रक्त पिशाच्छ - भाग 24 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रक्त पिशाच्छ - भाग 24

॥ रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 24

 

रात्र सरुन सकाळ उजाडली! डोंगरमाथ्यावरुन सूर्य हलकेच झाकुन पृथ्वीच्या दिशेने पाहू लागला. हिरव्या झाडांमधुन रान पाखर किलबिलाट करु लागली.चिमण्या-चिवचिव करत ओरडु लागल्या.

रामुसावकाराच्या वाड्यात अंगणात असलेल्या झोपाळ्यावर तो खुद्द बसला होता. दोन्ही हात झोपाळ्यावर ठेवुन पुढे मागे झुलत होता.लाल कवडी सारखे डोळे खाली जमिनीवर स्थिरावले होते.- काळ रात्री जे काही विलक्षण प्रकार घडल होत-त्याचा लवलेशही त्या डोळ्यांत दिसत नव्हता.वाड्याच्या चौकटीमधुन ढमाबाई एका बदकासारख्या चालेसहीत डुलत-डुलत चालत बाहेर आल्या.

तिच्या अवाढव्य शरीरयष्टीमुळे तिच्या मागून येणारा संत्या मात्र कोणालाही दिसत नव्हता.

" काय ओ ! " ढमाबाईंनी झोपाळ्यावर बसलेल्या आपल्या नव-याकडे पाहिल." कधी आला तुम्ही !?"

" व्हई की दाजी! " ढमाबाईंच्या पाठीमागून संत्या चालत पुढे आला.

संत्याच्या ह्या वाक्यावर त्याने डोळे एक दोन वेळा मिचकवुन थेट ढमाबाईंकडे पाहिल.बोलण्यासाठी तोंड उघडल,परंतु अचानक मध्येच

लंक्या तिथे आला.

" आबा! कधी आलात तुम्ही आणि आपली शालू कुठ हाई!" लंक्याने आजूबाजूला पाहिलं.

" हाईत की ! इथच हाईत " रामुसावकार खिवचटपणे हसुन जरासा गुढपणे म्हणाला.ते वाक्य ऐकुन संत्याची बोबडीच वळली.

" म्हंजी काय भुत बीत आणल का काय घरात!" संत्याच्या मनात विचार आला.

" कुठ हाई बा? मला तर माझ्या बाहिणीस्नी कधी एकदाच डोळे भरुन पाहतोय असं झालय!" लंक्याच्या चेह-यावर हास्य पसरल.

बाजुलाच संत्या उभा होता- त्याच्या मनात मात्र विचार आला.

" बघ बा बघ ! डोळे भरुन बघ तुझ्या बाहिणीला ! पण तीनी जर तुला बघता -बघता पोटात भरल म्हंजी!" संत्या एकटक आपल्या विचारात बुडाला होता. की तेवढ्यात.

" ए आई..! ए आये..! कुठ हाईस तु!" वाड्याच्या लाकडी गेटमधुन

एक आठ-नऊ वर्षाची गुलाबी फ्रॉक घातलेली पोर आत आली. तिच्या मागोमाग एक लुकडासा चाळीस पंचेचाळीस वय असलेला माणुसही आत आला.त्याच्या अंगावर एक फुल हातांच्या बाह्या दूमटलेला मळलेला शर्ट,खाली पायांत एक पांढरी पेंट होती. चेह-यावर दोन तीन महिन्याची वाढलेली दाढी होती.त्या आठ वर्षाच्या मुलीचा आवाज ऐकुन आतापर्यंत सर्वांच लक्ष गेटच्या दिशेने वळल ही होत.

" हा तर त्या काशीचा नवरा वाटतोय! आणि ही तिची पोर !"

संत्या म्हणाला.

" मी अस ऐकलय की ह्यो बेवडा हाई म्हनुन!" लंक्याने एकवेळ त्याच्या पित्या मग संत्याकडे पाहिल.

" अस असल तर मग पैक देऊन तोंड बंद करु!" रामुने ढमाबाईंकडे पाहिल तस ती लागलीच मान हलवून वाड्यात निघुन गेली.

" आण जर पैक देऊन न्हाई ऐकल तर!" लंक्याने आपली बाजु मांडली.

" मंग अजुन लेय मार्ग हाईत !" सावकार इतक म्हंणुन झोपाळ्यावरुन उठला.चेह-यावर खोट हास्य आणत त्याने म्हाद्याकडे पाहिल व म्हणाला.

" काय म्हाद्या काय म्हंतुस आज इकड कुठ?" सावकार हसतच म्हणाला.

" अव मालक! माझी बायकु तुमच्या वाड्यात काम करती! ती काल घरला नाय आली! तर माझ्या पोरीस्नी तिच्या आईची लय आठवण येती हाई!" म्हाद्याच्या बाजुलाच एक गुलाबी फ्रॉक घातलेली -डोक्यावरचे वाढलेले केस दोन लाल वेन्यांच्यात बांधलेली चिंकी ऊभी होती.आपल्या आईशी भेट होईल, कधी आपन आपल्या आईला पाहतोय अस त्या बिचारीला झाल होतं-परंतु नियतीने काय भयाण खेळ खेळला होता...ज्याक्षणी चिंकीला समजेल की आपली आई जिवंतच नाही आहे

त्यावेळेस तिची प्रतिक्रीया कशी असेल.? पन तिला सांगणार कोण? सावकार? लंक्या? संत्या?

" माझी आई कुठ हाई ?मला तिला भेटायचय!"

चेह-यावर एक हस्य आणत ती चिंकी म्हणाली. वाड्याच्या दारातुन हळकेच ढमाबाई चालत आल्या ,तिच्या हातात एक लाल कापडी थैली होती.सावकाराने हळकेच म्हाद्याच्या खांद्यावर एक हात ठेवला. दुस-या हातात ढमाबाईंनी ती पिशवी दिली.

"म्हाद्या ! सोन्याची दोनशे नाणी हाईत! हव ते कर पायजे तेवढी ऐश कर"

"

" म्हाद्या घे!" रामुसावकाराने ती लाल थैली म्हाद्याकडे सोपवली.

" पन सावकार , हे येवढ पैक कशापाई देताय तुम्ही मला?"

"आरे हे संमद पैक घे आणि तुझ्या बायकोचा ईषय कुठ काढु नको! "

" म्हंजी काय म्हंणायचय काय तुम्हाला?" म्हाद्या जरासा गोंधळून म्हणाला.

"हे बघ म्हाद्या ! तुझी बायको तुला तशीबी जिवंत असताना मेलेलीच व्हती!"

" ओ सावकार ! " म्हाद्याचा आवाज चढला." काय म्हंणायच काय हाई तुम्हाला! माझी बायको मला कधी बी मेल्यासारखी नव्हती ! आण माझी बायको कूठ हाई ते सांगा आधी ?जर तुम्ही तिला काय केल असल ना ! तर म्या राज्याकडच जाईल.!"म्हाद्याने चिंकीचा हात हातात धरला व बाहेर जाण्यासाठी निघणार की तोच मागुन एक आवाज आला.

" थांबा!"

××××××××

राझगड महालात प्रथम हॉल मध्ये महाराज रघुबाबा एका सोफ्यार बसुन काही गुप्त चर्चा करत बसलेले. त्या दोघांपासुन जेमतेम वीस पावलांवर महालाचा उघडा दरवाजा दिसत होता.त्या दरवाज्यातुनच

एक सैनिक हातात भाला घेऊन चालत,महाराज-रघुबाबा दोघांच्याही दिशेने चालत आला.

" महाराज !" तो सैनिक कमरेत लवुन म्हणाला.

"हम्म!" महाराजांनी होकारार्थी मान हळवली.तो सैनिक जणु ह्याचीच वाट पाहत असावा ,कारण तो लागलीच जे काही निरोप घेऊन आलेला तो त्याने सांगायला सुरुवात केली.

"महाराज! कोंडूबा आले आहेत ! "

" ठीके पाठवा त्यांना !" महाराज एक हात वर करुन म्हणाले.

" जी महाराज !" तो सैनिक पुन्हा कमरेत लवुन म्हणाला.आल्या पावले निघुन गेला.काहीवेळाने दरवाज्यातुन कोंडूबा आत आले.त्यांच्या चेह-यावर जरासे भीतीजनक,चिंताक्रांत भाव होते.

" नमस्कार महाराज-नमस्कार रघुबाबा !" कोंडूबा सुद्धा कमरेत लवुन म्हणाला.रघुबाबा एकटक कोंडूबा कडे पाहत बसलेले, त्यांच्या मते कोंडूबा जे काही निरोप घेऊन आला होता तेच महत्वाच होत.

" काय झाल कोंडूबा ! अस तातडीने इथे आलात.

"व्हई महाराज ! आताच काहीवेळापुर्वी आम्हाला येशीवर पहारा देताना

एक बैलगाडी आमच्या दिशेने येताना दिसली.आम्हाला वाटल की कोणी

पाहुणा असेल! परंतु जशी बैलगाडी जवळ आली, बैलगाडीत कोणिच नव्हत! आणि हो महाराज! बैलगाडीत जे कोणी बसल होत,त्याच संमद सामान जसच्या तस ! बैलगाडीतच हाई."

कोंडूबाच्या ह्या वाक्यावर महाराजांनी काळरात्री खिडकीसमोर उभ राहुन जंगलातुन आलेल्या त्या किंकाळीचा आवाज आता ह्याक्षणी सुद्धा ऐकु आला भीतीपोटी, कान वाजले त्यांचे.

" कोंडू? म्या काल जंगलातुन एक इवलाचा आवाज ऐकला व्हता. नक्कीच तो सैतान काल रातच्याला कुणाच्या तरी जिवावर बेतल असणार.!काय महाराज?" रघुबाबांनी महाराजांकडे पाहिल.

" हो. मी सुद्धा तो आवाज ऐकला !" महाराज विलक्षण नजरेने रघुबाबांकडे पाहत म्हणाले.

"महाराज जो पर्यंत त्या सैतानाच काय सोक्षमोक्ष लागत नाय, तो पर्यंत आपल्याला जंगलातला समद्या वाटा रस्ते बंद करावे लागतील!"रघुबाबा महाराजांच्या उत्तराची वाट

पाहू लागले.

" हो आम्ही सुद्धा असंच काहीस विचार करत होतो ! परंतु रस्ता बंद करुन काय होणार. जंगलातुन सुद्धा काही वेगळे शार्टकट मार्ग निघतात ना!आणि येवढे मार्ग बंद करायचे म्हंणजे असंभव आहे! "

"नाही महाराज तुम्ही त्याची चिंता करु नका! तुम्ही फक्त परवानगी द्या बाकी संमद म्या बघतु!" रघुबाबांनी मंदस्मित हास्य करत कोंडूबा महाराजांकडे पाहिल.

" ठिक आहे! देतो आम्ही तुम्हाला परवानगी !"

" ठिक हाई तर ! दुपारीच निघुयात मग आपण येशीवर!"

रघुबाबा चेह-यावर मंद स्मित हास्य घेऊन इतकेच म्हणाले.

××××××××

ए शाळू ताई!" बारकी चिंकी एकदमच ओरडली.तिच्या आवाजासरशी

लंक्या, ढमाबाई,संत्या तिघांनीही वाड्याच्या दरवाज्याच्या दिशेने पाहिल. अंगात काळी साडी,डोक्यावरचे केस एकाजागी मागे बांधुन ठेवलेले, टपो-या डोळ्यांत ढमाबाईंसारख काजळ ओतून भरल होत-लाल ओठांवर एक फिकटशी काळी लिपस्टिक लावली होतो- कपाळावर एक नागिणीची छोठीशी टीकळी चिकटवली होती. गळ्यात चांदीचे दागीने घातलेले.संत्या डोळे फाडून तिच्याकडे पाहत होता...

"मेलेल प्रेत जित झालय " डोक्यात हेच वाक्य घुमत होत त्याच्या.

ढमाबाई-लंक्या दोघांनाही आनंद झालेला दिसत होता तिला पाहुन...

वाड्याच्या दारातुन दोन्ही हात मागे ठेवून शलाका हलकेच चालत रामुसावकार-म्हाद्यासमोर आली ! तिने मंदस्मितहास्य करत चिंकी कडे पाहील.

" काय रे काय झाल?" शालुने उलट प्रश्ण केला.तिच्या ह्या वाक्यावर म्हाद्याने सगळ काही जसच्या तस तिला काहीवेळा अगोदर जे काहि घडल ते सांगीतल.दोन्ही हात पाठीमागे ठेवून मग सर्व काही ऐकुन झाल्यावर शलाका म्हणाली.

" मग हे सर्व आता तु कोणाला सांगणार ? "

" राज्यास्नी सांगल की !"

" अच्छा! कस सांगणार? "

" म्हंजी!" म्हाद्या न समजुन म्हणाला.इकडे त्याच्या ह्या वाक्यावर शलाकाच्या कालसर ओठांवर एक कुस्त्सीक हास्य आल,डोळ्यांत एक असुरी चमक उमटली.

" कारण तु तर मेलायेस ना!" शलाकाच्या पाठीमागे असलेल्या हातांची घडी सुटली ! हातात असलेल्या बांगड़यांचा खळ-खळ आवाज झाला...

ज्याप्रकारे क्रिकेटमध्ये एक बॉलर शरीरात असलेल्या पुर्ण ताकदीने चेंडू तीन स्टम्पसच्या दिशेने भिरकावतो..आणि तो चेंडू अगदी त्रिपाट वेगाने जाऊन स्टम्पसवर आदळून त्या स्टम्पसला हवेत उडवतो.सेम हुबे हुब तसंच शलाकाच्या हातात एक उभ दगड होत (वरवंटा)जो की तिने स्वयंपाक घरातुन आधीच लपवुन म्हाद्याच काम तमाम करण्यासाठी आणलेला आणि त्याचा आता वापर ही होत-होता...अगदी बुलेट ट्रेनच्या वेगाने शलाकाने हातातल्या बांगड्यांचा आवाज होत-खालचे ओठ वरच्या दातांत चावुन धरत असा काही तो दगड म्हाद्याच्या डोक्यात हाणला की फट्ट आवाज झाला ,म्हाद्याची कवटीच फुटली.रक्ताचा फवारा चौहीदिशेना उडाला..कवटीत तो दगड खोवला गेला. एका वारातच म्हाद्याच पुर्णत आयुष्यच संपल -नाक,कान,डोळे,तोंड सर्वांच्यातुन रक्तबाहेर आल.म्हाद्याच कलेवर हलकेच निर्जीव वस्तु प्रमाणे झोपाळ्यावर पडल..मागे पुढे झुळू लागल.

" बाऽऽऽऽ!" छोठी चिंकी ओरड़त आपल्या बा म्हंणजे म्हाद्याच्या कलेवर च्या दिशेने गेली. ढमाबाई,लंक्या,संत्या तिघेही आ वासुन शलाका कडे पाहत बसलेले.नेहमी गरीबांचा विचार करणारी-लहाण पोरींशी गोडीने वागणारी बोलणारी , मोठ्या मांणसांचा आदर करणारी शलाका एका रात्रीत बदल्ली होती.इतकी की तिने एका मांणसाचा जिवही घेतला होता..तो ही निघृण पणे.

" काय केल तु हे! माझ्या बा ला का मारल तू? वाईट हाईस तु ? वाईट हाईस..तू ! तु माझी शालू ताई होऊच शकत नाय!" चिंकी आपल्या पित्याच्या पाठीवर हात ठेवुन त्याला उठवत शलाकाकडे पाहुन म्हणाली.

संत्याने बाजुला एक तांब्या होता तो उचलला व पाणि पियु लागला.

की तेवढ्यातच शलाका अगदी मोठ्याने त्या चिंकीवर अपशब्द उच्चारत खेकसली.

" ए मा××××त..! चुप !"कधीही कोणाला उलट न बोलणा-या शलाकाच्या तोंडून आज शिवी ऐकून संत्याच्या नाकातोंडातुन पाण्याचा फवारा बाहेर पडला,खोकत-खोकत तो डोक्यावर हात मारु लागला.

तिच्या ह्या वाक्यावर लहानगी चिंकी एका झटक्यात गप्प बसली.

" निसती बड,बड,बड,बड लावले कार्टीनी.! " शलाकाने आपले काजळ फासलेले डोळे अक्षरक्ष वटारुन-वटारुन तिला दम द्यायला सुरुवात केली.तिच ते रुप,बोलण पाहुन बिचारी छोठी चिंकी घाबरली..

मागे -मागे सरकत तिने एकवेळ उघड्या दाराकडे पाहिल..तोच एक सुटण्याचा मार्ग होता.अन्यथाही मांणस तिचाही खून करणार नाहीत हे कशावरुन? दरवाज्याकडे पाहतच चिंकीने एकच धाव घेतली.तिचे लहानसे बाहुलीसारखे पाय दुडू-दुडू धाऊ लागले.शेवटी तिने दरवाजा गाठला..पन अचानक पुढुन दोन हात आले त्या हातांनी तिला दारातच आडवल.त्या समोरच्या आकृतीला पाहुन चिंकीच्या डोळ्यांत अश्रु दाटुन आले..तिने त्या आकृतीला..धाडकन मिठी मारली.

लंक्या,संत्या,ढमाबाई,रामुसावकार,शेवटला शलाका सर्वांच्या तोंडच पाणी पळाल त्या आकृतीला पाहुन. सर्वांच्या नजरा विस्फारल्या.

" प..प..प्रधानजी !" संत्या वाड्याच्या चौकटीत उभ्या असलेल्या त्या आकृतीकडे पाहुन म्हणाला. कारण चिंकी ज्या आकृतीला बिलगली होती.ती आकृती म्हंणजेच राहाजगडचे प्रधान यार्वशी होते.

प्रेमळ,मनमिळाऊ,मोठयांचा आदर ठेवणारे व लहान मोठयां समवेत अगदी मनमोकळेपणाने बोलण्या-या ह्या राहाजगडच्या यार्वशी प्रधानजींना कोण ओळखत नव्हत! म्हंणुनच तर चिंकीने त्यांना लागलीच मिठी मारली होती.

" बाळ चिंकी ! काय झालं ? अशी कावरी बावरी होऊन का पळत आहेस बर? " यार्वशी प्रधानजींनी प्रश्ण केला. चिंकीने काहीक्षण

प्रधानजींच्या त्या पाणीदार डोळ्यांत पाहील..त्या डोळ्यांत पाहून तिला धीर आला.तीने रडत-रडतच बोलायला सुरुवात केली.

" अं..अं...प..प..प्रधान काका ! ह्या मांणसांनी माझ्या आय -बाबाला मारलं हुन्हुं...हुन्हू.. वाईट मांणस हाईत ही सगळी..!" रडत विव्हळत

चिंकीने प्रधानजींना सांगितल.

" काय ! " यार्वशी प्रधानांनी एक रागीट कटाक्ष पुढे रामुसावकार, संत्या लंक्या, सर्वांवर टाकला.चिंकीचा हात धरुन ते वाड्यात आले.रामु सावकारा समोर उभे राहिले.त्यांच्या बाजुला लंक्या,संत्या,ढमाबाई, शलाका सर्वजन एकटक प्रधानजींकडे पाहत बसलेले.

" सावकार काय म्हंणतीये ही चिंकी? तुम्ही तिच्या आई-वडीलांना मारलत ?" यार्वशी प्रधान रागिट स्वरात उच्चारले.

" नाही ओ प्रधानजी! काय बी बोलतीये ती पोर ! मला वाटतय येडी झालीता !"

" नाही प्रधान काका ! खोट बोलतोय ह्यो म्हातारा, हे काय इथच माझे बाबा!" चिंकीने झोपाळ्यावर पाहिल...ज्या झोपाळ्यावर काहिवेळापुर्वी म्हद्याच प्रेत पडलेल..परंतु आता तो झोपाळा रिकामा होता. त्या झोपाळ्यावर काहीही नाही हे पाहुन चिंकीचे डोळेच विस्फारले काहीक्षण त्या लहानगीचा मेंदूच बधिर झाला.

" प्रधान काका ! म्या खरच बोलतीया ह्या शालू ताईनेच माझ्या बाच्या डोक्यात वरवंटा घालून त्याला मारला ! "

" अंग बाळ पण इथे तर काहीच नाहीये!मला वाटत तुला भास झाला असेल!" यार्वशी प्रधान म्हणाले.

" नाय प्रधान काका तो माझा भास नव्हताच! त्यापेक्षा ना आपण एक काम करु ? रुपवती ताईंना सांगु ती ह्या सगळ्यांना शिक्षा करेल..!"

चिंकीने प्रधानजींकडे पाहिल व ती बाहेर जाऊ लागली..की तोच पुढे जे काही घडल विलक्षण, अविश्वासनिय होत.

चिंकीच्या मागुन वेगाने एक हात आला, मागुन तिच्या गुलाबी फ्रॉकला धरुन त्या हाताने तिला एका कापसासारख मागे हवेत उचलुन घेत थेट सावकाराच्या अंगणात असलेल्या त्या गोल कठड्याच्या विहीरीत भिरकावुन दिल. एका दगडासारखी चिंकी धप्प आवाज करत विहीरीत पडली , पोहता येत होत म्हंणुन बिचारी हात-पाय झाडु लागली. तिच सर्व लक्ष वर होत.

.वर आकाशात काळे ढग जमा झाले होते.विहीरीच्या कठड्यापाशी गोल रिंगण करुन लंक्या,संत्या,ढमाबाई,सावकार,शलाका , सर्वजन जमली होती.

" जिती हाई ती !" रामु सावकार मागे वळुन म्हणाला.ज्याने चिंकीला विहीरीत फेकल होत.

" प्रधान काका वाचवा मला !" तिच्या आवाजासरशी विहीरीच्या कठड्यावर हलकेच पाच बोट पडली..मग यार्वशी प्रधानजींनी हलकेच आत वाकून पाहिल.

" अंग ए येडे गप्प! ह्यानेच तर फेकलना तुला ! हिहिहिहिही!" रामु सावकाराच्या ह्या वाक्यावर यार्वशी प्रधानजींने हलकेच आपली मान तिरकस पने वाकडी केली.जे ओठ नेहमी मंदस्मित हास्य करत असायचे त्या त्या ओठांवर एक छद्मी हास्य आल. डोळ्यांत आसुरी चमक उतपन्न झाली..आकाशात बार-फुटाव्या तश्या दोन विजा कडाडल्या , ज्या विजांच्या प्रकाशात चिंकीला यार्वशी प्रधानजींचा तो हसनारा कुरुप चेहरा पाहुन प्रथमच भीती वाटली.कुठे ते रोज बाजारात दिसल्यावर गोडीने बोलणारे -खाऊ देणारे प्रधानजी..आणि कुठे हा सैतान-बिल्कुल विश्वास बसत नव्हता तिला.मानवाच्या शरीरात राहुन..चेह-यावर चांगूलपणाच मुकुट लावून फिरणारा महाकारस्थानी

श्रीकृष्णाचा सक्खा मामा कनिश्क होता हा यार्वशी प्रधान.

सर्वांशी गोडीने बोलणारा हा यार्वशी मुळ हेतुने सांगायच झाल तर सैतानाचा हस्तक होता.महाराजांसमवेत राहुन त्यांचा विश्वासघात करत होता.

" जिती आहे अजुन ! तर पाय आपटत -आपटत मरल !" यार्वशी प्रधानाने विहीरीच लाकडी झाकण लावुन घेतल-.

" आबा ! हे प्रधानजी पन आपल्यात हाईत !" शलाकाने रामुकडे पाहिल.

" व्हई शालु बाई कव्हापास्नच ! आण प्रधानजींची आपल्याला लेय मदत झाली हाई!" रामुने यार्वशीकडे पाहील.त्याच्या चेह-यावर अद्यापही आसुरी हास्य झळकत होत.

" सावकार वाड्यात जाऊन बोलुयात ! म्या अस ऐकलय की भिंतीला बी कान असतात !" यार्वशीच्या वाक्यावर सावकार खिवचट पणे हसला. बाकीचे तर अद्याप धक्क्यातच होते. यार्वशी रामु मग बाकीचे अस मिळुन सर्वजन वाड्यात निघुन गेले. इकडे विहीरीतुन येणारा चिंकीचा हात पाय हलवण्याचा तो आवाज ही थांबला गेला.

 

क्रमश :