रक्त पिशाच्छ - भाग 10 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

रक्त पिशाच्छ - भाग 10

रक्त पिशाच्छ  ॥  भाग  10

 

दिवस 1

शिमगा स्पेशल....शिमग्याची सोंग.������

 

भुरीच बळी देऊन त्या सैतानाने रक्तरंजित  खेळाला सुरुवात केलेली.भुरीला त्याने का मारल होतं? प्रथम तर त्याला तो जादूचा ब्रश तिला  द्यायचा नव्हताच ! हे त्याच पहिल्यापासुन ठरल होत.दुसर म्हंणजे त्याच्या मनात आपुलकी-,किव , दया- माया याचनेच्या  अन्य भावनेंना जागा शिल्लक नव्हती त्या धुर्त, पापी विचारांनी नढलेल्या सैतानाला  आपल्या प्रिय पत्नी आणि चेला मायाकाल शिवाय कोणिही आवडत नव्हत .हे सांगायच मुळ हेतु  हाच आहे की भुरी ही फक्त एक कळसूत्री बाहुली होती.त्याच्या कामापुरती तो तिला आपल्या हातावर नाचवत होता.आणि एकदा का काम झाल, की तिला त्या न वापरता येणा-या बंद कपाटात कायमच फेकणार होता.  परंतु भुरीला हे सर्व  समजायला नको हवं  होत  का? की हा क्प्टी नीच सैतान तिला आमिष दाखवत आहे! आपल्या गोड बोलण्यात गुंतवत आहे.पन हे सर्व आता बोलून त्याचा उपयोग नव्हता कारण  आता वेळ निघुन गेलेली, भुरी त्याच्या जाळ्यात फसून ,तिच म्रुत्यु ही होऊन गेला होता.आणि ह्या सर्व घडणा-या विलक्षण  घटनेंना  पाहता-पाहता वेळ सरुन गेलेली.

रात्रीची-मध्यरात्र होऊन पहाट उगवायला सुरुवात झाली होती. तसा तो द्रोहकाल ड्रेक्युला  सैतान सुद्धा पहाट उगवायला येत आहे हे पाहुन पंख फड-फडवत आपल्या  गुहेत असलेल्या तळघरात जाऊन आपल्या कब्रेत निजला होता. त्या सैतानाला सुर्याच प्रकाश अनिवार्य होत,शरीरात असलेल्या वाईट गुणांमुळे त्याच ते शरीर नासल गेलेल , ज्या नासलेल्या देहाला सुर्याच्या प्रकाशाची एक  किरण सुद्धा स्पर्श होताच  राखेत रुपांतरीत करायला पुरेशी होती. अजुन खुप सा-या गोष्टी होत्या ज्या त्या सैतानाला रोखु शकत होत्या, काहीकाळ बंधणात ठेऊ शकत होत्या =परंतु ते आपण पुढे पाहू सद्या ते जाणून घेण्याची वेळ नाही.

****************************

आजपासुन सुरु झालेल्या होळी निमीत्त राहाजगड गावात दरवर्षी प्रमाणे तीन दिवसांकरीता होळीची  जत्रा भरलेली -आणि तीस-या दिवशी होळी संपताच जत्राही संपणार होती. राहाजगडच्या प्रथम घरापासुन ते शेवटच्या घरापर्यंत जत्रेतल्या मांणसांचे मिठाई,कपडे,लहान-मुलांची खेळणी,असे विविध प्रकारचे  तंबू लागले होते.

आणि बाजुच्या मोकळ्या जागेत गोल-गोल भिंगणारे लहान पाळणे सुद्धा  बसवलेले-ज्यात सात-आठ वर्षाची मुल बसली होती-आणि बाजुलाच एक माणुस तो पाळणा हाताने फिरवत होता.

(गावात स्द्यातरी लाईट नव्हती) पाळणा फिरताच ती लहान  मुल खळ-खळून हसत टाळ्या वाजवत होती.

अशातच मौज-मजेतपाहता-पाहता सकाळ निघुन गेली, दुपार व्हायला लागली .

तसे घरकाम आवरलेल्या बायका -मुली सुद्धा  जत्रेत येऊ लागल्या ज्याने  तुडूंब गर्दी होऊ लागली.

राझगड महालात महाराज आपल्या सिंहासनावर बसलेले, त्यांच्या समोर एक माणूस उभा होता त्या दोघांचही काहीतरी संभाषण सुरु होत.

" महाराज! आपण सांगितल्या प्रमाणे मी नियम बनवले आहेत! वाचुन दाखवतो!" तो पुढचा माणुस म्हणाला,  त्याच्या ह्या वाक्यावर महाराजांनी फक्त होकारार्थी मान हळवली. त्या माणसाने आपल्या हातात असलेला कागद समोर धरला व त्या कागदात काय लिहिल आहे ते वाचु लागला.

"काहीदिवसांपासुन राहाजगडमध्ये  घडणा-या विचित्र घटनांना पाहता, ह्या वर्षी होळी निमीत्त  भरवल्या जाणा-या तीन दिवसांच्या जत्रेस काही नियम लावले आहेत- जे राहाजगडमध्ये राहणा-या रहिवास्यांनी आणि राहाजगडमध्ये जत्रेचा आनंद घेण्यास येणा-या दुरच्या गावक-यांनी काटेकोरपणे पाळावेत अशी नम्र विनंती." त्या माणसाने येवढवाचुन महाराजांकडे पाहिल-महाराजांनी फक्त होकारार्थी मान हलवली, तसे तो पुढे बोलु लागला

" नियम क्रमांक पुढील प्रमाणे

1]जत्रेची वेळ सकाळ ते संध्याकाळपर्यंत  असेल! संध्याकाळ होताच सर्व दूकानवाल्यांनी आप-आपले दुकान बंद करुन आप-आपल्या तंबुत बसुन  राहावे-किंवा अन्नग्रहण करुन झोपी जाव.  बाहेर भटकू नये ,अन्यथा जिवास धोका निर्माण  होऊ शकतो.

 

2] जे रहिवासी दुस-या गावातुन राहजगड मध्ये जत्रेला येतात, त्यांनी गावातुन  दुपार होताच परतीचा मार्ग धराव-कारण  संध्याकाळ होताच राहाजगडच्या वेशीवर असलेले सैनिक कोणालाही वेशीबाहेर किंवा आत  येऊ देणार नाहीत-राहाजगड  बाहेरुन आलेल्या मांणसांसाठी एक विशेषविश्रांती गृह तैयार केले गेले आहेत. महाराजांच्या हुकूमावरुन!

 

3] गावात आणि जत्रेच्या ठिकाणी रात्री - अपरात्री पर्यंत सैनिकांचा

फेरफटका ठरलेलाच असेल ! कृपया सैनिकांशी वाद घालु नये.

 

4] जत्रेच्या आंतिम दिवशी, जत्रा फक्त आणि फक्त दुपारपर्यंतच मर्यादित राहिल दुपार होताच सर्व दुकानदारांनी आप-आपल्या परतीच्या प्रवासाला निघाव-शक्यतो जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकरच निघाव.

5] आणि शेवटच आंतिम नियम! आप-आपल्या तंबु बाहेर एक-कंदील, मशाल , टीटवी पेटवुन ठेवावी.! आणि जर कोणी ह्या नियमांच पाळण करणार असेल, किंवा नियमांच उल्लंघन करेन त्या गावक-यास किंवा दुकानदारास जत्रा संपेपर्यंत राहाजगडच्या कारावासात कैदी म्हनुन  ठेवल जाईन.!"

" वा! खुप छान नियमावली तैयार केली आहे आपन.परंतु मी सांगितल्या प्रमाणे भट्टाचार्यांना निरोप पाठ्वला आहे का?"

" होय महाराज! आमच्या एका विश्वासू मांणसा मार्फत आम्ही आज पहाटेच त्याला निरोप घेऊन साधुबाबांकडे पाठ्वल आहे."

तो माणुस म्हणाला की प्रधान तो महाराजांकडे पाहत म्हणाला.

" वा खुप छान!  आता लवकरात लवकर ह्या नियमावलीस हो दवंडी पिटवुन रहिवास्यांना - कळवा .चौका-चौकात नियमांचे  फळे बसवा.! " महाराज काहिवेळ थांबुन पुढे म्हणाले " आता या तुम्ही"

" जी महाराज!" तो समोरचा माणुस कमरेत लवून म्हणत  निघून गेला.

□□□□□□□□□□□□□□□□

राहाजगडच जंगल म्हणायला दुर-दुर पर्यंत पसरल होत. जंगलातली हिरवी झाड इतकी बलदंड-आणि मोठी होती, की त्यांच्या मुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहचत नव्हता ज्या कारणाने  जंगलात नेहमी काळोख असायचा. मोठ-मोठाले साप,  हिंस्त्र जनावर, जंगलातले विषारी घातकी कीटक ह्या सर्वांनी ते जंगल चक्क भरल होत-आणि ह्याच जंगलात ते आदिवासी राहत होते,ज्या आदिवास्यांनी महाराजांना जैक-आणि रिनाच्या मृत्युची वार्ता कळवली होती.जंगलातल्या खोल भागात झाडाझुडपांनी वेढलेल्या एका जागेत पंधरा -वीस लाकडाच्या झोपड्या दिसत होत्या.जेमतेम दहा-अकरा फुटाच्या भक्कम बांधणीने उभारलेल्या झोपडया.त्या झोपड्यांमध्ये एक झोपडी खुपच वेगळी होती- तिची ऊंची आणी लांबी पाहता ते एक देऊळ असाव असंच वाटत होत.बत्तीस फुटांवर पसरलेल्या त्या झोपडीची रचना पुढील प्रमाणे होती.चौही बाजुंना लाकडांच्या भिंती होत्या, आणी आत जाण्यासाठी एक कालोखी चौकट होती -आत अंधार असल्याने आतल काही दिसत नव्हत.त्या चौकटीवर दरवाजा बसवला नव्हता, फक्त त्या चौकटीच्या मधोमध वर एका बिना मांसाच्या वाघाच्या डोक्याची  कवटी बसवली होती. त्या चौकटीच्या आत असलेल्या खोलीत चार तांबड्या रंगाचे कंदील जळत होते, तेवढाच काय तो प्रकाश होता आतमध्ये .त्या प्रकाशात आतमध्ये एक सात फुट काळ्या माकडाची, पाषाणापासुन बनलेली ऊभी  मूर्ती दिसुन येत होती.त्या मूर्तीच रुप जरा ह्दयाचा थरकाप उडवणार विचित्र अक्ल्प्निय होत.गोळ टक्कल असलेल डोक, दोन-मोठे काळे कान, जाडजुड काळ्या रंगाच्या  भुवया, त्या मधोमध रेघाटळेल लालभडक कुंकू आणि  वटारलेले डोळे, तोंड वासलेल होत.ज्यातुन खालून-आणि वरुन अशे एकूण मिळुन चार सुळ्यासारखे टोसकुळे  काळे दात बाहेर आले होते आणि त्या वासलेल्या तोंडात मांस कोंबुन ठेवल होत, गळ्यात तुटलेल्या बोटांची पाषाणापासुनच कोरलेली  माळ घातलेली दिसत होती.खालच शरीर एका माकडा सारखाच होत.फक्त हातापायांची नख पोलाद असल्यासारखी वाढली होती. त्या उभ्या मूर्तीच्या पायांखाली टाचणी टोचलेले त्यावर लाल डाग असलेले दोन लींबू, बाजुला जमिनीवर लाल कुंकु, पिवळी हळद पडलेली.मूर्तीसमोर एक धग-धगत्या आगीचा हवनकुंड जळत होता, आणी त्या हवनकुंडातुन निघणा-या आगीबाजुला दोन नग्ण प्रेत ठेवली होती-जैक आणि रिनाची. दोघांच्याही शरीराची नग्न त्वचा राखाडी पडलेली, त्या शरीरांवर एक माणुस  हातात एक ताट व त्यात खुपसारी  हळद घेऊन त्या दोन्ही प्रेतांच्या शरीराला चोळत होता.नाका तोंडात कोंबत होता. काहिवेळात दोन्ही प्रेतांच्या पुर्णत शरीराला हळद चोळून झाल्यावर, तो हवनकुंडा समोर येऊन बसला तसे त्याच रुप दिसल.शरीर यष्टीने जाड-जुड , रंगाने जल्लाद सारखा काळा  बिना दाढी-मिशीचा चेहरा, आणी डोक्यावरही टक्कल पडलेला, पोटाची ढेरी सुटलेला -असा तो माणुस दिसत होता.जणु एक जिवंत सैतानच .

त्यांच नाव होत रघुभट, जंगलातल्या अदिवास्यांच्या झुंडातले भट होते ते.त्यांच्याकडे अमानविय शक्तिंचा ठेवा होता ज्यांच वापर ते चांगल्या कामासाठी करत. काळच त्यांची महाराजांसमवेत एक भेट झाली होती, आणी महाराजांनी महाराणी ताराबाईंना ज्या योगपुरुषांबद्दल माहीती दिली होती ते हेच होते.

हवनकुंडासमोर एका सोनेरी गोल थाळीत काळ्या रंगाच्या दोन बाहूल्या ठेवल्या होत्या, दोन्ही बाहुल्यांच्या तोंडावर चुन्याने डोळे आणि ओठ रेखाटले होते. बाजुलाच दुस-या थालीत  एक मेलेला बिन धडाचा कोंबडा ठेवलेला त्याच्या गळ्यातुन मंद प्रवाहाने रक्त  वाहत होत.आणि त्या कोंबड्यावर लाल-पिवळा बुक्का फ़ेकल्यासारख दिसत होत.रघु भट हे शरीराने पैलवाना सारखेच दिसत होते. शारीरीक रचना पाहता हात-पाय फुगीर बलदंड आहेत. अशातच त्यांनी आपला एक बलदंड काला हात तोंडाजवळ आणला,व एक विशिष्ट प्रकारचा मंत्र उच्चार करु लागले.

" सकुंम.स्कुँम! सैतानांम, पंचक्रोंम,वर्ध्ये ..! संकुंम, स्कुँम सैतानांम..प्ंचक्रोंम  वर्ध्ये  " एक घोगरा खोल खर्जातला आवाज  रघु भटांच्या मुखातुन निघाला, आणी त्या मंत्रासरशी पुढे सर्वकाही विलक्षण घडू लागल. ती तोंडाजवळ असलेली  हाताची मुठ सोनेरी रंगाने चमकु लागली. पुढच्याक्षणाला ती मुठ रघु भटांनी वर हवेत उचलुन घेत तेवढ्याच वेगाने  हवनकुंडाच्या दिशेने  विभुती फेकावी तसे भिरकावली. तसे मायावी शक्तिच्या  मंत्राउच्चाराने त्या  मुठीतुन एक सफेद चमकणारी पांढरट राख त्या हवनकुंडात फेकली गेली.राख कुंडात पडताच आगीचा एक भडका उडाला जो वर-वर जात , सेक्ंदात त्या आगीत एक तांबड्या रंगाची स्त्रीची आकृती तैयार झाली. एका अप्सरेसारखा आकार होता त्या स्त्रीच्या शरीराचा , तांबड्या रंगाची साडी-त्या साडीतुन दिसणारा कमनीय बांधा, आकार्षक वक्षस्थळे,तो सुर्यासारखा तेजोमय चेहरा,ते प्रणय नशेने न्हाऊन निघालेले डोळे.लाल पातळ  ओठ.

." प्रणाम! " त्या हवनकुंडात तैयार झालेल्या स्त्रीने हात जोडले व तिच्या मुखातुन एक प्रेमळ आवाज आला. परंतु रघु  भटांचा तिच्या ह्या बोलण्यावर किंवा ह्या रूपावर कद्यापी लक्ष नव्हत

त्यांनी पुन्हा एकदा आपली हाताची मुठ गच्च आवळली, आणि ह्यावेळेस कपाळावर ठेवली.

" सत्यंम- सत्यंम..! रुप्ंम प्रकटम, ! सत्यंम..सत्यंम रुपंम प्रकट्ंम!"

तो कपाळावर धरलेला हात, पुन्हा ह्याक्षणी  सोनेरी रंगाने चमकुन उठला. ती मुठ  रघुभटांनी आपल्या कपाळावरुन काढून घेतली, आणी विशिष्ट प्रकारे तिच्या दिशेने धरली,  त्या हातातुन एक  हिरवट शक्तिप्रवाह वेगाने बाहेर पडला नी थेट त्या हवनकुंडात तैयार झालेल्या  स्त्रीच्या शरीरावर पडला.तिच शरीर हिरव्या रंगाने चमकुन उठाल,काहीवेळा अगोदर मुखातुन निघालेला प्रेम स्वर आता, घोग-या भरड्या हजारो भांडी एकाचवेळेस फरशीवर आपटावी तसे आवाज तिच्या मुखातुन निघु लागले.

विव्हळ, वेदना, सर्वकाही मुखातून बाहेर पडु लागल, ते रुप,ते वासनांधीश  सौंदर्य गळून पड़ल, आता त्या जागी एक शंभर दोनशे वर्षाची जख्खड म्हातारी ऊभी होती, जिच शरीर एक हाडांचा पुंजका होता बस्स- ना त्या शरीराला कसलं रुप होतं नाही आकार- बस्स त्या शरीरावर होती हाड़ आणि डोक्यावरुन खाली पायांपर्यंत लोंबणारे वळवळणारे पांढरे केस.

" बस्स कर भटा बस्स कर!  हिहि..हियी..हियी .हियी..!"  घश्यातुन खव-खवणारा  आवाज त्यासमवेत एक निर्लज्जपणाचा आव आणणार हसु.हसतावेळेस ती दोन्ही हात तोंडावर ठेवून हसत होती. मित्रांनो ही एक वासनांधीश,( सर्वज्ञाणी याक्षिणी आहे.याक्षिणींचे मुळ प्रकार तळहातांच्या बोटांवर न मोजता येण्या इतपत आहेत.काही चांगल्या असतात तर काही वाईट असतात.त्यांचा लाभ कस करुण घ्यायचं हे आपल्यावर असत.बस्स इतकीच माहीती देईण मित्रांनो आपण याक्षिणीची भेट पुढे घेऊ) आवाज येताच त्या भटांनी तिच्या दिशेने वर हवेत उंचावलेला  हात खाली आणला व ते कडक , आज्ञाधारकाच्या आवाजात उच्चारले.

" हxxxxर चांडाळे ! मला फसवतेस..! तुझ्या सारख्या हजारो याक्षिण्या पाळल्यात मी, लक्षात आहेना तुझ्या.!"

" ए माहीतीये रे भटा.! आणि हे पन माहीतीये की तुझा त्या सुंदर याक्षिणींना पाहून..उठत नाही.. ते ! ही..हियी..ही..हियी.हियी..!" ती पुन्हा तोंडावर हात ठेवून निर्लज्जपणासारखी खिदळून  हसू लागली. तिच्या ह्या वाक्यावर ते भट गप्पच राहिले जणु क्रोध येऊन सुद्धा ते गिळल असाव.

"चल बोल लवकर कशाला बोलावलंय मले इथ. तसंही तुझा उठत नसेल..तर काय कामाच नाय तु माझा ही..हियी..ही..ही..हियी..हियी..!"

" अंग! ए हरामोखोर निर्लज्ज , आता एक शब्दही उच्चारु नकोस.जे विचारेन त्याचंच उत्तर दे.नाहीतर कायमच कैदेत ठेवेन."

" नको-नको..! मला..शारीरीक सुख .हव असत रोज, आणी तुझ्या सारखा नपुसंक, मला काय देणार भले..! मी गप्पच बसते सांग तुले काय पाहिजें माझ्याकडून! हियी.हियी..हियी..हिई..हिई..!"

ती याक्षिणी  पुन्हा निर्लज्जपणाचा आव आणतच म्हणाली .

परंतु ह्यावेळेस सुद्धा  त्यांनी स्व्त-च्या क्रोधावर नियंत्रण ठेवल व म्हणाले.

" मला सांग ह्या दोन्ही प्रेतांचा घात कोणी केला आहे? आणि कोणती अमानविय शक्ति आहे ती?" त्या भटांच्या ह्या वाक्यावर त्या याक्षिणीने प्रथमच एक कटाक्ष त्या दोन्ही नग्न प्रेतांवर टाकला. तिच्या अमानविय शक्तिने तिला ते दोन्ही शरीर थंडगार शवागारात ठेवलेल्या प्रेतांसारखी दिसली-राखाडी रंगाची .धार -धार नख असलेली, कान-नाक मानवापेक्षा जरा जास्त टोकदार .हे सर्व वर्णन पाहुन काहीक्षण तिचे डोळे विस्फारले व ती इतकेच म्हणाली.

" पिशाच्चराज..! .."

" पिशाच्चराज?" त्या याक्षिणीच्या मुखातुन निघालेल्या वाक्यावर ते भट म्हणाले.

" होय पिशाच्चराज भट्या!  पिशाच्चराजने मारलय ह्या दोघांना. आणि ह्या स्त्रीला केलेल्या दंशाने  अस दिसुन येतय. की ही स्त्री त्याला आवडली होती,! हीयी..हियी..हियी.. आणी हिच्या शरीराची ही दशा झालेली पाहुन ते पिशाच्च नाही तर एक  पिशाच्चराजच आहे असंच दिसुन येतय.अंधारावर राज्य करणार वासनेने नढलेला - रक्तावर करोडो वर्ष ऐशो-आरामात जगणारा पिशाच्चराज!

" म्हंणजे माझ तर्क खरा ठरला तर! " आपले दोन्ही डोळे डावी-उजवीकडे फिरवत रघुभट मनात म्हणाले व तिच्याकडे पाहिल.  " परंतु ही प्रजात तर आपल्या प्रांतातली नाही ! मग आपल्याकडे आली कशी.!"

" ते मला माहीती नाही भट्या.   पण अस असु शकत की त्याला इथं आणल असाव ! आण जर का आणल असल तर लक्षात ठेव !  तो सैतान हरामखोर सैतान जवळच्या कुठल्यातरी गावावर , रक्ताचा सडा पाडणार ! आण ते ही..! हियी..हियी..हीई हीई हीई ईईईईईई.." येवढ बोलूनच ती थांबली आणि वेड्या सारखी तोंडावर हात ठेवुन हसु लागली.त्या याक्षिणीच हे वाक्य ऐकुन रघुभटाच्या  मनात पाहिला विचार आला तो राहाजगडचा आणि काळ महाराजांसमवेत झालेल्या त्यांच्या वेशीवरच्या विचीत्र घटनांचा.

" आण ते ही..! पुढे काय..! पुढे बोल..!"  रघुभट घाईत असल्या सारखे

म्हणाले. त्यांच्या मनाला त्या पुढील शब्दांची जाणून घेण्याची आस लागली होती. रघुभटांच्या वाक्यावर त्या याक्षिणीच हसू मावळल,आणी त्या कंकाळी  चेह-यावर एक गुढ  विलक्षण शांतता पसरली आणि तिच्या त्या दोन काळोख्या खोबण्या पिवळ्या रंगाने चमकल्या.

" होळी  !" एक फटाक्यासारखा विशिष्ट प्रकारचा आवाज होत तिच्या शरीराचा स्फोट झाला.आणि ती सात-आठ फुटांपर्यंत वर उचळलेली

आग बिना आधार असलेल्या पुलासारखी खाली हवनकुंडात कोसळली.

इकडे रघुभटांच्या डोक्यात नाना त-हेचे वाईट विचार थैमान घालू लागले.राहुन-राहुन रहाजगडचा विचारच डोक्यात येऊ लागला.

" नाही ! माझ्या मनात जे विचार येत आहेत ते सत्यात उतरायला नको.

मला आताच्या आता ,राहाजगडला निघायला हव! महाराजांना  ह्या

धोक्यापासुन सावध करायला हव. !" स्व्त:शीच नकळत मान डावीकडून उजवीकडे हळवत रघुभट म्हणाले. मनाशी काहीतरी चंग बांधुन ते जागेवरुन उठले समोर असलेल्या त्या माकडासारख्या दिसणा-या विचित्र आकृतीला पाहुन हात जोडले , नी थेट दरवाज्याच्या चौकटीतुन बाहेर निघुन गेले. इकडे त्या हवनकुंडासमोर ती दोन्ही प्रेत जशीच्या तशी नग्न अवस्थेत डोळे बंद करुन पहुडली होती.दोघांच्याही शरीराला पिवळी हळद चोळलेली ज्याने ती दोन्ही प्रेत त्या हवनकुंडाच्या तांबड्या आगीत वेगळीच भासत होती.रिनाच्या राखाडी सुरकुतलेल्या चेह-यावर तो तांबडा प्रकाश पडत होता, ज्याने तीच तोंड भेसुर,क्लिष्ट  दिसत होत,तिची स्त्नाग्रे एका शंभर वर्षाच्या म्हातारी सारखी खाली झुकलेली, केस पिकल्यासारखे पांढरे पडले गेलेले . इकडे त्या  उघड्या दरवाज्यातुन एक धोतर घातलेला इसम आत आला.

तसे  रिनाच्या शरीराच रुप बदलु लागल, शरीराची त्वचा चकचकीत होऊ लागली हवनकुंडाच्या आगीत चमकु लागली, स्त्नाग्रे पहिल्यासारखी फुगीर उत्तेजित झाली , चेह-यावरच तेज पुन्हा परत आल, केसांच रंग बदलला.रिनाच रंग बदलताच त्या माकडाच्या मूर्तीसमोर जलणारा दिवा बिना हवेच्या झोतासरशी विझला, त्या खोलीतला अंधार हवनकुंड जलत होता तरीही गडद झाला ..तो सफेद धोतर घातलेला माणुस आत आला. त्या माणसाच वय जेमतेम तीस-पस्त्तीस च्या आसपास असुन नाव मदन होत.रघु भटांचा शिष्य होता तो - आत येताच त्याने एक कटाक्ष त्या दोन्ही प्रेतांवर टाकल -त्याला जैकच प्रेत डोळे बंद केलेल्या अवस्थेत दिसल.परंतु ज्यासरशी त्याच लक्ष रिनाच्या नग्न शरीरावर पडल.तिची ती पांढरी शुभ्र त्वचा   ताठरलेली दुधाल स्तनाग्रे पाहुन -त्याच्या पुर्णत  शरीरावर एक शहारा आला- वासनेने भरलेला, उत्तेजक करणारा शहारा. त्याच्या लिंगासहित शरीरावरचा एक-नी-एक केस ताठरला गेला.छातीतली धड-धड वाढु लागली.ओठ कोरडे पडु लागले.त्याने हळुच एक कटाक्ष मागे दरवाज्यात टाकला कोणीही नव्हत. त्याच्या शरीरात घुसलेल्या वासनांधीश सैतानाला धीर येत अजुनच चेव चढला. मदनने पुन्हा एकदा

 

 

रिनाच्या नग्न शरीराकडे पाहत विशिष्ट प्रकारे ओठांवरुन जीभ फिरवली आणि  तो हळुच कधी मागे तर कधी पुढे रिनाच्या नग्न शरीराकडे पाहत तिच्या जवळ-जवळ जाऊ लागला.  खोलीतला अंधार आता वाढु लागला होता, गारठ्याने आपली हजेरी लावायला सुरुवात केली होती,  हवनकुंडातली आगही कमी-कमी व्हायला सुरुवात झाली होती.

वासनेत बुडालेल्या मदनला मात्र ह्या सर्व बदलणा-या वातावरणाचा थांग पत्ता नव्हता.मदन रिनाच्या  नग्न शरीराजवळ पोहचला, तीच ते कामुक नग्न शरीर डोळ्यांत भरु लागला.मित्रांनो भले त्या शरीराला पाहुन कोण म्हणेल ? की हे  एक मेलेल प्रेत  आहे ? एक सैतानी प्रेत!जे मदनला आपल्या जाळ्यात ओढुन घेत होत! फसव मुखवट लावून त्याला आपल शिकार बनवुन घेत होत! परंतु वासनेच्या आधीन गेलेल्या मदनला कोण समजवणार ? की अरे बाबा नको जाऊस तिच्या जवळ, झोपेच सोंग घेऊन , तुझा मृत्यु   लपला आहे तिच्यात ! जे केव्हाही खाडकन डोळे उघडून तुझ्या रक्ताचा घोट घेईल ! म्हंणुन उठवू  नकोस तिला. मदन रिनाच्या नग्न शरीराजवळ पोहचला-  काहीवेळ जवळून नेत्रसुख घेऊन झाल्यावर आता , हात त्या शरीराला स्पर्शसुख करण्यास तडफडू लागले.त्याच लक्ष तिच्या दुधाळ स्तनाग्रांवर गेल,  वासनेत बुडालेला त्याचा हात आपोआप तिच्या स्तनाग्रहांच्या दिशेने वाढवला गेला.की तोच रिनाच कमरे इतक शरीर जमिनीवरुन वर उचल्ल गेल.अचानक घडलेल्या ह्या क्रियाने त्याच हात शरीर -डोळे विस्फारले जात स्टेच्युसारख जागेवरच थांबल गेल.मदन एकटक तिच्या राखाडी रंगाच्या, बंद डोळ्यांच्या  चेह-याकडे टक लावून पाहत होता त्याची वासना आता कुठच्या कूठे पळाली होती. आता त्या मेंदूत त्या डोळ्यांत भीतीची छ्टा उमटू लागली होती.अचानक रिनाच्या दोन्ही नाकपुड्या फुगल्या गेल्या आणि एक जोरदार श्वास आत घेतला गेला.तुफान वा-या वादळात जंगलात एका आडोश्याला असलेल्या  कालोख्या गुहेत शिराव , आण अचानक बेसावधपणे समोर एक रानटी हिंस्त्र झोपलेल वाघ दिसावा , त्याला पाहुन आपन गुहेतुन बाहेर पडण्यास पाउले मागे वाढवावी परंतु अचानक त्याने खाडकन डोळे उघडावे आणि एक मृत्युची झडप घालावी.सेम-हुब  हुब त्याच प्रकारे मदन रिनाला पाहुन मागे -मागे जाऊ लागला .आण बंद डोळ्यांआड जणु तिला चाहूल लागल्यासारख तिने पुढच्याक्षणाला   खाडकन डोळे उघडले. पांढरट बुभुळ आण त्यात एक काळ्या बिंदूचा टीपका. रिनाला पाहुन   मागे -मागे सरणा-या मदनचा हात नकळत हवनकुंडा समोर ठेवलेल्या एका ताटावर पडला आणि त्या ताटाचा विशिष्ट प्रकारचा आवाज झाला नी तो आवाज ऐकुन रिनाने गर्रकन मदनच्या दिशेने मान वळवली. मदनला पाहुन तिच्या चेह-यावर एक आसुरी हास्य आल भुकेलेल्या खायला मिळाल्यावर येत ते हसु  , डोळे एका विशिष्टप्रकारच्या लयीने चमकले.

जे पाहुन त्याच्या घशात श्वास अडकला आणि मुखातून त्या थरथरत्या ओठांतुन भीतीपोटी आवाज बाहेर पडणार की तोच  रिनाने आपला पवित्रा बदलला-एका रानटी श्वापदासारखी ती चार-पायांवर ऊभी राहीली आणि आपल तोंड उघडल.त्या पांढ-या शुभ्र दातांतुन खालुन-वरुन चार धार-धार तीक्ष्ण  सुळ्यासारखे दात बाहेर आले.

हा विचित्र करतब पाहुन मदनच्या पोटात गोळा आला. पिशाच्चरुपात बदललेल्या रिनाने एक-दोन वेळा आपल्या कोरड्या गुलाबी ओठांवरुन

जीभ फिरवली, आणी थेट मदनच्या अंगावर एक झडप घातली.त्या हल्ल्याने तो खाली पडला व त्याच्या छाताडावर बसुन रिनाने मान वर करुन आपला जबडा वासला-  त्यातुन चार धार-धार सुळ्यासारखे दात बाहेर आले , जे पुढच्याक्षणाला मदनच्या गळ्यात असलेल्या रक्तनटीकेत घुसले आणि पिशाच्च रिना त्याच गरम रक्त लुचु लागली. तिच्या अमानविय मीठीतुन सुटण्यासाठी तो बिचारा हातपाय झाडू लागला जिवाची भिक मागु लागला परंतु, शेवटी सुटका झाली ती जीव गेल्यानंतरच. पिशाच्च रिनाने मदनच्या शरीरातला एक नी एक रक्ताचा थेंब पिऊन टाकल्यावर त्याच शरीर  राखाडी रंगात बदलल, डोळे खोल गेले -अगदी खोंबण्यांच्यात घुसले. रक्त संपताच रिनाने आपले दात बाहेर काढले, तिच तोंड रक्ताच्या  चिखलाने माखल होत.

" ए भटा! तुला मी राहाजगडच्या दिशेने पोहचु देणार नाही येतीये मी..!

रिनाच्या मुखातून एक घोगरा आवाज बाहेर पडला.

 

क्रमश: