वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 2 prajakta panari द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 2

ये सारिका चल ना आज माझ्यासोबत आमच्या घरी तुला भेटल्यापासूनच मी बोलवत आहे पण तु का येत नाहीस. अग आम्हाला मित्र समजतेस ना मग कधीतरी ऐक ना माझ..... ऋतूजा म्हणत होती."
हो ग मी तुम्हाला माझे मित्रच मानते पण.... समजून घे मला आज नाही यायला जमणार परत कधीतरी नक्की येईन.....
काय ग तू आम्ही सगळ्या गोष्टी बोलतो ना तुझ्याशी मग तू मात्र अशी का वागतेस इतकि मदत करतेस आमची पण.... आम्हाला मात्र तुझी मदत करण्याची संधी देत नाहीस असच वाटत कि नक्की काहितरी लपवतेस तू आमच्यापासून.... ऋतूजा म्हणाली."
अस काही नाही ग हा एक सांगायच आहे पण वेळ आली कि नक्की सांगेन... सारिका म्हणाली."
तु पण ना बर ठिक आहे मी आता फोर्स नाही करत पण तुला जेव्हा सांगावस वाटेल ना तेव्हा नक्की सांग मला. आता जाते मी....बाय बाय...टेक केअर.... ऋतूजा म्हणाली."
हा चल बाय बाय टेक केअर.सारिका म्हणाली."
..............

थंडगार वार सुरू होत. ऋतूजा तिच्या रूममध्ये झोपली होती. एक जोराची वेदनेने भरलेली किंचाळी तिच्या कानावर आदळली तस तीला लगेचच जाग आली. ती इकडे तिकडे पाहू लागली. तर तिच्या आई - बाबांच्या खोलीतूनच तो आवाज येत होता. ती तशीच धावत त्यांच्या खोलीत गेली आणि जोरात किंचाळली. तिच्या आई बाबांची शरीर विछिन्न अवस्थेत पडली होती. एक माणूस ज्याच्या सगळ्या शरीरावर जख्मा भरलेल्या, ज्याच्या डोळ्यातून भळाभळा रक्त गळत होत. पाय तर नव्हते त्याचे तो त्यांच्या शरीरावर ठाव मांडून त्यांच्या शरीरातून बाहेर आलेल रक्त तसच पित होता. ते समोरच दृष्य पाहून ऋतूजा जोरात किंचाळली त्याबरोबर त्या माणसाने तसच आपल तोंड मागे फिरवल त्याच ते रूप पाहून तर आता तिची वाचाच बसली तो मात्र स्वतः च मस्तक स्वतः च्या हातांनी तसच गळ्यापासून वेगळ करत तिच्याजवळ भिरकवू लागला. व विचित्र पद्धतीने हसत हसत ते डोक तिच्या जवळ जवळ येऊ लागल त्याने तिच्या मानेत आपली सुळ्यासारखी दात खूपसली तस तिला असंख्य वेदना होवू लागल्या.
तस तिची आई धावत धावत जवळ येवू लागली स्वतः च विछिन्न शरीर स्वतः एकमेकांना जोडत ते दृश्य पाहून तर तीची अवस्था अधिकच बिथरली....
ये ऋतू ये ऋतू.... काय ग कसली ओरडलीस. किती घाबरलो आम्ही.. तुला काय आहे कि नाही आधीच बाबा उशीराने घरी येतात त्यात तुझ्या कालव्याने बघ त्यांची सुद्धा झोप मोड झाली.. आई म्हणाली."
तशी ऋतू आजूबाजूला पाहू लागली व हळूहळू भानावर येऊ लागली अच्छा म्हणजे हे स्वप्न होत पण कसल भयानक अस परत कधीच पडू नये. अस स्वतः शीच बोलू लागली."
काय ग काय झाल कसल वाईट स्वप्न बघितलस का काय? आई विचारू लागली."
तस ऋतूने तिला मिठीच मारली आणि म्हणू लागली तुम्ही तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना."
अग अस काय बोलतेस आम्ही का तुला सोडून जाऊ तूच सोडून जाशील एक दिवशी आम्हाला तुझ लग्न झाल्यावर...तिची आई म्हणाली."
काय ग आई एक तर माझी अवस्था असली झाले आणि तुला नको ते बोलायला सूचत.ऋतू म्हणाली."
बर नाही बोलत पण झोप बर आता शांत......आई म्हणाली."
................

आज दिवाळीचा सण होता. करड्याची वाडी गावात जल्लोष सुरू होता. तिथे दिवाळी सणाला इतर ठिकाणच्या गावांपेक्षा, शहरांपेक्षा खूपच अधिक महत्त्व होत. त्यांच्या इथे दिवाळी सण फक्त तीन दिवस किंवा पंधरा दिवस नसायचा तर तो दोन महिन्यांचा असायचा. या सणातल्या प्रत्येक दिवसाच इथे खूपच महत्त्व होत. पण एक मात्र खर इथ या सणात जे कोण येईल त्याला दोन महिने संपल्यावरच बाहेर पडाव लागायच. जर कोणी अतिथी आधीच निघून गेला तर गाव गाव राहणार नाही ते उद्ध्वस्त होणार अशी माहिती पूर्वजांकडून गावातल्या प्रत्येक घराला कळली होती. म्हणूनच तेथील ग्रामस्थ या सणात कोणाला बोलवायचेच नाहीत. त्यांना नेमक कारण माहिती नव्हत तरीही सर्वांचा आपल्या पूर्वजांवर विश्वास होता. त्यानूसार काही संकट यायला नको गावावर म्हणून इथली लोक या सणात बाहेर गावच्या कोणालाच बोलवत नसत.
..............

सगळ्यांची सहलीला जाण्याची तयारी झाली सहलीचा दिवस उजाडला. सगळे एकत्र जमले थोडावेळ आपाआपसात कुजबूज करू लागले यावेळी खूपच विद्यार्थी सहलीला जायला तयार झालेले म्हणून तीन गाड्या कराव्या लागल्या. सगळे गाडीत बसले व सहलीला जायच्या ठिकाणी जावू लागले. त्यांनी गोव्याकडचा भाग जास्त पाहिला नव्हता. म्हणून एकिकडून गप्पा आणि दुसरीकडून ते निसर्गसौंदर्य पाहण्यात सगळे हरवून जात होते.
अनन्या, रवी, अन्वी, ऋतूजा, वैभव, विराज या सर्वांचा ग्रूप दुसऱ्या गाडीत होते ते एकत्रच होते त्यांना सोबत राहायला आवडायच ते एकमेकांपासून कधी दूर जायचे नाहीत पण अशी वेळ येणार होती त्यांच्या आयुष्यात ज्यामुळे बरेच अनाकलनीय प्रसंग घडणार होते. पण आज मात्र ते खूप खुष होते.
.......

आज आज मी बाहेर पडणार बाहेर पडणार किती वर्ष मला अस या लोकांनी डांबून ठेवलय. त्या एका माणसान इथ डांबून ठेवल समजतो कोण तो स्वतः ला मला कोणी हरवू शकत नाही. नाही मला कोणी हरवू शकत नाही.. हि हि हि हि अस मोठमोठ्या आवाजात एके ठिकाणी कोणीतरी थैमान घालत होत.
त्याला आज खात्री होती की आज आपली सुटका होणार आपल्याला सोडवणारे हात आज आपल्या जवळ येणार म्हणून ते खूप खूष होत. पण त्याच येण इतरांसाठी मात्र खूप भयानक ठरणार होत. इतक कि असंख्य जीवांना जीवनाला पण मुकाव लागणार होत. याआधीही तस झाल होत म्हणून तर त्याला डांबून ठेवल होत.
.....

ट्रिपला चाललेल्या गाड्या 20 किलोमीटर पर्यंत आल्या. सगळे गप्पा गोष्टी करून दंगा करून आता कंटाळले होते म्हणून सगळ्यांनी थोडा वेळ नाष्टा करायच ठरवल. तीनही गाड्या मधूवार हॉटेलजवळ थांबल्या. सगळे गाडीतून पटापट खाली उतरले. त्यांचे एकसारख बसून बसून पाय पण अवघडले होते. म्हणूनच पाय पण मोकळे करता येतील म्हणून सगळे खाली उतरले.
सगळेच तेथील तो परिसर अनुभवत होते. खूपच मस्त होत ते हॉटेल जस पूर्वीच्या काळी दगडी बांधकाम करायचे तस त्या हॉटेलच बांधकाम दगडी होत. त्यावर वारली चित्रकला पद्धतीने काही चित्र रेखाटली होती. तर एका दगडावर मधूबनी पद्धतीची चित्र काढली होती. ते कलारूपी सौंदर्य पाहून सगळेच हरवून गेले होते.
विराज अचानक मोठ्याने म्हणाला. हा आता समजल मला.... त्याचा तो आवाज ऐकून सगळेच त्याच्याकडे बघू लागले..
काय रे कसल्या मोठ्या आवाजात बोललास. काय वेड बिड लागल का काय? आणि नेमक काय समजल काय ? वैभव विचारू लागला.
अरे मला या हॉटेलच नाव अस काय आहे असा प्रश्न पडला होता. मधूवार अस वेगळच काय तरी पण ते आता समजल म्हणून म्हटल.विराज म्हणाला."
काय मग काय समजल तुला असच ठेवल असेल रे नाव तुला पण ना कशावरून पण प्रश्न पडतात. वैभव म्हणाला.
अरे पण नेमक काय समजल तुला मला पण नाव वेगळ वाटलेल. त्याच सोडून दे मला सांग.रवी म्हणाला.
अरे यावर वारली चित्रकला आणि मधूबनी पद्धतीची चित्र रेखाटलेत म्हणून. विराज म्हणाला.
अरे व्वा तुला पेंटिंगस मधल माहिती आहे. मला पण सांग ना मला पण पेंटिंग्ज खूप आवडतात. अनन्या म्हणाली.
घ्या आता झाल या दोघांच पेंट पुराण चालू हे बोलू देत आपण थोडस बाजूचा परिसर बघूया खूप मस्त आहे तिकडे पण अस म्हणत ऋतूजा बाकिच्यांना घेऊन कारंज्या दाखवायला गेली. तिथे आधीच कॉलेजमधले थोडे जण गेले होते.
ऋतूजा आणि बाकिचे कारंज्या पाहायला गेल्या खूप मस्त दृष्य होत ते पाण्यामध्ये विविध कलर दिसत होते. इंद्रधनुष्य असल्यागतच वाटत होत त्यांना त्या कारंज्या बघून..
...........

अनन्याला त्या पेंट्स मध्ये काहितरी वेगळंच दिसल तिला खूप नकारात्मकता जाणवू लागली. पण अस का होतय ते तिलाच समजेना. जणूकाय तिला काहितरी दिसत आहे पण क्षणभरात च ती सगळ विसरत आहे पण तरीही ती एकटक त्या पेंटकडेच बघू लागली. व अचानकच चक्कर येऊन पडली. तसे सगळेच जण तिच्याकडे धावत गेले..

.........


क्रमशः