शिक्षा .... Akshay Yadav द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शिक्षा ....


लेखक : कुमार

नमस्कार मी सुहास आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सर्व माझ्यासोबत घडले आहे....
माझ्या घरी मी माझा भाऊ आम्ही दोघेच राहत होतो, आई वडील एक कार अपघात मध्ये गेले होते त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांचा सांभाळ करत होतो. माझ्या दादाचा माझ्यावर खुप जीव होता अगदी पोटच्या पोरासारखी माझी काळजी घेत होता.मी आणि माझा दादा म्हणजे सुशील आम्ही दोघे पण नोकरी करत होतो. दादा चे लग्नाचे वय झाले होते पण घरात वडीलधारे असे कोणी नव्हते .घरात बाई माणूस असेल तर घराला घरपण येते असे म्हणतात. मी दादाचे नाव विवाह मंडळात नोंदवले आणि स्थळ येण्यास सुरुवात झाली. कामातून किंवा सुट्टी टाकून आम्ही दोघे स्थळ पाहत होतो अश्यातच आम्हाला एक स्थळ आवडले शीतल नाव होते तिचे, दिसायला छान होती. शीतल म्हणजे माझी होणारी वाहिनी, तिच्या घरची परिस्थिती जरा नाजूक होती. तिला सोडून अजून दोन बहिणीची लग्न बाकी होती. त्यामुळे समोर येणारे स्थळ त्यांनी गोड म्हणून घेतलं. शिवाय सासू सासरे नाही फक्त एक भाऊ आणि तो देखील कमवता म्हणजे उद्या त्याचे लग्न झाले तरी तिला सोबत मिळाली असती. दादाचे लग्न त्यातल्या त्यात थाटामाटात झाले कसली कमतरता नव्हती.
सुरुवातीचे वर्ष छान गेले पण नंतर अचानक त्याच्यामध्ये भांडण सुरु झाले. छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडू लागले. रोज काही ना काही तरी वाद होत होते पण नवरा बायको मध्ये मी काय बोलणार म्हणून मी शांत राहिलो. पण एक दिवशी वाहिनी चे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काय झाले? कसे झाले ? काहीच समजत नव्हते. पोलीस आले आणि संशयित म्हणून दादाला अटक करून घेऊन गेले. त्या नंतर काही दिवसांनी माझा सोबत काही विचित्र प्रकार सुरु झाले.
ह्या घटनेला आता तीन दिवसाच्या वर होऊन गेले होते,
मी रात्री शांत झोपलो होतो आणि अचानक मला किचन मधून भांडी पडल्याचा आवाज आला. मी मोबाईलच्या
घड्याळात पहिले रात्रीचे सव्वा दोन वाजले होते. कदाचित किचनची खिडकी उघडी राहिली असेल म्ह्णून मांजर आत आले असेल असा माझ्या डोकयात पहिला विचार आला मग वाटेल मी एकटा आहे असे समजून चोर तर घरात आले नसतील ना? अश्या विचाराने मी जागेवरून झटकन उठलो. मोबाईल हातात घेऊन त्याची बॅटरी सुरु केली. त्या लहान उजेडात मी माझ्या खोलीमध्ये असलेली बॅट हातात घेतली आणि खोलीचा दरवाजा हलकेच आवाज न करता उघडला. दबक्या पावलाने मी आधी हॉल मग किचन च्या जवळ पोहोचलो. आतून भांडी पडण्याचा आवाज येतच होता. असे वाटत होते कि कोणी तरी भांडी जमिनीवर फेकत आहे. पण चोर असा आवाज का करतील असा विचार करत मी हळूच किचन चा दरवाजा लोटला. आतमध्ये घुप्प काळोख पसरला होता. माझ्या हृदयाचे ठोके मला बाहेर पर्यंत ऐकू येत होते. आत मध्ये मी हलकेच डोकावून पहिले तर सर्व भांडी जमिनीवर अस्ताव्यस्त जमिनीवर पडली होती. मांजर किंवा असे काही दिसत नव्हते मी हिम्मत करून आत गेलो.लाईट लावणायचा पर्यंत केला पण कदाचित लाईट गेली होती. खिडकी देखील बंद होती पण त्या अंधारात मला काही तरी जाणवले,त्या बंद खिडकी आणि किचन च्या कट्याजवळ एक स्त्री उभी होती आणि तिचे लालबुंद डोळे अंधारात देखील चमकून येत होते. तिने केस मोकळे सोडले होते काही समजायच्या आत ती झपझप पावले टाकत माझ्या दिशने येऊ लागली. तिला असे येताना पाहून भीतीने माझी पाचावर धारण बसली आणि एक किंकाळी माझ्या तोडून निघाली आणि मी माझे डोळे घट्ट बंद केले. डोळे उघडले तेव्हा लाईट सुरु होती आणि जमिनीवर जी भांडी दिसत होती ती आता तिकडे नव्हती माझ्या समोर कोणी उभे नव्हते. मी थरथरत आत प्रवेश केला, जमिनीवर पुन्हा एकदा पाहून तिकडे काही नसल्याची खात्री करून घेतली. घामाने माझे अंग ओले झाले होते. भीतीने अजून पाय कापत होते. जे मी पाहिले ते सत्य होते कि भास ...कदाचित मला भास झाला असेल अशी समजूत मी स्वतःची काढली आणि झोपायला गेलो खरा पण झोप काही नीट लागली नाही.
सकाळी मला जाग आली मी स्वतःला आरशात पाहिले तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. डोक्यावर टिकली लावली होती अगदी मधोमध, ओठांना लिपस्टिक केसात कुंकू कानात कुड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि ते सर्व माझ्या ओळखीचे होते त्या ... त्या सर्व माझ्या वाहिनीचे म्हणजे शीतल चे होते.मला आश्चर्य वाटेल कि हे सर्व मी कधी घातले आणि कधी केले मी सर्व ओरबाडून काढले. हे सर्व मी केले काही कारण शेवटची आठवण जी होती ती किचन ते रूम आणि मग झोप अशीच होती. विचार करत मी हॉल मध्ये आलो असतानाच कोणी तरी नळ सुरु केल्याचा आवाज माझ्या कानावर धडकला. मी नीट कानोसा घेऊन ऐकलं तेव्हा समजले कि हा आवाज दादाच्या म्हणजे मी जिकडे रात्री झोपलो होतो त्या खोलीतून येत होता. मी घरात एकटा होतो मला भीती वाटत होती काय सुरु आहे काहीच समजत नव्हते. जरा घाबरतच हलकेच दादाच्या रूमचा दरवाजा बाजूला केला आणि आत कानोसा घेतला पण वाहणाऱ्या पाण्याशिवाय कोणताच आवाज मला येत नव्हता. मी आत गेलो, आत मध्ये कोणाच्या तरी गाणे गुणगुण्याचा आवाज येत होता. हा आवाज माझ्या परिचयाचा होता , हा आवाज वाहिनीचा होता पण.... पण हे कसे शकय आहे वाहिनी तर .... मी झटकन पुढे झालो आणि बाथरूम चा दरवाजा उघडला तसे माझ्या मागून कोणी तरी गेले असा भास झाला म्हणून मी लगेच मागे वळून पाहिले पण तिकडे कोणी नव्हते आत देखील कोणी नव्हते फक्त पाण्याचा आवाज येत होता. बाथरूम मध्ये पाणी भरले होते, बहुदा लाईन ब्लॉक झाली असेल म्हणून मी पंप घेऊन पाईप च्या होल मध्ये घातले आणि एक दोन वेळा जोरात हिसका दिला तसे ब्लॉक मोकळा झाला. मी पाईप काढायला हात त्या होल जवळ नेला होता तसे एक सफेद हात त्या होल मधून बाहेर आला आणि माझे मनगट पकडले..... झालेली घटना एवढया जलद झाली कि मी जिवाच्या आकांताने ओरडत , हात सोडवणायचा प्रयन्त करत होतो पण त्याचा काही उपयोग होत नव्हता . तो बाहेर आलेल्या सफेद हातची माझ्या मनगटावरील पकड सैल सुटत नव्हती. त्या हाताची नखे माझ्या मनगटात रुतून त्यातून रक्त येऊ लागले होते. मी कसे तरी करून स्वतःची सुटका करून घेतली आणि धावत त्या खोलीच्या बाहेर आलो. बाहेर आल्या आल्या मी माझा हात पाहिला तर तो कोरडा होता म्हणजे जर सफेद हाताने होल मधून माझा हात पकडला होता तर माझा हात पण ओला झाला पाहिजे होता शिवाय त्याच्यावर नखे रुतून रक्तबंबाळ झाला पाहिजे होता पण तसे काही झाले नव्हते . माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . नक्की बाथरूम मध्ये पण पाणी साचले होते कि नाही हे पाहण्यासाठी मी पुन्हा त्या खोलीमध्ये घाबरत प्रवेश केला आणि बाथरूम मध्ये डोकावले. समोर जे काही पाहिले त्याने मला चक्कर यायची बाकी राहिली होती. पूर्ण बाथरूम मोकळे अन कोरडे होते. बाथरूम मध्ये पाण्याचा एक थेंब होता. त्यामध्ये पाण्याचा एक थेम्ब देखील नव्हता. माझ्यासोबत नक्की काय होते आहे मला काहीच समजत नव्हते.
रात्री जो काही प्रकार झाला आणि सकाळी मी जे पहिले ते पाहून खरे तर मला ऑफिस ला जायची इच्छा नव्हती पण घरात बसलो तर हे असेलच भास आणि विचार डोक्यात येत राहतील असे समजून मी तयारी केली आणि ऑफिस साठी निघालो. लिफ्ट बोलवली मी पाचव्या माळ्यावर राहत होतो, साधारण तीन चार सेकंड मध्ये लिफ्ट आली मी लिफ्ट मध्ये प्रवेश केला आणि लिफ्ट अचानक सातव्या म्हणजे शेवटच्या मजल्यावर जाऊन थांबली. मी खाली जायचे बटन दाबले होते, कदाचित वरती कोणी असेल असा विचार केला पण लिफ्ट उघडली आणि बंद झाली कोणी आत आले नाही. पुन्हा बंद झाली आणि पाचव्या माळ्यावर थांबली. मला वाटले कदाचित आता कोणी बटन दाबलेले असेल पण इकडे पण कोणी नव्हते. लिफ्ट चा दरवाजा नीट बंद होत नव्हता सतत अर्धवट बंद होऊन पुन्हा उघडत होता जसे त्या दरवाजा मध्ये कोणी उभे आहे आणि मला पाहत आहे. त्या कडे दुर्लक्ष व्हावे ह्यासाठी मी माझं लक्ष मोबाईल मध्ये दिले. पण काही फायदा झाला नाही माझी भीती कमी होण्यापेक्षा जास्त वाढली. भीतीनं मला घाम आला माझे हात पाय कापू लागले आणि मी त्यातून बाहेर पडलो जवळ जवळ उडी मारली आणि जिन्यावरून खाली पळत जाऊ लागलो तसे जिन्यामध्ये चढणारे दोन म्हातारे आजोबा माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. मी खाली आलो तर तीन मुले गप्पा मारत होती मला पाहून त्यातल्या एकाने दोघांना हाताने खुणावले. मी वॉचमन या आवाज देऊ लागलो तसे तो केबिन मधून बाहेर आला आणि तो सुद्धा मला आश्चर्याने पाहत होता.
"वॉचमन ती लिफ्ट बंद पडली आहे, कोणी तरी आत अडकेल ती बंद कर आणि कोणीतरी बोलून घ्या लिफ्ट ठीक करणारा" मी बोलत असताना तो माझ्याकडे पाहत होता ती तीन मुले पण कुजबुजत होती.
"काय पाहतो आहे? कधी पाहिले नाही का मला?" मी त्याला रागाने विचारले तसे त्याने जे उत्तर दिले त्याने माझे रक्त थंड पडले आणि मला माझीच लाज वाटू लागली होती. तो म्हणाला,
"पहिले आहे साहेब पण असे साडीत नाही..... "त्याचे हे वाक्य ऐकून मी खाली पाहिले तर मी साडी नसलो होतो आणि ती मुले माझा फोटो काढून हसत होती. मला स्वतःची लाज वाटली आता मला समजले ते जिन्यामध्ये ते दोन आजोबा माझ्याकडे असे का पाहत होते.
पण .... पण हे झाले कसे? मी वाहिनीची साडी कशी आणि कधी नेसली मला काहीच आठवत नव्हते. मी घाई ने वरती आलो आणि साडी सोडून कोपऱ्यात रडत बसलो होतो. अचानक मला एक साडी पुन्हा कपाटाखालून बाहेर आलेली दिसली. मी चिडून उठलो आणि मी रागाने ती बाहेर खेचायला सुरुवात केली.
" का ? का माझ्या मागे लागली आहेस मी असं काय वाकडे केले आहे तुझे? रागानं रडत ती साडी खेचत मी जोरात ओरडून म्हणालो.
तसे माझ्या हाताला काही तरी ओले लागले आणि मी माझ्या हाताकडे पहिले तर माझे हात रक्ताने माखले होते. हे काय होते आहे माझ्यासोबत, मी काय केले आहे कोणाचे मला का हे सर्व भोगावे लागत आहे? मी रडत होतो ओरडत होतो पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दिवस असाच निघून गेला.
दुसऱ्या दिवशी मी पुन्हा ऑफिस साठी निघालो ह्यावेळी मी घरातून नीट सर्व घातले आहे कि नाही पाहून बाहेर पडलो. खाली आलो तर माणसे माझ्याकडे पाहून हसत होती हाताने काही तरी खुणवत होती. मी टॅक्सी मध्ये बसलो आणि ऑफिस च्या गेट समोर उतरलो तर तिकडे पण हाच प्रकार होता. मी ऑफिस च्या आत प्रवेश केला तसे सर्व मला पाहून हसत होते. मला काहीच समजत नव्हते. तेवढ्यात माझ्या ऑफिस चा मित्र माझा जवळ आला आणि मला म्हणाला.
"तुला जर एवढीच हौस होती तर एखादे नाटक किंवा सिनेमात काम का नाही केले. हे सर्व करून तू स्वतःला किती बदनाम केले आहेस माहित आहे का? सर्व लोक हसत आहेत तुझ्यावर..."
तो कशाबद्दल बोलत होता मला काहीच समजत नव्हते. तेव्हा त्याने मला एक विडिओ दाखवला जो काल त्या मुलांनी शूट करून सोशल मीडिया वर टाकला होता ज्या मध्ये मी साडी नेसली होती आणि माझे हाव भाव बायकी होते. ते पाहून मी दोन मिनिट सुन्न झालो हे एवढे मी कधी केले मला समजत नव्हते. तेवढ्यात माझ्या टेबल वरचा फोन वाजला. आवाज ओळखीचा होता.
" हॅलो भाऊजी, कसे आहात" ..... एक एक हास्य कानात घुमले... हा आवाज माझ्या परिचयाचा होता.हा आवाज माझ्या वाहिनी शीतल चा होता.
"का? तुम्ही असे का करत आहात माझ्यासोबत ...... मी काय केले जे झाले त्यात माझी काय चुकी होती..... ह्या पुढे जर मला त्रास दिला तर मी सोडणार नाही तुम्हाला....." तेवढ्यात पलीकडून आवाज आला ....
"सुहास काय बोलतो आहेस, तुला समजत आहे का कोणाशी बोलतो आहेस एकतर तुझा विडिओ वायरल झाला ज्या मुळे तुझी तर गेलीच पण कंपनीची ईज्ज्जत पण गेली आणि तू मला धमकी देतो आहेस ..... तुला मी नोकरी वरून काढून टाकतो..... "बोलून बॉस ने फोन ठेऊन दिला.
ऑफिस मध्ये हसे झाले सोसायटी मध्ये हसे झाले नोकरी देखील गेली निराश होऊन मी घरी आलो. टाकून सोफयावर बसलो. तसे एक कुजबुज ऐकू येऊ लागली कानाजवळ असे वाटत होते जणू काही कोणी काही तरी हळू आवाजात जाब विचारत आहे. हळू हळू आवाज वाढू लागला आणि मला समजले हा आवाज माझ्या वाहिनीचा म्हणजे शीतल चा होता जो सर्व ठिकाणी ऐकू येत होता, ती मला बोलावत होती. मला विचारत होती, "माझी काय चुकी होती जे तू मला मारले?" शीतल चा आवाज आणि हा प्रश्न मला असहाय करत होता. म्हणून मी आज नक्की काय झाले हे तुम्हा सर्वाना सांगणार आहे....
दादाचे लग्न झाले आणि घरात एक बाई माणूस आले. आमच्या घराला पण घरपण लाभले होते. शीतलचा स्वभाव थोडा ओपन आणि फ्री होता. माझी मस्करी करणे, मला लहान मुलाप्रमाणे भरवणे, माझी काळजी घेणे माझ्यासोबत बिनधास्त फिरायला येणे, ती माझी वाहिनी कमी मैत्रीण झाली होती. मला पण सहवास हवा हवासा वाटू लागला. हळू हळू मी तिच्या मध्ये गुंतू लागलो मला ती आवडू लागली पण एक प्रियासी म्हणून मला शारीरिक आकर्षण निर्माण झाले तिचे बाजूला बसने हात पकडून चालणे मला आवडू लागले. एकदा मी ठरवले कि तिला जाऊन आपल्या मनातले सांगायचे आणि दादा घरी नसताना ती किचन मध्ये काही तरी काम करत असताना मी तिला पाठीमागून धरले तसे तिने स्वतःला माझ्यापासून सोडवून घेतले. मी तिला विचारले कि काय झाले? मी असे काहीही चुकीचे केले नाही. तिने शांत पणे मला समजावले कि हे जे सर्व आहे ते चुकीचे आहे ती माझी वाहिनी आणि माझ्या भावाची बायको आहे आणि ती मला तिच्या मुला समान समजत होती. पण माझं मन सर्व समजण्याच्या पलीकडे गेले होते. मला फक्त ती आणि तिचे शरीर दिसत होते वासनेची पट्टी माझ्या डोळ्यावर चढली होती. तिचे काही बोलणे ने मला ऐकू येत होते पण मेंदू पर्यंत शिरत नव्हते मला फक्त आणि फक्त तिचे शरीर दिसत होते. दादा घरी आल्यावर त्यांचा मध्ये थोडी वादावादी झाली जी मला रूम मध्ये पण ऐकू आली. एकदा शीतल म्हणजे वाहिनी अंघोळ करताना मी तिच्या रूम मध्ये गेलो दादा कामावर लवकर गेला होता आणि आज मी तिला काही करून आपले करून घेणार होतो. शीतल वाहिनी अंघोळ करून बाहेर आली तर समोर मी होतो तिचे ते मादक सौदर्य पाहून माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी तिला बेड वर ढकलून दिले तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयन्त करत असताना तिने मला ढकलून दिले आणि मला जोरात कानाखाली मारली. माझा राग अनावर झाला मी तिच्या डोक्यात फ्लॉवरपॉट घातला. गरम रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि आई ग !!! बोलून ती जमिनीवर कोसळली. संपूर्ण लादीवर रक्ताचे थारोळे जमा झाले होते. मी तिला उठवणायचा प्रयन्त केला पण ती नाही उठली.माझ्या डोक्यातल्या रागाची जागा आता भीतीने घेतली होती.माझ्या हातून काय घडले आहे ह्याचा अंदाज मला आला होता.हातातले ते पितळेचे फ्लॉवरपॉट माझ्याकडून जमिनीवर पडले आणि त्याचा आवाज घुमला. मी घाबरलो होतो, इकडून जर पळ काढला तर पोलीस मला पकडतील म्हणून मी एक योजना ठरवली आणि दादा ला फोन केला. मी त्याला घरी येण्यास सांगितले . दादा घरी आला तसे मी त्याला सांगितलं कि शीतल वाहिनी माझ्यावर जबरदस्ती करत होत्या त्याच्या सोबत शयनशय्या करण्यासाठी पण मी नकार दिला तसे त्या मला मारायला धावून आल्या आणि मी स्वतःच्या रक्षणासाठी त्याचावर हल्ला केला. दादाला हे खरे वाटले कारण खुप जीव होता त्याचा माझ्यावर आणि वाहिनी ने त्याला आधी पण माझ्याबद्दल सांगितले होते. तेव्हा पण दादा तिला हेच बोला होता कि माझा भाऊ असे काही करू शकत नाही. दादा ने माझ्यासाठी खुनाचा दोष स्वतःवर घेतला पण त्या नंतर घरात मला वाहिनी त्रास देऊ लागली होती. आता पण ती इकडे माझ्यासमोर उभी राहून मला रागाने पाहत आहे. तिचे केस मोकळे आहेत त्यातून रक्त येत आहे साडी आणि दोन्ही हात पूर्ण रक्ताने भरले आहेत. माझ्याकडे आता कोणता पर्याय शिल्लक नाही आहे माझी बदनामी झाली आहे माझी नोकरी पण गेली आहे आणि ह्या घरात आता मी एकटा वाहिनी सोबत नाही राहू शकत आणि ती मला जगू पण देणार नाही... मी माझे आयुष्य संपवत आहे .... मी वाहिनीच्या साडीचा फास तयार केला आहे आणि तो मी गळ्यात घातला आहे आता स्टुलला तिने जोरात धक्का दिला आणि माझे पाय हवेत..... पूर्ण शरीर झटके खात लोमकत आहे .... ती ते पाहून हसत आहे ..... दादा निर्दोष आहे आणि हे सर्व मी पत्रात लिहिले आहे ..... माझ्या गुन्ह्याची हीच खरी शिक्षा आहे......

समाप्त .......