❤️खरं प्रेम ❤️
प्रेम ते हृदयात जवळ असत ते .जे डोळ्यात दिसत ते नसतं
माप ओलंडताना तिने
एक छानसा उखाणा घेऊन,घरात प्रवेश केला.
घराच्या सगळ्यांनी नवीन सुने च स्वागत केल. आणि उखाण्याच्या सोबत तिचं ही कौतुक केल. नात्यांच्या गोतावळ्यात तिचा नवीन दिवस कसा गेला कळलाच नाही.
दुसरा दिवस उजाडला आणि आज घरात सत्यनारायणाची पूजा होती. दोघी ही जोडीने पूजेला बसले.
,सत्यनारायण पूजा ही आटोपली. जोडीने घरातील मोठ्यांच्या आशीर्वाद घेउन संसाराला सुरुवात केली.
, घरातल्या. सवाष्ण बायकांनी तिची ओटी भरली. संध्याकाळी सगळे हळदी कुंकाला पण आले होते. तिचा चेहरा खूप प्रसन्न होता. आज नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती.लग्न हा सगळ्यांच्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा.
रात्री उशीरा पर्यंत सगळ्यांचं गप्पा सुरु होत्या.नंतर..
ती आपल्या खोलीत गेली. नवीन संसाराचे स्वप्न सोबत घेऊन ,खूप खुश आनंदी होती तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं ..
रात्र ओसरली आणि नव्या आयुष्याची सकाळ झाली.
ती आवरून रूम च्या बाहेर आली देवाला🙏 नमस्कार केला. आणि ओट्या जवळ गेली .
आजचा तिचा नवीन स्वयंपाक घराचा पहिला दिवस.रीती प्रमाणे तिने गोड शिरा बनवला आणि
जमेल ती जवाबदारी घेतली . सगळ्याचा मनात जागा मिळावी म्हणून प्रयत्न करत होती.देवाला..
.नेवेद्य ही दाखवला .
पहिल्या रात्री काय झालं हे मात्र कधीच कोणालाच नाहीं कळू दिल.
चेहरा मात्र कायम आनंदी राहू दिला?? चेहरा नेहमी हसत.
एक सून म्हणून ती सगळे कर्तव्य पार पाडत होति कुठे काही ही कमी पडू दिल नाही.
जगा समोर ते दोघेही नवराबायको म्हणूनचं राहत होते.
घरात लग्न ,कार्य कुठल्या समारंभला सोबत जात होते.
ती नवरा बायको चं. मात्र हे नातं प्रामाणिक पणे निभवत होती.
जो जे सांगले ते उपाय करत होती. उपास पूजा पोथी . जे जमेल ते, मना पासून तिने त्याला नवरा मानलं. तिचं प्रेम खरं...होत
की उद्या नक्कीच चांगलं होईल ह्या विश्वासा ने.ह्याचं आशेवर जगत होती.
काळ पुढे चालला होता... लग्नाची काही वर्षे उलटून गेली .
दोघे सोबत असूनही त्यांचा नात्यांत दुरावा होताच.एकत्र असूनही ते एकत्र नव्हते. तिला काय हवं होत ते त्याला नको हवं होतं.अश्या परिस्थिती ही स्वतःला आनंदी ठेवत होती. संयम धरून होती.
पण घरच्याना वस्तुस्थिती कळत होती.. त्याचं वागण घरच्यांना खटकत होत..
मग ..घरच्यांनी..मग हळू हळू दखल देणं सुरू केलं.समजवून सांगतील लग्नाच्या बेड्या अश्याच नाही तोडता येत .
तिला ही शक्य नव्हतं मागे परत जाण कोणाचाच आधार नव्हता.
सासरचे सगळे च खूप चांगले होते.सगळे समजून घेणारे होते. तिला कधीच अंतर नाहीं दिल.
पुढचं उभं आयुष्य आपलं कस होणार?? तिने संयम ठेऊन सात वर्षे तिने अश्या व्यक्ती बरोबर काढले ज्याने लग्नाच्या पहिल्या रात्री सांगतील मी घराच्याच्या दबाव मुळे लग्न केलं .खरंतर तू मला मुळीच आवडली नव्हती.
इतके वर्ष..
त्यानें तिला बायको म्हणून कधीच स्पर्श ही नाहीं केला तो नेहमी अंतर ठेऊन राहायचा.मना विरुद्ध लग्न केल म्हणून तो एक प्रकारे बदला घेत होता. पण ती मात्र
त्या तिरस्काराचा बदला प्रेमाने करत होती.
तिचं खरं प्रेमचं तिची .जगण्याची शक्ती होती.
आणि ती त्यांच्या सोबत संसार करत होती
तिचं प्रेम एकतर्फी होत त्यांत त्याचं जवळ असणं महत्वाचं होत. प्रेम करण्यासाठी देहरुपाचीच निकड असते असं काही नाही,
आपलं प्रेम पराकोटीचं दृढ असेल तर दुःखाचा ही विसर पडतो आणि आयुष्यच प्रेम होऊन जातं, मग कुठलंच संकट उरत नाही...हें सत्य आहॆ.किती ही परीक्षा दया कधीच कठीण वाटत नाहीं त्या परीक्षा. किती संकट आली तरी जगणं सुंदर करत..
. तिचं नातं एवढं प्रामाणिकपणे होत. आपल्या प्रेमावर तिचा विश्वास होता.
.परत एक नवीन वर्ष आलं पुन्हा एक लग्नाचा वाढदिवस आला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या.
एक परत नवा दिवस.
दोघेही..
रात्री बाहेर जेवायला गेले. नंतर रात्री .घरी आले सगळं सामान्य होत ..तेवढ्यात एक..समोर.एका टेबला वर लहानसं गिफ्ट दिसलं तिला.ते बघून तिला खूप कुतूहल वाटल.. तिने उघडून पहिलं. .
त्यात एका कार्ड होत. त्यावर एक मजकूर लिहला
होता..
मागचे सात वर्षे मी तुला कधीच परत नाही करू शकत.
तू माझ्या साठीचं खूप काही केल. माझा विरोध पत्करला. माझा खूप त्रास तू सहन केला.
.घराच्याची काळजी घेतली.
एक बायको म्हणून सगळे कर्तव्य केल.
पण मला तुझं प्रेम नाहीं कळलं.तूझ्या प्रेमाचा मीं आदर करतो.
पण या पुढे आपण दोघेही एकमेकांना साठी जगू..हळूच त्याने..
वेलांटाईन डे. च निमित्त साधून त्यानें तिला प्रपोज केल.
तिच्या हातात एक सुंदर ताज टवटवीत गुलाबाचं फुलं देऊन त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली.
तिची इतक्या वर्ष्याची तपस्या सार्थकी लागली.
इतके वर्ष ती ह्याचं वेळची वाट पाहत होती.संयमाने आणि धैर्या नें त्यांचं मन तिने जिकलं.आणि त्याला ही कळलं..
प्रेम हे एक अद्भुत अनुभव आहे, जे जीवनात अत्यंत महत्त्वाचं असतं. प्रेम हे केवळ एक भावना नाहीं तर त्यामध्ये विश्वास, समर्थन, आणि सामर्थ्य ही असतं. प्रेमात संपूर्ण आत्मा आणि मनाची तत्त्वं दिसते, ज्यामुळे ते अत्यंत संपूर्ण आणि विशेष असतं. प्रेम हें वेगळ्या स्वरूपात दिसतं, त्यामध्ये एकांत, सामर्थ्य, आणि संवाद ही समावेश असतं. प्रेमात निरंतरता आणि समर्थता असतं, ज्यामुळे ते आदर्श ही मानलं जातं.
आणि खऱ्या अर्थाने आज दोघांनी संसार सुरु केला.... तिचं प्रेम तिला मिळालं.आजची रात्र तिला कधीच संपू नये..असं वाटत होत.. आज तिच्या प्रेमाचा नवीनं जन्म झालाआणि ती नव्याने पुन्हा प्रेमात पडली... कारण
आज तिच्या जवळ तिचं प्रेम आहॆ .
.प्रेम हे खूप खास आणि अद्भुत आहे.जे एकमेकांना जोडतं, समर्थ करतं आणि संरक्षित ठेवत.रोज जगण्याची ऊर्जा देत..
❤️
प्रेम हे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी असतं.
अत्यंत संवेदनशील आणि सांस्कृतिक अनुभव ज्यात दोघांमध्ये एकमेकांची स्नेहबंधने आणि सामर्थ्याचे दर्शन होते.
त्या प्रेमानेचं परंपरा, धर्म, आणि संस्कृतीचे मान आणि मूल्य जपली जातात.
🆃︎🅳︎trupti dev
भिलाई छत्तीसगड