श्रमसंत्सग - 5 Chandrakant Pawar द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्रमसंत्सग - 5

रोज सकाळ झाली की लवकर उठून सगळ्या गोष्टी आवरून नवरा बायको नोकरी वर जायला निघतात किंवा त्यांच्या उद्योगाकडे व्यवसायाकडे जायला निघतात. याचे कारण काय आहे.
याचे कारण एकच आहे की श्रम तुम्हाला जीवन पद्धती शिकवतो. तुम्हाला जगण्याची शिकवण देतो आणि तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी श्रमंत्र शिकवतो...
जो पुजारी आहे तो भल्या पहाटे उठून एक-दोन देवळांची पूजा आटपून घरी येऊन आराम करतो . तो स्वतःच्या गाडीने किंवा भाड्याच्या गाडीने अथवा सार्वजनिक वाहनाने तो श्रमस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करीत राहतो. मग त्याला धक्के,गर्दी याची पर्वा नसते. हे सगळं काय आहे? हाच तर श्रमाचा करिष्मा आहे...

श्रमाकडे सर्व पृथ्वीचरांचे शरीर आकर्षिले जातात. श्रमाकडे गुरुत्वाकर्षण आहे आणि श्रमाला तुम्ही किती सोडण्याचा प्रयत्न केला तरी श्रम तुम्हाला पुन्हा स्वतःकडे खेचून घेतो.त्याच्याकडे यायला पुन्हा पुन्हा भाग पडते कारण जसा प्रसारण पावणे हा श्रमाचा दुसरा गुण आहे. तसाच गुरुत्वाकर्षण हा श्रमाचा प्रथम गुण आहे ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मग तुम्हाला व्यक्तिगत रित्या तो स्वतःकडे खेचून घेईल अथवा एखाद्या समूहा प्रमाणे स्वतःकडे खेचून घेऊन सामूहिक श्रम करायला भाग पाडेल.

व्यायाम हा जसा श्रमाचा एक प्रकार आहे .तसाच आराम हा सुद्धा श्रमाचा दुसरा प्रकार आहे. ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी. कारण व्यायामामुळे शरीर बलिष्ठ होते तसंच गरजवंत आरामामुळे शरीर शांत राहते. पुन्हा श्रम ऊर्जा प्राप्त करते.

श्रमाला नेहमी विश्रांतीची गरज लागते. मग ती क्षणभर विश्रांती असेल किंवा अविश्रांत श्रम असतील तरी त्याला विसावा हा लागतोच. झोप आणि श्रम यांचा खूप जवळचा संबंध आहे गात्रांना,मेंदूंला, बुद्धीला,अवयवांना मुख्य म्हणजे हाता पायाला जर झोप मिळाली नाही .झोपेच्या स्वरूपात विश्रांती मिळाली नाही तर मग शरीर चिडचिडे बनते आणि त्याचा परिणाम श्रमावर होतो. परिणामी जीवन विचित्र बनतं. स्वभाव चिडचिडा बनतोच. मात्र शरीर आणि आरोग्य सुद्धा चिडचिडे होते.
याचा अर्थ ज्याने त्याने आपापल्या परीने घ्यायचा आहे आणि त्याचा श्रमार्थ लावायचा आहे... तो श्रमार्थ लावण्या मध्ये चूक झाली किंवा हयगय झाली तर मग त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि मग जीवन उध्वस्त होण्याच्या काठावर येऊन पोहोचते. त्यालाच बरबादी असे भयंकर भीतीदायक नाव आहे

श्रमाला नावे ठेवताना दुसरी गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे आम्ही एवढी मेहनत घेतो. कष्ट करतो. परेशानी करतो. काटेकोरपणा करतो. बचत करतो गुंतवणूक करतो. परंतु आम्हाला यश येत नाही. आमच्याकडे पैसा टिकत नाही किंवा आम्हाला पैसा मिळत नाही .आम्ही श्रीमंत होत नाही आणि गरिबीकडे अधिकच लोटत जातो... याचं कारण म्हणजे ती व्यक्ती ही श्रमसंपन्न बुद्धीची नसते.. तिचा स्वभाव हावरा असतो लोभी असतो. श्रमलोभ हा तसा चांगलाच आहे परंतु अतीश्रम लोभ हा वाईट आहे कारण त्याला बुद्धीची चुणूक नसते आणि नियोजन नसते. त्यामुळे जे समोर येईल ते करीत राहायचं...

एक प्रकारचा विचित्र प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनावर पडतो आणि मग ती व्यक्ती अनेक चित्र विचित्र गोष्टीतून संकटातून फिरत राहते .परिणामी त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला किंवा त्या संस्थेला किंवा त्या कंपनीला नुकसान खावं लागतं. परिणामी दिवाळखोरीची सुद्धा घोषणा करावी लागते. कारखान्यात टाळेबंदी करावी लागते. कामगारांची कपात सुद्धा करावी लागते .त्यामुळे कामगारांच्या जीवनावर खूपच विपरीत परिणाम होतो .काहीना नैराश्य येते. काही तणावात जातात .काही शॉक मध्ये जातात अनेक जण आत्महत्या सारखा पळपुटा मार्ग स्वीकारतात. त्यांच्या अंगी कामचोरीपणा येऊ शकतो किंवा ते समाजाला जगाला दुषणे देऊ शकतात. श्रमाला नावे ठेवतात.


याचं कारण म्हणजे श्रमाला कोणीही कमी लेखू नये.... विशिष्ट पद्धतीने श्रम करीत रहावे अपयश येणार नाही. यशाची हमी मिळत राहील.. याची गॅरंटी स्वतः श्रमि श्रमिला देतो .जीवनाला देतो. स्वतःला देतो .समाजाला देतो.जगाला देतो आणि स्वतःच्या मनाला व बुद्धीला सुद्धा देतो.. ती विशिष्ट पदक कोणती तर ती विशिष्ट पद्धत म्हणजे स्वतःच्या श्रमावर विश्वास ठेवणे. हेच आणि हेच जीवनाचं चातुर्य आहे...