रक्त पिशाच्छ - भाग 13 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

रक्त पिशाच्छ - भाग 13

रक्त पिशाच्छ ॥ 18+ भाग 13 महाएपिसोड पेटली रे पेटली प्रेतांची होळी

 

भाग 13 महाएपिसोड..पेटली रे पेटली प्रेतांची होळी पेटली..

 

वर आकाशात काळ्याभोर ढगांच्या छटांबाजुलाच एक गोल आकार पांढ़-याशुभ्र रंगाने चमकत होता ज्याचा प्रकाश ह्या अखंड भुतळावर पडत जात तो आकार म्हंणजेच चंद्र होता. एक दोन मिनीटांनी त्या चंद्राभोवती न राहवुन राहवुन काही काळे ढग जमा होऊन चंद्राचा प्रकाश जमिनिवर पडण्यापासुन रोखत होते. त्यांची हीच क्रिया पुन्हा पुन्हा घडत होती.चंद्राचा प्रकाश जसा जमिनिवरुन नाहीसा होत-होता-तैसे अमावास्या सुरु झाल्यासारख वाटत होत.ज्याप्रकारे घरात कोणी मेल्यावर त्या पुर्णत घराला सुतक लागत त्याचप्रकारे चंद्राचा प्रकाश नाहीसा होताच ह्या पृथ्वीरच्या मानवतेच्या आस्तित्वाला सुतक लागत होत.अंधा-याच्या काळ्या भिंतीमधुन सैतान रक्त मांसाच्या चटकेने हवालदील होऊन फिरत होता. गावातल्या एका खुळ्या मांणसासारखा जस तो माणुस समोरच डोक खातो तसा हा सैतान रातीच्या बाहेर भटकणा-या मांणसांच रक्त लुचत होता. धड-धडत्या आगीची चिता जशी अफाटवेगाने पेट घेऊन प्रेत बका-बका तोंडात कोंबते तसा हा सैतान एकापाठोपाठ खून करत सुटला होता.राहाजगड गावात म्हणायला प्रेत जाळण्याची परंपरा नव्हतीच -तर लोक प्रेत गाडत असायची जणु नावालाच मशान नाव लिहिल होत बस्स परंतु आत मात्र कब्रस्तान सुरु होत. राहाजगडच्या मसनाला चारही बाजुनी नऊ फुट बांधणीच कंपाउंड घातलेल.मधोमध एक दोन झापांच गंजलेल लोख्ंडी गेट होत.गेटला तेल वगेरे न मिळाल्याने त्याचा नेहमीप्रमाणे प्रसिद्ध करकरण्याचा आवाज व्हायचा जो ऐकून तिरडी घेऊन आलेल्यां मधल्या एक दोन भित्र्यांची भीतीने जागीच फाटायची.त्या दोन झापांच्या गेट पुढे जुन्याकाळातल्या दगडांपासुन बांधलेल्या सात-आठ काळ्या पाय-या दिसुन येत होत्या.ज्या उतरल्यावर पायांना मसनातली थंड भुस-भुशित माती लागत होती.मग पुढे एक नजर टाकली की राहजगडमधल्या म्हाता-या कोता-यांच्या, सैन्यात मेलेल्या , तर कोणि गळफास लावुन घेतलेल्या मांणसाना गाडलेल्या मातीच्या ढिगांच्या कबरी दिसत होत्या.कोणि मृतकाच्या मांणसाने ढेकळावर प्रेमाने रोपट लावल होतं तर कोणी गुलाबाच झाड..त्यावर एक लाल गुलाब ही उगवलेल दिसत होतं.दुर-दुर पर्यंत जेम-तेम एक एकरावर पसरलेल्या ह्या मसनात जिकडे नजर जाईल तिक्डे फक्त आणि फक्त मातीच्या कबरी दिसत होत्या. आणी त्या मातीच्या ढेकलाखाली झोपली होती

असंख्य शेकडो मृतप्रेतताम्यांची फौज.

मसनाच्या शेवटच्या टोकाला एक चेटकीणीच्या झोपडीसारख हुबे-हुब पन थोडवेगळस घर दिसत होतं. आठफुटाच्या चार मातीच्या भींतींच आणि वर कौलारु छप्पर नी त्यावर एक जाडजुड मातीपासुन बनवले नळी दिसत होती..त्यातुन पांढरट धुर बाहेर पडत होतं.घरापासुनच जरा वीस पावलांवर डाव्या बाजुलातीस फुट लांबीची एक बाग दिसत होती.बागेत टॉमेटो, वांगे, काकडी, विविध प्रकारचा भाजीपाळा लावलेला दिसुन येत त्यासमवेतच मोठ -मोठी झाड आंबा, जांभुळ,पेरु , सिताफळ इत्यादी लावलेली दिसत होती...आणि बागेत काजळासारखा अंधार भरला होता.झोपडीच्या उजव्या बाजुलाच एक पाच फुट दगडी कठड्याची विहिर होती , ज्या खोल विहीरीत डोकावून पाहता कालपट पाण्यात चंद्राची आकृती उमटलेली दिसत होती.

इकडे त्या चेटकीणीसारख्या दिसणा-या घराच दार हळकेच उघडल गेल आणि दरवाज्यातुन मेघावती बाहेर पडली. तिच्या अंगात एक फिकट भगवी साडी होती...गोल चेह-याच्या कपाळावर एक छोटीशी टिकली बसवलेली..आणि हातात एक ताट होत..ज्यात होळीआईसाठी नैवेद्य असाव.

" बा..! मी व्हळीला जाऊन येते..!"

दरवाज्याला बाहेरुन कडी घातली व हातात तो ताट घेउन वीस तीस पावल चालुन ती पुन्हा थांबली.तीने एक कटाक्ष पुढे टाकला..समोर

मातीच्या ढेकलांच्या कबरी दिसत होत्या. आणि त्या कबरींबाजुलाच पाच नवे खड्डे खणले गेले होते.मेघावतीला हे ठावुक होतं की आपला बा ज्या-ज्याक्षणी मसनात खड्डा खणत असायचा त्या-त्यावेळेस एक प्रेत त्या खड्डयात बुंजल जायच-रडत-विव्हळत छाती आपटत मृतकाची स्वारी लोक तिरडीवर घेऊन यायची बाबा-ला दोन तीन रुपये देऊन

प्रेत गाडून जायची.दर वेळेस आंबो एकच खड्डा खणत असत, हा तस म्हणायला गेल्या वेळेस ते दोन सैनिक मेले तेव्हा आंबोने दोन खड्डे आदळ्या रात्रीच खणुन ठेवले होते जणु गावात कोणि मरणार ह्याची शाश्वती त्याला झालीच होती...आणि पुढच्याच दिवशी सकाळी दोन प्रेत त्या खड्डयात गाडली गेली होती.

" आज चक्क पाच खड्डे!"मेघावतीने मनातच प्रश्ण केला.परंतु बा-ला विचारलं नाही, आंबोच स्वभाव तसं म्हणायला अंतर्मुख होता..तो जास्त कोणाशी बोलत नसायचा. नेहमी स्व्त:च्याच विचारांत गुंतलेला असायचा.. गर्दी तर मुळीच आवडत नसायची..म्हणुनच प्रेतयात्रा आली की हा आंबो त्यांच्यापासून तीस चाळीस मीटर दुर उभ राहायचा! मृतकांच्या घरातली एक दोन्ं मांणस पैसे हातात ठेऊन गेली, की मग हा आंबो एकटाच प्रेतावर माती टाकून खड्डा पुर्ण बुंजवत असे.

मेघावतीला आपल्या बा-च्या स्वभावा बदल सर्व काही ठावुक होत. आंबो कसाही असला तरी तिचा बा होता. आंबो जास्त कोणाशी बोलत नसल्याने त्याचे स्वर एका बोबड्या मांणसासारखे बाहेर पडायचे

शब्दरचना अडखळली जायची तर कधी शब्द मागे-पुढे होत असत.

पन तरीही मेघावतीला मात्र आपल्या वडिलांची भाषा कळायची.

ते काय बोलत आहेत त्यांना काय हव नको ते सर्व पाहायची.

" बा ! म्या व्हळीला जाऊन येते..!"

मेघावती पुन्हा म्हणाली.तिच्या आवाजासरशी त्या पाच खड्डयांमधुन एक जेम-तेम साठ -सत्तर वर्षाचा आंबो उभा राहिला. त्याच्या कपड्यांना हाता-पायांना माती लागली होती.

" ज्या.जा..ज्या....!

एका खुळ्यासारखा दात विचकत डोक नंदी बैलासारखा डावीकडुन-उजवीकडे फिरवत, खस,खसणा-या आवाजात आंबो उच्चारला. तसा त्याच्या ह्या वाक्यावर मेघावतीने फक्त हसतच होकारार्थी मान हळवली व जायला निघाली.ती जाताच आंबो पुन्हा आपल्या कामाला लागला.जाता-जाताच मेघावतीने पुन्हा त्या पाच खड्डयांच्या दिशेने मागे वळुन पाहिल तिच्या चेह-यावर जरा भीती पसरली होती.

होळीआईचा सन ऐला होता..

आण एन सनासूदीच्या हंगामालाच गावाला एक सुतीक लागणार व्हत.!

□□□□□□□□□□□□□

राम उर्फ रामु सावकाराचा वाडा :

 

रामु सावकाराचा वाडा तसं म्हणायला दू-मजली असुन जुन्या बांधणीचा होता. वाड्याला चौहीबाजुंनी कंपाउंड होत...वाड्यात प्रवेश करण्यासाठी कंपाउंडच्या मधोमध एक भलमोठ दोन झापांच लाकडी दार होत, ते दार उघडून आत आलो की खाली मातीच शेणाने सारवलेल चौकोणी अंगण होत.अंगणात एक गोल कठड्याची विहिर ,काहीबाही पापड वगेरे सुखत ठेवण्यासाठी ठेवलेली खाट, बैल-गुरांसाठी खाली ठेवलेला पेंढा , आणी मोठ्यांना बसण्यासाठी बनवलेला चौकलेटी रंगाच्या फळीचा पाळणा दिसत होता. परंतु वाड्यात एक गोष्ट मात्र तिथे खटकत होती.की तिथे कोठेही प्रकाश नव्हता. होता तो फक्त चौहीदीशेंना पसरलेला गर्द झाडीसारखा अंधार आणि त्याला जोड असलेली स्मशानशांतता.

वाड्यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या दाराची अंधारी चौकट उघडी

होती. त्या अंधा-या चौकटीतुन आतल काही दिसत नव्हत.ज्याप्रकारे एका चित्रपटात कधी-कधी सीनमध्ये कैमेरा झुम केला जातो तस ते दृश्य पुढे-पुढे येत स्क्रीनसहीत आपणही त्यासहीत पुढे चाललो आहोत की काय अस वाटतं सेम-हुबेहुन त्याच प्रकारे त्या अंधा-या चौकटीत झुम होत दृश्य पुढे-पुढे जाऊ लागल..आणि त्या अंधारात एक हलकासा प्रकाश चमकताना दिसला..पुढुण एक काले कपडे घातलेली, आकृती आपल्या हातात एक सोनेरु ताट घेऊन मंद पावलांनी पुढे पुढे चाललेली, त्या ताटात एक सोनेरी रंगाचा दिवा तेवत होता त्या दिव्यात तेल नसुन लाल रक्त टाकलेल आणि त्या रक्ताने तो दिवा ऊजळून पेटत होता. दिव्याच्या प्रकाशात बाजुलाच दोन चांदेरी वाट्या दिसुन येत होत्या.

एका गोल वाटीत रक्त तर त्या उलट दुस-या वाटीत होतं..पांढरट रंगाच.........वीर्य! त्या रगताने पेटुन उठलेल्या वातेचा तांबडा प्रकाश

त्या काळे पोशाख घातलेल्या आकृतीच्या तोंडावर पडला होता...पन त्या काळ्या कपड्याला लागुन एक त्रिकोणी काली टोपी तिच्या डोक्यापासून ते डोळे गाळ झाकत होती..ज्याने त्या आकृती ती स्त्री आहे की पुरुष काहीएक समजत नव्हतं. हातात ताट घेत ती आकृती हळुच दहा बारा पावल चालुन वाड्यातल्याच एका अद्यात खोलीत घुसली. वीस फुटांची अंधारलेली खोली होती ती. पन जस त्या एका दिव्याचा प्रकाश आत आला तसे त्या उजेडात पुढील दृश्य दिसल.त्या खोलीत काळ्या पोशाख घातलेल्या एकूण आठ आकृत्या आहेत.त्यातल्या सात जागेवर उभ्या अवस्थेत तर एक आकृती खाली जमिनीवर बसलेली आहे.आणि त्या जमिनीवर बसलेल्या मांणसासमोर एका नग्ण स्त्रीच मेलेल प्रेत जमिनीवर डोळे बंद करुन झोपलेल आहे.

 

" ए.....!..आलीस..ए..? "

ती जमिनीवर खाली बसलेली मानवाची आकृती आपल्या घोग-या भरड्या मिश्रित आवाजात पुढे पाहतच उच्चारली. त्याचा तो हुकमी स्वर ऐकुन त्या आकृतीने आपल्या शरीराची हालचाल केली. हातात असलेला ताट ज्यात रगताने पेटलेला दिवा, आणि दोन वाट्या एका वाटीत रक्त, तर दुस-या वाटीत....वीर्य.त्या आकृतीने ती थाळी त्या खाली बसलेल्या अनोळखी मानवाच्या हाती दिली.थाली हातात देताना त्या आकृतीच्या पंज्यावर दिव्याच्या उजेडात एक काळ्या रंगाने काढलेला सैतानी चित्र दिसला...बैलासारख काल डोक आणी डोक्यावर दोन टोस्कुले शिंग , बस्सकाहीक्षणा पुरत हे दृश्य दिसल.त्या आकृतीने ती थाळी त्या जमिनीवर बसलेल्या मांणसाच्या हातात दिली, आणी दोन पावले मागे सरकुन अंधारात गप्प उभी राहीली. त्या हुकमी स्वरात उच्चारल्या गेलेल्या आलीस ह्या शब्दाच अर्थ ती नक्कीच कोणि स्त्री असायला हवी ! असो पुढे पहा. खाली जमिनिवर बसलेल्या त्या आकृतीने ती थाली आपल्या हातात घेतली...आणि डावीकडून मग उजवीकडे असे चार पाच वेळा त्या खाली झोपलेल्या स्त्रीच्या नग्ण प्रेताकडे पाहतच पुढच्या दिशेने ओवाळली.मग उजव्या हातात ती थाली

धरुन ठेवत.प्रथम ती रक्ताची वाटी उचल्ली..आणि मग वीर्यात ओतली मग ती हातातली रगताची वाटी तोंडाजवळ घेऊन जात त्यात आपली जीभ बुडवुन थोडफार लागलेल कालपट रक्त चाटून घेतल...आणि ती रक्ताची वाटी अंधारात भिरकावली तसा तीचा जमिनीवर पडताच आवाज झाला.आता पुढे वीर्यात ओतळेल लाल रक्त मिश्रित करण्यासाठी हाताच एक बोट त्या वाटीत बुडवल, आणी गोल-गोल भिंगरीसारख भिंगवुन रक्त आणि वीर्य मिश्रित केल,आता त्या वाटीत फक्त कालपट रक्त होत बस्स. ती वाटी त्या आकृतीने आपल्या हातात घेतली, आणी आपला हात पुढे करत त्या नग्ण स्त्रीच्या डोक्यापासुन ते पायांपर्यंत ओतली. मग पुन्हा ती वाटी जिभेने चाटत अंधारात भिरकावली. आता त्या माणसाने तो रगताने तेवत असलेला दिवा हळुच डावा हात सरळ करत पुढे धरला.व ज्याप्रकारे बाटलीतल पाणि हळकेच खाली ओताव सेम तसंच हात विशिष्ट प्रकारे फिरवल..त्यासरशी दिव्यातल सर्व रक्त आणि ती पेटलेली वात खाली पडली.की तोच पुढच्याक्षणाला त्या खाली बसलेल्या मांणसाच्या आकृती पासुन जेमतेम दोन फुटांवर असलेल्या स्त्रीच्या नग्ण प्रेताने, धाड-धाड चट-चट आवाज करत पेट घ्यायला सुरुवात केली. तशी ती पुर्णत अंधारी खोली आता ह्याक्षणी त्या प्रेताच्या जळणा-या तांबड्या आगीने डोक्यावरचे केस , कातडी जळालेल्या वासाने व त्या प्रेताच्या अघोरी -आसुरी प्रकाशाने उजळून निघाली.आणी पुढे जे काही घडल हदयाचा ठोका चुकवणार होतं. त्या जळणा-या प्रेताच्या शरीराची हालचाल झाली.हदयाला शॉक दिल्यावर जस पेशंट झटका बसल्यागत शरीर उडवती तसंच

एक झटका त्या प्रेताला बसला , नी जसा झटका बसला गेला त्याचक्षणी ते प्रेत जळत्या अवस्थेतच कमरेपर्यंत जागेवर उभ राहिल.

अजुनही हात-पाय -डोक-वक्षस्थळे सर्वकाही धाड-धाड बारीक निखारे उडवत पेटताना दिसत होतं.हदयाच थरकाप उडीवणार बिपी लो करणार दृश्य होत..हे! पन त्या सैतानाला पुजणा-या चांडाळांना जणु ह्याची सवयच होती की काय त्यांना जराशीही भीती वाटत नव्हती.आणी जर हेच दृष्य कोणि सामान्य मणुष्याने पाहिल असतं तर? काय झाल असतं? विचार करुनच अंगारवर काटा उभा राहीतो.नाही का?

□□□□□□□□□□□□□

जंगलातल्या मोठ-मोठ्या झाडांतुन वाट काढत नाग्या, रुश्या- भुश्या, चिंत्या ही चार मुल घरी परतीच्या वाटेला निघालेली. चारही जणांच्या खांद्यावर फाटी आणि डोईवर चंद्र दिसुन येत होता.नाग्याच्या ह्या चारही

जणांना मगाचपासन आई-माईवरुन शिव्या द्यायच सत्र जरा काहीकाळ थांबल होतं म्हणुनच आजूबाजूला वाजणा-या रातकीड़यांची गुण-गुण ऐकु येत तर कधी कधी झाडा-झुडपांत होणारी सळ-सळ.जसा तो सळ-सळ आवाज यायचा तसे हे चारही जण भेदरलेल्या अवस्थेत त्या झुडपांत पाहत- तसे त्या झुडपांतुन कधी साप, तर उंदीर बाहेर येत.सापाला पाहुनतर प्रत्येकाची वीतभर फाटायची..आण उंदीर पाहिल तर नाग्या दगड हाती घेऊन त्याला शिव्या देत हुडकायचा.सर्वांच्या पुढे

भुश्या चाललेलाआणि त्याच्या मागे रुश्या, तीसरा चिंत्या आणि शेवटला लंगडा नाग्या चालत होता.भुश्याची भयभीत नजर एकटक पुढे स्थिरावलेली -म्हंणण्यापेक्षा विस्फारलेली त्यात भीतीची छ्टा ओथंबुन वाहताना दिसत होती.मागे असलेल्या रुश्या आणि चिंत्या ह्या दोघांचही तेच हाल होत.

" भुश्या..!" मागुन रुश्याचा आवाज..." लेका तु मगांशी रोवलेला त्यो फाटा प...प..परत आला तर कय समजायचंन.?"

रुश्याच्या वाक्यावर भुश्याची दातखिळी बसली , तो जागेवरच थांबला विस्फारलेल्या नजरेनेच खालचे दात दाखवत जबडा वासवत एकटक पुढेच पाहत राहिला.

" अय काय झाल !" रुश्या म्हणाला.

" अरे ए भुश्या चल ना लेका , ह्यो लंगडा हुड़कायले मला!"

" अय साल्यांनो, तुमच्या आईच्या वरातीत नाचु राहिलेका तुम्ही लोक

चलाना पटापट?" नाग्याचा घोगरा आवाज आला. भुश्याच्या खांद्यावरुन हलकेच फाटी गोल-गोल भिंगत , पाळ्या पाचोळ्याचा स्पर्श होऊन फाट्यांचा आवाज होत खाली पडली-यंत्रवतपने शरीराची अगदी शांतपणे हालचाल होत डावा हात वर-वर जात हाताच्या पंज्याचा एक बोट पुढे झाला.तसे सर्वांनी त्या दिशेला पाहिल.आणि पुढच दृश्य पाहुन चिंत्या-रुश्या दोघेही जागीच गार झाल्यागत त्यांच्याही खांद्यावरुन फाट्यांची मुळी गोल गोल फिरत खाली पडली...! कारण समोर काही मीटर अंतरावर तोच फाटा खाली जमिनित रोवलेला ज्यात भुश्याने काहीवेळा अगोदर ती झाडाची पाने अडकवली होती- ही खात्री करण्यासाठी की आपल्याला चकवा तर लागला नाही ना! आपण एकाच जागेवर पुन्हा-पुन्हा फिरुन येत तर नाहीना?.

□□□□□□□□□□□□□□

राहाजगड गावातल्या गल्लीबोळात-मातींच्या रस्त्यांवर जत्रेतली बंद दुकान दिसुन येत होती व त्या बंद दुकानांबाजुला तर गल्लीबोळांत

काही सैनिक हातात भाळा , तलवार , अंगावर चिळखत चढवुन फे-या घालताना दिसत होते.

" आर ए ढमा..काही येळान वर्दी द्यायची हाई माहीती हाई नव्ह?" ढमा म्हंणजेच भुश्याचे वडील-एका पैलवाना सारख्या शरीरयष्टीचे.

" व्हई व्हई लाल्या माहीती हाई की लेका ! व्हळी पेटवायची ना व्ह....!"

लाल्या म्हंणजे चिंत्याचे वडिल.

" व्हइ लेका !तु वर्दी दे! " लाल्यां नी आपल्या जवळचा भोंगा ढमांकडे दिला " मला व्हली रचाला बोलावला हाई, म्या जातु आता.!"

लाल्या अस म्हंणतच निघुन गेले.

आकाशातल्याकाल्या पांढ-या मिश्रित ढगांचा

जणु काही युद्ध चालल्याप्रमाणे ते चंद्राचा प्रकाश अडवू पाहत होते..पन पांढरा शुभ्र चंद्र त्या ढगांना हुलकावणी देत त्यातुन बाहेर पडत होता...आपला प्रकाश भुतळावर टिकवुन ठेवत होता.

राझगड महालापासुन ठिक शंभर मीटरांच्या अंतरावरच्या जागेत..काही मांणस , तर सैनिक होळी रचत होते...तसं म्हणायला होळी आता पर्यंत रचुन झालीच होती.फक्त गावक-यांनी येऊन श्रद्धेने तिला ओवाळून, नैवेद्य दाखवायच होत म्हंणजे त्यात ख-या देवाच अस्तित्त्व निर्माण होणार होत.

इकडे गावात चौकात उभ्या राहिलेल्या ढमांने गोल भोंगा आपल्या तोंडाला लावला आणि एक मोठा श्वास घेतला.

" राहाजगड वासियांनो ! " भोंग्यातुन निघालेला ढमाचा आवाज हवेमार्फत पुर्णत राहाजगडमध्ये घुमला,कालोख्या गल्लीबोलांतुन, घरांच्या बंद खिडक्यांच्या होलांतुन आत जात लोकांच्या कानांत घुसला.

" व्हळी, रचुन झाली हाई..! तीन तासांसाठी नियम शितील करण्यात आली हाईत..! ज्या -ज्या लोका- बायकांस्नी व्हळी आईच दर्शन घ्यायच असल निवद दाखवायच असल, त्यांनी महाराजांच्या राझगड महाला जवळ असलेल्या व्हळी आईसमोर जमा व्हा.आणि अजुन व्हळी बारा वाजता पेटली का समद्यांनी घरचा रास्ता धरायचा.. कोणी..बी..बाहेर राचा नाय...आण दुकानदारांनी कोणी बी आपला दुकान उघडू नका..न्हाई तर रट्ट खाल..! " ढमा हेच सर्व वाक्य तीन चार वेळा रिपीट करत म्हणाला. तसे राहाजगडच्या गावातल्या मातींच्या घराच्या खिडक्या उघडू लागल्या-दरवाज्यातुन नव पातळ, साड्या हातात ताट घेतलेल्या बायका -त कुठे घरांमधुन पुरुष त्यांची मुल बाहेर पडली.

आणी राझगड होळीच्या दिशेने निघाली.

:□□□□□□□□□□□□□□□□□

रघु बाबांच्या हातुन निघालेल्या त्या जादूच्या दगडाने द्रोहकालच आस्तित्व असलेली गुहा, त्याच घर शोधल होत.गुहेच्या मुख्य द्वारापाशी तो पिवळा दगड प्रखर तेज बरसवत चमकत होता. रघु बाबांनी खाली वाकून तो दगड हलकेच आपल्या हाती उचल्ला व तोंडातुन काही विचित्र मंत्र म्हंणत खांद्याला लटकवलेल्या पिशवीत टाकला तसा तो पिवळा दगड चमकायचा बंद झाला.दगड पिशवीत टाकुन रघुबाबांनी त्या गुहेच निरीक्षण करायला सुरुवात केली.त्यांनी वर पाहील गुहेच्या मुख्य द्वारावर काही झाडाझुडपांच्या वेली भुतासारख्या खाली लोंबत

होत्या ! समोर पाहताच रघु बाबांना गुहे आत प्रवेश करण्याचा कालोखात बुडालेला रस्ता दिसला...त्या अंधारात पाहतच रघुबाबांनी आपला एक हात छातीवर ठेवला डोळे मिटले व म्हणाले.

" चांडाळौ भस्मोस्वामी,शक्तिंदेहम!" रघुबाबांनी एकवेळ मागे तिरकस कटाक्ष देऊन पाहिल. मग खांद्यावर असलेली कापडी झोळी एका हाताने गच्च आवळत पावले त्या अंधाराच्या दिशेने वाढवली.

झिंग्या काळजल नदीच्या काळ्या पाण्यात उभ राहुन बॉट हातात धरुन किना-या जवळ आणत होता.

तर स्ंत्या जमिनिवर उभ राहत एका झाडाला पाठमोर उभ राहून दोरी बांधत होता. आजुबाजूला काळ्या निल्या गर्द झाडांच्या आकृत्या न हालता डुलता जणु अंधारात भुतासारख्या शुन्य नजरेतुन ह्या दोघांनाच

पाहत आहेत असं क्षणा-क्षणाला भास होत-होता.नदीच्या पाण्यावर झाडांच्या टोकावर पांढर कृत्रीम अनैसर्गिक धुक जमा व्हायला सुरुवात झाली होती.जणु कोणीतरी आल होतं? ह्या तिघांचही पाठलाग करत आल होतं , आणी ते नक्कीच काहीतरी अमानवी , अमंगळ हेतुने आल होतं. इकडे झिंग्या पाण्यात उभ राहुन जोर लावत बॉट किना-याच्या दिशेने आणत होता...की तेवढ्यातच अचानक त्याच्या मागुन त्याला खबर नसतानाच पाण्यातुन एक केसाळ डोक वर-वर येऊ लागल, त्या केसाळ डोक्यावरचे केस एका स्त्रीसारखे वाढलेले होते.केसवर येऊन गेले....आता कपाळावरची राखाडी मृतप्रेतासारखी राखाडी त्वचापाण्यातुन बाहेर येऊ लागली..हळू-हळू दोन पिवळे लुक-लुकते डोळेही आले मग.. धार-धार नाक आणि शेवटला आले ते लाल ओठ त्यातुन डोकावणारे तीक्ष्ण सुळ्यासारखे दात! झिंग्याच्या चेतना तंतुना कसली तरी जाणिव झाली, विशिष्ट प्रकारच्या मेंदूच्या पेशींवर दाब पडला..न.. मेंदू जरासा डोक्यात जड वाटु लागला जात त्याला आपल्या मागे कोणीतरी उभ आहे असं भास होऊ लागल..समोर पाहिल तर संत्या आपल दोरी बांधण्यात व्यस्त होता..त्याने हलकेच खाली पाण्यात पाहत डाविकडून-उजवीकडे डोळे हलवले-आणि एक गिरकी घेत थेट मागे वळून पाहील.नी मागे पाहताच त्याच्या अंगावर एक शहारा आला , डोळ्यांत चमक पसरली , तोंडाचा आ-वासला..छाती धड-धडू लागली

कारण समोर ती ऊभी होती...जिच्यावर झिंग्या जीव ओवाळून टाकायचा.

" स..स..संगे त.त..तू..!"

झिंग्या तिच्याकडे पाहत म्हणाला.बोलताना त्याचे शब्द अडखळत होते नजर तिच्या डोळ्यांत टिकून राहत नव्हती कारण तिच्या डोळ्यांत पाहता त्याला वासनेची छटा प्रखरपणे जाणवत होती.संगीरा उर्फ संगे जंगलातल्या आदिवासी जमातीतली सर्वात देखणी किशोरी..! झिंग्याच तिच्यावर खुप प्रेम होत..परंतु लाजूरपणा च्या स्वभावाने आतापर्यंत तरी त्याने तिच्या पुढे आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. मुलगी सुंदर दिसायली असली..तर तिच्यात भावखान आलच !

एटीट्यूड ईगोने आजकाल छपरी झालय सगळ्ं !.. असो आपल्या त्याच्याशी काही घेण देन नाही पाहु पुढे.

" व्हय म्याच. , तुले भेटायला आले..!" एक घोगरा आवाज त्या संगीराच्या मुखातून घान वाफेसारखा बाहेर निघाला.

" म..म..मले भेटायला?"

" व्हय.... का....... न्हाई येऊ शकत ? !"

संगीराचा घोगरा आवाज आता बदलला , आता त्या आवाजात एक उत्तेजीत , लाडीगोडी लावण्याचा स्वर जोडला गेलेला.ह्या वाक्यासरशी ती हळुच पाण्यातुन दोन पावले चालत झिंग्याजवळ आली.तिचा तो राखाडी रंगाचा चेहरा चंद्राच्या प्रकाशात कामुक्तेने चमकत होता. ते लाल ओठ एका विशिष्ट प्रकारच्या कामरसाने न्हाऊन निघाले जात रसरशीत झाले होते.त्या दोन काळ्या बुभळांच्या डोळ्यांत एक उत्तेजक लयीने लकाकायला सुरुवात केली होती..पाण्यात भिजलेल्या कोमल शरीराला जणु ही-या मोत्यांसारखी लकाकी आली होती.अंगावर असलेल्या पांढ-या साडीतुन दुधाळ उभारलेल्या वक्षस्थळांची छाती राहवुन राहवुन भान हरपवायला लावत होती. परंतु वाचक दोस्तांनो ते रुप ती लकाकी सामान्य नव्हती! ती लकाकी खरी नव्हती! ते रुप जरी वर-वर सौंदर्याचा ठेवा असलेला असलं तरी त्यात परकेपणा होता! जमिन आसमानाच फरक होता. क्लिष्ट पापी शक्तिच्या जोराने ते अमानवीय सौंदर्य घडवल गेल होतं..सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी एक फसव रुप जन्माला घातल होतं आणी जस तो सावज फसणार होता...तस ते रुप , ते सौंदर्यं, कामाग्न्नी गळुन खाली पडणार होतं.

" ए झिंग्या..!" स्ंत्याने झाडाला दोरी बांधत असतानाच पाठमोर उभ राहत झिंग्याला आवाज दिला..! परंतु प्रतिउत्तर आल नाही. " ए झिंग्या..! ए झिंगु.." संत्याने पुन्हा झिंग्याला आवाज दिल परंतु मागुन आवाज येत नसल्याने.. त्याने थेट मागे वळुन पाहिल. नी मागे वळून पाहताच त्याला तो दिसला...............नाही..!

" अर तिच्या मारी.!पैली ह्यो म्हातारा गाईब झला आता ह्यो..गाईब

झाला नक्की चाललाय काय...!इथ " संत्या स्वत:शीच आजूबाजूला अंधारात पाहत म्हणाला.

इकडे अंधारात नदीच्या दुस-या बाजुला एका जाड-जुड झाडाच्या खोडामागे संगी झिंग्याला घेऊन लपली होती. झिंग्या-संगी दोघेही संत्याला पाहत होते..परंतु अंधार जास्त असल्याने संत्या मात्र त्यांना पाहू शकत नव्हता.

" अंग त्यो -संत्या माझी वाट बघल की,? "

झिंग्याच्या ह्या वाक्यावर संगी झटकन त्याच्या शरीराला चिटकली -तसा तिचा शरीराचा तो थंड स्पर्श त्याच्या अंगाला झोंबुन गेला ! त्याने तिला झटकन बाजुला केल.

" अयो..! तुझ अंग इतक थंड कस ग..? आण अजून एक.. तु इथ आली कशी..? आ..आ..आण तु..तर माझ्याशी वस्तीत एकदा बी बोलली नव्हती..मंग आज अस अचानक? इथ.."

झिंग्याने प्रश्णाची लाट तीच्या समोर आणुन सोडली , ज्या प्रश्णाच्या लाटेने ती भांबावली गेली.डोक खाली झुकल जात डोळे कावरे बावरेपणाने डावीकडून-उजवीकडे जोराने फिरु लागले...आणि अचानक काहीतरी पाश्वी युक्ती तीच्या डोक्यात आली असावी कारण पटकन तीच्या लाल ओठांवर एक आसुरी हास्य आल..ते बारीकसे डोळे क्प्टी, नीच, हेतुंच्या लयीने चमकले. न जाणे कोठून कसा एक हवेचा झुलुक आला आणि त्या झुलकेच्या प्रखर आघाताने..

संगीराच्या अंगावर असलेल्या वक्षस्थळांवरचा थोडासा साडीचा भाग खाली घसरला. शेवटी झिंग्या पुरुषच होता.(मैन विल बे मैन) पदर खाली घसरताच क्षणार्धात तिच्या दोन दुधाळ वक्षस्थळांच अर्ध दर्शन त्याला घडल.डोक्यातली मेंदूत एक नस छेडली शरीरातल रक्तप्रवाह वेगाने वाहु लागला, लिंगात ताठरता येऊ लागला..वासलेल्या तोंडातुन मोठ-मोठे गरम श्वास वेगाने बाहेर पडू लागले.डोळ्यांत वासना प्रगटू लागली. संगीरा , झिंग्या दोघांचीही नजरा -नजर झाली.

" मला तु ले आवडते संगे....!" अस म्हंणतच त्याने तिला एक जोरदार मिठी मारली..ह्यावेळेस तिच्या थंडस्पर्शावर त्याच्या वासनेचे गर्मीने

हात फिरवला.सावज फसला रे फसला पाहताच तिच्या मीठी मारलेल्या अव्स्थेतच लाल ओठांवर एक विखारी छद्मी हास्य पसरल..हसताना जबडा ताणला गेला.डोळ्यांतले बुभळ लाल विस्तवांसारखे चमकले आणि त्या ताणलेल्या जबड्यातुन चार टोस्कुळे धार धार दात बाहेर आले.

" आणि मला तुझ रक्त! हिहिहिही..!" संगीच्या मुखातुन पुन्हा तोच घोगरा आवाज बाहेर पडला..! अंगावर काटा आणणारा आवाज..

आणी त्या आवजासरशी संगीने त्याच्या पाठीला अशी काही जोरात मीठी मारली..की पुढच्याक्षणाला त्या पाठीत " कट "आवाज झाला..जणु पाठीचा कणा चुरगाळला.

नी ते धार धार दात झिंग्याच्या मानेत खुपसले गेले.

□□□□□□□□□□□□□□

रघु बाबांनी आतापर्यंत त्या गुहेत प्रवेश केला होता. बाहेरुन गुहा आणि आत मात्र भलमोठ्ठ तळघर पाहुन एकवेळ त्यांनाही धक्काच बसला होता.तळघराच्या पाय-या उतरुन ते खाली आले होते.आणि आजुबाजुच निरीक्षण करत होते.डोळ्यांना मशाली, तळघराला आधार असलेले मोठ-मोठे गोल मटोल दगडी खांब दिसत होते.तर अंगाला बाजुला पसरलेल्या गाढ धुक्याने थंडीभरत होती. की अचानक त्यांना धुकयातच एक पाचफुट मोठा दगड आणि त्यावर एक लाकडी कबर दिसली. ते त्या कबरेपाशी पोहचले. त्या चौकलेटी कबरेवर एक लाल रंगाच्या वटवाघळूची आकृती रेखाटलेली. त्यांनी त्या कबरेच दार उघडायला काही खटका, वगेरे आहे का हे पाहायला सूरुवात केली.की तोच की अचानक त्यांच्या मागे अंधारात हालचाल झाली आणि त्या अंधारातुन एक भरडा आवाज आला.

" मालक बाहेर गेलेत..भटा...! तोवर..मी येऊ का..?हिहिहिही!"

□□□□□□□□□□□□

भुषण, ऋषीकेश, चिंतामणी, , नागराज चौघेही राहाजगडच्या जंगलात हरवले गेलेले , हे त्याना त्या फाट्याच्या निशाणीवरुन समजल होतं.

" आता समदी मरणार ! समदी मरणार आता.! त्यो सैतान कोणाला सोडणार नाय!" नाग्या येड लागल्यागत एकटाच खाली पाहत बरळत चाळलेला." पहीले त्या किश्या-शिरप्यादाला.. खाल्ल..! नंतर त्यो वयगुदा गायब झालाय...त्याचा अजून पत्ता नाय..! गावातली म्हंणत होती! का त्या सैतानाने त्याच मांसासकट हाड बी चावून खाल्ल असल..!" नाग्या एकटक खाली पाहत बरळत होता आणि हे बाकीचे सर्व त्याच्या बोलण्याकडे कान टवकारुन डोळे फ़ाडून पाहत होते.

" आण आज आपण मरणार! मरणार समदी..समदी मरणार , हह्ह्ह्ह्ह...खीखी..खीखीखी..! कुणाला न्हाई सोडणार त्यो..सैतान..

समदी मरणार..मरणार...समदी..हिहिही..खीखी..!" नाग्या एकटाच खुळ्याचा अटेक असल्यासारखा..डोक्यावरचे केस येड्यागत खांजळत दात विचकत हसु लागला.

" अय चिंत्या...ह्यो लंगडा सर्कीट झाला का काय..! "

" काय माहीत भौ..! पन तो बोलतो ते खर हाई..!"

" ए मला मरायच न्हाई रे..! माझ अजुन लगीन बी न्हाई झालं.!

आणी म्या ह्या नाग्या सारखा लंगडा पांगळा बी न्हाई..!मला कोण पन.पोर देइल..!" रुश्या तोंड वाकड तिकड हळवत थोड रडत म्हणाला आणि त्याने एक कटाक्ष थेट नाग्यावर टाकला...पन नाग्याच्या जागेवर आता कोणीही नव्हत..ती जागा अंधाराने गिळली होती.

" अर ह्यो पांगळा कुठ हाई..!" भुश्या म्हणाला.

" आर देवा कुठ गेला ह्यो..!" चिंत्याने सुद्धा भुषणच्या वाक्याला दुजोरा देत म्हंटल.

□□□□□□□□□□□□□

" ए म्हाता-या माग हाई बघ म्या! हिहिही..खिखिखी..!"

रघु बाबांच्या मागुन एक आवाज व पाश्वी हास्य आल तस त्यांनी लागलीच एक गिरकी घेत मागे पाहिल.समोर काळ्याकुट्ट अंधाराचा पडदा होता..आणि त्या पडद्याआड लपून काहीतरी अमानविय घे-या घालत होत.

" कोण हाई तिथं!बाहेर ये..?" रघु बाबा मोठ्याने म्हणाले.

तसा त्या अंधारातला काळा प्रकाश बाजुला आणि त्या जागी एक पिवळा , लाल मिश्रित प्रकाश उमटला...व त्या प्रकाशात रघुबाबांना दगडी भिंतीला पाठटेकून गुढघ्यांत डोक खुपसुन बसलेली एक मानवी आकृती दिसली. काहीक्षण रघुबाबांनी निरखुन त्या आकृतीला पाहिल.

गुढगे, हात, पाय,सर्वकाही राखाडी रंगाच होत, जणु मुर्दाघरातल प्रेतच समोर बसल असाव.

" कोन हाईस र..? "

" बघायचंय...! हिहिहिही..खिखिखी."आपल्या पुढ्यात जे काही आहे

ते नक्कीच मानवी नाही..... ते अमानवीय आहे.त्याचे विचार वाईट आहेत त्याचा हेतु..! त्याच्या बोलण्यातुन त्याच्या शारीरीक रचनेवर रघुबाबांनी ते ओळखल हे नक्कीच काहीतरी भयानक उपद्रव आहे.

त्यांनी आपल्या झोळीत हात घालायला सुरुवात केली.तसे त्या खाली बसलेल्या वयगुच्या पिशाच्चाने हळू-हळू गुर-गूरत गुढघ्यात खुपसलेली मान वर-वर घ्यायला सुरुवात केली.

□□□□□□□□□□□□□□

" ए नाग्याऽऽऽऽऽऽऽऽ" रात्रीच्या अंधारात.. मोठ-मोठ्या झाडांच्यावर दिसणा-या च्ंद्राच्या आकृतीत..त्याच्या उजेडात खाली उभे राहत..! रुश्या , चिंत्या, भुश्या आपल्या मित्राला वेग-वेगळे होत हाका मारत शोधत होते.त्यांच्या पुढे पडणा-या पावलासरशी खालचा पालापाचोळा चर-चरत वाजत होता.बाजुलाच

एका झाडाच्या बुंध्याखाली एक नाग फणाकाढुन ह्या तिघांनाही पाहत बसलेला...जणु त्यांची मजा पाहत असावा.

" ए नाग्यावऽऽऽऽऽऽऽऽऽ" चिंत्या आजुबाजुला झाडाझुडपांच्यात पाहत नाग्याचा शोध घेत होता. की तेवढ्यातच मागे सळसळ झाली.त्याने लागलीच एक गिरकी घेत मागे वळून पाहिल , परंतु मागे.....मागे कोणीही नव्हतं.भुश्या, रुश्या कोणीही नाही.

" माग तर कोणच न्हाई..? म आवाज कसला झाला?"

चिंत्या स्व्त:शीच अस म्हंणतच त्याने गर्रकन गिरकी घेतली नी थेट पुढे पाहिल....की तेवढ्यातच त्या क्षणाला त्याचा श्वास गळ्यात अडकला...डोळे विस्फारले.कारण समोर नाग्या दात विचकत त्यालाच पाहत उभा होता..त्याचा चेहरा एका मृत मानवासारखा रंगला होता..डोळ्यांतला बुभळ पांढरफट्ट त्यात एक चीर ! नाग्याला पाहुन चिंत्या काही बोलणार की तोच एका जंगली श्वापदासारखी नाग्याने त्याच्या उरावर झडप घातली.

" आआऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" एक भयान आर्तकिंकाळी त्या जंगलात उमटली. भुश्या , रुश्या दोघांनीही तो आवाज ऐकला , शरीरावर रोंगटे उठले..हातावरचे केस ताठरले गेले..छातीतली धड, धड विस्तव टाकल्यावर जशी ट्रेन पलते तशी धड-धडत पळू लागली.

मृत्युचा खेळ सुरु झालेला तो आला होता..रक्ताची चटक भागवायला तो आपल्या निद्रेतुन उठलेला..कोरडा गला ओला करायला आला होता.

" भुश्या..! भुश्या...!" अस म्हंणतच रुश्याने त्याच्या दिशेने कुच केली त्या गाठल.

" भुश्या..!काहीतरी वंगाल हाई ह्या जंगलात..आता इथ थांबून काय फायदा न्हाई..बघ !न्हाई तर आपल भी म्हढ पडणार म्हंजी पडणार.. "

रुश्या धाप लागलेल्या अवस्थेतच म्हणाला.

" व्हई..व्हई.चल..लवकर निघुयात..इथन.!" भुश्या ने रुश्याच्या वाक्याला होकार दर्शवला , व स्वत:च्या जिवाची पर्वा करता काट्या कूट्यातुन वाट मिळेल तिकडे धाऊ लागले.

□□□□□□□□□□□□

" काय शोधतो रे म्हाता-या ? काय खाला आणलाय का मला? हिहि..हीही..फिफिफी..!" त्या सैतानाने वयगुला लुचल होत..आणी त्या डंखाच्या विषाने त्याच संक्रमणात रुपांतर होऊन वयगु पिशाच्च बनला होता.रक्तावर जगणारा ,मालकाची हमाली करणारा.

" हो खाला..चा आणले तुला..! थांब देतो हा.!" रघूबाबांनी शक्कल लढवतच काहीक्षण शोधाशोध केल्यानंतर कापडी झोळीतुन हात बाहेर काढला.आता त्या हातात एक गोल काळ दगड होत. सामान्य नजरेला जरी तरी ते एक काला दगड दिसत असलं तरी त्या वयगुच्या नजरेत दगड तांबड्या आगीच्या गोळ्यासारख दिसत होतं.

" ए भट्या! काय हाई..ते ! दुर.ठिव माझ्यापसन..दुर ठिव...! न्हाई तर येऊ.येऊ..!..येऊ..येऊ.. "एक मांजर जशी कुत्र दिसल की गुर-गुरते मागे फिरते ह्ल्ला करण्यासाठी अंगावर धावु पाहते तसंच वयगु करु लागला. आता त्याच्या तोंडातुन चार सुळ्यासारखे दात बाहेर आलेले डोळ्यांत हिरव बुभळ त्यात मीरीएवढ़ा ठिपका दिसु लागला होता.रघु बाबांनी वयगुच्या बदललेल्या ह्या रुपाच निरीक्षण केल व पुढे म्हणाले.

" आर ये की बाबा! तुझ्यासाठीच काढलय घे खा.. ?" रघु बाबांनी तो काळा गोल लुसलुशीत दगड वयगुच्या दिशेने धरला. त्या दगडाला पाहून वयगु एक-एक पाऊल मागे मागे सरकु लागला...जणु त्या दडाचा स्पर्श त्याला अनिवार्य होता.

" ए भट्या, हxxxxर ! माग ठिव त्यो दगड..माग ठीव.. न्हाईतर तुज्या आxxxला मालकास्नी नाव सांगल..तुझा ! "

" अर ए चांडाळा तुझा आण तुझ्या मालकाचा बी काटा काढतो म्या.! कुठ हाई तुझा हरामखोर मालक!"

" ए भट्याऽऽऽऽऽऽ" वयगुच्या मुखातला घोगरा आवाज आता खोलखर्जातल्या सुरात बदलला , डोळे जणु तप्त विस्तवांसारखे तापून उठले जणु स्वत:च्या मालकाल अस बोललेल त्याला आवडल नव्हत.

" माझ्या मालकास्नी शिव्या देतो..!" वयगुने अस म्हंणतच वेगाने रघुभटांच्या दिशेने अमानवीय झेप घेतली...हवेतच त्याचा तो रक्ताळलेला जबडा वासला...

□□□□□□□□□□□□□□□

राहाजगडच्या वेशीवर सैनिकांचा पाहारा डोळ्यांत तेल घाळुन चाललेला.हातात भाळा, तलवार घेऊन जो तो येर झ-या घालत होता.एक-दोन मिनीटाला वेशीबाहेर पाहत होता -की तोच असंच काहीवेळाने वेशीबाहेर पाहणा-या एका सैनिकाला काहीतरी दिसल.झाडाझुडपांतुन वाट काढत एक आकृती लंगडत-लंगडत मान खाली घालुन एकटीच पुढे-पुढे येत आहे..तर मध्येच खाली पाहत हसत आहे..खिदळत आहे.आणी ती आकृती म्हंणजेच नाग्या होता..तो आतापर्यंत राहाजगडच्या वेशीपर्यंत येऊन पोहचलेला.., परंतु ती वेस वेगळी होती...गावात प्रथम मार्गक्रमण करण्याची होती..जिथे सैनिकांचा पाहारा लागलेला.

" आर गड्यांनो..! आर कोणीतरी येतय..येशीबाहेरुन."

तो सैनिक मोठ्याने ओरडला.

□□□□□□□□□□□□□□

काट्या कुट्यातुन जीव तोडून पळता-पळता एका झाडाच्या खोड्यात रुश्याचा पाय अडकला जात त्याची जमिनीशी एक जोरदार मीठीभेट झाली, आणी नेमक त्याच वेळेस खाली एक टोस्कुल दगड असल्याने डोळा थेट त्या टोस्कूलाशी एकत्रित झाला , तसे डोळ्याचा पातळ पांढरा बुभळ कानाचा पडदा फाटावा तस अलगद फाटला नी थेट आरपार घुसला जात मेंदूतून बाहेर आला...त्या चंद्राच्या उजेडात शरीरातुन बाहेर येणार ते लाल रक्त कालपट दिसु लागल. धावता-धावताच भुश्याला जमिनीवर काही धप्पकन पडल्याचा आवाज आला तसा तो थांबला होता.त्याने मागे वळून पाहिल , खाली रक्ताच्या थारोळ्यात रुश्या जमिनिवर उबडा पडला होता.ना कसली हालचाल..ना..आवाज... जणु एक प्रेतच रस्त्यावर लावारसपणे पडल होत...! हात पाय बलदंड असलेला शरीराने पैलवानासारखा दिसणारा भुषण आता कोलमडला होता. आपल्या मित्राला अस निपचित खाली पडलेल पाहुन -ते भल भल रक्त बाहेर येताना पाहुन बिपी फुल ऑन लो झाला होता..हात पाय काफरत पोटात ढ्वलु लागल होत की पुढ्च्याक्षणाला त्याला (व्या व्या व्या )वांती झाली.येताना पिलेला पाणी जे काही थोडफार खाल्ल होत सर्व घळा-घळा बाहेर पडलं!

□□□□□□□□□□□□□□□

वयगुपिशाच्चाने रघुबाबांवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या दिशेने उडी घेतली होती-! कोणत्याहीक्षणी त्याच्या तोंडातले धार धार दात त्यांच्या मानेत खुपसले जाणार होते! की तोच रघु बाबांनी आपल्या हातात असलेला तो काळा दगड़ , बरोबर वयगुच्या मधोमध आणला.तसा त्या गोल काळ्या दगडातुन सुर्याच्या उत्सर्जित किरणांसारखा प्रकाश प्रज्वलित झाला..आणी ज्यासरशी त्या पिशाच्चा शरीरावर ती सूर्याची दैवीक शक्तिने तैयार झालेली कृत्रीम किरणे पडली तस ते पिशाच्च हवेत एका सुतळी बॉम्ब सारख( धडाड) कंपने निर्मीत करणा-या आवाजसहीत फुटून सर्वनाश पावल...खाली जमिनिवर त्याची काळी राख पसरली.

□□□□□□□□□□□□□□□

एका कुत्र्यासारखा हात पाय दोन्ही गुढगे जमिनीला टेकवुन भुश्याने वांती केली.तोंडाला जे काही लागलेल ते एका हाताने पुसल आणि तोंड पुसतानाच त्याची नजर समोर गेली. दहा मीटर अंतरावर एक जाडजुड लाकडाच उंच झाड आहे. झाडाबाजुंनी..पांढरट धुक वाहत आहे. भुश्या एकटक त्या झाडाकडेच पाहत बसलेला , की तेवढ्यात एक राखाडी रंगाचा, त्यावर काळ्या निळ्या नखांचा मजबुत पंजा..त्या झाडामागुन पुढे आला. आणी जसा तो हात आला तसे मागुन एक डोक सुद्धा आल..चुना पोतलेल्या चेह-याच..वटारलेल्या खूनशी डोळ्यांच..नीताणलेल्या जबड्यासहित धार धार टोस्कुल्या दातांच एकटक भुश्याकडेच पाहुन हसणार.

" अंय..भुंश्या...! येऊ का मी.." त्या झाडापलिकडे जे काही विकृत आल होत.

त्याने आपल्या किन्नरी आवाजात भुश्याला हाक दिली.

" ए..न्हाई..न्हाई..! माझ्या जवल..येऊ..नग....ए आये..ए आये..! वाचीव..!" अस म्हंणतच भुश्या जमिनिवर हात-पाय घासत मागे मागे सरकु लागला. नी मागे जाऊन कशालातरी धडकला गेला ज्याचा सोर्श म्हंणजेच मृत्युची मीठी. भुश्याने मागे वळुन पाहिल.

राखाडी रंगाचा v आकाराचा चेहरा,डोक्यावरचे काळे केस मागे चोपुन बसवलेले, लाल ओठ रक्तांनी माखले गेलेले. अंगावर एक काला कोट त्याला जोडून मागे एक कधीही न झुकणारी ताठ कोळर..व कोट आत एक पांढरा शर्ट. खाली काळी पेंट व पायांत काळे शूज.

भुश्याला त्याला पाहुन वाटल कोणी इंग्रज साहेब असावा.तसा तो जागेवरच उभा राहीला.

" अव साहेब..अव साहेब..! मला वाचवा हो...ते तिथ झाडामाग दात बाहेर काढुन सैतान माझ्याकड पाहून हसत होता.साहेब..मला वाचवा साहेब..!"

" कोण तिथेतर कोणीच नाहीये!" द्रोहकाल भुश्याकडे पाहून म्हणाला..त्याच्या लाल ओठांवर एक छद्मी हास्य उमटल होत.

" आव साहेब खरच तिथ झाडमाग व्हत साहेब..तुम्हाला पाहुन पळाल असल." द्रोहकाल हळूच त्या झाडाजवळ चालत गेला..पाठमोरा उभा राहिला." अव साहेब अस तोंडातुन दोन सुळ्यासारख दात बाहेर काढून हसत व्हत माझ्याकड " भुश्या म्हणाला.तसे त्याच्या ह्या वाक्यावर द्रोहकालने हळूच एक गिरकी घेतली.

" कसे..! असे का?" द्रोहकालने अस म्हंणतच प्रथम त्याचे दोन डोळे लुकलूकत पिवळ्या रंगाने चमकले, जबडा वासला आणि त्यातुन

खालुन वरुन असे एकुन मिळुन चार धार धार पोलादासारखे तीक्ष्ण दात बाहेर आले...आणी पुढच्याचक्षणाला भुश्याला एक मीठी बसली.. गेली-.......मृत्युची मीठी..!"

□□□□□□□□□□□□□□□

राझगड महालापासुन ठिक शंभर मीटर अंतरावर गोव-या , सुखलेली फाटी, काट्या कुटे.असं सर्वकाही जमा करुन एक /\ आकाराची भलीमोठ्ठी होळी तैयार केली होती. होळीच्या आजुबाजुला पुरुष-स्त्रीया यांची येजा चालू झालेली..तर काही स्त्रीया होळीसमोर नैवेद्य ठेवुन.आरतीत ठेवलेल्या दिव्यासहित होळी आईला ओवाळत होत्या...आरती ठेवलेल्या दिव्यासहित फे-या घालत होत्या. मनोमन राहाजगड मध्ये घडणा-या विचित्र घटनेना आला बसावा ह्यासाठी प्राथना करत होत्या , अशातच थोड्यावेळाने राजघराण्यातले सदस्य सुद्धा तिथे आले महाराज-महाराणी युवराज- युवराज्ञी सर्वांनी मिळुन दर्शन घेतले.मेघावती ही होळीआईच दर्शन घ्यायला आलेली...तिची ही भेट, युवराजांनी फक्त डोळ्यांनीच इशा-या इशा-याने घडवलेली.

" अर्ध्यातासात महाराजांच्या हस्ते होळी पेटवली जाईल! कोणी दर्शन घ्यायचं राहिल असेल तर त्यांनी दर्शन घेऊन टाकाव!"

ढमाने पुन्हा तीन चारवेळा भोंग्यातुन एकच वाक्य रिपीट केल.

□□□□□□□□□□□□□□□

" आर ह्यो तर गज्याच पोर नाग्या हाई नव्ह! आर आत घ्या ह्याला आत घ्या.!" कोंडूबा मोठ्याने ओरडला तसे सर्वांनी नाग्याला वेशी आत घेतल.

" आर ए नाग्या ! आर कुठ गेला होतास.?"

" मसनातली लाकड व्हळीला न्हेऊ म्हंटल व्हत म्या..पन ऐकल न्हाई माझ गेल..ते जंगलात रांxxचे ! आत समद्यांना खाणार त्यो..समदे मरणार मरुन जिते व्हणार.परत येणार...हिहिहिही..खीखी...खीखी! " दात विचकत , डोक खांजवत नाग्या हसु लागला..! आणी जंगल हे वाक्य ऐकुन सर्वांचे डोळे खोंबणीतुन बाहेर यावे इतके मोठे झाले.

□□□□□□□□□□□□□□□□

होळीसमोर उभ राहुन महाराज दारासिंह यांनी हातात एक जळती मशाल घेतली. डोळे बंद केले." हे होळी आई ! आमच्या गावात जे काही विचित्र घटनांच प्रकरण सुरु आहे..त्यातून आम्हाला मार्ग दाखवा" उंहू,उंहु,उंहु..महाराजांना हलकेच एक ठसका बसला.

" पाणी.. पाणि आणा कोणीतरी " महाराणी महाराजांच्या पाठीवरुन हत फिरव म्हणाल्या.

" नाही आम्ही ठिक आहोत..!" महाराज जरासे.. सावरले..हातात पुन्हा मशाल घेतली एक कटाक्ष होळीवर टाकला , वर आकाशात काळे ढग जमा झाले होते , चंद्राचा प्रकाश अपशकुनी अमावास्या असल्यासारखा नाहीसा झाला होता..ती होळी आता काळी भेसुर भासत होती...त्यात देवासारख तेजस्वीपणा नव्हती जळती मशाल पुढे करत महाराजांनी थर-थरत्या हातांनी होळी पेटवली ( फांद्यांच्या)चट,चट आवाजासहित होळी पेटू लागली , वर आकाशात निखारे उडू लागले.

की तेवढ्यातच अचानक पेटलेल्या होळीतुन एकापाठोपाठ तीन आर्त किंकाळ्या बाहेर पडल्या जात तीन जळते शरीर हात पाय हळवत असहनीय वेदनेने आरोळी ठोकत.होळीतुन.. -बाहेर पडले...काहिक्षण लोकांसमोर हात पाय हळवत ते पेटते शरीर जस कोणी हातातल्या कळसुत्र्या बाहूल्या नाचवाव्यात तस नाचवल आणि काम होताच त्याला बिनआधार करुन जमिनीवर आपटल.

" रुश्या..! चिंत्या...भुश्या...!" आजुबाजुला जमलेल्या मांणसांमधुन एकाचवेळेस ओरड़त एकुन तीन स्त्रीया समोर जळत असलेल्या प्रेतांजवळ धावुन आल्या..! आपल्या नंग्या हातांनी ती आग विझवू लागल्या..! स्वत:च्या पोरांचा काळीज पिळवटून टाकणारा आवाज ऐकुन त्या मायेंचा काय हाल झाल असेल हे शब्दांत वर्णन असंभव आहे. महाराजांनी सैनिकांना सांगुन त्या प्रेतांना लागलेली आग विझवली.तो पर्यंत बाजुच्या बायकांनी त्या तिनही मातेना धरुन ठेवल.

 

ठाई...ठाई ठाई वसला काळ

त्यात मिरवू लागला..अंधकार..!

हिहिहिही...हिहिहिहिहिह....

वाट आंधळी प्रवास खडतर...

राहाजगडची...होळी पेटली बारा.. नंतर...!

पेटली रे पेटली पिरतांची व्हळी पेटली...अबबब...अबअबअब....���

 

क्रमश :