निर्धार.... लढूनी जिंकण्याचा - भाग 2 prajakta panari द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्धार.... लढूनी जिंकण्याचा - भाग 2

सलोनी भरभर चालत होती. आज तिला खूपच उशीर झाला होता. किर्र अंधार पडला होता. मनात विचारांचे वादळ उठले होते. का कोणास ठाऊक पण आज तिच मन खूपच अस्थिर झाल होत. काहितरी अघटीत घडणार आहे अस राहून राहून वाटत होत.
का अस होत नेहमी मुलींनी काय कोणाच वाईट केलेल असत कि त्यांना त्यांची स्वप्न गुंडाळावी लागतात. दुसरे जे सांगतील ते ऐकावेच लागते. स्वतः हाच्या मनाच थोडही ऐकायला मिळत नाही आणि वर अशी राहा तशी राहा हि सुनावणी. एकिकडून अस विचारांच चक्र चालू होत तर दुसरीकडून काहितरी अघटीत घडणार अशी चाहूल लागत होती. ............
दोस्ती आईला समजवत होती. ये आई बास ग किती त्रास करून घेशील. तुला माहित आहे ना पोलीसांचा तपास चालू आहे. सलोनी नक्की सापडेल. तु अशी विचार करून करून स्वतः हाला त्रास करून घेत जावू नको. अग सलोनी पण म्हणायची विचार करून समस्या सोडवता येत नाहीत. त्यांच्यासमोर खंबीरपणे उभ राहाव लागत.
दोस्तीची आई म्हणते, पण कधीपासून तपास सुरू आहे. जवळजवळ दोन वर्षे होत आली हेच ऐकायला मिळत आहे. कधी सापडणार सलोनी काय माहित.
सापडेल ग आई ती नक्की सापडेल आणि माझी चांगलीच खरडपट्टी करेल. माहित आहे ना लहानपणापासून ती किती खोडकरपणा करायची. माझ्याकडची वही हळूच घ्यायची व अशा ठिकाणी लपवायची कि कोठे सापडायचीच नाही मला मग टिचर, सरांचा मार खायला लावायची. पण बघ ना आज स्वतः हासच कोठे लपवून ठेवलय कि अजूनपण सापडत नाही आहे अस सांगता सांगता दोस्तीच्या डोळ्यात अचानकच पाणी येत ती ते अश्रू तसेच मागे परतवते आणि आईला सावरते.......

दोस्ती आणि सलोनी अगदी लहानपणापासूनच्या मैत्रिणी एकमेकांपासून एक पण गोष्ट न लपवणाऱ्या. सलोनीला कॉलेजला अॅडमिशन घेता आल नाही. पण तरीही त्यांच एकमेकांच्या घरी येण - जाण चालूच होत. दोस्तीच्या आईस सुद्धा सलोनीसोबत बोलायला खूप आवडायच. कधी कधी दोस्ती घरी नसताना सुद्धा सलोनी तासनतास त्यांच्याशी गप्पा मारत बसायची. ..........
अग सलोनी ये ना दोस्ती आताच दुकानला गेली तिला यायला उशीर होईल बस ना. हो काकि मला काय ती नसली तरी तुम्ही आहातच कि कंपनी द्यायला. हो ते तर आहेच.
अच्छा काकि तुम्ही लहानपणी कोणत स्वप्न पाहिलेलत काय?
काय ग तु, मी आणि स्वप्न अग एका स्त्रीला कसल स्वप्न आणि कसल काय? ती म्हणजे सगळ्यांसाठी एक वस्तूच असते. जिची किंमत वस्तूपेक्षा पण कमी समजतो हा समाज. नुसत बाईपण आत मुरवत, मनाला मारत जगत असते. नुसत समाजाने उठ म्हणल कि उठायच आणि बस म्हणल कि बसायच.
म्हणजे काकू तुम्ही कोणत स्वप्न बघायच्या नाहीसा.
अग तस नाही माझ पण खूप मोठ स्वप्न होत. जे या समाजाच्या विचारांपुढे फिक पडलं.
कोणत ओ काकि कोणत स्वप्न होत तुमच मला पण सांगा कि,
अग जावू दे ग ते जाणून तू काय करणार आता.
ओ काकि सांगा ओ एवढ काय त्यात मला पण काहितरी प्रेरणा मिळेल मोठ स्वप्न बघण्याची आणि मग मी पण तस स्वप्न बघेन.
काकि म्हणतात, "नको ग बाई नको, मी बघितल तेवढ बास झाल. अग जर आपल स्वप्न आपल्याला पूर्ण करता आल नाही तर आयुष्यभर पश्चात्तापाचे चटके सोसावे लागतात. मग सतत आपलच मन आपल्याला टोचत राहत. कि, छे काय या जगण्याचा उपयोग साध आपल स्वप्न आपल्याला नाही गवसल."
सलोनी म्हणते, "सांगा ओ काकि माझ्या बाबतीत तस नाही होणार, मी मोठ स्वप्न बघेन पण आणि ते पूर्ण करेनच."
काकि म्हणते, "बर तुझा इतका विश्वास आहे तर मी माझ स्वप्न सांगते तुला तेवढच माझ मन हलक होईल व तुझ्याही मनाला चैन पडेल."
हा आता कस बोललात. हेच ऐकायच होत मला सांगा आता पटकन माझे कान तरसले आहे.
बर बाई ऐक आता, मला अंतराळवीर व्हायच होत. तशी माझी तयारी पण चालू होती. अंतराळात जावून आपली पृथ्वी बघावी, चंद्र, तारे, ग्रहमाला बघावी अस खूप वाटायच. मी त्यासाठी खूप तयारी पण करत होते. पोहायला शिकले, अंतराळवीरांच्या कहाण्या ऐकत बसायची, त्यांना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली हे सतत जाणून घ्यायची आणि माझ्या आयुष्यात असा एक दिवस आलाच ज्यादिवशी माझ स्वप्न सत्यात उतरणार होत. पण .....
पण काय काकि काय झाल तुमच स्वप्न पूर्ण झाल काय. अग कसल काय आणि कसल काय, त्यादिवशी माझ स्वप्न सत्यात उतरायला दोनच दिवस बाकि होते. मी खूप खुष होते. घरी जावून आई - बाबांना हे सांगितल. वाटल होत कि ते पण खूष होतील पण झाल उलटच. ते म्हणाले, आम्ही तुला पोहायला शिकवले, शिक्षण दिले. ते इतक मोठ स्वप्न बघण्यासाठी नव्हे, अग त्यापेक्षा तु चांगली नोकरी कर, तुला चांगला नवरा मिळेल, तुम्ही चांगला संसार कराल. अग अंतराळात जाताना तुला काही झाले तर तु काय एक मुलगा आहेस का ? मैदानातली आणि शौर्याची स्वप्न मुलांनी बघावीत, मुलींनी संसार कसा चांगला करता येईल ते पाहाव. पण बाबा, आताच्या मुली प्रत्येक क्षेत्रात आहेत. त्या त्यांच स्वप्न पूर्ण करतातच. नाही म्हणल ना तुला तुझ्या जीवाच काही झाल तर, नाही तुला आम्ही जावू देणार नाही.
मग काय झाल काकि तुम्ही त्यांच ऐकलत आणि आपल स्वप्न सोडलत.
नाही ग सलोनी माझ स्वतः हापेक्षा स्वतः हाच्या स्वप्नावर प्रेम होत. पण मी जेव्हा पोहायच्या क्लासला जायचे तेव्हा इथे परस्पर मला न विचारता आई - बाबांनी मुलगा बघितला. पसंत केला आणि दुसऱ्या दिवसाचाच मुहूर्त काढला. मी खूप खुष होते कि दोन दिवसातच माझ स्वप्न पूर्ण होणार. पण त्यादिवशी मी सकाळी उठले तर सगळी घाई चाललेली . मला समजेना कि हे नेमक काय चाललंय आणि मुलगा आला व नंतर सांगितले की आम्ही तुझ लग्न ठरवलय आता काही वेळात अक्षता आहेत पटकन तयार हो. पण आई, आता आम्ही तुझं ऐकणार नाही. तु अंतराळात जायला निघशील नाहीतर आणि मग उगाच नको तो घोर त्यापेक्षा लग्न केलीस कि आम्ही मुक्त होवू. अस म्हणून माझ्या बोलण्याला कोणीच महत्त्व दिल नाही. आणि माझ लग्न शेवटी झालच. आणि मी एक गृहिणी झाले काय स्वप्न बघितले होते आणि क्षणात काय होवून बसले ते समजलच नाही. पण त्या एका दिवसात सगळ बदलल माझ स्वप्न क्षणात उद्ध्वस्त झाल. मी एक गृहिणी झाले.
सलोनीच्या डोळ्यात पाणी आले. काकि खरच खूपच कसतरी वाटल पण काकि खरच मी माझ्या बाबतीत तस होवू देणार नाही मी माझ स्वप्न पूर्ण करेनच.
हो ग सलोनी देव करो न माझ्या बाबतीत जे झाले ते तुझ्या बाबतीत होवू नये तुला आणि दोस्तीला तुमच तुमच स्वप्न पूर्ण करायला मिळू दे..........
आणि दोस्तीची आई वर्तमानात आली. खरच किती गोड होती सलोनी तिला तीच स्वप्न पूर्ण करायचे होते आणि काय होवून बसले हे कोणत्या अवस्थेत असेल आता ती काय माहित. अजून सापडत नाही आहे. आणि परत त्यांचे डोळे भरून येतात. .........

क्रमशः