ड्रेक्युला - भाग 7 जयेश झोमटे द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

ड्रेक्युला - भाग 7

ड्रेक्युलाऽऽऽ॥ 18 भाग 7फक्त 18 प्रौंढांकरीता..

शृंगारीक , थरारक, हिंसक.

लेखक:जयेश झोमटे (जेय)

ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे


भाग 7 ..

राझगड महालात महाराज दारासिंह आपल्या पलंगावर पाठ टेकवुन बसले होते. पलंगापासुन पाच-सहा पावलांवर असलेली ती खिडकी उघडी होती त्यातून सांजवेळेची थंड हवा आत येत जायची . निळ्या आकाशातल्या टिंम-टिंमणा-या चांदण्या दिसुन येत होत्या.आणि पुढच्याक्षणाला हळुच एक तारा खाली पडताना दिसला. दोन्ही पाय पलंगावर सोडुन पाठ ठेकवुन आणि एक हात डोक्यावर ठेवुन महाराज बसले होते.की तेवढ्यातच अचानक त्या शांततेत एक दार ठोठावण्याचा आवाज घुमला, आवाज येताच एका बिथरलेल्या धक्का बसलेल्या माणसाप्रमाणे महाराजांनी खाडकन डोळे उघडले.नी थेट एक कटाक्ष समोर टाकला. तसे त्यांना दरवाज्यात उभ्या असलेल्या महाराणी ताराबाई दिसल्या.
" हुश्श्श!" तोंडातून एक श्वास सोडला, व डोळ्यांनीच इशारा करुन त्यांनी महाराणींना आत बोलावल.दरवाज्यातुन आत येत महाराणी हळुच पलंगावर बसल्या.
" काय झालं तुम्हाला? इतके चिंतीत का दिसत आहात, अरण्यकांशी काही वाद!" म: ताराबाईंना सुद्धा हे ठावुक होत, की महाराजांचा स्वभाव भांडखोर नाही .समोर मुद्दा कोणताही का नाही असो ते नरमीने सोडवत असत . भांडण किंवा वाद घालत बसण हा त्यांच्या स्वभावात न बसणारा घटक होता. म:ताराबाईंच्या वाक्यावर महाराजांनी हलकेच डोळे मिटुन घेतले व म्हणाले.
" घात झाला महाराणी , घात झाला." बोलताना ते आपली मान डावी-उजवीकडे फिरवत होते.
" कोणाचा घात झाला! अहो काय बोलताय तुम्ही !" म: ताराबाईंनी जरा विस्फारलेल्या नजरेनेच महाराजांकडे पाहिल व त्यांच हात आपल्या हाती घेत पुढे म्हणाल्या.
" अहो हे पाहा तुम्ही आधी शांत व्हा , आणि काय झालं ते मला निट सांगा पाहु.!" महाराणी प्रेमळस्वरात म्हणाल्या.मित्रानो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ! की बायकोशिवाय ह्या जगात आपला कोणताच बेस्ट फ्रेंड नसतो! एकवेळ मित्र धोका देईण परंतु आपली बायको कधीच नाही.
उगाचंच अशी म्हंण नाही.की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, ती आपली आई , बहिण , मुलगी, बायको कोणीही असो.
म: ताराबाईंच्या प्रेमळस्वराने महाराजांची भीती, काळजी जे काही होत ती जरा कमी झाली.
" ठीके ..! " महाराजांनी एक दम भरला व पुढे म्हणाले.
" सांगतो ऐका तर ! "
□□□□□□□□□□□□□□
त्या विहीरीत भू-या चेटकीणीच घर होत.ह्या चेटकीणी न जाणे कोठे कशा राहतील सांगता येत नाही. त्या लहान बुटक्या जोकर येवढ्या आकृतीने ती सूचना वाचुन तोंडातली बत्तीशी दाखवत हसायला सुरुवात केली.एका किन्नरा सारखा दात दाखवत तो हिहिहिही आवाज करत हसु लागला.काहीक्षणातच त्याच हसु न जाणे का परंतु ओसरल कारण दरवाज्याला लावलेली बेल रुपी घंटी त्या बुटक्या इसमाच्या वरचढ होती.
त्या बिचा-या बुटक्याच्या मनात आता काय घाळमेळ सुरु झाली देव जाणे.आपले दोन लहान पाय वाढवुन तो त्या घंटीच्या खाली उभा राहिला. हा दोन फुट होता, आणी ती घंटा वर हवेत चार फुट उंचावर होती.ज्याप्रकारे स्विमिंग पुल रेस मध्ये उडी मारण्या अगोदर खेळाडु आपले हात वर करतो आणि मग जंप घेतो.सेम हुबे-हुब त्याचप्रकारे त्या बुटक्या आकृतीने आपले दोन्ही हात त्या घंटीच्या दिशेने केले व दोन्ही पाय एकमेकांना टेकवुन वर पाहत थोडे खाली आणले व टुनकन हवेत एक उडी मारली , आणी पुढच्याक्षणाला त्याचे हात त्या घंटीला लागणार की तोच खाडकन बाहेरच्या दिशेने दरवाजा उघडला , आणी त्याभार -भक्कम दरवाज्याची झाप अशीकाही त्या तीन फुट बुटक्या बिचा-याच्या तोंडावर बसली की तो थेट हवेत पाच फुट मागे उडाला आणि अंधारात नाहीसा झाला.
" ए कोण हाय ले, !" भु-या चेटकीणीने दरवाजा उघडून समोर पाहिल, अंधाराशिवाय समोर कोणिही नव्हत.एक दोन क्षण थांबुन तीने आपल्या पांढरट डोळ्यांनी चौही दिशेना पाहिला, परंतु कोणीही नसल्याने ती पुन्हा आत जाणार की तोच तिला अंधारातुन काला कोट घातलेली आणी सात फुट उंच असलेली एक आकृती आपल्याच दिशेने येताना दिसली.
□□□□□□□□□□□□□□
" महाराणी, आम्ही वेशीवर पोहचताच .समोर तीस चाळीस जंगली आदिवासी उभे होते." महाराजांनी हळूच म:ताराबाईंकडे पाहिल.
" तुम्हाला माहीती असेलच, की ह्या जंगली आदिवास्यांसमवेत आपल चांगल नात आहे, ह्या आदिवास्यांनी आपल्या राहाझगडला खुपसा-या युद्धांत मदत सुद्धा केली आहे. " महाराजांच्या ह्या वाक्यावर म:ताराबाईंनी फक्त मान डोळावली ,तसे ते पुढे बोलू लागले.
" तिथे जमलेल्या प्रत्येकाकडे एक शस्त्र होता, कोणाकडे भाला होता, तर कोणाकडे लाकडापासून बनवलेल धार-धार सुळा हे सर्व पाहून तर एक क्षण आम्हाला ही वाटल की हे लढायला तर नाही आले.परंतु आमच्या मनातला तो विचार फार चुकीचा होता." महाराजांनी एकवेळ खाली पाहिल मग पुन्हा महाराणींकडे पाहत सांगु लागले." मी पोहचताच त्या आदिवासींचा एक मुख्य होता, तो सर्वांन पुढे आला.आणि त्याने मला जे काही सांगितल ..!" महाराज इतके बोलुन थांबले, त्यांच्या डोळ्यांतुन हळकेच अश्रु गळाले जे पाहुन म:ताराबाईंना त्या अरण्यकाने त्यांना असं काय सांगितल ते ऐकुन घेण्याची उत्सुकता लागली , बाजुला असलेल्या टेबलावरच्या चांदीच्या जगातुन त्यांनी महाराजांना ग्लासामार्फत पाणि प्यायला दिल.थंड पाणी घशात जाताच महाराजांना जर बर वाटल.
" काय म्हणाले ते अरण्यक?" ग्लास पुन्हा आपल्या हाती घेत म:ताराबाई म्हणाल्या.
□□□□□□□□□□□□□□
" द्रोहकाल! !" भुरी चेटकीण दरवाज्यात उभ राहुन पुढे अंधारात पाहत म्हणाली. समोरुन द्रोहकाल ड्रेक्युला चालत येत होता. त्या सैतानाच्या v आकाराच्या चेह-याची त्वचा मेलेल्या माणसासारखी राखाडी पडलेली .परंतु न जाणे का. की राहुन राहून अस वाटत होत की त्या पांढ-याफट्ट चेह-यावर एक मायावी तेज झळकत आहे , जे की त्या चेह-याकडे पाहताच एकदम भुरळ पाडेल.त्या दोन काळ्या लहान डोळ्यांवर असलेल्या काळ्या भुवयांशिवाय एक केसही उगवलेल नव्हत. नाक -आणी कान दोन्ही सामान्य माणसापेक्षा जरा जास्तच टोकदार होते.नाका खाली असलेले लाल ओठ जरा सूजल्यासारखेवाटत होते.जणु तोंडात काहीतरी असाव.डोक्यावरचे वाढलेले केस अशे काही मागे चोपून बसवलेले, की जणु गारठलेच असावेत.ड्रेक्युलाच्या अंगात एक चक-चकीत काल कोट होता , कोटला जोडूनच वर मानेमागे एक लाल व काळी अशी ताठ कधीही न वाकणारी कॉलर होती.कोटमध्ये एक पांढरा सदरा होता. आणि खाली एक काळी पेंट,पायांत काळे चक-चकीत बुट आसा त्याचा पेहराव होता. दोन्ही हाताने तो काळा-लाल कपडा हातात पकडुन तो पुढे-पुढे येत होता.तसे त्या कवट्यांच्यातला तांबडाप्रकाश कमी-कमी होत-होता काजळीफासल्या सारखा.
" या या मालक , आत या !" भुरी आपल्या किन्नरी आवाजात म्हणाली.
द्रोहकाल त्या पाचफुटदरवाज्यातुन मान वाकवत आत निघुन गेला..भुरी एकटक आपल्या पांढ-या डोळ्यांनी एकटक दात विचकत हस्त ड्रेक्युलाकडेच पाहत होती, परंतु त्याच मात्र तिच्याकडे लक्ष नव्हत.
द्रोहकाल आत जाताच भुरीने तो भारभक्कम दरवाजा लावायला सुरवात केली. परंतु त्या हाडकुल्या म्हाता-या चेटकीणीला काहीकेल्या तो दरवाजा बंद होईना . त्याची झापच येवढी जाड-जुड पावरफुल होती की उघडायला सोपा आणि लावायला मात्र नाकी नऊ यायचे.
" द्रोहकाल , हिहिही , खिखिखी!" दात विचकत हसत भुरीने किन्नरी आवाज देत त्याच्या कडे पाहिल.तो एकटक समोर पाहत होता परंतु समोर पाहत असताना सुद्धा त्याच्या अमानवीय शक्ति मार्फत त्याला भुरीला काय म्हणायच आहे समजल गेल.आपल्या कोटच्या खिशात हात घालून त्याने एक सोनेरी रंगाचा ब्रश बाहेर काढला, आणी तो ब्रश पाठमोरा उभा राहुनच त्याने आप्ल्या राखाडी रंगाच्या हाताने मागे भिरकावला.तसा सोनेरी रंगाने चमकत हवेत गोल-गोल भिंगत तो ब्रश त्या जाड-जुड दाराला हलकेच स्पर्शला तशी ती झाप धाडदीशी धुळ उडवत दारावर आपटली नी दरवाजा बंद झाला.एक लहाण मुलगा ज्याप्रकारे आपल्या आईबरोबर बाजारात गेल्यावर रस्त्यात असलेल्या खेळण्यांना डोळे फ़ाडून,आ वासुन पाहत असतो, तशी ती भुरी चेटकीण त्या ब्रशला पाहत होती कारण त्या भुरीला तो चमत्कारीक ब्रश तिला हवा जो होता. त्या ब्रशमध्ये असलेल्या शक्तिचा उपभोग तिला घ्यायचा होता.
" ए भुरे ! " ड्रेक्युला गरजला.
"जी,जी, जी मालक." आपल्या म्हाता-या किन्नरी आवाजात भुरी म्हणाली.ड्रेक्युलाचा क्रोध त्या भुरीच्या मनातल्या भीतीला बाहेर काढायचा,त्याची जरब त्याचा क्रोध काही साधा नसायचा हे भुरीला ठावुक होत.पाठीत कुबड असल्याने वाकत-वाकत भुरी द्रोहकाल जवळ आली.व एकटक त्याच्या राखाडी चेह-याकडे पाहु लागली.
" तुला जे हव होत, ते आणलय मी.आता लवकरात लवकर मला माझ्या
मेनकाला पुन्नरजिवित कस करायच ते सांग. "
ड्रेक्युला समोर पाहत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर भुरीने शॉक लागलेल्या सारख डोक हलवुन दात विचकत आपली पावल उचलली.
पाच-सहा पावल चालुन ते दोघे एका विचित्र जागेत आले. ती जागा म्हंणजेच भुरी चेटकीणीच्या राहण्याची खोली होती , मायावी खोली . त्या खोलीची रचना अशी होती की त्या खोलीला भिंती नव्हत्या.
होता तो फक्त काळोख , चौहीदिशेना दूर -दूर पर्यंत पसरलेला ज्याला समाप्त हा शब्द लागु होत नव्हता. त्या खोलीत हवेत अंधांतरी तांबडया रंगाचे स्फटिकासारखे काही गोळे तरंगत होते. आणि त्या गोल स्फटिकासारख्या तांबड्या रंगाच्या प्रकाशात त्या खोलीतल्या काही-बाही विचित्र वस्तु दिसत होत्या. त्या खोलीत चार दगडांमधोमध जाड-जुड लाकडांची आग पेटलेली दिसुन येत त्या दगडांवर एक मोठा भांडा ठेवलेला, ज्यावर झाकन नसल्याने त्या भांड्यातुन हिरवीवाफ बाहेर येत होती. भांड्या पासुन थोड दुर बाजुला एका कपाटात खुपसारी जाड-जुड पुस्तक दिसत होती. आणि त्या पुस्तकांबाजुला अजुन एक कपाट होत काहीसा विचित्र . ज्यात मोठ-मोठ्या काचेच्या बरण्या असुन त्यात साप-उंदीर,पाळी, कोक्रोच,वळ-वळणा-या पांढ-या अळ्या, लहान-मोठे कोळी, नाना त-हेचे किटक भरुन ठेवले होते. पाठीत वाकत-वाकत लंगडत चालत भुरी निघालेली आणि तिच्या मागे तो सैतान ड्रेक्युला. एक चौकोनी आकाराचा टेबल दिसत होता, आणी त्या चौकोनी टेबलावर एक पांढरट काचेचा गोल आकाराचा स्फटिक ठेवलेला दिसुन येत होता. आणि त्या स्फटीका एका बाजुला ऊभी होती दात विचकत हासणारी भुरी आणि दुस-या बाजुला होता सैतान..
॥ ड्रेक्युलाऽऽऽ॥क्रमश :


क्रमश:

रेट करा आणि टिप्पणी द्या

Tejas Ghorpade

Tejas Ghorpade 2 महिना पूर्वी