Rakt Pishachchh - 6 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ - भाग 6

॥ रक्त पिशाच्छ…॥ 18+ भाग 6

 

फक्त 18+ प्रौंढांकरीता..

शृंगारीक , थरारक, हिंसक.

लेखक:जयेश झोमटे (जेय)

ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे

 

भाग 6

 

सैतानाचा नंगानाच माजून शेवटी ती रक्तपिपासु रात्र सरली होती. त्या एका रात्रीत काय-काय विलक्षण घटना घडल्या गेलेल्या, मानवाच्या आकळण क्षमतेलाही लाजवेल ते करतब सैतानाने घडवुन आणले होते.

आणि आता असे कित्येक करतब रोज रात्री घडणार होते ते देवच जाणो कारण शेवटी तो सैतान एका पिसाळलेल्या जनावरासारखा वा-यावर सुटला गेलेला ज्याला न कसल बंधण लादल गेलेल, नाही त्याला कोणी रोखणार होत ज्याने तो जो दिसेल त्याला चावणार होता, रक्तपिऊन स्व्त:सारखा बनवणार होता.राहाजगडची ती काळी रक्तपिपासु रात्र शेवटी कशी तरी सरली गेली आणि सकाळच्या तेजोमय स्वच्छ सूर्यप्रकाशाच दर्शन गावाला झाल गेल. झाडांच्या वरच्या शेंड्यांवरुन, मोठ-मोठ्या डोंगरमाथ्यावरुन सूर्यदेव डोकावून पाहत आपला प्रकाश ह्या पृथ्वीवर बरसू लागले.

राहाझगडचे राजे दारासिंह यांच्या राझगड महालात दुस-या मजल्यावर.

एक मोठी तीस फुट लांबीची खोली दिसुन येत होती, त्या खोलीत एक मोठा शाही पलंग आहे, पलंगाच्या डाव्या बाजुला एक टेबल आणि बाजुला जेमतेम दहा पावलांवरच एक मोठी ,सोनेरी रंगाच्या पडदे असलेली बिना झापांची खिडकी आहे. खिडकीतून राहाझगड दिसत आहे आणि त्या खिडकीतूनच सकाळच्या सुर्याची कोवळी किरणे आत येत छानशी हवा सुटली आहे ज्याने ते सोनेरी रंगाचे पडदे हवेने वर उडत आहेत.पलंगाच्या पुढच्या बाजूपासुन ठिक वीस पावलांवर एक चौकोणी आकाराचा मोठा आरसा दिसुन येतोय, त्या आरशा समोर एक लाकडी खुर्ची आहे आणि खुर्चीवर एक तरुन युवती बसली आहे. तिचा चेहरा चंद्रासारखा गोल आहे आणि त्यावर एक विशिष्ट प्रकारच तेज झळकत आहे.पातळ भुवयांखालचे डोळे पाणीदार टपोरे असुन बोलके आहेत.सकाळी -सकाळी पडणा-या मनमोहीत करणा-या धुक्यासारखे तीचे गुलाबी रंगाचे ओठ आहेत. डोक्यावरचे काळे केस थोडेसे ओळ्या असल्या सारखे पाठिवर सोडले आहेत जणु आताच अंघोळ केली असावी.त्या चंद्रकन्या युवतीच्या अंगावर एक गुलाबी रंगाची साडी आहे जे तिच सौंदर्या बहरुन टाकत आहे.आणि समोरच्याने तीच हे सौंदर्यदायक रुप पाहील तर त्याच मन नक्कीच प्रफुल्लित होऊन जाईल ,तो तिच्या प्रेमात पडेल. त्या युवतीच्या समोर आरश्याचा टेबल होता, आणी त्या टेबलाच्या फळीवर काही सोन्याचे दागिने होते. जसे की सोन्याच्या व रंगीबेरंगी बांगड्या, क्ंठ हार,हातातील अंगठ्या, कानातले झुमके ,आणि अजुन बरच काही.त्या युवतीने हळुच आरशात पाहत स्व्त:कडे पाहुन एक मंद स्मित हास्य दिल.आपला एक हात वाढवुन , हळुच सोन्याच्या बांगड्या हातात घेऊन मग एक-एक करत त्या दोन्ही हातांत भरल्या.खिडकीतून सकाळचा गार वारा येत होता:न ज्याने आतापर्यंत त्या युवतीचे केस सुकले गेलेले , आणी आता हव्याने उडून चेह-यावर येत होते. तीने हळुच पुन्हा आपला हात वाढवुन एक कानातला झुमका आपल्या हाती घेतला, आणी केस बाजुला सारत तो कानात घालु लागली. की तेवढ्यात तिच्या कानांवर एक स्त्रीची हाक ऐकु आली.

" रुपवती युवराज्ञी ताई तुम्हाला महाराणींनी खाली बोलावलंय!"

अच्छा तर मित्रांनो ही युवती म्हंणजेच दारासिंह यांच्या एकमेव कन्या आणि राहाझगडच्या युवराज्ञी रुपवती आहेत तर.खरच त्यांच सौंदर्य रुपवती नावाप्रमाणेच रुपवान आहे. नाही का?.

दरवाज्याच्या चौकटीबाहेर एक स्त्री ऊभी होती, तीच्या अंगावर एक लाल साडी होती, डोक्यावर पदर असाकाही ओढुन घेतलेला की चेहरा दिसुन येत नव्हता. तिला पाहून असं वाटत होत की ती नक्कीच महालात काही जेवन वगेरे बनवायच किंवा इतर काम करत असावी.

त्या स्त्रीच्या आवाजासरशी रुपवतीने कानात झुमका लावतच तिच्याकडे हसून पाहिल व म्हणाली.

:" हो आलेच!" रुपवतीच्या वाक्यासरशी त्या स्त्रीने फक्त मान हलवलीव दरवाज्यातुन निघुन गेली.

□□□□□□□□□□□□□

राझगड महालासमोरच एक लहान गवताची बाग होती. आणि सकाळच्या सुर्याच्या किरणांनी बागेत खुपसा-या विविध प्रकारच्या फळ-फुलांची झाड लावलेली दिसुन येत होती. आणी एक गडी माणुस सुद्धा बागेतल्या झाडांना पाणि देत आहेत असं दिसत आहे.बागेत एक गोल आकाराचा लहानसा ठेबल ठेवलेला.त्या लाकडी टेबलाच्या चारही बाजुंना चार खुर्च्या ठेवलेल्या आणि त्या चार मधल्या दोन खुर्च्यांवर राजा दारासिंह ,राणी लताबाई बसलेल्या. दोघांच्याही चेह-यावर प्रसन्नतेचे भाव पसरले जात हातात चहाचे कप होते. की तोच समोरुन युवराज्ञी रुपवती महाराज व राणीसाहेबांना आपल्याच दिशेने येताना दिसल्या. तसे त्या दोघांनीही आप-आपल्या नजरा तिकडे वळवळ्या. गोरीपान त्वचा जी की सुर्याच्या प्रकाशात सुद्धा चमकत आहे.टपोरे बोळके डोळे नी त्यात घातलेल ते काजळ मन भेदणार आहे, अंगावरची गुलाबी साडी सकाळच्या हवेत अक्षरक्ष जो कोणी पाहिल त्याच्या जिवाला वेड लावणारी आहे. गळ्यात एक कंठ हार , कानांत झुमके , चेह-यावर एक तेजमय हसु अशा राहझगडच्या युवराज्ञी रुपवती काहीवेळातच आपल्या माता पित्यां समोर हाजीर झाल्या. प्रथम येताच त्यांनी लागलीच खाली वाकुन माता-पित्याच आशिर्वाद घेतल. महाराज आणि महाराणींनी लागलीच आशीर्वाद सुद्धा दिला.

" खुप छान दिसत आहेस बाळ!"

रुपवतीने नमस्कार केल्यावर उभ्या राहताच महाराणी म्हणाल्या. त्यांच्या ह्या वाक्यावर महाराजांनी सुद्धा हसतच होकारार्थी मान हलवली.

" धन्यवाद !" युवराज्ञी रुपवती आपल्या माता-पिता दोघांकडेही पाहत नम्रपणे म्हणाल्या. की तेवढ्यातच मागुन राहाझगडचे युवराज्ञ सुरजसिंह तेथे आले. त्यांच्या अंगावर एक सफेद शर्ट होता, शर्टाची बटन छातीचा भाग दिसाव ह्या करीता उघडी ठेवलेली, की त्याकाळची फेशन असावी कोणास ठावुक ! खाली एक फुगीर काळी पेंट होती. डोक्यावरचे केस वाढून कानांपर्यंत आलेले, पायांत जंग बुटांसारखे स्टाईलीश चौकलेटी बुट घातलेले. चेहरा म्हणायला गोरापानच होता. मित्रांनो हे आहेत राहाजगडचे युवराज सुरजसिंह! त्यांचा स्वभाव महाराजांपेक्षा जरा वेगळा आहे.तसं म्हणायला त्या दोघांच पटतच नाही असंच समजा.

सुरजसिंह यांचा स्वभाव जरी वेगळा असला तरी आपल्या बाहिणीवर मात्र त्यांचा लाखमोलाचा जीव आहे.ते एकवेळ महाराजांना उलट बोलतील परंतु रुपवती आपल्या बाहिणीला कधीच नाही.

" दादासाहेब ! हे काय घातलय तुम्ही ?" युवराज्ञी रुपवती गाळात हसत म्हणाल्या. युवराज सुरजसिंह यांनी पाहिल्यांदाच असे कपडे घातले होते की काय? जे पाहुन महाराणी सुद्धा हसु लागल्या होत्या,! त्या दोघींनाही असं हसताना सुरजसिंह सुद्धा हसु लागले. इकडे महाराजांच मात्र त्यांच्या कडे लक्ष नव्हत, ते दुसरीकडे पाहत होते, आणि त्यांच्या चेह-यावर गंभीर भाव होते. तस सांगायच झाल तर महाराजांचे विचार जुन्या रुढी परंपरेंशी जुळलेले होते, त्यामुळेच महाराजांना युवराजांच हे वागन मुळीच आवडत नव्हत. महाराजांना वाटे की युवराजांनी प्रजेच्या

हिताचा विचार करावा, आपल्या समवेत राहून राहाजगडच रक्षण कराव, अन्य राजकारभारांच्या कामावर लक्षकेंद्रित कराव. परंतु मी म्हंटल्या प्रमाणे युवराजांना ह्या सर्व गोष्टींत मुळीच रुची नव्हती.

महाराजांनच्या मनात एक चिंतित भावना रुपी प्रश्ण नेहमी त्यांचा जिवखात असे. की जर आपल्याला उद्या काही झालं , म्हंणजेच आपण मृत्यु पावलो तर प्रजेकडे लक्ष कोण देईल? राहझगडच्या गादीवर कोण बसेल? ह्या राज्याच राज्यकारभार कोण सांभाळेल? युवराज्ञी रुपवती

जरी स्वभावाने ह्या सर्व पश्णांच मुळ उत्तर असल! म्हंणजेच प्रजेच्या

हितासाठी, आणी राहाझगडच्या गादीवर त्यांना बसवल असतं.परंतु महाराजांना ते पटल नाही! कारण त्यांच लग्न झाल्यावर त्यांना माहेरी थोडीना राहता आल असतं! आणि समजा जर त्यांना गादीवर बसवलंच. तर मग लग्न झाल्यानंतर त्या माहेरी गेल्यावर पुन्हा तोच प्रश्ण डोकावणार नव्हत का ?.

"रुपा !माझ्या एका इंग्रज मित्राने खास माझ्यासाठी ही भेटवस्तु, त्यांच्या मायदेशातुन आणलीये!" युवराज सुरजसिंह युवराज्ञी व राणींसाहेबांकडे पाहत म्हणाले. व काहीवेळ थांबून कपड्यांवरुन हात फिरवत पुढे म्हणाले.

" छान आहेत की नाही ?" त्यांच्या ह्या वाक्यावर दोघी-मायलेकींनी एकमेकांच्या चेह-याकडे पाहिल व गालात हसतच होकार दर्शवला.

" खुप छान आहेत.!" रुपवती म्हणाल्या.

बागेत चारही बाजुंना सकाळचा उन्ह पसरलेला , वातावरण म्हणायला अगदी टरकीफाय मन प्रफुल्लित करणार होत ज्याची अमळ राझगडच्या राझघराण्यातल्या कुटूंबावर चढली होती.

मानवाच सुख जेव्हा फुलत काही चांगल कार्य घडत असतं तेव्हाच ही क्प्टी नियती काहीना-काही अपरिहार्य धोक्याच , काही अपशकुनी स्फोटक फोड़ते. जस की एन लग्नातच,चांगल्या कार्यात कोणी दगावल कोणि मेल तर कस वाटेल?, त्या सुखाला क्षणात काजळी फासलेली कसं वाटेल?.तुम्हाला काही अनुभव आहे का? की समजा एका घरात लग्णाची जोरदार तैयारी चालु आहे ! पाव्हणे मंडळी, घरातले सर्व हस-या चेह-याने वावरत आहेत. लग्न मंडपात गाण वाजत आहे. आणि तेवढ्यातच एक पोलीसांची व एक शववाहक एम्बुलेंस सायरन वाजवत मंडपात येऊन थांबते , आणी क्षणार्धात त्या सुखदायक क्षणावर काजळी फासली जाते, मलभ पसरला जातो.वातावरणात एक विलक्षण भयप्रद शांतता पसरते! तसंच काहीसं इथे घडनार तर नव्हत ना?

महाराणी, युवराज्ञी , युवराज तिघांच्याही आनंददायक चर्चा बोलण सुरु होत.आणि महाराज न बोलता, दुसरीकडे मान वळवुन ती चर्चा फक्त ऐकत बसलेले.की तेवढ्यात तिथे एक सैनिक आला. सर्व प्रथम त्याने पाठित वाकुन महाराजांना नमस्कार केला व लागलीच म्हणाला.जणु तो जे काही वार्ता सांगण्याथी आलेला आणि तो घाईतच असावा.

" महाराज , राहाझगडच्या वेशीवर जंगलातले काही आदिवासी जमले आहेत, त्यातच त्यांचा एक म्होरक्या सुद्धा आहे ते म्हंणतायेत की महाराजांशी त्यांना काही बोलायच आहे.!"

राहाझगडच्या वेशीपासुन ठिक तीस मिनीटांच्या अंतरावर असलेल्या घनदाट भल्यामोठ्या जंगलात ते आदिवासी राहत होते.त्यांची वस्ती म्हणायला जंगलाच्या आत होती जिथपर्यंत हिंसक प्राण्यांच प्रमाण पाहता साधारण माणुस तिथे पोहचन असंभवच , व त्यांची राहण्याची जागा कोणालाही माहीती नाही.त्यांच मत अस होत, की मानवाने आमच्या राहणीमानात अडथळा निर्माण करु नये,मानवाच्या सोयीसुविधापासून अलिप्त असलले हे आदिवासी हे जंगल आमच घर आहे आणि हेच आमच विश्व अस मनोमन मानायचे.आज अमेजन ह्या भल्यामोठ्या विशाल आणि रहस्याने भरलेल्या जंगलात असे आदिवासी आजही, आता ह्याक्षणीही आस्थित्वात आहेत.ज्यांना हे सुद्धा ठावुक नाही, की लाईटकाय असते ,

हे मोबाईल, इंटरनेट, बिल्डींग, गाड्या-विमान काय असत हे. समजा एक टाईम मशीन मधुन आलेला आदीमानव ज्याप्रकारे हे सर्वकाही

पाहुन विलक्षण धक्का बसुन थक्क होईल, तसंच काहीस ह्या आदिवास्यांच आहे.ह्यांना आपल्या टेक्नोलॉजी वापरुन जगणा-या माणसांची खुपच चिड आहे.आणि जर का कधी आपन ह्यांच्या राहणीमानात ढ्वळा ढ्वळ केली तर मृत्यु निश्चित आहे.

" काय बोलायचंय माझ्याशी ?" महाराज म्हणाले. आतापर्यंत राणीं ताराबाई, युवराज, युवराज्ञी रुपवती तिघेही गप्पा थांबवुन त्या सैनिका कडेच पाहत बसलेले तो काय बोलत आहे हे पाहत होते.

" नाही महाराज त्याबदल काहीही सांगितल नाही ! आणि त्यांची संख्या जास्त असल्याने आम्हाला असं वाटल, की जणु ते सर्वयुद्धासठीच आले असावेत, म्हणुनच आम्ही त्यांच कारण न विचारता हा निरोप तुम्हाला लागलीच पोहचवायला आलो.!" युद्ध हे नाव ऐकून महाराजांच्या भुवया जरा मोठ्या झाल्या ते खुर्चीत जरा थाठच बसले , दुसरा हात कमरेवर ठेवला आणि खालच एक पाय जमिनीवर ठेवतच विशिष्ट प्रकारे थोड वर केला. व म्हणाले.

" ठीक आहे ! घोडागाडी काढा! " महाराजांच्या वाक्यावर तो सैनिक पुन्हा कमरेत लवत निघुन गेला.महाराजांनी सुद्धा महाराणींकडे पाहत येतो म्हंणत निरोप घेतला.घोडागाडीत बसत महाराज निघून गेले.

" काय बोलायचं असेल ह्या जंगलातल्या आदिवास्यांना ?" रुपवतीने आपल्या आईसाहेब व दादासाहेबांकडे पाहत हे वाक्य उच्चारल.

" काही नाही ग! ह्या जंगलातल्या आदिवास्यांना बाबासाहेबांनी जरा जास्तच डोक्यावर चढ़ुन ठेवलंय. " सुरजसिंह यांनी काहीवेळ थांबून त्या दोघींकडे पाहिल व पुढे म्हणाले.

" गरजेपेक्षा जास्त भाव दिला तर असंच होतं रुपा. जर बाबासाहेबांन जागी आम्ही असतो ना तर ह्या जंगलातल्या आदिवास्यांना चांगलीच अद्दल घडवली असती.!"

" थांबा सुरज. अर्धसत्य महिती असतांना अस कोणाबद्दलही काहीही बोलु नये ! " महाराणी त्यांना मध्येच थांबवत पुढे म्हणाल्या. " राहाझगडच्या जंगलात राहाणा-या ह्या आदिवास्यांनी , ह्या अगोदर राहाझगड मध्ये झालेल्या खुप सा-या युद्धांत आपल्याला खुपच मदत केली आहे.ज्याचे उपकार आपन कधीच फेडू शकत नाही.हे आदिवासी मनाने खुपच चांगले आहेत त्यांच राहणीमान सामान्य मानवापेक्षा वेगळ आहे, आणि म्हणुनच ते जंगलातुन जास्त बाहेर येत नाहीत, जर जंगलावर कधी कोणत मोठ संकट आल तरच ते इथे येतात.अन्यथा त्यांची प्रजात वर्षानुवर्षासाठी अलिप्तच असते."

" वर्षानुवर्षासाठी म्हंणजे?" रुपवती आवाक होत म्हणाल्या.

" म्हंणजेच, वीस एकवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ ते जंगलातुन बाहेर येतच नाहीत, आणी नाही त्यांचा पत्ता कोणास ठाऊक असतो.

महाराणी म्हणाल्या.की तेवढ्यात बाहेरुन घोड्याचा खिंखाळण्याचा आवाज आला. तसे महाराणींने लागलीच युवराजांच्या खुर्चीच्या दिशेने पाहिल, जी की रिकामी होती.

" सुरज?"

" दादासाहेब, तर गेले." रुपवती जरा गालात हसतच म्हणाल्या. जणु हे नेहमीचंच असाव.

" का जाऊ दिलस तु ! आम्हाला त्यांच्याशी - त्यांच्या विवाह बद्दल बोलायचं होत.!"

" दादासाहेबांचा विवाह!" रुपवती उत्साहाने म्हणाल्या.

" हो ! कालच महाराजांनी मला त्यांच्या समोर हा विषय काढण्यास सांगितलं होतं, पन.. आता रात्री पर्यंत तर ते येणार नाहीत."

महाराणी ताराबाईंनी तो विषय तिथेच थांबवला.

" आईसाहेब काळजी करु नका! दादासाहेब रात्री येताच आपण दोघीही ह्या विषयावर त्यांच्याशी बोलुयात " रुपवती आपल्या आईसाहेबांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या. त्यांच्या ह्या वाक्याने ताराबाईंना जरा सुखावल्या सारख झाल व काहीवेळ अशाच गप्पा मारुन त्या दोघीही महालात निघुन गेल्या. एन सकाळचा प्रहार उलटायला सुरुवात झालेली. सूर्य तापु लागला तसे दुपार झाली.एक-एक सेकंद पूढे जात, मिनीट काटा पुढे सरकु लागला.आकाशातले हलके पांढरे ढग मंद गतीने पुढे -पुढे जात सूर्य सुद्धा खाली खाली येत अस्ताला जाऊ लागला.डोंगरमाथ्यावरुन सुर्याला अर्ध गिळंकृत केलेला आकार दूरुन दिसु लागला तसे जंगलातली झाडांची शेंडे सोनेरी रंगाने चमकु लागली. पिंडावर बसणारे कावळे काव-काव करत परतीला जाऊ लागले कोणि मेल असत तर त्याच्या घरावर नक्कीच बसले असते हे एक डोळा फुटलेले राक्षस. पंख फड-फडवत सर्व प्राणी पक्षी आप-आपल्या घरट्याच्या दिशेने जाऊ लागले.आतापर्यंत सूर्य सुद्धा

डोंगरमाथ्यावरुन दिसेनासा झालेला.चौही दिशेना आता अंधाराने जागा घ्यायला सुरुवात केली होती.पांढरट धुक्याने सुर्याच्या तप्त शक्तिने तापलेल्या जमिनीला थंड करायला सुरुवात केलेली. निळ्या आकाशात चांदण पसरुन जात त्या प्रकाशाखालून वटवाघळु जंगलाच्या दिशेने निघाले होते. घोड्यांच्या पावलांचा तबडक-तबडक आवाज होत , एक घोडागाडी येऊन राझगड महालासमोर थांबली. त्या घोडागाडीतुन महाराज उतरुन थेट महालात शिरले.त्यांच्या चेह-यावर चिंतित , उदासीन भावनेच्या छटा दिसुन येत होत्या. महाराज महालात शिरले

त्यावेळेस प्रथम भल्यामोठ्या हॉलमध्ये महाराणी व युवराज्ञी रुपवती सोफ्यावर बसुन कसल्यातरी चर्चेत गुंग होत्या , परंतु महाराज येताच त्यांनी आपली चर्च्या थांबवली, जागेवर उठुन उभ्या राहिल्या.परंतु महाराजांनी त्या दोघींकडेही न पाहता थेट जिन्याचा रस्ता धरुन वरच्या खोलीत निघुन गेले.

" बाबासाहेबांना काय झाल ? " युवराज्ञी रुपवतीने आपल्या आईसाहेबांकडे पाहिल व काळजीच्या सुरात म्हणाल्या." खुपच चिंतीत दिसतायेत ते !"

" थांबा मी आलेच ?" महाराणी ताराबाई युवराज्ञी रुपवतींना इतक्याच म्हणाल्या व जिन्याच्या दिशेने निघुन गेल्या.

□□□□□□□□□□□□□

एक मोठ-मोठ्या दगडांच्या दोन फुट कठड्याची विहिर दिसुन येत आहे आणि ती विहिर पाण्याने भरलेली आहे.त्या विहीरीच्या चौहीदिशेला कालपट झाड दिसुन येत त्या झाडांची पान विहीरीत पडली आहेत.आणि अर्धी पडलेली पान कुजुन ही गेलीयेत..त्या कुजलेल्या पाणांवर विचित्र प्रकारची कीटक आधार घेऊन बसलेली दिसतायेत आणी पाण्याला घाण वास सुटला आहे, ह्याचा अर्थ ती विहीर नक्कीच

वापरातली नव्हती. काहिवेळाने निळ्या आकाशातुन एक पक्षी उडत त्या विहीरीच्या दिशेने आला, जणु त्याला तहान लागली असावी.प्राणी, पक्षी ह्यांना जल हे कस ही असो, घाण;मातीने मळलेल कसही ते त्या बिचा-यांना अमृतच लागत. परंतु कडक उन्हाळा सुरु झाल्यावर हा पाणि सुद्धा त्या बिचा-याना मिळत नाही.म्हणुनच मित्रहो तुमच्या टेरेसवर एक वाटीभर किंवा त्यापेक्षा जास्त पाणि उन्हाळ्यात ह्या मुक्या पक्ष्यांसाठी ठेवत जा तेवढच पुण्य तुम्हाला लाभेल.आता पाहुयात पुढे.

पंख फड-फडवत तो पक्षी हवेतुन खालीयेऊन थेट विहीरीच्या कठड्यावर उभ राहिल.काळ्या रंगाचा , आणी दोन लाल डोळ्यांचा असा तो विचित्र पक्षी होता. एक दोन वेळा डोक विशिष्ट प्रकारे फ़िरवुन त्याने पाण्यात पाहिल.आणि थेट त्या विहीरीत उडी घेतली.आणि पुढे जे घडल ते विलक्षण होत. कालपट पाण्याचा स्पर्श जसा त्या पक्षाच्या शरीराला झाला, ते पाणि मायावी म्हणा की अमानवी म्हंणा कोण्यातरी शक्तिमार्फत निळ्या रंगाने चमकुन निघाल आणि तो पक्षी थेट त्या विहीरीत खेचला गेला.त्या विहीरीखाली एक तळघर होत, अंधारात बुडालेल काळ्या रंगाच तळघर.त्या तळघरात चौकोनी आकाराच्या काळ्या रंगाचे दगडांचे खांब होते.आणी त्या प्रत्येक दगडाच्या खांबावर एक मानवाच्या हाडांपासुन बनलेली कवटी टांगलेली होती, आणि त्या टांगलेल्या कवटीतुन डोळे, तोंड ह्यामधुन तांबडा प्रकाश बाहेर येत होता.एकप्रकारे दात विचकत हसणारी प्रकाशफेकणारी विचित्र भीतीयुक्त रचनाच होती ती. जर कोणी सामान्य मणुष्याने ते दृष्य पाहिल असत तर नक्कीच तो भोवळ येऊन किंवा एक हदयाचा झटका येऊन राम-राम नक्कीच झाला असता. त्या तांबड्या प्रकाश फेकणा-या कवट्यांच्या उजेडात अचानक तळघरात वरुन काहीतरी पडल गेल.काहीवेळ अगोदर आपण पाहीलेला पक्षीच होता तो. याचा अर्थ त्या विहीरीतल्या पाण्याला सजीवाचा स्पर्श होताच तो ह्या तळघरात येत असे. जमिंनीवर तो काळ्या रंगाचा विचित्र पक्षी मेलेल्या मृतासारखा पडला होता त्या हालचाल होत नव्हती की तेवढ्यातच त्या पक्ष्याच्या शरीरातुन सोनेरी रंगाची किरणे बाहूर पडू लागली.आणि ती किरणे मोठी-मोठी होत जात त्या पक्ष्याच रुपांतर एका जोकर येवढ्या बुटक्या मांणसात झाल. तसा तो प्रकाश नाहीसा झाला गेला.त्या आकृतीने हालचाल केली.जमिनीवर हात टेकवुन तो बुटका माणुस जागेवर उभा राहिला. त्याच्या अंगात सैतानाचे उपासक घालतात तसे डोक्यावर एक काली टोपी आणी पुर्णत अंगावर एक काला कपडा होता. ज्याने तोंड काहीकेल्या दिसत नव्हत.

" आं..!आंई..! आंई...! आंई.....!" एका किन्नरी आवाजात ती जोकर येवढी आकृती पाठचोळतच विव्हळली. व पाठिवर हात ठेउनच लंगडत-लंगडतच पुढे चालु लागली. पाच सहा पावल चालुन ती आकृती थांबली.समोर एक काळ्या रंगाची भिंत दिसुन येत त्या भिंतीवर

एक हिरव्या रंगाने नाव चमकत होत-- भुरी चेटकीण ,आणी बाजुला एक घंटी होती.व घंटी बाजुला एक आमचे बंधु पुणेकरांसारखी फुल जोशमध्ये पाटी लिहिली होती. बिन काम शिवाय घंटी वाजू नये , नाहीतरी तुमची घंटी बनवुन वाजवली जाईल.

" त्या जोकर येवढ्या आकृतीने ती सूचना मोठ्याने वाचली आणि खीखीखी-फिफीफी करत तोंडावर हात ठेवत हसु लागला.

 

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED