रक्तकेतू - भाग ३ - अंतिम भाग Sanjeev द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रक्तकेतू - भाग ३ - अंतिम भाग

रक्तकेतु भाग ३
चेन्नईहून माझं काम आटपून मी परत आलो होतो घरी आलो तेव्हा दुपारचे अडीच वाजलेले होते. सकाळची फ्लाईट उशिरा आलेली होती. मी बेल वाजवली दारामध्ये दीपा उभी होती.
"अविनाश कधी आलास. . .?"
"मी तुझी किती वाट पाहिली. . .!". "मला करमतच नव्हतं". दीपा
आमच्या घरात दीपाला पाहून मला नवल वाटल नव्हत, काही तरी अघटीत प्रकार बघायला मिळेल याची मला अगदी खात्री होती.
राघवन च्या सामर्थ्याला तोड नव्हती एवढं मात्र खर !!!
दीपाला हाताने बाजूला करून मी घरात आलो, ती सारखी माझ्या अवतीभवती होती. बडबड चालू होती. गळ्यात टाईप नव्हताच. मी किचन मध्ये आलो ही स्वयंपाक करत होती. चेहरा गंभीर पेक्षा जास्त चिंताक्रांत, चेहऱ्यावर गोंधळ होता हा नक्की काय प्रकार आहे हे तिला समजणे शक्य नव्हतं...!. मी तिला खुणेनेच गप्प रहायला सांगितलं, आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो कपडे बदलले, निरांजन पेटवून स्वामी महाराजांच्या समोर बसलो धुपाचा मंद सुगंध सगळीकडे दरवळत होता स्वामींच्या ध्यानात हळू हळू माझी आजूबाजूची जाणीव नष्ट होत गेली मिटल्या डोळ्यासमोर अनंत कोटी ब्रम्हांडनायक स्वामी !!! क्षणभर प्रकट झाले. महाराजांना मला जे काही सांगायचं होतं ते माझ्या मनामध्ये विचार रुपात उतरल होत. स्वामींना नमस्कार केला, मिटल्या डोळ्यासमोरील दृश्यमान स्वामीं अंतर्धान पावले. मी उठलो दीपा सोफ्या वरती बसलेली होती. एकटक माझ्यावर नजर ठेवून होती
"अविनाश चेन्नई तुला करमत नसेल ना".
"तरी मी व्हाट्सअप वरती सतत तुला पिंग करत होते".
"पण तू एक सुद्धा रिप्लाय पाठवला नाही".
"एखादा रिप्लाय तर पाठवायचा", दीपाची बडबड चालू होती.
"खरे तू म्हणतेस ते दीपा,कामाच्या गडबडीत मी हे साफ विसरून गेलो, सॉSरी", हे सगळं संभाषण चालू असताना मी जवळच असलेल्या एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवलेली यज्ञकुंडातील जपून ठेवलेली विभूती हातात घेतली, गायत्रीच स्मरण करत दीपाच्या जवळ आलो "दीपा सॉरी मला पण तुझी खूप आठवण आली", इत्यादी बडबड करत तिला बोलण्यात गुंतवत ती विभूती तिच्या कपाळावरती लावली. विजेच्या तारेला हात लागून शॉक बसावा तस काहीसे भाव दीपाच्या चेहेऱ्या वर उमटले व ती सोफ्यावर कोसळली.
हिला मी दीपाच्या मोबाईल मधून रमेशचा फोन नंबर शोधायला सांगितला. रमेशला फोन करून त्याला आमच्या घरी बोलावून घेतलं. होतं रमेश बिचारा सरळ साधा माणूस दिसत होता, दीपाला बघितल्यावर ते त्याचा जीव भांड्यात पडला रमेश अनेक प्रश्न पडलेले होते ते त्याने विचारायच्या आतच मी थोडक्यात आत्तापर्यंत घडलेला प्रकार त्यातील काही प्रसंग वगळून त्याला सांगितला तो पुरता घाबरलेला दिसत होता. मी त्याला म्हणालो "रमेशजी खरंच तुमचं तुमच्या पत्नी वरती प्रेम असेल तर सध्या राहात आहात ती जागा त्वरित सोडून जा. .. !!!". "ही माझ्या मित्राच्या फ्लाईटची चावी महिना वर तुम्ही तिथे राहू शकता, महिन्याभरात तुम्हाला एखादं नवीन घर नक्की स्वामी महाराजांच्या कृपेने नक्की भाड्याने मिळेल".
"स्वामींचा तारक मंत्र तुम्ही दोघांनी सकाळी उठल्यावर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त म्हणत जा".
"स्वामींना मदती करता विनंती करा नवीन घर मिले पर्यंत".
"हे सगळं तुम्ही तुम्ही येता आठवड्यात आठवड्यात करून टाका".
"आता यावर जास्त भाष्य व चर्चा नकोत... !!!".
रमेश पूर्ण भेदरलेला होताच, "हे जर तुम्ही केला नाही तर तुम्ही तुमच्या पत्नीला कायमच गमावून बसाल हे मात्र मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो".
"आणि काळजी करू नका या फ्लॅट्स भाडं तुम्हाला द्या वगैरे लागणार नाही". माझा मित्र महाराजांचा सेवेकरी च आहे.
तोपर्यंत दीपा शुद्धीत आली होती दोन मिनिटात तिला काहीच कळलं नाही. रमेश वर नजर गेल्यावर "तुम्ही इथे असं?". तिने आश्चर्याने विचारले. रमेश ने तिच्या पाठीवर ती थोपटत तिला म्हणाला "चल दुसऱ्या जागेची व्यवस्था झालेली आहे". दोघांनी घराबाहेर पडले.
ही सोप्या वरती बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर काळजी होती.
तिला म्हटलं "काळजी करू नकोस स्वामी आहेत ना. . .!" आणि "मुख्य म्हणजे ती दीपा नव्हतीच, दीपाच्या शरीरातून दुसरच काहीतरी वावरत होत,त्याचा बंदोबस्त करून टाकला, ते गायत्री च्या हवनाच्या विभूतीत जळून राघवन च्या तावडीतून सुटल. . .!.
"आणि दीपाच्या रक्तकेतू मधल्या वाईट स्मृती मी पुसून टाकल्या आहेत तिला आता त्यातल्या कुठल्याही घटना ही कथा वाचल्याशिवाय आठवण शक्य नाही आणि ही कथा ती कधी वाचेल असं मला तरी वाटत नाही".
आम्ही दोघांनी स्वामींना नमस्कार केला उद्या पुन्हा कामावर जाणार जाणं गरजेचं होतं खूप. ह्या सगळ्या घटनांना जवळ जवळ वर्ष होऊन गेलं होतं.
योगायोगाने वारजेला जाण्याची वेळ माझ्यावर आली. माझ्या मित्राने नुकताच तिथे एक नवीन फ्लॅट घेतलेला होता.
त्यावेळेस मला रक्तकेतू बिल्डिंग,राघवन यांची एकदम आठवण आली. मित्राचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो बिल्डिंग तिच्या विचित्र नावामुळे प्रसिद्ध असल्याने ती सापडायला फारसा वेळ लागलाच नाही. पण वेगळच दृश्य मला बघायला मिळालं, गेट वरती आता वॉचमन नव्हता. गेट च्या दरवाज्याला कुलूप होतं. गेटवर No tracepassing बोर्ड लावलेला होता. समोर चहाची टपरी होती तिथे चहा पिता पिता मी बिल्डिंग कडे बघितलं संपूर्ण बिल्डिंग रिकामी होती. रस्त्याने चालत जेव्हा मी चौकात आलो त्यावेळेस हात पाय सडलेला अंगावरती कुष्ट, डोळा फुटलेला, भाजल्याच्या खुणा असलेल्या असलेला तर मांडीवरती वाहती जखम घेऊन रणरणत्या उन्हात चौकात भिक मागणार्‍या त्या माणसाकडे बघून मला दया आली. . .काय या माणसाने पाप केले असेल देव जाणे फारच भयानक असा विचार माझ्या मनात येऊन गेला. . .!. शंभराची नोट त्याच्या ॲल्युमिनियमच्या आहेत टाकून मी पुढे चालत आलो. जवळच दक्षिणमुखी मारुती च मंदिर होत. तिथे मारुतीरायाचा दर्शन घेतलं आणि तेवढ्यात अबून चा फोन आला "ओळखलस का?".
मला काही संदर्भ लागला नाही नंतर एकदम ट्यूब पेटली ज्या भिकाराच्या ॲल्युमिनियमच्या थाळीत शंभर रुपयाची नोट टाकलेली होती तो राघवन होता.
अबू पुढे मला म्हणाले "क्षुद्र देवतांना प्रसन्न करून क्षणिक सुख आणि ऐश्वर्य भोगणारा, बिल्डिंगचा मालक,लाखो रुपये कमाई असलेला राघवन आज स्वत:च्या बिल्डिंग समोर सडलेला देह घेऊन भिक मागतो आहे , अविनाश जे काही त्यान केलं त्याच्या हजारो पट त्रास आता त्याला भोगणे वाचून पर्याय नाही निदान अजून पुढे वीस वर्ष किंवा जास्तच, कर्माचे नियमात कोणालाच सवलत नसते जशी कर्मे तशी फळे फरक फक्त ह्या कि पुढील जन्मी", फोन कट झाला मी दुरूनच राघवन कडे बघितल त्या चौकातून जाणार्‍या स्त्रिया नाकाला रुमाल लावून जावे व करत होत्या. बिल्डींग मधल्या उरलेल्या कुटुंबांचं पुढे काय झालं इत्यादी गोष्ठी विषयी उत्सुकता मी डोक्यातून काढून टाकली आणि घरी परतलो व्हाट्सअप मधील दीपा ची chat history मी डिलीट करायचा करायला विसरलो नाही.
गायत्री जपाच्या हवन युक्त विभूती ने, अफाट मंत्र सामर्थ्य मिळवून अघोरी चैन करणारया राघवन च्या सर्व सिद्धी एका निमिषात नष्ट झाल्या होत्या. दैव जणुयाच संधीची वाट बघत असाव. रमेश आणि दीपा याना उत्तम घर स्वामी कृपेने मिळालं होतच आणि त्यांच्या संसारच्या वेलीवर दोन सुंदर फुल उमलली होती. हे अर्थात मला दीपाच्या व्हाटसअप मेसेज वरून कळल.

(समाप्त)