नरकपिशाच - भाग 3 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नरकपिशाच - भाग 3

द- अमानविय..... सीजन 1 ...
..... आग्यावेताळ भाग 3 ...
 
 
नम्र विनंती कथेत उच्चारले गेलेल्या भयउत्कंठामय थरार दृष्यांसहित, नाव, गाव, पात्र , देव सर्वकाही काल्पनिक असुन ह्या सर्व बाबींचा वर्तमान युगाशी काहीही घेन-देण नाही.! जर कोणाला तस काही अपवाद आढळलच तर त्यास निव्वळ योगा-योग समजावा .!🙏🏼
 
 
सिद्धांतने बांधायला घेतलेल्या फार्म हाऊस पासुनच जेम-तेम 3-4
किलोमीटर अंतरावरच, ती आदिवासी जुन्या परंपरांगत लोकांची वाडी होती! म्हणजेच एकंदरीत मला अस म्हणायचय !की वाडीतले लोक जुन्या विचारांचे, जुन्या परंपरेचे होते! वाडीच नाव पाषाणवाडी असुन , वाडीत 40-50घरांची लोकवस्ती होती. वाडीत सिमेंटचे रस्ते, नव्हते , फक्त एक खडकाळ माती पासुनच बनलेला रस्ता होता !त्यासमवेतच वाडीत शाळा सुद्धा नव्हती. कारण वाडीला जंगलातल्या झाडांनी आपल्या मिठीत सामावून घेतलेल , ज्याने वाडीच्या चारही बाजुंनी जंगलातली हिरव्या पानांची झाडे दिसून येत वाडीला झाडांनी गोल गराडा घातलेला. पाषाणवाडी ही अशी जंगली भागात असल्याने सरकारला सुद्धा अद्याप ह्या वाडीबदल माहीती नव्हत, ज्याने की ह्या वाडीत काही सुधारण करता येईल. वाडीची वेस ओलांडली कि जंगलात जाणारा एक सरळ रस्ता दिसुन यायचा . जो की हायवेवर असलेल्या बस-स्टॉपवए घेउन जायचा. वाडीतली लोक कधी-कधी घरसामान , कपडे, रॉकेल, इत्यादी सामग्री करीता वर्षातुन एकदा वाडीबाहेर शहरात जाण्यासाठी ह्या रसत्याचा उपयोग करायचे, कारण वाडीवर एका सैतानाचा श्राप लागु होता, जो की वर्षातुन फक्त एकेदीवशीच लागु नसायचा. वर्षातला प्रथम पावसाचा दिवस .ज्यावेळेस प्रथम पाऊस पडायचा त्याच दिवशीपासून 24 तासांअंतर्गत तो श्राप त्या लोकांवर लागु होत नव्हता. त्याच रस्त्याला जोडून उजवीकडे एक पायवाट फुटलेली आणि ह्या पायवाटेचा रस्ता पाषाणवाडी स्मशानभूमीत घेऊन जायचा. आता ह्याक्षणी सुद्धा एक प्रेत त्या स्मशानभूमीत चट, चटत्या आगीत जळून खाक झालेल . कारण स्मशानात जळालेल्या लाकडांचा सफेद रंगाचा धुर मंद गतीने बाहेर
पडत होता. प्रेत तस म्हणायला केव्हाच जळून खाक झालेल, कारण स्मशानभूमीत कोणीही नव्हत, होती ती फक्त आणि फक्त प्रेताची राख.
पाषाणवाडीत एक आश्रम असुन त्या आश्रमाच नाव महांक्राल आश्रम होत . आश्रमात एक बाबा रहायचे ज्यांच नाव महांक्रल होत आणि त्यांच्याच नावावरुन ह्या आश्रमाच नाव उदयास आलेल . ह्या महांक्राल बाबांचा इतिहास खुपच वेगळा आणि विचित्र होता. जस की सांगायच तर ते कोणि बाबा नसून एक अघोरी होते सर्व प्रथम ते पाषाणवाडी गावात रहात नसून स्मशानभूमीत राहायचे . स्मशानभूमीत राहून त्यांनी अघोर पंत स्विकारत न जाणे कित्येक विद्या ग्रहण केल्या होत्या. त्यांना अशा कित्येक तरी विद्या माहीती होत्या. की ज्याने मेलेल्यास सुद्धा पुनर-जिवित केले जाऊ शकत होत. महांक्राल यांस आपल्या शक्तिंचा गर्व ,अहंकार , होता .आप्ल्या काळ शक्ति विद्येंचा वापर ते चांगल्यासाठी, कोणाच्या भल्यासाठी करत नसुन.वाईट दूर्बुद्धी असलेल्या , दुस-यांवर जळणा-या लोकांच्या मदती साठी करत असत. जसे तंत्र-मंत्र जादू×टोना, मेलेल्यास पुनर जिवित करण, धन×लाभ , चेटूक, वासनांधीश, अशा कुविचार राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांची मदत ते आपल्या विद्या वापरुन करत असत. परंतु एके दिवशी त्यांच्या वाईट स्व्भाव प्रवृत्तींनेच घात केला . भयंकर , अमानविय ब्याद, त्यांच्या एका विद्येमार्फत पृथ्वी-तळावर अवतरली .पाषाणवाडीत हाहाकार माजला , गावात मृत्यूच सावट पसरल, लाल भडक रक्ताचा सडा जागो-जागी पहूडला, आकाशातून विजा चमकल्या जाऊ लागल्या , आणि त्याच दिवशी ह्या गावात आग्यावेताळाच आगमन झाल . एका कुविचार बुद्धीच्या मनुष्याने महांक्राल यांच्या विद्ये मार्फत सैतानास पृथ्वी-तळावर
आमंत्रण दिल. ज्याने हा दृष्ट-फेरा सुरु झाला होता. आता ह्याक्षणी महांक्राल आपल्या आश्रमातल्या प्रथम खोलीत असलेल्या एका मऊशार गादीवर ध्यानास्थ बसले होते. त्यांच्या पुर्णत शरीरावर भगव्या रंगाचे वस्त्र होते .सफेद रंगाची दाढी खाली लोंबत होती -केस जटांप्रमाणे वाढले जात बांधुन ठेवलेले . गळ्यात विविध प्रकारच्या रुद्राक्ष माळा होत्या. ज्या त्यांनी विद्येमार्फत शक्तिहींत बनवल्या होत्या. परंतु वाचक मित्रांनो तुम्हा सर्वांच्या मनात काहीएक प्रश्ण पडले असतील ? की अघोरी तर अंगावर राख फासतात? त्यांच शरीर उघड असत ....नाही का.? मग महांक्राल यांनी अशे भगवे वस्त्र परिधान का केले आहेत .तर तुमच्या ह्या प्रश्नांच उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल! महांक्राल डोळे मिटून ध्यानास्थास बसले होते. त्यांच्या समोर 20 -25 मीटर अंतरावरच बाहेर जाण्याचा व आतयेण्याचा मार्ग होता. म्हणजेच दोन झाप असलेला दरवाजा होता . दरवाजा उघडा असल्याने बाहेरचा प्रकाश आत येऊन जात पुर्णत खोली उजळली होती. तात्पुरता प्रकाश तरी पडला जात खोलीतल सर्वकाही दिसुन येत होत. नाहीतर रात्री लाईट नसल्याने पुर्णत पाषाणवाडी अंधारातच असायची. दिवे, कंदील , टीटव्या, थोडीना अंधाराला दुर ठेऊ शकत होत्या. त्यांचा काय तो थोडासा तांबडा प्रकाश पडला जायचा. महांक्राल बाबा अद्याप सुद्धा डोळे मिटुन ध्यानास्तास बसलेले . तस काहीवेळ निघुन मग दरवाजातुन एक वीस-एकवीस वय असलेला युवक आत आला . त्याच्या अंगावर सुद्धा बाबां प्रमाणे भगव्या रंगाचे वस्त्र,रुद्राक्ष असुन हातावर विघ्नहर्ता नाव असलेल गोंदवण होत. गोंदवन असलेल नाव मराठीत असुन, नाव हिरव्या रंगात कोरलेल .तो युवक जस आत आला तस त्याने आपले दोन्ही हात समोर जोडुन बाबांना नमस्कार केला .
" नमस्कार गुरुवर्य ! " आपले दोन्ही हात जोडून पूढे पाहतच तो युवक शांत सोज्वळ स्वरात उद्दारला. त्यासरशी महांक्राल बाबांनी मंद गतीने आपले दोन्ही डोळे उघडले. डोळे उघड़ताक्षणीच त्या युवकाला महांक्राल बाबांचे डोळे एका विशीष्ट प्रकारच्या निळ्या रंगाने चमकताना दिसले.महांक्राल बाबांनी त्या युवकाकडे पाहतच एक मंद स्मितहास्य केल , व पुन्हा आपले डोळे मिटुन उघडले.आता ह्याक्षणी त्यांच्या डोळ्यात कसलीही चमक नव्हती. आता ह्याक्षणी त्यांचे डोळे त्या युवकाला सामान्य मनुष्या प्रमाणेच दिसून आले . तस तो युवक म्हणाला.
" बाबा तुम्ही काहीतरी पाहत होतात का ? तुमचे डोळे
निलमंती विद्येच्या चमकेने प्रकाशीत झाले होते .?"
निलमंती विद्या एकप्रकारे वर्तमानकाळात घडणा-या घटनेच चित्रफित टीवी वर दिसणा-या चित्रपटाप्रमाणे आपल्या डोळ्यांस दाखवण्याच काम करते. ज्याप्रकारे आपण सेटेलाईट मार्फत घरी बसल्या लाईव मैच पाहतो त्याच प्रकारे ही विद्या ती घटना घडतावेळेस आपणास निदर्शनास आणून देते. परंतु ही विद्या काही-मोजक्याच महापूरुषांना
शिकता किंवा आकस्मात करता येते ,हेच ह्या विद्येच खर वैशिष्ट्य आहे . त्या युवकाच्या ह्या वाक्यारुपी प्रश्नावर महांक्राल बाबांनी म्ंद स्मित हास्य करत उत्तर दिल .
" बाळ विघ्नेश ..! ह्याचा अर्थ तु तैयार आहेस तर.?! "
एक धीर गंभीर आवाज महांक्राल बाबांच्या मुखातुन बाहेर पडला. जो की त्या आश्रमातल्या प्रथम खोलीतल्या भिंतींवर चेंडूसारखा आपटला जात गुंजत होता. महांक्राल बाबांचे हे शब्द विघ्नेश नामक त्या तरुणास कळले, उमजले नाहीत तस तो म्हणाला.
" गुरुवर्य ! तुम्ही काय बोलत आहात !मला काहीच कळंत
नाहीये ?
" बाळ विघ्नेश! तुझ्या प्रश्णांची उत्तर तुला मिळण्याची वेळ
आलीये ! परंतु.... सर्व प्रथम बाहेर उभ्या असलेल्या माणसांना
आत बोलाव..? त्या सर्व जनांना माझ्याशी काहीतरी प्रमुख
विषयावर बोलायचंय..?"! महांक्राल मंद स्मित हास्य करत म्हणाले.
महांक्राल यांच्या ह्या वाक्यावर विघ्नेशला एक छोटासा धक्का बसला. कारण खरच बाहेर वाडीतली माणस आली होती.परंतु विघ्नेशने त्या वाडीतल्या माणसांचा विषय त्यांचा निरोप काढण्या अगोदरच महांक्राल बाबांनीच तो आपल्या निलमंती विद्येने ओळखला होता.
" जी गुरुवर्य ! " विघ्नेशने अस म्हणतच हात जोडले व तो पुन्हा आल्या वाटेने वाडीतल्या लोकांस निरोप कळवण्यासाठी बाहेर निघुन गेला. त्यासरशी महांक्राल बाबांचे डोळे पुन्हा एकदा निळ्या रंगाने चमकले जात. त्यांनी आपले डोळे मिटून घेतले.
□□□□□□□□□□□□□□□□□□□
वेताळाच्या मंदिरात त्या दोघांच्या उपस्थीसहित आजुबाजुला भयाण, विशालकाया असलेल्या कालसर्पा सारखा अंधार पसरलेला , चिडीचूप शांतता, अंग गोठावणारी थंडी त्या मंदिरात सिद्धांतची टॉर्च बंद होताच पसरु लागलेली .क्षणात वातावरणात बदल जाणवु लागलेला. जणु कालोखाचा फायदा घेत शिकारीसाठी कोणीतरी बाहेर येत आहे. राकेश ची भित्रट नजर चौहू दिशांना भिर-भिरत होती. तर त्या उलट सिद्धांत आपला स्विच-ऑफ़ झालेला फोन चालू करण्यास व्यस्त होता. परंतु राकेश मात्र पुढच दृश्य डोळे फाडून पाहत होता. कारण मंदिरात खालच्या दिशेने गुढग्यांन इतक धुक जमा होत-होत.
" सि...सि...सि ....सिद्धांत ..! स्स्सी...सिद्धांत..?" " भीतीने दातखीळी बसल्यागत , त्या वाहणा-या मृत्युच्या चादरी सारख्या दिसणा-या सफेद रंगाच्या धुक्याकडे पाहतच राकेश उद्दारला.
राकेशच्या वाचा बसलेल्या आवाजाने सिद्धांतनी फोनवरुन लक्ष बाजुला काढुन घेत त्याच्या कडे पाहील.
" काय रे ..... काय झाल..? " सिद्धांतने हे वाक्य बोलून झाल्यावर पुन्हा एकदा फोन चालू होतय का ते पाहु लागला .
" अरे सिद्धांत ते खाली किती धुक पडलय बघ ना..? "
राकेश पुढे पाहत म्हणाला . मग सिद्धांतने सुद्धा पुन्हा एकदा समोर पाहिल तस त्याला सुद्धा थंडी-सहीत दरवाज्यामधुन येणा-या थोड्याश्या प्रकाशात त्या खाली असलेल्या धुक्याच दर्शन घडल.
" wow ! amazing " सिद्धांतच तोंड मोठ-ते-मोठच राहील व अचानक त्याच्या चेह-यावर कसला तरी प्रकाश पडला ज्याने त्याचे डोळे दिपले. सिद्धांतने हळकेच आपले डोळे मिचकावत हातात असलेल्या आईफोन कडे पाहील. आईफोन ची टॉर्च चालू झालेली व त्यात 100 प्रतिशन बैटरी संख्या दिसून येत होती. जे पाहून सिद्धांत काहीक्षण चक्रावलाच होता. परंतु आताच्या युगातले फोन असुन काहीतरी तांत्रिकदृष्ट्या समस्या असल्याने फोन स्विच-ऑफ़ होऊन . पुन्हा ऑन झाला असेल अस मानुन सिद्धांतने राकेश कडे हसतच पाहील .
" फोन तर स्विच -ऑफ़ झाल होत ना ..?" राकेशने सिद्धांतच्या फोन कडे पाहील, तस त्याच फोन सुद्धा ऑटोमेटीक पद्धतीने चालू झाल गेल.
" तुझ फोन सुद्धा स्विच-ऑफ़ झाल होत ना? " सिद्धांतच लक्ष सुद्धा राकेशच्या चालू झालेल्या फोन कडे गेल .
" आईशप्पथ हा काय घोळ हे यार!मी केव्हापासुन ट्राय करत होतो.
पण काहीच रेस्पोंस येत नव्हत. आणि आता तर मी हात पन नाही
.लावला तरी चालू झाला !" राकेश एका दमात हे सर्व बोलून गेला .
" रिलेक्स! राकेश काहीतरी तांत्रिक प्रोब्लेम असेल उगाच भिऊ
नकोस ..!" राकेशच्या घामा-गुम झालेल्या , बारा वाजलेल्या
चेह-याकडे पाहतच सिद्धांत चेष्टेच्या सुरात म्हणाला. परंतु मित्रांनो खरच सत्य कारण हे होत ?की फोन तांत्रिकबाधाहिंत होऊन जात बंद पडलेले? की कोण्या अनैसर्गिक शक्तिच्या मालकी हक्काच्या जागेत तिच्या सहवासात आल्याने ते तंत्रज्ञान साधन बंद पडलेले? आणि आता ह्या क्षणी तिच्या हुकूमावरुणच ते चालू झाले होते. का तर सावज आपल्या जाळ्यात यावा.
" सिद्धांत मी घाबरत नाहीये समजल..! " राकेश नाकावर राग
आणतच उद्दारला.
" relax bro! मी जोक करतोय ..!" मिश्किल हासतच सिद्धांत
म्हणाला.
" पण मी जोक करत नाहीये..! समजल का ..? चल तु
माझ्या मागुन ये मी पुढे जातो ! " राकेशने आपल्या स्मार्टफोनची टॉर्च ऑन केली, व सिद्धांतच्या पुढे आला . सिद्धांत त्याच्या ह्या रागावर डोक नाही अस हलवतच गालातच हसला .
राकेशने आपल्या स्मार्टफोनची टॉर्च एकदा पाय-यांवरुन खाली मारत चारही दिशांना फिरवली . प्रकाशात दिसणा-या गुढग्यांन इतक्या जाड धुक्याला पाहुन एकवेळ राकेशच्या अंगावर सर्र्कन, सरसरीत रक्तगोठावणारा काटा आला. राकेशने हलकेच थर-थर त्या ओठांनी सूखलेल्या गळ्यात आवंढा गिळून घेत प्रथम खाली जाणा-या पायरीवर
पाय ठेवण्यास पाऊल उचलल .त्याची हालचाल खुपच मंदावली होती.
जे पाहुन पाठीमागे सिद्धांत हसत होता. राकेशने आपल प्रथम पाऊल त्या खाली जाणा-या पहिल्याच पायरीवर ठेवला. त्याचवेळेस आकाशात एक विज कडाडली.
□□□□□□□□□□□□□□□
बाबा महांक्राल आपल्या आश्रमात डोळे मिटून बसलेले. की अचानक एक विज कडाडण्याच्या आवाजाने त्यांनी खाडकन डोळे उघडले.
□□□□□□□□□□□□□□□ʼ
राकेशने दगडाच्या पायरीवर पाऊल ठेवताच एक विज कडाडली गेली.
ढगांचा घर्षन होऊन जात गुलानी रंगाचा प्रकाश खाली जमिनीवर पसरला , जो की मंदिराच्या उघड्या दरवाज्यातुन आत येत काहीक्षणां करिता पुर्णत देऊल गाभारा उजळवून गेला. आणि त्याचक्षणी राकेश , सिद्धांतच्या नजरेस वेताळाची मूर्ती दिसली .एक पाषाण स्वरुपी वेताळाची, काळ्या रंगाची मूर्ती . क्रोधहिंत अंगार भरलेले पिवळे डोळे जणू ते प्रत्येकावर एक सुडभावनेचा कटाक्ष टाकत आहेत , टोस्कुले दात जणू रक्तनटीका फाडण्यासाठी तैयार आहेत , एक मोठी रुबाबदार मिशी,व हातात एक कायमस्वरुपी लढाऊ पवित्रा घेतलेली सोनेरी रंगाची तलवार , अशी ही वेताळाची मूर्ती पाहुन काहीक्षणतर सिद्धांत च्या सुद्धा अंगावर सर्र्कन काटा आला, काहीवेळ, ते दोघे एका स्टेच्यु सारखेच जागच्या जागी थिजले गेले. सेंकद काट्याच्या गतीने उजळून निघालेल्या प्रकाशाने सर्वकाही उजळून निघालेल . प्रकाश गेला तस पुन्हा एकदा कालोख पसरला. कालोख पसरताच सिद्धांतचा आईफोन वाजु लागला . ज्याने त्याच लक्ष आपल्या फोन स्क्रीनवर गेल.
तस त्याला आपल्या फोन स्क्रीनवर एक नाव दिसून आल .
 
मायरा.......💤💤💤💤💤💤....
 
 
 
...क्रमश : ...
 
🙏🏼कृपया कंमेंट नाहीतर रेटिंग नक्की द्या😊 वाचक मित्रांनो ! 🙏🏼
 
मला माहीतीये की ह्या भागात महांक्राल बाबांच इतिहास शार्ट कट मध्ये वर्तवळय ..आणि विघ्नेशच सुद्धा परिचय निट दिल नाहीये...!
ते सर्व रहस्य , आणी परिचय मी लवकरच उलगडेल.
 
 
actully लहान भागांसाठी माफी असावी. परंतू त्या लहान भागात सुद्धा
तुमची उत्कंठा मी वाढवत रहाण्याचा प्रयत्न करेल. तस सांगायच तर ही कथा १० भागांपर्यंत नक्कीच पोहचणारे... आणि मग त्या नंतर कैकृलाक सुरु..🙏🏼😊