॥रक्त पिशाच्छ ऽऽऽ॥ 18+ भाग 19
फक्त 18+ प्रौंढांकरीता..
शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..
लेखक:जयेश झोमटे (जेय)
भाग 19
सूर्य अस्ताला जाताच रात्र झाली, सुर्याची जागा आता चंद्राने घेतली. समंद भुतळावर निलसर प्रकाश पसरला रातकिड्यांची किरकिर वाजू लागली. झपझप करत राहाजगड गावात मातीपासुन बनलेल्या घरांच्या भिंतीवर एकापाठोपाठ मशाली तर कुठे, कंदील , चिमण्या अडकवल्या जाऊ लागल्या.लोक जेवन खावन करुन लवकरच झोपली. मानवाचा कोठेही मागमूसदेखील दिसत नव्हता ज्याने राहाजगडच्या गल्ल्या ओस पडल्या जात त्यात अंधार मिरवू लागला.
भटकी कुत्री त्या अंधारात पोटात पाय खोपून मरणाच्या भीतीने कुईकुई करत डोळे मिटुन पडली होती, आणि जर कोठे जरासाही आवाज झालाच तर त्या बिचा-या मुक प्राण्याचे कान आजुबाजुचा वेध घेत एंटीना सारखे फिरु लागायचे.
राहाजगड मसान ××××
धड-धडत्या काळजासहित, वटारलेल्या डोळ्यांआतल्या पांढरट बुभळांसहीत आंबोने मागे वळून पाहिल, मागुन ते जे काही अमानविय ध्यान होतं ते एका हिंस्त्र, पाश्वी भुकेल्या , अधाशा जनावरासारख पायाखालच पालापाचोळा तुडवत अगदी वेगाने आंबोवर वार करण्यासाठी आल होतं.परंतु आंबो ने मागे पाहताच, त्याचया नजरेस विचित्र असं काहीही दिसल नाही. उलट मागे होता तो फक्त काळ अंधार , जमिनीवरुन वाहणार पांढरट धुक. आंबोने घशाखाली आवंढा गिळला, लागलीच पुढे वळून पाहिल.
" आंबो !"
पुढे वळून पाहताच आंबोच्या कानांवर एक हलकासा मंद आवाज आला. थंडीसारखा थंड ,खोल-खोल पाणी नसलेल्या एका रिकाम्या विहीरीतल्या अंधा-या खोलीसारखा खोलगट. आवाज कोठून येत आहे? समोर आजुबाजुला तर कोणिही नाहीये , मग आवाज येत तरी कोठून आहे? आंबोची नजर आजुबाजुला फिरु लागली , अंधारात काही दिसत का काही सुगावा लागतो का कानोसा घेऊ लागली. डोळे आजुबाजुचा वेध घेऊ लागले तर कान आवाजाचा,.
" आंबोऽऽऽऽऽ!" दुस-यांदा पुन्हा एकदा तो खोलगट हलक्या स्वरातला आवाज आला आंबो एकटक पुढे पाहतच होता..आणी त्याचवेळेस तो आवाज आला होता..ज्या आवाजाने आंबोचे डोळे विस्फारले गेले,कपाळावरुन भयद्रव बिंदू वाहत आला. जणु....जणु..आंबोला त्या आवाजाची दिशा कळली असावी !
आवाज कोठुन येत आहे हे त्याने बरोबर हेरल-पकडल होत. त्याने पुन्हा एक आवंढा गिळला हलके-हलके मान खाली जमिनिच्या दिशेने आणायला सुरुवात केली. समुद्रांच्या लाटांप्रमाणे ते पांढरट धुक डौलत-डौलत वाहत होत....आणि त्याच त्या धुक्यातुन अक्षरक्ष आवाज येत होता " आंबोऽऽऽऽ" पुन्हा तो हलके स्वरातला आवाज आला. आंबोने आपल डोक थोडस वाकड केल,कान जमिनिच्या दिशेने आवाजाचा कानोसा घेण्यासाठी जमिनिपासुन थोड वर ठेवल.
बागेत आजुबाजुला गाढ अंधार पसरलेला, धुक्याने वाहणारी नदी समंद मसनात पुर घेऊन आलेली , वातावरणात पसरलेली थंडी अगदी विलक्षण हाड गोठावणारी होती आणि त्या थंडीत बागेत पसरलेली शांतता इतकी गुढ होती..की थंड हवेच्या सुटलेल्या झुलकांमध्ये दूरुन जंगलातल्या रानटी श्वापदांची विव्हळ बिभत्सपने कानांवर पडत होती.
त्या तरंग-तरंगाणी वाहणा-या धुक्यावर आंबो ने कान लावल होत.
मन अद्याप मानायला तयार नव्हता की आतुन आवाज येत आहे!
काहीक्षण-मिनीट असेच निघुन गेले, परंतु आवाज मात्र आला नाही ,
तसे आंबोने भास झाल असेल असं समजुनडोकवर घ्यायला सुरुवात केली , की तेवढ्यातच अचानक.
" बा...! " त्या गाढ धुक्यातुम ह्यावेळेस मेघाचा आवाज आला.पोरीचा आवाज ऐकुन बापाच काळिज बिथरल.
" बा...मला...वाचीव..? "
" ए मेघे..! ए मेघे कुठ हाईस..पोरी तु..?" आंबोने जमिनीवरुन वाहणार ते पांढरट गाढ धुक हाताने बाजुला सारायला सुरुवात केली. जस तो पांढरट धुका बाजुला सारला गेला आंबोच्या नजरेस जमिनीतुन बाहेर आलेला एक मानवी हात दिसला...! परंतु कोण म्हंणेल तो मानवी हात आहे ? मानवाच्या हाताची त्वचा जशी सजीव असते-तसा तो हात नव्हता -त्या हाताची त्वचा एका शवागारात दोन आठवडे बर्फाच्या पेटीत ठेवलेल्या मेलेल्या मृत (मयतासारखी) प्रेतासारखी राखाडी होती..
हाताच्या बोटांची नख रक्त न मिळाल्याने काळी-निळी पडलेली-त्यातुन कुबट - सड़का ओकारी आणणारा दुर्गंध येत होता.
आंबोने आयुष्भर मसनात कित्येक तरी प्रेत गाडली होती. प्रेतांसंबंधात त्याला सर्व जाणिव होती. जस की माणुस मेल्यावर त्याची त्वचा कधी सडते, माणुस मेल्यावर त्याच्या शरीरात काय काय बदल होतात-शरीराचे अवयव कसे दिसु लागतात सर्वच्या सर्व माहीती त्याला होती. आणि आताह्या क्षणि त्याने जो हात पाहिलेला.. तो पाहून त्याला हे कळून चुकल होतं. की हा...हात आपल्या मेघाचा नाही ! हे काहीतरी भलतच आहे , ज्याच्या तावडीत, सापळ्यात आपण सपशेल फसलो आहोत. आंबो एकटक त्या हाताकडेच पाहत होते...खालच्या चिकट दिसणा-या काळ्या मातीतुन तो पांढरट अर्धाहात झुकलेल्या अवस्थेत होता..त्याची हालचाल होत नव्हती. आता त्या हाताभोवती आंबोने बाजुला सारलेल धुक जमा होऊ लागल , त्या हाताला धुक्याने बुंजवुन टाकल. तसा त्याचक्षणी पुन्हा तो आवाज व एक भयान काळजात धारधार कट्यार रुतावी तैसे आवाज आला.
" आंब्याव्ह्ह्ह्ह.....! खीखीखीखीखीखी.., हिहिहीहिहि.."
हवेच्या वेगाने आंबोने पुन्हा खाली पाहिल-.....खाली पाहताच त्या धुक्यात दोन पिवळेजर्द डोळे चमकले, आणि त्या धुक्यातुन तो पांढरट राखाडी पंजा पुर्णत खांद्यांपर्यंत पांढरट हातासहीत एका सापासारखा फिस्कारत बाहेर आला, त्या हाताच्या काळसर नखांच्या बोटांनी आंबोचा गळा आवळला. पकड इतकी मजबूत होती..की आंबोला श्वास घ्यायला त्रास पडू लागला, नाकातुन रक्त बाहेर येऊ लागला,तोंडातुन गुलाबी जीभ बाहेर आली, डोळे खोंबण्यातुन बाहेर येतील इतके मोठे झाले. कोणत्याही क्षणी तो मृत होऊन कोसळणार तेवढ्यात त्या अमानविय हाताने आंबोला मागे हवेत भिरकावल.अमानविय शक्तिने पाच सहा फुट मागे उडून आंबो एका जागेवर पडले , पाठीचा हाड जरास खूळ झालेल परंतु काळजी करण्यासारख काहीही नव्हत! आंबोच्या अंगावर असलेला काला फुल बाह्यांचा सदरा फाटलेला, खालच दोन झापांच धोतर मातीने माखल होत. दोन्ही नाकपुड़यांमधुन
लाल रक्त आळीपाळीने बाहेर चाललेल, परंतु लक्ष. ते डोळे मात्र ह्या सर्व वेदनांवर स्थिरावले नव्हते, मनातली भीती त्या डोळ्यांच्यात उतरली जात ते त्या जागेवर स्थिरावले होते, ज्या जागेतुन तो हात आलेला.
भले मरणाची भीती वेदनांवरही करी मात, अस वाक्य मी कोण्या पुस्तकात स्पष्टीकरणासहीत वाचल होतं...ते आज खरच झाल म्हणायच. आंबोच लक्ष एकटक त्या जागेवर स्थिरावल होतं...तो हातच इतका विद्रूप शक्तिशाली होता. तर आत काय असेल? त्या ध्यानाच रुप कस असेल? ते बाहेर येईल का? बाहेर आल तर काय करेल? आपन एक सामान्य मणुष्य त्या अघोरी शक्तिसमोर काय करु शकु? आपला निभाव तरी लागेल का? आंबोला आठवल त्या हाताची पकड आठवली काय तो हिमालयातल्या थंड बर्फाच्या पाण्यापेक्षा तिप्पट प्रकारचा थंड असुरी स्पर्श होता तो....जर त्या हातासहीत ते ध्यान, गौडबंगाल जे काही आहे ते बाहेर आल '-आणि जर त्याने आपल्याला मृत्युची मीठी मारली तर? त्या एका मीठीनेच आपल सार आयुष्य संपेल ! वेदनाही जाणवणार नाहीत! आंबोक्ष सर्व लक्ष त्या जागेवर स्थिरावल गेलेल ज्या जागेतुन तो हात बाहेर आलेला.. तोंडातुन एकापाठोपाठ श्वास आत ओढला जात छाती फुग्यासारखी फूगत होती....ह्दयातील ठोके जरासे वेगाने पडत होते..बिपी अक्षरक्ष इतका कमी झालेला..की डोळे विस्फारले गेलेले, हाता पायांना कंप सुटला होता..पोटात ढवळणे सुरु झाल होत..वांती व्हायला पाहत होती....जर आता ह्याक्षणी त्यांना काही भयान ह्दयाचा थरकाप उडवणार दृश्य दिसल तर नक्कीच ह्दयविकाराचा झटका येण साहजिकच असेल अस समजा !...आणि तसंच झाल जणु त्या सैतानाने आंबोच्या मनातली भीतीच ओळखली असावी! आंबो ज्या जागेकडे एकटक पाहत होता..त्या जागेवरच धुक आता नाहीस झाल. तिथे अमानवीय, अघोरी, क्लिष्ट, पाश्वी, आसुरी, शक्तिंच्या मिश्रणाने लाल , हिरवा,पिवळा असा क्षणा-क्षणाला बदलणारा रंगीबेरंगी प्रकाश पसरला..जणु दुस-या मितीतल द्वार उघडल जात होत की काय? खालच्या काळ्या चिकट जमिनीला एक दोन भुकंपासारख्या तड्या गेल्या..आणि त्या तड्या गेलेल्या भेगांमधुन धुर बाहेर पडायला सुरवात झाली...अगोदर मंद गतीने बाहेर येणार ते धुर नंतर- नंतर वेगाने बाहेर पडु लागल, मग त्या सफेद धुरावर तो लाल,हिरवा,पिवळा प्रकाश पसरला.काहीवेळ असंच निघुन गेला असेल की क्षणा- क्षणाला बदलणारा तो रंगीबेरंगी प्रकाश थांबला जात आता त्या धुरावर प्रथम पिवळा प्रकाश पडला-एक भल्यामोठ्या कावळ्याची पंख-फडफवताना एक आकृती दिसली -मग पुन्हा तो पिवळा प्रकाश नाहीसा झाला-आता त्या धुरावर हिरवा प्रकाश पसरला जात-एका लहानबाहुल्याएवढ्या ऊंचीची आकृती हातात सुरा घेऊन उभा असलेली दिसली - मग पुन्हा त्या धूराचा रंग बदलला जात लाल झाला..रक्तासारखा लाल भडक ! ती बाहुल्यासारखी आकृती आता उंच-उंच होऊ लागली..हात पाय डोक शरीर समंद आकार फुगीर झाले....ऊंची वाढली.आता त्या लाल रंगात एक चेटकीनी सारखी आकृती दिसु लागली. चौकोनी डोक, त्यावर वाढलेले केस जे की सापासारखे वळवळत होते.. हाडांसारख्या पोकळ हातात एक काठी होती...व तश्याच पोकळ पायांत एक कैद्यासारख्या बेड्या होत्या. अंगावर एक कपडा होता जो की पुर्णत शरीर झाकत होता.
" को..कोण हाई तिकड ह्ह्ह्ह्ह?" आंबोने मोठ्या कष्टाने वाक्य जुळवाजुळव करत उच्चारल, शेवटच वाक्य संपताच तो हापापु लागला.
" म्या मेघा हाई की बा ! "त्या लाल प्रकाशा आतुन मेघाच्या आवाजाची नक्कल केलेला आवाज आला , अगदी हुबेहुब तर नाही जरासा घोगरा.
" मे...मेघे, तु...तु काय करती इथ ? जा घरला जा ! आ..आण बाहेर येऊ नगस!... इथ सैतान आला हाई...शैतान.! कोनाच बी रुप घेतया.. !
कुठून बी वार करतया! जा पोरी जा जीव वाचीव घरामंधी जा! "
आंबो अस म्हंणतच आपल्या लेकीसाठी उठला-..अंगात जेवढ बळ शिल्लक होतं ते सगळ एकवटून तो उठला,
व मेघाच्या दिशेने जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार की त्याच्या लक्षात आल. काहीवेळा अगोदर मेघाने त्याला टॉमेटो आणण्यासाठी पाठवल, तेव्हा तिचा पाय दुखत होता अस ती म्हणाली होती.
मग पाय दुखत होता तर ती इथपर्यंत चालत आली कशी ? घरापासुन ते बागेपर्यंतच अंतर तर खुपच लांब आहे -आणि अंधा-या वाटेच आहे! तसंही मेघाला अंधाराची भीती वाटते म्हनुनच ती रात्र झाल्यावर घरातुन बाहेर पडत नाही हे आंबोला ठावुक होत.म मग आता ह्याक्षणी पुढ्यात कोण होत? ती मेघाच होती का? की अन्य काही तीच रुप घेऊन आल होत.?
" मेघे...?" आंबो ने समोर पाहत हाक दिली.
"काय बा..!" त्या लाल रंगाआतुन घोग-या आवाजात प्रतिसाद आला.
" मेघे , एक उडी मारुन दाखीव की?"
" बर बा !" अस म्हंणतच लाल रंगाच्या आत उभ्या असलेल्या ध्यानाने अशी काही जागेवरुन उडी घेतली..जी थेट तीन-चार फुटपर्यंत उंच तरी होती.
" बापरे ! म्हंजी ह्यो सैतान मेघाच रुप घेऊन आला हाई तर ! काय बी करुन ह्याच्या तावडीतुन सुटाया लागल , आण मेघाला ह्या धोक्यापासन सावध कराया लागल..! एकवेळ माझा जीव गेला तर बेहत्तर हाई!"
आंबोने मनातल्या मनातच काय करायच ते ठरवल.
" मेघे , तुझ्या मांग काय हाई ग ?" आंबो म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर
त्या ध्यानाने हलकेच एक गिरकी घेतली..हे त्या लाल रंगात उमटलेल्या काळ्या सावलीच्या हालचालीवरुन कळल.
" कुठ काय हाई बा !" त्या काळ्या सावलीने वळून आता पुढे पाहिल..
तर समोर आंबो उपस्थित नव्हता. त्याने आपल्याला धोका दिला ,सावजाने स्वत:च शिका-याला भुल दिली हे पाहुन त्या ध्यानास किंवा चेटकीणी सारख दिसणार जे काही होत त्याला राग आला , त्याचा
मान सन्मान गर्विष्टपणाच्या मर्मावर घाव बसला..तसे ते गळाफाडून ओरडल, चित्कारल." आआआऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"
" मला, मला धोका देतोस काय आं...!" एक किन्नरी भयान आवाज. "..मायाविनीला धोका देतोस काय आं...आं...हिहिही.." आकाशात दोन ढ़गांच घर्षण झाल, एक जोरदार निळी-गुलाबी विज मोठा आवाज होत कडाडली, त्या विजेचा तो चमकणारा प्रकाश पृथ्विवर सर्वत्र पसरला..या चमकणा-या प्रकाशात त्या मायावीनीच रुप दिसल. तिच्या अंगावर एक काला चिपचिपत कापड होता-ज्या कापडाने तिच समंद हाडकुल शरीर झाकल गेलेल-फक्त पोकल बांबुसारखे हात पाय दिसत होते...पायांत दोन कैद्यासारख्या चांदीच्या गोल बेड्या होत्या.
चेहरा म्हणायला ना त्याला आकार होता नाही उकार.
होत ते फक्त कालपट धुर बस्स व त्या धुरामध्ये चमकत होते दोन तांबड्या रंगाचे ठिपके , जणु ते डोळे असावेत.
×××××××××××××××
रामु सावकाराच्या दुमजली वाड्याला चौहुबाजुनी दगडाच्या कंपाउंडने
घेरा घातलेला. वाड्यात प्रवेश करण्यासाठी कंपाउंड मधोमध एक लाकडी कडीकोयंड्याच दोन झापांच उघड दार दिसत होत.
दार ओलांडून जाताच खाली अंगण होत.पुढे वाड्याबाहेर
सात -आठ मशाली जलत होत्या...त्या मशालीच्या उजेडात झोपाळ्यावर दोन आकृत्या बसलेल्या , तर तिसरी जाडजुड आकृती झोपाळ्यापाशी हातात एक लहानशी चौकोणी पानाची पेटी घेऊन ऊभी राहिलेली -ती आकृती म्हंणजेच ढमाबाई होत्या व झोपाळ्यावर बसलेल्या त्या दोन
आकृत्या म्हंणजेच रामुसावकार आणी त्याची कन्या शलाकाची होती.
" म्या काय म्हंतु शालुबाई? " रामुसावकाराने आपल्य लेकीकडे पाहिल,
तीने फक्त होकारार्थी काय अस म्हंणत मान हलवली.
" आता तुम्ही राजघराण्याच्या सुन व्हनार, तर म्या तुमच्यासाठी भारी-भारीतल्या साड्या व महागतले दाग-दागीने मागवले हाईत....
म्हंजीच उद्या मांणस घेऊन येणार हाईत ! तर तुम्हाला जे आवडल तेवढ
घ्या बघा ! पैशाची जराशी बी फिकर करु नका "
रामुसावकार म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर शलाकाने फक्त मंद स्मित हास्य देत होकार दर्शवला. बाजुलाच ढमाबाई लहान मुलासारख्या एकापठोपाठ पान तोंडात चेपत होत्या.
" ओ मालकीणबाई?.." रामुसावकाराने ढमाबाईंकडे पाहत हाक दिली.
ढमाबाईंच्या तोंडात पाणांचा बार चघळला जात होता, ज्याने त्यांना प्रतिसाद काही देता आला नाही मग ढमाबाईंनी भुवया उडवतच काय असा इशारा केला.
" अव लेकीचा लगिन हाई आता! लग्नात मोठ-मोठी मांणस येतील.
महाराज-महाराणी बी येतील , मंग काय त्यांच्या समुरबी असंच तोंड फुगवुन बोलणार हाईत का तुम्ही? ते पान खान जरा कमी करा आता! "
रामुसावकार म्हणाला. ढमाबाईंनी फक्त होकारार्थी पान मचाव-मचाव करत खात पुन्हा मान हलवली.
शलाका राझघराण्याची सुन होणार म्हणुन वाड्यात सकाळपासुन आनंदाच वातावरण निर्माण झालेल. तिघेही माय-बाप-लेक बोलण्यात गुंग झालेले , तेवढ्यात वाड्याच्या दोन झापांच्या दाराबाहेर दोन सफेद घोडे जुंपलेली घोडागाडी येऊन थांबली. घोड्यांचा आवाज ऐकुन रामुसावआ4कार झोपाळ्यावरुण उठला ,एक कटाक्ष त्याने समोर टाकला..
घोडागाडीतुन प्रथम म.रा: ताराबाई ,मागाहुन युज्ञी: रुपवती उतरल्या. महाराणींना पाहुन शलाका जराशी लाजली व वाड्यातल्या दारापाशी जाऊन..आत शिरुन दाराबाजुला , भिंतीला पाठटेकवुन ऊभी राहीली..तिचे श्वास जरासे वाढले गेलेले, लालसर ओठजरासे वर उचल्ले गेलेले , ज्याने आतले पांढरे शुभ्र दात दिसुन येत होते.ढमाबाईंची तर पळथा भुई थोडी झालेली, झोपाळ्यापासुन थोड दूर एक चौकोनी टेबल होता..त्यावर एक ऊभी फुलदानी होती...ढमाबाईंनी वेगाने ती गाठली..
फुलदानी उचलुन, तोंडातला पान थु-थु करत त्यात थुंकला..साडीच्या पदराला तोंड पुसला...पुन्हा जागेवर येऊन ऊभी राहिल्या.
" नमस्कार महाराणी..! " रामुसावकाराने मोठ्या आदराने हस्तआंदोलन
करत महाराणींना हात जोडले. महाराणींच मात्र सर्व लक्ष खाली होत..चेह-यावर हास्य नसुन जरासे चिंतीत भाव पसरलेले..तो चिंतीत
चेहरा पाहुन रामुसावकाराला जरास विचित्रच वाटल, परंतु त्याच्या एकतर्फी मनाला ते भाव गर्विष्ठ वाटले येवढी मोठी मांणस आहेत..थोडस गर्विष्टपणा तर असेलच ना, असा त्याचा अर्थ त्या रामच्या एकतर्फी मनाने घेतला.
" या ,..आत या ! " रामु सावकार वाड्याच्या पाय-या चढत म्हणाला.
परंतु पहिल्याच पायरीला महाराणींनी तोंड उघडल.
" नाही थांबा सावकार! " महाराणींनी एकवेळ यु.ज्ञी:रुपवती...मग सावकाराकडे पाहील व पुढे म्हणाले.
" आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे!"
" महाराणी, युवराज्ञी, तुम्ही आमच्या वाडयात पाहिल्यांदाच आला हाईसा, आण तुम्ही माझ्या लेकीला तुमच्या घरची सुन बनवुन घेणार हाईसा ! हे आमच्या साठी लेय मोठी भाग्याची गोष्ट हाई , आण आता आपण पक्के सोयरीक व्हणार.आण सोयरीकाला अस दारातच उभ राहुन मानपान करण्याची आमची..परंपरा नाय बघा. म्हणुन तुम्हाला जे काय बोलायच हाई ते निवांत आत बसुन बोलु की आपण!" महाराणींना वाटल्याप्रमाणे प्रकरण जरा जास्तच हाताबाहेर गेल होत. कोणत्या तोंडाने त्या हे सांगणार होत्या." की आम्ही, हे लग्न तोडायला आलो आहोत !"
परंतु बोलायला तर लागणारच होत ना. सावकार म्हणाला तरी महाराणी काही केल्या जागेवरुण वितभर ही हळल्या नाहीत, त्यांची मान जराशी खेदाने घाली गेलेली.
"बर ठिक हाई महाराणी बाहेरच बसु आपण." रामु सावकाराने हसतच महाराणींकडे पाहिल व वाड्याच्या पाय-या उतरला." ए बाळ्या!"
रामुने हाक दिली, हाक देताच वाड्यात काम करणारा एक माणुस तिथे आला. " जी सावकार !" खाली पाहतच बाळ्या म्हणाला. सावकाराने त्याला काहीतरी सांगीतल, जे ऐकुन तो निघुन गेला.काहिवेळाने तो पुन्हा परतला आता बाळ्याकडे दोन लाकडी खुर्च्या होत्या.एकीवर महाराणी बसल्या -दुसरीवर युवराज्ञी..बाळ्याने पुन्हा सावकाराच्या खुर्चीसाठी तिसरी फेरी मारली,..खुर्ची खाली ठेवतावेळेस नकळत...रुपवतीची नजर बाळ्याच्या हातावर गेली. तिला बाळ्याच्या हातावर एक विचित्र गोंदण दिसल- वटारलेल्या भेदक डोळ्यांच , टक्कल असलेल्या डोक्यातुन दोन शिंग बाहे आलेल -तोंडातुन सुळ्यासारखे दात बाहेर आलेल - जणु एक सैतानाच असाव. खुर्ची ठेऊन बाळ्या पुन्हा वाड्यात निघुन गेला...युवराज्ञी एकटक त्याच्या पाठमो-या पुढे-पुढे जाणा-या आकृतीकडे पाहत बसलेले की तेवढ्यात एक आवाज आला.
" महाराणी, राजकुमारी काय घेणारा हाईसा तुम्ही ! "
" नाही आम्हाला काहीही नको ! " महाराणी जरा पटकण म्हणाल्या.
" सावकार आमच्याकडुन अनावधनाने एक चुक झाली आहे. आणि त्याच चुकीबदल आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे.!"
महाराणींच्या ह्या वाक्यावर सावकार जरासा गोंधळलाच गेला. महाराणींच वागण जरास अनपेक्षितच वाटत होत जरास विलक्षणच म्हणा.आता सावकारही खुर्चीत जरासा ताठ बसला, त्याच्या चेह-यावरच हसु जरास मावळल गेल. समोर गावच्या महाराणी बसल्या असल्या तरी तो काय कोणी भिकारी नव्हता, त्याच्याकडेही अमाप संपत्ती होती..रुबाब, अहंकार , गर्विष्टपणा होता.
" ठिक हाई बोला तुम्ही!" सावकार खुर्चीत जरासा ताठ बसला, चेह-यावर गंभीर भाव पसरले.महाराणींनी एकवेळ यु.ज्ञी:रुपवतींकडे पाहिल, तीने फक्त मानेनेच होकार दर्शवला,जणु तो पुढे बोलण्याचा होकार असावा अस समजुन महाराणींनी बोलायला सुरुवात केली.सकाळपासुन जे काही घडल ते सविस्तर सावकारास सांगितल.
महाराणींच्या प्रत्येक वाक्यावर सावकाराचा संताप उफाळून उठत होता..वाड्यात दरवाज्या बाजुला भिंतिला पाठ टेकुन हे सर्व ऐकणा-या
शलाकाचे डोळे विस्फारले गेलेले-तिच्या मनाला एक विलक्षण हादरा बसला होता...शब्दांत वर्णन न करण्या पल्याडचा.तिने जे काही राझघराण्याची सुन होण्याचे स्व्पन पाहिले होते , ते सर्व आता धुळीस मिळाले गेलेले, रामुसावकाराचा आपल्या पित्याचा तो आनंदीत चेहरा क्षणा-क्षणाला तिच्या नजरे समोर येत होता. सावकाराचही काही और सांगायलाच नको ! त्याच्यामते आपल्या लेकीची महाराणींनी फसवणुक
एकप्रकारे विश्वासघातच केला होता, तिला उगीचंच चण्याच्या झाडावर चढवल होतं.सावकाराचा संताप आता वर उफाळून आलेला, तो खाडकन आपल्या खुर्चीतुन उठला , बोलण्यासाठी तोंड उघडलच होत..
तेवढ्यात त्याच लक्ष वाड्याच्या दारात गेल- दारातुन संत्या, लंक्या दोघेही हस-या चेह-याने आत आले होते.ह्याचा अर्थ, ह्याचा अर्थ सावकार समजुन गेला होता.दोघांनीही कामगिरी चोख पार पाडली आहे.
" महाराणी! जे झाल..ते झाल ! आता आम्हाला ह्या विषयावर काय बी बोलायचं नाय!" सावकाराने आपला सणसणीत मनफ धगधगणारा राग कसतरी रोखुन धरला.- संत्या लंक्या दोघेही ती पेटी घेऊन आले होते..आणि त्या पेटीच सर्वप्रथम बंदोबस्त कराव लागणार होत..जे की महाराणी व युवराज्ञींच्या उपस्थीत झाल नसत..म्हणूनच रामुने त्यांना जाण्यासाठी सांगितल. म्हणायला तस सर्व चुकी महाराणींचीच होती..ज्याजाकारणाने महाराणींनी ती मान्य केली होती..सावकाराच्या वाक्यावर त्या व युवराज्ञी लागलीच माघारी वळल्या.
लंक्या एकटक आवासुन डोळे फाडुन युवराज्ञींकडेच पाहत होता..
तिच नयन सुख डोळ्यांत भरुन घेत होता त्याच्या डोळ्यांत वासना प्रगटली होती. युवराज्ञींच लक्ष त्याच्याकडे नव्हत. घोडागाडीत बसुन महाराणी व युवराज्ञी निघुन गेल्या.तसा रामुसावकार त्या दोघांजवळ आला.
" झाल काम!" सावकार हळू आवाजात बोलला.
" व्हय आबा !" लंक्या खुशीतच म्हणाला.
" कोणि पाहील नाय नव्ह ?"
" नाय आबा , कोणी बी नाय पाहिलंय!"
" बर ठिक हाई! " सावकाराने अस म्हंणतच एकवेळ मागे पाहिल, वाड्यातल अंगण रिकाम होत, पन त्या रिकाम्या अंगणात आता पांढरट धुकही वाहयला सुरुवात झालेली " ती पेटी घेऊन स्वयंपाक घरात या !"
सावकार हळुच म्हणाला. तशी दोघांनीही ती पेटी घोडागाडीतुन बाहेर काढली, व लागलीच वाड्याच्या कंपाउंडच्या दाराची चौकट ओलांडली...दहा बारा पावल चालुन - दोघे वाड्याच्या दारातुन आत शिरले..व उजव्याबाजुला वळून स्वयंपाक घरात पोहचले.
स्वयंपाक घरात एक कंदील जळत होता, त्या कंदीलाच्या उजेडात
स्वयंपाक घरातली भांडी ताट,चमचे, इत्यादी वस्तु चमकुन दिसत होत्या.
सावकारही स्वयंपाक घरात उपस्थीत असुन चुलीजवळ पाठमोरा उभा राहिलेला , त्याच्या हातात एक जळता कंदील होता.
" आबा , !" लंक्या हलकेच म्हणाला.
त्याच्या ह्या वाक्यावर सावकाराने पाठमोरा उभ राहतच फक्त होकारार्थी मान हलवली , सावकाराच्या पायांसमोर थोड पुढे एक न पेटलेली मोठी चुल होती. रामु सावकाराने कंदील असलेला हात समोर धरला , तो कंदील आता चुलीपासुन जेमतेम दोन फुटांवर होता. सावकाराने क्ंदीलाची कडी पकडलेली, जी की आता त्याने सोडली. बिन आधाराने तो कंदील थेट खाली-खाली येत चुलीवर आदळला.
त्या कंदीलाची काच फुटली , आतल रॉकेल बाहेर येत चुलीवर पसरल - पेटत्या वातीचा स्पर्श रॉकेलला झाला तसा चुलीने झपकन पेट घेतला.
पुर्णत स्वयंपाक घर तांबड्या प्रकाशाने उजळुन निघाल. लंक्या, संत्या, रामु सावकार अस मिळुन तिघांच्याही आकृत्या भिंतींवर दिसु लागल्या.
सावकाराने आता आपला डावा हात त्या पेटलेल्या चुलीवर धरला, उजव्या हातात एक काळा धारधार पातीचा सुरा घेऊन तो डाव्या हाताच्या मुठीत गच्च पकडला, तसा त्या हातातून रक्ताची धार त्या आगीत गळु लागली. रक्ताचा स्पर्श ज्यासरशी त्या आगीस झाला,
त्या तांबड्या आगीचा रंग गुलाबी झाला व ती आग विझली जात फुस्स धुर उडाला जात ती चुल दोन भागांत विभागली गेली.चुलीची एक बाजु डाव्या-तर दुसरी बाजु-उजव्याबाजुला सरकली. आता समोर होत्या खाली जाणा-या अंधा-या पायवाटेच्या दगडी पाय-या , जणु आत गुप्त तळघर असाव.
" ती पेटी माझ्या माग घेऊन या?" रामु सावकाराचा गंभीर आवाज घुमला.
××××××××××
क्रमश :