रहस्याची नवीन कींच - भाग 2 Om Mahindre द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रहस्याची नवीन कींच - भाग 2

हाच विचार करता-करता तो झोपला. दुसऱ्या दिवशी सर्व जण फिरायला जातात पण प्रविण मात्र पोट दुखत आहे असे खोटे बोलून तो फार्महाऊस वरच थांबतो.
सर्व जण गेल्यानंतर मात्र तो त्या बंद हवेलीत जातो. तेथे तो पुन्हा हवेलीची तलाशी घेतो. पण त्याला काहीच सापडत नाही तो वरच्या खोलीतील अलमारी उघडतो ज्यामध्ये त्याला ते लॉकेट सापडले असते. तो अलमारीची तलाशी घेतो त्यातही त्याला लॉकेट संबंधात काहिच सापडत नाही. तो नीराश होऊन पुन्हा फार्महाऊस वरती जातो व लॉकेट हातात घेऊन बघत बसतो. तो एक टक लावून त्या लॉकेट कडे बघत असताना त्याला असा भास होतो की जणू त्याला कोणी बघत आहे. तो मागे वळून पाहातो तर कोणीच नसते. त्याला भास झाला असावा म्हणून तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण थोडयाच वेळाने त्याच्या चेहऱ्याजवळून एकदमच थंड वारा त्याला जाणवतो. तो अचानक उठून बसतो व कोणी आहे का ते पाहातो. त्याचे लक्ष नंतर ए.सी. कडे जाते त्याला असे वाटते की ए.सी. मुळे त्याला तो थंड वारा जाणवला असावा. सांयकाळचे ७:०० वाजले होते. सर्व जण फार्महाऊस मध्ये परतले. सर्व जण खुप दमलेले होते त्यामुळे सर्व जण लवकरच जेवले आणि झोपी गेले. पण मात्र प्रविण आणि राघव अदयाप झोपलेले नव्हते. प्रविणने राघवला सांगीतले की तो आज त्या हवेलीत पुन्हा गेला होता. त्याच्यावर राघव प्रविणला कल्ला करतो आणि म्हणतो, "मुर्ख पणा करू नको प्रविण त्या हवेलीत जाऊ नकास. तु त्या हवेलीतून जाऊन आलास आणि हवेलीच्या मालकाचा अचानक मृत्यू झाला" याच्यावर प्रविण हसत उत्तर देतो, " तु खुप अंधश्रद्धा बाळगतो, मी इथे हवेली उघडली तर हवेलीच्या मालकाचा मृत्यू तिथे तो विदेशात असतांना कसा काय होईल", त्याच्यावर राघव म्हणतो, "प्रविण मला तुझे त्या हवेलीत जाने व ते लॉकेट तिथून आणणे मला काही ठिक नाही वाटत आहे? त्याच्यावर प्रविण म्हणतो," अरे घाबरू नको काही नाही होत."
त्याच्यात बोलणे झाल्या नंतर ते दोघे झोपाला जातात.
रात्रीचे 2:30 मीनीटे झाली होती. फार्महाऊसची लाईट अचानक गेली. राधा ए.सी बंद झाल्यामुळे तिला जाग आला. ती उठली आणी पायऱ्या चढून वर टेरेस वर जात होती तेव्हा तीला मागून कोणी तरी तीचा पाठलाग करत आहे असे तिला वाटले म्हणून तिने मागे वळून पाहाले तर कोणीच नाही होते. ती दुर्लक्ष करून टेरेस वर जाते. तेथे ते थंड हवेत बसते. ती रात्रीच्या त्या दुश्यांचा आनंद घेत होती तीतक्यात तिच्या मागून कोणी तरी गेले ती खूप घाबरली. ती खाली जाण्यासाठी पळवार तीतक्यात तिला कोणी तरी तिला मागून धक्का देते व राधा पायऱ्यावरून ती पाय घसरून खाली पडते. पायऱ्यावरून घसरल्यामुळे तीच्या डोक्याला खुप दुखापत होते व ती जाग्यावरच बेशुदा होते. तिचा आवाज ऐकुल श्रेयाला जाग येतो व ती आवाजाच्या दिशेने जाते आणि काय पाहाते तर राधा बेशुद्ध पडली आहे आणि तीच्या डोक्यातून खुप रक्त जात आहे. काही वेळ ती स्तब्ध उभी राहते. ति आरडा ओरडा करते तीच्या आवाजाने सर्व जण उठतात व काय झाले म्हणून बघतात तर राधा बेशुद्ध राघव आणि सर तिला बसमध्ये दवाखान्यामध्ये घेऊन जातात. थोड्यावेळाने डॉक्टर येतात व म्हणतात "काही काळजीची गरज नाही ती आता ठीक आहे फक्त रक्त खुप वाहून गेल्यामूळे फक्त काही दिवस अशक्तता राहील बाकी काही चिंताची गरज नाही.
डॉक्टरने २४- तास निरिक्षणासाठी राधाला दवाखान्यात ठेवण्यासाठी सांगीतले.
-------------- * * * * * -------------
राधाला कोणाच्या असण्याचा आभास झाला असेल!!
कोणी राधाला पायऱ्या वरून ढकलले असेल!!