवटाळुन धरलेला त्या आडून त्या गो-यापान मध्यम नितंबांच दर्शन घडत होत. तिचे ते काळे केस गो-यापान पाठिवर मोकळे सुटले होते. ते गोरपान शरीर त्या तांबड्या प्रकाशात अक्षरक्ष एका परीकथेतल्या सुंदर, विलक्षण, मनमोहीत करणा-या नाजूक परीसारख दिसत होत.

इकडे बाजुलाच त्या तबेल्याच्या एका तुटलेल्या फळीतुन दोन लाल मोठे वटारलेले डोळे तिच्या त्या शरीरावर वासनांधपणे खिळलेले आहेत असं दिसुन येत होत.होय तो सैतान ड्रेक्युला त्या रिनाकडे पाहत होता. त्याचे ते दोन डोळे ते यौवन सुख खाऊ की पिऊ ह्या नजरेच्या अविर्भावामे रिनाच्या शरीरावर खिळले होते.त्या पांढरट राखाडी चेह-यावर एकदम गंभीर शुन्य भाव दिसुन येत तो चेहरा एका जिवंत प्रेतासारखा भासत होता. अंगात एक काळा कोट त्यात पांढरा सदरा , मानेमागे एक ताठ लाल-काळी कॉलर आणि खांद्यांवरुन खाली पायांपासुन थोड वर एक लाल -काळा कपडा असा हा द्रोहकाल -रक्तपिपासु सैतान रिनाचा काल बनुन आला होता. कोटला लागुन पाठीमागे असलेला तो लाल-काला कपडा आपल्या धार-धार काळी-निळी विषारी नख असलेल्या हातांच्या पंज्यात पकडुन जास्त वेळ न दडवता ड्रेक्युला तबेल्यात जाण्यासाठी निघाला.

□□□□□□□□□□□□□□

धुक्यातुन एक-एक पाऊल वाढवत जैक घोडागाडीच्या दिशेने निघालेला. जैकच्या चौहीदिशेना अंधारात काळी-निळी पडलेली झाड़ दिसुन येत विलक्षण शांतता पसरलेली. वर निळ्या आकाशगंगेत

चांदण्या कमी जास्त प्रकाश फेकत चमकत होत्या.जंगलातला रानटी श्वापद मोठ-मोठ्याने ओरडून धोक्याची चाहूल लाऊन देत होता.परंतु कसली? घों-घों करत थंड हवेचे एकदोन झोत जैकच्या अंगाला स्पर्शुन जात होते.थंड वातावरणामुळे जैकच्या नाका तोंडातून थंड वाफ बाहेर पडत होती. एक दोन मिनीट चालुन जैक घोडागाडीजवळ पोहचला. तसे त्याला पुढे जुंपलेले दोन काळे घोडे आपल्या जागेवरच उभे आहेत असं दिसल,त्या दोघांकडे पाहतच त्यातल्याच एका घोड्याच्या डोक्यावर मायेने गोंजारत ,मग तो मागच्या डब्ब्याच्या दिशेने जाऊ लागला. जिथे तो म्हातारा होता.

□□□□□□□□□□□□□□□

रिनाचे दोन्ही डोळे तबेल्याच्या दिशेने स्थिरावलेले, जैकची वाट जी पाहत बसलेली ती.तबेल्याचा चौकोनी आकाराचा लाकडी दरवाजा एका बाजुला सरकलेला होता.त्या दरवाज्याची हाईट जेमतेम आठ नऊ फुट असेल.रिनाला त्या उघड्या दरवाज्या बाहेरच काळोख आणि सफेद धुक नजरेस दिसुन येत होत, की तेवढ्यातच एक आकृती त्या बाहेरच्या धुक्यातुन वाट काढत येत, दरवाज्यात थांबली.

" जैक! आलास तु! कसला आवाज झाला होता? " रिनाने त्या अंधा-या आकृतीकडे पाहुण हे वाक्य उच्चारल! तिला त्या मानवी आकृतीला पाहुण हे वाटलं की तो आपला जैक आहे, परंतु खरच तो जैक होता का? त्याची शारीरीक रचना पाहता सामान्य मनुष्यापेक्षा मोठी होती जेमतेम सहा -सात फुट.

" जैक ! मी म्हंटल कसला आवाज झाला?" जैक आपल्या वाक्याच पुनरउच्चार करत नाहीये हे पाहुन , ती पुन्हा म्हणाली.

" जैक ! काय झालय तुला तु काही बोलत का नाहीयेस?"

रिनाने ह्यावेळेस आपल्या छातीशी कवटाळुन धरलेला ड्रेस जरा आणखी दाबुन धरला.जणु तिला कसला तरी संशय आला असावा. त्या ऊंचीचा त्या , शारीरीक रचनेचा संशय आला असावा.

" को..को..कोण आहेस तु!" रिना जागेवरुनच मागे-मागे जात म्हणाली.तिला एव्हाना कळून चुकलं होत की हा आपला जैक नाही दुसरच कोणीतरी आहे. रिनाच्या ह्या वाक्यावर एवढवेळ शांत बसलेल्या

त्या आकृतीने आपल्या शरीराची हालचाल केली , एक पाऊल वाढवत हळुच तो पुढे आला, पुढे येताच शेकोटीच्या तांबड्या प्रकाशमय उजेडात रिनाला त्या मानवी आकृतीचा चेहरा दिसला.

मेलेल्या मृत प्रेतासारखा गार राखाडी रंगाचा चेहरा, त्या चेह-यावर भुवयांशिवाय एक केसही उगवलेला नव्हता. डोक्यावरचे थोडेसे वाढलेले केस अशे काही काहीमागे चोपुन बसवलेले की एक केसही जागेवरुन हलणार नाही.नाक-कान सामान्य माणसापेक्षा जरा टोकदारच होते.त्या मानवासारख्या आकृतीच्या अंगावर एक काळ्या रंगाचा चकचकीत कोट, त्यात एक पांढरा चमकदार सदरा आणि खाली काळी पेंट पायांत चकचकीत बुट असा त्याचा शाही पेहराव आहे.खांद्यावरुन खाली पायांपासुन थोडवर राहिल असा एक लाल-काला कपडा दिसुन येत रिनाच्या मुखातुन एकच उच्चार बाहेर पडला.

" को..को..कोण आहेस तु! " रिनाने जयेश झोमटे त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या एका इंग्रज लेखकाची काही भुताखेतांची पुस्तक वाचली होती.इ:स 1900 च्या चालु काळातळे ते एक चांगले प्रसिद्ध लेखक आहेत , ज्यांच्या एका ड्रेक्युला कांदबरी कथेच पुस्तक तिने वाचल होत , ज्यात ड्रेक्युलाची इत्यंभूत माहिती त्यात लिहिली होती. त्या सात फुट आकृतीला , त्याच ते वर्णन पाहुन रिनाच्या काळजात धस्स झाल.कारण पुस्तकात लिहीलेल्या वर्णानाच आणि सत्यात दिसणा-या वर्णानच मेळ अगदी मिलत-जुलत होत.

भीतीने अंगावर उठलेल्या शहा-यांसरशी एक एक पाऊल मागे मागे सरकवत रिना पाठिमागे सरकत होती.तसा तो राखाडी रंगाचा चेहरा असलेला ड्रेक्युला सैतान रिनाच्या दिशेने पुढे पुढे येत होता. काहीवेळ असंच मागे मागे सरकणा-या रिनाच्या हाताला तबेल्याची शेवटची लाकडी भिंत लागली.त्या भिंतीचा आधार घेत , तो काळ्या रंगाचा ड्रेस छातीशी कवटाळून रिना आप्ल्या जागेवर ऊभी राहीली. त्या ड्रेसमधुन ही तीच ते गोरपान अर्ध नग्न शरीर दिसत होत. ते मादक सौंदर्यपाहुन त्या सैतानाच्या राखाडी रंगाच्या चेह-यावर, एक भयंकर शुन्यहिंत भाव पसरला जात डोळे वटारलेले गेलेले. आणि तो गंभीरमुद्रा असलेला चेहरा फार भयंकर भास होता.

" तिथेच थांब ! जवळ येऊ नकोस! नाहीतर मी ओरडेन? थांब तिथेच.!" रिनाने त्याला दम दिला , परंतु तीचा काफरा आवाज त्या सैतानाला किंवा त्या पायांना रोखू शकला नाही.त्याची पाउले पुढे पुढे सरकतच होती, ते पाहुण रिनाने मोठा आ वासला आणि जैकला आवाज देणार तेवढ्यात , त्या सैतानाचे वटारलेले ते दोन डोळे लाल रंगाने चमकले. पांढरट बुभळ लाल रंगात परावर्तित झाले.रिनाच सर्व लक्ष त्या सैतानावरच होत ज्याने तिच लक्ष क्षणार्धात त्या चमकणा-या लाल डोळ्यांवर गेल. नी त्याचक्षणी तिच्या डोळ्यांतही तो लाल रंग पसरला जात ती संमोहित झाल्यागत तिच आवाज देण्यासाठि उघडलेल तोंड खाली-खाली येत बंद झाल. छातीशी कवटाळुन धरलेले दोन्ही हात ड्रेस सहित बाजुला झाले आणि तिच ते शरीर त्या गोरपान शरीर त्या सैतानसमोर नग्न झाल. हळु-हळु पावल वाढवत तो सैतान रिनाजवळ आला. रिना एका निर्जीव मूर्तीसारखी जागेवर ऊभी होती.डोळे उघडे असुन लाल रंगाने चमकत होते , डोळ्यांची पापणीही लवत नव्हती.

त्या सैतानाने एकवेळ रिनाच्या शरीरावर खालून वरपर्यंत एक कटाक्ष टाकला आणी आपला जबडा हळुच तिच्या गौरवर्ण गळ्याजवळ नेला

आणि नाकपुड्या फुगवून एकवेळ तिच्या शरीराच वास घेत जबडा वासला.पुढच्याक्षणाला त्या जबड्यातुन खालून आणि वरुन अशे एकुण मिळुन चार पांढरे शुभ्र सुळ्यासारखे दात बाहेर आले. तसे( द्रोहकाल )त्या सैतानाने हळुच ते सुळ्यासारखे दात रिनाच्या मुलायम गळ्यात घुसवले.रिनाने दात आत घुसताच डोळे बंद करुन एक उसासा टाकला , आणी त्या ड्रेक्युला द्रोहकालला गच्च मीठी मारली.रक्त लुचतावेळेस तिच्या शरीराचा एकनी एक भाग राखाडी रंगात परावर्तीत होऊ लागला, एका प्रेतासारखी तीची त्वचा कोरडी पडु लागली.तोंडातुन एकापाठोपाठ मोठ-मोठ्या श्वासांसहीत उसासे बाहेर पडु लागले.शरीराचा एक नी भाग अशक्त होत मांस शरीराला चिकटू लागल, उरली ते फक्त हाड मांस. जणु ते सौंदर्य त्या सैतानाने लुचल असाव.

□□□□□□□□□□□

जैकने घोडागाडीच्या आत डोकावून पाहील परंतु आत कोणिही नव्हत.खाली जमीनीवर काही काचांचे तुकडे पडले होते.समोर पहिल्यावर घोडागाडीच्या डब्ब्यावर असलेल्या दरवाज्याची काच फुटल्याच दिसत होत.जैकने एक-दोन वेळ गाडी चालक असलेल्या

आंबो ना हाक सुद्धा मारली परंतु प्रतिसाद काही मिळेना, म्हणुनच जैकने रिनाच्या काळजीपोटी तबेल्याच्या दिशेने धाव घेतली.

एका मिनीटात तो तबेल्याच्या दरवाज्यात पोहचला सुद्धा आणि समोरच दृष्य पाहुन जागच्या जागी दरवाज्यातच गोठला.कारण काही मीटर अंतरावर शेकोटीच्या बाजुला रिनाच नग्न शरीर खाली जमिनीवर अस्थव्यस्थपणे पडल होत.शरीराची त्वचा हाडांना चिटकली जात ती त्वचा रक्त नसल्यासारखी राखाडी पडली होती, दोन्ही डोळे आत खोल गेले होते. जणु त्यात डोळेच नसावेत.

काहीवेळ अगोदर सौंदर्याचा ठेवा असलेल रिनाच शरीर,.

आता सडून गेल होत.त्या सैतानाने रक्तासहित सौंदर्यही

शोषुन लुचत काढल होत.

 

क्रमश:

 

कंमेंट रेटिंग नक्की द्या.���������

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED