शापित नदी सरस्वती - 1 Ankush Shingade द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शापित नदी सरस्वती - 1

प्रस्तावना

लेखक अंकुश शिंगाडे यांची शापित नदी सरस्वती ही कादंबरी वाचतांना मला मनापासून आनंद झाला आहे. या पुस्तकात लेखक अंकुश शिंगाडे यांनी सरस्वती नदी विषयी पौराणिक आणि भौगोलिक अशी दोन्ही प्रकारच्या माहितीचे सुंदर कथानक गुंफले आहे. याआधी, मी त्यांची अनेक पुस्तके वाचलेली आहे.
या कादंबरीची सुरुवात लेखकांनी अतिशय प्राचीन पुरावे देवून केलेली आहे. सुरुवातीला त्यांनी माहीतीवर भर दिलेला आहे. पण लगेच काही ओळीनंतर लेखक कथानकावर पूर्णपणे पकड बसवितात. आतापर्यंत त्यांनी सत्याहत्तर पुस्तके लिहीली आहेत. या लेखनात प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कादंबरी आणि लेख संग्रह यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. या कादंबरीला एकदा का, वाचायला सुरूवात केली की हजारो वर्षापासूनचा सरस्वतीचा इतिहास आपल्या डोळयासमोर अचूकपणे उलगडत जातो. मी येथे खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की या कादंबरीतील अभ्यासपूर्ण माहीती वाचतांना वाचकांच्या ज्ञानात भर पडल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सरस्वती या नावाला मानाचे स्थान आहे. इसवी सनाच्या ४००० वर्षापूर्वीचा इतिहास हा वैभवशाली असाच असाच इतिहास होता. त्यानंतरच्या वर्षादरम्यान ती लुप्त होण्यास का सुरुवात झाली याची माहीती लेखकांनी आपल्या तर्कशुध्द आणि विवेक बुध्दीने देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. सरस्वती नदी विषयी अनेक मतेमतांतरे आहेत. सरस्वती नदीच्या संशोधनाकरीता अनेक उत्खनने झाली आहेत. त्या उत्खननातून संशोधकांना काही महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. परंतू या सर्व अनुमानावरून तिला एका चौकटीत बसविणे कठीण आहे. परंतू हे जिकरीचे काम लेखक अंकुश शिंगाडे यांनी केले आहे. हा विषय दिसते तितका सोपा नाही. परंतू लेखकांनी या विषयाला एक आव्हान म्हणून स्विकारले आहे. अंकुश शिंगाडे कोणताही विषय अतिशय पोटतिडकीने लिहतात. त्याबद्दल त्यांचे कौतूक जेवढे करावे तेवढे कमीच आहे.
'नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे
वसत्वम् मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव'

वेदकालीन साहीत्य, रामायण, महाभारत आणि बुध्दकाल या प्रत्येक कालखंडामध्ये सरस्वतीचा नदीचा उल्लेख होताना दिसून येतो. प्राचीन प्रारंभीचे अश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नवाश्मयुग असे प्राचीन कालखंडाचे जे टप्पे पडत जातात. त्यानंतर ताम्रपाषाण युग आणि लोहयुगाची सुरुवात होते. त्याकाळात म्हणजे ताम्रपाषाण युगातच सिंधू संस्कृतीला सुरुवात झाली होती. लेखनकलेचा शोध लागून एका नव्या युगाला सुरुवात झाली होती. त्यादरम्यान सरस्वती नदीचा काळ हा भरभराटीचा होता. कालीबंगा आणि हडप्पा या दोन्हीही संस्कृती सिंधू नदीच्या आणि सरस्वती नदीच्या परीसरात प्रगत झाली आहे. ही अतिशय मौलीक माहीती लेखक अंकुश शिंगाडे यांनी अधोरेखीत केली आहे. ऋग्वेदात सरस्वती नदीला नदीतमा ही उपाधी दिली होती. ही नदी वैदिक सभ्यतेमध्ये सर्वात मोठी आणि पवित्र नदी होती. उत्तराखंड मध्ये असलेल्या बद्रीनाथच्या ही पुढे भीमपूर येथील माणा गावाजवळ सरस्वती नदी ही लूप्त होवून जाते. हजारो वर्षापासून वाहणारी सरस्वती नदी ही अशी अचानक लुप्त होवून जाते, हा खरोखरच कुतूहलाचा विषय आहे. याविषयी मुद्येसूद माहीती लेखकांनी आपल्या शब्दात मांडली आहे.
सरस्वती नदीचा परीसर नयनरम्य आणि निसर्ग संपन्न असाच होता. सिंधू नदीला समांतर असणारी सरस्वती नदीला वेगवेगळ्या नावानेही ओळखले जात होते. सरस्वती, गंगा व यमुना ह्या प्राचीन नद्या.आजही गंगा, यमुना व सरस्वती या तीनही नदयांचे नाव आम्ही आदराने घेत असतो. ही नदी जवळपास १६०० कि. मी. ९९४ मील इतकी लांब आहे. शापीत नदी सरस्वती हे लेखकांचे सत्याहत्तरवे पुस्तक आहे. त्यांनी अनेक कादंब-या लिहिल्या. वेदना, राजा दाहिर सिंग, कोहिनूर. सर्व वाचनीय आहेत. त्यापैकी ही एक. त्यांच्या हातून अनेक पुस्तकांची निर्मीती व्हावी असे सुयश चिंतितो. तसेच या कादंबरीचे रचनाकार लेखक अंकुश शिंगाडे यांना पुढील साहित्यिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन देतो.

आपलाच
सुनील वाडे नागपूर
९३२५३७०५७६

मनोगत

शापीत नदी सरस्वती ही पुस्तक वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. त्याचं कारण म्हणजे सरस्वतीचा शोध. कोणी म्हणतात की सरस्वती नदी अस्तीत्वातच नव्हती.
सरस्वती नदी अस्तीत्वात होती. त्याचं कारण म्हणजे महाभारत व रामायण या महाकाव्यातील तिचा उल्लेख. महाभारतात सरस्वती नदी, ती जिथे लुप्त झाली, त्या प्रदेशाला विनाशन म्हटलं आहे. महाभारतात सरस्वतीला प्लक्षवती, वेदस्मृती, वेदवती म्हटलं आहे. तसंच ऋग्वेद या ग्रंथात सरस्वती नदीला यमुनेच्या पश्चिमेला व सतलजच्या पुर्वेला वाहात असलेली नदी म्हटले आहे. तांडव व जैमिनीय ब्राम्हण या ग्रंथात तिच्यातील पात्र वाळवंटी प्रदेशात आटलेलं दाखवलं आहे. वायुपुराणातही तिचं अस्तीत्व दाखवलं असून त्यात दधीची ऋषीच्या मुलांचा उल्लेख केल्या गेला आहे. संस्कृत कवी बाणभट्ट याने आपल्या हर्षचरीत या ग्रंथातही सरस्वतीचा उल्लेख केला आहे. अश्वघोष यानेही बुद्धचरीत काव्यात सरस्वतीचं वर्णन केलं आहे.
सरस्वतीच्या वर्णनाबाबत काव्यमिमांसा हा देखील एक ग्रंथच आहे की ज्या ग्रंथात म्हटलं आहे की सरस्वतीला एकदा पुत्रप्राप्तीची इच्छा झाली व ती हिमालयात तपश्चर्या करु लागली. त्यावेळेस तिच्यावर ब्रम्हदेव प्रसन्न झाले. त्यातून त्यांना एक पुत्र झाला. तो पुत्र म्हणजे काव्यपुरुष.
सरस्वती नदीबाबत या सर्व पुराणात म्हटलं जातं की सरस्वतीच्या पुर्वीच्या काळात यमुना, सतलज, घागरा- हाकरा या उपनद्या होत्या. तसंच दृष्टावदी व हिरण्यवती या ज्या दोन नद्या आता लुप्तावस्थेत आहेत. त्याही सरस्वतीच्या त्याकाळी सहाय्यक नद्या होत्या. त्याही नद्या सरस्वती लुप्त झाल्यानं लुप्त झाल्या. ऋग्वेदात या नदीला नदीतमा असंही म्हटलं आहे.
सरस्वती एक विशालकाय नदी होती. म्हटलं जातं की जेव्हा भुकंप आला असेल, तेव्हा जमीन वर आली असेल व सरस्वतीचं पाणी यमुना नदीत शिरलं असेल तसंच सतलज नदीनंही आपला प्रवाह बदलून ती सिंधू नदीकडं वळली असेल.
ऋग्वेद सांगतं की ही नदी पर्वतीय प्रदेशांना चिरत चिरत अरबी सागराला मिळाली. तसंच असंही त्या ग्रंथात म्हटलं आहे की हा ग्रंथ याच नदीच्या तटावर लिहिल्या गेला.
यजुर्वेदातील वाजस्नेयी संहिता ३४.११ मध्ये म्हटलं आहे की पाच नद्या ह्या सरस्वती नदीच्या त्या काळातील उपनद्या होत्या. त्यात सतलज, रावी, चिनाब, व्यास व दृष्टावती या आहेत.
वाल्मिकी रामायणात त्या गोष्टीचा उल्लेख आहे. भरत जेव्हा कैकेय देशातून अयोध्येत परत आला. त्यानं सरस्वती नदी पार केल्याचा उल्लेख आहे. 'सरस्वतींच गंगा युद्धे प्रतिपाद्य च, उत्तरान् वीरमत्साना भारूण्डं प्राविशद्वनम्' तसंच या नदीचं महाभारताच्या शल्यपर्वात ३५ ते ५४ व्या अध्यायात वर्णन आहे. त्यातच कालीबंगा, पीलीबंगा व लोथल ही शहरं खोदकामात सापडली. इथं सरस्वतीचं समांतर खोदकाम केलं असता तिथं काही यज्ञकुंड देखील सापडली. महाभारतात असाही उल्लेख आहे की निषाद आणि मलेच्छ हे एकमेकांचे द्वेष करीत होते. म्हणून त्या प्रदेशात या नदीनं जाणंच बंद केलं. अर्थात त्यावेळेस त्या नदीत पाणी नसेल असं प्रत्ययास येते. महाभारतात असाही उल्लेख आहे की ऋषी वसिष्ठ सतलज नदीत आत्महत्या करीत असतांना ही नदी शंभर प्रवाहात विभाजीत झाली. याचाच अर्थ असा की सतलज नदीनं सरस्वती नदीमध्ये मिसळण्याचा मार्ग बदलवला होता. त्यातच बलरामाचं द्वारकेतून मथूरेत नदीमार्गानं येणं, विनशन मुद्दा, हेही महाभारत महाकाव्याचे मुद्दे सरस्वतीच्या अस्तीत्वाची साक्ष देतात.
श्रीमद्भागवत ५, १९, १८ मध्ये यमुना आणि दृषद्वती नदीचा उल्लेख आहे. 'मंदाकिनी यमुना सरस्वती दृषद्वदी गोमती सरयू' असंही लिहिलेलं वाचलं की सरस्वतीच्या अस्तीत्वाची साक्ष पटते. तसेच "मेघदूत पुर्वमेघ' या कालीदासाच्या महत्वपूर्ण ग्रंथात सरस्वतीचा उल्लेख आहे.
मुळात सरस्वती नदी होती. परंतू अलीकडे ती लुप्त झाली. आता ती अस्तीत्वात नाही. पुराणातील उल्लेखानुसार तिचं पाणी हे अतिशय गोड होतं आणि ती विशालकाय नदी होती. कोणी म्हणतात की ती नदी भुगर्भातून वाहते तर कोणी म्हणतात की ती नदी भुकंप झाल्यानं लयास गेली. त्यामुळंच ती आज अजिबात अस्तीत्वातच नाही. कोणी म्हणतात की ती नदी गंगेला प्रयागजवळ संगमीत होते तर कोणी म्हणतात की ती यमुनेला मिळालेली आहे. आता नेमकं काय झालं ते माहितीच पडत नाही.
सरस्वती नदी हा नदीच्या इतिहासाचा प्राचीन वारसा आहे. सध्या अत्याधुनीक साधनं निर्माण झाली आहेत. तेव्हा या साधनांच्या साहाय्यानं सरस्वती नदीचं अस्तीत्व शोधता येवू शकतं. तसं शोधणं सुरु आहे. त्यावरच प्रकाश टाकण्यासाठी मी ही पुस्तक लिहिली आहे आणि अल्पशः प्रयत्न करुन या लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या अस्तीत्वावर प्रकाश टाकला आहे.
ही शापीत नदी सरस्वती. ही पुस्तक लिहिण्यामागे प्रेरणा म्हणून मी माझा मित्र सुनील वाडेचं नाव पुढं करेल. कारण त्यानं ब-याच दिवसापासून हा विषय लिहा असं सांगीतलं होतं. परंतू ते लक्षात येत नव्हतं. मात्र ई साहित्यानं जशा माझ्या ऑनलाईन पुस्तका प्रकाशित केल्या. त्यामुळंच मला प्रोत्साहन मिळालं. त्यातूनच ही साहित्यकृती घडली. ही माझी सत्याहत्तरवी साहित्यकृती आहे आणि ह्या साहित्यकृतीला मी जरी लेखांकीत केलं असेल तरी सुचविणारा सुचक म्हणून सुनील वाडेही काही माझ्या दृष्टीकोनातून लहान ठरत नाही असं मला वाटते. त्याबद्दल त्यांचे तसेच ईसाहित्य प्रतिष्ठानचे सुनीळ सामंत यांचे आभार. तसंच नास येवतीकर यांचेही आभार. त्यांनीच ई साहित्य प्रतिष्ठानचा रस्ता दाखवला. त्यांचे आभार मानण्याचे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविण्यात तो व्यक्ती जी भुमिका करतो व यात जीव वाचविणारा जसा महत्वाचा असतो. तीच भुमिका ई साहित्य प्रतिष्ठानचे सुनीळ सामंत, सुनील वाडे व नमस्कार येवतीकर यांनी केलेले आहे. त्यांनीच माझ्या साहित्याचा जीव वाचवला आहे.
सरस्वती नेमकी कोण होती? तिला कोणता शाप होता? ती का लुप्त झाली? यात लेखकानं सरस्वती हे पुस्तक लिहिण्यामागचा दृष्टिकोन कोणता? खरंच सरस्वती सापडली का की सरस्वतीचे नेमके काय झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आहेत. ही सर्व उत्तरे एका वेगळ्याच कथानकानं जोडलेली आहेत. ते नेमकं कथानक कोणतं? हे ही पुस्तक वाचूनच कळेल. तेव्हा आपण ही पुस्तक वाचावी व एक फोन अवश्य करावा ही विनंती.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०


शापीत नदी भाग एक (कादंबरी)
अंकुश शिंगाडे


राजस्थानचा तो रेताड भाग. एकेकाळी त्या वाळवंटात जिकडं नजर जाईल, तिकडं रेतीच रेती दिसायची. सर्व भागात रेती. पाण्याचा कोणताही स्रोत नसल्यानं या भागात उन्हाळ्यात लोकांची दैन्यावस्था असायची. ऊन लंबरुप पडत असल्यानं रेताड जमीन एवढी तापायची की कोणीही उन्हात प्रवास करु शकायचा नाही आणि प्रवास केल्यास तो यमसदनी पोहोचल्याशिवाय राहायचा नाही. त्यामुळंच लोकं रात्रभर प्रवास करायचे व सकाळ झालीच तर सावलीच्या कडेला जिथं काही पाण्याची सोय आहे. अशा ठिकाणी अधिवास करायचे. त्याला मरुद्यान असंही म्हटलं जाई. या ठिकाणी दोनचार खजुराची झाडं असायची व दोन चार खुरटी झुडपं. तसंच काही अंशी पाणीही.
राजस्थानात सर्वत्र पाणी दिसायचंच नाही. काही तुरळक भागातच अशी मरुद्यानं दिसायची. लोकं अंगातील पाणी सुकू नये म्हणून जाड व सुती कपडे घालायचे नव्हे तर असे जाड व सुती कपडे कितीही घातले तरी अंगातील पाणी सुकायचंच. कधीकधी तहान एवढी तीव्र लागायची आणि दूरवर पाणी नसायचं, तेव्हा आपल्या लेकरागत पाळलेल्याच ऊंटाला कापावं लागायचं. त्या ऊंटाला........ज्या ऊंटाच्या पोटातील चरबीत भरपूर पाणी असल्यानं ते पिवून आपली तहान भागवता येईल.
अशा या वाळवंटी भागात राजस्थानात पुर्वी एके काळी एका नदीचं वरदान होतं. ती नदी म्हणजे सरस्वती. परंतू आज सरस्वती नदी अस्तीत्वात नव्हती. म्हणतात की ती कोण्यातरी शापानं लुप्त झाली होती ती.
सरस्वती एक वाहणारी नदी होती. परंतू ती शापीत होती. तिचं अस्तीत्व असूनही नसल्यासारखाच होतं. कारण ती आज लुप्त झाली होती. फक्त ती उगमस्थानाजवळच थोडीशी दिसत होती. परंतू पुढे........पुढे ती अचानक गायब झाली होती. जणू पृथ्वीच्या पोटातूनच ती वाहत असावी असं वाटत होतं.
सरस्वती नदी भुतकाळातही भविष्य ठरविणारी एक माता होती. तिनं केवळ हरयाणाच नाही तर पंजाब, राजस्थान व गुजरातला संपन्न बनवलं होतं. परंतू आज ती लुप्त झाली होती. ज्यातून राजस्थानात रेतीचं वाळवंट तयार झालं होतं व राजस्थान रुक्ष बनला होता. आज सरस्वती नव्हती म्हणून राजस्थानात पाणी नव्हतं आणि मनुष्य जीवन? मनुष्य जीवन होतं. परंतू त्यांच्यात तेवढा उत्साह नव्हता. तोच उत्साह भरु पाहात होता अमोल. त्यासाठीच तो लुप्त झालेल्या सरस्वतीला शोधत होता नव्हे तर त्याला शोधणं गरजेचं असल्यानं तो तसा प्रयत्न करीत होता. जिला शोधण्याचं आवाहन व ओळख पाळख अंबिकानं करुन दिली होती.
अंबिका आणि अमोल एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र होते. ते राजकारणात होते. परंतू ते तेवढे मोठे राजकारणी नव्हते. ती हुशार होती. त्यामानानं अमोल हुशार नव्हता. तसं पाहता अमोलला तेवढं कळत नव्हतं. त्याला डावपेचही कळत नव्हते. राजकारणातील तर बरेचसे डावपेच त्याला कळत नव्हते.
अंबिका जशी हुशार होती. तशीच ती डावपेचवालीही होती. तशी बरीचशी मतलबीही, तेवढीच स्वार्थीही. तसं पाहता ती आपल्या कामासाठी कोणत्याही स्तराला जायला तयार होती आणि ती तसं आपलं काम पाहून कोणत्याही स्तराला जात होती. याउलट अमोलचं होतं. अमोल इमानदार असून त्याला पाहिजे त्या प्रमाणात डावपेच कळत नव्हते. तसा तो कुणाशीही वागतांना डावपेचानं वागत नव्हता.
आज जग धावपळीचं बनलेलं आहे. या धावपळीच्या काळात जगाला विश्रांतीसाठी पुरेसा वेळच उरलेला नाही. त्यामुळंच काही लोकं कुणाला काहीही बोलत नाहीत. ते आपापल्या कामात व्यस्त असतात. तरीही काही लोकं असे असतात की त्यांना फालतूच्या उचापती सुचत असतात. अंबिकाचंही तसंच झालं. तिलाही तिच्या स्वार्थासाठी उचापती करण्याच्या सवयी होत्या. त्या सवयीनुसार ती अमोलला समजवायची व सांगायची की त्यानं तिच्याचसारखं वागावं. स्वार्थीपणानं वागावं, इमानदारीनं काहीही मिळत नाही. स्वार्थीपणानं सगळं मिळवता येतं.
अंबिकाचं तसं वागणं. ते काही अमोलला पटत नव्हतं. त्यामुळंच तो तिचं ऐकत नव्हता. अंबिकामुळं अमोलचं बरंचसं नुकसान झालं होतं. त्यामुळंच त्याच्या मनात तिच्या कर्तृत्वाच्या ब-याच गाठी तयार झाल्यात. एक दिवस अंबिका त्याला म्हणाली,
"अमोल, आम्ही तर बदललो. आम्हालाही सुचतं की आपण कसं वागावं. म्हणूनच आम्ही बदललो. तसं पाहता प्रत्येकाला स्वार्थ असतो. तो आम्हालाही आहे. म्हणूनच आम्ही बदललो."
ते अंबीकाच्या तोंडचं वाक्य. अशा ब-याच गोष्टी त्याला अंबिका बोलत होती. त्यामुळंच की काय, अमोलच्या मनावर परिणाम झाला होता. त्याला वाटत होतं की जगात असेही लोकं बरेच असतात की जे स्वतःचा स्वार्थ पाहात असतात.
अमोल एक इमानदार गृहस्थ होता. त्याला स्वार्थ आवडत नव्हता आणि स्वार्थीपणानं वागणंही त्याला आवडत नव्हतं. त्यामुळंच त्याला अंबिकेच्या तोंडचं वाक्य ऐकताच त्याला वैषम्यता वाटत होती, म्हणूनच त्याला तिच्या तोंडचं वाक्य आवडलं नव्हतं.
काही दिवस बरे गेले. अंबिकानं आपल्या स्वार्थानं आपला फायदा करुन घेतला होता. तसं अमोलचं ब-याच प्रमाणात नुकसान झालं होतं. परंतू त्यानं त्यावर शोक दर्शवला नाही वा चिंता व्यक्त केली नाही.
काळ हळूहळूच सरकत राहिला. नियती सर्व हरकती पाहात होती. अमोल इमानदारीनं वागत राहिला. त्याला त्याच्या इमानदारीपणानं फार हालअपेष्टा शोसाव्या लागल्या.
आज जसा काळ बदलला आहे. तसे लोकांचे स्वभावही बदलले आहेत. त्यामुळंच लोकं आपला स्वार्थ पाहात आहेत. ज्याचेकडे कामं आहेत, त्यांचेकडे ती मंडळी मान खाली घालून मेंढरासारखी वागत असतात.
आज स्वभावाचा असाच काळ. केवळ आपल्या स्वार्थपणामुळे आपला स्वार्थ साधण्यासाठी माणूस कुत्र्यासारखा कुणासमोर शेपटी हालवीत असतो. मग काम झालं की तोच माणूस असा दूर होतो की तो कसा दूर झाला हेही कळायला मार्ग नसतो. काळ हळूहळूच सरकला व निवडणूक झाली. त्यात अमोलही निवडणूकीत उभा राहिला. तशी निवडणूक झाली व अमोल बदलत्या काळानुसार सत्तेवर आला.
बदलत्या काळात अमोल सत्तेवर आल्यानंतर बाकीची मंडळी त्याच्या बाजूनं उभी झालीत. त्यात अंबिकाही होती.
अंबिका बदलली होती नव्हेतर ती बदलल्यासारखी वाटत होती. परंतू ती बदलली नव्हती. तिच्या मनात आजही त्याचेबाबत जळफळाट होता. अतिशय मोठ्या प्रमाणात द्वेष होता. तशी त्याच द्वेषानं ती त्याचा बदला घेण्याची वाट पाहात होती.
अमोल अंबिकाचीही कामं करीत होता. सर्व मागील वाईट गोष्टी विसरुन गेला होता. परंतू ती गाठ मनात अजूनही तेवत होती तिच्या आणि त्याच्या मनात. जी गाठ अंबिकानं त्याच्या मनात निर्माण केली होती. आता अमोलला विचार येत होता की जी अंबिका काल तिच्या स्वार्थीपणानं माझं नुकसान करीत होती. ती अंबिका बदलली कशी? परंतू ती बदलली असली तरी आज अमोल सत्तेवर आल्यावर त्यानं आपल्या मनात बदल्याची भावना ठेवली नाही. त्यानं तिला माफ करीत तिचे संपूर्ण कामं केले. मात्र तो तिची कामं जरी करीत असला तरी ती मागची गाठ त्याच्या मनामध्ये कायम तेवत होती. जी गाठ आज त्याला सतावत होती. ती गाठ आज विरलेली नव्हती कँन्सरच्या गाठीसारखी.
अमोलच्या मनात एक गाठ असली तरी तो जुनं वैमनस्य विसरल्यामुळं त्याला अंबिका बरी वाटत होती. परंतू ती जरी आज बरी वाटत असली तरी त्याला भुतकाळ आठवत होता. त्याला जेव्हा भुतकाळ आठवायचा, तेव्हा मात्र वाटायचं की अंबिकाला जवळपासही उभं करु नये. परंतू काही काही गोष्टी, ज्या तिनं सांगीतल्या होत्या. त्या त्याच्या फायद्याच्या ठरल्यानं त्यानं तिला माफ केलं होतं. अशीच एक गोष्ट होती सरस्वतीचा शोध.
अंबिका व अमोल जसे बालपणाचे मित्र होते. तसेच ते पुढे महाविद्यालयातही मित्र होते. एकदा एक प्राध्यापक म्हणाले,
"सरस्वती ही आपली पुरातन काळातील एक प्रमुख नदी असून ती लुप्त झालेली आहे. कोणी म्हणतात की तिचं अस्तीत्व आजही आहे. परंतू ती कोणाला दिसत नाही. त्याचं कारण काय असावं? ते कारण कुणालाच सापडलं नाही. कदाचीत तुम्ही जर त्या कारणाचा वा त्या नदीचा शोध घेतला तर बरे होईल. तसे तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहात."
अमोल पुस्तकी किडा होता. तसं पाहता सुरुवातीला त्याला राजकारणात उत्साह नव्हता. त्याला इतिहास विषय आवडायचा. त्यामुळंच की काय, प्राध्यापकांकडून सरस्वतीच्या शोध आणि कारणाविषयी माहीती ऐकल्यावर तो अति आनंदीत झाला. त्याला वाटायला लागलं की आपणही सरस्वतीचा शोध घ्यावा. तसं पाहता त्याला अंबिकानं गत काही दिवसापुर्वीच सुचवलं होतं की त्यानं भविष्यात लुप्त झालेल्या सरस्वतीचा शोध घ्यावा. तशी ती सरस्वतीचा शोध घे असं सुचविणारी एक मुलगी असल्यानं व ते त्याला तरुणाईतच शोधायचं सुचविल्यानं त्याला ते तिचं तसं सुचवणं आवडलं व तो सरस्वतीच्या शोधार्थ प्रयत्नाला लागला. जर तसं सुचविणारा मुलगा जर असता तर कदाचीत त्यानं सरस्वतीच्या शोधाचा प्रयत्नही केला नसता नव्हे तर शोधलंच नसतं.
सरस्वतीच्या शोधाचा विचार करीत असतांना तो ती नदी कोठून आली? केव्हा आली याचा शोध घेवू लागला. त्यासाठी तो बरीच पुस्तकही हाताळू लागला. तशी त्याला बरीच सरस्वती नदीबद्दल माहिती झाली होती.
सरस्वती ही पुर्वी नदी नव्हती तर ते एक व्यक्तीमत्व होतं. कोणी म्हणतात की तिला ब्रम्हानं आपल्या तेजाने जन्म दिला. तशी ती लहानाची मोठी होवू लागली. ती जेव्हा यौवनावस्थेत आली, तेव्हा ती अधीकच सुंदर दिसू लागली होती.
गंगा, लक्ष्मी व सरस्वती या तीनही मैत्रीणी होत्या. त्या एकमेकांवर प्रेम करीत असत. त्या तिघी जशा एकमेकांवर प्रेम करीत. तशा त्या विष्णूवरही प्रेम करीत होत्या. परंतू त्या विष्णूवर प्रेम करतात हे काही विष्णू वा त्या तिघींना माहीत नव्हते. परंतू जेव्हा माहीत झाले, तेव्हा सरस्वती आपल्या दोन्ही मैत्रीणीचा द्वेष करायला लागली. त्यातच त्या तिनही मैत्रीणी एकमेकींचा द्वेष करायला लागल्या होत्या.
लक्ष्मी, गंगा व सरस्वती या एकमेकींशी द्वेष करायला लागल्या होत्या. त्यातच त्या द्वेषाचं रुपांतर त्यावेळी शापात झालं. ज्यावेळेस त्यांचं कडाक्याचं भांडण झालं. सरस्वती मोठी होती. ती गंगेला म्हणाली,
"मी तुला शाप देते की तू जलवाहिनी बनशील. तू भूतलावर जाशील व निवास करतील. तुझ्या पात्रात लोकं मलमुत्र आणि आपल्या शरीराची राख शिरवतील. तुझ्यात सांडपाणी मिसळवतील व तुला पायदळी तुडवतील."
सरस्वती बोलून गेली खरी. परंतू तिच्या शाप देण्याचा राग गंगेलाही आला. तशी ती कमजोर नव्हतीच. तिही सरस्वतीला शाप देत म्हणाली,
"मिही तुला शाप देते की तू देखील जलवाहिनी होशील. तुही भूतलावर जाशील व निवास करतील. तुझ्यातही लोकं आपल्या मृत शरीराची राख शिरवतील, सांडपाणी आणि सर्वकाही. तुला तेव्हा स्वतःचीच लाज वाटेल व त्या लाजेनं तुला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही. मग तू भुतलावरच लपत फिरशील."
सरस्वतीनं गंगेला जसा शाप दिला. तसाच शाप तिनं लक्ष्मीलाही दिला. ती म्हणाली,
"मी तुला शाप देत आहे की तू भुतलावर जाशील व एका झाडाच्या रुपात जन्म घेशील."
लक्ष्मीला सरस्वतीनं शाप देताच तिही काही चूप बसली नाही. तिही तिला शाप देत म्हणाली,
"सरस्वती, तूला आपल्या अहंकाराचा गर्व झालाय ना, परंतू एक लक्षात ठेव. तूझ्या हातून असं लांच्छनपद कृत्य घडेल की ज्या कृत्यानं तुलाच नाही तर तुझ्या पतीलाही तोंड दाखवायला जागा उरणार नाही."
तो काय. मुळातच तो काळ सत्ययुगाचा. त्या काळात शापवाणी यशस्वी होत होती. त्यातच त्या तिघींनीही एकमेकींना दिलेला शाप. तो शाप का बरं यशस्वी होणार नाही? गंगेनंही सरस्वतीला शाप दिला. तसा सरस्वतीनं गंगेला शाप दिला. सरस्वतीनं लक्ष्मीला शाप दिला. तसा सरस्वतीला लक्ष्मीनं शाप दिला. तशी तिघींचीही इच्छा श्रीहरी विष्णूशी विवाह करण्याची होती.
काही दिवस बरे गेले. काही दिवसानंतर ती शापाची गोष्ट खरी ठरणार याचं भय गंगा, सरस्वती व लक्ष्मीला वाटू लागलं. त्यावर त्या विचार करु लागल्या. विचारांती एकमेकांशी चर्चा करु लागल्या. चर्चेअंती त्यांनी ठरवलं की आपण या गोष्टीवरील उपाय श्रीहरी विष्णूलाच विचारावं. तेच योग्य ते मार्गदर्शन करतील. कारण त्यांना माहीत होतं की श्रीहरी विष्णू हे अतिशय हुशार असून तेच यावर योग्य तो उपायही काढू शकतील.
तो त्यांचा विचार. तसा विचार करताच ते विष्णूकडे गेले. त्यांनी आपण केलेला प्रकार त्यांना कथन केला. झालेल्या चुकीबद्दल क्षमायाचना केली. तसे विष्णू म्हणाले,
"बरं झालं मला ही गोष्ट माहीत केली ते. जे तुमच्या वाचेतून निघालं. ते बदलू शकत नाही. ती गोष्ट घडणारच. मात्र तुमचं माझ्यावरचे प्रेम पाहून मी तुम्हाला वचन देतो की मी पृथ्वीलोकात तुमच्या सानिध्यातच असेल. तुम्हाला नेहमीच दर्शन देत राहणार. मात्र या शापानुसार तुम्ही पृथ्वीतलावरच राहाल. त्यांची सेवा करण्यासाठी. तुम्ही या स्वर्गात कधीच परत येणार नाही. त्यांची सेवा करण्यासाठी सदैव पृथ्वीवर राहाल. तुम्हीही परत याल. जेव्हा ते पृथ्वीतलावरील लोकं जास्त प्रदुषण करतील. तुमचं काहीच ऐकणार नाही. तेव्हाच तुम्ही स्वर्गात परत याल." ते त्यांचं बोलणं. तसे ते सरस्वतीला म्हणाले,
"सरस्वती, तू शापानुसार लुप्त होशील. इथं येण्याचा प्रयत्न करशील. परंतू कलीयुगात असाही एक व्यक्ती येईल की जो तुला पुन्हा शोधून काढेल. केवळ शोधूनच काढणार नाही तर तुला वाहण्यासाठी वाट मोकळी करुन देईल. तेव्हा तुझ्यात अहंकार राहणार नाही व तू अहंकार सोडून पृथ्वीतलावरील सर्व लोकांची सेवा करशील. त्यानंतर तिलाही स्वर्गात परतण्यासाठी बरीच वाट पाहावी लागेल."
ते श्रीहरी विष्णू. तशा त्या तिघींही श्रीहरी विष्णूवर प्रेम करीत होत्या व त्या तिघीही श्रीहरी विष्णूला आवडत होत्या. कारण ते जगाचे पालनहार होते. त्यांना सर्व जग समानच होते. ते तरी काय करणार होते. कारण ते सर्व विधिलिखितच होतं. त्यातच ती शापवाणी होती.
ती शापवाणी खरी ठरणार होती. तशी कल्पना श्रीहरी विष्णूंना होती. तसे ते कल्पकच आणि तेवढेच दुरदर्शीही होते. त्या शापवाणीनुसार म्हटलं जातं की त्यातील दोघींही जलवाहिनी म्हणून नदीरुपात आल्या. त्या आपल्या आजूबाजूलाच वाहायला लागल्या. गंगा व बाजूलाच सरस्वती व तिच्याच बाजूला यमुना. कोणी कोणी या यमुनेलाच लक्ष्मी म्हणतात. परंतू लक्ष्मी पृथ्वीतलावर एका झाडाच्या रुपात अस्तीत्वात आली. ते झाड म्हणजे तुळस. त्या सरस्वतीनं गंगेला दिलेल्या शापवाणीनुसार गंगा नदी भुतलावर आली. आता निवास करीत आहे आणि आज तिच्यात माणसं आपलं मलमूत्र टाकून व सांडपाणी टाकून तिला दुषीत करीत आहेत. हे दुषीत करणं तिला जणू पायदळी तुडविण्यासारखं आहे. तसंच तिच्यात माणसं याच पृथ्वीवर मृत झालेल्या माणसांची राख मिसळवीत आहेत. तसंच त्या शापवाणीनुसार सरस्वतीही भुतलावर आली. परंतू ती डोळ्याला दिसत नाही. गुप्त स्वरुपात निवास करीत आहे. जणू काही गंगेनं म्हटल्यानुसार लाजेनं. तिला जणू तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही. असं गंगेनं म्हटलं होतं. त्यामुळंच की काय, ती लुप्त झाली आहे. तिचा स्वर्गात जाण्याचा विचार आहे. परंतू ती शापवाणीनुसार स्वर्गात जावूच शकत नाही. म्हणूनच ती पृथ्वीतलावर गुप्त स्वरुपात वावरत आहे.
मध्यंतरीचा काहीसा काळ तिच्यासाठी चांगला होता. तिच्या तटावर बसून कवीनं कवनं केली. वैदिक धर्माचे जे चार वेद आहेत. त्याचीही रचना याच नदीतटावर झाली. तसंच महाभारत ग्रंथाची रचनाही याच नदीच्या तटावर झाली. श्रीहरी विष्णूनं दिलेल्या वचनानुसार या सरस्वती नदीचा उगम हा हरयाणामधील यमुनानगरच्या भागात झाला. हरियाणा याचा मुळात अर्थ ज्या प्रदेशावर हरीची कृपा आहे किंवा ज्या ठिकाणी प्रत्यक्ष हरी राहतात असा प्रदेश. हरी म्हणजे प्रत्यक्ष विष्णू. या प्रदेशावर हरीची एवढी कृपा आहे की या प्रदेशात धनधान्य पुष्कळ प्रमाणात पिकतं. तसंच दुधदुभतेही विपुल प्रमाणात आहेत. येथील गाईंना देशविदेशात भरपूर मागणी असून त्या गाई हरीयाना गाई याच नावानं प्रसिध्द आहेत. या गाई भरपूर दूध देण्यासाठी प्रसिध्द आहेत. श्रीहरी विष्णूनं सरस्वतीला दिलेल्या वचनानुसार तिचा उगम याच हरीयाना भागात झालेला असल्यानं तिच्यावर विष्णूची कृपा आहे व ती सतत विष्णूच्या सानिध्यात आहे.
यमुना नावानं साक्षात लक्ष्मीचा जन्म झालेला नसला तरी तसा जन्म झालेला समजून जगजाहीर आहे की श्रीहरी विष्णू हे तिला भेटायला क्रिष्ण रुपात पृथ्वीवरच आले होते. तसंच ज्यावेळेस कालिया मर्दन केलं गेलं. त्यावेळेसही ते यमुनेच्या गर्भात शिरले होते. अशाप्रकारे त्यांनी साक्षात लक्ष्मीला पृथ्वीतलावर दर्शन दिलं होतं. कोणी म्हणतात की लक्ष्मी पृथ्वीवर तुळशीच्या रुपात जन्मलेली असून दरवर्षी श्रीहरीनं म्हटल्याप्रमाणेच श्रीहरी तुळशीविवाहाच्या दिवशी तिला प्रत्यक्ष भेटायला येतो. तशीच गंगाही हिमालयातून उगम पावत असून तिही विष्णूच्या सानिध्यात आहे.
**********************************************************

ती शापवाणी........त्या शापवाणीत लक्ष्मी म्हणाली होती सरस्वतीला, 'तुझ्या हातून असं लांच्छनास्पद कृत्य घडेल की ज्या कृत्यानं तुलाच नाही तर तुझ्या पतीलाही तोंड दाखवायला जागा राहणार नाही.' ती शापवाणीही खरी ठरली. जेव्हा ती तरुण झाली.
सरस्वती, गंगा आणि लक्ष्मी या तिघीही दिसायला सुंदर होत्या. सरस्वतीला गाण्याचा छंद होता. ती गाणे गात असायची कुठेही बसून. तसा तिचा आवाज गोड होता. एकदा अशीच एका सरोवराच्या काठावर बसलेली असतांना ती गाणे गात होती. तिचा आवाज गोड असल्यानं तिच्या गोड आवाजावर बम्हा प्रत्यक्ष तिचा पिता मोहीत झाला. त्यात त्यांचाही दोष नव्हता. त्यानं बालपणात तिला जन्म तर दिला होता. परंतू तिला स्वच्छंद विहार करण्यासाठी मोकळं सोडून दिलं होतं. त्यातच ती जेव्हा तरुण झाली. ते तिच्या वडीलांना माहीत नव्हतं. कारण असं आहे की आपल्या घरच्या ब-याचशा गोष्टी शेजा-यांना माहीत असतात. परंतू आपल्याला माहीत नसतात. तेच घडलं बम्हाच्या बाबतीत. तसं पाहता त्यांनी तिला ओळखलं नाही व पाठीमागून येवून तिला म्हणाले,
"प्रिये, मी तुझ्यावर मोहीत झालेलो असून मला तुझ्यासोबत विवाह करायचा आहे. बोल करशील का माझ्याशी विवाह? आपण दोघंही मिळून सृष्टीची रचना करु."
ते ब्रम्हाचे बोल. तसं बालपणातच तिला आपल्या दिव्य तेजानं त्या ब्रम्हानं जन्म देवून सोडल्यानं तिलाही तो तिचा पिता असल्याचं माहीत नव्हतं. त्यामुळंच तिनंही होकार दिला व दोघांचाही विवाह पार पडला.
दोघांचाही विवाह पार पडला. तसे दोघंही जण अगदी सुखात राहू लागले. तोच एक दिवस श्रीहरी विष्णू त्याचेकडे आले असता ब्रम्हानं तिची ओळख त्यांना करुन दिली. तेव्हा विष्णू म्हणाले,
"ब्रम्हाजी, आपण हे काय केलंत? हे पाप घडलंय आपल्या हातून."
तो 'पाप' शब्द. तो शब्द ब्रम्हाच्या कानावर पडताच श्रीहरी विष्णूला ते म्हणाले,
"पाप! माझ्या हातून पाप घडलं म्हणता? ते कसं काय?"
"ही सरस्वती आहे ना. ही आपली पुत्री आहे पुत्री."
"पुत्री! माझी पुत्री."
"होय, तुमचीच पुत्री."
"ते कसं काय?"
"तुम्ही तुमच्या तेजानं जन्मास घातली ना. मग ओळखता देखील नाही येत आपल्या स्वमुलीला. ओळखा. अन् आताही वेळ गेलेली नाही. आताही सोडून द्या हिला. दोष तुमचा नाही. यात दोष सरस्वतीचा देखील आहे. हिला देखील आपल्या जन्मदात्या पित्याला ओळखता आलं नाही काय?"
ब्रम्हानं डोळे मिटले. त्यांना स्वतःच्या कृत्याबद्दल पश्चाताप होत होता. तरीही ते कृत्य पडताळून पाहण्यासाठी त्यांनी डोळे मिटले. क्षणातच त्यांना कळलं की ती सरस्वती त्यांची मुलगी आहे. तसं माहीत होताच त्यांनी डोळे उघडले व श्रीहरी विष्णूला म्हणाले,
"भगवन, मला माफ करा. मी माफीच्याही लायक नाही. माझ्या हातून न होणारं कृत्य घडलंय."
ते ब्रम्हाचे बोल. तसे विष्णू म्हणाले,
"मी काय माफ करणार तुम्हाला. मी कदाचीत माफही करुन टाकेल. परंतू ही जनता! ही जनता माफ करेल का तुम्हाला? तुम्ही सृष्टी निर्माते जरी असले तरी तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तशीच ही सृष्टीही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तसेच तुम्ही जरी सृष्टीनिर्माते जरी असले तरी तुमची पुजा कधीच भुतलावर होणार नाही."
श्रीहरी काय बोलायचं ते बोलून गेले. त्यानंतर ते निघून गेले. दोष त्यांचाही नव्हता आणि तिचाही नव्हता. ती अनवधानाने घडलेली गोष्ट होती. परंतू ते कृत्य वाईटच होते.
श्रीहरी विष्णू निघून जाताच ब्रम्हाला पश्चाताप झाला. ते सरस्वतीला म्हणाले,
"आपण असा विवाह करुन घोर पाप केलं आहे. माहीत आहे, आपण केलेल्या पापाला क्षमा नाही. यात दोष माझा जरी असला तरी तेवढाच दोष तुझाही आहे. मात्र आजपासून तरी आपण वेगळं राहिलेलं बरं. मी विवश आहे की मी कुठं जावू शकत नाही. मात्र तू निघून जा."
ते ब्रम्हाचे बोल. तशी सरस्वती म्हणाली,
"मी तरी कुठे जावू? आजपर्यंत इथं राहिली. आताही इथंच राहणार. झाली ती झाली चूक. काय आपल्याला माहीत होतं का? काय, आपण जाणूनबुजून केली काय चूक? नाही ना. मग कशाला घाबरायचं?"
"नाही, तुला कळत नाही. जर तू अशी जाणार नाहीस तर मी सृष्टी निर्माण करायचं कार्य कायमचं बंद करेल." ब्रम्हा म्हणाले व चूप बसले.
काही दिवस असेच गेले. ब्रम्हानं आपले कार्य बंद केले. सृष्टी नष्ट होत होती. परंतू ती निर्माणच होत नव्हती. ब्रम्हा सृष्टी निर्माणाचं कार्यच करीत नव्हता सरस्वतीला म्हटल्याप्रमाणे. सरस्वती ते सर्व पाहात होती. तिला फार वाईट वाटत होतं. तसं तिला त्या ब्रम्हाला सोडावंसं वाटत नव्हतं. परंतू ती तरी काय करणार! तिही विवश झाली. तिच्यासमोर नाईलाज होता. सृष्टी निर्माणच झाली नाही व नष्टच होत गेली तर.......तर कदाचीत सर्व काही नष्ट होईल. सर्व बंजर होईल. आनंद उरणार नाही. शेवटी तिनं विचार केला. विचार केला की आपण जायचं. आपल्या जन्म दिलेल्या बापाला आणि आपल्या अनवधानाने बनलेल्या पतीला सोडून जायचं. कशासाठी? कशासाठी तर सृष्टीचं रक्षण करण्यासाठी. सृष्टी टिकविण्यासाठी आणि तिचं जतन करण्यासाठी. तिचं जतन करणं काळाची गरज आहे. आपण जायचं पृथ्वीतलावर. कधीही न परतण्यासाठी. पृथ्वीवासीयांची सेवा करायची निःस्वार्थपणानं. तिनं जणू शपथच घेतली की मी पुन्हा कधीच स्वर्गात परतणार नाही. कदाचीत मी स्वर्गात परतताच ब्रम्हा निराश होतील व सृष्टी निर्माणच करणार नाहीत. असंही तिला वाटत होतं.
तिनं तसा विचार करताच ती पृथ्वीवर आली. निराश आणि दुःखी अंतःकरणानं. ती पृथ्वीवर येवून वाहू लागली होती. आपल्या पाण्यानं सृष्टी समृद्ध करीत होती. मात्र एक शापवाणी अजूनही बाकी होती. ती म्हणजे लक्ष्मीनं दिलेला तिला शाप. तो आणखी एक शाप होता, तुला अहंकाराचा गर्व झालाय. याचाही परिणाम तुला भोगावाच लागेल.
ती शापवाणी होती. परंतू ती शापवाणी तिच्या लक्षात नव्हती. ती शापवाणी ती हळूहळू काळानुसार व विधिलिखितानुसार भोगत होती. सरस्वती भुतलावर आली होती. तशी ती वाहात होती. आपल्या कार्यकर्तृत्वानं ती भुमी समृद्ध करीत होती. ती वाहात होती माणा या गावातून. माणा या गावातून वाहता वाहता ती हिमालयाच्या सिरमौर्यराज्य, त्यानंतर अंबाला, कुरुक्षेत्र, कैथलमधून पटियाला राज्यातून पुढे वाहात जावून अरबी समुद्रात मिळत होती. या आपल्या मार्गातील हिमाचल प्रदेश, हरीयाणा, पंजाब व राजस्थानचा भाग समृद्ध करीत होती. आज ते संपूर्ण भाग केवळ भारतात नाही तर पाकिस्तानातही आहेत. म्हणतात की या नदीची रुंदी आठ ते पंधरा किमीची होती. तर लांबी सोळाशे किमी होती. तशीच तिची खोली पंधरा मीटर होती. तिचं उगमस्थान आदिबद्री अर्थात माणा हे गाव होतं असं मानलं जातं. सरस्वतीच्या शोधाचा विचार करीत असतांना अमोलनं जी पुस्तके चाळली. त्यातून त्याला बरीचशी माहिती मिळालेली होती. तसा तथ्यांशही समजलेला होता.
कालांतरानं सरस्वती लुप्त झाली. तिला स्वर्गात जावंसं वाटत होतं. परंतू ती जाणार कशी? तिला आठवत होते तिचेच ते विचार. आठवत होती तिला, तिच्या आणि त्या ब्रम्हाच्या हातून घडलेली चूक आणि ते विचार होते तिच्या मनात की मी काहीही झाले तरी स्वर्गात परत येणार नाही. कदाचीत मी परतताच ब्रम्हा सृष्टी निर्माणच करणार नाहीत हीच भीती होती तिच्या मनात. म्हणूनच ती स्वर्गात परतली नाही. पृथ्वीवरच गुप्त स्वरुपात वाहात राहिली.
अमोल लहान होता, तसा तो लहान असतांनाच चिकित्सक बुद्धीमत्तेचा असल्यानं तो शिक्षकांना कोणतेही प्रश्न विचारत असे. ज्या प्रश्नाला उत्तरच नसे. परंतू जसजसा तो मोठा होवू लागला, तसतसं त्याच्या शिक्षकांना वाटायला लागलं की हा कोणी वेगळाच पुरुष बनेल. केवळ पुरुषच नाही तर महापुरुष बनेल. ज्याचे शब्द न् शब्द लोकं ऐकतील.
अमोल वेगळेच असे लहानपणी प्रश्न विचारायचा. त्यामुळं तो वेडाच वाटायचा. परंतू तो वेडा नव्हता. अंबिका मात्र हुशार होती. ती त्याच्या त्या प्रश्न विचारण्याच्या सवयीनं त्याला वेडीच समजायची नव्हे तर त्याला तुच्छही समजायची. ती तुच्छ समजत होती त्याला. काहीबाही बोलायची कधीकधी. तरीही तो तिला काही म्हणत नव्हता. त्याला वाटत होते की कोणीच कोणाला तुच्छ समजू नये वा तुच्छ लेखू नये. या जगात कोणीच तुच्छ नाही. कारण प्रत्येकालाच जीवन जगण्याचा सारखा अधिकार असून तो अधिकार विधात्यानं आधीच प्रदान केलेला आहे.

**********************************************************

आज परिस्थिती वेगळीच आहे. या परिस्थितीची वास्तविकता पाहता असं जाणवतं की या परिस्थितीत काही लोकं स्वतःला फार मोठे महात्मा समजतात आणि दुस-याला तुच्छ समजतात. लोकांच्या तोंडून नेहमी शब्द बाहेर पडत असतात की किती घाणेरडे आहेत हे लोक. किती तुच्छ आहेत हे लोक. परंतू तसे म्हणण्याचा कोणालाच अधिकार नाही. कारण आपली विचारशक्तीच मुळात तुच्छ आहे. म्हणून आपल्याला तसं दिसणारंच यात तसूभरही असत्यता नाही.
देशात विविध प्रकारचे लोक राहतात. त्यात गरीब श्रीमंतही असतात. कोणी उच्च जातीत जन्माला येतात. कोणी कनिष्ठ जातीत. कोणी शेतकरी बनतात. कोणी व्यापारी तर कोणी सरकारी नोकरदार. या घडून येणा-या गोष्टी, या गोष्टी प्रारब्धानं घडून येतात. या दृष्टिकोनातून अशी एक म्हण आहे की सगळेच कुत्रे काही काशीला जात नाही. काही गावातही राहतात. हे शंभर प्रतिशत सत्य आहे. कारण सर्वच लोकं काही पंतप्रधान बनत नाहीत. काही सामान्य शेतकरीही बनत असतात.
आपापलं प्रारब्ध. कोणी कोणी प्रारब्ध मानत नाहीत. ते म्हणतात की कार्य केल्यास फळ मिळतं. परंतू फळ मिळविण्यासाठी आधी कार्य करायला हवे की नाही. त्यांचही बरोबरच. परंतू याबाबत एक मत आहे, ते म्हणजे कार्य. कार्य तर शेतकरी आणि शेतमजूरही करतात. अपार मेहनत करतात ते. तरीही त्यांना सुख असतं का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. त्यांची मुलंही अपार मेहनत करीत करीत आपलं आयुष्य काढत असतात. याला काय म्हणावे? कधीकधी एखाद्या वेळेसच चमत्कार होतो आणि त्यांना नोकरी लागते व त्यांचा कायापालट होतो. याउलट ज्यांचा जन्म अति श्रीमंत कुटूंबात होतो, त्याला अमाप सुख मिळतं जन्मापासूनच. त्यांना जीवन जगतांना कोणताच त्रास होत नाही. ते सुखी असतात संपुर्ण आयुष्यभर. याला काय म्हणावे? यालाच प्रारब्ध नाव देता येईल. आज तेच प्रारब्ध. त्याच प्रारब्धानुसार माणसाचे सुख दुःख ठरलेले आहे असे दिसते.
आयुष्यात आपापल्या प्रारब्धानुसार कोणत्याही गोष्टीचे तीन स्तर पडतात. उच्चस्तर, मध्यमस्तर आणि कनिष्ठ स्तर. मध्यम स्तराबाबत काही भानगड नाही. तो स्तर दोघाही स्तराला जोडतो. तरीही याबाबतीत सांगायचं झाल्यास आज उच्चस्तर आणि कनिष्ठ स्तर यात फार मोठी दरी आपल्याला जाणवते. ती दरी कोणती? तर ती दरी आहे विषमतावादाची. त्यालाच भेदभाव असं म्हणता येईल. आता या स्तराचा संबंध समाजाशी जोडू.
समाजातही उच्च, मध्यम व कनिष्ठ वर्ग असतात. यात उच्च वर्ग हा कनिष्ठ वर्गाला हिन लेखतो. त्यांना तुच्छ समजतो. त्यांच्याशी व्यवहार करणं टाळतो. त्यांच्याकडे अतिशय तुच्छ नजरेनं पाहतो. परंतू याचा विचार करीत नाही की आपणही आईच्या गर्भात नवच महिने अधिवास केला. कोणीही आईचा लाल बारा महिने आईच्या गर्भात राहिलेला नाही. आता जो आईच्या गर्भात बारा महिने राहिलेला नाही, मग तो उच्च कसा? तसंच प्रत्येकाचं शरीर हाड, मांस आणि रक्ताचं बनलेलं असतांना एक उच्च आणि दुसरा कनिष्ठ कसा? फरक एवढाच आहे की त्यांच्या त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांचा जन्मच मुळात कनिष्ठ व उच्च जातीत झाला. मग त्यात आपल्याला उच्च कनिष्ठ मानण्याचा अधिकार कोणी दिला? याचं उत्तर आपल्याजवळ नसेलच. उदा. द्यायचं झाल्यास एखादा व्यक्ती मुख्यमंत्र्याच्या घरात जन्माला येतो. तो भावी काळात मुख्यमंत्री वा आमदार खासदार बनला तर त्यात कोणतं तीर मारणं झालं? हं, एखाद्या गरीब शेतक-यांचा मुलगा जर आमदार, खासदार बनला वा मुख्यमंत्रीपद त्याला मिळालं, तर त्याला विशेष महत्त्व देतात येईल.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आज कलियुग आहे. या काळात कोणीच मोठा नसला आणि कोणीच लहान नसला व प्रत्येकजण आईच्या गर्भात नवच महिने राहिलेला असला वा प्रत्येकाला हाड, मांस व रक्त समान असलं तसेच कोणीच व्यक्ती सोन्या, चांदीचा बनलेला नसला तरी काही लोकं स्वतःला फार मोठे समजतात. त्यांचा जन्म त्यांच्या प्रारब्धानुसार उच्च जातीत वा उच्च घराण्यात झाल्यामुळेच ते गरीब वा कनिष्ठ जातीला तुच्छ समजून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करीत असतात आणि बिचारे तेही आपल्यावर होणारा अन्याय, अत्याचार निमुटपणे सहनच करीत असतात.
आजपर्यंत आपण पाहिलंच आहे की पुर्वी समाजात असाच कनिष्ठ आणि तुच्छ समजून अन्याय, अत्याचार झाला. कित्येक अस्पृश्यांना मारलं गेलं याच तुच्छ समजण्यातून. कित्येक महिलांच्या जिंदग्या बरबाद केल्या गेल्या याच तुच्छतेच्या भावनेतून. खरंच ही तुच्छतेची दरी मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब लढले. त्यांनी संविधानात कलमांचाही समावेश केला. परंतू खरंच समाजातील हा तुच्छपणा मिटला काय? याचं उत्तर नाही असंच आहे.
विशेष सांगायचं म्हणजे तिही माणसंच आहेत, गरीब असली तरी. त्यांनाही भावभावना आहेत, ते मुकाट्यानं ऐकून घेत असतील, तरी आणि त्यांनाही इतरांसारखं सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार आहे. हं, ठीक आहे की आपला जन्मच आपल्या प्रारब्धानुसार श्रीमंत घरी झाला. परंतू याचा अर्थ असा नाही की आपण कोणाला तुच्छ समजावं. त्यांच्याशी हिनतेचा व्यवहार करावा. त्यांना काहीबाही बोलावं.
आपण हे लक्षात ठेवावे की या सर्व गोष्टींचा हिशोब होत असतो. जो असा व्यवहार करतो, तो कधीच पुढं जात नाही. कधी प्रारब्धानुसार असं घडतं की तो पटकन खाली येतो. त्याची अधोगती होते व त्यानंतर विचार करायला वेळच मिळत नाही. म्हणून आज कोणी कोणालाच तुच्छ समजू नये. आज आपण पाहिलेलं आहे की बरेचसे राजे राजाचे रंक बनलेले आहेत. कालचे राजे असलेले काही आदिवासी आज रस्त्यारस्त्यावर भीक मागतांना दिसत आहेत. याबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास कौरव पांडवांचं देता येईल. प्रचंड शक्तीसामर्थ असलेले कौरव आपल्या अशाच हेकेखोर व हिन विचारशक्तीनं अठरा दिवसाच्या युद्धामध्ये पुर्णतः समाप्त झाले. पर्यायानं सांगायचं झाल्यास आपला हेकेखोरपणा वा आपली हिन विचारशक्ती जास्त दिवस टिकत नाही. तिचा अंत होतो. दिवसानंतर रात्र येणारच व रात्रीनंतर दिवस. तसंच पोर्णीमेनंतर अमावस्या व अमावस्येनंतर पोर्णीमा. कारण तो निसर्ग नियम आहे. म्हणूनच कोणी कोणाला तुच्छ समजू नये म्हणजे मिळवलं. विशेष सांगायचं म्हणजे लोकं तुच्छ नाहीत. जरी ते गरीब असले तरी वा त्यांचा जन्म कनिष्ठ जातीत झाला असला तरी. आपणच तुच्छ आहोत. कारण आपली विचार करण्याची पात्रताच तुच्छ आहे. आपण आधी ती पात्रता बदलवावी. मगच लोकांना आपण तुच्छ समजावे. अन्यथा आपल्याला इतर कोणाला तुच्छ समजण्याचा अधिकार नाही. तसेच संतही........खरे संत आज दिसतच नाहीत. ख-या संताला देश पारखा झालाय असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आज देशात अशीच संतांची ख्याती निर्माण झाली आहे. आजचे संत हे पोटभरु असून व्याभीचार मुक्तही नाहीत.
संत हे कालही होते. आजही आहेत आणि उद्याही राहणार. कालच्या संतांचा इतिहास पाहता, काल जे संत झाले, त्या संतांची परीक्रमा वाखाणण्याजोगी होती. ते संत लोकांना दिशा दाखविण्याचं काम करीत असत. प्रसंगी अशी दिशा दाखवीत असतांना येथील दांभीक समाज आपल्याला वाळीत टाकेल याची पर्वाही करीत नसत. त्यांचं जे कार्य असायचं, त्यात स्वार्थपणा नव्हताच. आज त्यांचा इतिहास वाचला की आपल्या अंगावर शहारे उमटतात. उदाहरण द्यायचं झाल्यास संत एकनाथांचं देता येईल. संत एकनाथ महाराजांचं उदाहरण घेवू. ते नदीवर स्नानाला गेले असतांना त्यांच्या अंगावर एक व्यक्ती त्यांची अंघोळ झाल्यावर थुंकला, त्यानंतर पुन्हा अंघोळ केल्यावर पुन्हा थुंकला. असा थुंकण्याचा प्रकार एकशे एक वेळा चालला व त्यांनी न रागावता एकशे एक वेळा अंघोळ केली. आजचा संत जर असता तर त्यानं फक्त दोनचार वेळा अंघोळ केली असती. पाचव्यांदा थोबाडीत मारली असती. हा आहे, पुर्वीच्या संताचा आणि आजच्या संतांचा महिमा. पुर्वीचे संत मुक्या प्राण्याचा जीव वाचवितांना तो आपल्याला इजा करीत आहे. याचा विचार करीत नव्हते. एकदा एक विंचू पाण्यात पडत असतांना त्या संताला वाटले की फुकटच पाण्यात राहून याचा जीव जाईल. त्यानं त्याला बाहेर काढलं. तेव्हा त्या विंचवानं त्याला दंश केला. तसा परत तो पाण्यात पडला. तसं परत त्या संतानं त्याला बाहेर काढलं. परत त्यानं चावा घेतला. असं बरेचदा घडलं. परंतू ना संतानं आपलं कार्य बंद केलं, ना विंचवानं. शेवटी त्या संतानं त्याचा जीव वाचवला. त्यानंतरच त्यानं दम घेतला. आजचा संत असता तर त्यानं त्या प्राण्यांचा जीव वाचवला नसता, उलट त्याला यमसदनी पोहोचवलं असतं.
संत ज्ञानेश्वर.........संत ज्ञानेश्वरांना आपण संत म्हणतो, परंतू त्यांना तत्कालीन परिस्थितीत किती त्रास सहन करावा लागला याची कल्पना करवत नाही. माधुकरी मागतांना त्यांना माधुकरीही मिळायची नाही. अक्षरशः उपाशी झोपावं लागायचं. परंतू आजच्या संतांजवळ एवढं घबाड असतं की ज्यांची संपत्ती मोजताच येत नाही. एवढी प्रचंड स्वरुपात संपत्ती असते. मोठमोठे आश्रम असतात. ही संपत्ती येते कुठून? काय, संत कामाला जातात? कारखान्यात मेहनत करतात? मजूरी करतात की त्यांचे मोठमोठे उद्योग असतात? तरीही त्यांच्याजवळ मोजता येत नाही, एवढी संपत्ती. खरं तर ही संपत्ती जप्त व्हायला हवी. कोणी म्हणतात की ही संपत्ती त्यांना दान म्हणून मिळालेली असते. हो, ठीक आहे. दानात मिळालेली संपत्ती. मग ही संपत्ती घेतातच कशाला दानात? अन् समजा एखाद्यानं दानात अशी संपत्ती दिलीच तर ती संपत्ती वाटून द्यावी ना गरीबांना. त्यांच्या तरी कामात येईल ती संपत्ती. परंतू आजचे संत तसे करीत नाहीत. कारण ते मुळातच संतच नाहीत.
खरे संत हे पुर्वीच्या काळातील. हे मी आधीच म्हटलंय. संत तुकारामांनी आपल्या इह गोष्टीचा त्याग केला व ते डोंगरावर जावून बसले. संत रामदास स्वामींनी आपल्या संसाराचा त्याग केला व ते विवाह करतेवेळी कायमचेच सावधान झाले. आयुष्यभर ब्रम्हचर्य सांभाळला. त्यांनी व्याभीचार अजिबात केला नाही. अन् आजचे संत व्याभीचारी आहेत, हेही सिद्ध झालंय. ते स्वतःला ब्रम्हचारी समजतात. ब्रम्हचारी असल्याचं सांगतात. तसं दाखवतातही. परंतू त्यांची सेवा करायला कितीतरी कौमार्य वयातील मुली असतात नव्हे तर ते तशा कौमार्य वयातील मुलींचा लैंगिक अत्याचार करण्यासाठी वापर करीत असतात. हे आजचे संत आणि आपण अशाच संतांवर विश्वास ठेवून त्यांना एवढे मानतो की त्याच्यासारखा आपल्याला कोणी देवच मिळालेला नाही. तोच आपला जणू खराखुरा आणि सर्वात मोठा देव आहे असं वाटतं आपल्याला.
संताबाबत महत्वाचं सांगायचं झाल्यास खरा संत हा परमार्थ साधणारा असायला हवा. त्याच्याजवळ राग, लोभ, मद, मत्सर नसावा. गडगंज संपत्ती नसावी. समजा कोणी जबरदस्तीनं संपत्ती दानात दिलीच तर ती वाटून द्यावी गोरगरीबांना. समाजात असे गोरगरीब भरपूर असतात. तो ज्ञानी असावा. संसारी असला तरी चालेल, परंतू व्याभीचारी नसावा. त्यानं समाजाला आपल्या वाणीतूनच नाही तर आपल्या कर्तृत्वातून दिशा द्यावी. नाहीतर आजचे संत, बोलतात एक आणि कर्तृत्व दुसरंच असतं. संतांजवळ भक्तांबाबत भेदभाव नसावा. कारण आजच्या संताजवळ भेदभावही दिसतो. ते धनिकांना जवळ करतात आणि गरीबांना दूर लोटवतात. अशी स्थिती आढळून येते. ते जेव्हा व्याख्यान द्यायला येतात. तेव्हा त्यांच्या व्याख्यानात गरीबांना प्रवेश नसतोच. खुर्च्या लावलेल्या असतात. त्या खुर्च्या अशा लावलेल्या असतात की लोकांच्या थाटबाटानुसार त्यांच्या जागा ठरलेल्या असतात. जो जास्त पैसा देईल. तो पहिल्या रांगेत. जो नाही देणार, त्याला शेवटच्या रांगेत. तसंच या ठिकाणी थेट भिका-यांना प्रवेश नसतोच. तसाच येणारा संतही एसीच्या गाडीतून येत असतो. जे व्याख्यान सभागृह असतं, त्या सभागृहातही एसी व्यवस्था केलेली असते. त्यांचं अन्न आपल्यासारखं सामान्य स्वरुपाचं नसतं. महागडे फुंकर वा महागडे ड्रायफ्रुट खात असतात ते.
विशेष सांगायचः म्हणजे आपण कोणत्या संतावर विश्वास करायचा. कोणाला खरा संत समजायचं? हे एक प्रकारचं कोडच आहे. या आजच्या एसी गाडीमधून फिरणा-या, स्वतः महागडे फळं वा महागडे ड्रायफ्रुट खाणा-या, स्वतःला संत समजून भोंदू तत्वज्ञान मांडणा-या, श्रीमंत गरीब असा भेदभाव करणा-या, गडगंज संपत्ती आपल्या नावावर ठेवणा-या, व्याभीचार करणा-या, कौमार्य मुलींना छळणा-या दांभीक लोकांना संत मानावं की जो स्वार्थी नाही. ज्यांना अजिबात लोभ नाही, ज्याला राग येत नाही, ज्याच्याजवळ अहंकार नाही, ज्याच्याजवळ अजिबात संपत्ती नाही, जो ज्ञानी आहे, तसंच जो संसारी आहे, परंतू शिलवान आहे. जो सामान्य माणसात मिसळतो, अजिबात भेदभाव नसतो त्याच्याजवळ. अशांना संत मानावे? तसा विचार आपणच करायला हवा. हवा की नाही?
आज अशाच संतांची वानवा आहे. आज असा संत कुठेच आढळत नाही. आढळूनही येत नाही. आज संत शेकडो आहेत. संमेलन भरविल्यास त्याची प्रचिती येईल. परंतू खरे संत दिसणार नाही, जे काल दिसत होते. जनकल्याणासाठी आपला जीवही दावणीला लावणारे. ते होते, म्हणून समाज तरी जाग्यावर होता. त्यांनी ख-या अर्थानं समाजसुधारणा केल्या. त्यासाठी समाजाचे त्यांच्यावर होणारे अत्याचार सहन केले. परंतू आपले ध्येय सोडले नाही. समाजानं तर त्यांचं कार्य पाहून त्यांच्या हत्या केल्या आणि आजचे संत त्यांच्याविरुद्ध बोलणा-यांच्या हत्या करतात आणि आपल्याच आश्रमात पुरुनही टाकतात. त्यामुळंच विचार येतो की हे संत आहेत की संतांच्या बुरख्याआड लपलेले गुंड. त्यामुळंच विचार येतो की कोणत्या संतावर विश्वास करायचा?
आज खरं सांगायचं म्हणजे आज खरे संत सापडतच नाहीत. सापडणारही नाहीत. असतीलही दोनचार खरे संत. परंतू आपले लक्ष त्यांचेकडे गेले नाही. जात नाही. कारण आपणच खोटेपणाचा, स्वार्थीपणाचा व अहंकाराचा बुरखा ओढलेला आहे आपल्या स्वतःच्या आदर्श असणा-या आपल्या शरीरावर. तो बुरखा जेव्हापर्यंत आपण हटवणार नाही, तेव्हापर्यंत आपल्याला खरा संत दिसणार नाही वा ओळखताही येणार नाही. त्यामुळंच आपण आजच्या दांभीक संतावर विश्वास करुन व त्यांच्या अत्याचाराला बळी पडू. यात शंका नाही. मात्र जे आजच्या काळातील आदर्शवादी असतील, त्यांच्या मनात नेहमी प्रश्न उपस्थीत राहिल की खरा संत कोणाला म्हणावे? ते सहज विश्वास ठेवणार नाही आणि कोणाला ठेवूही देणार नाहीत. खरे संत आपले मायबापच असतात. कारण आपले मायबाप आपल्याला संत जे सांगतात. अगदी तसंच उद्बोधन करतात. त्यात त्यांचा कोणताच स्वार्थ नसतो. व्याभीचार नसतो आणि राग, लोभ वा अहंकारही नसतो, यात शंका नाही. हे तेवढंच खरं आहे.
हा निसर्ग. हा निसर्ग रमणीय आहे. या निसर्गात प्रत्येक व्यक्ती वा सर्व प्रकारचे निसर्गातील जीवजंतू जन्म घेत असतात. तसा सर्वांना जन्म घेण्याचा अधिकार आहेच. जर या निसर्गात अशा जीवजंतूचा जन्म झाला नसता तर या निसर्गात दुस-या भाषेत सांगायचं झाल्यास जीवसृष्टी राहिलीच नसती.
निसर्ग हा रमणीय आहे. या निसर्गात प्रत्येक सजीव जसा जन्म घेतो, तसाच तो मरतोदेखील आणि जेव्हा तो जन्म घेतो, तेव्हा अविरत आनंद असतो आणि जेव्हा मरतो, तेव्हा साहजीकच दुःख होतं. या दुःख प्रसंगी काही जीवजंतू शोक व्यक्त करतात तर काही तसा शोक व्यक्त करीत नाही. तसंच ज्यावेळेस प्रत्येक जीवजंतूचा जन्म होतो, त्याचवेळेस त्याचं मरणही ठरलेलं असतं. मग कितीही औषधोपचार केला तरी.
जन्म........प्रत्येक जीवाच्या जन्माचा कालावधी हा ठरलेला आहे. काही काही प्राणी आपल्या आईच्या गर्भात एका सेकंदापेक्षा कमी काय राहतात तर काही प्राणी अनेक वर्षपर्यंत राहतात. तसंच प्रत्येक जीवाच्या जन्म होण्याचा कालावधीही हा कमीजास्त आहे. जसं म्हणतात की वाघीण बारा वर्षापर्यंत गरोदर राहात नाही.
गरोदरपणाचा काळ........प्रत्येक जीवाला जन्म घेत असतांना त्याची पुरेशी वाढ होण्यासाठी पुरेसा काळ लागतो, यालाच गरोदरपणाचा काळ असं संबोधन आहे. हा काळ प्रत्येक मातेसाठी अतिशय वेदनादायी असतो. या काळात बाळ आईच्या गर्भात असतांना स्वस्थ बसून राहात नाही. कधी निपचीत पहुडतो तर कधी तिला पाय मारतो. त्यानुसार त्या मातेची पोटदुःखी ठरलेली असते. बाळानं हालचाल केलीच नाही तर तिलाच काळजी वाटते व ती विचार करते की बाळाला काही झालं तर नाही. महत्वपुर्ण गोष्ट ही की आईच्या गर्भात प्रत्येक जीव हा स्वस्थ बसत नाही. तो सतत तिला त्रास देत असतो.
बाळाचा जन्म होतो. तसा सगळीकडं आनंदीआनंद पसरतो. परंतू त्या बाळाला जन्म देतांना ज्या आईनं त्रास भोगला, ते दुखणंखुपणं कोणीही पाहात नाही. हा जन्म देणं म्हणजेच त्या आईचा नवीन जन्मच असतो. या प्रक्रियेत काही काही प्राण्यांचा मृत्यूही होतो. जसे. विंचवाला जन्म देणारी माता आपल्या पिल्लाला जन्म दिल्यानंतर आपल्याच पिल्लाचीच भक्ष बनते. मधमाशीही प्रजनन करीत असतांना उडता उडताच थकल्यानं मरण पावते. असे अनेक प्राणी आहेत. म्हणजे त्या मादीला माहीत असते की मी जर गरोदर राहिले की मला मरावंच लागेल. तरीही धोका स्विकारुन त्या गरोदरपण स्विकारतात. कोणासाठी तर आपल्या लेकरांसाठी. काही काही प्राणी हे प्रसूतीकाळातच प्रसूती व्यवस्थीत न झाल्यानं मरण पावतात. बाळ मात्र जीवंत राहातं.
काही काही प्राणी मात्र याला अपवाद आहेत. असे प्राणी हे आपल्या पिल्लांना जन्म दिल्यावर आपल्याच मुलांना खात असतात. यात साप, उंदीर आणि कुत्र्याचाही समावेश आहे. म्हणतात की साप जेव्हा आपल्या पिल्लाला जन्म देते. तेव्हा त्याची मादी आपल्याच बाळाला भूक लागल्यानं खात असते. तशीच कुत्री आणि उंदरंही तेच करीत असतात. म्हणतात की उंदरं तर त्याला भूक लागली आणि खायला काही न मिळाल्यास आपलेच अवयव खात असतात.
विशेष म्हणजे बाळ जन्म घेतांना आईला फार त्रास देतो गर्भात असतांना आणि तो जेव्हा गर्भातून बाहेर येतो, तेव्हाही आईला भयंकर त्रासच होत असतो. आईला मुल गर्भात असतांनाचा त्रास. या काळात अक्षरशः जेवन होत नाही. ओका-या होत असतात. त्यानंतर जन्म होताच त्रास. या काळात अत्यंत वेदना होत असतात. काही स्रिया मरतात वेळीच बाळाचा जन्म झाला नाही तर........काहींचं सिझर होतं, त्याचा सहा महिने त्रास. तसं पाहता ते मूल मोठं करीत असतांनाही त्रास सहन करावा लागतो मातेला. एवढा त्रास सहन करते आई. बदल्यात काय मिळतं. ते वृद्धाश्रमातील चटके आणि तो म्हातारपणातील क्लेश. बाळ आपल्या आईला जन्मापुर्वी गर्भातही त्रास देत असतो आणि जन्म झाल्यावरही. आपल्याला बाळास असा जन्म देतांना मरण येणार आहे. हे माहीत असूनही. तरीही ती जन्म देत असते धोका पत्करून. जणू आपल्या लेकरासाठी नाही तर सृष्टीला तेवत ठेवण्यासाठीच. महत्वपुर्ण गोष्ट अशी की आपण मरण पावलो तरी चालेल, सृष्टी मरण पावायला नको. यासाठीच आपली आई त्रास सहन करुन प्रसंगी धोका पत्करून आपल्या बाळाला जन्म देत असते. त्यातच ती प्रसंगी मरणही पावते. तिला माहीत असतं की ती मरु शकते, तरीही ती बाळाला जन्म देत असते.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आपली आई आपल्यासाठी एवढा त्रास सहन करीत असते. तेव्हा आपलंही कर्तव्य बनतं की आपण तिचं देणं लागतो. आपण तिचं ऋणपण लक्षात घेवून आपण तिच्या म्हातारपणात तिची सेवा करावी. तिलाही आधार द्यावा. तिला वृद्धाश्रमात पाठवू नये. परंतू आपण तिची सेवा करीत नाहीत. आपण जन्मापुर्वी तर तिला त्रास देतोच. व्यतिरीक्त तिला जन्म झाल्यानंतरही त्रास देत असतो. तसंच तिला म्हातारपणातही अतिशय त्रास देत असतो. तिला वृद्धाश्रमातही पाठवीत असतो. जे की आपण करायला नको.
महत्वाचं म्हणजे आई ही आपली आई असते. सृष्टी जतन करुन ठेवणारी. ती मग कोणाचीही आई असो. जीवजंतूची का असेना, ती कोणालाही जन्म देतांना आपल्या मरणयातनेचा विचार करीत नाही आणि जन्म देते. तीच बाब आपण विचारात घेवून आपणही तिच्या तरुणपणी नाही तर तिच्या म्हातारपणी, जेव्हा तिला आपल्या आधाराची गरज असते. तेव्हा आपण आपली माणूसकी शाबूत ठेवून प्रत्येकाच्या आईला मरणापर्यंत सांभाळावे. तिला त्रास देवू नये. मग ती जीवजंतूची आई का असेना, जीवजंतूलाही मारु नये. त्यांच्यामध्येही कोणाची आई लपलेली असते. कारण प्रत्येक जीव हा सृष्टी प्रवर्तक असतो. सृष्टीरक्षकही असतो आणि सृष्टीवर्धकही. ती जर नसेल तर प्रत्यक्ष सृष्टीविधात्याच्या कार्यात अडचण येईल. त्यांचे कार्य थांबेल. त्यातच तो कधीच आपल्याला माफ करणार नाही. हे लक्षात ठेवावे.
आज कोणी कोणी गोहत्या बंद करा असा सूर काढतात, तर कोणी त्याच्या विरुद्ध बाजूनं बोलतात. खरंच गोहत्या बंदच व्हायला हवी. कारण गाय आपल्याला दूध देते. सरपणासाठी तसेच आपल्या शेतात भरघोष पीक यावे, म्हणून शेण देते. तसं पाहता गाईचे भरपूर उपयोग आहेत.
गाईचे जसे उपयोग आहेत, तसेच उपयोग सृष्टीतील प्रत्येक जीवजंतूंचेही आहेत. लहानसा दही बनविणारा जीव पोटात गेल्यावर आपल्या अन्नाचेही पचन करतो. तशीच लहानशी दिसणारी मधमाशी आपल्याला बहूगुणी शहद देत असते. इवलंसं दिसणारं गांडूळ आपल्याला गांडूळखत देत असते.
काही प्राणी आपलं मनोरंजनही करु शकतात नव्हे तर करीत असतात. जशी. कुत्री, माकड किंवा ऊंट वा बकरी सुद्धा. सर्कशीत लहानशा धाग्यावर चालणारी बकरी, माकड तसंच लहानशा स्टुलवर बसणारा हत्ती आणि ऊंट आपण नेहमीच पाहतो. बिचारे धाकानं अशी अशी कौशल्य करतात की जे कौशल्य पाहून आपण आश्चर्यचकीत होवून जातो. आपण पाहतो की सर्कशीत वाघ, सिंहासारखे अजस्र प्राणीदेखील मोठमोठे कौशल्य दाखवून जातात.
प्राण्यांबाबत आपल्याला त्यांचे उपयोग दिसत नाही. आपल्याला दिसते आपल्या जिभेचे चोचले. आपल्याला प्राण्यांचे सर्कशीत कौशल्य आवडत नाही. त्यांनी सर्कशीत आपले केलेले मनोरंजन आपल्यासमोर फिकं वाटतं. कारण आपलं मनोरंजन असतं आपल्या जिभेची चव. मग आपण आपला राष्ट्रीय प्राणी विसरतो. आपण आपला राष्ट्रीय पक्षी विसरतो आणि नाहक आपलं मनोरंजन म्हणून आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी त्यांचा बळी घेतो.
पुर्वीही अशीच प्राण्यांची हत्या व्हायची. यज्ञात पशुबळी म्हणून बैल, घोडा, रेडा दिला जायचा. गाईला माता संबोधून तिचा बळी दिला जात नसे. तसाच राजा हा शिकारीचा हौशी असल्याने आपलं मनोरंजन म्हणून शिकार करायचा. विनाकारण प्राण्यांचा अपराध नसतांना बळी घेतले जायचे. त्यातच कधीकधी प्राण्यांच्या शर्यतीही लावल्या जात असत. यात कोंबड्यांची झुंज, शंकरपटात बैलाच्या शर्यती, काही ठिकाणी रेड्याला व ऊंटाला शर्यतीत लावले जाई. काही ठिकाणी रेडे, बैल, बोकड आणि एडक्यांच्या टकरी होत. हे आपल्यासाठी मनोरंजनच असे. यात जो प्राणी हारला, त्या प्राण्याला सर्रास कापले जाई. त्यात हारजीत ठरलेली असतांना त्या प्राण्यांचा कोणता दोष असायचा की ते प्राणी मारले जायचे?
महत्वाचं सांगायचं म्हणजे आपलं मनोरंजन होते आणि दोष नसतांना विनाकारण त्या प्राण्यांचा बळी जातो. आपले जिभेचे चोचले पुरवले जातात आणि विनाकारण आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी ते प्राणी मारले जातात. विशेष म्हणजे आपल्या मनोरंजनासाठी त्या प्राण्यांचा कोणताही अपराध नसतांना बळी का घ्यावा? याचा विचार कोणीही करीत नाहीत. आपल्याला काय करायचं असा विचार करुन सर्वच लोकं सृष्टीतील हे महत्वाचे घटक कमी करीत आहेत. आपल्याला माहीत नसेल की काल आपल्या दारासमोर येणारा चिमण्यांचा आवाज कमी झाला. कारण काय, तर आपलेच मनोरंजन. आपण आपल्या मनोरंजनासाठी मोबाईल काढला. परंतू आपल्याला माहीत नसेल की याच मोबाईल मधून निघणा-या घातक ध्वनीलहरीनं त्यांच्या शरीरावर परिणाम होवून त्यांचा बळी गेला. आज आपल्याला कावळे, बेडकं आणि सापही दिसत नाहीत. ही मानवतस्करीच आहे. सापाच्या जहरातून घातक असं नशा येणारं इन्सुलिन तयार केलं जातं म्हणून तस्करी. तसंच कावळ्याचंही आहे. आज सापाची व बेडकाची तस्करी झाल्यानं उंदरांची संख्या वाढतांना दिसत आहे. परंतू काही दिवसांनी उंदरंही कमी होतील. कारण अलीकडे कोणत्याही आजारावर औषधांचा प्रयोग करण्यासाठी तो प्रयोग आधी उंदरावर केला जात आहे. जो पुर्वी बेडकावर केला जायचा. परंतू मानवतस्करीच बेडकांची संख्या कमी झाल्यानं आता उंदरं पकडली जातात.
ज्याप्रमाणे निसर्गातील साप, बेडकं कावळे पकडली जातात. तशीच जंगलातील वाघ सिंहाची संख्या आता अतिशय कमी झालेली आहे. बोटावर मोजण्याइतकीच आहे. शिकारीदरम्यान वाघ, सिंहाला मारले गेल्याने त्यांची संख्या कमी होणे साहजीकच आहे.
वाघ, सिंह, कावळे, उंदरं, बेडकं आणि तत्सम त्यासारखे जीव, मग त्यात गांडूळासारखे प्राणी का असेना, हे सर्व जीव सृष्टीतील समतोल राखणारे जीव. ते आहेत म्हणून आपणही आहोत. नाहीतर आपल्याला कोणी कुत्रही विचारणार नाही. आपल्याला माहीत नसेल की आपल्या जिभेचे चोचले पुरवले जातात. परंतू त्यांचा नाहक बळी जातो. आपले मनोरंजन होते. परंतू त्यात त्यांना किती त्रास होतो. कदाचीत ते विचारच करीत असतील आणि दररोज विधात्याला साकडे घालत असतील की हे विधात्या, एकदा तरी या मानवाला आमचा जन्म दे आणि मानवाचा आम्हाला. मग पाहू. कदाचीत जर त्यांचं विधात्यानं ऐकलं आणि आपल्याला मानव जन्मातून मुक्ती मिळाली आणि त्यांचा जन्म मिळाला तर पाहा, आपली काही खैर नाही. म्हणून एक आपला विचार की आपले मनोरंजन करा. करायला मनाई नाही. परंतू जरा विचार करुन. कारण पुराणशास्र सांगतं की आपला जन्मच मुळात कित्येक योनी फिरुन झाला. त्यामुळंच कधी ना कधी त्यांचाही जन्म आपल्याला मिळणारच. मग आपण जसा त्यांच्याशी या जन्मात व्यवहार केला. तसाच व्यवहार ते त्या जन्मात आपल्याशी करतील यात शंका नाही. म्हणून आपणच आज त्यांच्याशी सौहार्दपूर्ण व्यवहार करावा. जेणेकरुन आपल्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा तेही आपल्याशी सौहार्दपूर्ण व्यवहार करतील यातही शंका नाही. म्हणून प्राण्यांचा बळी घेतांना सावधान. मग ते प्राणी गाई, बकरे वा कोंबडे असो वा इतर कोणतेही. खरंच विचार करावा की आपण आपल्या मुलांना कापून खातो काय? नाही ना. कारण त्यांना आपण आपली मुलं समजतो. त्यांना आपण लहानाचं मोठं करतो. उन्हातून सावलीत नेतो. त्यांना माया देतो. तसेच हे प्राणीही. या प्राण्यांनाही आपण लहानाचं मोठं करतो ना. त्यांना अन्नही चारतोच ना, पाणी पाजतो ना. उन्हातून सावलीतही नेतो. त्यांच्यावरही आपण माया करतो. मग कसायाला विकतांनाच आपण असे निष्ठूर का होतो? तेच कळेनासे आहे. खरंच त्यांना तसं कसायांना विकतांना आपण आपली मुलं समजावीत. प्राणी पाळावे. हवं तर त्यांच्या विष्ठेपासून खत बनवावे. त्यांच्या दुधाचा उपभोग घ्यावा. मरण पावल्यावर पुरुन टाकावे. त्याजागी एक झाड लावावे. जास्त उत्पादन येईल. परंतू त्यांना कोणीही कसायाला विकून टाकू नये वा घरीही करकर कापू नये नव्हे तर त्यांना कापतांना आपले लेकरु कापत आहो असे समजावे. म्हणजेच त्यांना कापायची हिंमत होणार नाही व त्यांचं संरक्षण तर होईल, व्यतिरीक्त जतनही होईल.
नदीचंही तसंच करावं. त्यात सांडपाणी टाकू नये. सांडपाणी टाकल्यानं नदी घाणेरडी होते. तिचा श्वास गुदमरतो. व तिही हळूहळू नष्ट व्हायला लागते.
पाणी हे जीवन आहे. पाणी जर मिळाले नाही तर आपल्याला लवकरच गुदमरल्यासारखं वाटते. म्हणून पाण्याचा वापर काटकसरीनं करावा. काही लोकं पाणी पितात. परंतू पाणी पितांना ते अर्ध पितात. उरलेलं पाणी फेकून देतात. परंतू तसं फेकणं बरोबर नाही.
पाणी कुठून मिळतं? असा जर विचार केला तर आपण सहजच म्हणतो की पाणी विहिरीतून मिळतं. कोणी नळातून तर कोणी बोरवेलमधून पाणी मिळत. असंही सांगतील. परंतू पाणी हे जमीनीतून मिळत असतं. पावसाचं जमीनीत मुरलेलं पाणी झ-यांच्या रुपात विहिरीतून आपल्याला मिळवून घेता येतं. कधी पाणी नदीतूनही मिळवता येतं. परंतू अलीकडं पाणी संकटच निर्माण झालेले असून आता पाणी प्रश्न पेटलेला आहे. आता ब-याचशा विहिरी खोदल्या जातात. कुपनलिका अर्थात बोरवेल खोदल्या जातात. परंतू पाणीच लागत नाही. कारण आता ना पाऊस पडतो. ना तो पाऊस जमीनीत मुरत. ना ते पाणी झ-यांच्या रुपात विहिरीत येत ना नदीत. आज तसं पाहता विहिरीच नाही तर नद्याच्या नद्या सुखलेल्या आहेत. त्याचं कारण काय असावं याचा आपण कधी विचारच करीत नाही.
आपण केरकचरा, सांडपाणी नदीत टाकतो. आपण शोषखड्डा खोदत नाही. त्यातच आपल्याला वाटतं की कोण अशी मेहनत करेल. कोण खड्डा खोदेल. त्यातच असं सांडपाणी जमीनीत सोडा, नदीत वा तलावात सोडल्यानं, नदीत किंवा तलावात जे प्राणी नदीचं किंवा तलावाचं पाणी शुद्ध करणारे असतात. ते जलचर आधी मरतात. कारण अशा सांडपाण्यात विषारी वायू जास्त प्रमाणात प्रवाहित होतात. त्यामुळंच अशा जलचरांना श्वासच घेता येत नाही. त्यामुळं नदीचं वा तलावातील पाणी शुद्ध होत नाही. त्यातच त्या पाण्याची लवकरच वाफ होते व ते पाणी लवकर नष्ट होते. म्हणून आता पृथ्वीवर पाणी सापडत नाही.
आता लवकर वाफ होते असं म्हटल्यास आतिशयोक्ती वाटेल. याबाबत एक उदाहरण सांगता येईल. आपण एखाद्या चुनखडीवर वा फॉस्फरसवर पाणी टाकल्यास काय दिसते? त्याचं पाणी बनतांना दिसत नाही तर ती वाफ होतांना दिसते. याचाच अर्थ असा की नदीच्याही पाण्याची लवकर वाफ होत असावी व ते पाणी निसर्गात जात असावे हे बरोबर की नाही? कारण नदीच्या पाण्यात माणूस अस्थीविसर्जन करीत असल्यानं जास्तीत जास्त फॉस्फरस नदीत मिसळतो व तोच फॉस्फरस जास्तीत जास्त पाण्याची लवकरात लवकर वाफ बनवीत असतो. म्हणूनच नद्यांमध्ये आता पाणी सापडत नाही. त्या शुष्क होतांना दिसत आहेत. आता कोणी म्हणणार की पाण्याचीच वाफ होते ना, मग ती वाफ वर जाईल. थंड होईल व पावसाच्या स्वरुपात खाली येईल. मग खालच्या पाण्याची पातळी जैसे थे. परंतू असं होत नाही. ते वाफेच्या स्वरुपात निसर्गात मिसळलेले पाणी सदृश व इतर वायू हवेतील ऑक्सिजन व इतर वायूंशी संयोग पावतात व ते विनाशकारी वायुमध्ये रुपांतरीत होतात. ज्या वायूतून पाणी बनत नाही. ते वायूचे वायूच राहतात. ज्याचा ओझोनच्या स्तराशी धोका होतो. (ऑक्सिजनची जाड परत) ओझोनची परत अर्थात स्तर पातळ होत असतं.
महत्वपुर्ण गोष्ट ही की ओझोनचा थर कमी झाल्यानं वा पातळ झाल्यानं सुर्याचे जास्तीत जास्त किरणं पृथ्वीवर येतात. त्याला ओझोन परत अडविण्यास सक्षम ठरत नाही. हे सुर्याचे किरण पुन्हा जमीनीतील पाण्याची वाफ तर करतात. परंतू वर गेलेले वाफ सदृश पाणी, त्या पाण्याचे रुपांतर इतर वायूत होत असल्यानं ते परत थंड होवून जमीनीवर येत नाही. याचाच अर्थ असा की आताच्या काळात पृथ्वीवर पाणी प्रश्न पेटला आहे.
आपण विचार करायला हवा की पुर्वी जमीनीवर किती मुबलक प्रमाणात पाणी असायचं. याचं कारण काय? तर पाण्याचं शुद्धीकरण. पाण्यात पुर्वी आपण सांडपाणी मिसळवीत नव्हतो. प्रत्येकाच्या घरी शोषखड्डे खोदलेले राहायचे. ते सांडपाणी शोषखड्ड्यात मुरायचं. जास्त प्रमाणात ते सांडपाणी नदीत मिसळायचं नाही. तसंच मेलेली प्रेतही माणसं जास्त जाळायचे नाहीत. ती प्रेतं जमीनीत गाडली जायची. त्यामुळंच नदीच्या पाण्यात जास्त प्रमाणात फॉस्फरस मिसळत नव्हता व जास्त प्रमाणात वाफेच्या रुपात फॉस्फरस वातावरणातही मिसळत नव्हता. त्यामुळंच साहजीकच शुद्ध वाफ वातावरणात मिसळायची. ज्याचा संयोग हवेतील ऑक्सिजनची होवून त्यातून H/2O म्हणजेच पाणी निर्माण व्हायचं. जे थंड होवून जमीनीवर यायचं. तसंच पाण्यात वेगवेगळे जलचरही असायचे की जे पाणी शुद्ध ठेवायचे. अशा पाण्याची सुर्याच्या उष्णतेनं वाफ झालीच तर त्या वाफेतूनही तोच पाणी निर्माण करण्याचा प्रकार.
आज पाणी प्रश्न पेटला आहे. कारण आपण केलेलं सिमेंटीकरण. आज पाणी जमीनीत मुरायला जागाच नाही. शिवाय आपलं सांडपाणी शोषखड्ड्यात न मुरता सरळ सरळ नदीत जातं. त्यातून नदी प्रदुषीत होते व तिच्यात पुरेसं कालांतरानं पाणी दिसत नाही.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की नदीत पाणी दिसावं तर आपण एक उपाय करुन पाहावा काही वर्ष तरी. प्रायोगीक तत्वावर. नदी प्रदुषीत करु नये. नद्यांचं शुद्धीकरण करावं. तिच्यात सांडपाणी टाकू नये. कारण तिच्यात सांडपाणी गेल्यानं तिचा श्वास गुदमरेल. तिची हत्या होईल आणि तिच्याच हत्येनंतर सा-यांचीच हत्या होईल. पाणी प्रश्न पेटेल. मग सारेच प्रश्न पेटतील. अन्नधान्य पिकणार नाही. पशूपक्षी दिसणार नाही. मग मानवही काळाच्या ओघात डायनासोरसारखा नष्ट होईल यात शंका नाही. मग सा-याच नद्यांचं अस्तित्व संपेल सरस्वती नदीसारखं.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आपण दिसावं, नद्या दिसाव्या, पशूपक्षी दिसावे ही सृष्टी दिसावी. गाय दिसावी. तिचं लेकरु दिसावं वा प्रत्येक जीवजंतूंची माय दिसावी व त्या प्रत्येक जीवजंतूचं बाळ दिसावं यासाठी आपण नद्याच नाही तर वातावरणही शुद्ध ठेवावं. नद्याही शुद्ध ठेवाव्यात. म्हणजेच पाणी शुद्ध राहील. प्रत्येकाला पाणी मुबलक मिळेल व पाणी प्रश्न पेटणार नाही हे तेवढंच सत्य आहे.
सरस्वती आपल्या पित्याच्या नव्हे तर पतीच्या वागण्यावर त्रासून भुतलावर आली. ती आपला झुळझुळ मंजूळ आवाज करीत वाहू लागली. ती एवढी आकारानं मोठी होती की तिनं आज बंजर असलेल्या वा मानण्यात येणा-या राजस्थानचा भाग सुपीक केला होता. ती थेट वाहात वाहात कच्छ मार्गे गुजरातकडून येवून अरबी सागरास मिळत होती. म्हणतात की जी द्वारका आज गुजरातला लागून असलेल्या अरबी समुद्रात बुडालेली आहे. त्या द्वारकेतून सरस्वतीच्या जलमार्गाने बलराम मथूरेला येत असे. यावरुन ही नदी कुठून कुठंपर्यंत वाहात होती याची कल्पना येते.
सरस्वती जेव्हा भुतलावर आली. तेव्हा तिचे क्षेत्र तेवढे विस्तारलेले नव्हते. परंतू हळूहळू ते क्षेत्र विस्तारीत गेले. तिच्या तटावर अनेक ऋषीमुनींना करमत असल्यानं त्यांनी निवास केला. काहींनी तिच्या तटावरच बसून कवनंही रचली आणि ग्रंथरचनाही केल्या. काहींनी गावंची गावं बसवली. म्हणतात की एकट्या सरस्वती नदीतटावर सव्वीसशे गावं वसली होती.
सरस्वती नदीपात्रातील पाणी हे शुद्ध आणि गोड होतं. ती जेव्हा वाहात असे. तेव्हा वाहतांना विचीत्र असा गोड, मंजूळ आवाज येत असे. असं वाटायचं की कोणीतरी जणू गीतच गात असावं. एवढा त्या वाहण्याचा आवाज सुंदर होता.
सरस्वती नदीचा परीसर हा अतिशय रमणीय व सुंदर होता. तिला सतलज नदी मिळत होती. सतलज ही त्या काळातील सर्वात मोठी नदी होती. तसं पाहता या नदीला सिंधू, झेलम, रावी, चिनाब व बियास याही नद्या मिळायच्या. त्यामुळंच या नद्यांचा जो परीसर होता, त्याला सप्तसिंधूचा प्रदेश असेही म्हणत असत. हा प्रदेश केवळ सुपीकच नव्हता तर इथं विपूल प्रमाणात धनधान्य पीकत होतं.
आपली ख्याती, तशीच आपली सुपीकता, तसंच तिच्या पात्रातील पाण्यानं लोकांना विपूल प्रमाणात पीकत असलेलं धनधान्य, आपल्या काठावर लिहिली गेलेली कवने व ती इतरांपेक्षा जास्त असलेली वस्तीस्थाने यामुळंच आज सरस्वती नदीला अहंकार चढला होता. ती अधीकच अहंकारी स्वरुपात वागत होती. यातच पांडवांनी स्वर्गारोहणाचा बेत आखला.
पांडव स्वर्गारोहणाला निघाले असता ते माणा या गावी आले. जेथून या नदीच्या उगमाचं क्षेत्र आहे. म्हणतात की या ठिकाणी ही नदी अतिशय तीव्रतेनं वाहात असते.
पांडवांनी पाहिलं की ही सरस्वती नदी या भागात तीव्रतेनं वाहात असून तिला ओलांडल्याशिवाय पलीकडं जाणं शक्य नाही. तसं पाहता या सरस्वतीला पार करुनच स्वर्गाचा रस्ता फुटत होता. पांडवांनी बराच प्रयत्न केला या नदीला पार करण्याचा. परंतू शेवटी या सरस्वतीला पार करण्यासाठी कोणताही पर्याय न निघाल्यानं भीमानं सरस्वतीला विनंती केली. ती विनंती होती की तिनं त्यांना पलीकडं जाण्यासाठी जागा द्यावी. परंतू सरस्वती त्याचं ऐकेल तेव्हा ना. ती तर अहंकारानं फुगली होती. तशी ती ताठरतेनं बोलली.
"मला कशाला मागताय रस्ता? तुम्हाला रस्ताच हवा तर स्वतः बनवून घ्या."
सरस्वतीचं ते बोलणं. तसा त्या बोलण्यातून दिसणारा तिचा तो उन्मादपणा. याचा राग भीमासह सर्व पांडवांना आला. त्यांनी बराच वेळ तिची क्षमाप्रार्थना केली. परंतू काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी ठरवलं.
शेवटी त्यांनी ठरवलं की आपण सरस्वतीच्या म्हणण्यानुसार आपल्या स्वतःचा रस्ता आपण स्वतःच बनवावा. तसा विचार येताच पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठीर भीमाला आदेश देत म्हणाला,
"भीमा, तू काहीही कर आणि या नदीवरुन पलीकडं जाण्याचा मार्ग शोध अन् तो मार्ग नसेल जमत तर तसा मार्ग बनव."
युधिष्ठीरनं भीमाला दिलेला आदेश. तसं पाहता युधिष्ठीर अर्जुनालाही तसा रस्ता बनविण्याचा आदेश देवू शकला असता आणि अर्जुनानंही आपल्या बाणाच्या सहाय्यानं तसा मार्ग ताबडतोब बनवला असता. परंतू पांडव जेव्हा स्वर्गारोहणाला निघाले होते, तेव्हा त्यांनी आपले शस्र त्यागले होते. त्यामुळंच ते तसा रस्ता बनवूच शकणार नव्हते. हे सरस्वती जाणून होती. म्हणूनच ती त्यांच्याशी उद्धमपणे वागली होती.
युधिष्ठीरनं भीमाला आदेश दिला. युधिष्ठीर पांडवांचा सर्वात मोठा भाऊ होता. त्याला माहीत होतं की भीमच यावर पलीकडं जायला रस्ता काढू शकतो. वडील बंधूंच्या आदेशानुसार भीम सरस्वतीच्या या नदीतटावरुन पलीकडच्या नदीतटावर जाण्यासाठी रस्ता शोधू लागला. तसा रस्ता न मिळाल्यानं त्यानं दोन मोठमोठे दगडं याठिकाणी उभे केले. जेणेकरुन त्यांना पलीकडं जाता येईल. भीमाला तसं करताच भीमासह व युधिष्ठीरासह सर्व पांडवांना सरस्वतीचा प्रवाह पार करता आला. आजही तो पूल याच सरस्वतीच्या उगमाजवळ डौलानं उभा आहे. ज्याला भीमपूल अशी संज्ञा आहे.
युधिष्ठीरासह सर्व पांडवांनी सरस्वतीचा वाहता प्रवाह पार केला. परंतू तरीही तिचा उन्माद खाली पडला नाही वा तिचं गर्वहरण झालं नाही. ती आणखीनच अकडूपणानं वाहात होती. तसाच तो प्रसंग उद्भवला. आता तर तिचं गर्वहरणच होणार होतं.
महर्षी वेद व्यास. ज्याना महाभारत ग्रंथाची रचना करायची होती. ज्यांनी लिहायला स्वयं गणपतीला आणलं होतं. ते याच माणा गावाजवळील नदीच्या जवळच एका झाडाच्या सावलीत बसले होते. ते प्रसंगानुसार एकेक पैलू आठवत होते व एकेक पैलू लिहित होते. परंतू असे करतांना वेद व्यासांना ते पैलू आठवेना. त्यांना ते पैलू आठवण्यात अडचण भासत होती. त्याचं कारण होतं सरस्वतीचा तो उगमाजवळचा तीव्र आवाज. ती खळखळ खळखळ आवाज करीत तीव्रतेनं वाहात होती. तसं पाहून वेद व्यास सरस्वतीला म्हणाले नव्हे तर विनंती केली की तिनं आपला आवाज बंद करावा. परंतू ती गर्वानं फुलून होती. ती कशी काय ऐकणार! शेवटी व्यासांना राग आला नाही. परंतू ते व्यासमुनीच्या सांगण्यावरून महाभारत ग्रंथ लेखनबद्ध करीत असलेल्या गणपतीला राग आला. तो राग एवढा तीव्र होता की त्यांनी तिला शाप दिला. शापात म्हटलं की तुला गर्व झालाय ना. तेव्हा तू ऐक काही दिवसानंतर तुझा प्रवाह कोणाला दिसणारच नाही. तुझी इच्छा असूनही. असा शाप देत ते एकांतवास शोधू लागले. तसं बरंच शोधल्यावर त्यांना एक गुहा सापडली. इथंच महाभारत ग्रंथाची रचना झाली. आज ती गुहा गणेशगुहा म्हणून प्रसिद्ध आहे.
तो शाप.........तो शाप तोंडातून निघूनही सरस्वतीला काहीही वाटलं नाही. तसा बराच काळ गेला. सरस्वतीनं आपला आवाज काही बंद केला नाही. ती तशीच उन्मादपणे वाहात राहिली.

***********************************************

अमोल शिकत होता शाळा. आज तो दहावी पास झाला होता. तसा तो अकरावीत गेला होता. त्यातच त्या महाविद्यालयातील प्राध्यापकानं म्हटल्यानुसार तो सरस्वती नदीच्या अस्तीत्वाचा शोध घेत होता. सरस्वती नदीचं अस्तीत्व आहे की नाही की ती कायमची नष्ट झाली? अन् नष्टच जर झाली तर कशी झाली? वैगेरे प्रश्न त्याच्यासमोर उभे होते व तो आज त्याच प्रश्नांची उत्तरं शोधीत होता.
नदीचं अस्तीत्व. आज नदीचं अस्तीत्व नष्ट होत चाललं आहे. कालची विपुल प्रमाणात पाणी असलेली सरस्वती नदी आज दिसत नाही. कोणी म्हणतात की ती यमूनेला मिळाली तर कोणी म्हणतात की ती पाताळ मार्गानं वाहात जावून प्रयागजवळ गंगेला मिळाली. तर कोणी ती नदी आजही अरबी समुद्रालाच जावून मिळते असंही म्हणतात. त्यामुळं नेमकी सरस्वती कुठं गेली याचा शोध लावणं शक्य होत नाही.
अमोल सरस्वतीच्या शोधाच्या मार्गावर होता. तशी ती वार्ता अंबिकाच्या कानावर आली होती. तशी ती त्याला वेड्यातच काढत होती. तिचा तसा विचार करणंही बरोबर होतं. कारण तिला वाटत होतं की जिचं अस्तीत्वच समाप्त झालं आहे. अशा नदीला शोधून काय उपयोग? त्यापेक्षा ज्या नद्या आहेत, त्या टिकवणं महत्वाचं.
अमोल नदी शोधण्यात उत्साह दाखवत होता. त्याचं कारणही होतं. ते कारण म्हणजे तिच्या भोवतालचा प्रदेश. तो भोवतालचा प्रदेश ती अस्तीत्वात असतांना नंदनवनच होता. परंतू कालपरत्वे ती नष्ट होताच तो संपूर्ण भाग आज एक प्रकारचा वाळवंटच बनला होता. आज त्या भागात निव्वळ जिकडे पाहावे तिकडे रेतीच रेती पसरलेली होती आणि जिकडे लक्ष जाईल तिकडं शुष्कपणाच जाणवत होता. जिथं एकेकाळी ती अस्तीत्वात असतांना हिरवेगारपणा जाणवायचा. तसंच तिच्या काठावर निव्वळ माणसच राहायची नाही तर पशूपक्षीही आनंदानं निवास करायचे. तिथं आज त्या पशूपक्षांना थारा नव्हता. आज त्याच वाळवंटी प्रदेशातील प्राणीही बदलले होते. जिथं गाई, अश्व मुक्तपणे विहार करायचे. आज त्याच ठिकाणी केवळ आणि केवळ ऊंट आले होते. मोठमोठ्या विशालकाय झाडाची जागा लहानशा खुरट्या काटेरी झुडपांनी घेतलेली होती.
सरस्वती नदी........तिचं अस्तीत्व एकदम कसं काय नष्ट झालं. ते एक कोडंच आहे. यानुसार एक प्रश्नचिन्हं लोकांच्या मनात उभं राहातं की खरंच ही नदी अस्तीत्वात होती काय?
होय, ही नदी कालपरत्वे अस्तीत्वात होती. तसा उल्लेख पुराणात मिळतोच. तसंच या नदीच्या आसपास हडप्पा मोहेंजोदारो सारखी सभ्य संस्कृती होती. तशीच ही नदीही अस्तीत्वात होती.
तो काळ सन १८९३ चा. त्या काळात एक ब्रिटिश इंजीनिअर सीन. एफ. ओल्डहैम या नदीच्या सुर्ख जागेतून प्रवास करीत होता. तो घोड्यावर स्वार होता. ज्यावेळेस तो घोड्यावरुन खाली उतरला, तेव्हा त्याला वाटायला लागलं की इथं कोणती ना कोणती पुर्वीच्या काळात नदी वाहात असेल. ती नदी विशालकाय असेल.
ऋग्वेदमध्ये या नदीचं वर्णन आहे. वर्णनात या नदीला इतर नद्यांची आई अशी उपमा दिलेली आहे. ती तशीच होती विशालकाय.
मध्यंतरीचा काळ बरा गेला. नदीसाठी पैसा खर्च करायचा? प्रश्न होता. काय गरज आहे असा विचार करुन लोकांनी आपली तोंड बंद केली. परंतू इस १९९० च्या दशकात एका सॅटेलाइटनं जगाला दाखवून दिलं की एक नदी आजही हिमालयपासून तर अरबी सागरापर्यंत जमीनीच्या गर्भातून वाहात आहे व तिची चौडाई साधारणतः वीस किमी आहे. त्यामुळं तीच नदी सरस्वती नदी असावी अशा आशा पल्लवीत झाल्या व पुन्हा एकदा सरस्वती नदीचे अस्तीत्व आढळून आल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सरस्वती नदीला शोधण्याचे शोधकार्य सुरु झाले.
ती नदी सरस्वती असू शकते. परंतू कोणतीही नदी ही एवढी एकशे वीस किमी रुंद असू शकत नाही असं विशेषज्ञांचं म्हणणं. त्यामुळंच इस २०११ मध्ये या नदीला शोधायला इलेक्ट्रीकल रेसिस्टिविटी साउंडींग प्रणालीचा वापर केल्या गेला.
इलेक्ट्रीकल रेसिस्टिविटी साउंडींग प्रणाली. ही अशी प्रणाली असते की या प्रणालीनुसार पाण्याचा स्तर कळत असतो. त्याची जाडी कळत असते. या प्रणालीनुसार माहीत झालं की कास्ययुगात एक नदी हडप्पाजवळूनच वाहात होती. त्यामध्ये असं आढळून आलं की या नदीची धार बदलल्यानं ती नदी नष्ट झाली. त्यानंतर २०१२ ला जे या नदीबाबत अध्ययन केलं गेलं. त्यात असं आढळून आलं की जमीनीच्या खालून एक नदी वाहात आहे. ज्या पाण्याचा प्रवाह तेज आहे. तो तेज प्रवाह पाहता असं लक्षात आलं की ही एक मुख्य नदीच राहू शकते. जिचा प्रवाह तेज आहे. कारण उपनद्यांचा प्रवाह एवढा तेज नसतो.
सरस्वती नदी.. ......सरस्वती नदी शेवटी नष्ट का झाली असावी? होवू शकते की या नदीत पाणी जास्त असल्यानं त्या पाण्याच्या खालील परत मऊ झाली असावी व त्या नदीपात्रातच भुकंप आले असावे आणि तिथं धरण बांधल्यासारखी टेकडी बनली असावी. ज्यातून तिच्या वाहत्या पाण्याला अडकाव आला असावा. शेवटी तिचं वाहातं पाणी दुसरीकडं वळलं असावं व ते पाणी इतर नद्यांना मिळालं असावं. ज्यातून इतर नद्या मोठ्या झाल्या असाव्या व सरस्वती नदी लुप्त झाली असावी किंवा या नदीचं भुकंपाच्या टेकडीनं अडवलेलं पाणी झिरपत झिरपत खडकातून वाहून गेलं असावं. तसंच तिला वाहण्यासाठी मार्गच न मिळाल्यानं कालपरत्वे तिच्या वाहण्याचा मार्ग नष्ट झाला असावा किंवा ते पाणी त्याच टेकडीच्या दगडाखालून मार्गक्रमण करीत अरबी सागरापर्यंत दगडाखालूनच गेलं असावं. याबाबत एक उदाहरण असं की पुर्वी वाहणारी यमुना ही अगदी लहान नदी होती सरस्वतीपेक्षा. परंतू कालपरत्वे यमुनेचा प्रवाह वाढलेला असून त्या सरस्वतीचं पाणी यमुनेला मिळालं असावं असंही इतिहासकार सांगतात.
सरस्वतीचा शोध करण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. तो प्रश्न मिटविण्यासाठी सरस्वतीचा शोध होणं गरजेचं होतं. कारण या नदीत पाणी भरपूर होतं. व्यतिरीक्त ते पाणी गोड होतं. शोधकर्त्यांनी जेव्हा कालीबंगा व माणा गावाजवळ शोध केला. तेव्हा असं आढळून आलं की या गावात जमीनीच्या खालून बारा किमी चौडी व तीस मीटर जाडी असलेली रेतीसंरचना आहे. या रेतीत पाण्याचे प्रमाण असून ते पाणी गोड आहे. ही संरचना एका विशालकाय नदीचं दर्शन देते. परंतू आज त्याच संरचनेनुसार तिच्यातील पाण्याच्या प्रवाहाचं विभाजन झाल्याचंही संशोधनातून जाणवतं. या संशोधनातून त्या रेतीच्या वर दहा मीटरचा भाग हा चिखलाचा दर्शवतो. याचाच अर्थ असा की जेव्हा या नदीचे पाणी सुकले. तेव्हा तिथं फक्त चिखल उरलं असावं. ज्यातून दहा मीटरची चिखलाची जाडी तयार झाली असावी. कालीबंगाच्या आसपासचा भाग. या भागात असे मातीचे ढिगारे मिळतात की त्या मातीच्या ढिगा-यांना खोदल्यास हडप्पाकालीन अवशेष मिळालेले आहेत. याचाच अर्थ असा की ही सरस्वती नदी हडप्पा संस्कृतीच्या आजुबाजूच्याच प्रदेशातून वाहात होती.
सरस्वती नदीचा शोध घेतांना तिच्या अरबी समुद्रापर्यंतच्या वाहण्याचा रस्ता बनविण्यात आला. त्यानंतर त्यानुसार नकाशाही बनविण्यात आला. त्यानंतर ब-याच ठिकाणी कुपनलिका खोदण्यात आल्या. काही विहिरी. यातूनच या विहिरीत वा कुपनलिकेत मोठमोठे विशालकाय झरे लागले. हे विशालकाय झरे सरस्वतीच्या अस्तीत्वाची साक्ष देत आहेत. अशा कुपनलिका गुजरात व हरयाणात जास्त प्रमाणात खोदण्यात आल्या.
सॅटेलाईट द्वारा सरस्वती नदीचं पाणी हे हरीयाणामध्ये कुरुक्षेत्र, कैथल, फतेहाबाद, सिर्सा,अनुपगड, त्यानंतर राजस्थानात श्रीगंगानगर, हनुमानगड, थोडे वाळवंट, त्यानंतर गुजरातमध्ये खंबात खाडी या ठिकाणी दिसतं. तसंच सांगायचं झाल्यास सरस्वती नदीचं अस्तीत्व शोधण्यासाठी खोदलेल्या बोरवेलमधून आताही आपोआपच पाणी निघतांना दिसतं. आजही राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात काही ठिकाणी आपोआपच वाळूतून वाहतं पाणी दिसतं. राजस्थानात आताही काही काही गावात त्याच्या घरच्या जलस्रोतातून आपोआपच पाणी निघतांना दिसतं. या पाण्याची भाभा एटॉमीक रिसर्च सेंटरमध्ये तपासणी केली असता ते पाणी तीन ते चार हजार पुरातन काळातील पाणी असल्याचं सिद्ध झालं आहे. एवढंच नाही तर राजस्थानात पसरलेली वाळवंटातील रेती ही देखील एका मोठ्या नदीच्या अस्तीत्वाचीच साक्ष देत आहे.

************************************************

आज अमोल सत्तेवर होता. तसा त्याचा रुतबा पाहून अंबिका त्याच्यासमोर नतमस्तक झाली होती. आज ती त्याला मानायला लागली होती.
अंबिका जणू तो निवडणुकीत निवडून येताच त्याची मांडलिक बनल्यागत त्याला मदत करीत होती. परंतू तिच्रा मनात दुसरंच काहीतरी होतं. अशातच त्या दोघात एकमेकांविषयी प्रेम निर्माण झालं होतं.
ते दोघंही एकमेकांना पसंत करीत होते. परंतू ते एकमेकांना पसंत करीत असले तरी अंबिकाचं प्रेम हे स्वार्थी होतं. तो आज सत्तेवर होता, म्हणून की काय, अंबिकाला त्याचेबरोबर प्रेम निर्माण झालं होतं.
अमोल सत्तेवर जरी असला तरी त्यानं आपल्या मनात सरस्वतीचा विचार तेवत ठेवला होता. कारण त्यालाच नाही तर त्याच्या देशाला पाण्याचा प्रश्न सतावत होता. तो त्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र अंबिका त्याचा द्वेष करीत होती. त्याची दिवसेंदिवसची होत असलेली प्रगती तिच्या मनात द्वेष उत्पन्न करीत होती. ती प्रेम करीत होती. परंतू ती प्रेम त्यानं आपली प्रगती बंद करावी यासाठी करीत होती. तिच्या म्हणण्यानुसार त्यानं आपली प्रगती बंद केली नाही. अशातच तिला आठवलं. जर जनतेनं याच्यावर अविश्वास दाखवला तर.......तर कदाचीत याची प्रगती करणं बंद होईल. शेवटी तसा विचार करुन एक दिवस ती म्हणाली,
"अमोल एक सल्ला देवू का? तू ती प्रथा बंद करशील?"
"कोणती प्रथा?"
"अरे, आज देशात अशी एक प्रथा जन्म घेत आहे की त्या प्रथेत माणूसकी उरलेली नाही."
"अशी कोणती प्रथा आहे की ज्यात तुला माणूसकी दिसत नाहीत?"
"लग्नमंडप."
"लग्नमंडप म्हणजे?"
"अरे, आज रस्त्यारस्त्यावर लोकं मंडप टाकतांना दिसतात. रस्तेच सोडत नाहीत. जसा ते रस्त्याला आपल्या बापाचीच जागा समजतात."
अमोल हसला. तसा तिला थोडासा राग आला. तशी ती म्हणाली,
"असा का रे हसतोस? मी काय वाईट बोलले काय? लग्नमंडप टाकण्याचे काही नियम असावेत की नाही? अरे लग्नाच्या नावावर दोनचार दिवस टाकून ठेवतात मंडप आणि बंद करुन ठेवतात रस्ता. माहीत आहे किती त्रास होत असतो जाणा-या येणा-या लोकांना? फिरुन जावं लागतं. शिवाय डी जे आणि बँड एवढ्या जोरात वाजतो की त्याची सांगता सोय नाही."
"होय."
"मग विवाहाचे वा विवाहमंडपाचेही नियम असावेत की नाही."
"होय असावेत."
"मग हे नियम तुमचं सरकार केव्हा लावणार. हवं तर त्यावर करप्रणाली चालू करावी तुमच्या सरकारनं. तुमच्या सरकारलाच टॅक्स मिळेल. देशाचं उत्पन्न वाढेल."
अंबिका बोलून मोकळी झाली. तिचं म्हणणं संयुक्तिक होतं. परंतू तिनं ते संयुक्तीक पद्धतीनं मांडलं नव्हतं तर ती त्याचा द्वेष करीत असल्यानं जर त्याच्या सरकारनं तसे नियम लावल्यास त्याची सरकार पडावी वा त्यानं तसे नियम आणल्यास जनता भडकावी म्हणून ती बोलली होती. परंतू तिला माहीत नव्हतं की तिनं जे मत त्याचेसमोर व्यक्त केले होते, ते बरोबर होते.
लग्न मंडपाचेही नियम असावेत? असं अमोललाही वाटत होतं. त्यामुळंच त्यानं तिच्या बोलण्याला गैर म्हटलं नाही. तसा विषय त्यानं संसदेत लावून धरला व तो मसूदा पासही झाला. त्यानं विवाहाचे नियम आणले होते. त्या नियमानं लोकांचा त्रास कमी झाला होता नव्हे तर ज्यानं हद्द ओलांडून नियम तोडला. त्याच्याकडून दंड वसूल केल्या जात होता. या नियमानं बरेच लोकं सुखी झाले होते. ते अमोलला धन्यवाद देत होते. तसं पाहता अंबिकाच्या म्हणण्यानुसार जनता भडकली नव्हती.

**********************************************************

अमोलच्या मनात आलेला तिचा विचार. तसा तो विचार त्यानं संसदेत मांडला.
"विवाह.......दरवर्षी विवाहाची धूम असते. लोकं या विवाहाला लाखो रुपये खर्च करतात. त्यात पैशाचा हिशोबच नसतो. त्यातच या विवाहात जो खर्च होत असतो, त्याचं मोजमाप केलं जात नाही.
अलीकडे विवाह करणे अगदी सोपे झाले आहे. अत्याधुनिक साधनांचा शोध लागल्यानं आता विवाहसोहळा अडचणीचा वाटत नाही. तसंच लोकं आज विवाहावर खर्च करताना काहीच तारतम्य बाळगत नाही.
हुंडा..... हुंडापद्धती आज कालबाह्य ठरत चाललेली आहे. कारण अलीकडे भ्रृणहत्या झालेल्या आहेत. त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत की मुलींची संख्या अतिशय कमी झालेली आहे. हुंडापद्धती व मुलींना दर्जा कमी असल्यानं लोकांनी आपल्या पत्नीच्या गर्भातील भ्रृणलिंग तपासले. तेव्हा ते भ्रृण मुलींचे आढळल्यानं प्रत्येक पालकांनी ते गर्भ मारले. त्यामुळंच आपोआपच मुलींची संख्या कमी झाली. तसं पाहता हुंडापद्धती प्रबळ असल्यानं काही मुलींनी वयात येताच आपल्या वडीलांना उगाचच त्रास होवू नये म्हणून दुस-या मन पसंत असलेल्या मुलांसोबत पळ काढला. त्यामुळंच आज विवाहाला मुली सापडणं कठीण होवून बसलंय. काहींनी निश्चितच आत्महत्याच केल्या. अशावेळी आज मुलीला भाव आलाय. तसंच समीकरणही असमान आहे. ते समीकरण असमान स्वरुपाचं असल्यानं मुली कमी झाल्या.
आज ब-याच मुली अशाच निघून गेल्या आहेत. कोणत्याही मुली केव्हा अशा निघून जातील याची काही शाश्वती नाही. काही तर विवाहाच्या मंडपातूनच अशा आपल्या मनपसंत मुलांसोबत निघून जातात विवाहाला लागणारा खर्च वाचावा म्हणून. तसं पाहता त्या तसं करुन आपल्या वडीलांचा विवाहाचा खर्च वाचवीत असतात.
आज काही मुली अशा स्वरुपात निघून जातात. परंतू काही मुली निघून जात नाहीत. त्या तसं राहण्याला आपल्या आईवडीलांची इभ्रत समजतात. त्या निघून जात नाहीत. त्यामुळंच त्यांचा विवाह करणे आईवडीलांना भाग पडते व ते कसंही का होईना, आपल्या मुलीला टाकून देत नाहीत. त्यांचा विवाह करतात नव्हे तर करावाच लागतो.
विवाह करतांना काही लोकं खुप श्रीमंत असतात. ते विवाहात पोत्यानं पैसा ओततात असं म्हटल्यास आतिशयोक्ती होत नाही. ते विवाह करतांना मंडप, डेकोरेशन, जेवणखावण, आंधण, दागदागिने यात अतोनात पैसा खर्च करीत असतात. तर काही विवाह करणारी मंडळी ही गरीब स्वरुपाची असतात. या मंडळीत काही काही एवढे गरीब असतात की ते साधा विवाहासाठी सभागृह देखील करु शकत नाहीत. ते आपल्याच घरी दारासमोर थोड्याशा जागेत मंडप उभारतात. ज्यात संबंध रस्ताच बंद केला जातो. तो रस्ता, जो रहदारीसाठी एकच रस्ता असतो व तिथंच मंडप उभारला गेल्यानं रहदारीमध्ये एकप्रकारे समस्याच उत्पन्न होत असते.
रस्त्यावरील मंडप, त्यातच होत असलेली वाहनांची गर्दी. त्या गर्दीला चिरुन जाणारी पायदळी मंडळी या सर्वांनाच अशा विवाह मंडपामुळं अडचणी निर्माण होत असतात. असा विवाह मंडप ज्या गल्लीत असला, ती मंडळी संपूर्ण रस्ताच बंद करुन टाकतात. त्यामुळं कोणालाच तेथून जाता येता येत नाही. अगदी पायदळी चालणा-या माणसालाही. शिवाय त्यांना काही बोलतो म्हटल्यास 'रस्ता काय तुमच्या बापाचा आहे काय?' अशी उत्तरं मिळतात.
विवाहसोहळ्याला अलीकडे अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. ते पाहता आज विवाह सोहळ्याचेही जबरन नियम असावेत असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. परंतू आजपर्यंत विवाह सोहळ्याचे नियम बनवले गेले नाहीत. जे बनवणे गरजेचे होते. परंतू मी ते नियम आता बनवणे गरजेचे समजतो. संसदेने तसेच मा. महोदयांनी त्यावर प्रकाश टाकावा."
अमोलनं तसे लग्नमंडपाचे नियम संसदेत मांडले. त्यावर संसदेत सविस्तर चर्चा झाली व त्यातील काही नियम गाळले गेले. तसेच काही नियम पास होवून अमोलनं त्यातील काही नियम आणले होते. ते नियम होते.
१) विवाह मंडप टाकतांना कोणी कोणाचा बाप काढणार नाही. यासाठी अशा अपमानीत होणा-या व्यक्तीला तक्रार करता यावी. अपमानीत करणा-या व्यक्तीवर दंड ठोकावा.
२) विवाह करतांना ज्यांनी संपूर्ण रस्ता बंद केला, त्यावर उचीत कारवाई व्हावी.
३) घरासमोर विवाह मंडप टाकतांना पुरेशी जाण्या येण्यासाठी जागा असावी. कमीतकमी पायदळी चालता तरी यावे. संपूर्ण रस्ताभर मंडप टाकता येवू नये.
५) पुरेशी नोंदणी कक्षातून परवानगी असावी. परवानगी अशी की ते किती चौरस फूट मंडप टाकणार? जायला जागा सोडली की नाही? त्याची पाहणी व्हावी.
६) नोंदणी कक्षात याचीही नोंद असावी की वधूवर किती वयाचे आहेत. त्यांच्या विवाहाला चार साक्षीदाराची परवानगी आहे की नाही.
७) प्रत्येक विवाहात विवाह होण्याआधी नोंदणी कक्षातून रितसर परवानगी घेणे आवश्यक ठेवावे. मग तो प्रेमविवाह असो वा सहमतीचा विवाह असो.
८) नोंदणी याचीही असावी की तो विवाह होतांना अंदाजे ती मंडळी किती खर्च करणार? पर्यायानं सांगायचं म्हणजे खर्चाचं मोजमाप असावं.
९) प्रत्येक विवाह करतांना विवाह शुल्क भरावे. तसं विवाह शुल्क भरणं सक्तीचं करावं.
१०) महत्वाचं म्हणजे विवाहाला लावणार असलेला पैसा कुठून तडजोड करणार याचं विवरण पत्र असावं. जसे कर्ज काढले काय की नोकरीतून गोळा केला की कुणी उसने दिले. याचं विवरणपत्र भरणं बंधनकारक असावं. याचा फायदा असा की त्यातून उभययंती दांपत्यांनी तो पैसा कुठून गोळा केला ते माहीत होईल.
११) खर्च करण्याची मर्यादा असावी. अंदाजे रक्कम जाहीर करावी. त्यापेक्षा जास्त रक्कम विवाह सोहळ्यासाठी खर्च केल्यास त्यावर टक्केवारीनुसार इन्कमटॅक्स असावं.
१२) खर्चाचंही विवरण असावं. कशासाठी किती खर्च होणार याचा तपशील असावा. ते सर्व एका विवरणपत्रात भरुन घ्यावं.
१३) आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही. याचं शपथपत्र असावं. मग रस्त्यावरुन काढलेली वरातीची मिरवणूक का असेना. कित्येक वेळेस वरातीच्या मिरवणूकीने फोडलेल्या फटाक्याने कित्येकांची घरं जळालेली आहेत. तसेच कित्येक वेळी वरातीच्या मिरवणूकीने किरकोळ अपघात झालेले आहेत. तसेच कित्येक वेळेस वरातीच्या गर्दीतून निघता न आल्यानं ऑफिसला जायला वेळ झालेला आहे.
१४) विवाहाचं आवेदनपत्र बंधनकारक करावं व त्यात आवर्जून वर वधूच्या वयाची अट नमुद असावी. जेणेकरुन कोणीही अकाली किंवा बालवयात कोणाचाच विवाह करणार नाही. विवाहाची नोंदणी विवाहपूर्व करतांना विवाह वयाचंही बंधन पाहावं. असे नियम अमोलनं संसदेत पास केले होते. तसं त्याचं म्हणणं होतं.
"वरील सर्व गोष्टी या सक्तीच्या असाव्यात विवाह साजरे करतांना. कारण आता पुर्वीचा काळ गेला. त्या काळात लोकं वरात पायी वा बैलगाडीनं काढत असत. परंतू आता.......आता मात्र वरात भरधाव गाड्यांनी निघते. पुर्वी विवाहात जास्त पैसा खर्च केल्या जात नव्हता. पैसा जपूनच वापरला जायचा. आता मात्र पैशाची उधळपट्टी चालत असते. पैशाला आज किंमतच उरलेली नाही. काही काही मंडळी तर विवाह करण्यासाठी प्रसंगी कर्ज काढतात. हवसे, नवशे, गवसे पाहूणे बोलावतात. आज गरीब माणसंही खोटी शान दाखवतात नव्हे तर दाखवावीच लागते. यावर उपाय म्हणून वरील नियम बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्याशिवाय विवाह करतांना गरीब आणि श्रीमंत अशी दरी निर्माण होणार नाही. गरीब आणि तेवढेच श्रीमंतही आपला खिसा पाहूनच विवाह करतील. विवाह नितीनियमानं होतील. शिवाय वरील नियमांतर्गत विवाहात फसवेगीरी होणार नाही. म्हणूनच हे नियम केले जात आहेत. त्याचं पालन सर्वांनी करावं म्हणजे झालं."
विवाह मंडपाचे नियम आले होते. वाटलं होतं अंबिकाला की असे नियम आणल्यास जनता भडकून उठेल. परंतू तसं काही घडलं नव्हतं. त्यातच तिनं आता दुसरा उपाय करण्याचे ठरवले. तिनं विवाहीत जोडपे भडकले पाहिजेत म्हणून विवाहीत जोडप्यांनी भांडण करु नयेत. त्यासाठी काही नियम आणायला लावले. जर अशी भांडणं करीत असतील तर त्यांना शिक्षेची तरतूद असावी असा तिनं युक्तिवाद त्याचेसमोर बोलून दाखवला. त्यानुसार त्यानं तोच मुद्दा लक्षात घेवून तोही मुद्दा संसदेत मांडला. विषय होता, विवाहानंतर भांडणं करु नये. जर भांडण करायचेच असेल तर विवाह करताच कशाला? यामुळं त्या पती पत्नीचं नाही तर मुलांचंच नुकसान होत होतं. कारण त्यांना आईच नाही तर बापही हवा होता. लोकं मात्र विवाह झाल्यानंतर दोनचार मुलं जन्मास घातल्यानंतर भांडण करीत असत. ज्यातून काही मुलं आईकडं राहात व काही मुलं बापाकडं. जी मुलं आईकडं राहात. त्यांना बापाचं प्रेम मिळत नसे व जी मुलं बापाकडं राहात, त्यांना आईचं प्रेम मिळत नसे. मग मुलं मायबाप जीवंत असतांना आपापसातील भांडणातून कोण्या एकाच्या प्रेमाला पारखे होत असत. हे अंबिकाला नको होतं नव्हे तर या मुद्द्यावर ती जनतेला अमोल विरोधात भडकवून पाहात होती. परंतू हाही खेळ तिला तोट्याचाच वाटला. यावर भाष्य करतांना तो संसदेत म्हणाला,
"मायबाप........मायबाप मुलांचं संगोपन करीत असतात नव्हे तर त्यांना करावं लागतं. कारण ते सृष्टी निर्माते आहेत आणि विधात्यानं प्रत्येक जिवालाच सृष्टी निर्माण करण्यासाठी पाठविलं आहे असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. यात केवळ माणूसप्राणीच नाही तर पशूपक्षी आणि सर्व प्रकारच्या जिवजंतूचा समावेश होत असतो. ज्याला विधाता सृष्टी निर्माण करण्यासाठी पाठवीत नाही, ते उभयलिंगी म्हणून जन्म घेत असतील असेही म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. यात अपवाद आहे की काही माणसं विवाहच करीत नाही. ती मंडळी विधात्याच्या कार्यात बाधा आणतात असंही म्हटल्यास आतिशयोक्ती ठरु नये.
सर्व प्रकारची आतिशयोक्ती. मुलाला जन्म देतांना विधाता ठरवूनच देतो की अमूकानं अमूक अमूक कार्य करावं. त्यानुसार प्रत्येक जीवजंतू जन्माला येतो. तो आपलं कार्य संपलं की नष्ट होतो. मग त्यानं जन्मास घातलेली बाळं लहान असली किंवा तिचे डोळे उगवले नसले तरी. समजा यात एखाद्या बाळाची आई त्याच्या जन्मतःबरोबर मरण पावते. कारण तिचे कार्य संपलेलं असतं. ती आपले कार्य संपल्यावरच मरण पावते. कारण तिच्या भाग्यात फक्त त्या बाळाला जन्म देणे एवढंच कार्य असते.
आज परिस्थिती तशीच आहे. आजच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास असं स्पष्ट दिसतं की मुल जन्मास येतं, ते लहानाचं मोठं झालं वा वयात आलं की विवाह करतं. एकदोन लेकरं जन्मास घालतं. तिथपर्यंत सारंच बरोबर असतं. मग त्यांची विवाहानंतर किरकोळ स्वरुपाची भांडणं सुरु होतात. कारणं शुल्लक असतात. कारणं कोणती? तर त्याची कारणं आहेत.
१) त्यांचं दारु पिणं, दारु वेगवेगळ्या कारणांनी प्राशन केली जाते. कामावरुन येतांना काम फार झाल्यानं थकवा जाणवू नये म्हणून थोडीशी दारु प्राशन करणं. त्यातच पत्नी भांडण करीत असेल तर रोज रोज टेन्शननं थोड्या थोड्या प्रमाणात वाढलेली दारु. मित्रांबरोबर नाईलाजास्तव आग्रहानं घेतलेली दारु. इत्यादी अनेक कारणं. कधी तिही व्यसनाधीन असते. म्हणून भांडणं होत असतात.
२) दुसरे कारण म्हणजे पत्नीच्या काही गोष्टी न ऐकणं. जसं ती सांगते की मला तुझ्या मायबापाची सेवा करायची नाही. वेगळं निघ किंवा त्यांना वृद्धाश्रमात टाक. मुलगा टाकू शकत नाही. मग भांडण किंवा तो म्हणतो की तुझ्या माहेरचे लोकं नको, म्हणून भांडण.
३) त्याचे अनैतिक दुस-या स्रीशी संबंध असतात. ते तिला खपत नाहीत. कधी तिचेही अनैतिक संबंध असतात की जे त्याला खपत नाहीत. कधी कधी तसे अनैतिक संबंध नसूनही केवळ तशी शहानिशा न करता आपल्या शंकेखोरपणानंही भांडणं होत असतात.
४) कधीकधी तो निकम्मा असतो. कामच करीत नाहीत. बसून खातो. तसंच कधीकधी तिचंही तसंच असतं. ती घरची कामं करीत नाही. म्हणते नोकरं ठेव. मी मोलकरीण आहे काय?
५) कधी माहेरच्या माणसाची सारखी लुडबुड असते. ती मंडळी सारखी शिकवीत असतात की आपल्या सासरच्या मंडळींचं अजिबात ऐकायचं नाही. बरीचशी भांडणं यामुळंच होत असतात. ती जावयांनाही बोलत असतात. अमूक करा, तमूक करा. परंतू त्याच्यात क्षमता नसल्यानं तो ती गोष्ट करु शकत नाही. यातूनच भांडणं उद्भवतात.
६) कधी कधी सासरची मंडळी निव्वळ त्रास देत असतात मुलीला. त्यातच नवरा मुलगाही आपल्या मनानं न चालता आपल्या मायबापाच्या मनानं चालत असतो म्हणून भांडण होतं.
७) कधी कधी चालत्या संसारात आजुबाजूला राहणारी शेजारील मंडळीही आग लावत असतात. त्यांना कोणाच्या संसारात होत असलेली भांडणं जास्त आवडत असतात.
८) महत्वाचं कारण म्हणजे दोघांचेही एकमेकांना समजून न घेणे. तसेच आपल्या घरातील गोष्टी दुस-यांना सांगणे व आपल्या घरातील व्यक्तींचे न ऐकता इतर लोकांचे सल्ले विनाकारणच ऐकणे. यातूनच वाद तयार होत असतात.
९) कधी कधी अशा भांडणासाठी शारीरिक दुर्बलताही कारणीभूत असते. कधीकधी अशी दुर्बलता विवाहापूर्वी असते. त्या कुटूंबात टेस्ट ट्युब बेबीतून मुलं पैदा केली जातात. परंतू त्यात तिचा काय दोष? ती आपली शारीरिक गरज पुर्ण करण्यासाठी बाहेर अनैतिक संबंध ठेवते. यातूनच भांडणं.
१०) कधीकधी एखाद्याला एखादे मूल होते. परंतू त्यानंतर तोच व्यक्ती शारीरिक दृष्टीनं अनफिट होतो. त्याचं कारण म्हणजे त्याला पुर्वापार असलेली व्यसनं. यातूनच तिची शारीरिक भूक भागत नाही. कधीकधी हा दोष तिच्यातही निर्माण होतो, यातूनच अनैतिक संबंधांचा जन्म होतो. काही अपवादात्मक परिस्थितीत अनैतिक संबंध जाणूनबुजून निर्माण होत असतात. हेही मूल झाल्यावरची भांडणाची कारणं.
भांडणाबाबत सांगायचं झाल्यास भांडणं व्हायलाच हवीत. कारण कुटूंब म्हटलं तर भांडण होणारच. परंतू अशी भांडणं करतांना त्यातून जे वितुष्ट येतं ना. ते बरोबर नाही. वितुष्ट येवूच देवू नये. त्याचा विचार विवाह करण्यापुर्वीच करावा. तसंच प्रत्येक मायबापानं त्याचा मुलगा वा मुलगी उभयलिंगी असल्यास त्याचा अजिबातच विवाह करु नये आणि असा विवाह करुन कोणी कोणाची फसगतही करु नये. तसंच व्यसनं करावीत. ती करायला मनाई नाही. परंतू त्यावर स्वतःचं नियंत्रण असावं. आणखी याबाबत विशेष सांगायचं म्हणजे विवाहानंतर मुलगा असो वा मुलगी यांनी आपले विवाहबाह्य अनैतिक संबंध ठेवू नयेत. तसंच त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा. शंकाही मनात ठेवू नये. कारण जुनी आबालवृद्ध मंडळी म्हणतात की शंकेनं निर्माण होते चिंता आणि चिंतेनं घटतं शरीर. याचाच अर्थ असा की आपल्या मनात शंका जर उत्पन्न झाली तर त्याची परियंती त्यांचं आयुष्य समाप्त होण्यात होते.
भांडणं व्हावीत कुटूंबात. परंतू ती भांडणं जागची जागीच मिटवावीत. ती बाहेर जावू देवू नयेत. कारण बाहेरची मंडळी ही भांडणं मिटवीत नाहीत, तर ती त्यात तेल ओतण्याचे काम करीत असतात. अशी मंडळी आपल्या भांडणात विनाकारण जास्तची आग लावून मजा पाहात असतात. कारण त्यांना तशी मजा पाहण्यात जास्त आनंद वाटतो.
विशेष सांगायचं म्हणजे भांडणं करावीत. परंतू तेवढीही भांडणं करु नये की दोघंही पतीपत्नी एकमेकांशी फारकत घेण्यास मजबूर होतील वा घटस्फोटाचे न्यायालयात अर्ज दाखल करतील. यात एक बाजू आपण समजून घेतो. जी कमकुवत असते. परंतू दुसरी बाजू समजून घेत नाही. जी सक्षम असते. ती सक्षम बाजू म्हणजे आपली मुलं. आपण विवाहानंतर भांडणं करुन एकमेकांसोबत फारकत घेतल्यास वा घटस्फोटाचे अर्ज केल्यास आपल्याला असलेल्या बाळाचं जे नुकसान होतं. ते नुकसान कधीच भरुन निघणारं नसतं. कारण मुलांना जगण्यासाठी माय अन् बाप दोघांचीही गरज असते. आपले जर असे घटस्फोटाचे खटले न्यायालयात सुरु असतील वा आपली तशी फारकत झाल्यास मुलांना मायबाप असूनही अनाथ झाल्यासारखं वाटतं. त्यानंतर ती मुलं जास्त बोलकी बनत नाहीत. त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो व तीच मुलं सर्वात जास्त प्रमाणात गुन्हेगारी जगताकडं जात असतात. संस्कार मिटतात नव्हे तर आपल्या नासुकल्या शुल्लक भांडणानं मिटवले जातात. म्हणून विवाह झालेल्या जोडप्यांनो, वेळीच सावधान व्हा. विवाहानंतर वितुष्ट निर्माण होत असेल तर मुलं जन्मास घालायची घाई करु नका. वितुष्ट घालवा व मगच मुलं जन्मास घाला. मात्र मुलं जन्मास घातल्यानंतर फारकतीचा वा घटस्फोटाचा विचारच येवू देवू नका. मग काहीही झालं तरी. कोणासाठी तर तुमच्याच लेकरांसाठी आणि लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. कदाचीत मुलांवर 'मायबापाचं भांडण व आमचं नुकसान' असं म्हणण्याची पाळी येवू नये. यासाठीच संसदेनं काही नियम बनवावेत. असे नियम बनवावेत की विवाह करण्यापूर्वीच लोकं विचार करतील विवाह करावा की करु नये. विवाह केल्यावर भांडणं होवून जर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास मुलांची आबाळ होते. फार मोठ्या प्रमाणावर नुकसानही होते."
अमोलनं संसदेत मांडलेला प्रश्न. तसं पाहता त्या प्रश्नावर गंभीर चर्चा झाली. तो प्रश्न ऐरणीचाच होता. तशी त्यावर गंभीर चर्चा होवून तो मुद्दा विचारात घेतला गेला व काही नियम बनवले गेले. त्यानुसार ठरलं की कोणी विवाह केल्यावर विवाहानंतर भांडणार नाही. भांडल्यास पती पत्नी दोघांनाही काही रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. ही निर्धारीत रक्कम ही भरावीच लागावी आणि ती भरली तरी त्याची फारकत शक्यतोवर होवू देवू नये. अन् गंभीर मुद्दा असल्यास फारकत देण्याची वेळ आलीच तर त्यांना असलेली ती लेकरं त्यांना देवूच नये. ती अशांना दत्तक द्यावी की ज्यांना मुलबाळ नाही व जे आपल्या मुलांची विशेष काळजी घेवू शकतील.
आज तोही मुद्दा फारच गाजला होता. त्या मुद्द्यानुसार बरेचसे घटस्फोट थांबले होते. कोणी आपली मुलं आपल्यापासून हिरावून घेतली जातात. म्हणून फारकत घेत नव्हते. शिवाय त्यांना दंड म्हणून पैसेही भरावे लागत असल्यानं त्या वाटेवर जाण्याचा कोणीच प्रयत्नही करीत नव्हते.
सरस्वतीचा वाद. तोही संसदेत गाजणारा मुद्दा होता. सरस्वतीला वेदस्मृती, वेदवती, प्लाक्ष्वती असेही म्हणत असत. तसच ऋग्वेदमध्ये तिचं नाव अन्नवती आणि उदकवती असंही ठेवलं होतं. ही नदी बारमाही स्वरुपाची असून ह्या नदीत बाराही महिने पाणी असायचं. पाणी वहन क्षमता भरपूर होती. तिच्या काठावरील जमीन ही सुपीक असून त्या जमीनीत भरपूर धनधान्य पीकत होतं. पर्यायानं सांगायचं म्हणजे या नदीच्या काठावरील जमीन पिकाऊ होती. म्हणतात की एकदा संपूर्ण देशात अकाल पडला असता सर्व ऋषीमुनींनी सरस्वतीचा तट सोडला. परंतू सारस्वतानं तिचा काठ सोडला नाही. ज्यावेळेस अकाल संपला आणि ते ऋषीमुनी जेव्हा परत आले, तेव्हा ते सर्व प्रकारचं प्राप्त झालेलं ज्ञान विसरले होते. त्यावेळेस पुन्हा सरस्वतीच्या आज्ञेनं सारस्वतानं त्यांना शिष्यरुप प्रदान केलं होतं.
म्हणतात की सरस्वतीला सारस्वत व काव्यपुरुष नावाची दोन अपत्य झाली. काव्यपुरुषच्या जन्मानंतर शब्दांना अर्थ प्राप्त झाला. वैदिक काळात ह्या नदीला फार महत्व प्राप्त झालं होतं.
म्हणतात की सरस्वती एक विशाल नदी होती. ती कित्येक पर्वतांना चिरडून अरबी सागरापर्यंत जात होती. महाभारत काळातच ही नदी सुखायला लागली होती. कारण त्याच काळात या नदीला पाणी कमी होतं. परंतू त्याही वेळी पावसाळ्यात ही नदी दुथडी भरुन वाहू लागायची. तसंच असंही म्हटलं जातं की कित्येक राजांनी याच नदीतटावर यज्ञही केलेत.
सरस्वतीचा शोध घेतांना ज्यावेळेस काही भागाचं उत्खनन झालं, त्यावेळेस अनेक शहरं उघडकीस आली. त्यात कालीबंगा, लोथल व पीलीबंगाचा समावेश आहे. तिथे काही यज्ञकुंड देखील मिळाले आहेत. ही नदी मरुस्थलमध्ये विनाशन नावाच्या स्थानावरुन लुप्त झाली व ती काही अंतरावर प्रकट झालेली आहे.

**********************************************************

आपला भारत देश एक विशाल देश असून या देशाला नद्यांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. या देशात सरस्वतीच नाही तर गंगा यमुनासारख्या मोठमोठ्या नद्या आहेत. या देशात अनेक संस्कृत्यांनी जन्म घेतला आणि अनेक संस्कृत्या नष्ट झाल्या. त्यातच या नद्यांनी भेदभाव न करता आपलं समृद्ध व शुद्ध पाणी सर्वांना दिलं आणि कल्याणकारी कार्य केले. त्यात सरस्वती नदीचंही योगदान आहे.
सरस्वती नदीला एका नदीचंच नाही तर देवीचं स्थान प्राप्त आहे. तिनं केलेली मरुस्थानाला मदत, त्या मदतीमुळेच आज ती जरी नसली तरी तिला देवीच्या स्थानावर ठेवलं आहे व तिला पुजलं जात आहे. म्हणतात की तिला एक शाप मिळाला होता, त्यामुळंच ती विलुप्त झाली आहे. परंतू आजही ती विलुप्त झालेली असली तरी तिचं अस्तीत्व नाकारता येत नाही. मानलं जातं की आजही ती अस्तीत्वात आहे.
दृषद्वती नदी. जिला आता यमुना असं नाव पडलं आहे. ही नदी लहान होती व ही नदी सरस्वती नदीची उपनदी होती. तशाच प्रकारच्या अनेक नद्या सरस्वतीला मिळत होत्या. त्यात सतलज नदी सुद्धा सहभागी होती.
म्हणतात की जेव्हा भुकंप आला असेल, तेव्हा सरस्वती नदीचं पाणी यमुनेत शिरलं असेल व सरस्वती नदीचं अस्तीत्व समाप्त झालं असेल. त्यामुळंच मानलं जातं की प्रयाग इथं त्रिवेणी संगम आहे. तसंच असंही मानलं जातं की सरस्वती नदी ही गुप्त रुपात प्रयाग इथं वाहात आहे. कोणी म्हणतात की या नदीचा प्रवाह जमिनीखालून आताही वाहात जावून अरबी समुद्रात मिळतो. परंतू ते पाणी भूगर्भातून वाहात असल्यानं आपल्याला दिसत नाही.
सरस्वती नदीच्या प्रगटीकरणाबाबत अनेक विचार तत्व आहेत. तसाच एक रोमांचक इतिहास असा. एका पुरातन कथेनुसार जोगी वनात मार्कंडेय मुनी तपश्चर्या करीत होते, त्यावेळेस त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होवून सरस्वती नदी प्रगटली. ही नदी सुरुवातीस गुलेर इथं प्रगटली असं म्हटलं जातं. ही नदी प्रगटताच मार्कंडेय ऋषीनं तिचं पुजन केलं. त्यानंतर ही नदी पश्चिम दिशेला वाहायला लागली.
सरस्वती लुप्त होती. तिला शोधणं गरजेचं होतं. तशी ती गरज असल्यानं तशी चर्चा त्यानं संसदेत मांडली आणि म्हणाला,
"सरस्वती आपली आई. तिला विद्येची देवताही म्हणतात. तसं पाहता ती सात्वीक आहे, सोज्वळ आहे. होय, मी मानतो की ती एक शापीत नदी आहे. तिला शाप मिळाल्यानं तिला प्रत्येक वेळेस संकटांचा सामना करावा लागला. परंतू तिनं जनकल्याणकारी कार्य केलं. यात तिचा स्वार्थपणा नव्हता. अन् हं, श्रीहरी विष्णू कोणाला आवडत नाहीत, तिलाही आवडले. त्यातूनच हा शापाचा प्रकार घडला व तिच्या चुका होत गेल्या.
चूक.......चुका कोणाच्या हातून होत नाहीत. तशा तिच्याही हातून झाल्यात. त्याच शापाचा परिणाम की तिच्या वाहत्या पाण्यात तिनं अंतापर्यंत वाहू नये म्हणून भुकंप आला व तिचं आपलं अस्तीत्व समाप्त झालं. तिला निसर्गानं शिक्षा दिली. ती शिक्षा शापाच्याच कारणानं मिळाली. वेद व्यासाच्या कार्यात विघ्न आणलं म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष गणेशजीच्या कार्यात विघ्न आणलं म्हणून. परंतू आपण त्यांना शिक्षा देणारे कोण? तिलाही शिक्षा देणारे कोण? खरं तर आपल्याला तिला शोधावं लागेल. आपली एक प्राचीन नदी म्हणून नाही तर आपला एक जलस्रोत म्हणून. ती आपली गरज आहे म्हणून आणि तिचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून.
आज आपण पाहतो आहोत की पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे. पृथ्वीवरील पाणीच नाही तर पाण्याची मात्रा कमी होत चाललेली आहे. काही ठिकाणी सुका दुष्काळ पसरलेला आहे. काही भागात तर निव्वळ वाळूचे थर चे थर. वाळवंटच....... त्यातच त्या वाळवंट भुभागाची वाढ होत आहे. परंतू तो भुभाग कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. आपल्याला वाटत असेल की जावू द्या, पाणी संपेल तर संपेल. परंतू समुद्र आहे ना. त्याचे पाणी वापरु. परंतू महोदधीचे पाणी तरी वापरणे शक्य आहे का? कारण ते खारं पाणी आहे. ते जेवढं आवश्यक आहे, तेवढंच वापरता येईल. आजची अवस्था पाहता गोड्या पाण्याचे जलस्रोत सुकत चालले आहेत. जसे नदी, तलाव, विहिरी इत्यादी. शिवाय कुपनलिकांनाही पाणी येत नाही. परंतू आपण पाहिलं की आपली सरस्वती एक शापीत नदी जरी असली तरी प्राचीन काळात तिच्यातच मुबलक पाणी होतं. ती शापीत जरी असली तरी ती स्वार्थी नदी नाही. कित्येकांना तिनंच जीवनदान दिलेलं आहे प्राचीन काळात. हेच तिनं आपल्यावर केलेले उपकार.
प्राचीनकाळी तिच्याच तटावर माणसं राहिलेली असून कित्येक माणसांना तिनं लिहायला प्रेरीत केलेलं आहे आणि माणसं घडविलेली आहेत. अन् आजही आपण पाहतो की अमेरीकेची माणसं सॅटेलाईट आणून आपल्या देशातील नदीचा शोध घेत आहेत. का? आपण त्यासाठी सक्षम नाही का की आपल्या देशात विदेशातील लोकं येवून आपल्याच देशातील नदीचा शोध घेतात? का आपल्या देशात एवढी हुशार मंडळी असतांना त्या ब्रिटिश इंजीनिअर ओल्डहैमला ओळखावं लागतं की अमुक तमुक ठिकाणाहून कोणती तरी एक नदी विस्तारानं वाहात होती. त्यानं चौकशी केल्यावर त्याला येथीलच लोकांनी माहीती दिली की होय, ती वाहणारी नदी सरस्वतीच होती. मग त्या व्यक्तीनं जे प्रतिपादन केलं. त्याला आपणच पुष्टी दिली आणि त्या विदेशातील लोकांना तिच्या संशोधनाबाबत शोधकार्य करायला लावले आणि आपल्याला सर्व माहिती असून आपण त्याचे महत्व वाढवले. जणू आपल्याला काही येत नाही असं समजून. मी विशेषत्वानं सांगतो की आपला देश आधीपासूनच हुशार असून या देशाला विद्वानांची परंपरा लाभलेली आहे. आपल्या देशात पूर्वीपासूनच असे रथी आणि महारथी निर्माण झाले की ज्यांची गणतीच करता येत नाही. त्यात ब-याचशा स्रियांचाही सहभाग आहे. म्हणूनच सांगतोय की आपल्याच देशातील लोकांमध्ये असे बळ आहे की इतर देशातील प्रशासनानं आपल्याला ही नदी शोधण्यासाठी मदत नाही केली तरी चालेल, आपल्याच देशातील लोकं या नदीला शोधून दाखवतील व अस्तित्वातही आणतील. तेवढं बळ आहे आपल्याच देशातील लोकांत. फक्त तुम्ही एक संधी द्या. तुम्हाला सांगतो, सरस्वती ही आपल्याच देशातील नदी असून तिच्यात एवढं गोडं पाणी आहे की तिच्या पात्रातील पाणी आपणच नाही तर देशविदेशातील लोकांनी जरी प्राशन केलं ना, तरी संपणार नाही. सरस्वतीचा शोध लागल्यानं आपण आपलीच नाही तर आपल्या आजूबाजूच्या इतरही लोकांची गरज भागवू शकतो.
आता आपल्याला विचार येत असेल की सरस्वती ही नदी आहे की नाही? परंतू मी तुम्हाला हमखास सांगतोय की सरस्वती नदी आहे. आता कोणी म्हणतील की सरस्वती गुप्त रुपात प्रयागजवळ त्रिवेणी संगमाच्या रुपानं गंगेला तर मिळत नाही. तर त्याचं उत्तर मी हमखास सांगू शकत नाही. मात्र एक मत संसदेला सांगू शकतो की ही नदी भूगर्भातून वाहात असून ही नदी लुप्त जरी झालेली दिसत असली तरी आजही ती अरबीच सागराला मिळत आहे. मात्र तिचा शोध घेणे गरजेचे आहे."
अमोल जे बोलायचं ते बोलून गेला. त्यानं संसदेत सरस्वती नदीबद्दल जे मत मांडलं, ते अगदी वाखाणण्याजोगं होतं. ती नदी होती. अदृश्य रुपात वावरणारी. तिला दृश्य रुपात आणायचं होतं. त्यासाठी प्रयत्न करायची गरज होती. त्यामुळंच त्या गोष्टीचं स्फुर्लींग रोवलं होतं त्यानं.
अमोलचं ते बोलणं सर्व संसदेतील सदस्यांनी ऐकलं. तसे त्यावर सभापती महोदय म्हणाले,
"आपण जे मत व्यक्त केलंय. ते पटलेलं आहे. सरस्वती नदीत त्याकाळी भरपूर पाणी असेल हेही आम्ही मानतो आणि आम्ही एवढंही मानतो की ही सरस्वती केवळ देशीयांचीच गरज भागवणार नाही तर विदेशातील लोकांचीही गरज भागवली यात शंका नाहीच. परंतू मी या सर्व प्रतिनिधींच्या मार्फत विचारतो की आपण जे म्हणता की सरस्वती आहे. ती अरबी समुद्राला मिळते. त्याचं प्रमाण काय? प्रमाण? पुरावा? पुरावा हवा की नाही? आता बोला. पुरावा हवा की नाही?"
ते सभापती महोदयाचं बोलणं. त्यांनी पुरावा विचारला होता. अमोल बोलून तर गेला खरा. परंतू आता त्याला विचार आला होता की त्यावर काय उत्तर द्यावं. परंतू तोही काही कमजोर नव्हता. संसदेत विषय मांडतांना तो सर्व तयारीनिशी आला होता.
ते सभापती महोदयाचं बोलणं. त्यावर विचार करुन अमोल म्हणाला,
सभापती महोदय, ऐका तर मी काय सांगतो ते. माझ्या माहितीनुसार राजस्थानातील जेसलमेर जिल्ह्यात अशा काही कुपनलिका आहेत की ज्यातून वर्षभर अविरतपणे पाणी निघत असतं. तसंच याच जिल्ह्यात जालुवाला गावात गोमती देवीच्या कुपनलिकेतून आजही अविरतपणे पाणी निघतांना दिसतं. सभापती महोदय, यात एक आश्चर्याची गोष्ट अशी की राजस्थान सारख्या रेताड प्रदेशात जिथं फक्त नी फक्त जिकडे पाहावे तिकडे वाळूच वाळू पसरलेली असतांना तिथं असं अविरत पाणी निघतांना दिसत असेल तर याला काय म्हणावं? सभापती महोदय, एवढंच नाही तर एका प्राप्त माहितीनुसार राजस्थानातीलच एका अर्शद नावाच्या व्यक्तीच्या ट्युबवेलमधून अविरत पाणी वाहते आहे. याचं संशोधन केलं असता ते पाणी कमीतकमी तीन ते चार हजार वर्षापुर्वीचं असल्याचं सिद्ध झालंय. तेव्हा आपणाला विनंती की आपण हा सरस्वतीचा मुद्दा पास करुन या नदीच्या शोधकार्यासाठी आवश्यक निधी पुरवावा. हे शोधकार्य आपल्याच देशातील लोकांवर सोपवावं. तेच लोक सरस्वती नदीचा शोध लावू शकतील नव्हे तर ते कार्य अतिशय आत्मीयतेनं व जोमानं करु शकतील. शिवाय या रुपानं त्यांना रोजगारही मिळेल."
अमोल बोलला खरा. त्याच्या सर्व गोष्टी सत्य होत्या आणि बळ आणणा-या होत्या. ते म्हणणं सर्व संसद सदस्यांनी ऐकलं होतं. तसं पाहता ते बोलणं इतर सर्व लोकांना विचार करायला भाग पाडणारं होतं.
लोकसभा अध्यक्षांनं ते बोलणं ऐकलं. तसं संसद सदस्यांनीही. त्यांनी त्यावर योग्य विचार करण्यात येईल असं आश्वासन दिलं. तशा चर्चा होत असतांना वेळ बराच झाला होता. त्यामुळं आजची चर्चा बंद झाली होती.
शिशिर नुकताच निघून गेला होता. झाडाची पाणी शिशिराच्या पर्णगळीनं खाली गळून पडली होती. तसा वसंत उजळला होता नव्या दमानं. आज झाडावर हिरवी हिरवी पानं आली होती. आज तीन वर्ष झाली होती. परंतू सरस्वती नदीचा मुद्दा लोकसभा अध्यक्ष विसरुन गेले होते असं वाटत होतं. तसं पाहता संसदेतील सर्व सदस्यांना भुरळ पडली होती.
अमोलनं विवाह केला होता अंबिकाशी. अंबिकानंही अमोलशी विवाह केला होता. तो विवाह स्वार्थासाठीच होता. तिला वाटत होतं की अमोल एक खासदार आहे, तिथं अपार सुख मिळेल. परंतू तो तिचा विचार होता. ज्यावेळेस विवाह झाला होता. त्या विवाहानंतर दोनचार वर्ष चांगले गेले. परंतू जेव्हा तिला कळलं की अमोल एक साधा सुधा व्यक्ती असून तो काल जसा गरीब होता आणि सुखात लोळत नव्हता. आजही तसाच तो साधा व सुखात लोळणारा नाही. बाकीची लोकं पैसा कमविण्यासाठी साधारण नगरसेवक बनताच शर्थीनं प्रयत्न करतात आणि अल्पावधीतच लाखोच्या घरात पैसे कमवतात. परंतू अमोल तसा नाही. त्याला पैशाचा लोभ नाही आणि शानशौकतचाही लोभ नाही. त्याचे विचार चांगले आहेत. परंतू विचारानं आज पोट भरतं का? तर याचं उत्तर नाही असंच आहे.
अंबिकाला शानशौकत आवडत होती. तिला चारचाकी गाडीत फिरणं आवडत होतं. तिला वेगवेगळी वेषभुषा करुन समाजात मिरवणं आवडायचं. तिला इमानदारी आवडत नव्हती. तिला बेईमानी आवडायची. त्यातच तिला वाटायचं की अमोलनं बदलावं. दोन पैसे कमविण्यासाठी भ्रष्टाचार करावा. असं फाटकं राहू नये. कधीकधी ती त्याला सांगायची आणि तसं वागायला लावायची. परंतू अमोलच्या धमनीतच नाही तर नसानसात इमानदारीपणा कूटकूट भरला होता. म्हणून की काय, अंबिकाला त्याचे घरी करमत नव्हते. तिचा दम घुटत होता. तिला वाटत होतं की अमोल बदलेल आपण विवाह केला तर. परंतू अमोल न बदलल्यानं त्यांची सतत भांडणं होवू लागली व एक दिवस कडाक्याचं भांडण होवून अंबिका त्याला सोडून गेली. उलट तिनं अमोलवर घटस्फोटाचा खटलाही दाखल केला.
सरस्वती नदीचा मुद्दा. त्यातच घरचं भांडण. तसं पाहता अंबिका त्याची प्रगती आधीपासूनच पाहू शकत नव्हतीच. तिच्या मनात तसा द्वेष असायचा. ते त्याला माहीत नव्हते. तो मात्र निरागस होता. चांगला विचार करणारा. त्याला इमानदारीसह कोणतीही चांगली कामं करणं आवडायचं. त्याचंच फळ की काय, आज तो खासदार बनला होता. जणू शून्यातून त्यानं आपलं अस्तीत्व तयार केलं होतं.
अंबिकाचा न्यायालयात दाखल झालेला खटला. त्यातच संसदेत पारीत झालेल्या कायद्यानुसार त्या दोघांचाही घटस्फोट झाला. दोघांनाही घटस्फोटाचा खटला दाखल केल्याबद्दल एक मोठीशी रक्कम न्यायालयात भरावी लागली. शिवाय त्यांना असलेले अपत्यही त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आले व त्या मुलांना एका चांगल्या दांपत्याला दत्तक देण्यात आले.
तो घटस्फोटाचा खटला. तो खटला संपला होता. आता मुलाबाळांचीही चिंता नव्हती. काही दिवस तसे निराशेत गेले. तिची आणि जेव्हा मुलांची आठवण यायची, तेव्हा जीव कासावीस व्हायचा. राहावंसं वाटायचं नाही. जणू आत्महत्याच कराविशी वाटायची. परंतू जसजसे दिवसं गेले. तसतसं त्यानं ठरवलं की आपण आता आपलं लक्ष पूर्ण स्वरुपात राजकारणात घालायचं. अशाच परिस्थितीत आज तीन वर्ष झाले होते. सरस्वती नदीचा मुद्दा काही मार्गी लागला नव्हता.
अमोलच्या जेव्हा आज तीन वर्षानंतर सरस्वतीचा मुद्दा लक्षात आला. तेव्हा तो लोकसभा अध्यक्षांच्या कानाशी लागला. त्यांना आठवण करुन दिली आणि सरस्वती नदीचा मुद्दा मार्गी लावून घेतला.