नागपूरचे ते पवित्र आत्म्ये - भाग 2 Ankush Shingade द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नागपूरचे ते पवित्र आत्म्ये - भाग 2

ते पवित्र आत्म्ये भाग दोन

गणेश विचारत होता त्यांना नागपूरच्या कहाण्या. त्यातच विचारत होता त्या राजांचे शौर्य. त्यात त्या सर्व पवित्र आत्म्यांनी सांगीतलं होतं की मानवासारखं ते जात वा धर्म पाळत नाहीत. मालमत्तेवरुन भांडणं करीत नाहीत. तसेच कोणत्याच स्वरुपाचा भेदभाव करीत नाहीत. तरीही काही प्रश्न अजुनही होतेच गणेशजवळ. त्या प्रश्नांची उत्तरं अजुनही सापडली नव्हती त्याला. तो प्रश्न विचारताच होता. तसा त्यानं तद्नंतर प्रश्न विचारलेही. परंतु ते प्रश्न इतरांना विचारले होते. बख्त बुलंद शहाला विचारले नव्हते. तोच बख्त बुलंदशहा त्याच्या पुढ्यात आला. म्हणाला,
"अरे, आम्हालाही विचार आमचा इतिहास. आम्हीही नागपूरच्याच इतिहासातील माणसं. नागपूर वसविण्यात आमचाही मोलाचा वाटा आहे."
गणेशला बख्त बुलंद शहा काय म्हणतो ते कळेना. तसा तो म्हणाला,
"सांगा तुम्हीही आपला इतिहास सांगा."
गणेशनं तसं म्हणताच बख्त बुलंद शहा आपला इतिहास सांगू लागला व तेवढ्याच तत्परतेनं गणेश ती माहिती ऐकून घेवू लागला होता.
"भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भाची ओळख आहे. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. पवनी आणि आदम या दोन ठिकाणी झालेल्या उत्खननात भुईकोट किल्ल्याच्या बांधणीचे पुरावे मिळालेले आहेत. पुढे मध्ययुगीन कालखंडात म्हणजे इ. स. १२ ते १३ व्या शतकात राजकीय घडामोडींमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर किल्ले बांधणीला सुरुवात झाली. विदर्भात जवळजवळ असे एकूण ३० किल्ले आहेत. हे किल्ले दोन प्रकारांत बांधण्यात आले आहेत. यातील काही किल्ले हे उंच टेकडीवर आहेत, ज्याला आपण गिरिदुर्ग म्हणतो तर काही किल्ले हे जमिनीवर म्हणजेच भुईकोट प्रकारात बांधलेली आहेत. जसा अमरावती जिल्ह्यातील गाविलगडचा किल्ला.
मध्ययुगीन व उत्तर मध्ययुगीन काळात विदर्भावर वेगवेगळ्या राजवंशांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या व किल्ले बांधले. अंदाजे १२ ते १३ व्या शतकात पूर्व विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी विदर्भात वैरागड, गडबोली, राजोली, माणीकगड, सुरजागड इत्यादी ठिकाणी किल्ल्यांची बांधणी केली. किल्ल्यांच्या स्थापत्य कलेतून त्यांच्या बांधणीचा कालखंड निदर्शनास येतो. या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर नागांचे शिल्पांकन कोरलेले आहेत. त्यामुळे हे किल्ले नागवंशी राजांनी बांधले असावेत, असा समज आहे. माणीकगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. हा किल्ला आकाराने मोठा असून त्याची तटबंदी ही फार लांबवर पसरलेली आहे. किल्ल्यातील स्तंभ, कमानी, मेहरपी अगदी सुबक अशा कलाकुसरीने बनविलेल्या आहेत. वैरागड, सुरजागड, इत्यादी किल्यांची केवळ तटबंदी शिल्लक असलेली आढळून येते.
गोंड राजवटीचा उदय हा इ. स. तेराव्या शतकाच्या मध्यार्धात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. वैरागड, माणीकगड व सुरजागड हे किल्ले गोंडानी आपल्या ताब्यात घेवून त्याचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख आहेत. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ चारशे वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांनी बांधलेले किल्ले या भागात जास्त प्रमाणात आढळतात. बल्लारशहा, चंद्रपूर आणि नागपूर ही शहरे त्यांची राजधानीची ठिकाणे होती. बल्लारशहा हा किल्ला वर्धा नदीच्या उत्तर तीरावर स्थित आहे. हा किल्ला चंद्रपूर येथील किल्ल्याच्या तुलनेत आकाराने लहान असून किल्ल्याची तटबंदी व बुरुजे मजबूत स्थितीत आहेत. आतील भागात काही बांधकामे निदर्शनास येतात, परंतु ती मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहेत. चंद्रपूर हा किल्ला आकाराने मोठा असून या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात आधुनीक वसाहत निर्माण झाली आहे. किल्ल्याची तटबंदी व बुरुज काही भागांत सुस्थितीत आहेत. गोंड राजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कोरीव काम असलेले अतिशय सुबक प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावरील हत्तीवर आरूढ सिंहाचे शिल्पांकन हे गोंड राजवटीचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. नगरधन, देवलापार, देऊळगाव, भद्रावती, रामटेक, नागपूरचा गोंडराजाचा किल्ला, आमनेर किल्ला, महदागड किल्ला, पवनीचा किल्ला, वैरागड किल्ला, माहुरगड, अंबागद, भिवगड, गडबोली किल्ला इत्यादी गोंडकालीन किल्ल्यांचे अवशेष आज विदर्भात पाहायला मिळतात. या किल्ल्यांची आज मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असून सध्या केवळ तटबंदी व प्रवेशद्वारे सुस्थितीत आहेत.
इसवी सनाच्या तेराव्या शतकात खिलजीच्या आक्रमणानंतर महाराष्ट्रात मुस्लीम राजवटीचा उदय झाला व पश्चिम विदर्भावर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. खिलजी, तुघलक आणि बहमनी राजसत्तांनी काही किल्ल्याची बांधणी केली. त्यामध्ये गाविलगड, नरनाळा, बाळापूर इत्यादी किल्ल्याचा समावेश होतो. काही लोकं म्हणतात की गाविलगड हा किल्ला गवळी लोकांनी बांधला तर काही लोकं म्हणतात की तो किल्ला मुजाहिद वंशाच्या अहमदशहा वली पहिला यांनी बांधला.
गाविलगड हा किल्ला उत्तरेतून दख्खनमध्ये येणारा जो मार्ग होता, त्या मार्गावर बांधण्यात आलेला होता. त्यामुळे या किल्ल्याला दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात असे. उत्तरेतून येणाऱ्या मुस्लीम सरदारांना दख्खनमध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात संघर्षाला सामोरे जावे लागत असे. हा किल्ला नंतरच्या काळात बहमनी, निजामशाही, इमादशाही यांच्या अधिपत्याखाली होता. शेवटी अठराव्या शतकात भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या किल्ल्याच्या तटबंदीत वेगवेगळ्या राजवटीत वाढ झाली व आतील भागांत अनेक बांधकामे केलेली आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने मशीद हे उत्तम उदाहरण आहे. याच भागात नरनाळा नावाचा किल्ला आहे. हा किल्ला दहाव्या शतकात आमच्याच गोंड राजांनी बांधला.
पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात अहमदशहा वली याच्या काळात या किल्ल्याचे नुतनीकरण झाले. नंतरच्या काळात मोगलांनी हा किल्ला जिंकून घेतला. नागपूरकर भोसल्यांनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात विदर्भावर आपले वर्चस्व प्रस्थापीत करुन अनेक किल्ल्यांचे नुतनीकरण केले. त्यामध्ये नगरधन, पवनी, रामटेक, गाविलगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात मुस्लीम राजवटींना सत्ता स्थापन करताना अनेक लढायांना सामोरे जावे लागले. त्यामुळे मुस्लीम व मराठा काळातील किल्ले अतिशय मजबूत, तसेच शत्रूच्या आक्रमणापासून सावध राहण्याकरिता केलेल्या सर्व उपाययोजनांनी युक्त आहेत.
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात भुईकोट प्रकारातील किल्ले निदर्शनास येतात. हा भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. या भागावर येथील स्थानिक गोंड राजांनी राज्य केले. गोंड राजांनी सुरुवातीपासून वेगवेगळ्या काळात मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे फार कमी प्रमाणात युद्धाला सामोरे जावे लागत असे.
चंद्रपूर जिल्हा जो की पुर्वी चांदा नावाने ओळखला जात होता गोंड राजांच्या काळात आणि त्यापुर्वी त्याचं नाव होतं लोकपुर. त्याला पुर्वी इंद्रपूर सुद्धा म्हणत. ते नंतर बदलून कालांतराने चंद्रपूर झाले.
ब्रिटीश कालावधीत चांदा जिल्हा म्हणून संबोधले जात होते या चंद्रपुराला. जे सन १९६४ ला बदलवून त्याचे नाव चंद्रपूर करण्यात आले. या प्रदेशात इतर स्थळं म्हणजेच वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्कंडा यांचा समावेश होता. हिंदू आणि बुद्धिस्ट राजांनी या क्षेत्रावर बराच काळ राज्य केले. त्या नंतर गोंडराजांनी १७५१ नंतर मराठी काळाचे सुरुवातीस राज्य केले. अखेरचा राजवंशी राजा रघुजी भोसले याचा मृत्यू १८५३ मध्ये झाला. त्यानंतर नागपूर आणि चंद्रपूर एकत्र ब्रिटीश साम्राज्य म्हणून घोषीत केले गेले.
सन १८५४ मध्ये चंद्रपूर स्वतंत्र्य जिल्हा म्हणून अस्तित्वात आला आणि १८७४ मध्ये त्यात तीन तहसिली आल्या. ज्यात मुल, वरोरा आणि ब्रम्हपुरी यांचा समावेश झाला. सन १८७४ मध्ये गोडवाई जिल्हा कमी करुन चार तहसिली चंद्रपूर मध्ये जोडण्यात आल्या. मुख्यालय म्हणून सिरोंचा ही एकच तहसील ठेवण्यात आली. १९८५ मध्ये एक तहसील मुख्यालयाचे मुल वरुन चंद्रपूरला हस्तांतरण करण्यात आले. १९०५ मध्ये नवीन तहसील मुख्यालयासह गडचिरोली येथे ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर तहसील पासून जमीनदारी मालमत्त्यासह हस्तांतरीत करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनदारीचा लहान हिस्सा नव्याने अस्तित्वात आलेल्या जिल्ह्यास १९०७ मध्ये हस्तांतरीत करण्यात आला. त्याच वर्षी क्षेत्र १५६० चौ की. मी. तिन्ही विभागाचे नावे चरेला, अल्बक आणि नुगीर मद्रास राज्यात हस्तांतरीत करण्यात आले होते. कोणतेही जास्त बदल न करता सन १९११ ते १९५५ दरम्यान जिल्हा किंवा त्याच्या तहसिली सीमेमध्ये आल्या. १९५६ मध्ये राज्य संयोजना योजनेचा परिणाम म्हणून जिल्हा मध्यप्रदेश राज्यातून बॉम्बे राज्यास हस्तांतरीत करण्यात आला. त्याच कालावधीत हैद्राबाद राज्याचा आदिलाबाद जिल्ह्याचा भाग राजूरा तहसीलचा भाग नांदेड जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात १९५९ मध्ये हस्तांतरीत करण्यात आला. मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासून चंद्रपूर हा जिल्हा महाराष्ट्राचा भाग झाला. प्रशासकीय सोईसाठी आणि औद्योगिक व शेती विकासाकरिता १९८१ जणगणनेनंतर जिल्ह्याची विभागणी चंद्रपूर आणि गडचिरोली अशी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात आता असलेल्या तहसिली चंद्रपूर, मुल, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, गोंडपिपरी, पोम्भूर्णा, राजुरा, कोरपना, बल्लारशा आणि जिवती यांचा समावेश आहे."
गणेशला बख्त बुलंद शहा चंद्रपूरची माहिती का देतो? हा प्रश्न पडला होता. त्याला बख्त बुलंद शहाचा मुख्य उद्देश समजू येत नव्हता. तसं त्यानं पुन्हा गडचिरोलीचीही माहिती दिली. तो म्हणाला,
"गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगलांचा जिल्हा आणि औद्योगीकद्रृष्ट्या मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्राचीन काली ह्या प्रदेशावर राष्ट्रकूट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य ह्या प्रदेशावर होते. यानंतर गोंड राजांनी या गडचिरोली प्रदेशावर राज्य केले. माझाच वंशज असलेल्या खांडक्या बल्लालशाह यांनी तेराव्या शतकात चंद्रपूरची स्थापना करुन आपली राजधानी बनविली. याच काळात चंद्रपूरचा प्रदेश मराठयांच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये हा प्रदेश ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. १८५४ मध्ये ब्रिटिशांनी चंद्रपूरला बेरार प्रांतातील स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषीत केले. ब्रिटिशांनी १९०५ मध्ये चंद्रपूर व ब्रम्हपुरी मधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करुन गडचिरोली तालुक्याची निमिर्ती केली. त्यावेळी गडचिरोली व सिरोंचा ह्या दोन तहसिली चंद्रपूर जिल्ह्याचा भाग होत्या.
२६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करुन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा स्थापनेच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे होते. जिल्हानिर्मिती होवून प्रथमतः गडचिरोली, सिरोंचा, आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी, धानोरा, अहेरी आणि एटापल्ली हे आठ तालुके निर्माण करण्यात आले. १५ ऑगस्ट १९९२ रोजी जिल्ह्यात देसाईगंज, भामरागड, कोरची व मुलचेरा ह्या चार तहसीली नव्याने निर्माण करण्यात आल्या.
दक्षीण गोंडवाना ची राजधानी चंद्रपृर ही होती. जिल्ह्यातील लोककथा जैमिनी अश्वमेधाशी मिळत्याजुळत्या होत्या. कृत युगातील प्रसिद्ध "लोकपूर" शहर चंद्रपूर होय.
त्रेतायुगात चंद्रवंशी पुरुषांची लोकपूर येथे सत्ता होती. त्यांनी लोकपूरचे नाव इंदुपूर असे ठेवले. याच काळात वैनगंगेच्या पूर्वेस वैरावन नावाच्या चंद्रवंशीय राजाचे राज्य होते. त्याने वैरागड नावाचे शहर स्थापन केले. हेमाडपंथानी कलियुगात मार्कंडा येथील देवळाची स्थापना केली. वैरागड मध्ये माना वंशीयांचे राज्य होते व त्या वंशातील लोकांवर मात करुन गोंडवंशीयांनी त्याठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
कौल भिल नावाच्या गोंडवंशीयाने इत्रस्थ पसरलेल्या गोंड जमातींना एकत्र आणले. खनिज मातीतून लोखंड काढण्याची कला कौल भिल याने गोंड लोकांस शिकविली.
भीम बल्लाळसिंग हा प्रथम गोंड राजा होता. त्यानं शिरपूरला आपली राजधानी बनवली होती आणि खांडक्या बल्लालशाह दहावा गोंड राजा होता. ज्यानं चंद्रपूर ही नवी राजधानी बनविली होती. त्यानंतर आम्हाला भोसले घराण्यांनी पराभूत केलं व चंद्रपूर, नागपूर त्यांच्याकडे गेलं. सन इ .स. १७५१ च्या सुमारास भोसले यांच्याकडे संपूर्ण चंद्रपूरची सत्ता होती.
१७१८ च्या सुमारास साताऱ्याच्या अधिपतींनी गोंडवानावर स्वारी करण्यासाठी आपला सरदार कान्होजी आंग्रे यास पाठवले. परंतु त्यांना यश आले नाही. रघुजी भोसल्यांनी १७५१ मध्ये संपूर्ण गोंडवाना चा कारभार आपल्या हाती घेतला. निळकंठशाह हा अंतिम गोंड राजा होय. गोंड साम्राज्यपतनानंतर गोंडवन हा प्रदेश भोसले यांचे अधिपत्याखाली आला होता. त्यानंतर १८१८ मध्ये हा प्रदेश इंग्रजांच्या राजवटीखाली गेला होता."
बख्त बुलंद शहानं गणेशला माहिती पुरवली होती. परंतु त्यानं आपल्याविषयी व खांडक्या बल्लाळशहा वा चांद सुलतान याबाबत सांगीतलं नव्हतं. तसा गणेश त्यांना म्हणाला,
"खांडक्या बल्लाळ हे नाव मी बरेच वेळा ऐकलंय. तो कोण होता व त्याचं नाव खांडक्या बल्लाळ का पडलं होतं?"
गणेशनं विचारलेला प्रश्न. त्यावर बख्त बुलंद शहाला थांबवत खांडक्या बल्लाळ म्हणाला,
"मध्ययुगीन काळात गोंडवाना हा भारतातील एक मोठा प्रदेश होता. पूर्वीच्या मध्य प्रांताच्या म्हणजे आजच्या विदर्भ, छत्तीसगड व मध्यप्रदेशातील भूप्रदेशास गोंडवाना असे म्हणतात. गोंडवाना राज्यावर राजगोंडांचे राज्य होते. 'गोंडवाना' हे नाव 'गोंडी' लोकांच्या नावावरुनच पडले होते. गोंडवाना प्रदेशात विदर्भाच्या पूर्वेकडील भाग, त्याच्या उत्तरेकडील मध्यप्रदेशातील काही भाग आणि छत्तीसगडच्या पश्चिमेकडील काही भागांचा समावेश होतो. उत्तर तेलंगणा, पश्चीम ओरिसा आणि दक्षीण उत्तर प्रदेशातील काही भागही या प्रदेशात समाविष्ट होता. सातपुडा पर्वताच्या तसेच विंध्याचलच्या हजारो मैल पसरलेल्या घनदाट वन्य प्रदेशात हजारो वर्षांपासून आदिवासी लोक वास्तव्य करीत. या प्रदेशाच्या सीमा म्हणजे पूर्वेस रत्नापूरचे राज्य, पश्चिमेस माळवा, उत्तरेला पन्ना राज्य आणि दक्षिणेस दख्खन अशा होत्या. या प्रदेशात मोठ्या प्रमाणात गोंड समाज वास्तव्यास असल्यामुळे संपूर्ण अरण्यमय भूप्रदेशास गोंडवाना म्हणून अनादिकालापासून ओळखले जात असे व यात पन्नासच्या वर गोंडांच्या उपजातीचे वास्तव्य होते. चौदाव्या आणि अठराव्या शतकांच्या दरम्यान अनेक आदिवासी स्वायत्त प्रदेशांव्यतिरिक्त भारतात चार मुख्य गोंड साम्राज्य अस्तित्वात होते. गोंड शासकांनी सोयीकरिता चार राजधान्यांची स्थापना करुन 'गोंडी' राज्य निर्माण केले आणि या सर्वांचे मिळून 'गोंडवाना' राज्य अस्तित्वात आले.
उत्तरेला असलेले गढामंडलाचे गोंड राज्य, ज्याला जबलपूरचे राज्य म्हणतात. दक्षिणेत चांदागढचे गोंड राज्य ज्याला चंद्रपूरचे राज्य म्हणतात. पश्चिमेला खेरलागढचे गोंड राज्य, ज्याला बैतुलचे राज्य म्हणतात. तसेच पूर्वेस देवगढचे गोंड राज्य, ज्याला नागपूर, छिंदवाडाचे राज्य म्हणतात.
गढामंडलाचे राज्य इ.स. १३०० ते १७८९ या काळात अस्तित्वात होते. चांदागढचे गोंड राज्य सन इ.स. १२०० ते १७५१ या काळात अस्तित्वात होते. खेरलागढचे गोंडराज्य सन इ.स. १५०० ते १६०० या दरम्यान अस्तित्वात होते तर देवगडचे गोंड राज्य सन इ.स. १५९० ते १७९६ या दरम्यान अस्तित्वात होते.
जदूराय हा गोंडांचा पहिला राजा होय. तो आधी कलचुरी राजघराण्याच्या चाकरीत होता. जदूरायने त्यांची सत्ता यशस्वीपणे उलथून टाकली आणि त्याने मध्यभारतातील कलचुरींच्या राज्यात समावेश असलेल्या गढामंडला या भागावर नियंत्रण मिळवले. त्याच्या वंशातील नामवंत गोंड शासकांमध्ये राणी दुर्गावती व मुस्लीम झालेला पहिला गोंड राजा हिरदेशहा यांचा समावेश होतो. 'गढामंडला' हे गोंडवानाच्या चार गोंड राज्यांपैकी असलेले एक राज्य सध्याच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये वसलेले होते. मुघलांच्या अधिपत्याखाली येईपर्यंत गढामंडला हे 'वरिष्ठ गोंड राज्य' होते. १५५६ मध्ये मुघल बादशहा अकबराने भारतावर आक्रमण करुन दिल्लीची सत्ता काबीज केली. नंतर मुघलांची नजर गढामंडलावर पडली. गढामंडलाचे गोंड राजे दलीपतशहाच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र वीर नारायण लहान असल्यामुळे गढामंडला ओसाड झाला होता. त्यांना राणी दुर्गावतीचे नेतृत्व मान्य नव्हते. राणीला कमजोर समजून बाज बहादूर व आसफ खान यांना राणी दुर्गावतीवर आक्रमण करण्यासाठी पाठवले. राणी सुध्दा आपला वीरतेचा परिचय देत त्यांच्यावर तुटून पडली. शेवटच्या श्वासापर्यंत ती शत्रूचा मुकाबला करत होती. शेवटी या लढाईत राणीला वीरमरण आले. अशारितीने गढामंडला गोंड राज्य १५६४ मध्ये मुघलांच्या हातात गेले. राणी दुर्गावती गढामंडलाच्या गोंड राज्याची शेवटची शासक होती. पुढे बाळाजी बाजीरावने सन १७४२ साली या घराण्यातील बारावा पुरुष महाराजशहा याचा पराभव करुन गढामंडला ताब्यात घेतला. गढामंडला मुघलांच्या ताब्यात गेल्यामुळे देवगडावर मुघल बादशहाचा मुलगा शहाजहान याचा प्रभाव वाढू लागला. पुढे त्याचा मुलगा औरंगजेब याने देवगडात खंडणी वसूल करण्यासाठी धुमाकूळ घालणे सुरु केले. त्यावेळी देवगडवर राजा बख्त बुलंदशहा राज्य करत होता. त्याचे मूळ नाव 'महिपतीशहा' असे होते. परंतु औरंगजेबाने महिपतीशहा बरोबर युती केली आणि त्यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण झाले. महिपतीशहाचे प्रजेप्रती असलेले प्रेम आणि चांगले कर्तव्य पाहून औरंगजेबाने त्याला 'बख्त बुलंदशहा' असे नाव बहाल केले. पुढे आर्थीक कारणांवरून बेबनाव होवून दोघांमध्ये संघर्ष वाढला. तशाही परिस्थितीत बख्त बुलंदशहाने औरंगजेबाला न जुमानता आपला पराक्रम सुरुच ठेवला.
औरंगजेब आपली सर्व शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध लावू शकला नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे गोंड राजे मुघलांशी सतत युद्ध करत होते आणि ते तेवढेच शूरवीरही होते आणि दख्खन ते आग्रा पर्यंतच्या मार्गांमध्ये अडथळा आणत होते.
बख्त बुलंदशहाने १७०२ मध्ये 'नाग' नदीच्या तीरावर नागपूर शहर बनवून 'नागपूर' शहराची स्थापना केली. तो नागपूरचा संस्थापक मानला जातो. त्यापुर्वी नागपूर हे एक लहानसे गाव होते. त्यानंतर त्याचा मुलगा चांद सुलतान याने १७७६ मध्ये आपली राजधानी देवगडवरुन नागपूर येथे आणली. बख्त बुलंदशहाने खेरलागढचे गोंड राज्य देवगडच्या राज्यात सामील करुन घेतले व आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याच्या काळात देवगढ अन्नधान्याने सुखी व समृद्ध राज्य होते. बख्त बुलंदशहाला औरंगजेब शेवटपर्यंत वठणीवर आणू शकला नाही. तो एक हुशार आणि बुद्धिमान राजा होता. त्याने रक्ताची होळी न खेळता अतिशय काळजीपूर्वक व हुशारीने औरंगजेबाशी मुकाबला केला. १७०९ मध्ये बुलंदशहाच्या मृत्यूनंतर देवगडला उतरती कळा लागली. याचा नेमका फायदा मराठयांनी घेतला. त्यानंतर रघुजी भोसल्यांनी देवगडाभोवती आपला फास आवळला. गोंड राजे बुऱ्हानशहा यास १७४९ मध्ये कैद करुन देवगडचे राज्य खालसा केले. अशारितीने देवगड राज्य मराठयांच्या अधीन झाले. देवगड ताब्यात आल्यानंतर रघुजीची हिंमत वाढली आणि त्यांची नजर चांदा गडाकडे गेली. हे एक लहान गोंड राज्य होते. याची राजधानी सुरुवातीला सिरपूर व नंतर बल्लारशाहा ही होती. रघुजी भोसल्याने तेथील गोंड राजे निलकंठशहाच्या निष्काळजीपणाचा फायदा घेवून त्याच्यावर आक्रमण केले व चांदागडचे गोंड राज्य खालसा केले. नीलकंठशहाचे जनतेकडे व जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष नव्हते. याचा फायदा रघुजीने घेतला. अशाप्रकारे १७५१ मध्ये संपूर्ण गोंडवाना रघुजीच्या ताब्यात गेला. पुढे इंग्रजांनी १८१७ मध्ये देवगडचे मराठा सरदार अप्पासाहेब भोसल्यावर आक्रमण करुन देवगड व १८१८ मध्ये चांदागड आपल्या ताब्यात घेतले. दोन्ही गड भोसल्यांच्या हातातून गेल्यामुळे आपसुकच संपूर्ण गोंडवाना प्रांत इंग्रजांच्या ताब्यात गेला. परंतु इंग्रजांनी १८५३ पर्यंत चांदागडचा कारभार रघुजी भोसल्याच्या नावानेच सुरु ठेवला. १८६१ मध्ये नागपूरला सेंट्रल प्रॉव्हिन्सेस आणि बेरारची राजधानी करण्यात आली व हा भूप्रदेश मध्यप्रांत म्हणून ओळखला जाऊ लागला.
१८५३ पासून चांदागडमध्ये इंग्रजांनी अनन्वीत अत्याचार सुरु केले. याची झळ आदिवासी जनता व जमीनदार यांना बसू लागली. मोल्लमपल्लीचे जमीनदार वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध सन १८१८ मध्ये सशस्त्र उठाव करून आपल्या विरतेचा परिचय करुन दिला. त्यांना देशद्रोही व लुटारू म्हणून जेलमधील पिंपळाच्या झाडाला फाशी देण्यात आली.
तेरा ते अठराव्या शतकापर्यंत म्हणजे सहाशेहून अधिक वर्षे गोंडांच्या सत्तेखाली असलेल्या पूर्व विदर्भात भोसल्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले असले व नंतर राज्य केले असले तरी भोसले गोंड राजांना सन्मानाने वागवीत असत. ब्रिटिशकालीन मध्य-प्रांताचा विचार करता एकोणवीसव्या शतकापर्यंत या प्रांतास 'गोंडवाना' हे नाव कायम होते. पुढे याच शतकात गोंडवानाचे विभाजन होवून गढामंडला संस्थान छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचनेच्या निर्मितीसाठी १९६० मध्ये खेरलागढ, देवगढ व चांदागड हे तीन संस्थान विदर्भ म्हणून महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आले. जर गोंडवानाचे तीन भागांत विभाजन झाले नसते तर भारतात सर्वात मोठे राज्य किंवा भूभाग म्हणून 'गोंडवाना' दिसला असता. गोंड ही मध्यभारतातील एक जनजाती असून मूळ तेलगू असलेल्या ‘कोंडा’ शब्दाचा अर्थ पर्वत असा होतो. पुढे कोंडाचा अपभ्रंश गोंडा-गोंड असा झाला. मात्र गोंड समुदायात ‘गोंड’ शब्दाचा ‘गोल’ असलेल्या भूमीचा ‘अंड’ (बाळ) म्हणजे भुमीपुत्र असा केल्या गेला."
खांडक्या बल्लाळच्या उत्तरानं गणेशचं समाधान झालं नाही व तो परत त्याला म्हणाला,
"आपण कृपया मला आपल्याबद्दल सांगावं. म्हणजे माझं समाधान होईल."
ते गणेशचं बोलणं. तसा खांडक्या बल्लाळ गणेशशी संवाद साधू लागला होता. गणेश बोलत होता. तोच खांडक्या बल्लाळ म्हणाला,
"माझी राजधानी बल्लारशाहा. आता त्याला बल्लारपूर असं म्हणतात. माझ्यामुळेच बल्लारपूरला जास्त महत्व प्राप्त झाले व ते हिंदुस्थानात ओळखले जावू लागले."
ते खांडक्या बल्लाळचं म्हणणं. परंतु ते बोलणं मधातच तोडत हिराताणी म्हणाली. हिरातानी खांडक्या बल्लाळची महाराणी होती.
"चूक. शंभर प्रतिशत चूक." हिरातानीचं बोलणं. तसा गणेश म्हणाला,
"म्हणजे? हे खोटे बोलत आहेत की काय?"
"होय, ते खोटंच सांगत आहेत."
"मग खरं काय आहे? अन् तुम्ही कोण आहात?"
गणेशचा तो प्रश्न. तशी हिराताणी म्हणाली,
"मी यांची महाराणी. हिरातानी नाव माझं. मी वास्तविकता सांगते. चंद्रपूर शहराला आदिया बल्लाळ यानं वसवलं. त्याचा कालावधी होता १३२२ ते १३४७ व माझ्या पतीचा कार्यकाल होता सन १४७२ ते १४९७. शिवाय आदिया बल्लाळनं तेलंगाणातील शिरपूर इथं असलेली राजधानी बल्लारशाहा इथं आणली. आता ठरव की कोणं बल्लारपूर वसवलं."
खांडक्या बल्लाळनं ते ऐकलं व तसा तो म्हणाला,
"अवो मातामाय. मी बल्लारशाहाची गोष्ट करीत नाही. मी जी चंद्रपूर राजधानी बनवली. त्याची गोष्ट करीत आहो. सांग बरं चंद्रपूरची राजधानीसाठी निवड कोणं केली?"
"चंद्रपूर म्हटलं काय?"
"मग काय म्हटलं तर........ तुला ऐकायला आधीच कमी येते. अन् मधातच टिपीर टिपीर करीत बसतेस. नीट ऐकत जाणं."
त्या पती पत्नी दोघांचं ते म्हणणं. तसा गणेश काय समजायचं ते समजला. त्यानंतर म्हणाला,
"कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं ते काही मला माहीत नाही. परंतु तुम्ही चंद्रपूर वसवलं वा चंद्रपूरची राजधानीसाठी निवड केली म्हणता, त्याबद्दल काही माहिती सांगू शकाल काय?"
गणेशनं विचारलेला प्रश्न. तसा खांडक्या बल्लाळ म्हणाला,
"माहीत आहे. माझ्या सर्वांगाला भरपूर फोडं होते. ते फोडं लहानपणापासूनच होते. माझ्या आईनं व मिही भरपूर औषधं केली. परंतु काहीच उपाय चालला नाही. त्यानंतर फिरता फिरता मी चंद्रपूरच्या एका नदीजवळ आलो.
माझ्या अंगावरील फोडामुळंच माझं नाव खांडक्या बल्लाळ पडलं होतं. मीच चंद्रपूर शहर स्थापन केले व मीच चंद्रपूर शहराची मुहूर्तमेढ रोवली. मला माझी ही राणी हिरावतीच्या रुपानं फारच बुद्धीमान व सुलक्षणी पत्नी मिळाली होती. माझी तिनं भरपूर काळजी घेतली. तिनंच माझ्या अंगावरील फोड सुधारावे म्हणून जंगलात फेरफटका मारायला सांगीतले होते. मी बल्लालशाहा पासून दहा किमी अंतरावर जुनोना येथे एक विस्तीर्ण तलाव बांधला होता. शिकारीदरम्यान थकवा आल्यावर मी इथंच थांबत असे. त्या तलावाच्या काठावरच मी जलमहालही बांधला होता.
ती एकदाची गोष्ट. मी असाच वाट चुकून एकदा शिकारीसाठी गेलेलो असतांना पाण्याच्या स्रोताजवळ आलो. तेथील थंडगार पाणी प्राशन केल्यानंतर माझी तहान भागली. मग ते थंडगार पाणी मी माझ्या घावाला लावलं. फार बरं वाटलं. शिवाय माझे फोडंही कमी झाले. तेव्हापासून मी नित्य तिथं जावून पाणी पीत असे. काही पाणी फोडाला लावत असे तर कधीकधी अंघोळही करीत असे. मग ती गोष्ट राणी हिरातानीला माहीत होताच तिनं त्या ठिकाणी एक मंदीर बांधून घेतलं. हेच ते झरपट नदीजवळचं अंचलेश्वर मंदीर. हे मंदीर नंतर अंचलेश्वर मंदीर म्हणून प्रसिद्ध झालं. हाच विस्मयकारी प्रसंग. हाच प्रसंग हेरुन या हिरातानीनं चंद्रपूर किल्ल्याची उभारणी केली. तद्नंतर मी माझी राजधानी बल्लालशाहातून चंद्रपूरला हलवली. अन् ही म्हणते की चंद्रपूर राजधानी आदिया बल्लाळनं वसवली. "
"अहो, मी चंद्रपूर नाही म्हटलं. मी बल्लालशाहाची गोष्ट केली."
"ठीक आहे, ठीक आहे." खांडक्या बल्लाळ म्हणाला. खांडक्या बल्लाळचं बोलणं संपताच राणी हिरातानी म्हणाली,
"अन् हे ही माहीत असायला हवं तुला की बल्लारपूर शहराच्या पूर्वेस सिरोंचा ते अल्लापल्ली रस्त्याच्या उजव्या बाजूस, बल्लारपूर शहराच्या टोकाकडील विरळ लोकवस्तीच्या भागात खांडक्या बल्लाळ शाहची समाधी आहे. इस्लामी पद्धतीचे भव्य घुमट असलेल्या या समाधीला स्थानिक लोक 'खर्जीचे मंदिर' म्हणतात. दुर्दैवाने या शहरातील बऱ्याच रहिवाश्यांना याची माहितीसुद्धा नाही. त्यामुळे बरीच वर्षे ही समाधी गर्द काटेरी झाडीझुडुपांत गडप झाली होती. याचा फायदा घेत चोरट्यांनी छुप्या संपत्तीच्या आशेने समाधीच्या आतील भाग उद्ध्वस्त केला होता. सध्या भारतीय पुरातत्व विभागाच्या सहाय्याने समाधीची व परिसराची स्वच्छता केल्याने या समाधीस पूर्ववत देखणे रूप प्राप्त झाले. राजाच्या समाधीसमोरच माझी म्हणजेच या राणी हिरातानीची चौथ-याच्या स्वरूपातील समाधी आहे. राजाच्या समाधीजवळील दगडावर एकूण चौऱ्यांशी पावलांचे ठसे कोरलेले आहेत. हे ठसे त्याच्या समाधीवर सती गेलेल्या बेचाळीस पत्नींच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोरले गेले आहेत. याचाच अर्थ माझ्या पतीला तब्बल बेचाळीस पत्न्या होत्या. समोरच एक देखणी पायऱ्यांची विहीर सुद्धा आहे. तिला आम्ही बारव वा बाहुली विहीर म्हणायचो.
माझ्या पतीच्या समाधीच्या डाव्या बाजूलाच एक अत्यंत साध्या धाटणीची दुसरी एक समाधी आहे. ती समाधी याच गोंड राजवटीतला शेवटचा राजा निळकंठ शहाची आहे. ज्यांची कारकिर्द सन १७३५ ते १७५१ होती. इ.स. १७५१ मध्ये त्यांना नागपूरचे हेच भोसले राजे रघुजी पहिले यांनी तुरुंगात टाकले होते आणि कैदेतच त्याचे निधन झाले. ज्यात चंद्रपूरचा थोर संस्थापक आणि त्याच्या अधोगतीचा साक्षीदार, ज्याच्या कारकिर्दीत गोंड राजवटीचा अस्त झाला. हे दोन्ही राजे आता चंद्रपुरात एकमेकांच्या बाजूलाच चिरनिद्रेत पहुडले आहेत. इतर गोंड राजवटी आधीच लयाला गेल्या होत्या. त्या मानाने चांदाची गोंड राजवट बराच काळ टिकली. चांदाच्या गोंड राज्याला कुशल व बुद्धिमान शासकांचा मोठा वारसा मिळालेला होता व इतर राज्यांना ग्रासलेल्या अंतर्गत कलह आणि षड्यंत्रांच्या नैसर्गिक प्रलोभनांचा प्रतिकार करीत हे राज्य जवळपास पाच शतके आपला नावलौकिक टिकवू शकले."
ते हिरातानी राणीचं बोलणं. तसा गणेश म्हणाला,
"हे सगळं बरोबर आहे. परंतु मी ऐकलं की गोंड राजे हे तर हिंदू होते. मग ते मुस्लीम कसे झाले? कोणी सांगू शकाल काय?" गणेशचा तो प्रश्न. तसं त्यानं विचारताच बख्त बुलंद शहा म्हणाले,
"माझे वडील कोकशाह मरण पावताच मी राजा बनलो. परंतु माझा राजा बनण्यास माझ्याच भावांचा विरोध होता. अशातच ते माझी हत्या करणार होते. ही माहिती मला लागली व मी ठरवलं. आपण आपलं राज्य टिकवू शकत नाही. आपल्याला जर राज्य टिकवायचं असेल आणि राजा बनून राहायचं असेल तर आपण कुणाची तरी मदत घ्यायला हवी. तसं पाहिल्यास स्वार्थ कोणं सोडलेला आहे, तर मी सोडणार. मग मी विचार करु लागलो. त्यावेळेस मी देवगडलाच होतो. शेवटी तेथून पळालो. तो थेट दिल्लीला गेलो. तिथं बादशाहा औरंगजेबाची मी भेट घेतली. तेव्हा त्यांच्यासमोर मी माझी कैफियत मांडली. त्यावर ते म्हणाले नव्हे तर ती एक अटच होती. मी तुला मदत करतो. परंतु इस्लाम कबूल करावं लागेल. मग काय, शेवटी माझ्यासमोर उपाय नव्हता व मी इस्लाम स्विकारला आणि माझ्या विरोधात असलेल्या नातेवाईकांचा औरंगजेबाच्या मदतीनं बंदोबस्त लावला. परंतु याचा अर्थ असा नाही की मी हिंदू असलेल्या माझ्याच जातीच्या लोकांवर अत्याचार केले. मी माझं सिंहासन परत घेण्यासाठी मुस्लीम नक्कीच बनलो आणि त्यानंतर माझे सर्व वंशज मुस्लीमच झाले. मी नागपूर वसवलं व माझ्या मुलानं म्हणजे चांद सुलताननं नागपूरचा विस्तार केला. परंतु मिही माझ्या या नागपूरला चांगल्या गर्तेत आणलं होतं. मी नागपूरला चांगले दिवस दाखवले. त्यामुळंच माझ्या मुलानं देवगडवरुन नागपूरला आपली राजधानी आणली."
बख्त बुलंद शहा म्हणाला. तसे त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्यावर गणेश म्हणाला,
"काय झालं? असे अश्रू का?"
गणेशचा तो प्रश्न त्यावर बख्त बुलंदशहा बोलले.
"अश्रू यासाठी की आम्ही आमच्या काळात त्याग केला आमच्या सौहार्दपुर्ण जगण्याचा. आपलं सुख त्यागलं. आम्हीही त्या काळात सुखात राहू शकलो असतो. आम्हालाही राजकारण करण्याची इच्छा नव्हती. आम्हालाही लोकांच्या ऐहिक सुखासाठी मुस्लीम बनायचे नव्हते. आम्हालाही आमचा धर्म प्यारा होता. तसं पाहिल्यास माझी अजिबात मुस्लीम बनायची इच्छा नव्हती. परंतु मला वाटत होतं की जर मी राजा बनलो नाही तर माझ्यानंतर गादीवर येणारे राजे हे जनतेला सुखी ठेवणार नाहीत. ते जनतेला लुटलूट लुटतील. आम्ही राज्य केलं, ते जनतेचं हीत लक्षात घेवूनच. जनतेचं कल्याण करणं हे आमच्या राजपरीवारानं आमच्या वंशजानं शिकविलेली गोष्ट होती. आम्ही शोषल्या त्या काळातही अनंत वेदना. परंतु त्या वेदनांचा त्रास आम्ही जनतेला होवू दिला नाही.
आज मात्र परिस्थिती वेगळीच आहे. आज आम्ही या उघड्या डोळ्यानं पाहतोच आहोत. पाहतो आहोत की लोकं पार बदलले आहेत. बदलले आहेत आणि विसरले आहेत आम्हालाच आणि विसरले आहेत आम्ही केलेला त्याग. आज आम्हालाच वाटते की आम्ही विनाकारणच लढलो. आमचं शौर्य पणाला लावलं. कारण आमच्यानंतर आलेला हा मनुष्यप्राणी बेईमान निघाला. साधं त्यांचं आमच्या समाधीकडे लक्ष नाही. आज नागपूरात मोठमोठे पूल बनत आहेत व नागपूरचा विकास होत आहे. नागपूरचं नाव जगात पसरत आहे. परंतु त्याच नागपूरचे लोकं या बख्त बुलंद शहाला विसरले आहेत की ज्यानं नागपूर वसवलं व त्याच्या परिवारानं नागपूरचा विकास केला. हो, मी मुस्लीम झालो. परंतु आधीचा हिंदूच होतो ना. आज ना आमच्या या मित्रांच्या म्हणजेच राजे रघुजीच्या वंशजांच्या समाध्या बरोबर आहेत ना माझ्या वंशजांच्या. ही नागपूरची धरोहर आहे हेच विसरलेत लोक. तरीही या काशीबाईनं चमत्कार करुन दाखवलाय. परंतु तरीही तिच्याही समाधीकडे कुणाचं लक्ष नाही. माझी तर समाधीच दुरावस्थेत पडली आहे. तिचे दगडं पडले आहेत. तेच इतरही माझ्या मित्रांच्या समाध्यांचेही झाले आहे. त्या आमच्या स्मृती आज नागपूरच्याच विकासाबरोबरच सुधरविण्याची गरज आहे यात शंका नाही."
बख्त बुलंद शहानं आपलं बोलणं बंद केलं होतं. तसा गणेश काय समजायचं ते समजला होता. परंतु ते त्याचं बालपण होतं आणि त्या बालपणात तो काहीही करु शकत नव्हता.
सर्वांनी आपआपला आजपर्यंतचा इतिहास सांगीतला होता. ज्यात बाकाबाई होती, काशीबाई होती. अप्पासाहेब होते. राजे रघुजी होते. खांडक्या बल्लाळ होता. हिरातानी होती. बिंबा महाराज होते. परंतु सर्वात शेवटी माहिती देणारा बख्त बुलंद शहा. तो तर वेगळच बोलून गेला होता. म्हणत होता की तुम्ही आजचे मानव बेईमान की जे आमचंच अस्तित्व विसरलेय. ज्या नागपूरसाठी आम्ही त्याग केला. त्या नागपूरलाच विसरले. नागपूर विकास पावत आहे. मोठमोठ्या इमारती व रस्ते बांधत आहे. त्यात पुलंही. अन् आमचं अस्तित्व असलेल्या समाध्या. त्या पडत आहेत. ते कोणालाच दिसत नाही. आम्ही जर काल नागपूर वसवलं नसतं तर आज ना नागपूर असतं, ना शहर असतं. ते गावंच राहिलं असतं साधारण. त्याचं शहर बनलं नसतं.
बख्त बुलंद शहाचं बरोबर होतं एकतर्फी. कारण आज माणूस आकाशात चांद्रयान पाठवत होता. आदित्य एल वनही पाठवलं होतं सुर्यावर. परंतु तो आपली जमीन विसरला होता. अन् विसरला होता त्या पूर्वजांना. ज्या पुर्वजांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं होतं. ज्याचं अस्तित्वही तोच मानव आज नष्ट करायला लागला होता.
आज खरं तर त्यांच्या समाध्यांच्या पुनरुत्थानाची गरज होती. परंतु कुणीच त्याकडं लक्ष देत नव्हतं. सगळे आज आपल्याच तालात खुश होते. कुणालाच त्याकडे ढुंकूनही पाहायला वेळ नव्हता. कारण मोबाईल क्रांती झाली होती.

************************************************

दुपारचे तीन वाजले होते. तशी आरती झाली व गणेश त्या समाधीपासून घरी जायला निघाला होता. त्याला अजुनही कळलं नव्हतं की नेमकं काय होतंय. आतापर्यंत त्याच्या लक्षात आलं नव्हतं की ती संवाद साधणारी माणसं ही भूतं असतील. त्याकडे त्यानं लक्षही दिलं नव्हतं. परंतु जसं त्यानं बख्त बुलंदशहाकडून ऐकलं की त्यांची समाधी दुरापास्त स्वरुपात आहेत. माणसं विसरली आहेत त्यांना. तेव्हा मात्र त्याला नक्कीच वाटलं की आतापर्यंत आपण ज्यांच्याशी बोलत होतो. ती खरी खुरी माणसं नव्हती, तर ती भूतच होती.
गणेशच्या जसं लक्षात आलं की ती माणसं भूतं होती. तसा तो किंचीतसा घाबरला. त्याचबरोबर तो थोडा विचार करायला लागला की या लोकांनी मला फक्त त्यांची माहिती दिली. तिही मानवी रुपात येवून. शिवाय मला काहीही केले नाही. मग यांना का बरं घाबरायचं. तसा तो विचार करता करता अगदी बिनधास्त झाला होता.
गणेश घरी आला होता. तेव्हा सायंकाळचे चार वाजले होते. आज तब्बल एक महिना झाला होता. तो तब्बल एक महिना शाळेत गेला नव्हता. तसा त्याच्या घरी त्याच्या शिक्षकांचा त्याच्याबद्दल फोन गेला होता. विचारणा झाली होती की तो तब्बल एक महिना तो शाळेत आलेला नाही.
गणेश जसा घरी चार वाजता परत आला, तशी त्याची आई दारातच उभी होती. म्हणाली,
"कुठून आलाय?"
"शाळेतून." गणेश म्हणाला.
"खरं बोलतंय."
"हो, खरंच."
"शाळेतून फोन होता."
शाळेतून फोन होता. असं म्हणताच गणेश चक्रावला. त्याच्यासमोरुन शाळेच्या दहशतीचे विचार गिरक्या घालू लागले. विचार घोळू लागले होते की ती शाळा, ज्या शाळेत तेच स्वतः आपल्यावरचा त्रास कमी करु शकत नाहीत. तेच गुलाम आहेत. ते मला काय शिकवतील. ते तसे आहेत. म्हणूनच आज त्या काळातील झालेल्या महात्म्याच्या समाध्यांची स्थिती दुरापास्त आहे.
शाळेतील त्रास....... तोही शिक्षकांना? तसा त्याला तो एक प्रसंग आठवला की ज्यावेळेस सरकारनं शिक्षकांना ड्रेसकोड लागू केला होता. ती बातमी एका वर्तमानपत्रात छापून आली होती व त्यावर एका लेखकाचा एक लेखही छापून आला होता. ती बातमी होती शिक्षकांनाही ड्रेसकोड.
एका वर्तमानपत्रात छापून आलेली व प्रसिद्ध झालेली बातमी. बातमी शालेय शिक्षणमंत्र्याच्या आदेशाची नव्हे तर हा शासननिर्णय पारीत होणार होता. त्या बातमीनुसार आता शिक्षकांनी काय करावं? काय करु नये? हे सरकारच ठरवणार होतं. कारण ते शिक्षकांना वेतन देत होतं.
सरकार वेतन देतं. त्यामुळंच त्यांचं म्हणणं काहीही असो, ते शिक्षक म्हणून शिक्षकांनी ऐकायलाच हवं. नाही ऐकलं तर घरी बसा अशीच अवस्था. शिवाय त्यावर काही बोलतो म्हटल्यास तसं का बोललात? म्हणून कारणे दाखवा नोटीस. अन् कोणीही म्हणतं की शिक्षकांसारखा सुखी कोणी नाही. म्हणूनच शिक्षकानं काहीच बोलू नये. असं जगाचं म्हणणं व मानणंही.
सरकार नेहमीच काहीतरी उचापती करीत असतं. मागं सरकारनं एकदा म्हटलं होतं, 'हागणदारीमुक्त गाव बनवायचं आहे. कोणीही बाहेर शौचास जाणार नाही.' मग त्यासाठी त्याचा सर्व्हे करण्यासाठी सरकारनं कोणाकोणाच्या घरी शौचालय नाही याचा सर्व्हे करायला लावला. त्यानंतर बी एल ओ चीही कामं करायला लावली. कोरोनात नाक्यानाक्यावर ट्रापीक पोलीस बनून रहदारीही सांभाळायला लावली. निवडणूक व जनगणनेची कामं तर जगजाहीरच आहेत. शिवाय मराठा आरक्षण सर्व्हेही करायला लावला. तिही कामं शिक्षकांनीच केलेली आहेत. याचाच अर्थ असा की शिक्षक हा सहनशील व्यक्तीमत्वाचा असल्यानं त्याला सरकार जे काम करायचा आदेश देईल. ती ती कामं शिक्षकांना करावीच लागतील. असा हुकूमशाही तत्वाचा आदेश.
सरकार सांगतं की मुले शिकवा. परंतु त्यांना बोटंही लावू नका. लहान मुलं जरी असतील तरी त्याला मांडीवर खेळवू नका. त्याला राग येईल असं बोलू नका. तो तुम्हाला जरी काही म्हणेल तरी चालेल, परंतु त्या विद्यार्थ्यांना काहीही म्हणू नका. त्यानं काही म्हटलं की नाही हे पाहण्यासाठी वर्गावर्गात व शाळेशाळेत कॅमेरे बसवले. कॅमेर्‍यानं आता वर्गखोल्यांचीही जागा घेतली. काल विद्यार्थ्यांना दुखापत होवू नये म्हणून सरकारचं हे पाऊल. त्यातच विद्यार्थी चांगला शिकायला हवा ही सरकारची अपेक्षा. शिवाय या विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांना नाचूनही दाखवायचं आहे. याचाच अर्थ असा की शिक्षकांनी एक मिनीटही वर्गात बसूच नये. कारण शिक्षक हा न थकणारा घटक आहे हे सरकारचं मत. शिवाय शिक्षकांनी अजिबात थकूच नये. कारण त्याला वेतन मिळतं.
विद्यार्थ्यांना बोट लावू नये. त्यांचा लाड करु नये. ती अश्लील कृती आहे, असं लोकांचं व शासनाचं म्हणणं. जरी ती लहान असतील तरीही. परंतु लहान असतांना एखाद्या मुलाला एखादं अक्षर लिहिताच येत नसेल तर त्याचं बोट धरुन वा प्रसंगी हात धरुन अक्षर वळवून वा लिहून दाखवावं लागतं व सांगावं लागतं की असे अक्षर काढ. मग तो विद्यार्थी तशी अक्षरे काढतो. ही अश्लील कृती नसतेच. शिवाय मुलांचा लाड करणे ही देखील अश्लील कृती नसते. ती लहानगी मुलं त्या शिक्षकांना आपल्या स्वमुलासारखीच असतात. परंतु शिक्षक खाजगी संस्थेच्या संस्थालकांना दान देत नसल्यानं त्याला दरवेळी अशाच प्रकारचे आरोप लावून बदनाम केलं जातं. हे सत्य नाकारता येत नाही.
अलिकडील काळात शाळेत राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान म्हणणं आहेच. शिवाय राज्यगीतही म्हणणं बंधनकारक झालंय. शिवाय एवढा मोठा अभ्यासक्रम आहे की तो पूर्ण करीत असतांना शनिवारही कमी पडतो. त्यातच परीपाठ हा जुनाच प्रकार नवीन स्वरुपात आला आहे की ज्याला थोडासा वेळ द्यावाच लागतो. शिवाय नव्यानंच आलेला शाळेतील प्रशासनाबाबतचा ऑनलाईनपणा. त्यात काही काही शाळांना बाबू आणि शिपाही नसल्यानं सगळी कामं शिक्षकांनाच करावी लागतात. शिकवणं बंद करुन. मग वेळ मिळत नाही. त्यातच प्रशिक्षणं.......कधी नवभारत साक्षरता, कधी शाळाबाह्य प्रशिक्षण, कधी अध्ययन निष्पत्ती व मुल्यमापन तर कधी एखादं वेगळंच. सारं नाकीनव येत असतं शिक्षकांच्या. तरीही शिक्षक नावाचा हा घटक ती सर्व कामं पुर्ण करुन शिकवणं पुर्ण करण्यासाठी वेळ काढतोच, नव्हे तर त्याला काढावं लागतं. कारण त्याला वाटतं की त्या विद्यार्थ्याचं कोणत्याही स्वरुपाचं नुकसान होवू नये. सरकार जरी कोणतेही कामं सांगत असेल, तरी चिडचिड न करता ती कामं करावीत. परंतु त्यासोबतच विद्यार्थीही शिकवावेत. कारण ते विद्यार्थी आहेत. म्हणूनच आपण आहोत. ते जर नसते तर आपणही नसतो. हीच शिक्षकांची भावना. म्हणूनच तो इतर सरकारची सर्व कामं काहीही न बोलता इमानीइतबारे पुर्ण करीत असतो. सरकार वेळोवेळी दररोजचे आदेश काढत असते व तो एखाद्या गर्दभासारखा काही न बोलता फक्त राबराब राबत असतो. कारण त्यालाही त्याच्या शिक्षकांनी तो शिक्षक बनल्यास कोणत्याही स्वरुपाची त्यानं कुरकूर करु नये हेच शिकवलंय. आता तो फक्त आदेश पाळतो. कोणत्याही स्वरुपाची कुरकूर करीत नाही.
सरकारनं नुकताच एक आदेश काढला. ड्रेसकोडचा आदेश. त्यानुसार सरकारनं सांगीतलं की शिक्षकांनी अमूक अमूक ड्रेसकोड वापरायचा. भडक कपडे वापरु नयेत. जीन्स, टी शर्ट वापरु नयेत आणि पुरुषांनी शर्ट इन करावा. इन करावा याचा अर्थ शर्टींग करावा. याचाच अर्थ असा की वरील निर्णयानुसार सरकारनं शिक्षकांच्या पेहरावाच्या मुक्त स्वातंत्र्यावर बंधन आणलं. महत्वपुर्ण गोष्ट ही की घटनेतील कलम १९ ते २२ मध्ये काही स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत. मूलभूत स्वातंत्र्ये ही नागरिकांच्या स्थितीत अंतर्भूत असलेली नैसर्गिक आणि मूलभूत स्वातंत्र्ये आहेत. तथापि, ही स्वातंत्र्ये निरपेक्ष किंवा अनियंत्रित नाहीत. परंतु काही वाजवी निर्बंधांच्या अधीन आहेत. ती स्वातंत्र्ये आहेत.
१) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
२) शांततेने आणि शस्त्राशिवाय एकत्र येण्याचे स्वातंत्र्य.
३) संघटना, संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य.
४) भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य;
५) भारताच्या प्रदेशाच्या कोणत्याही भागात राहण्याचे आणि स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य.
६) कोणताही व्यवसाय किंवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा व्यवसाय चालविण्याचे स्वातंत्र्य.
सरकारनं आता शिक्षकांना ड्रेसकोड सांगून त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्य्यावर गदाच आणलेली दिसून येत असून जी घटनेच्या कलम एकोणवीस मध्ये मुलभूत स्वातंत्र्याची यादी आहे. त्यात पोशाखाचा आणखी एक अनुक्रमांक टाकून शिक्षकांना ड्रेसकोड जाहीर करुन वाढविल्याचे निदर्शनास येत आहे. आता सरकार शिक्षकांना ड्रेसकोडच नाही तर ते शिक्षक आहेत, म्हणून त्यांनी काय खावं? काय खावू नये? काय प्यावं? काय पिवू नये? काय बोलावं? काय बोलू नये? काय लिहावं? काय लिह विशेष म्हणजे सरकारनं शिक्षकांनी तोकडे कपडे परिधान करु नये हे सांगण्याची गरज आहे. कारण बऱ्याच शाळेत ब्लाऊजला बायाच लावलेल्या दिसत नाहीत. टी शर्ट आणि जीन्सनं काहीच फरक पडत नाही फारसा. शिवाय त्यानं शर्ट इन केला काय, नाही केला काय, याचाही फारसा फरक पडत नाही. परंतु सरकार म्हणतं की तो भावी पिढी घडवतो, विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. शिक्षकांच्या पेहरावाचा त्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो. मग असं जर आहे तर नवीन बदलत्या परिवर्तनशील काळानुसार त्यांना नवीन बदलाव शिकवायचा केव्हा? का त्यांनी जुनंच बुजगावण्यासारखंच राहावं काय भविष्यातही? मग जुनं जर सोनं आहे तर महिला शिक्षकांनी लुगडं घातलं आणि पुरुष शिक्षकांनी पुर्वीच्या शिक्षकांसारखं धोतर बंगाली वापरली तर काय हरकत आहे? शिवाय बरेचसे शिक्षक आजच्या काळात जीन्स टी शर्टच नाही तर बंगाली कुर्ता व पायजमा वापरतात. त्यावर ते शोभून दिसतात. ते आपली बंगाली कशी इन करतील?
महत्वपुर्ण बाब ही की सत्ता आहे म्हणून काहीही करायचे, ही बाब बरोबर नाही. हं, बदलाव जर करायचाच असेल तर शिकविण्यात करावा. शिक्षक विद्यार्थ्यांना किती आणि कसे चांगले शिकवतील यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी त्यांनी काय वापरावं? कसं शिकवावं? हे सांगायला हवं. काय खावं? काय प्यावं? यासाठी बदलाव करु नये. तसं पाहता एक प्रतिशत शिक्षक वर्ग जर सोडला तर सर्वच शिक्षक सरकार आदेश काढो की न काढो, चांगलेच शिकवीत असतात. चांगलेच कपडे घालत असतात आणि ते जीन्स व टी शर्टही घालत असतील तर त्यात गैर काय? तो पोशाख म्हणजे जगाचा बदलाव आहे. जग आता चंद्रावर जात आहे. ते भविष्याचा वेध घेत आहे. शिवाय पुढील काळात भविष्यवेधी शिक्षण शिकणार आहे. त्यासाठी त्याला तशाच स्वरुपानं बदलविणारे शिक्षक हवेत. मग त्यात कोणी पोशाखावरुन बदलवतील. कोणी विचारातून बदलवतील. तर कोणी नवीन आचरणाच्या कोणत्याही पद्धतीतून. हं, ड्रेसकोड सांगायचाच आहे तर तो तोकडे कपडे वापरु नये असा असावा. चित्रविचित्र नक्षीकाम असलेला वापरु नये असा असावा. फाटके डिझाईन असलेला वा जास्त मेकअप केलेला जीन्स वापरु नये असा असावा वा कोणतेही कपडे इन केलेले असावेच याचंही बंधन नसावं. कारण कोणाला शर्टींग करणं आवडत नाही. ते सदोदीत बंगाली कुर्ता व पायजमा घालत असतात. तसंच सर्वच शाळांनी राज्यगीत घ्यावं असं बंधन घालू नये उन्हाळ्यात तरी. कारण विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळेस जास्त वेळ उभे ठेवल्यास बऱ्याच वेळेस चक्करही येतात व ती गोष्ट जीवावर बेतू शकते. यात शंका नाही. शिवाय शिक्षक दररोजच विद्यार्थ्यांना आनंददायी शिकवीत असतांना स्पेशल शनिवार म्हणत त्याच दिवशी आनंददायी शिकवण्याच्या नावावर विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडीत करणं बरोबर नाही.
शालेय दृष्टीकोनातून सरकारनं वरील आदेश काढला, तो स्तुत्य आहे. परंतु तसा आदेश काढतांना भविष्यवेधी शिक्षणाची बाब विचारात घेतलेली दिसून येत नसून जरी तो आदेश काढला असेल, तरी त्यास बदलवू नये. कारण तो आदेश रद्द करणे म्हणजे सरकारच्या अंतरात्म्याला ठेच पोहोचविण्यासारखेच होईल. मग त्याचा त्रास शिक्षकांना झाला तरी चालेल. त्यांचे मन दुखवले तरी चालेल. त्यांच्या भावना दुखावल्या तरी चालेल. त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावले गेल्यासारखे त्यांना वाटले तरी चालेल. कारण तोच असा एकमेव प्राणी आहे की जो सहनशील आहे. मग त्याला कोणी काहीही म्हणो वा कोणी कितीही शब्दाचा मारा देवो वा कोणी कितीही त्याला घाण्याला जुंपो. तो अजिबात नकार देणार नाही. तो अजिबात काहीही बोलणार नाही. हे तेवढंच खरं आणि तेच आपणच नाही तर सर्व जग आजपर्यंत पाहात आलंय यात तसूभरही असत्यता नाही.
विशेष म्हणजे शिक्षक हा काही घाण्याला जुंपलेला बैल नाही की त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा याव्यात. त्याला सहनशील समजत त्याच्यावरच ताशेरे ओढावेत. एवढंच नाही तर तो सन्मानीत व्यक्ती असूनही त्याचा पदोपदी अपमान करावा. कधी शिक्षक रिकामटेकडा आहे असं म्हणत होणारा अपमान. कधी त्याला शाळेबाहेरची कामे देवून होत असलेला अपमान तर कधी त्याचेवर असते भलते आदेश लादून त्यांचा होत असलेला अपमान. कधी संस्थाचालकांच्या भलत्याच अपमानास्पद आरोपाला सामोरं जावं लागतं. हा सततचा अपमान बरा नाही. माहीत आहे की तो सहनशील आहे. सगळं सहन करतो. परंतु तो एवढाही सहनशील नाही की त्याला राग येणार नाही. त्यालाही एक दिवस असा राग येईल की जसा भूगर्भातील लाव्हारस बऱ्याच दिवसानंतर भुगर्भातून बाहेर येवून आजुबाजूच्या गावाला, जीवसृष्टीला नेस्तनाबूत करुन डोंगरशिला बनवतो व आपलं अस्तित्व तयार करतो. तसा शिक्षक करेल. ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आज शिक्षक शांत आहेत, सहनशील आहेत, त्याचा कोणीही गैरफायदा उचलू नये. त्यांचा सन्मान करावा. ते आहेत म्हणून आपण साक्षर आहोत. सरकारही साक्षर आहे. ते जर नसते तर सरकारही साक्षर नसती, ना त्यांना कोणते आदेश काढता आले असते ना सरकारी पदावर आरुढ होता आलं असतं हे तेवढंच खरं. याचा विचार सरकारनंही करावा. उगाच कोणतेही बंधन घालून शिक्षकांना कोणत्याही बाबीतून छ्ळू नये वा त्रास देवू नये म्हणजे झालं.
तो त्या लेखकाचा लेख. तसा गणेश विचार करायला लागला की जो शिक्षक आपल्यावर होणारा अत्याचार शोषमता शोषता त्या लोकांचा इतिहास विसरला की ज्यांनी या नागपूरसाठी कार्य केले. नागपूरात राहणारे नागपूरकर लोक आज नागपूरचा इतिहास त्यांना माहीत नाही. त्यांना हेही माहीत नसेल की नागपूर केव्हा वसलं. त्यांना हेही माहीत नसेल की नागपूरला नागपूरच नाव का दिलं. त्यांना हेही माहीत नसेल की नागपूरात नागनदीला नागनदी नाव का पडलं. त्यांना बख्त बुलंदशहाची पुर्ण माहिती नसेल की ज्यानं नागपूर वसवलं आणि त्याचा मुलगा चांद सुलतानचीही माहिती नसेल की ज्यानं आपली राजधानी देवगडवरुन नागपूरात आणली. त्यांना ना रघुजीचा पराक्रम माहीत असेल, ना त्याच्या वंशात झालेल्या इतर वारसांचा पराक्रम. शिवाय काशीबाई कोण होती हेही माहीत नसेलच.
या नागपुरातील नागपूरवासीय लोकांना त्यांचा स्वतःचा इतिहास माहीत नाही आणि ते चालले जगाचा इतिहास माहीत करुन घ्यायला. ही शोकातिका त्याला कळत होती. तो विचार करु लागला होता त्याचबद्दल. तसे आईचे शब्द कानावर आले.
"कुठं हरवलाय? मी काय विचारते त्याकडे लक्ष आहे का तुझं?"
गणेश भानावर आला. तसा म्हणाला,
"कुठंच तर नाही. बोल, काय म्हटलं तू?"
"मी म्हटलं की तू एक महिन्यापासून शाळेत गेला नाही म्हणे. मग गेला तरी कुठे होता?"
गणेशनं आईचं बोलणं ऐकलं. त्याला त्याची चूक कळली होती. परंतु ती चूक जरी असली तरी ती घोडचूक नव्हतीच. कारण त्याला नागपूरचा इतिहास शिकता आला होता. त्याचबरोबर त्याला शिकता आला होता विदर्भाचा इतिहास. ज्या विदर्भात खांडक्या बल्लाळसारखी माणसं झाली होती.
आईचा तो प्रश्न. कुठं गेला होता. त्यावर उत्तर न दिल्यानं व कुठंतरी तो हरवला आहे हे लक्षात येताच आईनं त्याला हलवलं व पुन्हा विचारलं, कुठं गेला होता?
आईचा तो प्रश्न. त्यावर उत्तर देत गणेश म्हणाला,
"कुठं जाणार. शाळेतच."
"मग ते शिक्षक खोटे बोलतात की काय? चल त्यांच्याकडेच घेवून चालते तुला. नाहीतर खरं खरं सांग अगदी कुठं गेलता ते?"
"खरं सांगू आई तुला. तू रागावणार तर नाही."
"नाही रागवत. खरं खरं सांग."
"काशीबाईच्या देवळात."
'काशीबाईच्या देवळात' असं उत्तर गणेशच्या तोंडून ऐकताच गणेशची आई घाबरली. कारण अलिकडील काळात तिनं तिथं भूतं दिसतात असं ऐकलं होतं. बऱ्याच जणांनी ती भूतं पाहिलीही होती असंच तिला सांगीतलं होतं. तशी ती घाबरली व त्याला जोरानं म्हणाली,
"तिकडं काय करीत होता तू?"
"इतिहास ऐकत होतो त्यांचा. त्या पुण्यात्म्यांनी केलेल्या शौर्याचा."
"कोणते पुण्यात्म्ये आणि कोणते शौर्य? वेडा वैगेरे झाला की काय तू?"
"नाही आई, मी वेडा झालो नाही. ऐक तर या महिन्यात मी स्वतः शिकलेल्या गोष्टी."
असं म्हणत गणेशनं त्यानं ऐकलेला तो इतिहास भराभर न अडखळत आईला सांगून टाकला. तसा आईला एक आश्चर्याचाच झटका बसला. ते लहानगं वय व त्या वयात त्याला असलेला तो रघूजी राजासह व शिवाजी महाराजासह खांडक्या बल्लाळपर्यंतचा इतिहास न अडखळत सांगणं, ही तारेवरची कसरत होती. तिचा विश्वासच बसत नव्हता त्या गोष्टीवर. तशी ती म्हणाली,
"एवढं सारं तुला त्या काशीबाईच्या मंदीरात सांगीतलं गेलं?"
"होय आई, अन् या गणेशचा श्रीगणेशाही झाला. परंतु त्यांना एक खंत वाटते. खंत वाटते की त्यांना अजुनही न्याय मिळालेला नाही."
"न्याय? मेलेल्या माणसांनाही न्यायाची अपेक्षा असते का?"
"होय, तिही भुतं अतृप्त असतात सन्मानासाठी. त्यांना वाटते की त्यांनी आपल्या नागपूरच्या पुनरुज्जीवनासाठी आणि विकासासाठी भरपूर काही केलं. त्यांनीच नागपूर वसवलं नव्हे तर नागपूरचा विकासही केला. परंतु त्यांची पिढी ही त्यांना विसरली व त्यांच्या समाध्यांची हालअपेष्टा करीत आहे. ते पुण्यात्म्ये म्हणतात की त्यांच्या समाध्या भंगल्या. पडत आहेत त्यांच्या समाध्या. त्यामुळंच त्यांच्या त्या समाध्यांचा जिर्णोद्धार व्हायला हवा. ती नागपूरची शान आहे आणि धरोहर सुद्धा. धरोहर याचा अर्थ सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा. खरंच त्या समाध्यांचा जिर्णोद्धार होईल तरी का गं?" गणेशचा तो प्रश्न. परंतु त्या प्रश्नांवर त्याच्या आईला आश्चर्यच वाटत होतं.
गणेशच्या आईचं नाव पार्वती होतं. तिनं ते सगळं ऐकलं. त्यावर ती म्हणाली,
"परंतु तू माझ्या प्रश्नावर उत्तरच दिलं नाहीस?"
"आई, तुझा आणखी कोणता प्रश्न?"
"अरे, तू शाळेत का गेला नाहीस?"
"आई, ते शिक्षक मारतात मला. मला ते आवडत नाही. अन् मी नाही जात शाळेत."
आईला गणेशनं खरं खरं सांगून टाकलं. परंतु आईला वाटत होतं की सध्या आपल्याला किती ज्ञान आहे याची गरज नाही. आजचं चाकोरीबद्ध शिक्षण आहे. आज पदवीला महत्व आहे. व्यक्तीच्या ज्ञानाला नाही. व्यक्ती कितीही ज्ञानी महापुरुष असला, त्यानं कितीही पुस्तके लिहिली असली तरी त्याचं ज्ञान उपयोगाचं ठरत नाही. ते अर्थशुन्य असतं. परंतु तेच ज्ञान जर पदवी रुपात वाढत असेल तर त्याला अर्थ आहे. त्यामुळंच चाकोरीबद्ध शिक्षण आलंच. तसं ते महत्व लक्षात घेवूनच आई पुढे म्हणाली,
"बाळ, आजचं शिक्षण हे शाळेत गेल्यानं होत असतं. असं तुला कितीही ज्ञान असलं तरी त्याला किंमत नाही. तुला जर मोठं व्हायचं असेल तर तुला शाळेत जाणं आलंच. शिवाय तूच करु शकतोस या तुझ्या मित्रांच्या समाध्यांचा जिर्णोद्धार. त्यामुळंच तुला शिकणं आलंच. त्यासाठी दररोज शाळेत जाणं आलंच. म्हणूनच तुला शिकावं लागेल. मग तुझ्या मनात इच्छा असो अगर नसो."
आई पार्वतीने बोललेले ते शब्द. ज्याप्रमाणे पुरातन काळातील आई पार्वती आपल्या प्रिय पुत्राला समजावून सांगत असे एखाद्या प्रसंगानुसार. तशीच आज ही कलियुगातील गणेशाची आई आपल्या पुत्राला म्हणजेच गणेशाला शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगत होती. तसं शिक्षणाचं महत्व गणेशला समजावून चुकलं होतं. तसा दुसरा दिवस उजळला.
दुसऱ्या दिवशीपासून गणेश नित्यनेमानं शाळेत जावू लागला होता. त्याचं मन शाळेत रमायला लागलं होतं. तसं पाहता त्याचा इतिहास आवडता विषय बनला होता. इतिहासाचा तास असलाच की बाई त्यालाच शिकवायला लावत असे. कारण त्याला त्या शिक्षिकेपेक्षा त्या भागाची खडान् खडा माहिती असायची. शिवाय एखाद्या प्रश्नात वा प्रसंगात तो अडकलाच तर त्याचं उत्तर त्या काशीबाईच्या देवळात जावून त्या पवित्र आत्म्यांना विचारुन टाकत असे व ते ऐकून तो त्या प्रश्नांवर वा प्रसंगावर नेमकं उत्तर देत असे.
गणेश जेही काही उत्तरं द्यायचा. ती उत्तरं आश्चर्यचकीत करणारीच वाटायची. असं वाटायचं की ती माहिती वा ती उत्तरं त्याला कशी माहीती झालेली असावीत. परंतु ते एक गुपीतच होतं की ते गुपीत फक्त त्यालाच माहीत असायचं.
आज गणेश मोठा झाला होता. परंतु तो त्या पुण्य आत्म्यांना विसरला नव्हता. तो आताही नित्यनेमानं काशीबाईच्या देवळात जात असे. तिथं आजही त्या पवित्र आत्म्यांशी संवाद साधत असे. तिथं देशोदेशीचे पवित्र आत्म्ये येत असत. ते फक्त त्यालाच दिसत असत व मायेनं बोलत असत. त्याची त्याला किंचीतही भीती वाटायची नाही.
आज तो मोठा झाला होता. शिक्षणातूनही वर गेला होता व राजकारणातूनही. आज तो नागपूरचा महापौर बनला होता. तसा तो महापौर बनताच महालला असलेल्या राजे रघुजीच्या वारसांना भेटला होता. शिवाय राजनगरला असलेल्या आजमशहाचा व बख्त बुलंद शहाचा नातू सलमानच्या वारसांनाही भेटला होता. त्यानं त्यांच्याशी संवाद साधला होता व त्या समाध्यांचा जिर्णोद्धार करण्याच्या गोष्टी बोलला होता.
जिर्णोद्धाराची ती गोष्ट. ती गोष्ट ऐकताच बख्त बुलंद शहाच्या वारसांना आनंद झाला. त्याचबरोबर आनंद झाला होता राजे रघुजीच्या वारसांना. त्यांनी रितसर परवानगी दिली होती त्याला.
राजे महाराजांच्या वारसाची परवानगी मिळताच गणेशनं नागपूरची शान असलेल्या त्या सर्व समाध्यांचा जिर्णोद्धार केला होता. त्या समाध्या पुन्हा पुनर्जीवीत झाल्या होत्या.
आज काशीबाईचं देऊळ दैदिप्यमान वाटत होतं. त्याचबरोबर दैदिप्यमान वाटत होत्या त्या इतरही बर्‍याच समाध्या. शिवाय बख्त बुलंद शहाचीही समाधी आज शोभून दिसत होती. त्यामुळंच की काय, ते पवीत्र आत्म्ये वर आकाशातून अतिशय आनंदानं पाहात होते व आनंद व्यक्त करीत होते.
गणेश केवळ एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं चक्कं नागपूरचा विकास करण्याकडे आपला कल वाढवला होता. त्याच्या त्या कामं करण्याच्या सपाट्यानं त्याचं नाव विकास पुरुष म्हणून आज नागपूरच्या धरणीला माहीत झालं होतं. हळूहळू तो महापौराचा आमदार व पुढे खासदार व त्याचबरोबर मंत्रीही बनला होता. त्याचं कारण होतं त्या पवित्र आत्म्यांचाच आशीर्वाद. कदाचीत जर त्यानं त्या पवित्र आत्म्याच्या समाधीचा जिर्णोद्धार केला नसता तर कदाचीत चित्र काहीसे वेगळेच असते.
आज आठवत होतं गणेशला की त्या पवित्र आत्म्यानं त्याचीच निवड का केली होती माहिती सांगायला. ते काशीबाईचंच देऊळ का निवडलं होतं माहिती देण्यासाठी. त्याचं कारण होतं की गणेश एक सात्वीक मुलगा होता. साधा भोळा असलेला. तो लहानपणी पाहिजे त्या प्रमाणात हुशार नव्हता. सामान्य बाबतीत तो अडाणीच होता. परंतु जिज्ञासा त्याच्या मनात कुटकूट भरली होती. त्याच जिज्ञासेच्या भरवशावर त्यानं ऐतिहासीक माहिती उपलब्ध करण्यासाठी आपल्या आईजवळ जाणूनबुजून प्रश्नांची सरबत्ती सोडली होती. शिवाय तीच सरबत्ती आपल्या शिक्षकांजवळही सोडली होती. हे अंतर्यामी असलेले प्रेतात्म्ये ओळखून होते. शिवाय ते काशीबाईचंच देऊळ यासाठी निवडलं होतं प्रेतात्म्यांनी की तिथं अलिकडील काळात कोणीच जात नव्हतं. कारण अलिकडील काळात एक अफवा होती की तिथं अलिकडील काळात भुतं दिसतात.
ते प्रेतात्मे काही भुतं नव्हती. तर त्यांनी चांगलं कार्य केलं होतं. ज्या कार्याचा गौरव व्हायला हवा, असं त्या प्रेतात्म्यांना वाटत होतं. परंतु जी नागपूरकर मंडळी खुद्द आपल्या मायबापांनाच विसरली होती आणि त्यांना कैदेत टाकल्यासारखं वृद्धाश्रमात टाकत होती. तसंच स्वतः मात्र आपली पत्नी व मुलाबाळासह आनंदात ऐषआरामात राहात होते. ती मंडळी कशी काय त्या प्रेतात्म्यांना आठवतील?
नागपूरचं सारं ऐतिहासिक वैभव संपत चाललं होतं, याची जाणीव प्रेतात्म्यांना झालेली होती. त्यामुळंच ते प्रेतात्म्ये चिंतातूर होते. अशातच त्यांना दिसला निराश अवस्थेत असलेला गणेश. मग काय, प्रेतात्म्यांची चिंताच मिटली व त्यांनी त्याच्या मनावर राज्य केलं. त्याला काशीबाईच्या देवळात आणून अशा अशा गोष्टी सांगीतल्या आणि शिकवल्या की ते प्रेतात्म्ये कृतकृत्य झाले. शिवाय त्यांचाही गणेशच्या रुपानं जिर्णोद्धारच झाला होता.
आज तेच पवित्र आत्म्ये कृतार्थ झाले होते त्याच्या कृतीनं. ते आताही त्याला भेटत असत. संवाद साधत असत व म्हणत असत की तू होता. म्हणूनच आमचा उद्धार झाला. आमच्या समाध्यांचाही. तू जर नसतास तर आमच्या समाध्या तुटल्याच असत्या संपुर्ण. त्या पृथ्वीच्या पोटात गडप झाल्या असत्या कायमच्याच. मग ना त्या समाध्या असत्या. ना आम्ही असतो. आमच्या तर केव्हाच स्मृती मिटल्या असत्या या धरणीवरुन. आम्हीही कायमचेच गडप झालो असतो या पृथ्वीवरुन. कारण आमच्या समाध्याच नसत्या. मग आम्हाला विचारणारे तरी कोण असते बरं.
गणेशनं श्रीगणेशाच केला होता मृत आत्म्यांना शांती मिळवून देण्याचा आणि त्यानं मिळवूनही दिली होती त्यांना शांती. त्यांच्या समाधीचा जिर्णोद्धार करुन. त्यासाठी शहरातूनच फंड उभा केला होता. परंतु तो नागनदीला शुद्ध करु शकत नव्हता. कारण त्याला जास्त पैसे लागणार होते. शिवाय शहरातील सांडपाणी कुठं टाकावं? हा प्रश्न होता त्याचेसमोर.
आज नागपूरात मोठमोठे उद्योगधंदेही उभे राहू लागले होते. ते शहर जागतीक पातळीवर अव्वल दर्जाचं शहर म्हणून ओळखलं जावू लागलं होतं. त्यातच त्या शहराला ज्या बख्त बुलंद शहानं उभारलं. त्यांचं स्मारकही उभं राहिलं होतं. परंतु ज्या नदीचं पाणी लोकं पुर्वी पीत असत. शिवाय ज्या नदीचं पाणी स्वच्छ आहे म्हणून नागवंशीय लोकं या नदीजवळ स्थिरावले होते नव्हे तर त्या लोकांच्या नावानं ज्या नदीचं नाव नागनदी ठेवलं गेलं होतं. त्या नागनदीचं पाणी कसं स्वच्छ करायचं व नागनदीचं पुनर्वसन कसं करायचं हा प्रश्न होता. समजा ते पाणी एखाद्या नळाद्वारे पाईपमधून जरी शहराबाहेर काढलं, तरी समस्या मिटणार नव्हती. कारण ते पाणी विषारी असायचं व त्या पाण्यात असेही घटक असायचे की ते हवेतील ऑक्सीजनशी संयोग पावून वातावरण प्रदुषीत करायचे. शिवाय पीकं होवू द्यायचे नाहीत आणि तेच पाणी जर नदीत मिसळले तर नदीतील जीवजंतूही मरणाची भीती होती नव्हे तर मरतच असत. जर हे कारखान्यातील पाणी नदीत नाही मिसळू दिले तरी नागनदी शुद्ध करता येत नव्हती. कारण लोकांना कितीही सांगीतलं तरी लोकं लपूनछपून कचरा टाकतच होते नागनदीत. कोणी कोणी तर अर्धवट जळलेल्या मुदड्याचीही राख टाकत असत नदीत तर कोणी आपली मेलेली जनावरे. त्यामुळंच कितीही नागनदी शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवले तरी नागनदी शुद्ध होत नव्हती. तिचं पाणी त्या सांडपाण्यानं काळसर पडलं होतं.
गणेश खासदार बनला असला आणि पुढं मंत्री जरी बनला असला तरी तो बांधील होता त्याच गोष्टीत. तो जेव्हा जेव्हा नागनदीवर उभा असायचा. तेव्हा तेव्हा त्याला अश्रू यायचे की ज्या नदीमायनं नागपूर शहराला वाढायला संधी दिली. ज्या लोकांची दया घेवून त्या नदीमायनं राहायला जागा दिली नव्हे तर एकेकाळी आपल्यातील पाण्यानं लोकांची तहान भागवली. जमीन सुपीक केली. एवढंच नाही तर त्या जमीनीत लोकांनी पीकं घेतले व संबंध नागपूरला पोषलं. आज तीच नदी प्रदुषणानं त्रस्त होती व तिची दया घेणारं कोणीच नव्हतं.
नागनदीचं पाणी अशुद्ध होतं. ते पाणी काळसर रंगाचं दिसत होतं. ती वाहात होती नागपूर शहरातून. अविरतपणे व अखंडपणे. ती कधीच आता कधीच सुकायची नाही. तिला वर्षभर पाणी असायचं. परंतु ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं. तिला बरेचदा शुद्ध करुन पाहिलं. परंतु ते शुद्धही होत नव्हतं. तशी ती एक चिंतेची बाब होती.
नागनदी पुढं कन्हान नदीला मिळत होती. कन्हान नदी ही वैनगंगेला मिळत होती. कन्हानचं पाणी शुद्ध होतं. परंतु ज्याठिकाणी तिला नागनदी मिळायची. त्या संगमापासून नागनदीचं अस्तित्व संपायचं. परंतु त्यापुढे कन्हान नदीचंही पाणी काळ्याच रंगाचं व गढूळ दिसायचं. शिवाय ज्या वैनगंगेचं पाणी शुद्ध व शितल होतं. त्याच वैनगंगेला ही नागनदी मिळालेली कन्हान नदी मिळाल्यानं तिचंही पाणी गढूळ झालं होतं व त्या छोट्याशा नागनदीनं विशालकाय वैनगंगेच्या रंगालाही आपला रंग देवून टाकला होता. त्याचाच परिणाम हा होत होता की प्रदुषीत झालेली वैनगंगा पुढं प्रदुषीतच पाणी वाहून नेत होती. ज्यातून तिच्या पाण्याचा वापर करण्यासाठी जिथे गोसेखुर्द प्रकल्प बांधला होता. त्या गोसेखुर्द प्रकल्पावर त्याचा परिणाम होत होता.
गोसेखुर्द प्रकल्प बांधला. त्याचं कारण होतं, शेतीला पाणीपुरवठ्याच्या सोयी पुरवणे, लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे, लोकांना मत्सपालन द्वारे रोजगार देणे, जलविद्युत निर्माण करणे. यापैकी जलविद्युत हा प्रकल्प सोडला तर कोणत्याच गोष्टी या प्रदुषीत पाण्यानं साकार होत नव्हत्या. हीच एक चिंतेची बाब होती.
नदीशुद्धीकरण करणे हा प्रकल्प कसा राबवायचा? ह्या प्रश्नावर गणेश विचार करीत होता. तसा तो आज जरी खासदार बनला असला तरी लहानपणापासूनच तो चिकीत्सक बुद्धीमत्तेचा होता. तसं पाहिल्यास तो खासदार व मंत्री बनल्यामुळं त्याला वेळच मिळायचा नाही. तसं पाहिल्यास तो बरेच दिवस झाले होते. त्या प्रेतात्म्याच्या भेटीला गेला नव्हता. पुर्वी तो नेहमीच जायचा त्या प्रेतात्म्याच्या भेटीला. त्यांच्याशी संवादही साधायचा. परंतु आता ना वेळ होता त्याला, ना त्याला त्या प्रेतात्म्याची आठवण येत होती. शिवाय एकांतही नसायचा त्याचेजवळ.
गणेश नदी शुद्धीकरण प्रकल्पावर विचार करायचा. परंतु त्याला उत्तर मिळत नव्हतं. तसा विचार करीत असतांना त्याला अचानक त्याचं बालपण आठवलं व आठवल्या त्या बालपणातील बऱ्याच गोष्टी. हळूहळू त्या आठवणीतून ते प्रेतात्म्ये डोळ्यासमोर तरळू लागले. आता त्याला आठवलं की त्यांनी बरीच माहिती दिली होती त्याला. त्यांचाच आशीर्वाद होता की तो आज एक मंत्री बनला होता, तोही केंद्रातील. हळूच आठवले त्याला ते सल्ले. जेव्हा एखाद्या प्रसंगात तो अडत असे, तेव्हा तो त्याच मृतात्म्यांना सल्ले विचारायला जात असे. तसा एक दिव्य प्रकाश पडला त्याच्या डोक्यात. वाटलं की आपण याबाबतीत त्या मृतात्म्यांना सल्ला विचारायचा.
विचारांचा अवकाश. तशी एकांतवासाची संधी साधून तो काशीबाईच्या देवळात गेला. त्यानं मृतात्म्यांचं नामस्मरण केलं. तसे एकएक प्रेतात्म्ये तिथं हजर झाले. सर्वांनी विचारलं,
"कसा आहेस?"
सर्वांचा तो एकच प्रश्न. कसा आहेस? त्यावर गणेशनं ठीक आहे असं उत्तर दिलं. त्यानंतर ते पवित्र आत्म्ये म्हणाले,
"कसं काय येणं केलं?"
तो त्यांचा प्रश्न. तसा प्रश्न मनात होताच. तसं त्यानं विचारलं,
"मला नागपूर शहराच्या विकासासाठी नागनदी शुद्ध करायची आहे. ती कशी शुद्ध करता येईल? काही उपाय आहे काय?"
तो प्रश्न. तो प्रश्न ऐकताच बख्त बुलंद शहाचा मुलगा चांद सुलतान म्हणाला,
"सोपं आहे यावरचा उपाय."
"काय? कोणता उपाय आहे?"
"शोषखड्डे खोदायचे."
"म्हणजे?"
"ज्याच्या घरी शौचालय वा अंघोळीचं पाणी निघत असेल व ते मुख्य वाहीनीतून नदीत मिसळत असेल तर त्या वाहिण्याच बंद करुन टाकायच्या."
चांद सुलतान बोलत होता. परंतु त्याचं तत्वज्ञान काही गणेशला समजत नव्हतं. तसा तो म्हणाला,
"मला परत समजावून सांगा बरं."
चांद सुलतानला ते काही बरोबर समजावून सांगता येत नव्हतं. तसा बख्त बुलंद शहा म्हणाला,
"अरे, अशी दवंडी द्यायची की ज्याचं सांडपाणी असेल, त्याची सोय त्यानंच लावावी. म्हणजे नदीत सांडपाणी जाणारच नाही व नदी अशुद्ध होणार नाही."
"हे काय नवीनच खुळं. मी उपाय विचारला तर तुम्ही अलतं भलतं उत्तरं देत आहात."
गणेशचं ते बोलणं. त्यावर राजे रघुजी पहिले म्हणाले,
"अरे, सर्वांना शोषखड्डा खोदायला सांग. खोलवर खोदायला सांग. त्यात सांडपाणी गोळा होवू दे. असे दोन शोषखड्डे खोदायला सांग. एक भरला की दुसरा कामात आणायचा व तो शोषखड्डा उपसा करुन त्यातील मलमुत्र शेतीला द्यायचं. म्हणजे त्यानं दुहेरी फायदा. एक म्हणजे नदी अशुद्ध होणार नाही व शोषखड्ड्यातून जेही मलमुत्र निघेल, त्यानं शेतीही पीकेल व पीक जोमात येईल. शोषखड्डे हे रस्त्याच्याच बाजूला खोदून घ्यायचे. म्हणजे उपसायलाही बरे जातील."
रघुजी राजे पहिल्यांचं बोलणं पुर्ण होताच दुसरे राजे रघुजी बोलले,
"काही ज्या जागा पडीक असतात. त्या जागेत मोठमोठे शोषखड्डे खोदून जर त्यात दोनचार घरातील सांडपाणी गोळा केलं तर अधीक चांगलं."
दुसऱ्या रघुजीचं बोलणं पुर्ण होताच तिसरे रघुजीही मागं राहिले नाहीत. तेही बोलते झाले. ते म्हणाले,
"शोषखड्डे खणण्याऐवजी जर पायल्या टाकून ते पाणी शहराबाहेर काढलं आणि त्याला शुद्ध केलं वा त्याच पाण्याचा वापर शेतीला केला तर अधिक चांगलं."
सर्व मृतात्म्यांची ती उत्तरं गणेशनं ऐकली. तसा त्यानं आणखी एक प्रश्न केला. प्रश्न होता, आता लोकं ऐकतील काय? तसा तो प्रश्न. तो प्रश्न सर्वांनी ऐकला. परंतु कोणीही उत्तर देत नव्हतं. तसा तो म्हणाला,
"आपण आपल्या राज्यात मलमुत्राची कशी विल्हेवाट लावत होते?"
तो त्याचा प्रश्न. तसा प्रश्न त्यानं विचारताच बख्त बुलंद शहा म्हणाला,
"आम्ही शोषखड्डे खोदले होते."
"बाकीच्यांच्या राज्यात काय सोय होती."
सर्वांनी एकच उत्तर दिलं की आम्ही शोषखड्डे खोदले होते व शोषखड्ड्यातून मैला वाहून नेल्या जात होता. तो मैलाचा व सांडपाण्याचा वापर नगराच्या बाहेर शेतीत सोनखत म्हणून केल्या जात होता."
गणेशनं त्यावर भरपूर विचार केला व विचारांती ठरवलं की आपण जर या मृतात्म्यांनी सांगीतलेले उपाय राबविले तर.........जिथं शोषखड्डे खोदून सांडपाण्याची विल्हेवाट लावता येईल. तिथं सांडपाण्याची विल्हेवाट लावायला शोषखड्डे खोदायला लावावेत आणि जिथं तसे शोषखड्डे खोदण्याची सोय नसेल, तिथं गडर लाईन टाकून ते सांडपाणी शहराच्या बाहेर काढावे. ते सांडपाणी शहराच्या बाहेर एका तलावात गोळा करावेत व त्या पाण्याला शुद्धीकरण करुन त्याचा पुनर्वापर करावा. त्याचा वापर पिण्यासाठी जरी झाला नाही तरी चालेल. परंतु त्याच पाण्याचा वापर करुन शेतीत चांगले पीक पीकवता येईल. त्यासाठी कालवे काढावे लागतील. शिवाय त्याच पाण्यावर आपल्याला जलविद्युतही निर्माण करता येईल. शिवाय आपण जर असे धोरण राबवले तर आपलं नागपूर जागतिक स्तरावर एक प्रतिकृती बनेल.
विचारांचा अवकाश. त्यानंतर त्यानं त्या मृतात्म्यांची रजा घेतली व तो निघून गेला तेथून. त्यानंतर त्यानं नदीशुद्धीकरणासाठी जो विशेष नीधी आला होता. त्याचा वापर करुन त्यानं मोठी पाईपलाईन टाकली. ज्यात खालून सांडपाणी वाहात होतं व वरुन वाहतूक चालत होती. ती पाईपलाईन शहराच्या बाहेर काढून तिला त्यानं एका तलावात वळवलं होतं. ज्या तलावात काही मशिनी लावल्या होत्या. त्या मशिनी पाणी शुद्ध करीत होत्या. तर काही टर्बाईन लावले होते. त्या टर्बाईन जलविद्युत निर्माण करीत होत्या. शिवाय त्यानंतर त्यानं पुढं जावून त्याच तलावातून कालवे काढले होते व त्याच कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा होत होता. आता कालांतरानं नदीही शुद्ध झाली होती व तिच्या पाण्याचा वापर शहरातील लोकं पिण्यासाठी करीत होते. शिवाय याच पाण्यात काही ठिकाणी मत्सपालन व्यवसाय फुलला होता व लोकं पोटंही भरीत होते.
आज शहराचा चेहरामोहराच बदलला होता. त्याचे श्रेय जात होते गणेशला. कारण तोच आज नागपूरचा मंत्रीच नाही तर विकास पुरुष म्हणून नावारुपाला आला होता. परंतु त्याला जरी त्या कामाचं श्रेय जात असलं तरी ते श्रेय तो त्या पवित्र आत्म्यांना देत होता. ज्या पवित्र आत्म्यांनी जिवंत असतांना तर शहराचा उद्धार केला होता. परंतु आज मेल्यानंतरही गणेशला सल्ले देवून आपल्या मरणाचं सार्थक केलं होतं नव्हे तर मेल्यानंतरही नागपूर शहराचाच उद्धार केला होता.
आज नागपूर शहर जागतीक दर्जात्मक शहराच्या यादीतील क्रमवारीत येत होतं. लोकं सुखी होते आणि त्यांना सुखी केलं होतं गणेशनं. परंतु गणेशच्या म्हणण्यानुसार बख्त बुलंदशहा व त्या संपुर्ण चमूनं. ज्यांनी जिवंतपणीही नागपूरला सुखी केलं होतं आणि मरणानंतरही. ते खरंच पुण्यात्मेच होते की ज्यांनी नागपूर वसवलं होतं आणि नागपूरच्याच आन बान व शान साठी अहोरात्र झटले होते.
गणेशला खत वाटत होती. ती खंत होती नागपूरच्या विकासाची. त्यालाही वाटत होतं की अनेक वर्षांपासून वाहात असलेली आपली नागनदी स्वच्छ व्हावी. ती जर स्वच्छ होईल तरच आपल्या शहराचा मान वाढेल. ती खंत आज दूर झाली होती.
गणेशच्या सर्व इच्छा पुर्ण झाल्या होत्या. तो आता निश्चींत झाला होता. परंतु तो राजकारणातून निवृत्त झाला होता. त्यानं नागपूरच्या विकासासाठी भरपूर काही केलं होतं. त्यानं स्मृतीस्थळंही स्थापन केलं होतं व त्या स्थळी नागपूरच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी जे जे काही केलं. ते ते ठेवण्यात आलं होतं. कधी कधी तो तिकडेही जात असे व आपलं मनोरंजन करुन घेत असे. या ठिकाणी असलेल्या वस्तू त्यानं दिवंगत राजांच्या वारसांकडून मिळवल्या होत्या.
गणेशची सर्व कामं झाली होती. आज तो म्हातारा झाला होता. त्याला आता जास्त उठापटक करता येत नव्हती. तसं राजकारणातून निवृत्त झाल्यानं त्याला निवृत्तपण सतावत होतं. परंतु तरीही काही लोकं येत व त्याचे सल्ले घेवून जात. आताही तो त्या काशीबाईच्या मंदीरात जात असे व संवाद साधत असे. अशातच तो होळीचा दिवस उजळला. रात्री होळी पेटली होती व सकाळची धुरवड सुरु होती.
सकाळ झाली होती व सकाळीच गणेशला गुलाल लावायला लोकांची नेहमीप्रमाणे भीड लागली होती. अशातच तो एक माथेफिरु आला. त्यानं गणेशला गुलाल लावला व वाकून नमस्कार केला. त्यानंतर खिशात हात टाकला व खिशातूनच क्षणाचाही विलंब न होवू देता गोळ्या झाडल्या. एक..... दोन..... तीन....... मग काही कळायच्या आतच गणेश गतप्राण झाला. कारण ती गोळी गणेशच्या मस्तकाला लागली होती. मस्तक छिन्नविछिन्न झालं होतं.
तो इसम. त्या इसमानं गर्दीचा सहारा घेवून गोळी झाडली होती व तो पळून गेला होता. शिवाय तो कोण होता हेही कळायला मार्ग नव्हता. मात्र लोकं हरहळत होते. ज्यानं नागपूरसाठी एवढं केलं. त्याचा मृत्यू असा व्हावा!
ती एक तर आश्चर्यच करण्यासारखी गोष्ट होती. तसं पाहिल्यास तो आता सत्तेवर नव्हता. त्यामुळंच त्याला व्हि आय पी सुरक्षा नव्हतीच. त्यामुळंच तो हत्यारा कोण हे ओळखता आलं नाही आणि यंत्रणेनंही ते शोधण्याचा प्रयत्न केला नाही. सगळा डाव. विरोधकांचा की आपल्याच माणसांचा. ते काही ओळखता आलं नाही. मात्र साऱ्यांनाच माहीत होतं की तो नेहमीच काशीबाईच्या देवळात जात असे लहानपणापासूनच आणि आताही कधी सवड मिळालीच तर.......मग त्याच्या प्रेताला अग्नी कुठं द्यायचा? तसा प्रश्न निर्माण झाला. त्यावरही लोकांचं विचारमंथन झालं. विचारमंथन म्हणजे त्या प्रेताचा दाहसंस्कार. त्यावर एकजण म्हणाला,
"काशीबाईच्या देवळाच्या बाजूलाच राजेरजवाड्यांच्या स्मशानभुमीत त्याचा दाहसंस्कार करावा. कारण गणेशला तिथंच मार्ग सापडला व त्याला नागपूर शहराचा विकास करता आला."
वाद शिगेला पोहोचला होता. प्रेत जाग्यावरच होतं. कोणी म्हणत होतं की काशीबाईच्या देवळालगत दाहसंस्कार व्हावा तर कोणी म्हणत होते की ती स्मशानभुमी राजेरजवाड्यांची आहे. तिथं दहन करु नये. वाद चव्हाट्यावर आला होता. तसं ठरलं की त्याच्या प्रेताला अग्नी काशीबाईच्या मंदीरातलगत द्यावी. ज्या स्मशानभुमीत राजेरजवाड्यांच्या समाध्या आहेत. कारण त्याला तेथूनच मार्गदर्शन मिळालं. त्यातच कोणी म्हणालं की त्याचा पुरावा काय? मग वाद पुन्हा सुरु झाला. कोणी म्हणत होते की तोच रघुजीच्या राजवंशातील कोणीतरी अवतारी पुरुष असेल की ज्याची इच्छा अपुर्ण राहिली असेल, त्यानं गणेशच्या रुपात जन्म घेतला असेल व नागपूर विकासाचं आपलं कार्य पुर्ण केलं असेल. मग कोणी म्हणत होतं की नागपूर विकासाचं कार्य व ती इच्छा बख्त बुलंद शहाचीच अपुर्ण राहू शकते. ती इच्छा चांद सुलतानचीही अपुर्णच राहू शकते. कदाचीत हाच गणेश बख्त बुलंद शहाच्या रुपानं जन्म घेवून आला असावा किंवा चांद सुलतानच्या रुपात त्याचा जन्म झाला असावा त्यामुळंच त्याच बख्त बुलंदशहाच्या समाधीच्या बाजूलाच त्याला पुरावं. जिथं चांद सुलतानचीही समाधी आहे. त्यानंतर एक अतिशहाणा व्यक्ती बोलला. ज्यानं तो वाद मिटविण्याचा प्रयत्न केला नाही तर त्या वादात तेलमीठ टाकलं. तो म्हणाला की तिथं बख्त बुलंदशहाची समाधी आहे. जो एक मुस्लीम राजा होता व ती स्मशानभुमी मुस्लीम स्मशानभुमी आहे. गणेश हा तर धर्माने हिंदू होता. त्याच्या प्रेताला तिथं कसं दफन करता येईल?
सारेच वाद. बख्त बुलंद शहा मुस्लीम समुदायाचा राजा असल्यानं तिथं दफन होवू नये असं मानणारा एक गट. जो गट मुस्लीम होता व मुस्लीम असल्याचा हक्कं जतवत होता. तसाच दुसरा गट होता की जो गट हिंदू जरी असला तरी ती स्मशानभुमी आमच्या राजेरजवाड्याची स्मशानभूमी आहे असं म्हणत होता. शिवाय गणेशच्या परीवाराचं मत कोणीच विचारात घेत नव्हतं. ते अतिशय दुःखात होते आणि कार्यकर्ते त्याच्या दफनविधीवर भांडण करीत होते. विरोधक तर द्वेषाच्या भावनेतून हत्या करुन निघून गेला होता की कोणतं कारण होतं ते काही कळलं नव्हतं. मात्र देशानं एक मंत्री हरवला आहे. अशा लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. ज्यानं एक चांगलं काम केलं व नागपूरला जागतिक स्तरावरचा दर्जा मिळवून दिला होता, हे विसरता येत नव्हतं. तशाच स्वरुपाच्या काहीजण प्रतिक्रियाही देत होते. अजुनपर्यंत प्रेत स्मशानभूमीतच गेलं नव्हतं. तरीही प्रतिक्रिया येणं सुरु होत्या. वाद चिघळत चालला होता. कार्यकर्त्याची गर्दीही वाढली होती. सर्वजण त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत लागले होते.
होणारा तो वाद. तो वाद लोकं जसे ऐकत होते. तशीच गणेशची पत्नीही ऐकत होती. असा वाद होणे बरे नाही, असे समजून ती ओरडतच म्हणाली,
"राहू द्या प्रेत इथंच. माझ्या पतीला कुठं पुरायचं, कुठं नाही, ते मी ठरवणार. तुम्ही कशाला भांडताय. आम्ही आमच्या प्रेताचा दफनविधी सार्वजनिक स्मशानभूमीतच करु. कारण असे बरेच व्हि आय पी होतील. माझ्या पतीसारखेच यापुढेही. मग प्रत्येकाचं प्रेत काय काशीबाईच्याच देवळालगत पुरायचं काय आणि त्यानं नागपूरचा विकास केला म्हणून त्याला बख्त बुलंद शहाच्या कबरे बाजुला पुरायचं काय? नाही. माझ्या पतीच्या प्रेतापासून त्यांनीही बोध घ्यावा. असं मला वाटते. माझ्या पतीचा अंत्यसंस्कार सामान्य स्मशानभूमीतच होणार."
गणेशची पत्नी बोलली. तसा तिढा सुटला व गणेशच्या प्रेताला सामान्य स्मशानभूमीत जाळल्या गेलं. गणेशचा अंत्यसंस्कार शासकीय इतनामात पार पडला. त्यानंतर गणेशच्या हत्याराला शोधण्यात आलं. तसा त्याचा शोध लागला. त्यानंतर त्याला विचारण्यात आलं की त्यानं का बरं असं केलं. त्यावर त्याचं उत्तरच अजबगजब होतं. तो म्हणाला,
"मी माधव. मी त्याचा बालपणचा मित्र. माझीही इच्छा होती आमदार, खासदार व मंत्री बनायची. परंतु ती पुर्ण झाली नव्हती. मला माझं नाव त्याच्याचसारखं मोठं करायचं होतं. मी त्याचा द्वेषच करायचो लहानपणापासूनच. तो द्वेष माझ्या मनात आधीपासूनच खदखदत होता. तो जसजसा समोर जात असे. तसतसा मला त्याचा रागच येत असे. मग त्याची हत्या करायची इच्छा झाली माझी. वाटलं की आपण आमदार, खासदार वा मंत्री बनलो नाही तर काय झालं? आपण त्याची हत्या करायची. मग त्याच्याबरोबर आपलंही नाव मोठं होईल. जसं महात्मा गांधींचे झाले तसे. नाथूरामाला आज तरी कोणी ओळखलं असतं का? जर त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली नसती तर...... मी तेच ठरवलं होतं मनात. परंतु तशी इच्छा माझी पुरी होत नव्हती. मी संधी शोधत होतो. तशी संधी काही मिळत नव्हती. मग काय, शेवटी ठरवलं की हा व्यक्ती सहज जर म्हातारपणानं मरण पावला तर माझ्यातील इच्छेचं काय? माझं नाव मला कसं मोठं करता येईल? शेवटी तो प्रश्न होता माझ्या मनातील. द्वेषभावनेचा बदलाही पुर्ण होईल व माझं नावही मोठं होईल. हाच विचार. मग मी तशी योजना बनवली व त्या दिवशी दिलं उडवून त्याला."
तो लोकांचा प्रश्न. त्यावर विचारण्यात आलं की तो पळून का बरं गेला? त्यावर त्यानं उत्तर दिलं,
"भीती कोणाला वाटत नाही साहेब. तशी भीती मलाही वाटली. माणसं हत्या वा कोणाचा खुन करतांना हा विचारच करीत नाहीत की खुन केल्यानं मला पुढं पश्चाताप होईल. असा जर विचार खुनापुर्वी प्रत्येकानं केला असता तर खुनच झाले नसते कुणाचे. परंतु त्याचा नंतर पश्चाताप होतो. जसा पश्चाताप मला होत आहे. आज मला वाटते की मी माझं नाव मोठं व्हावं म्हणून त्याला मारलं. परंतु आता माझ्यावर कोणते संकट कोसळेल. त्याची कल्पनाही मी करु शकत नाही."
तो मारेकरी. तो गणेशचा बालपणचा मित्र होता. त्याच्या मनात त्याच्याविषयी लहानपणापासूनच द्वेषभावना होती. ते त्यानं दिलेल्या कबुलीजबाबात त्यानं व्यक्त केली होती. त्यालाही आज भीतीच वाटत होती. परंतु एक समाधान होतं. ते समाधान म्हणजे त्याचंही गणेशला मारुन नाव मोठं झालं होतं. जे नाव गणेशबरोबर जोडलं जाणार होतं. युगान् युगे. जेव्हापर्यंत गणेशचं नाव आणि कार्य राहणार होतं.
त्या मित्राला तद्नंतर जन्मठेप झाली. त्यादरम्यानच्या काळात अतिशय त्रास झाला त्याला. परंतु तो त्रास त्यानं अतिशय आनंदानं शोषला. हे भाकीत मनात ठेवून की आपलंही नाव इतिहासात गणेशबरोबर कोरलं गेलंय.
आज गणेशही त्या पवित्र आत्म्यातच सहभागी झाला होता की ज्यांनी नागपूर विकासासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. आज त्याचं नाव अजरामर झालं होतं की ज्यांनी नागपूर इतिहास घडवला होता. त्या यादीत त्याचं नाव आलं होतं.
आज गणेश जगात नव्हता. परंतु जगात होती त्याची नीतीतत्वे. त्याचं सुक्ष्म निरीक्षण. त्याचा दुरदर्शी विचार. त्याची नीतीमत्ता आणि त्याची उच्च विचारसरणी. त्याचा तो उच्च विचार की जो उच्चविचार आकाशालाही गवसणी घालू शकेल. ते उच्चविचार व त्यानं केलेलं महान कार्य आज जगाची प्रेरणा झालं होतं व तो जगाचा प्रेरणास्थान झाला होता नव्हे तर मार्गदर्शक आणि तेवढाच आधारस्तंभही. कारण जेव्हा जेव्हा नागपूर विकासाच्याच नाही तर जगातील शहराच्या विकासाच्या बाबतीत गोष्टी यायच्या. विचारमंथन व्हायचं. तेव्हा तोच आठवायचा लोकांना आणि त्यानं सांगीतलेली कार्य करण्याची हातौटी. ती सुत्रे आणि ती शैलीही. ज्या तत्वावर व जोरावर ज्यांना त्यांना कार्य करता येत होतं.

**********************************************************************************समाप्त ********