पुराणातील गोष्टी - 1 गिरीश द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुराणातील गोष्टी - 1

पुराणातील गोष्टी
भुगोल
सूर्य, चंद्र , राजवंशाची माहिती ऐकल्यावर ऋषींनी रोमहर्षणा ना विनंती केली की आम्हांला जगाच्या भूगोला बद्दल सांगा. रोमहर्षण म्हणाले पृथ्वी ७ द्विपांमधे विभागली आहे.
त्यांची नावे जंबुद्विप, प्लक्शद्विप, शाल्मली द्विप, कुशद्विप, क्रौंच द्विप, शाक द्विप आणि पुष्कर द्विप. ही द्विपे सात समुद्रांनी वेढली आहेत. ते समुद्र म्हणजे लवण, इक्शु, सुर, सर्पी, दधी, दुग्ध, जल.
जंबुद्विप हे मध्य भागी आहे. व त्याच्या बरोबर मधे सुमेरू पर्वत आहे.
सुमेरूच्या दक्षिणेला हिमवन, हेमकुट, निषाद पर्वत आहेत. उत्तरेला नील, श्वैत, श्रींगी पर्वत आहे. जंबुद्विप काही प्रदेशात विभागले आहे. त्याना वर्ष असे म्हणतात. इलावृत वर्ष,भरत वर्ष, भद्र वर्ष, केतुमल वर्ष, हरी वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्मय, व कुरू वर्ष. सुमेरूच्या टोकाला ब्रह्माचे स्थान आहे. तिथुन गंगा येउन चार प्रवाहामध्ये विभागली जाते.
सीता पुर्वेला, चक्षु पश्र्चिमेला, भद्र उत्तरेकडे व अलकनंदा दक्षिणेला.
भरतवर्षामधे सात पर्वत रांगा आहेत. त्या म्हणजे -महेंद्र, मल्य, सह्य, शुक्तिमान, रिक्ष, विंध्य आणि परीयात्रा.
ब्रह्म पुराण - कोणार्क
भरत वर्षाच्या दक्षिणेला एक समुद्र आहे. त्याच्या किनाऱ्यावर उत्कल किंवा औंद्र प्रदेश आहे. (ओरीसा). तेथे राहणारे लोक धार्मिक होते. तिथे सूर्याची एक मुर्ती आहे तीला कोणादित्य असे नाव आहे.
कोणादित्य म्हणजेच कोणार्क. आदित्य म्हणजे सूर्य .अर्क म्हणजे पण सूर्यच. ही मुर्ती अतिशय सुरेख आहे. देवळाच्या भोवती वाळू आहे पण तरीही तिथे खूप 🌲 झाडे आहेत.
सुर्यौदयाच्या वेळी सूर्याची पुजा करणे सर्वात चांगले असते. पुर्वेकडे तोंड करून लाल चंदनाने जमीनीवर कमळाचे आठ पाकळ्याचे चित्र काढावे. त्यावर तांब्याचे भांडे मधोमध ठेवून धान्य, तीळाचे पाणी, चंदन, लाल फुले, पवित्र गवत त्यात घालावे व सूर्याला आवाहन करावे.
बारा आदित्य हे सूर्याचे अवतार आहेत. त्यांची नांवे- इंद्र,धता, पर्जन्य, त्वष्टा, पुष, आर्यम, भाग, विवास्वन, विष्णू, अंशुमान, वरुण व मित्र.
इंद्र देवांच्या शत्रु चा नाश करतो. धता प्राण्यांना जन्म देतो, पर्जन्य पाउस पाडतो, त्वष्टा झाडाझुडुपांमध्ये असतो, पुषा धान्य पिकवण्यासाठी मदत करतो, आर्यम वाऱ्यामधे असतो, भाग जिवंत प्राण्यांच्या शरीरात असतो, विवस्वान अग्निमध्ये असतो व अन्न शिजवण्यासाठी मदत करतो, विष्णू शत्रु नाशात मदत करतो, अंशुमान वायु मधे, वरुण पाण्यामध्ये, तर मित्र चंद्र आणि व समूद्रामधे.
पुरूषोत्तम क्षेत्र
सत्ययुगामधे इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. तो सामर्थ्यवान, विद्वान होता. त्याने क्षेत्रात जाउन विष्णुची पूजा करणेचे ठरवले. यात्रा करण्यासाठी तीर्थ क्षेत्र चांगले असते. इंद्रद्युम्नाने सर्व तीर्थ क्षेत्रांचा विचार केला पण त्याला एकही विष्णू पूजेसाठी योग्य वाटले नाही. त्याला नवीन देऊळ बांधायचं होते, म्हणून तो प्रवासास निघाला.
त्याच्या बरोबर सैनिक व प्रजाजन होते. खुप दिवसांनी ते लवण समुद्राजवळ पोहोचले. या समुद्राच्या लाटा प्रचंड होत्या. अनेक समुद्री प्राणि व हिरे त्या समुद्रात होते. राजाला तिथे अनेक फुल झाडे व फळझाडे असलेला प्रदेश दिसला.
हा प्रदेश " पुरूषोत्तम क्षेत्र " म्हणून ओळखला जात असे. तेथे खूप पूर्वी एक विष्णू ची मूर्ति होती. त्या मूर्तीची लोक पुजा करीत असत व त्यांच्या पापाचे क्षालन होई , त्यामुळे यमराज पाप्यांना शिक्षा करू शकत नसत.
म्हणून यमराजांनी विष्णू ना प्रार्थना केली की यावर उपाय काढा. तेव्हा ती मूर्ति वाळूत खोल ठेवण्यात आली व तीचे दर्शन कोणाला घेतां येइना. इंद्रद्युम्नाला पुरूषोत्तम क्षेत्र आवडले. त्याने तिथे देऊळ बांधायचे ठरवले व एका शुभ दिवशी भूमीपुजन केले.
इंद्रद्युम्नाने उत्कल, कोशल देशाच्या राजांशी संपर्क साधून देवळासाठी दगड आणण्यासाठी मदत करण्यास सांगितले. त्यां राजांनी आपले कारागीर विंध्य पर्वतावर पाठवले व तेथील दगड रथ, नांवां मधून पुरूषोत्तम श्रेत्रात पाठवले. इतर अनेक राजांना निरोप पाठवले. ते पण संपत्ती व सैन्यासह आले. त्यांना इंद्रद्युम्नाने सांगितले की मी दोन योजना आखल्या आहेत.
एक म्हणजे अश्व़मेध यज्ञ व देऊळ बांधायचे आहे. तुम्ही मदत केली तर दोन्ही कामे पार पडतील. सर्वांनी मदतीचे आश्वासन देऊन हिरे, जडजवाहीर, सोने, कपडे, धान्यें, इ. दिले. यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू सोन्याच्या होत्या. असा यज्ञ कधी झाला नव्हता. यज्ञानंतर देऊळ बांधण्यात आले. आता मूर्ति कशी करावी हा प्रश्न होता. इंद्रद्युम्नाने विष्णूची प्रार्थना केली. विष्णूनी सांगितले की सूर्योदयाच्या वेळी किनाऱ्यावर जा. तेथे एक झाड जे अर्धे समुद्रात व अर्धे वाळूत असलेले दिसेल ते तोडा व मूर्ति बनवा. राजा किनाऱ्यावर गेला व त्याने ते झाड बाहेर काढले व ते तो तोडणार एवढ्यात दोन ब्राह्मण समोर आले, व म्हणाले हे तू काय केलेस या किनाऱ्यावर हे एकचं झाड होते. ( ते विष्णू व विश्वकर्मा होते.). इंद्रद्युम्नाने सांगितले की मी विष्णूं ची मुर्ति करणार आहे, तसे मला विष्णूंनीच सांगितले आहे.
ब्राह्मण म्हणाला चांगली कल्पना आहे. विष्णूचे पूजन करणे चांगलेच आहे. माझ्या मित्राला भेट हा पण विश्वकर्मा इतकाच हुशार आहे. तो तुला मूर्ति बनवून देईल. आणि त्यांनी तीन मुर्ती बनवायला घेतल्या. पहिली बलरामाची होती, तीचे डोळे लाल व रंग शुभ्र होता. निळे वस्त्र व डोक्यावर नाग होता. त्याच्या हातात मुदगल व दंड होता. दुसरी कृष्णाची , तीचा रंग निळा व डोळे कमळासारखे होते व वस्त्र पिवळे व हातात चक्र होते. तिसरी मुर्ती सुभद्राची , ती सोनेरी रंगाची व भरजरी वस्त्रे घातलेली होती. अशा काही क्षणात मूर्ति बनवल्या गेल्याने राजा चकीत झाला. राजाने ओळखले की हे सामान्य ब्राह्मण नाहीत , तो त्यांच्या पाया पडला व प्रार्थना केली की आपण कोण आहात ते सांगावे. मग विष्णू व विश्व़कर्म्याने दर्शन दिले व विष्णू नी आशिर्वाद दिला की तू दहा हजार वर्षे राज्य करशील व तुला मृत्यू नंतर स्वर्गात जागा मिळेल. नंतर त्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.