रहस्याची नवीन कींच - भाग 6 Om Mahindre द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रहस्याची नवीन कींच - भाग 6

माझे बॉस मरण पावल्यानंतर मी कधी - कधी विचार करायचो पण त्याच्या मुत्युचे गृढ मला कळालेच नाही . सर्वांना असे वाटायचे की बॉस ने आत्महत्या केली आहे पण मला असे नाही वाटायचे कारण बॉस हे खुप धैर्यवान व आनंदी व्यक्ती होते . तर त्याच्या वरती असे कोणते संकट आले हे मला अद्याप ही कळाले नव्हते . मी त्या लॉकेट बद्दल माहिती गोळा करत होतो . तेवढ्यात एका गावकऱ्याने मला सांगितले की तुम्ही गावा बाहेरील जंगलात एक महान तपस्वी राहतात त्याची भेट घ्या तेच तुमची याचात काही मदत करू शकतील . मी दुसऱ्या दिवशी त्या तपस्वी ला भेटाला गेलो असता ज्या ठिकाणी ते तपस्वी राहत होते तेथे एक अदभुत जाणीव झाली . मन प्रफुल्लीत झाले . काही वेळाने एक वृद्ध मानुस माझ्याकडे आला व माझी विचारपुस करू लागला ते वृद्धच ते तपस्वी होते .
त्या तपस्वीला भेटल्यानंतर मला असे वाटले की आता मला माझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील . माझ्या मनात प्रश्नांच वादळ उठू लागले मला समजत नव्हते की पहिले कोणत प्रश्न विचारू तेवढ्यात ते तपस्वी मला येऊन बोलले की मला माहीत आहे जे तुला जाणून घ्यायच आहे . मी थोड्या वेळासाठी हबकलो . तितक्यात ते तपस्वी बोलले ते मायावी लॉकेट कोणालाही जगु देणार नाही . जो कोणी त्या मणीला धारण करेल तो मुत्यूच्या आहारी जाणार हे खरे . ह्या श्रापीत मणीचा इतिहास हा खुप जुना आहे . हि श्रापीत मणी चालुक्य राजवंशामधली आहे . या मणीमध्ये अशा काही शक्ती होती की जो कोणी राजा किंवा शासक याला धारण करणार तो नेहमी अजय राहील व त्या राज्यात कधीही दुष्काळ किंवा गरीबी येणार नाही . म्हणून या मणीमुळे चालुक्य राज्यावरती खुपवेळा आक्रमण झाले पण राजाच्या युद्ध कौशल्य मुळे हे कोणालाही शक्य झाले नाही . हि मणी शासकाच्या आठ पीढ्या पासून त्याच्या जवळ होते . एकदा एका जंगलातून जाताना राजाने एका वृद्ध व्यक्तीची मदत केली त्याचे प्राणाचे रक्षण तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीने राजाला एक भेट म्हणून ती मणी दिली व म्हणाला की ज्या शासकापाशी हि मणी राहील तो कधीही पराजीत होऊ शकणार नाही व दुष्काळ त्या राज्यावर परिणाम करू शकणार नाही एवढेच बोलून तो वृद्ध म्हतारा तेथून निघून गेला तेव्हा पासून हे मणी राजाच्या राजपरीवारात आहे . पण आठ पिढ्या ओलाडल्या नंतर हि जवाबदारी आली सम्राट विक्रमजीत कडे त्याच्या शासनात प्रजा खुप खुश होती . पण त्याच्या सावत्र भावाला असे वाटायचे की तो अपाहिज आहे म्हणून त्याला राजगद्दीचा वारस नाही केले .
त्याच्या मनात विक्रमजीत बद्दल शञू राजाना ते रनवीजयच्या मनात आणखी द्वेष भरत होते व विक्रमजीत विरुद्ध शत्रू राजाना विक्रमजीतचा मूत्यू हे त्याचे कटकारस्थान करायचा एके दिवशी त्याच्या प्रयत्नाना यश आले व विक्रमजीतचा आकास्मीक मूत्यू झाला या वार्तेने राज्यात शोक पसरले . आता सम्राटाच्या मुत्यू नंतर उत्तराधीकारी म्हणून विक्रमजीतच्या पुत्राची नीवड केली त्याच्या राजभीषेका आधीच रणवीजयने त्याला सुद्धा संपवण्याचा कट रचला पण त्याच्या नशीबाने त्याला साथ नाही दिली व त्याच्या मुत्यूमुळे त्याची आईला खुप धक्का बसला त्याची आई ही एक चेटकीन होती व सर्वप्रकारच्या काळ्या जादुत पारांगत होती ती स्वताच्या प्राणाची बळी देऊन चालुक्य वंशाला श्राप दिला व ज्या मणी मुळे माझ्या मुलाचा जीव गेला तेच मणी या राजवंशीच्या नाशाचे कारण बनेल व हा श्राप मणी बरोबरच राहील . इतके बोलून तीने आपले प्राण त्यागले . त्यानंतर चालूक्य राजवंश हा नामशेश झाला व त्याची सत्तेचा अंत झाला . रणवीजयच्या आईच्या मुत्यूनंतर हि मणी राज्यातला काही श्रेष्ठ संताच्या मदतीने एका ठीकाणी ठेवण्यात आली व अभिमंत्रीत मंत्राने ते बंद करण्यात आले आणि त्याच ठीकाणी खोदून तुम्ही ते मणी शोधला व पुन्हा त्या श्रापाला जीवंत केले आता जो कोणी त्या मणीला धारण करेल किंवा ज्याच्या जवळ ते मणी असेल त्याला ते जीवंत राहू देणार नाही .
म्हणून तुझ्या मालकाचा मृत्यू झाला . ते मणी आताही जागृत अवस्थेत आहे त्याचा लवकरात लवकर तुला ते मणी बदीस्त करावी लागेल तेव्हाच त्या मणी धारकाचे प्राण वाचू शकेल .