Rakt Pishachchh - 26 books and stories free download online pdf in Marathi

रक्त पिशाच्छ- भाग 26

॥ रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 26

 

दुपार दोन वाजता

राहाजगड महालात , युवराजांची खोली.

 

युवराज सुरजसिंह यांच्या खोलीत पलंगावर मेघावती डोळे मिटुन पडली होती. तिच्या बाजुला युवराज बसलेले,त्यांच सर्व लक्ष तीच्या चेह-यावर होत. मेघावतीच्या चेह-याकडे पाहणा-या युवराजांच्या चेह-यावर चिंतेच्या छटा उमटल्या होत्या..

आणिका नाही उमटणार? मेघावतीच्या गर्भात त्यांचा वंश जो वाढत होता..अद्याप त्या वंशाने ह्या धरतीवर जन्म ही घेतला नव्हता ,आपल्या आई -वडिलांना पहिलही नव्हत! जर त्या सैतानाच्या कचाट्यात सापडुन बाळाला, त्याच्या आईला काही झालं असत तर? युवराजांच्या मनात वाईट प्रश्ण उभे राहत होते. युवराज एकटक मेघावतीच्या चेह-याकडे पाहत बसलेले.की तेवढ्यात मेघावतीच्या बंद पापण्यांआडून डोळ्यांची हालचाल झाली..मग मेघावतीने हलकेच डोळे उघडले.डोळे उघडताच तिला आपल्याकडे एकटक पाहणारे युवराज दिसले. आणि त्यांच्या चेह-यावर पसरलेले ते काळजीयुक्त भाव सुद्धा , भले खरे प्रेम करणारे जोडपे आपल्या पुढील जोडीदाराच्या भाव अगदी टळक पणे ओळखू शकतात हे त्याच एक उधारणच समजा! मेघावतीने दोन्ही हात पलंगावर ठेऊन उठण्याचा प्रयत्न केला,पन अशक्तपणा अद्यापही शरीरात असावा! कारण उठताना तिचा तोळ गेला..जो की वेळीच युवराजांनी तिचे खांदे पकडून सावरला,अन्यथा ती पलंगावरुन खालीच पडली असती! युवराजांनी तिला पलंगाच्या मागच्या फळीवर

पाठटेकवुन बसवल.

" मेघा ! काय हे ? तुला बाबांनी आराम करायला सांगितला आहे ना !"

युवराज मेघाच्या बाजुला बसले ,काळजीच्या सुरात म्हणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर मेघाने कसलेही प्रतिउत्तर दिले नाही! ती एकटक युवराजांकडे पाहत राहीली.मग तिने आपला एक हात हळूच वाढवुन युवराजांचा हात हलकेच पकडला...व म्हणाली.

" कसला विचार करताय युवराज!" मेघाचा स्वर जरासा अशक्त होता.

" आम्ही ! नाहीतर कसलाच नाही !" युवराज उसने हसू आणत म्हणाले.

" युवराज, तुम्हाला नीट खोट तरी बोलता येत का! " मेघाच्या वाक्यावर

युवराजांच हसु मावळल.

" आमचा " मेघाने अस म्हंणत आपला एक हात वाढवुन आपल्या पोटावरती ठेवला व पुढे म्हणाली." आणि आपल्या बाळाचा विचार करत होतात ना !" मेघाच्या वाक्यावर युवराजांनी खाली मान घालून होकारार्थी मान हलवली व म्हणाले.

" आम्हाला माफ करा मेघा! आम्ही आपल्या लग्ना विषयी आई आणि बाब साहेबांशी बोलून तुमच्याशी लग्न करुन तुमह इथे आणायला हव होत.ज्याने हा हल्ला झालाच नसता " युवराज म्हणाले.

" नाही युवराज! ह्यात तुमचा दोष नाही! मुळातच दोष आपला नाहीच आहे! उलट दोष आहे तो ह्या नियतीचा! जिने हे फासे फ़ेकले-आणि त्यात आपण अडकलो गेली. परंतु पहाना त्याच नियतीने आज आपल्याला एकही केल आहे! आम्ही आज तुमच्या महालात तुमच्या समवेत आहोत." मेघावतीच्या वाक्यावर युवराजांनी हळकेच मान हलवली तिचे दोन्ही हात आपल्या हाती घेतले, मग दोघांनिही एकमेकांना मीठी मारली.काहीक्षण दोघेही डोळे बंद करुन त्या क्षणाचा आनंद घेऊ लागले. त्या जादूई झप्पीने जणू मन फ्रेश होत असाव.परंतु तेवढ्यात युवराजांच्या खोलीतल्या उघड्या दरवाज्यातुन महाराणी-युवराज्ञी दोघीही चालत आल्या.पुढील दृष्य पाहून दोघींनीही एकवेळ एकमेकांकडे गाळात हसुन पाहिल.

" आईसाहेब! मला वाटत आपण चुकीच्या वेळेवर आलो आहोत!"

रुपवती आपल्या शब्दांवर जोर देत जरा मोठ्याने म्हंणाली. अचानक आलेल्या आवाजाने युवराज मेघावती दोघांनीही आपली मीठी सोडली..

" आईसाहेब ! मला वाटतं आपण नंतर येऊयात !" युवराज्ञी गालात हसत म्हणाल्या. मेघा एकटक खाली पाहत होती-तिच्या चेह-यावर लाजाळू भाव पसरलेले-गोरे गाल लालसर झाले गेलेले.

" नाही,नाही थांबा ! मलाच थोड काम आहे बाहेर मी...जरा येतो!"

युवराजांनी एकवेळ महाराणी-युवराज्ञी मग मेघाकडे पाहिल व लागलीच कावरे बावरे होतखोलीतुन बाहेर पडले.महाराणींनी हळकेच आपली पाउले मेघाच्या दिशेने वाढवली.तिची लाजेने खाली गेलेली मान त्यांनी आपल्या हातानी वर केली.

" मेघा! आज पाहिल्यांदा आम्ही आमच्या मुलाला इतक खुश पाहिल आहे! खरंच,! खरंच आता आम्हाला पटल आहे.की तुम्हीच ह्या राहाजगडच्या युवराजांच्या पत्नी होण्या लायक आहात!म्हंणुनच लवकरच तुमचा विवाह आम्ही! युवराजांशी लावण्याच ठरवल आहे!" महाराणी म्हणाल्या. त्यांच्या ह्या वाक्यावर मेघाच्या डोळ्यांतुन

आनंद अश्रु बरसु लागले, तीने महाराणींना मीठीच मारली.

xxxxxxxxxx

रघुबाबांनी राहाजगडची वेस एका कवचाने बांधुन घेतलेली! हे आपण गेल्या भागात पाहिल होत! मग त्या नंतर महाराज-खुद्द रघुबाबा,संत्या

तिघेही घोडागाडीतुन राहाजगड गावात जाण्यासाठी निघालेले!

या पाहुयात पुढे!

"संत्या? गाडी थांबीव?" रघुबाबा महाराज दोघेही घोडागाडी मागे बसले होते! पुढे संत्या घोडागाडी चालवत होता. घोड़ागाडीपासून जेमतेम शंभर मीटर अंतरावर गावची घर दिसत होती.

" अव बाबा , गाव अजुन लांब हाई की! गावातच घालतु की गाडी!"

संत्या पुढे पाहतच म्हणाला.

" अर लेका! आपल्याला गावात अस थोडीना जावाच हाई!"

" म्हंणजे?" संत्या न समजुनच म्हणाला.

" अर तु गाडी थांबीव पाहिले, मंग समजीव तू?"

रघुबाबांच्या ह्या वाक्यावर संत्याने गाडी एका झाडाखाली थांबवली.

" आता सांगा!" संत्या म्हणाला.

" आर आपल्या वेष बदलून जायच हाई!" रघुबाबा पटकन म्हणाले.

" परंतु, बाबा ! वेष-भुषेच सामान तर महालात आहे, मला वाटत आपन

महालात जायला हव !" इतकवेळ शांत असलेले महाराज म्हणाले.

" नाय-नाय महाराज त्याची चिंता करु नका!हहहहहह "

रघुबाबा जरासे हसले.मग त्यांनी हळूच आपल्या हाताचा पंजा उचल्ला एकवेळ सुर्याकडे पाहिल, सूर्य कसा तप्तपणे चमकत होता.रघुबाबांनी सुर्याकडे पाहतच हाताची पाचही बोट मुठ झाकावी तशी बंद केली..मग ती बंद मुठ ओठांवर ठेवली.

" वेषम,आलटम-पलटम!" रघुबाबा हळुच पुटपुटले,त्यांच्या पुटपुटण्यासरशी ती हाताची मुठ काहीसेकंद निळ्या रंगाने चमकली ! महाराज-संत्या दोघांनीही तो अद्भूत दृष्य काहीसेकंद का असेना परंतु आपल्या डोळ्यांत साठवला.रघुबाबांनी आता आपल्या हाताची मुठ उघडली ! पाचही बोटे बाजुला सरताच हाताच्या पंजावर एकूण दोन निल्या रंगाच्या आणि एक उर्वरित लाल रंगाची अशा मिळुन एकुण तीन गोल जेम्स सारख्या गोळ्या दिसल्या.

" घ्या! महाराज!" रघुबाबांनी महाराजांकडे एक निळी गोळी सोपवली.

"घे संत्या!" बाबांनी संत्याला निळी गोळी न देता लाल गोळी दिली.

" बाबा, तुम्ही महाराजास्नी निलि गोळी दिली! स्व्त,कड भी निळी ठेवली.मंग मले लाल भी निळी गोळी द्या की लाल कशापाई देताय!"

संत्याने आपली बाजु मांडली.

" आर संत्या कळल,कळल! तु आधी ती जादूई गोळी तोंडात तर टाक?"

रघुबाबा म्हणाले.त्यांनी महाराजांकडे पाहिल,हळूच मंदस्मित हास्य करत होकारार्थी मान हलवली आणि एकसाथ तिघांनीही गोळी तोंडात ठेवली मग गिळली.गोळी तोंडातुन पोटात जाताच तिघांचही शरीर वेगवेगळ्या रंगाने चमकू लागला. महाराज,बाबा दोघांच निळ्या रंगाने तर संत्याच लाल रंगाने ! त्या शरीरांवर चमकणा-या प्रकाशासरशी एक अद्भूत,अविश्वासनीय प्रकार घडु लागला.महाराजांची वय झालेली त्वचा जवान होऊ लागली , रघुबाबांची टक्कल भरुन आली-त्यावर केस आले -पोटाची वाढलेली ढेरी आत गेली! शरीर अगदी पिळदार अस जवानीत-एन तारुण्यात आल्यासारख झाल.

" अद्भूत! हा काय चमत्कार म्हंणायचा!अद्भूत आहे !" महाराज आश्चर्यकारक होत म्हणाले.

" व्हिई महाराज! आपण त्या जादूच्या गोळी मुळे दोन तासांसाठी तरुण झालो आहोत! म्हंजी ह्या तरुन शरीरांमूळे आपल्याला कोण वळखणार नाही !"

" आआआआआऽऽऽऽऽऽ" अचानक एक आर्तकिंकाळी आली.

महाराज रघुबाबा दोघांनीही त्या आवाजाच्या दिशेने पाहिल.त्याना दिसल की समोर एक साठ सत्तर वर्षाचा म्हातारा आपले हात -पाय तोंड अस क्षणोक्षणी हात लावुन-लावून पाहत आहे.

" अहो रघुबाबा , हे कय केल तुम्ही ? म्हातारा बनवल मले ! माझ अजुन लगीन तरी झालंय का ? हे काय केल तुम्ही ?" अच्छा तर तो संत्या होता तर! ह्याचा अर्थ निळी गोळी तरुण बनवत होती-तर लाल वृद्ध!

" आर ए संत्या! आर काळजी नग करुस सूर्य अस्ताला जाताच ही जादू अपोआप उतरल! तु आता गाडी गावाकड घे पाहु!" रघुबाबा म्हणाले.

संत्याचा रघुबाबांवर पुर्ण विश्वास होता! म्हंणुनच तो काही बोलला नाही!

त्याने गपगुमान मान खाली घालुन गाडी गावच्या दिशेने घेतली.

××××××××

" बापरे हे तर खुप भयानक आहे ! " युवराज्ञी रुपवती मेघाकडे पाहत म्हणाली.मेघावती आपल्या समवेत कालरात्री काय भयाण घडल होत हे पुन्हा एकदा महाराणी-युवराज्ञी दोघांनीही सांगितल होत.

"होय! आणी लवकरात ह्यावर योग्य तो उपाय ही करायला हवा!"

महाराणींनी मेघावती-युवराज्ञी रुपवतीकडे पाहील व म्हणाल्या.

××××××××

महालाबाहेर बागेत युवराज उभे होते. त्यांच्या पुढ्यात एक इंग्रज उभा होता.त्याच्या अंगावरच्या कपड्यावरुन तरी हेच वाटत होत..

" ही माहीती आहे ,त्या सैतानाला कस रोकता येइल !"

तो इंग्रज म्हणाला. त्याने एक जुनाट कागद युवराजांकडे सोपावला.मग युवराजांनी त्याला एक मोहरांनी भरलेली लाल रंगाची कापडी पिशवी दिली....तसा तो काम झाल्यासारखा निघून गेला.

×××××××××

गावच्या वेशीबाहेर गाडी थांबवुन,महाराज,रघुबाबा,संत्या तिघेही गावात शिरले.त्या तिघांच्याही आजुबाजुला गावातली घर दिसत होती-एन वक्ताला दुपारी ह्या घरांची दार उघडी असायची! पन आज आता ह्याक्षणी , त्या घरांची दार खिडक्या बंद होती! सैतानाचा हाहाकार असा काही माजला होता, की गल्लीबोळ सर्व सामसुम पडल होत.राहाजगड गावच पुर्णत स्मशान झाल होत.म्हातारा संत्या हळू-हळू पाठ वाकवुन चालत,आपली म्हातारी नजर घरांकडे टाकत होता.एक दोन घरांच्या खिडक्या उघड्या दिसायच्या, आणि त्या खिडकीतून पाहणारी लहान-मुल दिसली जायची ,तर कुठे ह्या तिघांना पाहुन धाड-धाड करत उघड्या खिडक्या बंद होत-होत्या.

" रघुबाबा काय हालत झाली आहे ह्यो,गावाची ! " महाराज आजुबाजुला पाहत म्हणाले.

" व्हिई महाराज,त्या सैतानाचा हाहाहाहाहाह माजलाय समदी कड ! ज्या -ज्या मांणसांना त्यान मारलय,त्यांच्या अंतान गाव घाबरुन सुटलय!"

" बाबा !" संत्याची हाक आली,रघुबाबांनी मागे वळुन पाहिल.

" काय र?" संत्याने डावीकडे हात केला.रघुबाबांनी त्या बाजुला पाहिल.

एक बाई घरांबाजुनी आजुबाजुला पाहत आवाज देत पुढे-पुढे येत होती.

" ओ धनी ! ओ धनी.!"

" काय ग ,कुठ हाई तुझ धनी ? आण नाव काय त्याच,कसा दिसतो तो ?.महाराजांनी त्या बाईला प्रश्ण केला.त्या बाईने महाराजांना ओळखला नाही!

" अहो , गज्या नाव हाई त्यांच ! शरीरयष्टीन पैलवान सारख दिसतात ! इथ जंगलात गेलते आठवडाभरा अगूदर, पन आजून आल नाहीत!"

" महाराज !" रघुबाबा मध्येच म्हणाले.

" जी बाबा!"

" तुमचा गळ्यातला तो हार द्या इकड!" रघुबाबांच्या वाकयासरशी महाराजांनी कसलाही विचार न करता गळ्यात असलेल्या अलंकारामधला एक हार काढुन बाबांकडे सोपवला.

रघुबाबांनी तो हार आपल्या हाती घेऊन,त्या स्त्रीकडे दिला मग हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवला, आपले डोळे बंद केले! तोंडावाटे काहीतरी पुटपुटले मग डोळे उघडले व म्हणाले.

" ह्यो हार , सोनारकड विक? पोरांकड लक्ष दे?तुझ्या नव-याची वाट बघु नको! जा आता?" रघुबाबांच्या शेवटच्या वाक्यावर ती स्त्री एका यंत्रमानवा प्रमाणे हळवुन आल्या पावले मागे निघुन गेली.

" बाबा, त्या स्त्रीला तुम्ही त्यो हार का दिला ? आण अस का म्हंटल की तुझ्या नव-याची वाट बघु नको!"

" संत्या, महाराज ! जंगलात जो गज्या रुपी सैतान आपल्यास्नी भेटला व्हता! आण ज्याच अंत यार्वशीन केल! त्योच हीचा धनी व्हता!"

रघुबाबा निराशजनकपणे म्हणाले.

" अर बापरे अस हाई काऊ!" संत्या.

" बर जाऊद्या जे झाल ते झाल. आता पुढ चला!"

रघुबाबांच्या ह्या वाक्यावर ते तिघेही चालत थोडे पुढे आले!

आता समोर नाग्याच घर दिसत होत! घराभोवती बाहेर पायरीवर चार पाच मांणस बसलेली.त्या मांणसांच्या चेह-यावर शोकग्रस्त भाव उमटलेले

जणु त्या घरातल कोणि मेल असाव !

" चला महाराज !" रघुबाबा म्हणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर महाराज,संत्या दोघेही त्यांच्या मागोमाग त्या घराजवळ आले !

" काय रे भाऊ ? अस तोंड पाडुन काहुन बसु राहिले तुम्ही ?"

म्हाता-याच वेष केलेला संत्या पुढे बसलेल्या त्या मांणसांना म्हणाला.

" आर काय सांगु अज्या!" त्यातलाच एकजण म्हणाला.

" कोण अज्या?" संत्या पटकन म्हणाला.जणू तो हव विसरला असावा की तोच म्हातारा अज्या आहे!

"हुं,हुं,हुं,!" रघुबाबा मुद्दामून खोकले, त्यांनी डोळे मोठे करत संत्याला गप्प राहण्यास सांगितल.

"अहो दादा , म्हाता-या बाबांच सोडा! तुम्ही आम्हाला सांगा काय झालं !" त्या बोलणा-या मांणसाने एक कटाक्ष संत्यावर टाकला व पुढे

बोलु लागला.

" अहो भौ ! गावाला नजर लागले बघा ! सांज व्हताच गावात काय बाय

अभद्र शिरतय बघा ! "

" सैतान , सैतान शिरतोय " त्या पहिल्या मांणसाच अर्ध वाक्य पुर्ण होण्या अगोदरच दुसरा इसम म्हणाला.

" सैतान शिरतोय गावात , अंधारात शिकार करतय ! काय त्याच रुप..

न काया ! कधी कुत्र्याच,तर कधी काळ्या सावलीच रुप घेतय, तर कधी बाहुल्याच रुप घेतय ! छाताडावर बसुन दात विचकत हसत मारतय !"

" आं,आं,आं,आं!" तो माणुस पुढे काही बोलणार होताच की आतुन

नाग्याच्या आईचा रडण्याचा आवाज आला.आवाज आला तसा महाराज रघुबाबा, संत्या तिघांनीही घरात डोकाऊन पाहिल.

आत मृत नाग्याची आई जमिनिवर बसलेली -तिच्या आजुबाजुला चार बायका होत्या,ज्या तिला धीर देत असाव्यात.

"एकदाच माझ्या पोरास्नी घेऊन गेल त्यो सैतान ! बाहुल्याच सोंग घेऊन आलता आकारमाश्या !" नाग्याच्या आईने हाताची बोट मोडली" माझ्या पोराच छाताडातल काळिज खावुन पळाला मेला ! दात विचकुन पळाला मेला , आकारमाश्या!" नाग्याच्या आईने तोंडातले दोन दात ओठांत चावत पुन्हा बोट मोडली.इकडे रघुबाबा एकटक हे सर्व ऐकून बाजुला आले ! त्यांना अस बाजुला येता पाहुन महाराज,संत्या ही आले.

एन आकाशातला सूर्य अस्ताला जायला सुरुवात झाली होती. आकाशातुन ऊडत पाखरे घरी निघाली होती.

" बाबा काय झाल?" महाराज म्हणाले.

" ज्याची भीती व्हती तेच झालय महाराज !"

" कसली भीती आणि काय झालंय?" महाराजांच्या ह्या वाक्यावर बाबांनी हलकेच वर आकाशात पाहिल.

" ती आलीये..! व्हिई तीच आलीये!" रघुबाबा गुढपने म्हणाले.

" कोण...!कोण आलीये!" रघुबाबा दोन पावले चालत पुढे गेले.

त्यांच्या पाठमो-या आकृतीकडे महाराज व संत्या एकटक पाहत होते.

की तेवढ्यात बाबा म्हणाले.

" म..म..म....मयाविनी!"

 

सरता वाट प्रकाशाची!

आरंभ होई..खाई..अंधाराची

मृत्यु थरथरे ज्या हाती...

नाव तिचे मायावती..!

 

क्रमश :

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED