रक्त पिशाच्छ - भाग 17 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

रक्त पिशाच्छ - भाग 17

॥ रक्त पिशाच्छ ॥ भाग 17

लेखक: जयेश झोमटे...(जेय)

 

काल्पनिक कथा ! ���������

आकाशात सत्याची बाजु मांडून त्याच्या मागे नेहमी ठामपणे उभा राहणारा ! तिमीराच्या द्वाराला बारा तास का असेणा न उघडण्यापासुन रोखून धरणारा - हा सूर्यनारायण... आता अस्ताला जाण्याच्या तैयारीला लागणार होता. बस्स काही तासांचा अवधी उरला होता त्याला. मग तो जाताच पुढे काय होणार होत? तो विशालडोंगर त्या हिरव्यागारद-या सर्वजन आपला जबडा वासुन त्या सूर्यदेवाला गिळंकृत करणार होत्या ! मग पुढे तो विशाल अंधार ह्या भूतळावर आपल ठाव मांडुन भक्कास, अपिवत्रता प्रकाशित करणार होता ! किती भयान कल्पना नाही!

आकाशातुन काळ्या रंगाचा कावळा वेगाने पंख फडफडवत पुढे -पुढे जाताना दिसत होता.

वाचक मित्रांनो अस म्हंटल जात की कावळा चांगला ही आहे.....आणि वाईट ही! त्याचे एक दोन कार्यच काय चांगल्याची प्रचिती देतात. प्रथम तर तो पिंडाला शिवतो मानवाच्या आत्म्याला पुढच्या प्रवासा साठी गती मिळवुन देतो -दुसर ते काव-काव साठी घरावर ठेवल जाणार अन्न (नैवेद्य)जे काही म्हणा ते खावुन आपल्या पुर्वजांच मान राखतो.

ह्या दोन दिवसांसाठीच फक्त कावळा चांगला मानला जातो. मग बाकीचे दिवस? त्याला एक डोळ्याचा चकणा राक्षस म्हंणवल जात.मानवाने त्याच्या विचार बुद्धीने म्हंणा की प्राचीण प्रथेवरुण म्हणा ह्या काळ्या कावळ्यांच्या न जाणे कित्येक गोष्टींना अपिवत्रतेचा ठेवा दिला आहे. त्यातली एकच जाणून घेऊयात.

कावळा दिवसा रात्री -अपरात्री घरावर ओरडला तर कोणीतरी नक्की मरणार ह्या भीतीपोटी तो घरात बसलेला माणूस बाहेर येऊन त्याला हाड-हाड करत हाकलत नाही तो पर्यंत त्याला चैन पडत नाही! आजुबाजुच्या सत्तर-ऐंशी वर्षाच्या म्हाता-या तर ह्या बिचा-या मुकप्राण्याला तर घाबरुनच असतात. जरास हास्यस्पदच आहे ! नाही का?मरणाची भीती कोणाला वाटत नसते-कटु सत्य.

तो काळ्या पिसांचा कावळा आपले पंख फडफडवत (का-का )ओरडत..पुढे पुढे जात होता. हा कावला नेहमीच्या कावळ्यांपेक्षा जरा मोठाच होता..त्याच्ज्ञा काळ्या तोंडावर एक धार-धार पौलादासारखी चोच विशिष्ट प्रकारच नाक-आणि वर एक मण्यासारखा लाल डोळा होता. त्या डोळ्यांतुन तो खाली पाहत होता.

त्याच्या लाल नजरेस एक धावणारी घोडागाडी दिसुन येत होती घोडागाडीत एकुन चालक धरुन मागेदोन जण बसली होती.त्या घोडागाडीच्या दोन्ही बाजुला दोन घोडे होते..तपकीरी व काळ्या रंगाचे, दोन्ही घोड्यांवर दोन मांणसे बसली होती.आणि त्यांच्या मागे- चाळीस पन्नास सैनिकांची फौज हातात तळवार भाले घेऊन..जमिनीवरची माती धुळ वर हवेत उडवत धावत-पळत मागे:-मागे येत होती.इतक्या उन्हात धावुन सुद्धा त्या प्रत्येक सैनिकाच्या चेह-यावर दमल्याच्या-थकल्याच्या खुनांचा काडीमात्र लवलेश कोठे दिसुन येत नव्हता..उलट त्यांच्या चेह-यावर एक तेज पसरल होत..त्या तेजात धाडस,आपल्या प्रजेच्यारक्षणाकरीताची कृतज्ञनता, आत्मविदारक विश्वास अशा अनेक

जिज्ञासु भावनेंच्या छ्टा ऊठून दिसुन येत होत्या

त्या सैनिकांपासुन पुढे एक घोडागाडी पळताना दिसुन येत होती.

घोडागाडी चालक म्हंणुन संत्या बसला होता.त्याची सर्व नजर पुढे सोनेरी मातीच्या रस्त्यावर होती..आणि त्या दोन डोळ्यांतली ती नजर अगदी भेदक होती. कारण त्याच्या डोक्यात फक्त एकच विचारलक्ष वा-यासारखा घोंघावत होता..ती गुहा , त्या जागेत लवकरात-लवकर सूर्य अस्ताला जाण्या अगोदर पोहचायच बस्स.

संत्यामागे हातात तळवार घेऊन महाराज दारासिंह बसलेले , आणी त्यांच्या बाजुला हातात ती पांढरी कापडी झोळी ज्यात अमानविय ताकदीला रोखणा-या काही शक्ति होत्या तीच कापडी झोळी घेऊन घेऊन रघुबाबा बसले होते. त्यांच सर्व लक्ष खाली होत.की अचानक न जाणे का, त्यांच्याच मनालाच ठावुक त्यांना कशाची तरी चाहूल लागली व थेट वेगाने वर आकाशात पाहिल. तसा आकाशात तो अखंड ज्वालेचा उद्रेक करणारा अग्निहोत्र..म्हंणजेच भडक भगव्या तेजाने प्रकाशलेला सूर्य दिसला , आणी त्या व्यतिरिक्त ही रघुबाबांना काहीतरी दिसल. आणि त्याला पाहताच क्षणीकच त्यांच्या दोन्ही भुवया आकसल्या गेल्या.

समोर आकाशात एक कावळा ऊडत होता.. परंतु उडणारा तो कावळा मुळातच साधारण नव्हता , कारण त्याची ऊंची साधारण कावळ्यापेक्षा मोठी होती-जेमतेम दीड फुट जणु साक्षात सैतानच वर उडत आहे. त्या पक्षाच रुप घेऊन , बहुरुप -एक सोंगाट्याची सलवार घालुन त्यात लपल आहे.

" मायाविनी ! "

रघुबाबा हळकेच स्वरात पुटपुटले! पर्ंतु महाराजांनी ते ऐकल.

" मायाविनी?" महाराज काहीक्षण थांबले, रघुबाबांनी पुन्हा एकवेळ विचारचक्र फिरवत खाली पाहिल " मायाविनी म्हंणजे? " महाराज न समजुन पुढे बोलले. तसे रघुबाबांनी पुन्हा वर आकाशात पाहिल , आता तिथे काहीही नव्हत...तो अभद्र कायेचा कावळा निघुन गेला होता.

" भट्ट! तुम्ही ठिक आहात का? " महाराजांनी हलकेच रघुबाबांच्या खांद्यावर हात ठेवला, त्यांच वागण जरा विलक्षण होतं.

" म्या ठिक हाई महाराज! तुम्ही काय म्हंणालातसा..? "

" तुम्ही मायाविनी अस काहीतरी पुटपुटलात! म्हंणुनच त्याच अर्थ विचारल!" महाराजांच्या ह्या वाक्यावर रघुभट्ट हलकेच हसले, मान जरा खेदाने डाविकडून-उजवीकडे हलवली.

" महाराज ही मायाविनी म्हंजी पाताळातली एक क्रुर जादूगारीण हाई!

हिच्याबदल मला जास्त काय ठाव नाय महाराज , पर जेवढ माहीती हाई तेवढ सांगतु मी.(रघु बाबांनी सफाईदारपणे थाप मारली.कारण सामान्य मांणसांना ह्या अशा गोष्टी जाणुन घेन्यात फार रुची असते.म्हणुनच त्यांना त्या रहस्यांपासुन लांब ठेवलेलच बर, अस रघुबाबांच खाजगी मत होत. )

घोडागाडीच्या दोन्ही तर्फे दोन धोडे धावत होते- एक काला घोडा होता त्यावर यार्वशी प्रधान बसले होते, दुस-या तपकीरी घोड्यावर कोंडूबा

बसला होता...दोघांचही लक्ष रघुबाबांच्या बोलण्यावर होत.

" महाराज पाताळ हे भुतखेतांच घर हाई ! भुताखेतांसहित ह्या पाताळात ज्याप्रकारे सर्गात करोडो देव हाईत-तसंच ह्या पाताळात भी करोडो अनिष्ट सैतानी देव-देविका हाईत..ज्यांच नाव , त्यांच्या शकत्या, स्वभाव - आजपर्यंत कोणी पाहिल नाय. ! ते एक रहस्यच हाई म्हंणा.

आण- त्यातल्याच एका सैतानी देवाच्या रक्तापासन ह्या मायाविनीचा जनम झाला हाई. तर ह्या मायाविनीस लहाणपणा पासनच वाईट कृत्य करण्याची व सत्याला डिवचण्याची आणि असत्याची बाजु घेऊन त्याच्या माग नेहमी उभ राहीण्याची जाम हौस व्हती, तुम्ही वाटलच तर तिला असत्याची कट्टर समर्थक समजा. त्यासमवेतच तीला एक येड होत.. काळ्या जादुच ! ज्यातच तिने लहानपणापास्न अशाकाही इद्या शिकाला सुरु केल्या व्हत्या, ज्या की एका मातब्बर मांत्रिकास भी

धुळ पाडायच्या-म्हंजी एक इद्या शिकाला ती अवगत कराला..त्याला वरिस लागायच."येवढ वाक्य बोलुन रघुबाबा थांबले व त्यांनी आपल्या भुवया आकसल्या चेहरा जरासा गंभीर केला.

" पन ही मायाविनी म्हंजी जाम हुशार! तिला एक इद्या शिकाला फक्सत एक आठवडा लागायचा बघा! आण अशातच तिने तरुन वयात येईसपर्यंत अखंड शक्तिची उर्जा असलेल्या समद्याच्या समद्या इद्या अवगत केल्या -आण बनली ह्या समंद ग्रहांवरची एक तरुण वयातली शक्तिशाली जादूगारीण! ह्या अखंड पंचक्रोशीत ह्या बयेच्या कोणी नांदी लागल तर ही बया तिच्याकड असलेल्या इद्येने आपल्या शत्रुसोबत.. मोहीनी नावाची एक भयंकर इद्या वापरुन शत्रुला फसवायची.. मृत्युचखेळ-खेळुन शत्रुला मारायची. एक काल असा आला की सर्गातले देव बी हीला घाबरु लागलेले का तर ही बया आता सर्ग काबीज कराया निघाली व्हती! महाराज तुम्हाला सांगतो " रघुबाबांनी महाराजांकडे पाहील. "रावण हा लेय हुशार राजा व्हता. त्याला जर हव असत तर त्यान लंकेसहीत ह्या पृथ्वीवर भी राज्य केल असतं. पन त्यान सीतामाईला पळवुन आणली...! तेव्हापासनच त्याच वाईट काल सुरु झाला.त्याच्या बायकोन-त्याच्या भावान बी त्याला राम हे देवाच अवतार हाईत त्यांच्या संग युद्ध करु नको , सीतामाईला सोडुन दे अस सांगितल...पन रावणाने ते ऐकल न्हाई ! का.. तर त्याला स्वतच्या शक्तिचा गर्व अहंकार व्हता ! जर आपण सीतेला असंच रामाच्या हावाली केल..तर समदी लोक मला हसतील-डरपोक म्हंतील..ही त्याची विकृती अहंकारी बुद्धी त्याला तस करण्यापासन रोखत व्हती..आण शेवट पर्यंत..त्याने त्या अहंकाराचीच बाजु पत्कारली..आण अहंकारानच मृत्यु पावला..! तसंच ह्या मायाविनीच हाई..! आपल्या शक्तिचा तिला इतका गर्व -अहंकार झाला होता, की तिला अस वाटत होतं की आपल्यापेक्षा ह्या समंध ग्रहांवर कोणीच ताकदवर नसल आणी हीच तीची घोडचुक व्हती." यार्वशी, कोंडूबा, महाराज, संत्या- चौघेही रघुबाबांची हकीकत कान देऊन ऐकत होते.

" सर्गात मायाविनीने हैदोस घातला व्हता- जो देव मिळल त्याच्या बरोबर युद्ध करत व्हती, त्या देवास्नी हरवुन त्याचा महाल काबीज करत होती.

दिवसें-दिवस ह्या राक्षसीनीचा हैदोस वाढतच चालला व्हता.शेवटी न राहवुन एके दिवशी काही देवांनी मायाविनीच्या त्रासाला क्ंटाळून सर्गात एक गुप्त बैठक बसवली , त्या बैठकीत एकमेकांच रुप असलेले महादेव, श्रीकृष्ण ,श्रीविठ्ठल, असे एकुण तीन देव जमले होते. त्यांनी ह्या मायाविनीच अंत करण्यासाठी आप-आपली शक्ति एक-केली..आणी त्या शक्तिमार्फत एका पंचमहाभुत अखंड शक्तिचा ठेवा असलेल्या देवाची निर्मिती झाली ज्याच नाव व्हत -

xxxxxxxxx

" हुश्श!...झाल एकदाच काम! आता कधी एकदाच वाड्यात पोहचतु आण ही पेटी आबांकड सोपवतु अस झालंय!"

लंक्या व संत्यामामा दोघांनीही मिळुन ती पाच फुट पेटी गुहेतुन बाहेर काढली मग नदीत ठेऊन ती तरंगल्यावर तिला दुस-याबाजूला पोहत-पोहत आणली. संत्यामामाने ते पाहिल ज्याक्षणी ती पेटी काळजल नदीच्या पाण्यात तरंगली -तेव्हा ते पाणी गडद काळ झाल होत- अमावास्याच्या रात्री पडणा-या कालपट अंधारा सारख. नदीतुन पेटीबाहेर काढली तेव्हा त्या पेटीला पाण्याचा स्पर्शही झाला नव्हता अस वाटल ! कारण खालची माती तिला चिकटली नव्हती.जरा विचित्रच वाटल संत्यामामाला परंतु तो काही बोल्ला नाही.मग पुढे दोघांनीही ती पेटी कशीतरी घोडागाडीत उचलुन ठेवली.तेव्हा लंक्याने एक सुटकेचा निश्वास टाकला आणि वरच वाक्य उच्चारल होत.

" न्हाई लंक्या अजुन एक काम शिल्लक हाई बघ! "

" काय..?" संत्या मामाच्या वाक्यावर लंक्या ओरडलाच " आता कोणत काम शिल्लक हाई ?" लंक्याने संत्याच्या दिशेने एक हात वर उंचावला" हे बघ मामा म्या वापस त्या तळघरात यायचो नाय हा ! तुला जायचंय तर तु जा. तस बी ते येताळासारख दिसणार येड म्हातार माझ्याच मांग लागतय! मला घेऊन चल ! घेऊन चल म्हंणतय ! आता तुच सांग येवढ हाड गोठावणारी थंडी आत अस्ताना ह्या येड्याला उकडतच कसल असल."लंक्या गालाला हात लावुन विचार करत बसला.

" आर...लंक्याऊ..सोड ते आता! आर म्या काय म्हंतु ते तर ऐक पयले!"

" हा हा बोल -बोल.!" लंक्याने संत्यामामाकडे पाहील

" आर आपन ही पेटी घेऊन राहजगडच्या दिशेने जाणार! बराबर." लंक्याने डोक हलवल." आण अचानक कधी आपल्याला रसत्यात राहजगडच्या सैनिकांनी आडवल - आण त्या रघुभट्टला ही पेटी दिसली तर ! मंग..?" संत्यामामाने तोंडाचा आ वासला डोळे जरा मोठे वटारल्यागत केले-लंक्याच सुद्धा काहीवेगळ सांगायलाच नको.... त्यांच्या ही चेह-यावर असेच भाव होते... त्यातच तो म्हणाला.

" तु म्हंणतोस ते बराबर हाई मामा " लंक्याने त्याच्या मामाच्या वाक्याला दुजोरा दिला.

"तो गोल-गोल भिंगनारा लाल भवरा भी असंच म्हणाला होता की.

की त्यो रघुभट्ट इकडच येतोय !..आण त्याने जर ही पेटी पाहील..तर जाम लोचा व्हील! त्यो दारासिंज तर आपल्याला तुरुंगातच टाकील! "

लंक्याच्या ह्या वाक्यावर त्या दोघांनाही एक स्व्पन पडल.त्यात ते दोघे

राहाजगडच्या तुरुंगात आहेत , एका खाणीत उन्हात खडी फोडत आहेत! चेह-यावर दोन-तीन महिन्याची दाढी -केस उगवलेत.आणि अंघोळ वगेरे न धूतल्याने दोघांचही अवतार एका फाटक्या कपड्यांच्या भिका-यासारख झाल आहे...आणी एका मोठ्या दगडावर बसुन दोघेही एकमेकांच्या केसातल्या उवा शोधत खात आहेत.

" नाय..!" लंक्या कानाचे पडदे फाटतील इतक्या जोरात किंचाळला.

" काय झाल लंक्या ! तु बी माझ्यावाणी सपान पाहिल का?"

" म्हंजी तू बी तेच पाहिल व्हय ! जे मी पाहील ! "

" आर बापरे लंक्या ! दोन मांणसाई एकच सपान बघीतल म्हंजी ते खर व्हणार की लगा" संत्या मामाच्या ह्या वाक्यावर लंक्याला पुन्हा त्या

स्व्पनाची पुनरावृत्ती झाली. की कस तो उन्हात बसुन आपल्या पिवळसर दातांनी संत्यामामाच्या वाढलेल्या केसातुन उवा शोधुन तोंडात टाकून चवीन खात होता.आणी लंक्याला ते दृष्य पुन्हा-पुन्हा आठवुन किळस येत होती.

" नाय -नाय संत्या मामा ! कायतरी मार्ग काढु आपण?" अस म्हंणतच

लंक्याने आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवले -आजुबाजूला पाहु लागला.

समोर झाडा झुडपांची मैफिल जमली होती..त्यात न जाणे कित्येक झाड तिथे ऊभी होती..त्यातल्या एका झाडावर लंक्याची नजर स्थिरावली.

" मार्ग भेटला मामा ! " लंक्या इतकेच म्हणाला.व त्याच्या ओठांवर हे वाक्य उच्चारताना एक हसु होत-आसुळलेल.

×××××××××××××××

" काय नाव होत त्या देवाच ?" यार्वशी प्रधान आपल्या घोड्यावर बसलेल्या अवस्थेत म्हणाले. क्षणाला-क्षणाला त्याचि आकृत्यांच्या ह्या वाक्यावर रघुबाबांनी हळुच वळून त्यांच्याकडे पाहील व आपल्या जागेवर ते जरासे ताठ बसले , मान गर्वाने म्हंणा की त्या नावउच्चारल्या जाणा-या देवाच्या शक्तिलहरीन म्हणा वर आली होती..डोळ्यांत एक विशिष्ट प्रकारची चमक तरंगुन उठली होती. ओठ ते नाव घेण्यासाठी थरथर करत काफत होते-उत्तेजित झाले होते.. की तोच त्यांनी छाती फुगवुन एक श्वास आत भरला आणी धारधार उच्चारकरत म्हणाले.

" श्रीकाल!"

रघुबाबांच्या मुखातुन सा हा उच्चार बाहेर पडला , त्याचक्षणी....समंद आकाश एका गरुडाच्या चित्काराने दणाणुन निघाल.वर हवेतुन गोल-गोल भिंगुन तो आवाज खाली-खाली आला रघुबाबांच्या कानांवर आदळला. सर्वप्रथम रघुबाबांनी लागलीच वर आकाशात पाहिल,तसे त्यांना वर आकाशात एक चमत्कारीक आकळन क्षमते पल्याडच दृश्य दिसल. वर प्रकाशजन्य आकाशात एक सोनेरी रंगाचा सोन्याचा गरुड उडताना दिसला. सोन्याची पिस , त्यातच ते उघडलेले दोन पंख-ज्या पंखाच्या पुढच्याबाजुचे पंख अगदी तीक्ष्ण होते,सोन्याची ती चोच अगदी एका लाव्ह्यापासुन बनलेल्या चिलखता सारखी मजबुत होती, आणी ते दोन डोळे अगदी पाणिदार सोन्याने नढलेले.त्या गरुडाला पाहताच रघुबाबांच काळिज धड-धडायला लागल -डोळ्यांत न जाणे का परंतु पाणी जमा व्हायला लागल! काहीवेळा अगोदर चेह-यावर पसरलेला तो निराशेचा गोळा एका स्फोटाने ताड-ताड करत फुटून पळून गेला होता.रघुबाबा एकटक वर पाहत आहेत आणि वर पाहताच त्यांच्या चेह-यावरचे भाव बदलले आहेत..हे महाराज, कोंडूबा, यार्वशी तिघांनीही हेरल व लागलीच वर आकाशात पाहण्यासाठी आप-आपल डोक वर केल की तेवढ्यातच न जाणे कोठून एक हवेचा झुलुक आला आणि त्या हवेच्या झुलकेने डोळ्यांत कचरा जायला नको म्हनुन रघुबाबांनी डोळ्यांसमोर आपला हात धरला.

" काय झाल रघुबाबा? काय पाहत होतात वर ?"महाराज काहीवेळाने म्हणाले.

"अव महाराज , ते नाय का गरुड..!" रघुबाबांनी पुन्हा वर आकाशात पाहिल परंतु आकाश नेहमीप्रमाणे रिकामच होत.

" गरुड !..कुठ आहे गरुड?.आम्हाला तर काय बी दिसल नाय!" कोंडूबा म्हणाला.

" काय?..!" रघुबाबांनी काहीक्षण कोंडूबाकडे आश्चर्यकारक नजरेन पाहिल व पुढे म्हणाले. " आवाज बी नाय आल व्हय तुम्हास्नी ?"

" नाही ओ ! परंतु एक आवाज आला होता -कावळ्याच्या ओरडण्याचा!"

ह्यावेळेस यार्वशी प्रधान म्हणाले. त्या चौघांचीही प्रश्नउत्तरे सुरु होती.

रघुबाबांना विश्वास बसत नव्हता , की त्यांनी दोनवेळा विस्मरणीय

अद्भूत शक्तिंचा अंधाराची वाईट तर दुसरी प्रकाशची चांगली अश्या पात्रांची जशीच्या तशी छठा(झलक) उभ्या डोळ्यांनी पाहिली होती.परंतु ते दृष्य फक्त रघुबाबांनाच दिसल होत,अस का? बाकी जणांना का दिसल नव्हत ते? मायाविनीच कावळ्याच रुप ? तर दुसर होत श्रीकाळ यांच्या गरूडाच रुप! रघुबाबांच्या अंगी असलेल्या शक्तिंमुळे त्यांना ते रुप दिसल होत का? काही शास्त्रांनुसार अस म्हंटल गेलय, की काही मानव , सामान्य

मानवापेक्षा वेगळे असतात! त्यांच्या शरीरात काही अद्भूत शक्ति असतात.जसे की एक मांत्रिक तांत्रिक भुतांचा सर्वनाश करण्यासाठी काही विवीध प्रकारच्या शक्तिंचा उपयोग करतो , आणी करत जातो तसे त्या शक्तिप्रवाहांद्वारे त्या वापरकर्त्याला एक त्रिनेत्र लाभत.ह्या त्रिनेत्राची मुळ वैशिष्टे अशी, की ह्या त्रिनेत्रा द्वारे सामान्य मानवाला न दिसणा-या , जाणवाणा-या संकेतांची जाणीव होते. जे दृष्य सामान्य मानव आपल्या डोळ्यांनी पाहु शकत नाही, ज्या अनैसर्गिक गोष्टींपासुन मानव नेहमी अजाण-आलिप्त आहे ! ते सर्व ह्या त्रिनेत्रा द्वारे पाहायल जाऊ शकत..

भुत, प्रेत, पिशाच्च, आत्मा ह्या सर्वांच्या कायेच -त्यांच्या आस्तित्वातच दर्शन ह्या त्रिनेत्राने घडू शकत होत , आणी हाच त्रिनेत्र रघुबाबांजवळ ही नसेल हे कशावरुन! ते सुद्धा एक भट्ट होते ना?भुताखेतांपासुन

ह्या पृथ्वीच रक्षण करत होते ना? आजतागायत त्यांनी न जाणे कित्येक भुत-प्रेतांसमवेत लढा दिला होता आणि खुप सा-या विद्या आकस्मात ही केल्या होत्या. रघुबाबा खाली मान घालुन आपल्या विचारांत गुंतले होते

डोक्यात एकाक्षणाला तो अभद्र कावळा येऊन जात ती क्प्टी,नीच, मायाविनी तर इथे आली नसेल ना ? हा प्रश्णाचा मारा डोक्यात होताच छातीर एक कळ उठत होती!तर दुस-याक्षणाला तो गरुड डोळ्यांसमोर येऊन जात मनात एक सुप्त आरामादायक दिलासा भेटत होता. वाईटावर नेहमी आपला सत्याचा पगडा पाडणारा श्रीकाळ कोणी साधारण देव नव्हतेच हे रघुबाबांना ठावुक होत.

×××××××××××××

" अरे हा तर चिंबार हाई की "

संत्यामामा लंक्याकडे पाहुन म्हणाला.

(चिंबार म्हंणजे तिरडी बनवायला वापरल जाणार झाड! आणि ह्याच चिंबाराच्या काठ्या गुढीपाडव्यालाही वापरतात एकेकाळी वॉट्सएप्प मेसेजवर वाचल होत)

लंक्याने चिंबराच्या झाडाच्या चार-पाच मोठ्या काठ्यांचे जेमतेम तीन-चार फुट असे तुकडे केले होते. आणी काहीबाही झाडाझुडपांच पाळा-पाचोळा गोल करुन असाकाही कबरेभोवती पसरलेला की कबर झाकून गेलेली....मग ते चिंबराचे तुकडे ही त्या कबरीवर-तर काही बाजुला खाली ठेवले होते.

" चल मामा! " लंक्या अस म्हंणतच घोडागाडीत बसला.

त्याच्या मागोमाग संत्याही चालकाच्या जागेवर बसला. जागेवर बसुन

त्याने हातातली ती काली काठी वर हवेत नेली आणि फट्ट आवाजासरशी घोड्याच्या पाठिवर बसवली, प्रथम तो काळा घोडा खिंखाळला..आणि मग टप टप पावलांच्या आवाजासरशी पुढे सरसावला.

xxxxxxx

महाराणी महालातल्या भल्यामोठ्या हॉलमध्ये एका सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांच्या चेह-यावरुन अस दिसुन येत होत..की त्या कोणत्यातरी विचारचक्रात अडकल्या आहेत - एका खोल-खोल चिखलात खेचल्या जाणा-या दलदलीतच म्हणा. की तेवढ्यातच बाजुच्या जिन्यातुन खाली युज्ञी आल्या , म.रा: ताराबाईंकडे पाहुन म्हणाल्या.

" आईसाहेब आम्ही शलाकाची भेट, घेऊन येतो ! " येवढ वाक्य बोलून त्या जायला निघाल्या.

" थांबा ! " महाराणी सोफ्यावरुन उठल्या, त्यांचा आवाज ऐकुन युज्ञी:जागेवरच थांबल्या दोन तीन पावल चालुन पुढे आल्या " अवश्य भेटा ! परंतु काय बोलणार आहात तुम्ही तिला ?" म.रा: वाक्यावर युवराज्ञींच्या चेह-यावर पुन्हा निराशेचे भाव पसरले.

" ठावुक नाही आईसाहेब ! परंतु काहीही करुन आम्हाला तिला सांगाव तर लागेलच ना!" म.रा:ताराबाईंनी हळूच युज्ञी:रुपवतींचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला व म्हणाल्या.

" आम्ही तुमच्या भावना समजु शकतो युवराज्ञी ! " महाराणी काहीक्षण थांबल्या व पुढे म्हणाल्या. " खर तर आमचीच चुक झाली! आम्ही एकदा युवराजांशी बोलायला हव होत ! "

" नाही आईसाहेब , उलट जे झाल..ते होणारच होत! नियती जे कपाळावर लिहीते ते घडतच..... त्याला कोणीही रोखु शकत नाही! म्हणुनच आता स्व्त:ला दोष देऊ नका! "

" खर आहे तुमच युज्ञी! चला तर आपण दोघी जाऊयात त्यांच्या वाड्यावर !" म.रा: ताराबाई म्हणाल्या. त्यांच्या ह्या वाक्यावर युज्ञी:रुपवतीने फक्त होकारार्थी मान हळवली व त्या दोघीही महालातुन बाहेर जाऊ लागल्या.

×××××××

रघुबाबा एकटक खाली मान घालून बसले होते.आणि मायाविनीच पुढे काय झाल? श्रीकाळ देवाने तिला कस हरवल असेल! ते रहस्य जाणुन घ्यायची महाराज सोडून सर्वांनाच आस लागली होती.परंतु रघुबाबांना बोलणार कोण? म्हणुनच ते रहस्य ते रहस्यच राहिल होत.अद्यापही रघुबाबा एकटक खालीच पाहत होते. संत्याने तर फक्त एकवेळच रघुबाबांकडे वळून मागे पाहिल होत...आणि त्याला तो होडीत बसल्याचा रात्रीचा प्रसंग आठ्वला...आणि त्याला लागलीच समजुन चुकलेल की रघुबाबांना पुन्हा कसलीतरी भयानक चिंतासतावत आह.

तेव्हापासन तो गप्पच बसला होता. एका जादूच्या सुरनळीतुन तड-तडत्या आगीचा गोळाबाहेर पडावा आणी त्याचा प्रहार असा काही तिमीराच्या भिंतीवर आदळावा की त्या आघाताने हवेत काहीक्षण कंपने निर्माण व्हावीत. तसंच काहीस रघुबाबां समवेत झाल.त्यांच्या दोन्ही कानांतल्या पातळ पडद्यांवर एक विशिष्ट प्रकारचा आवाज घुमला(थंन्न). सेकंदापुरताच कानांत घुमलेल्या त्या आवाजाने रघुबाबांनी खाडकन डोक वर केल ,व दोन्हीबाजुंना डोक वेग-वेगाने फिरवत पाहु लागले. महाराज, यार्वशी प्रधान, कोंडूबा सर्वजण रघुबाबांच हे वागन पाहून जरा चक्रावलेच.

" संत्याऊ ! " रघुबाबा ओरडलेच"आपल्या जवळून आता काय गेल, काय गेल आता "

" अहो रघुबाबा! राहाजगड गावातली मांणस व्हती वाटत !"

" पाई चालत व्हती का? काय व्हत त्यांच्याकड? रघुबाबा जरा पटकन म्हणाले

" पाई नव्हती चालत ओ त्यांच्याकड घोडागाडी व्हती की ! आण घोडागाडीत माग पाळा-पाचोळा व्हता..- घोड्यांसाठी असल!"

" होय!मी सुद्धा पाहिलं ! पाळा-पाचोळा होता मागे आणि चिंबराच्या

काठ्याही होत्या..." यार्वशी प्रधान संत्याच्या वाक्याला दुजोरा देत म्हणाले.

" व्हई बाबा! उद्या गुढीपाढवा हाई नव्ह! त्यासाठी गेली असतील गावतली!" कोंडूबा सुद्धा आपली बाजु मांडत म्हणाले.

आता येवढी सारीजण बोलत आहेत-त्यांवर विश्वास ठेवायचा की आपल्याला मिळालेल्या संकेतावर ! किंवा तो संकेत नसुन आपले कान वाजले असावेत? हा सुद्धा प्रश्न विचार रघुबाबांच्या मनात आला.

" रघुबाबा ! थांबवु का गाडी? " संत्याने डोक थोडस मागे फिरवल व म्हणाला..व तसंच रघुबाबांच्या उत्तराची वाट पाहत राहीला.

रघुबाबांना समोर जंगलाची वेस दिसत होती. मोठ-मोठाल्या झाडांची हिरवीगार रांगच्या रांग त्यांनी दिसत होती....त्यांनी एकवेळ वर पाहिल आकाशात सूर्य अजुनही काही तासांसाठी थांबलेला जणु त्यांच कार्य व्हाव ह्या साठीच थांबला असावा. आणि तेच ओळखुण ते म्हणाले.

" नाय संत्या नग थांबुस गाडी!.. घुशीव जंगलात !"

××××××××

" हाहाहा ! हो..हो...हो..! हाहाहा "

संत्यामामा आणि लंक्या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती पेटी त्या दोघांनाही अगदी चपळाईने महाराज-रघुबाबा , प्रधानजी , कोडुबा सैनिकांना चकमा देऊन त्यांच्या हातावर तुरी देऊन बाहेर काढली होती. दोघांच्याही चेह-यावर मोठा खजिनाच हाती लागल्यासारखा आनंद पसरला होता.त्यातच ते दोघे वरडत होते..एका खुळ्यासारखे दात दाखवत हसत होते.

" लंक्याऊ पोहचलो रे पोहचलो गावात पोहचलो..! हाहाहा!"

विकृतपणे हसतच संत्याने हातात असलेली ती पातळ काळी काठी पुन्हा एकदा त्या घोड्याच्यापाठित मारली....तसा तो बिचारा घोडा एका रॉकेटसारखा खिंखाळत वा-याच्या गतीने पळू लागला.

समोर राहाजगडचा नदीचा पुल होता..त्या पुलाखालून नदीच पाणि जात होत..आंणि त्या पुलापासुन ठिक साठ मीटर अंतरावर राहजगड गावची सीमारेषा प्रारंभ होत-होती. वेळ काळ सर्वकाही गोठल गेल..होत...

वर आकाशात पसरलेला तो आग्निहोत्र सूर्यदेव सत्याची बाजु मांडून उभा राहिलेला सूर्यदेव आज फक्त बघ्याची भुमिका पार पाडत होता...

जणु पाहण्यावाचुन त्याच्या हाती काहीही नव्हत.

तो काळ्या रंगाचा घोडा मागुन मिळणा-या वेदनादायी प्रहाराने बेभान होऊन पळत होता. त्याच्या प्रत्येक पावलासरशी वीतभर माती हवेत उडत होती..पाहता-पाहता त्या घोड्याने तो पुल पार केला..मग पुढे दिसु लागली ती राहाजगड गावची वेस...! घोडागाडीची ती सफेद चाक वेगाने गोल फिरत होती..अंतर कापत पुढे येत होती...समंद राहाजगडगावावर आकाशात काळे ढग जमा झाले होते. खाली गावातली ती सोनेरी वाळू ,झाडे आता श्रापीतल्यासारखी काळी पडली होती.राहाजगड गावातल्या बायका घराच्या खिडकीतून तर पुरूष मांणस घरातुन बाहेर येत वर आकाशात झालेला हा विलक्षण बदल विस्फारलेल्या नजरेने पाहत होते. प्रत्येकाच्या चेह-यावर भयाच्या छठा

जणु उफाळून आल्या होत्या. ज्याप्रकारे एक रॉकेट शत्रुच्या छावणीत घुसताच एक मोठा विस्फ़ोटक आवाज होत फुटतो. त्याचप्रकारे ती घोडागाडी ज्यासरशी राहाजगडची सीमा ओलांडुन आत आली , त्याचक्षणी आकाशात एक विशाल अगडबंब कानठळ्या बसवणारी वीज कडाडली..(धडाडधमम्म्म⚡⚡)......व त्याचक्षणी त्या सैतानाच गावात...प्रवेश झाल..

 

क्रमश :