द मिस्ट्री - 1 Akshit Herkar द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

द मिस्ट्री - 1

मुबंई सारख लोकांनी भरलेलं शहर आणि त्यात काळोख्या अंधारात पोलीस गाडी आवाज करत जात आहे . अचानक गाडी थांबते. गाडी मधून एक पोलीस अधिकारी ज्याचं नाव विजय आहे तो खाली उतरतो तेवढ्यात तो त्याच्या सहकार्याला म्हणतो काय जायभाये हीच का ती जागा , तेवढ्यात जायभाये म्हणतो हो सर हीच ती जागा. थोडं पुढे जाताच क्षणी त्यांना पत्रकारांचा घोळका दिसतो जो या पोलीस अधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार करत असतो . विजय - काय जायभाये यांना कोण आमंत्रित केलं , काय माहित नाही सर . याच काळोख्या अंधारात विजय आणि त्यांचे सहकारी मोबाईल चा प्रकाश लावून जेव्हा बिल्डिंग वर जाऊन पोहचतात तेव्हा तिथे पूर्वी च काही पोलीस असतात त्यांनी एका डेथ बॉडी ला पांढऱ्या कपड्याने झाकलेले असते . विजय जायभाये ला म्हणतो चला जायभाये पाहु या काय अवस्था आहे बॉडीची.
जायभाये - हो सर ..
आणि मग विजय हळूच त्या बॉडी वरून कपडा बाजूला करतो आणि छी काय दुर्दैवी मृत्यू दिला आहे याला .कोणी एवढं कसं क्रूर असू शकत .कारण त्या डेथ बॉडी च्या तोंडावर काचाचे बारीक तुकडे खुपसुन ठेवलेले असतात . विजय म्हणतो या बॉडी ला जायभाये पोस्टमॉर्टम साठी पाठवून द्या असं म्हणत तो बिल्डिंग खाली येतो आत्ता तो पत्रकारांना टाळू शकत नाही . पत्रकार - सर हा मर्डर कोणी केला ?
पत्रकार - का झाला हा मर्डर ?
विजय - हे बघा हे आम्हाला माहित असत तर आम्ही इथे असे बसलो असतो का ? लवकरच आम्ही शोध लावू तपास सुरु आहे असे रागात उत्तर देतो व गाडीत बसून निघून जातो ..
हि पोलीस गाडी आत्ता डायरेक्ट जाऊन sp च्या ऑफिस ला थांबते विजय हा साधा पोलीस इन्स्पेक्टर असतो .
SP अजय पाटील -
काय विजय तुम्ही ड्युटी वर असताना अशी घटना घडन हे फार वाईट आहे .
विजय - हो सर जे झालं ते चूूक झाले .
SP अजय पाटील - चूक झाले ना मग आत्ता तुमची चूक सुधारा लोक आमच्या बोकांडी बसले आहेत .
विजय - हो सर ..
( विजय ऑफिस बाहेर येतो )
विजय - जायभाये गाडी काडा म्हणून गाडीत बसतो .
गाडी एका पुलावर जाऊन थांबते तिथे विजय गाडीतून खाली उतरतो व त्या पुला वरून संपूर्ण शहराला पाहत असतो .
जायभाये- काय झााले सर कसला विचार करत आहात्
विजय- कोण आणि का ? एवढा निर्घृण खुुुुुुन करू शकत.
जायभाये - साहेब काय बोलले का सर ?
विजय - तो विषयच नाहीये जायभाये हा खून का झाला असावा हा विषय आहे तो पण एवढा निर्घुन . त्या बॉडी चा चेहरा देखील ओळखू येत नाहीये .पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला का ?

जायभाये - हो आला सर ती बॉडी एका पुरुषाची आहे सर त्याला मारण्याआधी फार ट्रॉचर केलं आहे सर . त्या बॉडी चे हाताचे आणि पायाचे नख देखील काढले आहेत .

( तेव्हढ्यात विजय चा फोन वाजतो )

फोन उचलताच विजय ला धक्का बसतो .

विजय - काय ? जायभाये लवकरात लवकर गाडी काडा . (म्हणत गाडीत बसतो )

( गाडी सायरन वाजवत जुन्या रेल्वे स्टेशन परिसरात जाते )

रेल्वे पटरीवर एक डेथ बॉडी आणखी असते आणि तिच्या बाजूला पोलीसांची वैद्यकीय टीम पडताळणी करत असते . विजय त्या बॉडी जवळ जातो आणि त्यावरील कपडा बसून काढतो आणि पाहतो तर काय हा खून पूर्वी पेक्षा भयंकर पध्दतीने केलेला असतो .
Solve होईल का हि मिस्ट्री
हि बॉडी कोणाची आहे काय झालं आहे या बॉडी सोबत कोण आहे हत्यारा हे माहित करून घेण्यासाठी पुढील भाग वाचा . पुढील भाग लवकरच प्रकाशित होईल .