Murder Weapon - 4 books and stories free download online pdf in Marathi

मर्डर वेपन - प्रकरण 4




मर्डर वेपन प्रकरण ४
दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर सौंम्या पाणिनीला म्हणाली, “तुमच्या कालच्या लाडक्या अशिलाचा फोन आलाय सर.” तिने पाणिनी कडे फोन दिला.
“ मिस्टर पटवर्धन, मला तुम्हाला तातडीने भेटायलाच हवंय” रती म्हणाली.
“ तू इथे चैत्रापूर मधे आहेस?” पाणिनीनं विचारलं
“ हो.”
“ इथे कशी आलीस तू?”
“ मी काल रात्रभर झोपू शकले नाही.मी जसजसा विचार करत होते तसतस मला तुमचं म्हणणं पटत गेलं.म्हणजे आपण एकत्र घरी जाऊन काही ...”
“ काही काय?” पाणिनीनं विचारलं
“ काही घडलं नाही ना ते पाहू.”
“ म्हणजे?” पाणिनीनं विचारलं
“ म्हणजे पद्मराग ने आजची त्याची सकाळी दहा ची अपॉइंटमेंट पाळली नसेल तर काहीतरी गंभीर घडलंय असा अंदाज आपण करू शकतो.” –रती म्हणाली.
“ कदाचित अत्ता तो ऑफिसात त्याच्या अपॉइंटमेंट मधे असू शकतो.”
“ तोच मुद्दा मला सांगायचाय पटवर्धन.मी थोड्याच वेळापूर्वी अंगिरस शी बोलले, पद्मराग अजून ऑफिसात आलाच नाहीये.”
पाणिनी हे ऐकून गंभीर झाला.
“ अत्ता तू माझ्या ऑफिस पासून किती लांब आहेस?”
“ मी तुमच्या ऑफिसच्या इमारती खालच्या पार्किंग मधे आहे. ”
“ आता मी सांगतो ते नीट ऐक, मधे प्रश्न विचारू नको. लगेच वर ये.पण रिसेप्शन मधून आत न येता पाणिनी पटवर्धन (खाजगी) असं लिहिलेल्या दरवाजातून आत ये, सौंम्या तुला आत घेईल. ” पाणिनी म्हणाला आणि फोन ठेवला.
“ सौंम्या, मला एकदा वाटतंय की आपली पर्स चोरली असल्याचं रती जे सांगते आहे ते बरोबर असाव त्याच वेळी असंही वाटत की ती आपल्या ऑफिसात येऊन मुद्दामच पर्स ठेऊन बाहेर पडली असावी, पर्स मधे बरेच पैसे असल्याने आपले कुतुहूल वाढेल आणि आपण तिचा पत्ता शोधून तिच्या पर्यंत पोचावं असा तिचा डाव असावा. पर्स मधे रिव्हॉल्व्हर नसतं तरी आपण ते केलंच असतं. सौंम्या, पटकन कनकला फोन लाव.रती इथे येण्यापूर्वी मला त्याच्याशी बोलायचंय.” पाणिनी म्हणाला.
काही क्षणातच फोन मधून कनकचा आवाज पाणिनीच्या कानावर आला.
“ कनक, मला तातडीने तुझ्याकडून पुढच्या पंधरा मिनिटात एक मदत हव्ये.सत्तावीस ते तीस या वयाच्या दरम्यानच्या, दिसायला चांगल्या असणाऱ्या सहा ते सात तरुणींनी गडद रंगाचे गॉगल घालून तुझ्या ऑफिसात बसायचं. ”
योग्य वेल येताच सौंम्या तुला इंटरकॉम वर म्हणेल, ‘ कनक, मी सौंम्या.’ तिने हे शब्द उच्चारताच तू गॉगलवाल्या मुलींना माझ्या ऑफिसच्या रिसेप्शन च्या दारात उभं करायचं.पण त्यांनी आत जायचं नाही.मी तशाच एका गॉगल घातलेल्या मुलीला घेऊन माझ्या खाजगी दाराने बाहेर येईन आणि तू आणलेल्या मुलींसह एकत्रच रिसेप्शन मधून आत प्रवेश करू. समजलं नीट?”
“ समजलं पण इतक्या कमी अवधीत तुला हव्या असणाऱ्या सहा-सात मुली मिळवणं......” कनक कुरकुरत म्हणाला.
“ आपल्याच इमारतीत अनेक ऑफिसेस आहेत. तिथे काम करणाऱ्या मुलींना ताशी पाचशे रुपये देऊ कर. किंवा दुसऱ्या कोणत्यातरी मार्गाने मिळवं.मला जो मार्ग सुचला तो तुला सांगितला. मला मुली उपलब्ध करून दे म्हणजे झालं.” पाणिनी म्हणाला. आणि फोन ठेवला.
सौंम्या पाणिनीकडे पाहून हसली. “ सर आपल्या रिसेप्शनिस्ट गती कडून ओळख परेड करून घेण्यासाठी रायबागी उपद्व्याप? ”
“ एकदम बरोबर, रती रिसेप्शन मधून आत आली असती आणि मी जर गती ला विचारलं असतं की तू हिला पाहिलं आहेस का पूर्वी,तर ती म्हणाली असती की अरे हो ही तर रती आहे.आपल्या ऑफिसात पर्स विसरून गेलेली. आणि ती तिला ही सांगेल की रती तुमची पर्स पाणिनी पटवर्धन यांचेकडे आहे. यात गती ची चूक आहे असं नाही.कारण तिला एवढंच लक्षात आहे की गडद रंगाचा गॉगल घातलेली, सत्तावीस-ते तीस वयाची एक तरुणी इथे आली होती आणि आपली पर्स विसरून गेली. पुढे जर काही अघटीत घडलं आणि गती ने रती ला ओळखलं की हीच आमच्या ऑफिसात आली होती तर आपण अडचणीत येऊ. म्हणजे आपल्या ऑफिसात आलेली तरुणी रती असेल तरी आणि रती ची पर्स चोरणारी तोतया असेल तरी. ” पाणिनी म्हणाला.
तेवढ्यात दार वाजलं.सौंम्या ने उघडलं आणि रती ला आत घेतलं.
“ तुझा गॉगल नाही घातलास आज?” सहजगत्या विचारावं तसं पाणिनीनं विचारलं
“ मी नेहेमी नाहीच घालत.जर उन्हातून जात असेल कुठे बाहेर,तरच वापरते.” रती म्हणाली.
“ तुझ्याकडे आहे गॉगल म्हणजे ?”“ अर्थात आहे पटवर्धन.”
“ तू डोळ्यावर घालत नाहीस तेव्हा काय करतेस? म्हणजे कुठे ठेवतेस तो?”
“ अर्थात माझ्या हँडबॅग मधे.”
“ मी तुला जी बॅग परत केली,त्यात होता तुझा गॉगल?” पाणिनीनं विचारलं
“ नव्हता.” रती उत्तरली.
“ याचा अर्थ दुसरं कुणीतरी वापरत होतं तो.”
“ हो.नक्कीच.”
“गॉगल ची रिकामी केस होती तुझ्या बॅगेत, तुला मी बॅग परत केली तेव्हा.” पाणिनी म्हणाला.
“ हो आहे ती त्यात.” रती म्हणाली.
“ अजून एखादी गॉगल ची जोडी आहे?” पाणिनीनं विचारलं
“ हो मी नवीन एक खरेदी केली.”
“ मी तुला परत केलेली हँड बॅग आणि पर्स आहे अत्ता तुझ्याकडे?” पाणिनीनं विचारलं
“ आहे.”
“ तुला देतांना ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या आहेत त्यात?” पाणिनीनं विचारलं
“ हो आहेत.पण असे प्रश्न का विचारताय मला?” रती वैतागली.
“ बघू मला तुझ्याकडचा गॉगल. ”
तिने बॅग मधून गॉगलची केस आणि गॉगल काढून पाणिनीच्या हातात दिला.
“ हा नवीन घेतलेला गॉगल तुझ्या जुन्या केस मधे अगदी बरोब्बर कसा काय बसतोय?” पाणिनीनं विचारलं
“ माझा पहिला गॉगल ज्या कंपनीचा आणि ज्या मापाचा होता, तसाच मी नवीन घेतला.त्यामुळे जुन्या केस मधे बसणारच ना तो?” रती ने प्रतिप्रश्न केला.
“ नक्की कुठल्या दुकानातून घेतलास तू? तिथला विक्रेता ओळखेल का तुला?” पाणिनीनं विचारलं
“ मला दुकानाचं नाव वगैरे नाही आठवणार.कारण मी गाडी चालवताना पार्किंग विलासपूर जागा मिळेल तिथे थांबले,खाली उतरले, समोर जे दुकान दिसले तिथे गेले आणि घेतला गॉगल. ”
“गॉगल घ्यायला पैसे कुठून मिळाले तुला? तुझी पर्स तर चोरीला गेली होती. ” पाणिनीनं विचारलं
“ तुम्हाला म्हणाले ना मी, माझ्या नवऱ्याने मला पाच हजार रुपये देऊन ठेवले होते.” –रती “ मला तो म्हणाला की बॅगेत ज्या काही वस्तू होत्या त्या पुन्हा घे.तुझं लायसेन्स वगैरे याचा चोराला काही उपयोग नाही.तो फक्त पैसे घेईल आणि लायसेन्स वगैरे तुला परत करेल. ” –रती म्हणाली.
“ ठीक आहे. तुला इथे का यावसं परत?” पाणिनी म्हणाला.
“तुम्ही काल मला जो सल्ला दिलात,त्याचा मी रात्रभर विचार केला.इथे येऊन काय घडलंय हे पाहिल्याशिवाय मला नीट झोप लागणार नाही हे माझ्या लक्षात आलंय.” रती म्हणाली.
“ तुझा गॉगल डोळ्यावर घालशील जरा,अत्ता?” पाणिनीनं विचारलं
तिने आपल्या डोळ्यावर गॉगल घातला.पाणिनीने नीट निरखून पाहिलं. “ मोठी भिंग आहेत याची. ” तो म्हणाला.
“ मला असेच आवडतात. गडद रंगाचे आणि मोठ्या आकाराच्या काचांचे. रेबॅन कंपनीचे.”
“ तर मग तू सकाळी अंगिरस खासनीस ला फोन केलास?”
“ हो तुम्हाला फोन करण्यापूर्वीच. तो म्हणाला मलाही काळजी वाटायला लागली कारण त्याने अपॉइंटमेंट ची आठवण करायला फोन केला होता.पण फोन घेतलाच नाही.लँड लाईन वर सुद्धा उचलला नाही.आपोआपच आन्सरिंग मशीन वर जात होता.साधारण जेव्हा महत्वाची अपॉइंटमेंट असते तेव्हा तो पंधरा मिनिटे आधीच हजर असतो. ”
“ अपॉइंटमेंट रद्द केली नव्हती ना?” पाणिनीनं विचारलं
“ नाही ना ! पद्मराग ला भेटायला येणारा माणूस ऑफिस मधे येऊन बसला होता. अंगिरस त्याला म्हणाला की अजून पंधरा मिनिटात जर तो आला नाही तर घरी जाऊन बघीन काय झालाय ते.” रती म्हणाली.
“ अंगिरस कडे घराची किल्ली असणार होती का?”
“ घरची एक किल्ली ऑफिस मधे असतेच ठेवलेली. कधी काही तातडीचे काम निघाले, पद्मराग परगावी किंवा लांब गेला असेल आणि घरातून काही कामाची कागदपत्रे वगैरे आणायची असतील तर खोटी नको म्हणून किल्ली ऑफिस मधे असते. ”
पाणिनीनेआपल्या हातातल्या घड्याळाकडे बघत म्हंटले, “ आता एवढ्यात काहीतरी कळायलाच हवं आपल्याला नाहीतर आपण घरी जाऊन बघू,त्याने काही चिट्ठी ठेवली आहे का ते.”
“ तसं असतं तर त्याने ऑफिसात निरोप देऊन ठेवला असता. ” रती घाईत म्हणाली. “ मला वाटतंय तो आजारी असेल किंवा......”
“ किंवा काय रती?” पाणिनीनं विचारलं
“ तुम्ही काल म्हणालात तसं झालं असेल.” ती खालच्या आवाजात म्हणाली.
पाणिनीने परत घड्याळाकडे नजर टाकली. कनक विलासपूर फोन लावला. “ तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं?”
“ दोन मुली मिळाल्यात मला. तुला पाच-सहा हव्या होत्या पण अजून तरी नाही मिळाल्यात.”
“ अजून दहा मिनिट आहेत तुला कनक.” पाणिनी म्हणाला.
“ मी प्रयत्न करतोच आहे.”
“ काय आहे हे सर्व? माझ्या केस शी संबंधित आहे? ” –रती
“ तुझी कसली केस आहे?” पाणिनीनं विचारलं
त्याने पोलीस स्टेशन ला इन्स्पे.तारकर ला फोन लावला.
“ हाय पाणिनी, तुला एखादं प्रेत मिळालंय की काय? त्याशिवाय तू मला स्वतः फोन करणार नाहीस. ” तारकर म्हणाला.
“ मला मिळालं नाहीये अजून काही,पण एका गोष्टीची काळजी वाटते आहे.” पाणिनी म्हणाला.
“ तुला वाटते म्हणजे माझ्याही डोक्याला डोकेदुखी होणारे असं दिसतंय.”
“ तारकर, विलासपूर नोयडा इथे राहणाऱ्या माझ्या एका अशीलाची पर्स दोन दिवसापूर्वी हरवली.म्हणजे मोठी हँडबॅग, बायका वापरतात तशी.म्हणजे त् लिपस्टिक, चिल्लर, वगैरे बायकी वस्तू असलेली.”
“ आलं लक्षात.” तारकर म्हणाला.
“ तिचं नाव आहे रती रायबागी.आपला नवरा पद्मराग रायबागी ची ती पूर्वाश्रमीची पत्नी.ते वेगळे राहतात.ती केरशी ला राहते.”
“ लटांबर न लावता मूळ मुद्दा सांग.” तारकर म्हणाला.
“ काल मी आणि सौंम्या दोघेही ऑफिसात नसतांना एक तरुणी आली.तिने मोठ्या आकाराचा गॉगल घातला होता.तिने रिसेप्शनिस्ट ला सांगितलं की तिचं नाव मिसेस रायबागी आहे आणि मी ऑफिसात येई पर्यंत ती थांबून राहायला तयार आहे.ती थोडा वेल बसली पण नंतर रिसेप्शनिस्ट ला म्हणाली की जरा खाली जाऊन येते. ती गेली पण परत आलीच नाही. आम्ही आल्यावर आम्हाला ऑफिसात एक पर्स किंवा हँड बॅग सापडली.त्याची आम्ही तपासणी केली तेव्हा लायसेन्स, क्रेडीट कार्ड अशा वस्तू त्यात सापडल्या.ज्यावरून त्या वस्तू मिसेस रायबागी च्या असल्याचं सिद्ध होईल. ”
“ मग त्यात काय एवढ पाणिनी? त्या तिला परत.....” तारकर बोलता बोलता थांबला. “ पाणिनी, त्यात रिव्हॉल्व्हर तर नव्हतं ना? अन्यथा तू असल्या फालतू कारणासाठी मला फोन केला नसतास. ”
“ होतं.”
“ त्यासाठी लागणारं परमिट आहे न तिच्याकडे?” तारकर म्हणाला.
“ नाही.मिसेस रायबागी आपल्या बरोबर रिव्हॉल्व्हर बाळगत नाही.तिने ते रिव्हॉल्व्हर शेवटचे म्हणजे तिच्या बेडरूम मधल्या कपाटाच्या ड्रॉवर मधे बघितलं होतं.” पाणिनी म्हणाला.
“ एक मिनिट,पाणिनी, त्या रिव्हॉल्व्हर मधून गोळी मारली गेली नव्हती ना?” तारकर ने विचारलं.
“ दोन वेळा.” पाणिनी म्हणाला.
तारकर ने डोक्याला हात लावला.
“ त्या गोळ्यांनी ज्याचा बळी घेतला, त्या प्रेता बद्दल सांग आता मला ” –तारकर.
“ तसं झालाय की नाही हेच मला माहित नाहीये,पण मला तीच काळजी वाटत्ये.” पाणिनी म्हणाला.
“मला ही बया कुठे भेटेल? तिचा पत्ता सांग मला.”तारकर म्हणाला.
पाणिनीने रती चा विलासपूर चा पत्ता त्याला सांगितला. “ ती अत्ता इथे माझ्या ओफिसात आहे तारकर.आम्ही चर्चाच करत होतो या विषयी,मला असं वाटलं की तुझ्या कानावर घालून ठेवावं.”
तारकर अचानक सावध झाला. “ रिव्हॉल्व्हर मधून झाडलेल्या दोन गोळ्यांबद्दल ती काय म्हणत्ये?”
“ तिला त्याबद्दल काहीच माहिती नाहीये तारकर.तिची हँडबॅग चोरीला गेल्ये आणि रिव्हॉल्व्हर सुद्धा. महत्वाच म्हणजे माझ्या ऑफिसात येऊन आपलं आपण मिसेस रायबागी आहोत असं सांगणारी आणि ऑफिसात हंड्बग विसरून जाणारी बाई वेगळीच आहे,ती माझी अशील रती नाही ती तोतया बाई माझ्या अशीलाचं नाव लावत होती. ”
“ मग केरशीच्या पोलिसांना का नाही कळवत पाणिनी? प्रेत सुद्धा कदाचित तिथेच असेल.” तारकर म्हणाला.
“ माझाही अंदाज तोच आहे पण मला वाटलं तुला सांगितलेलं बरं कारण तू म्हणतोस ना नंतर की पाणिनी तू आधी मला कळवत नाहीस त्यामुळे माझ्या तपासात कटकटी निर्माण होतात. त्यातून विलासपूर हे दुसऱ्याच प्रदेशात येतं तिथे माझ्या ओळखही नाही.फुकट माझ्या मागे शुक्ल काष्ठ लागायची !” साळसूद पणाचा आव आणत पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे ,ठीक आहे. कळल्या भावना तुझ्या. तू मला कळवलंस, मी लक्षात ठेवीन.” तारकर म्हणाला..”
“ रती. मी सांगतो ते नीट ऐक,” फोन बंद होताच पाणिनी म्हणाला, “ तारकर आता इथे लगेचच येईल, सायरन वाजवत,वाजत गाजत येईल. तुला आता तुझी उत्तरं तयार ठेवावी लागतील. तू माझ्याशी खरं बोलली असशील तर तारकरच्या प्रश्नांना बिन धास्तपणे, मोकळेपणे आणि प्रामाणिकपणे उत्तरं दे.मला तू सत्य सांगितलं नसशील तर तारकरच्या प्रश्नांना एवढंच उत्तरं दे की मला काहीही बोलायचं नाही.पण कोणत्याही स्थितीत त्याच्याशी खोटं बोलायचं नाही. ”
“ समजलं मला.” –रती
“ तर मग रती. माझ्या ऑफिसात आलेली मुलगी म्हणजे तू नव्हतीस?” पाणिनीनं विचारलं
“ नव्हते.”
“ तू तुझी हँडबॅग सोडून गेली नव्हतीस?”
“ नाही.”
“ त्या रिव्हॉल्व्हर मधून गोळ्या तू झाडल्या नाहीस?” पाणिनीनं विचारलं
“ नाही.”
“ तू तुझं रिव्हॉल्व्हर तुझ्याच अपार्टमेंट मधे शेवटचं बघितलंस ?”
“ होय.”—रती
“ ठीक आहे हे सर्व खोट सांगत असशील तू तर तुझी फाशी अटळ आहे.” पाणिनी म्हणाला आणि त्याने कनक ओजस विलासपूर फोन लावला.
“ सहा मुली मला मिळाल्या आहेत पाणिनी. आणि त्यांचा संयम आता संपत चाललाय.” कनक म्हणाला.
“ फार वेल लागणार नाही आता, त्यांना गॉगल मिळालेत ना? सगळ्यांना?”
“ आहेत.”
“ मोठे?” पाणिनीनं विचारलं
“ आहेत, तुझ्या अपेक्षेनुसार. पाणिनी, किती वेल लागेल या सगळ्याला?” कनक म्हणाला.
“ या मिनिटापासून पुढील वीस मिनिटात सर्व नाटक संपेल.” तयार रहा.” पाणिनी म्हणाला आणि फोन ठेवला. त्यानंतर तो रती विलासपूर म्हणाला, “ तुझ्याकाडला मोठा गॉगल हातात तयारच ठेव, कुठल्याही क्षणी घालता येईल असा. आता इथे तारकर कोणत्याही क्षणी येईल .तो इथे असताना माझ्या बोलण्याकडे तू जरासुद्धा लक्ष देऊ नको.” पाणिनी म्हणाला.
“ तुम्हाला इन्स्पे.तारकर येईल इथे असं का वाटतंय पटवर्धन? तुमचं मी फोनवर जे बोलणं ऐकलंय ना, त्यावरून त्याला तुमच्या बोलण्यात काहीही अर्जंट असावं असं वाटलेलं नाही.”
“ तू इथे येणार असल्याचं अंगिरस ला तू बोलली होतीस का?” पाणिनीनं विचारलं
“ हो बोलले.......” रती उत्तरं देत असतांनाच फोन आला, “ अंगिरस चा फोन आहे ती म्हणाली.”
“ इथे घे किंवा बाजूच्या खोलीत जा.” पाणिनी म्हणाला.
“ कशाला? इथेच घेते की.” रती म्हणाली. “ हां, बोल अंगिरस. का sss.. य ! ” ती किंचाळून म्हणाली. “ तू पोलिसांना कळवलस ? बापरे काय हे भलतच झालंय? मी अत्ता अॅडव्होकेट पटवर्धन यांच्या ऑफिसात आहे..... हो हो सांगायला हरकत नाही पोलिसांना हे.....मला तातडीने तिकडे यायचंय..... अर्थात पाणिनी पटवर्धन यांच्याशी बोलूनच ठरवते मी..... ओके.बाय.थँक्स अंगिरस.”
फोन ठेऊन ती पाणिनी कडे वळली.
“ खून ? नवऱ्याचा? आश्चर्य वाटलाय की काय?”
“ काहीतरी वाईट घडणार असं माझं मन मला सांगत होतं मिस्टर पटवर्धन, पण हा फार मोठा धक्का आहे मला.”
“ मला पटकन सांग अंगिरस नेमकं काय म्हणाला तुला.” पाणिनी म्हणाला.
“ तो त्याच्या जवळ असलेली किल्ली घेऊन घरी गेला तेव्हा त्याला पलंगावर माझा नवरा पडलेला दिसला.त्याच्या डोक्यात दोन गोळ्या घालण्यात आल्या होत्या.” रती किंचाळत म्हणाली.
तेवढ्यात रिसेप्शनीस्ट गती चा इंटरकॉम आला.
“ भोपटकर नावाच्या माणसाचा फोन आलाय ” ती म्हणाली.
“ दे जोडून ” पाणिनी म्हणाला “ हॅलो, काय म्हणताय?” सहजपणे पाणिनी म्हणाला.
“ मला रायबागी च्या प्रॉपर्टी तडजोडी बाबत पुढे काय प्रगती आहे ते जाणून घ्यायचं होतं.”
“ खरं म्हणजे या क्षणी मिसेस रती रायबागी माझ्या ऑफिसात आहेत. मला शेवटचं सांगा तुम्ही किती वाढवू शकाल रक्कम? ” पाणिनीनं विचारलं
“ मी तुम्हाला काल सांगितली आहे तीच ” भोपटकर म्हणाला.
“ ती मंजूर नाही मला. तुम्ही शेवटची रक्कम सांगा.”
“ त्यासाठी मला पुन्हा माझ्या अशिलाला विचारावं लागेल ”
“ मी आहे इथेच.सांगा मला.” पाणिनी म्हणाला. आणि फोन बंद केला.
“तुम्ही पद्मराग गेल्याचं त्याला कळू दिलं नाहीत? ” रती आश्चर्याने म्हणाली.
“ नाही.त्याच्यावरच सोडला मी तो विषय.” पाणिनी म्हणाला.
पुढची काही मिनिटं तणावपूर्ण शांततेत गेली.पुन्हा भोपटकर चा फोन आला.
“ पटवर्धन, मी बोललो माझ्या अशीलाशी.त्याला कल्पना दिली की तुम्ही रक्कम वाढवून मागताय आणि तुमच्या मागणी एवढी रक्कम आपण दिली नाही तर पटवर्धन कोर्टात जातील आणि आपणही भांडत बसू.त्याने माझ्याकडे विचार करायला वेळ मागितला पण पुन्हा वीस मिनिटातच पुन्हा फोन करून सांगितलं की पाणिनी पटवर्धन सारख्या वकीलाबरोबर भांडणे सोपे नाही.त्याने मला वाढीव रकमेची तयारी दाखवली, पटवर्धन, ती रक्कम ऐकून मी चक्रावूनच गेलोय.”
“ किती आहे ती?” पाणिनीनं विचारलं
“ दरमहा दहा हजार रुपये पुढील दहा वर्षं.या शिवाय त्याच्या मृत्युपत्रात तिला पाच लाख देण्याची तरतूद.” भोपटकर म्हणाला.
“ या रकमे बद्दल तुझी खात्री आहे न आता?” पाणिनीनं विचारलं
“ हो.”
“ तू रायबागी शी बोलूनच मला सांगतो आहेस ना हे?” पाणिनीनं विचारलं
“ अर्थातच.”
“ मागून असं म्हणायला नकोस तू की मी फोनवर रायबागी समजून बोललो पण तो वेगळाच माणूस होता, वगैरे.”
“ हे बघा,पटवर्धन, मी प्रामाणिक पणाने वकिली करणारा माणूस आहे. तत्वाने जगणारा माणूस आहे.”
“ स्वत:ला आदर्श वकील समजणाऱ्या माणसा, तुझ्यासारखा खोटारडा माणूस उभ्या आयुष्यात पहिला नाही मी.” पाणिनी म्हणाला.
“ काय बोलताय पटवर्धन?.. मी...हे..सहन...”भोपटकर म्हणाला.
“ ज्या रायबागी शी बोलल्याचं तू सांगतो आहेस, तो चोवीस तासापूर्वीच मृत्यू पावलाय.” पाणिनी म्हणाला आणि भोपटकर ला काही बोलायची संधी न देता फोन ठेवला.
प्रकरण ४ समाप्त


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED