रक्त पिशाच्छ - भाग 30 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रक्त पिशाच्छ - भाग 30

॥रक्त पिशाच्छ ॥18+ भाग 30

 

रक्तांचल महालाच्या भल्यामोठ्ठया प्रथम हॉलमध्ये सैतानाच्या समर्थकांची ! शेकडोने फौज जमली होती.प्रत्येकाच्या हातात, धगधगत्या पेटत्या मशाली , तर कोणाच्या मोठाल्या धार धार पातीच्या तलवारी..तर कोणाकडे भाले होते. त्या समर्थकांपुढे रामु सावकार-वरच अंग संपुर्ण डोक्यापासुन ते कमरे इतक प्रेतांच्या राखेने रंगवल गेलेल! आणि खाली एक काळ धोतर घातलेल,! बाजुलाच ढमाबाई उभ्या होत्या-अगदी विचित्र रुपाच्या , डोक्यावर टक्कल, त्यावर एक सापाचा टेटू, वटारले डोळे..जे की भीतीदायक दिसत होते..ढमाबाईंनी अंगावर तीच कालची हिरव्या रंगाची साडी घातलेली.

ढमाबाईंच्या बाजुला लंक्या उभा होता- त्याच्या हाती दोन धार-धार तलवारी होत्या.-शेवटला यार्वशी उभे होते-त्यांच्या अंगावर एक चिळ्खत चढवलेल होत -ज्यावर सैतानाच्या एका विचित्र मूर्तीच चिन्ह होत..ह्या चार जणांपुढे द्रोहकाल उभा होता-त्याच्या डाव्या उजव्या बाजुला..रिना-शलाका उभ्या होत्या.

" रामु! " द्रोहकालचा घोगरा-आज्ञाधारक आवाज संपुर्णत हॉलमध्ये घुमला..! तशी शांतता पसरली गेली.

" जी मालक !" रामु:

" तुझ्या मागे दोन हजार सैतानी सैनिक उभे आहेत ! ह्या सर्वांच्या रक्तात सैतानी खून आहे! एकवेळ हे मरतील पन हार पत्कारणार नाहीत ! रामु ह्या सर्व सैनिकांच आधिकार मी तुला देत आहे ! ह्या सर्वांमार्फत तुला आज मध्यरात्री राहाजगडवर हल्ला करायचय ! "

" पन मध्यरात्रीच का मालक ? आताच जाऊन एका,एकाचा मूडदा पाडतो की!" रामु सावकार तावातावाने म्हंणाला!

" नाहीऽऽऽऽ" द्रोहकालचा स्वर उंचावला."...आपल्यामुळे आपला शत्रु सावध होईल अशी भुमिका आपल्याला घ्यायची नाहीये! उलट आपन ते सर्व बेसावध असताना मागुन..वार करायच्ंय! "

" जी मालक ! तुम्हाला काय म्हंणायचय ते कळल मला !हिहिही!" खिवचट हसत रामु सावकार म्हणाला.

" पण एक लक्षात ठेवा! राहाजगड गावचा एकनी-एक माणूस, लहान, मुल,बाईका सर्वांची प्रेत अस्तव्यस्तपणे मरुन पडायला हवीत-राहाजगडमध्ये रक्त मांसाचा चिखल पडायला हवा ! आणी हो...

माझ्या मेनकाला काहीही होता कामा नये ,! नाहीतर.!"

" मालक ! तुम्ही काळजी करु नका ! मालकीण बाई अगदी सुखरुप उद्यापर्यंत ह्या महालात तुमच्या जवळ असतील! हा तुमच्या समर्थकाचा पक्का वादा हाई.." रामु सावकाराने आपली मोठ्या गर्वाने बाजु मांडली.

त्याच्या ह्या वाक्यावर मागे उभ्या असलेल्या समर्थकांनी सैतानाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.

" सैतानाचाऽऽऽऽ!विजय असोऽऽऽऽऽऽऽऽ

"सैतानाचाऽऽऽऽ!विजय असोऽऽऽऽऽऽऽऽ"

प्रत्येकाच्या हातातील मशाली,तलवारी वर हवेत नाचु लागल्या..

पुर्णत हॉलमध्ये आवाज घुमु लागले,त्या आवाजांनी हॉलच्या भिंति दणाणून निघाल्या.काचा तड-तड करत थरु-थरु लागल्या.

××××××××××

रात्री राहाजगड महालात दुस-या मजल्यावर रघुबाबांच्या खोलीत समर्थ क्रूणाल आणि रघुबाबा काही गुप्त चर्चा करत बसले होते. खोलीत एक पलंग आणि त्या पलंगाबाजुला दोन फुलदाणी असलेले टेबल होते..आणी पलंगापुढे चार लाकडी खुर्च्या होत्या, त्यातल्याच दोन खुर्च्यांवर रघुबाबा आणी समर्थ क्रूणाल बसलेले. रघुबाबांनी राहाजगड मधल्या एक नी एक प्रसंगाची हकीकत समर्थांना सांगितली होती.जंगलात येण्यापासुन , ते सर्वच्या सर्व! फक्त मायाविनीच सोडुन.

" एक बोलु समर्थ!" रघुबाबा..

" हो बोलाना बाबा! अगदी मनमोकळेपणाने सांगा..काय बोलायचय.. " समर्थांनी होकार दर्शवला.

" मला ना राहून-राहुन काहीतरी वाईट घडणारे. अस वाटतय ! जणु युध्दा पयले जी शांतता असते ना तिच !" रघुबाबांच्या वाक्यावर समर्थांनी होकारार्थी मान हलवली.

" हम्म! मलाही तसंच काहीतरी वाटत आहे! आणि त्याच कारण मला अस वाटत,!" समर्थांनी आपल्या दोन्ही भुवया ताणल्या." की आतापर्यंत सैतानी समर्थक असल्याच जे सत्य रामु आणि यार्वशीने सर्वांपासुन लपवल होत.ते सत्य सर्वांना समजल आहे..आणी आता त्या इतकी वर्ष केलेल्या नाटकाचा त्यांना फायदाच झाला नाही म्हंटल्यावर सावकार..! आता आपली दुसरी चाल चालणार!"

" आणी ती चाल म्हंणजीच रक्तपात!" रघुबाबा पटकन म्हणाले.

" अगदी बरोबर बाबा! आणी ही असली मांणस कधीच पुढुन वार करणार नाहीत! " समर्थांनी अगदी बरोबर ओळखल..

" व्हीई की! त्याचीच तर भिती हाई !" रघुबाबा..

" बाबा मला अस वाटत" समर्थ काही वेळ थांबले व पुढे म्हणाले.

" की महाराजांना सांगुन, सैनिकांना रात्रीचा पहारा अगदी डोळयात तेल घालुन घालावा अस सांगायल हवं! "

" अव..पण ते आत येतील कस ! म्या येशीवर कवच लावलय की!"

रघुबाबांच्या वाक्यावर समर्थ जरासे हसले.ते हसु पाहून रघुबाबा प्रश्नार्थक नजरेने एकटक समर्थांकडे पाहू लागले.

" बाबा! तुम्ही मायाविनी बदल सांगायच विसरलात वाटत मला "

समर्थांच्या ह्या वाक्यावर रघुबाबांच्या चेह-यावर आश्चर्यकारक भाव पसरले जात एक विलक्षण धक्का बसला.

" अरे व्हिई की! अहो ती मायाविनी माहीती हाई का तुम्हास्नी !"

" हो-हो आमच्याच गुहेतुन सुटली ती !" समर्थ रघुबाबा पुढे काही बोलणार तेवढ्यात म्हंणाले.

" काय?" रघुबाबांच्या तोंडाचा आ वासला." प..प..पण कशी? "

समर्थांनी हळुच खाली जमिनीकडे पाहील" आमच्याच एका नीच साथीदाराने ! असीम शक्तिच्या लोभापाई, आम्ही सर्वजन निद्राधीन असतांना! मध्यरात्री तीची सुटका केली! परंतु ते म्हंणतात ना!

वाईटा समवेत वाईटच होत! मायाविनी ची सुटका करताच तिने त्या साथीदाराचाच बळी घेतला आणि पळून गेली! मग सकाळी आम्हा सर्वांना ते दृश कृत्य कळाल ! "

" मग समर्थ भट्टाचार्यांनी तिला पुन्हा पकडायच व्हत की!"

रघुबाबांच्या ह्या वाक्यावर समर्थांनी त्यांच्याकडे पाहील.

" जर समर्थांनी त्यावेळेस समाधी घेतली नसती ना ! तर नक्कीच तीला पुन्हा बंदीस्त करता आल असतं! कारण.." रघुबाबा मान हलवत ऐकत होते की कारण हा शब्द ऐकून ते म्ह्नाले." कारण. म्हंजी?"

" कारण! "समर्थांनी एक मोठा श्वास घेतला व तो सोडत म्हणाले.

" कारण तिला बंदीस्त करण्याच मार्ग! नाही कोणता मंत्र आहे ! नाही कोणती शक्ती! तिला फक्त एक भुल दिली जाते! एका शक्तिची लालसा दिली जाते ज्याने ती मायाविनी स्वत-हा त्या मंतरलेल्या बाटलीत शिरते !"

" काय ! बापरे ! पन अशी कोणती अशीम शक्ति हाई ती?की जिच्या लालसेने ती स्व्त:हा आपली कैद स्वीकारते ?"

" तेच तर ठावूक नाही ना! पन हा ! " समर्थांनी आपले दोन्ही डोळे छोटे केले.

" जर श्रीकाळ देवांन नंतर कोणाला ते सत्य ठावूक असेल !तर तो आहे !" समर्थांनी धीरगंभीर होऊन आपले दोन्ही डोळे मोठे केले व पुढे म्हणाले.

येहूधी "

रघुबाबांनी त्यांच्या ह्या वाक्यावर हा असा इशारा करत मान हलवली.

" पन समर्थ! म्या अस ऐकलय..! की हा येहूधी म्हंजी महा नालायक

राक्षस हाई ! त्याच्या संमद्या शरीरात वाईट, क्रूर, वासना, लोभ,गर्विष्टपणा, ठोसूण-ठोसूण भरला हाई! त्यो तुम्हाला ते सांगल व्हय?" समर्थ पुन्हा हसले..

" बाबा ! समर्थ भट्टाचार्य मला नेहमी सांगायचे! की..ही राक्षस,भुत,पिशाच्च, कितीही ताकदवर असली ना ! तरी बुद्धी वापरुन त्यांना काहीकाळांकरीता आपल्यात ओढुन घेत ! हव ते साध्य केल जाऊ शकत! आणि हीच युक्ती वापरुन त्यांनी जस मायावीनीला भुलवल होत ! तस मी येहूधीला भुलवणार!"

समर्थांच्या ह्या वाक्यावर रघुबाबांनी फक्त मंद स्मित हास्य करत मान हलवली!"

××××××××××

राहाजगडच्या वेशीवरचा सैनिकांचा पहारा अगदी

चोखपणे पार पाडला जात होता!

..कोणत्याही क्षणी वार होईल-शत्रु

कोठुन कसा घात करेल काही सांगता येत नव्हत.

 

" ए पोरांनो ! जाग रहा संमदी ? डोळ्यांत तेळ घालून पहारा द्या! तो पर्यंत म्या जरा महालात जाऊन येतो ! महाराजांनी बोलावल हाई!"

यार्वशी प्रधान गद्दार निघाल्याने आता कोंडूबांने सर्वकाही जबाबदारी निभवायला सुरुवात केली होती ! कोंडूबा सैनिकांना हुकूम सोडून आपल्या घोड्यावर बसला व एक टाच घोड्याला हलकेच मारली तसा तो घोडा थेट राहाजगड महालाच्या दिशेने निघाला!

" काय बी बोल भावा ! पन आपल्या कोंडूबाचे भलेही केस पिकले असतील ! तरी जोश मात्र जवान असल्यावाणी हाई!" एक सैनिक हातात भाला घेऊन दुस-या सैनिकाकडे पाहत म्हणाला.

" व्हिई की! त्यो रांxxचा यार्वशी गद्दार निघाला ना भxxवा ! त्याच्या तर आxxला!" दुस-या सैनिकाने शिव्या शाप देत यार्वशीचा सत्कार केला परतु त्याच्या ह्या वाक्यावर एक आवाज आला.

"ए तिथ कोणतरी हाई र? त्यो बघा काल कपड घातल्यावाणी दिसल मले!" एक सैनिक ओरडला ! त्याच्या ह्या वाक्यावर हे दोघेही तिथे पोहचले त्या दोघांनीही पुढे एक कटाक्ष टाकला..! चंद्राच्या प्रकाशात पन्नास मीटर अंतरावर रघुबाबांच कवचाच्या काठ्या-त्यांना गुंडाळलेला लाल पिवळा दोरा दिसत होता..आणी अजून पुढे वीस मीटर अंतरावर जंगलातली काळी निळी..झाड दिसत होती.

" काय रे? तिथ कोणीच न्हाई हाई! उगीचंच बोंबळू नको! भास झाला असल तूले !" तो सैनिक म्हणाला.तसे त्या तिस-या सैनिकाने डोक खांजल्ल व पुन्हा अंधारात एक कटाक्ष टाकला आता तिथे काहीही नव्हत.मग त्या सैनिकानेही आपल्याला भास झाल असेल अस समजुन

पहारा द्यायला सुरुवात केली.

इकडे त्याच जागेवर जंगलात झाडाझुडपांच्या काळ्या सावलीत रामु सावकार -त्याच्या बाजुला ढमाबाई , लंक्या, यार्वशी असे मिळुन ते सर्वजन उभे होते.

"अजुन किती येळ थांबायच! एक-एकाला तुडवायला घेऊयात की!"

ढमाबाई पुढे राहाजगडच्या वेशीवर उभ्या सैनिकांकडे पाहत म्हणाली.

" बस थोडवेळ राहिलाय मालकीण बाई! मंग बघाच कसा रक्त मांसाचा चिखल पडतो ते!" रामुने अस म्हंणतच एक तिरकस कटाक्ष मागे अंधारात टाकला...तसे त्या सर्वांच्या मागे अंधारात सैतानाची दोन हजारांची सेना दुरच्या दुरपर्यंत पसरलेली दिसली..जी की एकदा का मालकाचा हुकूम मिळाला जाणार होता तशी पुढे सरसावुन राहाजगडच्या प्रजेचा एक-एकाचा मूडदा पाडायला मागे पुढे पाहणार नव्हती.

×××××××××××

राझगड महालात महाराजांच्या खोलीत :

समर्थ क्रूणाल, महाराज रघुबाबा, तिघेजण उभे होते.

" महाराज ! तुमचा समर्थ भट्टाचार्यांवर किती विश्वास होता?"

समर्थ क्रूणाल यांच्या वाक्यावर महाराज जरासे गोंधळले व काहीवेळाने म्हणाले.

" इतका! की जे सांगणे अशक्य कोटीतली गोष्टी आहे !"

महाराजांच्या ह्या वाक्यावर समर्थ मंद स्मित हास्य करत हसले.

" महाराज ! मग तेवढाच विश्वास माझ्यावर ठेऊ शकाल का?"

" ज्या समर्थांना मी लहानपणापासुन ओळखत आलो आहे.आणी त्याच समर्थांनी जर तुम्हाला त्यांचा वारसा पुढे चालवण्यास दिला आहे! तर त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल ! नाहीतर हा हक्क एरवी तेरवी कोणालाही सोपवणा-यांमधले समर्थ भट्टाचार्य नाहीच.म्हंणुनच..माझा विश्वास तुमच्यावर आहे..आणी तितकाच आहे जितका समर्थांवर होता..! " महाराजांच्या ह्या वाक्यावर समर्थ पुन्हा मंद स्मित हस्य करत हसले.

" महाराज आम्हाला आमच्या प्रश्णांची ,उत्तरे अशीच मिळतील अशी आशा होतीच !"

" परंतु असे प्रश्ण का विचारलेत समर्थ तुम्ही!"

" कारण महाराज! आम्हाला तुमच्या महालात साडेचारशे वर्षांअगोदर ज्या येहूधीला समर्थांच्या वंशजांनी कैद केल होत. त्या सैतानाची भेट घ्यायची आहे! आणी तो मार्ग तुम्ही आम्हाला सांगाव अशी आमची इच्छा आहे ! "

" समर्थ तुम्ही जे काही करत आहात , ते राहाजगडच्या भल्यासाठीच तर करत आहात ना ! मग मी नक्कीच तुम्हाला तो मार्ग दाखवेण!"

महाराजांनी अस म्हंणतच! आपली पाऊले पलंगाबाजुला असलेल्या

दोन झापांच्या कपाटाच्या दिशेने वाढवली.कपाटापाशी पोहचताच

त्यांनी कपाटाचा एक दरवाजा उघडला ! काहीवेळ ते पाठमोरे उभे राहुन शोधत राहीले! मग काहीतरी सापडल्यासारख त्यांनी कपाट लावून घेतल, पुन्हा समर्थांजवळ आले.

" हे पाहा समर्थ !" महाराजांनी आपला एक हात पुढे केल..समर्थ आणि रघुबाबांनी त्या हाताकडे पाहील! महाराजांच्या हातात एक काळ्या रंगाचा गोल चेंडू होता.

" काय हाई हे?" रघुबाबांनी प्रश्ण केला.

" हाच तो मार्ग आहे! " रघुबाबांनी जरा चमकुनच पाहील त्या काळ्या चेंडूकडे!

" पण हा चेंडू कस मार्ग असेल!" रघुबाबांनी महाराजांकडे पाहील.

" थांबा आताच कळेल !" महाराजांनी अस म्हंणतच तो काळा चेंडू असलेला हात मागे नेत हवेत घेऊन जात ! थेट वेगाने पुढे आणत तो काळा चेंडु हातातुन सोडत कपाटाच्या दरवाज्यावर मारला.तो चेंडू कपाटावर आदळून पुन्हा महाराजांच्या हाती आला.

"महाराज कुठ हाई द्वार!" रघुबाबा म्हणाले.कारण काहीही झाल नव्हत.

" अरे हो विसरलोच! हा हा हा!" महाराज काहीतरी आठवल्यासारखे म्हणाले. त्यांनी आजुबाजुला पाहायला सुरुवात केली.त्यांच्या नजरेस बाजुला एका टेबलावर फळांच्या भांड्यात एक सुरा दिसुन आला.

जो की महाराजांनी हाती घेऊन, हलकेच आपल एक बोट कापल , मग त्या बोटातुन निघणा-या लाल रक्ताने तो काला चेंडू माखवला..आणि मग एक मंद स्मित हास्यहिंत कटाक्ष समर्थ आणि रघुबाबांवर टाकत तो चेंडू असलेल्या हात पुन्हा तीच क्रिया करत मागे नेला आणी पुन्हा वेगाने पुढे आणत तो बॉल कपाटाच्या दिशेने भिरकावला.. तो काळा चेंडू

हवेतच सेकंदाचा काटा पुढे सरसावा, तसा त्याचक्षणी जेवढे रंग आस्तित्वात आहे! लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, ,निळा,केशरी,

सर्वच्या सर्व रंग फेकत विशीष्ट प्रकारे चमकला आनी थेट जाऊन त्या कपाटावर आदळला..जसा त्या चेंडूचा कपाटाला स्पर्श झाला..!

त्या कपाटावर एक आठफुट दरवाजा आला जात त्या दरवाज्यातुन विविध रंग सेकंदाच्या काट्याला वेगाने बदलत आहेत अस दिसुन आल..आंणि पुर्णत खोली त्या सर्व रंगाने चमकुन उठली..!

जणु त्या दुस-या दुनियेच द्वार उघडल असाव !

समर्थ रघुबाबा आश्चर्यकारक नजरेने हा देखावा पाहत होते.की तेवढ्यात

महाराज म्हणाले.

" समर्थ, चला ! हा द्वार जास्त वेळ उघडा राहणार नाही!"

" नाही महाराज! तुम्ही आंणि बाबा इथेच रहा ! मी एकटाच आत जाणार आहे! " समर्थ अस म्हंणतच त्या द्वारापाशी पोहचले ही ! त्यांनी एकवेळ मागे वळून पाहील" महाराज बाबा माझी काळजी करु नका, मी नक्की परत येईल !.आणि हो युवराजांना मी युद्धाची रणनीती कळवलीये...तर तुम्ही दोघे आता त्यांच्या खोलीत जा ! मी लवकरच परतेल!"

समर्थांनी अस म्हंणतच त्या क्षणा-क्षणाला बदलणा-या सर्वरंगी द्वारापुढे एक पाऊल ठेवल ! त्यासरशी त्यांच सर्व शरीर त्या द्वारात तिप्पट वेगाने झटकन आतमध्ये खेचल गेल..व तो द्वार बंद झाला..!

 

क्रमश: