रक्त पिशाच्छ - भाग 28 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

  • गोळ्याचे सांबार

    🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिच...

श्रेणी
शेयर करा

रक्त पिशाच्छ - भाग 28

॥रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 28

 

आकाश...त्या आकाशातले ढग सर्वकाही लाल रंगाचे दिसुन येत आहेत. जणु त्या आकाशात, ढगांच्यात रक्तनी रक्त भरल आहे.जर कधी त्या ढगांमधुन पाण्याचा वर्षाव झाला, तर ढगांमधुन पाणि नाहीच तर रक्त पडेल रक्त! तो गोलाकार चंद्रही रक्तासारखा लाल भडक दिसत आहे आणि त्या गोलाकारा चंद्रा बाजुलाच........................

एका उंचकड्यावरती तो भव्य -दिव्य रक्तांचल महाल दिसत आहे. मोठ-मोठाल्या काळसर दगडी चुन्यांच्या बांधकामाने उभारलेला भक्कम असा सैतानाचा महाल.

महालाच्या पुढच्या भिंतींवर असंख्य काचेच्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यांमधुन मेंनबत्त्यांचा पेटलेला प्रकाश दिसत आहे.महालाच्या ठिक मधोमध एक बाराफुट उंचीचा दोन झापांचा चौकलेटी रंगाचा लाकडी दरवाजा आहे. दरवाज्याच्या दोन्ही डावी-उजवीकडे दोन मशाली घेऊन उभे असलेले काले कपडे घातलेले सैतानाचे समर्थक आहेत.त्या काळ्या कपड्याला लागुनच , एक त्रिकोणी टोपी त्या सैतानी समर्थकांच्या डोक्यावर घातलेली आहे ज्याने त्यांचे ओठ नाक सोडून चेहरा दिसत नाही आहे.एका सैतानी समर्थका बाजुलाच एक काचेची खिडकी आहे,ज्या काचेच्या खिडकीतुन आतल दृश्य दिसत आहे जे की पुढीलप्रमाणे.

रक्तांचल महालाच्या प्रथम हॉलमध्ये डाव्या ,उजव्या दोन्ही बाजुला भिंतींजवल स्टेंन्डसवर खुप सा-या लाल रंगाच्या मेंनबत्त्या पेटल्या आहेत ! त्यांचा प्रकाश पुर्णत हॉल उजळून सोडत आहे. त्या मेंनबत्त्यां मधोमध एक मोठा चौरसकारातला शाही राजे महाराजे वापरावा तसा लाकडी डायनिंग टेबल दिसत आहे. आणि टेबलावर फक्त नी फक्त मांसाहारी रेसिपीज दिसत होत्या,एका मोठ्या थालीत दहा बारा तंदूरी,पूर्णत ड़ायनिंग टेबलवर अशाकाही मांडलेल्या की प्रत्येकाच्या पुढ्यात एक तंदुरी असेल.कुठे लॉलीपॉप ठेवलेले, तर कुठे मटनाचा रस्सा! मांसाहारी सूप,तर कुठे एका बोकडाची जिभ बाहेर आलेली, डोळे सताड उघडे असलेली तळलेली मुंडी दिसत होती. डायनिंग टेबलाच्या डाव्याबाजुला सावकार, यार्वशी प्रधान, आणि उजव्या बाजुला ढमाबाई,लंक्या बसले होते.संत्याचा अद्याप पत्ता नव्हता. डायनिंग टेबलावरच्या मधोमध असलेल्या खुर्चीवर पांढ-याफट्ट चेह-याचा-काळे केस मागे डोक्यावर चोपुन बसवलेला पिशाच्च राज द्रोहकाल बसलेला, त्याच्या खुर्चीबाजुला दोन्हीतर्फे दोन खुर्च्या होत्या,एका खुर्चीवर शलाका बसलेली तर दुस-या रिना.दोघीही द्रोहकालच्या अर्धांगीनी होत्या. इकडे ढमाबाई हवरटल्यासारख्या

पुढ्यात असलेल्या व्यंजनांवर लाल गालत त्यांचा फडशा पाडण्यासाठी शिका-यासारख्या लक्ष देऊन बसलेल्या...मनात एकच विचार येत होता..कधी एकदाच गचळायला मिळतय!

" घ्या सावकार , दावतचा पुरेपुर आनंद घ्या !..सुरु करा?"

द्रोहकालचा घोगरा आवाज घुमला.

" परंतु देवा! आपण!"

" नाही ! मी हे अस खात नाही ! मला फक्त ताज रक्त आणि ताज मांस आवडत! घ्या. तुम्ही सुरु करा !"

द्रोहकालच्या आज्ञेसरशी ढमाबाईंनी आपल्या पुढ्यात असलेल्या त्या बोकडाच्या मुंडीला दोन्ही हातात गचकन पकडल-आणि कचकन त्याच्या मुका घेऊन तिथल मांस बका-बका तोंडात कोंबू लागली..

जणु वर्षभराची भुकेली असावी! तसही तिच्याकडे कोणाच लक्षही नव्हत. थोड्यावेळाने एक काली मेक्सि घातलेला व त्या मेक्सीला जोडुन एक त्रिकोणी टोपी असलेला-माणुस डायनिंग टेबलच्या दिशेने चालत येऊ लागला. त्याच्या हातात एक गोळ सोनेरी थाली होती, त्या थालीवर

एक काचेचा मोठा जग -तीन काचेचे ग्लास होते. त्या पारदर्शक जगात

लालसर रंगाच रक्त पुर्णत भरुन ठेवलेल दिसत होत.तो माणुस द्रोहकाल जवळ आला. त्याने तीन ग्लास -एक शलाका पुढे दुसरे, द्रोहकाल-तीसरा

रिना पुढे ठेवला.मग ती जग असलेली थाली हळुच डायनिंग टेबलावर

ठेवुन,मग हळूच हाताने तो जग उचल्ला, मग तो जग हळुच वाकवून

त्यातल रक्त त्या ग्लासात ओतल.अशाचप्रकारे त्या माणसाने तिन्ही ग्लास भरली व थाळी घेऊन निघुन गेला. द्रोहकाने तो रक्ताचा ग्लास हळूच उचल्ला,मग नाकाने त्या रक्ताचा वास घेऊन त्याच्या आसुरी हास्य उमटलेल्या ओठांवर टेकवुन एक घोट घेतला.शलाका रिना दोघींनीही मग तेच केल. लंक्या आपल्या बाहिणीत झालेल हे विलक्षण अस बदल

उभ्या डोळ्यांनी फक्त पाहत होता बस्स ! तसंही त्याच्या हाती पाहण्या वाचुन काहीही नव्हत. काहीवेळाने सर्वांच जेवण आटोपल गेल.मग दहा-बारा सैतानी समर्थक येऊन राहिलेल जेवन परत घेऊन जाऊ लागले.त्या सर्वांच्या पाच सहा फे-या मारताच पुर्णत डायनिंग टेबल रिकामा झाला.

" मालक , आता तुम्ही सांगा ! की आम्हा सर्वांना इथ कशापाई बोलावल हाई!" रामु सावकार द्रोहकालकडे पाहत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर द्रोहकालच्या चेह-यावर गंभीर भाव पसरले , तो आपल्या खुर्चीतुन हळुच पुढे आला.त्याने आपल्या लाल डोळ्यांनी एक कटाक्ष सर्वांवर टाकला.व म्हणाला.

" तुम्हा सर्वांना राहजगड माहीती असेलच ?" द्रोहकालच्या वाक्यावर सर्वांनी फक्त होकारार्थी मान हलवली.

" आणि राहाजगडची युवराज्ञी रुपवती सुद्धा !" द्रोहकालच्या ह्या वाक्यार त्याच्या ओठांवर पुन्हा ते कुत्सिक हसु आल.

" पन, मालक तुम्हाला नक्की काय म्हंनायचय ! काय कळना !"

रामु सावकार न समजुन बोलला.त्याच्या ह्या वाक्यावर द्रोहकाल हळुच आपल्या जागेवरुन उठला.रिना -शलाका मात्र आपल्या जागेवरच बसल्या होत्या. द्रोहकालने हळुच आपल्या कोटच्या आत हात घातला..

मग लगेच बाहेर ही काढला! परंतु आता ह्याक्षणी त्या हातात एक ब्रश होता.दंडगोल पेंन्सील पेक्षा थोडा जाड काळ्या रंगाचा, आणि त्याची पुढील टोक लाल रंगाची होती.आणि वरच्या टोकाला एक सोनेरी रंगाचा पंख होता.अगदी कोणाच्याही नजरेस भरेल असा हा ब्रश होता-त्याची खासियत अशी ही होती. की हा ब्रश साधासुधा नसुन जादूई होता.

द्रोहकालने त्या ब्रशला हळकेच हवेत नेल! आणि एक गुणाकार आकाराची खून केली.तसा त्या ब्रशच्या पुढील टोकातून अगदी सोनेरी रंगाच्या दोन रेशा हवेत बनल्या गेल्या.आणि त्या गुणाकार आकारावर एक पांढरट पडदा उघडला..त्या पडद्यावर द्रोहकालच दोनशे वर्षां अगोदर पाद-यांसोबत झालेल युद्ध,त्यात मरण पावलेली मेनका..

मग शंभर वर्षान नंतर वयगुने त्याला दिलेल पुन्नर जीवन , भुरुने सांगितलेला उपाय इथपर्यंत सर्वच्या सर्व त्या पडद्यावर दिसल...मग तो पडदा हवेतच जादूई शक्तिमार्फत गायब झाला.

××××××××

राहाजगड महालाच्या प्रवेश्द्वाराबाहेर ! दोन सैनिक हातात भाला घेऊन उभे होते. दोघांच्याही बाजुला एक-एक असेल मिळुन दोन कंदील जळत ठेवलेले. आणि मागचा तो मोठा दोन झापांचा दार आतुन बंद होता.

वर आकाशात काळ्या ढगांनी चंद्राचा प्रकाश पृथ्विवर पडण्यापासुन रोखुन धरला होता. ज्याने पुढे सर्वकाही अंधारलेल दिसत होत.

तरीसुद्धा आकाशात जर कधी विज कडाडलीच तर पुढचा परिसर

सकाळ असल्यासारखा उजळून निघत होता.एका सैनिकाने हळुच

आपल्या कमरेला लावलेली एक लाल पिशवी उपसुन काढली.पिशवीची दोरी खोलून त्यातुन थोडी तंबाखू हातावर ठेवली , मग ती पिशवी पुन्हा दोरीबंद करुन कमरेला लावुन, तंबाखू मळू लागला.

" जाम पाऊस येणारे वाटत गड्या!" हातात तंबाखू मळत तो सैनिक पुढे

विजेच्या प्रकाशात उजळलेला परिसर पाहुन म्हणाला.

" पाहिजेल का?" तंबाखू मळुन झाल्यावर दोन बोटांत पकडत तो सैनिक म्हणाला.तसा दुस-याने आधीच तोंड भरुन मावा खाल्ला होता त्याने फक्त नको म्हंणून मान हलवली. मग त्या सैनिकाने हळुच हातात राहिलेला तंबाखुचा थोडासा कचरा खाली टाकून दिला-तंबाखू हातात असलेल बोट तोंडाच्या दिशेने नेल, आणि तंबाखू तोंडात कोंबणार की तेवढ्यात त्याला जोर-जोरात घंटी वाजण्याचा आवाज ऐकु येऊ लागला.

त्या सैनिकाने तंबाखू हातात असलेला पंजा तसाच तोंडाजवळ ठेवला..

आणी पुढे अंधारात घंटीचा आवाज कुठून येत आहे हे पाहू लागला.परंतु निट काही दिसत नव्हत, म्हंणुन त्या सैनिकाने आपले डोळे थोडे छोठे केले..ज्याने अंधारातल दिसुन येईल..घंटीचा आवाज आता अगदी जवळ-जवळ येऊ लागला होता..आणि आता तर त्या घंटीसहित..

जमिनिवर जोर-जोरात पाय आपटल्यासारखा पावलांचा आवाज ही येऊ लागलेला..! त्या दुस-या सैनिकाने हळुच तोंडातला मावा बाजुला थुंकला

व म्हणाला.

" अर ए बाबा कसला आवाज येतय ? "

त्या दुस-या सैनिकाच्या वाक्यावर त्या पहिल्या सैनिकाने फक्त खांदे उडवत नाही असा इशारा केला , मान वळवत दोघांनीही एकाचवेळेस पुढे पाहील. की तेवढ्यात आकाशात एक वीज कडाडली..विजेच्या त्या चंदेरी प्रकाशात समंद राहाजगड महालासमोरची बाग, झाडे सर्वकाही ऊजळून निघाला, आणि त्या सैनिकांना त्या काहीसेकंदाच्या अवधीत एक पांढ-या रंगाचा, धार-धार लाल शिंगांचा बैल अगदी वेगाने चिखल,माती हवेत उडवत आपल्याच दिशेने येताना दिसला.त्या बैलाला

पाहुन त्या दोघांचीही पाचावर धारण बसली,कोणत्याही क्षणी तो बैल

ह्या दोघांना धडक देणार की दोघांनीही आप-आपल्या शरीराची वेगाने हालचाल केली. एका सैनिकाने डावीकडे तर दुस-याने उजवीकडे झेप घेतली..इकडून त्या बैलाने प्रथम पायरीच्या पहिल्या पायरीवर पाय ठेऊन एका घोड्यासारखी हवेत उडी घेतली. अगदी स्लोमोशनने तो बैल त्या दोन सैनिकांच्या डाव्या-उजव्या दिशेने पडणा-या देहांबाजुंनी पुढे जात ! महालाच्या दारावर आदळला. आदळला म्हंणन्या पेक्षा एक शक्तिशाली धडकच बसली अस म्हंणन केव्हा ही चांगल.

त्या धडकेने पुढ़च्याक्षणाला महालाचा दरवाजा धाड आवाज करत चिरफाल्या उडवत , तुटला.

×××××××××

" अच्छा , म्हंणजे रुपवती हीचऽऽऽ!" रामु सवकार पुढ़ काही बोलणार की तेवढ्यात, रक्तांचल महालात एक घुबड आपले पंख फडफडवत हवेतुन उडत येत , हळूच द्रोहकालच्या खांद्यावर येऊन बसली.

द्रोहकालने एक तिरकस थंड नजर त्या काळ्या घुबडावर टाकली.

काहीवेळ तो एकटक तसाच त्या घुबडाकडे पाहत राहीला, परंतु त्या वेळेत त्याच्या ओठांवर असलेल हसु नाहीस झाल गेल, चेह-यावर गंभीर भाव पसरले.

" हम्म ठीके! जा आता तु!" द्रोहकालने त्या घुबडाच्या काळ्या केसांवर हळुच हात फिरवला! पंख फडफडवत घुबड उडून गेल.

" रामु, आज तुझ्या वाड्यात कोणाच बळी दिलस?" द्रोहकाल पाठमोरा वळाला. त्याच्या ह्या वाक्यावर रामु म्हणाला.

" जी मालक एक माणुस म्हाद्या नाव व्हत त्याच! आण दुसरी त्याची पोर !"

"मारलीत का तिला? मेली का ती ?"

" नाही मालक ! तिला यार्वशींनी इहिरीत फेकली, आतापर्यंत मेली बी अशणार बघा! " द्रोहकालने वळून पुढे पाहील.

" अशणार?" ह्या वाक्यावर द्रोहकालने स्वर उंचावला.

" तू पाहिलस तिच मृत शरीर? की ती मेली आहे ते ?" द्रोहकालने हळुच एक भुवई उंचावली.

" पन मालक! त्या एवढ्याश्या छोकरीच काय येवढ!"

" एवढीशी छोकरी! " द्रोहकालचा स्वर पुर्णत महालात घुमला.

त्या आवाजात काय जरब होती, हे शब्दांत वर्णन करणे नाही!

रामुची मान खाली झुकली.

" अरे मूर्खा ! ती एवढीशी मुलगी विहीरीतुन बाहेर पड़लीये केव्हाचीच!

आणी आताला तिने तुम्हा सर्वांच सैतानी समर्थक असल्याच गुपित दारासिंहला सांगितलही असेल !" द्रोहकाल पटकन म्हणाला.

त्याच्या ह्या वाक्यावर रामु सावकार,ढमाबाई, यार्वशी, लंक्या सर्वांना एक धक्का बसला ! सर्वांचे डोळे विस्फारले.

" काय ? पन हे कस शक्य हाई ! वाड्याच आणि इहिरीच दार आतुन बाहेरुन बंद है ! आणि आम्ही समदी तर!" रामुने अस म्हंणतच मागे पाहिल.ढमाबाई, यार्वशी, लंक्या तिघे होते.

" संत्या..? संत्या..कुठे हाई मालकीण बाई?"

" मेला तो !" मध्येच द्रोहकाल आपल्या ओठांवर हास्य आणत म्हणाला.

त्याच्या ह्या वाक्यावर तो खुद्द , रिना, शलाका ही तिघ सोडुन सर्वांना दुसरा धक्का बसला.

" विश्वास नसेल तर पाहून या ! विहीरीत प्रेत पडलय त्याच!" ओठांवर कुत्सिक हास्य करत द्रोहकाल म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर रामु, यार्वशी, लंक्या,ढमाबाई सर्वांनी एकापाठोपाठ रक्तांचल महालातुन काढता पाय घेतला.!

×××××××××××

नेहमीप्रमाणे महाराज आजही आपल्या विश्रामखोलीत खिडकीत उभे राहिलेले, मागे पलंगावर महाराणी डोळे बंद करुन झोपलेल्या. महाराज एकटक खिडकीबाहेर पाहत बसलेले त्यांच्या नजरेस बाहेर आकाशात ढगांवर काळी काजळी पसरलेली दिसत होती.भुतासारखी दात काढत हवा अशी काही बेफानपणे वाहत सुटलेली , की राझगड वासियांनी आपल्या घराबाहेर

भिंतीवर अडकवलेली ती मशाल , दिवट्या नागमोडी पांढरट दुर सोडत

विझुन गेलेल्या. ज्या कारणाने महाराजांना त्यांच्या खिडकीतून आता राझगड गाव अंधारात बुडालेल दिसत होत. हो तसं म्हंणायला काळ्या ढगांमध्ये कधी-कधी विजा कडाडत होत्या.विज कडाडताच पुर्णत राहाजगडची घर चंद्रेरी रंगात माखली जात महाराजांना काहीसेकंदासाठी दिसुन येत होती.एका भग्नपडलेल्या सांगाड्या सारखी जणु त्यात जिवच नसावा.वातावरण असकाही दुषीत झालेल, की मनावर मलभ पसरला गेलेला.सर्वकाही जणु आता शेवटच्या ट्प्प्यात

येऊन ठेपल आहे अस महाराजांना वाटू लागलेल! तो सैतान राझगड मध्ये येऊन सर्वकाही उद्धवस्त करेल, मृत्युचा तांडव घालेल, थैमान माजेल चौहीदिशेना भीतीचा, सर्वकाही आता संपल असल्यासारख महाराजांना वाटू लागलेल! निराशा, उदासिन, हताश चेह-याने त्यांनी आपल्या मागे खिडकी ओढुन घेतली...व हळुच पलंगाच्या दिशेने जाऊ लागले.

××××××××

रुपवती आपल्या खोलीत पलंगावर पहुड़ली होती. लहानपणा पासुन ते मोठहोई पर्यंत कधीच महाराज तिच्यावर रागावले नव्हते,! ज्याप्रकारे मानवाचा देवाचा आशिर्वाद घेतल्यावर आणि , पूजज्याकेल्या शिवाय दिवस पुढे जात नसतो! तसंच यु.ज्ञी:रुपवतीच होत.आपल्या पित्याच्या पावलांच दर्शन घेतल्याशिवाय तिचा दिवस सुरु होत नव्हता.परंतु आज पहिल्यांदाच असं झाल होत-की तिच्या वडिलांच्या पावलांच दर्शन तिला घ्यायला मिळाल नव्हत.गेल्या रात्री जे काही घडल-महाराजांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडलेले.

"एकवेळ युवराजांवर आमचा जितका विश्वास नाही तेवढा तुमच्यावर होता..पन आज तो विश्वास तुम्ही तोडलात त्या विश्वासाला तडे जाण्यास भाग पाडलत आणि ही गोष्ट आम्हाला खुप लागली आहे" महाराजांच हे वाक्य तिच्या कानांत क्षणा-क्षणाला रिपिट होत पडत होत.

ज्याने तिला आतोनात वेदना होत होत्या.

 

×××××××××

युवराज सुरजसेन यांच्या खोलीत :

मेघावती पलंगाला मागे टेकुन बसलेली आणि युवराज तिला औषध पाजत होते. तिची तब्येत आता सुधरायला सुरुवात झाली होती.

ब-यांपैकी तरी..नक्कीच!

×××××××××

रघुबाबा आपल्या खोलीत खाली फरशीवर मांडी घालुन बसलेले.खोलीतल्या दार खिडक्यांना त्यांनी ओढुन घेतलेल.आणि समोर एकुण दहा मेंनबत्त्या पेटवुन ठेवलेल्या. डोळे बंद करुन ते

शांतपने बसले होते. पुर्णत महालात एक विलक्षण शांतता पसरली गेलेली, बाहेरुन रातकीड्यांचा आवाजही येत नव्हता. परंतु अचानक त्याच शांततेला तोडत , भग्ण पावत एक मोठा आवाज झाला.काहीतरी जमिनिवर महालात पडल्याचा ! त्या निर्जीव शांततेत तो आवाज संमंद महालात घुमला!

इकडे ध्यानास्थ बसलेल्या रघुबाबांनी खाडकन आपले डोळे उघडले.

××××××××

पलंगाच्या दिशेने झोपण्यासाठी जाणा-या महाराजांनीही तो आवाज ऐकला! ते जागेवरच थांबले,पलंगावर झोपलेल्या महाराणींनी सुद्धा दचकुन डोळे उघडले.

×××××××××

रुपवतीही पलंगावरशी उठली !.

 

×××××××××

" युवराज, कसला आवाज झाला ? आणि तो ही इतका मोठा " मेघाने

युवराजांना विचारले.परंतु त्यांच्याकडे उत्तर नसल्याने ते गप्पच राहिले.

" तु थांब ! आम्ही पाहुन आलो !" युवराज अस म्हंणतच खोलीतुन बाहेर आले. बाहेर येताच त्यांच्या नजरेस महाराज-महाराणी, मग शेवटला युवराज्ञी येताना दिसली.

" काय झाल ? कसला आवाज झाला ?" महाराणी म्हंणाल्या.परंतु कोणालाच काही माहीती नव्हत ! की तितक्यात एक नौकर जिन्यावरुन धावतच वर आला.

" महाराज! एक बैल महालाचा दार तोडून आत आलाय बघा, आण त्या बैलावर बसुन एक पोर बी आत आलिया , पन ती बेशुध्द हाई !"

" काय ?" महाराज इतके म्हंणतच सर्वांना मागे सोडून खाली हॉलच्या दिशेने जायला निघाले-निघुन गेले ही. महाराजां पाठोपाठ, महाराणी युवराज, युवराज्ञी रुपवतीही निघुन गेली.

खाली हॉलमध्ये महालाच दोन झापांच दार तुटुन अस्तव्यस्तपणे पडल होत. बाजुलाच एक पांढ-या रंगाचा, टपो-या पाणीदार डोळ्यांचा, लाल शिंगांचा बैल उभा होता.आणि त्या बैला मागे भिंतीला पाठ टेकवुन अर्ध डोळ्यांनी शेवटचे श्वास घेणारी - चिंकी पाय पसरुन बसलेली. त्या बैला पुढे सात-आठ सैनिक भाला घेऊन त्याला दूर हकलण्याचा प्रयत्न करत होते.त्यांच्या मते तो बेल घातक-हानिकारक होता त्यानेच त्या चिंकीला हानि पोहचवली होती. मानवाची दृष्टि नेहमीचंच धुळ खात आली आहे त्याचाच हा नमुना समजा ! ज्याच कराव भल तोच म्हंणतो माझ खर.!

" सैनिकांनो! ह्या पिसाळलेल्या प्राण्याला बाहेर काढा!" महाराजांचा आवाज आला.त्यांच्या मागुन युवराज-युवराज्ञी , महाराण पोहचल्या, पुढच दृष्य पाहू लागल्या. यु:ज्ञी रुपवतीची नजर हलुच चिंकीवर पडली - चिंकीच्या चेह-यावर अशक्तपणाचे भाव पसरलेले, चेह-यावर जागो-जागी जखला झालेल्या त्यातुन रक्त बाहेर पडला जात चेहरा रक्ताने माखला होता, त्याच अवस्थेत चिंकीने हळूच आपला एक थर-थरता हात हवेत उंचावला, हाताच्या बोटांची विशिष्ट प्रकारे हालचाल करत! यु:ज्ञी.रुपवतीला आपल्या दिशेने बोलावु लागली.महाराजांच्या हुकमासरशी सैनिकांनी बैलावर हाती असलेले भाले मारण्यासाठी मागे घेतले व त्या मुक्या जनावरावर वार करणार की तेवढ्यात एक आवाज आला.

" थांबा ! " वरच्या मजल्यावरुन, रघुबाबांचा मोठा आवाज आला.

त्या आवाजासरशी सैनिकांनी महाराजांकडे पाहील, महाराजांनीही मग नजरेनेच इशारा करत सैनिकांना थांबण्याचा इशारा केला.

रघुबाबा जिन्याची एक-एक पायरी उतरत खाली येऊ लागले,

चिंकीच्या अवस्थेवर रुपवतीला तिची दया आली! ती चिंकीच्या दिशेने जायला निघाली.तो बैल चिंकीच्या मधोमध एका भिंतीसारखा उभ राहीला होता! ज्या भिंतीला पार करुन यु.ज्ञी:रुपवतीला चिंकीपाशी पोहचायच होत.रुपवती सैनिकांना मागे सोडत थेट त्या बैलाजवळ आली.

"यु:ज्ञी. रुपवती काय करत आहात तुम्ही? तो प्राणि तुम्हाला हानि पोहचवेल! माघारी या?" महाराणी चिंतेच्या स्वरात ओरडून म्हणाल्या.

" रुपा ! काय करत आहेस तु मागे ये पाहू?" युवराज सूरजसेन म्हणाले.

" थांबा तुम्ही सर्व ! आपण जे पाहत आहोत तस मुळीच नाही आहे !"

युवराज्ञीने अस म्हंणतच त्या बैलासमोर हात जोडले.

" हे नंदीदेवा, कृपया मला त्या मुलीची भेट घेऊ द्या! मी त्या मुलीला ओळखते ! माझ नाव रुपवती आहे !"

रुपवतीच्या वाक्यावर त्या बैलाने रुपवतीची ओढणी आपल्या तोंडात धरली व तिला हलकेच ओढत चिंकीच्या दिशेने घेऊन जाऊ लागला.

चिंकीपाशी गेल्यावर त्याने ती ओढणी सोडून दिली.महाराज, महाराणी, युवराज , सर्वजन हा अकलनिय दृष्य पाहून आश्चर्यचकीत झाले.

फक्त रघुबाबा मंदस्मित हास्य करत हसले बस्स.

" पाणी आणा कोणीतरी!" युवराज्ञींच्या वाक्यावर बाजुला उभा असलेला एक नोकर पाणि आणायला निघुन गेला.

" चिंगी बाळ! काय झालं तुला! आणि तुझी ही अवस्था कोणी केली? तुझे आई -वडिल कोठे आहेत?"

" र..र..रुपाताई!" चिंकीच्या गळ्यातुन एक-एक शब्द मोठ्या कष्टाने उपहासाने बाहेर पडला जात होता.

" हं बोल ना !" यु:ज्ञी.रुपवती चिंकीच्या डोळ्यांत पाहत म्हणाली.

एवढीशी पोर ती काय हाल झाले होते तिचे ! हसत खेळण्या बागडण्याच्या वयात काय हाल झाले होते तिचे.जे पाहुन यु:ज्ञी रुपवतीच्या डोळ्यांतुन नकळत एक अश्रु बाहेर आला.मनातल्या भावना इथे श्बदांत मांडण्या पल्याड होत्या नाहीतरी मी लेखक म्हंणुन उतरवल्या असत्याच.

" म.म....माझ्या..आ..आ.आई बबाला मारल! "

" काय? को..को.कोणि मारल तुझ्या आई वडिलांना?"

रुपवतीच्या ह्या वाक्यावर हॉलमध्ये असलेल्या सर्वांचे डोळे विस्फारले,

एक विलक्षण धक्का बसला सर्वांना. जो तो सैनिक बाजूला उभ्या असलेल्या दुस-या सैनिकाकडे पाहुन कुजबूजा लागला.

" श..श..शला.शला....दिदि" चिंकीचा स्वर खालावला, आवाज अगदी सूक्ष्म ,आणि कमी ऐकु येऊ लागला.ज्या कारणाने रुपवतीने हळुच आपला कान तिच्या ओठांपाशी नेला.

" श,..शा शालू दीने मारल ! ती..ती.वाईट झालीये." लहानग्या चिंकीने अस म्हंणतच सकाळपासुन ते संत्याच्या अंतापर्यंतच सर्वकाही घटनाक्रम तोडक्या मोडक्या शब्दांत रुपवतीला कळवला..! चिंकीचा एक वाक्य नी वाक्य ऐकताच रुपवयीचे डोळे विस्फारले गेले.ह्दयात धड-धड वाढु लागली.तोंडाचा आ-वासला गेला.

" यु:ज्ञी.पाणि!"तो नोकर पाणि घेऊन आला.त्याच्या आवाजाने रुपवतीची तंद्रीभंग पावली गेली. तिने नोकराकडून आपल्या हातात

तो चंदेरी रंगाचा ग्लास घेतला.चिंकीला पाणि पाजण्यासाठी तिच्या ओठांजवळ घेऊन गेली.

" न..न..नको मला ! रु..रुपा ताई !" इतक्या सर्व वेदना होत असतांना ही चिंकीच्या ओठांवर एक हसु आल. तिने मान वळवुन महालातल्या उघड्या चौकटीत पाहिल"ते बघ दा..दारात उभ राहुन माझी आई नी बा मला बोलावताये! मी..जाते आता, रुपा ताई !" चिंकीच्या तोंडून शेवटच वाक्य निघाल आणि हळकेच तिची मान डोळे बंद होऊन खाली झुकली.

रुपवतीच्या हाती असलेला तो ग्लास हळकेच बाजुलाच आवाज होत खाली पडला.तिच्या डोळ्यांतली बुभळ रक्त उतरल्यासारखी लाल झाली..अगदी क्रोधिंतरुपी महाकाली प्रमाणे. तिने चिंकीच मृत शरीर

दोन्ही हातात उचलून घेतल व हळूच ऊभी राहीली..ऊभी राहताक्षणीच तिच्या गळ्यात असलेला तो लाल-पिवळा दोरा आणि त्यात असलेला तो सुर्यांशी लॉकेट झटकन बाहेर आला.ज्या लॉकेटला पाहुन रघुबाबांच्या भुवया वर जात -डोळे खोबणीतुन बाहेर यावे इतके मोठे झाले.

" सुर्यांशी..! हे भगवान, काय पाहत आहे हे मी ! " नकळत रघुबाबांच्या मुखातुन हे श्बद बाहेर पडले.

 

 

क्रमश :

 

ड्रेक्युला..चाप्टर 1 # अंताची सुरुवात.

...पुढील भागात पाहू ,

महाराज रघुबाबांना समजेल का ? यार्वशी सावकार आहेत

सैतानाचे समर्थक? इतकी वर्ष...