अवकाशयात्रा - भाग 2 Ankush Shingade द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अवकाशयात्रा - भाग 2

अवकाश यात्रा भाग दोन

ते अवकाशयान. त्या अवकाशयानात अनेक व्यक्ती होते नव्हे तर ते अंतराळवीर. ज्यात जया आणि जॉनही होता. शिवाय जोलही होता. जोलला घेतलं होतं जॉननं सोबत. त्याला वाटत होतं की अवकाशयानात काही बिघाड झाल्यावर जोलची मदत घेता येईल. कारण जॉनला जोलनं अवकाशयान बनविण्यात बरीच मदत केली होती. शिवाय त्यासोबतच जयाही त्या अवकाशयानात होतीच.
आज त्या अवकाशयानानं अंतराळात झेप घेतली होती. काही वेळ ते अवकाशयान पृथ्वीच्या कक्षेत होतं. परंतु त्यानं काही वेळातच त्यानं पृथ्वीची कक्षा सोडली होती व ते बुध ग्रहाच्या कक्षेत झेपावलं होतं.
अंतराळात झेपावत असलेल्या त्या अंतराळयानात असलेल्या जॉननं अंतराळातील ग्रहांचा अभ्यास आधीच केला होता. त्यांची वैशिष्ट्येही जाणून घेतली होती. त्याच्या अभ्यासानुसार अवकाशात बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे आठ ग्रह होते. तसाच प्लुटो व काही नवीन शोध लागलेले ग्रहही होते.
बुध हा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह होता. तो पृथ्वीपेक्षा फारच लहान आणि तेथील रचना खडकाळ स्वरुपाची होती. तिथं खडक असल्यानं तो खडक सुर्याच्या उष्णतेने जास्त तापत असे. तो खडक गरम होत असे. तसाच तो ग्रह सुर्याच्या अतिशय जवळ असल्यानं तेथील तापमान जास्त उष्ण होते. शिवाय तेथील तापमान दिवसा अतिशय उष्ण आणि रात्री अतिशय थंड असायचे. तसेच तेथील तापमान दिवसा जास्त प्रमाणात असल्याने त्या ग्रहावर वातावरण नव्हते.
शुक्र हा ग्रह सुर्यानंतर दुसरा सर्वात जवळचा ग्रह होता. तो पृथ्वीच्या आकाराचा जवळपास मिळताजुळता ग्रह होता. तो अतिशय जाड आणि उष्ण वातावरण असलेला ग्रह होता. शिवाय शुक्राला पृथ्वीची “जुळी बहीण” असेही म्हणत असत.
पृथ्वी हा सुर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह होता. सध्या ज्ञात असलेल्या विश्वात जीवनाचे अस्तित्त्व असलेला एकमेव ग्रह म्हणून पृथ्वीची ओळख होती. तसेच पृथ्वीचे वातावरण पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकण्यासाठी लाभदायक स्वरुपाचे होते.
मंगळ हा सुर्यापासून चौथ्या क्रमांकाचा ग्रह होता. तो लाल रंगाचा दिसणारा खडकाळ ग्रह होता. शिवाय शास्रज्ञांनी त्यापुर्वी जेव्हा मंगळावरचा अभ्यास केला होता. तेव्हा मंगळावर पृथ्वीच्या वातावरणाचा अत्यल्प अंश आहे याचा अंदाज बांधत होते. मंगळावर पाण्याचा बर्फ असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले होते.
गुरू हा सुर्यापासून पाचव्या क्रमांकाचा आणि सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह होता. तिथं संपुर्णतः धुळीचे व वायुचे वातावरण होते. त्याला कोणी एक वायुमय राक्षस ग्रह देखील म्हणत असत. गुरूचे अनेक चंद्रही होते.
शनी हा सुर्यापासून सहाव्या क्रमांकाचा आणि दुसरा सर्वात मोठा ग्रह होता. शनीला वेढणारे खडकाच्या आणि बर्फाच्या कणांपासून बनलेले विशाल वलय होते. तसेच शनीचे अनेक चंद्र होते.
युरेनस हा सुर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह होता. त्याला कोणी वायुमय राक्षस ग्रह आहे असे देखील म्हणत असत. तसेच युरेनस हा बाजूवर झुकलेला आहे, त्यामुळे त्याचे दक्षिण आणि उत्तर ध्रुव हे सुर्याच्याभोवती फिरण्याच्या त्याच्या मार्गावर जवळजवळ बाजूने असतात. असेही मानत होते. युरेनसचे अनेक चंद्र होते.
नेपच्यून हा सुर्यापासून आठव्या क्रमांकावर असलेला आणि सर्वात दूरचा ग्रह होता. परंतु तो पृथ्वीच्याच सुर्यमालेत होता. तसेच युरेनसप्रमाणेच, नेपच्यून हा देखील एक वायुमय राक्षस ग्रह आहे असे शास्रज्ञांना आढळून आले होते. नेपच्यूनचा रंग युरेनसपेक्षा थोडा जास्त निळा होता व त्यालाही सर्वात जास्त चंद्र होते. ते एकुण अकरा होते. तसेच या ग्रहाचे चुंबकीय क्षेत्र सर्वात जास्त होते. नेपच्यून वर एक ऋतू एकेचाळीस वर्षाचा असतो असं शास्रज्ञांना आढळून आलं होतं. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहात असतात असंही आढळून आलं होतं.
प्लुटो हा नवव्या क्रमांकावर असलेला पृथ्वीच्या सुर्यमालेतील ग्रह होता. सुर्यमालेतील नववा आणि शेवटचा ग्रह म्हणून त्याची ओळख होती.

**********************************************************

सजीवांना जीवन जगण्याची आवश्यक गरज म्हणजे पाणी. पाणी हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांचा संयोग होवून पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. ते प्राणी व वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्यांच्या घन रूपाला बर्फ व वायुरूपाला वाफ म्हणतात.
पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरीत होत असते. तसेच बर्फाला उष्णता दिली की त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले की त्याचा बर्फ बनतो. तसंच अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात. म्हणूनच पाण्याला वैश्विक द्रावक असेही म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येवून तरंगत असतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठा केंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते.
आपल्या शरीरात साठ ते सत्तर प्रतिशत पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे आवश्यक असते, म्हणूनच पाण्याला जीवन असेही म्हणतात. पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे अती आवश्यक आहे.
पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळतो. मासे पाण्यातील ऑक्सिजन घेवून जीवंत राहतात. पाण्याच्या एका विशिष्ट गुणधर्मामुळे सृष्टीमध्ये पाण्याचे स्थान अद्वितीय आहे. पाण्याचे तापमान कमी केले असता शुन्य अंश सेल्सियस तापमानाला ते घनरूप घेऊ लागते. तापमान अजून कमी केल्यास चार अंश सेल्सियस तापमानापर्यंत ते आकुंचन पावते. परंतु त्यापेक्षा कमी तापमान झाल्यास पाणी प्रसरण पावू लागते आणि त्याची घनता कमी होते आणि त्याबरोबरच परिणामी चार अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान असलेल्या पाण्यावर तरंगू लागते. याला पाण्याची अपवादात्मक प्रसरणशिलता म्हणतात. यामुळे बर्फाळ प्रदेशातील जलचर बर्फाखालील पाण्यात जगत असतात. अणू बॉंब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार मानला जातो. पाणी ही माणसाची मुलभूत गरज आहे.
पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१% इतके असूनही ते पिण्यासारखे नाही. समुद्रात पाणी सुमारे ९६.५% आहे. अंटार्टिक हिमखंड, ज्यात पृथ्वीवरील सर्व ताज्या पाण्यापैकी ६१% भाग आहे, परंतु नियमित वापरासाठी ते मिळवणे शक्य नाही. पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे. त्यामुळे पाण्याचा वापर गरजे इतकाच करावा. पाण्याची नासाडी करू नये. परंतु अशी सुचना वारंवार देवूनही काही लोकं पाण्याची सतत नासाडी करीत असतात. पाणी हे जीवन असलं तरी ते पाण्याला जीवन मानत नाहीत. शिवाय पाणी देणारा जो घटक आहे. त्या ऑक्सिजन नावाच्या घटकाचीही नासाडी करीत असतात. जंगले कापत असतात. जी जंगलं हवेत जास्तीत जास्त ऑक्सिजन प्रवाहीत करतात. मानवाला पृथ्वीवर उपलब्ध पाणी पुढील स्रोतांमधून मिळते.
विहीर किंवा कुपनलिकेतून मिळणारे पाणी. आपल्या पृथ्वीवर अनेक देश कृषीप्रधान देश आहेत. येथील शेतकरी मुख्यत: सिंचनासाठी भूजलवर अवलंबून आहेत. वाढती लोकसंख्या, कमी जमीन धारण आणि शहरीकरण यासह भूगर्भातील गोष्टीसाठी खोल बोरवेल खोदले जातात. बोअरवेल म्हणजे उभ्या छिद्रीत विहिरी म्हणता येतील. कूपननलिका खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केसिंगच्या प्रकारात, जिथे ड्रिल केले जाते, तेथील आच्छादनाची खोली आणि मातीच्या प्रकारात दोन फरक आहेत. कोसळण्याविरूद्ध बोरवेलच्या बाह्य पृष्ठभागास आधार देण्यासाठी केसिंगची आवश्यकता काही विशिष्ट खोलींमध्ये आवश्यक असू शकते आणि केसिंग सहसा पीव्हीसी पाईप्सपासून बनलेली असते. सरकार आता सौर पंपसाठी सबसिडी देत ​​असतानाही, सामान्यत: बोरवेलमध्ये पाणी सोडण्यासाठी विद्युत पंपांचा वापर केला जातो. पंपांची ही सुविधा वाढीच्या वेगाने भूजल कमी होण्याची शक्यता आहे. बोरवेलचे जास्त प्रमाणात ड्रिलिंग केल्याने पाण्याचे रिचार्ज करण्याच्या दरापेक्षा जास्त दराने भूजल शोषणाला कारणीभूत ठरते आणि भूजल पातळी खालावते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशांनी भूजल वापरावर नियंत्रण ठेवण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे कायदे आणि वैधानिक अधिकार आणले आहेत. काही राज्यांत भूजल विषयक कायद्यांची अंमलबजावणी झाली आहे, जे पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात सरकारी संस्थांच्या परवानगीशिवाय बोरवेलचे ड्रिलिंग रोखतात. तरीही काही राज्ये परवानगी घेण्याशिवाय केवळ पिण्याच्या पाण्याच्या बोरवेलची ड्रिलिंग करण्यास परवानगी देतात.
तलावातून उपलब्ध होणारे पाणी. सरोवर पाण्याचे एक मोठे साठे. ते तलावापेक्षा मोठे आणि सखोल असते. एक तलाव समुद्रापासून विभक्त होत असल्याने तो समुद्र नसतो. काही तलाव खूप मोठे आहेत आणि पूर्वी लोक त्यांना कधीकधी समुद्र म्हणत. तलाव नद्यांप्रमाणे वाहत नाहीत, परंतु बऱ्याच नद्या त्यामधून वाहतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बहुतेक तलाव गोड्या पाण्याचे असून बहुतेक उत्तर गोलार्धात आहेत. जगातील साठ प्रतिशत पेक्षा जास्त तलाव कॅनडामध्ये आहेत. फिनलॅंडला हजारो
तलावांचा भूभाग म्हणून ओळखले जाते.
बऱ्याच तलावांमध्ये वीजनिर्मिती, करमणुकीसाठी, सिंचनासाठी, उद्योगासाठी किंवा घरांमध्ये पाणी वापरण्यासाठी तयार केलेली मानवनिर्मित जलाशये आहेत.
जर सरोवरातून नद्या वाहत्या नसल्या किंवा त्या काही कमी वाहत्या असल्या, तर फक्त बाष्पीभवनाने तलावाने पाणी गमावले आहे किंवा पाणी मातीच्या छिद्रांमधून वाहते. जेथे पाण्याचं जलद बाष्पीभवन होते आणि तलावाच्या सभोवतालच्या मातीमध्ये मीठाची पातळी जास्त असते, अगदी कोरड्या ठिकाणी, तलावाच्या पाण्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात असते, त्या तलावाला मीठ तलाव म्हणतात. ग्रेट मीठ तलाव, कॅस्पियन समुद्र, अरल समुद्र आणि मृत समुद्र अशी मीठ तलावाची उदाहरणे आहेत.
नदीसुद्धा पाण्याचा एक स्रोतच आहे. नदी हा पाण्याचा प्रवाह आहे की जो भूमीच्या पृष्ठभागावरील वाहिनीमधून वाहतो. ज्या नदीत नदी वाहते, त्या नदीला नदी बेड असे म्हणतात आणि प्रत्येक बाजूच्या पृथ्वीवरील जमीनीला नदीकाठ म्हणतात. एक नदी उंच जमिनीवरुन किंवा टेकड्यांमधून किंवा डोंगरावरुन सुरू होते आणि गुरुत्वाकर्षणामुळे उंच भूमीपासून खालच्या मैदानात वाहते. एक लहान प्रवाह म्हणून नदी सुरू होते आणि ती वाहते. त्यास अनेक प्रवाह मिळतात आणि ती आणखी मोठी होते.
पाऊस हा सुद्धा पाण्याचा एक स्रोत आहे. आपल्याला पावसाद्वारेही पाणी सहज उपलब्ध होवू शकते.
शेवटी असे म्हणावे लागेल की पाणी हे जीवन आहे.
पाणी हे आपले जीवन आहे. पृथ्वीची निर्मितीच मुळात पाण्यापासून झाली आहे. आजकाल पाण्याचा खूप अपव्यय होताना आपल्याला दिसून येत आहे. सरकार रेडिओ, दूरदर्शन मार्फत पाण्याच्या काटकसरी बाबत जनजागृती करीत असले तरी लोक ऐकून बघून सोडून देतात किंवा फार थोडे लोक असतात की जे पाण्याची बचत करताना दिसतात. आपण पुढच्या पिढीचा विचार करायला पहिजे त्यांच्यासाठी आपण आत्ता पाण्याची बचत केली तर पुढे होणारे दुष्परिणाम टाळले जातील. परंतु लोकं पाण्याचे महत्व विसरले आहेत वा विसरत चालले आहेत. असे चित्र आज दिसत आहे. सगळ्यात जास्त महत्त्वाचे पाण्याचे महत्त्व म्हणजे, सजीव प्राण्याच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे.
पाण्याचा पृथ्वीवरील साठा संपत चालला होता. सरकार सांगत होते लोकांना की पाणी वाचवा. परंतु लोकं काही पाणी वाचवत नव्हते. शिवाय ज्या ऑक्सिजनमुळं पाणी वाढत असते. तो ऑक्सिजनच जंगलतोड करुन नष्ट करीत होते. मात्र लोकसंख्या वाढत चालली होती आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होत चालला होता. शिवाय ऑक्सिजन कमी झाल्यानं ओझोन वायुच्या थरालाही छिद्र पडले होते व त्या छिद्रातून सुर्याची अतिनील किरणं थेट पृथ्वीवर येत होती. त्यातच तापमान वाढले होते. जलस्तर सुकत चालला होता. त्याची चिंता जॉनला पडली होती. जॉनला वाटत होतं की पृथ्वीसारखंच इतरही ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते. तिथंच आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टी नेता येवू शकेल. पाण्याचा आणि लोकांच्या अधिवासाचा प्रश्न सोडवता येवू शकेल. म्हणूनच जॉननं तो प्रश्न सरकारपुढं ठेवला व सरकारला विनंती केली की त्याला अवकाश यात्रा करण्यासाठी जावू द्यावे. तशी परवानगी सरकारनं द्यावी. जेणेकरुन पृथ्वीवरील तापमानाचा, लोकांच्या अधिवासाचा व पाण्याचा प्रश्न सोडवता येईल. तो अशा ग्रहांवर पाणी शोधून आणण्यासाठी जाईल की ज्याचा आपल्या पृथ्वीवासीयांना फायदाच होईल.
सरकारनं परवानगी देताच जॉननं जोलच्या मदतीनं एक अवकाशयान बनवलं व त्यानं पृथ्वीवरुन उडाण केलं. त्यानंतर सर्वात शेवटी त्यानं प्लुटो व नेपच्यूनच्या दिशेनं उड्डाण केलं व त्या प्रवासादरम्यान त्याला आढळून आलं की त्यानं जसं ऐकलं होतं. तसे ते ग्रह त्या ऐकण्यासारखे नव्हते तर ते ग्रह त्यापेक्षाही वेगळेच होते.
जॉन बुध या ग्रहाजवळ पोहोचला होता. त्यापुर्वी बुध ग्रह हा सुर्यानंतरचा पहिला ग्रह होता. तो आकाराने पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा होता. त्याचा व्यास ४८७८ कि. मी. होता. सुर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे त्यास आंतर ग्रह देखील म्हणत. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळीच दिसत असे. याचा अर्थ तो नेहमीच दिसतो असे नव्हते. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसत असे. तो देखील सुर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सुर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन होत नसे.
पृथ्वीवरील लोकांना वाटत असे की या ग्रहावर वातावरण आहे. परंतु जॉन जेव्हा या ग्रहावर पोहोचला. तेव्हा त्यास आढळून आलं की तिथं वातावरण नसल्याने उल्कावर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसत होता. शिवाय तिथं पाऊस पडत असे रोजच. परंतु तो पाऊस ॲसीडचा असायचा. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवत होता. तसंच त्याला आढळून आलं होतं की हा ग्रह साधारणतः एकोणसाठ दिवसामध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास अठ्यांशी दिवस लागतात. सुर्यापासून अत्यंत जवळ म्हणजे फक्त ५७, ९०९१७५ कि. मी. ( ०.३८७०९८९३ ए यु.) अंतरावर असल्याने या ग्रहाचे सुर्याच्या बाजूकडील असलेल्या भागाचे तापमान ४२० अंश सेल्सिअस एवढे प्रचंड असते तर याउलट सुर्याच्या त्याच्या विरुद्ध बाजूकडील तापमान अत्यंत थंड म्हणजेच २०० अंश सेल्सिअस असते. या दोन्ही तापमानात कोणताही सजीव जीवंत राहू शकत नाही. बुधचा सुर्याभोवतीचा भ्रमणाचा मार्ग हा दीर्घ वर्तुळाकृती आहे. तसेच सुर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भ्रमणावर मोठा परिणाम होतो. बुधाच्या सुर्यप्रदक्षिणा भ्रमणमार्गामध्ये नेहमीच थोडा थोडा बदल होत असतो. म्हणजेच एकदा एका भ्रमणमार्गावरून फिरल्यावर बुध ग्रह त्या मार्गास सोडून दुसर्‍या मार्गावरून भ्रमण करतो. काही वेळेस बुधाचे सुर्यावरील अधिक्रमण पाहावयास मिळते. अधिक्रमण म्हणजे सुर्य व पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत ज्यावेळेस बुध ग्रह येतो. त्यावेळेस बुध ग्रहाचा छोटासा ठिपका सुर्य बिंबावरून पुढे सरकताना दिसतो. त्यामुळंच एका शतकामध्ये बुधाची तेरा अधिक्रमणे पाहावयास मिळतात. म्हणूनच हे अधिक्रमण अतिशय दुर्मिळ समजले जाते.
बुधाचे निरीक्षण झाल्यानंतर जॉन हा सूर्यमालेतील शुक्र या ग्रहाकडे पोहोचला होता. तो जाण्यापुर्वी लोकांना माहीती होती की शुक्र हा बुधग्रहानंतरचा दुसरा ग्रह. ह्याचा आकार जवळपास पृथ्वी एवढा आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. आहे. या ग्रहास देखील आंतर ग्रह म्हणत. कारण हा ग्रह देखील सुर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये आहे. याच मुळे हा ग्रह देखील आपणास फक्त सकाळी किंवा संध्याकाळी दिसतो.
जॉन जेव्हा या ग्रहावर पोहोचला. तेव्हा त्याला आढळून आले की या ग्रहावरील वातावरण अतिशय दाट असल्याने सुर्याचा त्यावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणावर परावर्तीत होतो. त्यामुळे शुक्र अन्य ग्रहापेक्षा फारच तेजस्वी दिसतो. शुक्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काल आणि सुर्याभोवती फिरण्याचा काळ यामध्ये मोठे वैशिष्ट्य जाणवते. शुक्राला स्वतःभोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सुर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. म्हणजेच शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. शुक्राचे सुर्यापासूनचे अंतर १०८, २०८, ९३० कि. मी. ( ०.७२३३३१९९ ए यु.) आहे. शुक्राच्या स्वतःभोवती फिरण्याच्या दिशेमध्ये कमालीचे वैशिष्ट्य आहे. सुर्यमालेतील इतर सर्व ग्रह पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह विरुद्ध म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. याचा परिणाम असा शुक्रावर सुर्य पूर्वेऐवजी पश्चिमेकडे उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो. सुर्याभोवती फिरताना त्याच्या सुर्याकडील बाजूचे तापमान सरासरी ७३० अंश असते. शुक्र ग्रहाला बुध आंतरग्रह आहे. शुक्रावरून बुध फक्त सकाळी आणि सायंकाळी दिसू शकतो. शुक्राला देखील एकही चंद्र नाही.
जॉन चंद्रावर जाण्यापुर्वी चंद्रावर पाणी आहे असं शास्रज्ञ मानायचे. तसं पाहिल्यास तिथं बरेच जणही गेले होते. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून साधारण तीन लाख कि. मी. अंतरावर आहे.
चंद्राचाच अर्थ आहे उपग्रह. पृथ्वीप्रमाणे सुर्यमालेतील सुरुवातीचा बुध आणि शुक्र सोडला तर इतर सर्व ग्रहांना आपापले चंद्र आहेत. इतर ग्रहांना देखील चंद्र असल्याचे प्रथम गॅलिलिओला कळले. जेव्हा त्याला त्याच्या दुर्बिणीमधून गुरुचे चार चंद्र दिसले. नंतरच्या काळामध्ये दुर्बिणीमध्ये झालेल्या अद्ययावत बदलामुळे मंगळ ग्रहापासून प्लुटो ग्रहापर्यंत सर्व ग्रहांना चंद्र असल्याचे आढळून आले.
जॉन जेव्हा चंद्राजवळ पोहोचला. तेव्हा त्याला आढळून आलं की प्रत्येक उपग्रह हा त्याच्या मुख्य ग्रहाच्या आकारापेक्षा लहान असतो व त्याच्या भोवती फिरत असतो. यालाच त्या ग्रहाचे परिभ्रमण असे म्हणतात. परिभ्रमणाचा काळ तो उपग्रह किती अंतरावर आहे यावर अवलंबून असते. उपग्रह जेवढा दूर तेवढाच त्याला मुख्य ग्रहाभोवती लागणारा परिभ्रमणाचा काळ जास्त व उपग्रह जेवढा जवळ तेवढाच त्याचा परिभ्रमणाचा काळ देखील कमी असतो.
प्रत्येक ग्रहाच्या चंद्राची निर्मिती निरनिराळ्या कारणांनी झालेली असू शकते. चंद्र निर्मितीच्या तीन शक्यता आतापर्यंत शोधण्यात आल्या आहेत. मुख्य ग्रहाच्या निर्मितीवेळेस त्यापासून उपग्रहाची निर्मिती, लघुग्रहांच्या किंवा क्युपरबेल्टच्या पट्ट्यातून गुरुत्वाकर्षणाने एखादा मोठा खडक खेचला जाऊन उपग्रहाची निर्मिती व रोश मर्यादा ओलांडल्याने एखाद्या ग्रहाचे तुकडे होवून उपग्रहाची निर्मिती. उदा. शनीचे काही चंद्र. जॉनला सुर्यमालेतील फक्त मंगळ ग्रहाचेच चंद्र आकाराने अपवाद वाटत होते. कारण त्यांचा आकार इतर ग्रहांच्या चंद्राप्रमाणे गोलाकार नव्हता. मंगळाचे दोन्ही चंद्र ( फोबॉस आणि डिमॉस ) ओबडधोबड होते. त्यांना कुठलाच विशिष्ट आकार नव्हता. तसेच त्यांचे मंगळापासूनचे अंतर देखील नियमबद्ध नव्हते. यावरून असा अंदाज निघत होता की हे चंद्र सुरवातीपासून मंगळाचे उपग्रह नसून मंगळ आणि गुरू यांच्या मध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यातून गुरुत्वाकर्षणाने खेचले गेले असावेत.
उपग्रह म्हणजे एखाद्या ग्रहाभोवती फिरणारा आकाराने छोटा ग्रह, म्हणजेच त्या मुख्य ग्रहाचा चंद्र. उपग्रहाचे दोन भाग पडतात. नैसर्गिक आणि कृत्रिम.
नैसर्गिक उपग्रह आधीपासूनच निसर्ग नियमित नियमांप्रमाणे एखाद्या ग्रहाभोवती फिरत असतात. त्यांच्या ग्रहापासूनच्या अंतरानुसार त्यांचा परिभ्रमण काळ नियमित असतो. सध्याच्या अत्याधुनिक जगामध्ये मानवाने सुर्यमालेचा अभ्यास अधिक सोयीस्कर व्हावा म्हणून अवकाशात कृत्रिम यानं पाठविली आहेत. ही कृत्रिम यानं इतर ग्रहांच्या भोवती ठराविक अंतरावरून फिरून त्या ग्रहाची सविस्तर माहिती व चित्रे पृथ्वीवर पाठवितात. यांनाच कृत्रिम उपग्रह म्हणतात.
जॉननं निरीक्षण केलं होतं. त्यानुसार माहीत पडलं होतं की बुध ग्रहास एकही चंद्र नाही. याचं कारण बहुदा सुर्यापासून त्याचे कमी अंतर असावे. काहीवेळेस पृथ्वीवरून बुधाच्या कलादेखील पाहावयास मिळत असत.
जॉन मंगळ ग्रहावर गेला होता. परंतु तो जाण्यापुर्वी लोकांना माहीत होते की मंगळ हा सुर्यापासून चौथा ग्रह म्हणजे त्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या निम्म्याहून थोडा जास्त म्हणजेच ६७९५ कि. मी. होता. पृथ्वीच्या मानाने हा पहिला बहीर्ग्रह असल्याने हा ग्रह संपुर्ण रात्रभर देखील दिसत असे. सुर्यापासून याचे अंतर साधारणतः २२७,९३६,६४० कि. मी. ( १.५२३६६२३१ ए यु.) आहे. मंगळाचा देखील आस सुर्यभ्रमण कक्षेशी २५ व १९ अंशांनी कललेला असल्याने मंगळावर देखील पृथ्वीप्रमाणे उन्हाळा व हिवाळा असे ऋतू अनुभावयास येतात. मंगळाचे सुर्यापासूनचे अंतर हे पृथ्वीच्या सुर्यापासूनच्या अंतराच्या सुमारे दीडपट आहे. या ग्रहास स्वतःभोवती फिरण्यासाठी चोवीस तास छत्तीस मिनिटे लागतात. तर सूर्याभोवती फिरण्यास सहाशे सत्याऐंशी दिवस लागतात.
जॉननं पाहिलं की हा ग्रह रंगाने लालसर तांबडा दिसतो. तसेच त्याला मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले. ज्यामधील काही ज्वालामुखी अजूनही कार्यरत होते. निरीक्षणाद्वारे मंगळावर कालव्यांच्या खुणा आढळल्या. ज्यावरून असा अंदाज लावला जात होता की पुर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे व या ग्रहावर देखील पृथ्वीप्रमाणे सजीव सृष्टीही असावी. मंगळावरील ध्रृवीय भागात मोठ्या प्रमाणात गोठलेल्या अवस्थेत बर्फ आढळले होते. तसेच मंगळाच्या सुर्याच्या बाजूने असलेल्या भागाचे तापमान वीस अंश तर सुर्याच्या विरुद्ध भागाचे तापमान एकशे ऐंशी अंश असते. शिवाय मंगळाला दोन चंद्र आहेत. जवळच्या चंद्राचे नाव फोबॉस व दूरच्या चंद्राचे नाव डिमॉस आहे. सुर्य मालेतील सर्व ग्रह व त्यांचे चंद्र गोलाकार आकाराचे आहेत, तर फक्त मंगळाचे चंद्र त्यांना अपवाद आहेत. दोन्ही चंद्रांना पद्धतशीर गोलाकार आकार नाही. ते वेडे वाकडे आहेत व त्याचा आकार देखील फार लहान आहे. फोबॉस मंगळापासून साधारणतः ५८८० मैलावर आहे व एक दिवसात तो मंगळास प्रदक्षिणा घालतो. तर डिमॉस मंगळापासून साधारणातः १४, ६०० मैलावर आहे व मंगळाभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास त्यास ३० तास ९८ मिनिटे लागतात.
जॉन गुरु ग्रहावरही गेला होता. त्याला वाटत होतं की सुर्यमालेतील पाचवा ग्रह गुरू, गुरू म्हणजे एक श्रेष्ठ स्थान. नावाप्रमाणेच सर्व ग्रहांचा गुरू, गुरू आहे. कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. हा ग्रह सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचा व्यास साधारणतः १४२९८५ कि. मी. आहे. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगायचे तर आपल्या पृथ्वी सारख्या अकरा पृथ्वी या ग्रहाच्या व्यासावर ओळीने सहज बसू शकतील. त्याचे सुर्यापासूनचे अंतर ७७८४१२०१० कि. मी. ( ५.२०३३६३०१ ए यु) आहे.
जॉनला त्या ग्रहाजवळ गेल्यावर आढळून आलं की, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे ग्रह घनरूप पदार्थांनी बनलेले आहेत. याउलट गुरुचा अंतर्भाग हा द्रवरूप लोखंडाचा आहे व या द्रवरूप चेंडूच्या बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आहेत. ह्या ढगांमुळेच गुरुवर आडवे पट्टे दिसतात. ह्या ग्रहाचा पृष्ठभाग वायुरुप असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वादळ होत असतात. ह्याच वादळांमुळे या ग्रहांवर एक मोठा भोवरा निर्माण झाला आहे. ज्याचा आकार पृथ्वीच्या तिप्पट आहे. ज्यास रक्तरंजीत लाल ठिपका असे देखील म्हणतात. प्रचंड आकारामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण देखील प्रचंड आहे. इतकेच नाही तर त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग देखील प्रचंड आहे. स्वतःभोवती फेरा मारण्यास त्यास नऊ तास पन्नास मिनिटे लागतात. सुर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्यास बारा वर्ष लागतात. याचाच अर्थ गुरू दरवर्षी एका राशीमध्ये वास्तव्य करतो. पृथ्वीप्रमाणेच गुरू देखील एक मोठा चुंबक आहे. याचे उदाहरण म्हणजे १६ जुलै १९९४ रोजी शुमेकर लेव्ही-९ हा धूमकेतू या ग्रहावर आदळला. या टकरीत या धुमकेतूचे अनेक तुकडे होवून ते दूरवर पसरले. ही प्रक्रिया २२ जुलै१९४४ पर्यंत चालू होती. तो धूमकेतू गुरू ऐवजी पृथ्वीवर आदळला असता तर काही क्षणातच पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट झाली असती. इतकी तीव्रता या धूमकेतूमध्ये होती. परंतु ते तेथील गुरुत्वाकर्षणानं शक्य झालं. दुर्बिणीने पाहिल्यास त्याचे चार चंद्र फार सुंदर दिसत असतात. सर्व प्रथम गॅलिलिओने या चंद्रांना पाहिल्याने यास गॅलिलिओचे चंद्र देखील म्हणतात. त्यांची नावे गॅलिलिओनेच ठेवलेली होती. इयो, युरोपा, गॅनिमेड व कॅलिस्टो. यामधील गॅनिमेड हा तर बुध ग्रहापेक्षा देखील मोठा होता. आतापर्यंत गुरू ग्रहाचे चाळीस चंद्र शोधण्यात आले आहेत. तसेच शक्तिशाली दुर्बिणीने पाहिल्यास या ग्रहा भोवती कडा देखील आढळून आली आहे.
सुर्यमालेतील सहावा ग्रह व गुरू नंतरचा सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी. ह्याचा आकार देखील प्रचंड आहे. याचा व्यास साधारणतः १,२०,५३७ कि. मी. इतका आहे. परंतु प्रचंड आकारमानापेक्षा तो जास्त प्रसिद्ध आहे, त्याच्या भोवती असलेल्या कड्यामूळे. गुरू ग्रहाप्रमाणेच हा ग्रह देखील वायूने बनलेला आहे. स्वतःभोवती प्रदक्षिणा पुर्ण करण्यास या ग्रहास साधारणतः दहा तास लागतात व सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास एकोणतीस वर्ष लागतात. सुर्यापासून हा ग्रह जवळपास १,४२६,७२५, कि. मी. ( ९.५३७०७०३१ ए यु.) अंतरावर आहे.
जॉन जेव्हा शनी या ग्रहाच्या जवळ पोहोचला. तेव्हा त्यानं त्याच्या कड्यांचे देखील निरीक्षण केले. जे निरीक्षण काही वर्षापुर्वी सर्वप्रथम गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीतून केले होते. तो ग्रह जॉनला प्रचंड आकाराचा असून देखील याची घनता पाण्याहून कमी आहे असा आढळून आला. जर एका मोठ्या समुद्रामध्ये शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू लागेल. असंही त्याला त्या ग्रहाचं निरीक्षण करतांना आढळून आलं होतं. शिवाय लहान मोठ्या असंख्य खडकांपासून शनी ग्रहाची कडी निर्माण झाली आहे असंही आढळून आलं. ही कडी कधी एके काळी शनीच्याच एखाद्या चंद्राचा स्फोट होवून त्यापासून ही कडी निर्माण झाली असावी असा अंदाज जॉन व्यक्त करीत होता. वस्तुतः या कड्यांची संख्या असंख्य असली तरी प्रामुख्याने या कड्यांची सात निरनिराळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली होती. हा ग्रह अतिशय कमी तापमान असल्यामुळे या कड्यांतील सर्व तुकडे बर्फाच्छादित होते. या कड्यांची जाडी जवळपास दहा ते पंधरा कि. मी. होती. शनी ग्रह त्याच्या अक्षाशी साधारण अठ्ठावीस अंशांनी कललेला असल्यामुळेच पृथ्वीवरून त्याची कडी व्यवस्थीत दिसत होती. अन्यवेळी पृथ्वी शनीच्या विषुववृत्त पातळीत येते, तेव्हा त्याची कडा जवळजवळ अदृश्य होत असे व त्याजागी शनीला छेदणारी एक बारीक रेषा आपणास दिसत असे. शनीला एकूण तीस उपग्रह होते. त्यामधील टायटन नावाचा उपग्रह आकाराने बुध ग्रहा एवढाच होता. शनी हा देखील एक मोठा चुंबक असल्याचे आढळून आले होते. तसाच तोही गुरू ग्रहाएवढाच शक्तिशाली आहे असंही आढळून आलं होतं.
जॉन जेव्हा युरेनस जवळ पोहोचला. तेव्हा तो युरेनसच आहे याबाबत त्याच्या मनात संभ्रम निर्माण झालेला होता. कारण बुध पासून शनी पर्यंत सर्व ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत होते. तर शनी नंतरचे इतर ग्रह पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता भासत असे. या ग्रहाचा शोध अठरा मार्च १७८१ रोजी विल्यम हर्षल याने लावला. वास्तवीक शंभर वर्ष त्याआधी हा ग्रह काही शास्त्रज्ञांनी पाहिला होता. परंतु त्याची नोंद एक तारा अशी केली गेली होती. परंतु जेव्हा जॉन तिथं पोहोचला. तेव्हा तो अतिशय शांत स्वरुपाचा असलेला आढळला. यावरुन तो ग्रहच असावा हे सिद्ध झालं. या ग्रहाचे सुर्यापासूनचे अंतर साधारणतः २८७०, ९७२, २०० कि. मी. ( १९.१९१२६३९३ एक यु.) होते. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहास सोळा तास लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास ८४ वर्षे लागतात असं आढळून आलं. युरेनसची सुर्यप्रदक्षिणा पश्चिमेकडून पूर्वेकडे असली तरी त्याचे स्वतःभोवती फिरणे मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे असंही आढळून आलं. याचा व्यास साधारणतः ५१, ११९ कि. मी. होता. युरेनसचा आस अठ्यान्नव अंशांनी कललेला असल्यामुळे तो घरंगळत चालल्या सारखा दिसत असे. त्यामुळे कधी त्याच्या धृव भागाचे तर कधी विषुववृत्तीय भागांचे दर्शन घडत असे.
जॉनला या ग्रहाभोवती देखील शनी ग्रहाप्रमाणे कडे आढळून आले. ही कडा युरेनसच्या केंद्रभागापासून ५०,००० कि. मी. अंतरावर दिसली. जी ही कडा दुर्बिणीतून दिसत नव्हती. या ग्रहास एकूण पंधरा चंद्र होते. ज्यामध्ये पाच मोठे चंद्र आणि दहा लहान चंद्र आढळून आले. युरेनस आपल्या कक्षेवरून एका सेकंदाला एक मैल सरकतो. युरेनस भोवती देखील चुंबकीय क्षेत्र असल्याचे आढळून आले.
सुर्यमालेतील नेप्च्यून हा आठवा ग्रह. या ग्रहाचा शोध चार ऑगस्ट १९६४ रोजी लागला. हा ग्रह देखील दुर्बिणीनेच पाहता येत असे.
जॉन जेव्हा नेपच्यूनवर पोहोचला. तेव्हा नेप्च्यून हा ग्रह युरेनसच्या ही पुढे एक अब्ज मैल अंतरावर आहे असा आढळून आला. या ग्रहाचे सुर्यापासूनचे अंतर साधारणतः ४४९८,२५२, ९०० कि. मी. ( ३०.०६८९६३४८ एक यु.) होते. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः एकोणवीस दिवस लागत. तर सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास १६५ वर्षे लागतात. याचा व्यास साधारणतः ४९६२८ कि. मी. आहे. जॉनला या ग्रहाभोवती देखील कडे आढळून आले. परंतु इतर ग्रहांच्या कड्याप्रमाणे ते गोलाकृती नसून त्याच्या एका ठिकाणी रिकामी जागा आढळून आली. ज्यामुळे ते कडे घोड्याच्या नालेसारखे वाटले. ही कडा दुर्बिणीतून दिसत नव्हती. जॉनला नेप्च्यूनचे आकारमान सुमारे युरेनसच्या आकारमानाइतकेच आढळून आले. सुर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथेही कमालीची थंडी आढळून आली. तेथील वातावरण मिथेन या विषारी वायूचे बनलेले आढळून आले.
शोध होता की युरेनस आणि नेप्च्यूनचा शोध लागल्यानंतर त्यांची भ्रमण कक्षा ठरविण्यात आली होती. गणित शास्त्राप्रमाणे हे दोन्ही ग्रह आपापल्या मार्गावरून जाणे आवश्यक होते. परंतु ते कक्षेच्या थोडे अलीकडे पलीकडे दिसू लागले होते. तेव्हा या ग्रहांना आकर्षीत करणारा एखादा ग्रह कुठेतरी असावा असे शास्त्रज्ञाना वाटले व त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आणि प्रयत्नांना गणिताची जोड मिळाल्याने अखेर १८ फेब्रुवारी १९३० साली प्लुटो या ग्रहाचा शोध लागला. दुर्बिणीनेच हा ग्रह पाहता आला. शास्रज्ञांनी या ग्रहाचे सुर्यापासूनचे अंतर साधारणतः ५, ९०६, ३७६, २०० कि. मी. ( ३९.४८१६८६७७ एक यु.) ठरवले होते. त्याला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहास साधारणतः पाच ते सहा दिवस लागत असत. तर सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास २४८ वर्षे लागत असत. जॉननं प्रत्यक्ष जावून सॅटेलाईट द्वारे त्याची कक्षा मोजली. तेव्हा हा ग्रह शास्त्रज्ञानी केलेल्या आकारमानापेक्षा फारच लहान निघाला होता. प्लुटोचे आकारमान पृथ्वीच्या आकारमानापेक्षा कमी आढळले होते व त्याचा व्यास साधारणतः २३६० कि. मी. आढळला होता. सुर्याभोवती तो दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतांना दिसला. तसेच आपल्या कक्षेमध्ये फिरत असताना कधीकधी तो नेप्च्यूनच्या कक्षेपेक्षासुद्धा सुर्याच्या जवळ येत असतांना दिसला. प्लुटोला एक चंद्र होता. तो बाकीच्या ग्रहांच्या चंद्राइतका मोठा नव्हता. परंतु तो इतर ग्रह व त्यांचे उपग्रह यांच्या परस्परासापेक्ष उपग्रहांच्या तुलनेत बराच मोठा होता. त्याचा प्लुटो भोवती फिरण्याचा काल हा प्लुटोच्या परिवलन कालाएवढाच होता. त्यामुळे तो जोड ग्रह असल्याप्रमाणे एकमेकांभोवती फिरत फिरत सुर्याभोवती फिरतांना दिसला.
त्यानंतर प्लुटोवर फिरल्यावर जॉनला आणखी दोन ग्रह आढळले. त्याला सेरेस नाव दिलं होतं. परंतु त्यांच्या परीभ्रमणाची दिशा वेगळीच आढळली. तीच दिशा प्लुटोचीही वाटत होती.
दुसरा एक ग्रह आढळला होता जॉनला. त्या ग्रहाचं नाव त्याला माहीत नव्हतं. परंतु नक्कीच तिथं जीवसृष्टी वसविण्याचे शुभ संकेत होते. ते दोन्ही ग्रह अतिशय थंड होते व पृथ्वीसारखंच तिथं वातावरणही जॉनला आढळून आलं होतं. परंतु ते ग्रह पृथ्वीपासून बरेच लांब होते. शिवाय ते पृथ्वीच्या आकाशगंगेत नव्हते तर ते दुसऱ्याच वेगळ्या आकाशगंगेत असून त्यांचाही एक वेगळाच सुर्य आहे. असं जॉनला वाटत होतं. त्यावरुन त्यानं अंदाज बांधला होता की आपल्याला दिसते ते अवकाश म्हणजेच एक पोकळी आहे. जी आपल्याला दिसते, ती आपली आकाशगंगा आहे व जी दिसत नाही. ती दुसऱ्यांची आकाशगंगा आहे. अशा कितीतरी आकाशगंगा या अवकाश रुपी पोकळीत आहेत की ज्यांचे कित्येक सुर्य आहेत व कित्येक त्या सुर्याचे ग्रह की ज्या ग्रहावर आपल्याच आकाशगंगेसारखं काही ग्रहांवर गुरुंसारखं वायुरुप वातावरण आहे. तसंच ॲसीडचं वातावरण. जसं गुरु ग्रहावर असलेलं वायुरुप व उष्ण वातावरण, चंद्रावर असलेलं खडकासारखं वातावरण तर मंगळावर असलेली फक्त लाल माती की ज्यात पाण्याचा एवढासाही अंश नाही. तसाच दुरुन दिसणारा बुध व शुक्रासारखा निळसर ग्रह. ज्यात त्यांचा निळसर भाग म्हणजे पाणीच वाटतं. परंतु ते पाणी नाही तर ते ॲसिड आहे व त्या ग्रहांवर सतत ॲसिडचाच पाऊस पडत असतो. जॉनला वाटत होतं, त्या पृथ्वीतलावरील जीवसृष्टी वसविण्याचा विचार करतांना की एखादा ग्रह सापडेलही पृथ्वीतलावरील जीवसृष्टी वसविण्यासाठी. परंतु ती पृथ्वीतलावरील माणसं इथं आणायची कशी? तोही एक प्रश्न त्याच्यासाठी विचार करण्यालायक होता. त्यावर तो विचार करु लागला होता. शेवटी विचार करुन तो थकला. त्याला त्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही. शेवटी तो ते यान घेवून परत फिरला.
ती अवकाश यात्रा. त्या अवकाश यात्रेला करोडो रुपये खर्च आला होता. वेळही वाया गेला होता. कारण जीवसृष्टी वसविण्यासाठी उचललेलं ते पाऊल होतं. परंतु जीवसृष्टी वसविण्यासाठी काहीही सुगावे न मिळाल्यानं ती अवकाशयात्रा जरी घडली असली तरी ती मातीमोल ठरली होती. मात्र त्या अवकाश यात्रेनं त्यांनाच नाही तर सर्वांनाच बोध दिला होता की प्रयत्न करणाऱ्यांची कधीही हार होत नाही. जशी मुंगी एखादा पदार्थ नेत असतांना भिंत चढत असते व दहा वेळा पडते. परंतु ती चढूनच जाते भिंत. तसेच पृथ्वीवासीय लोकांनीही प्रयत्न करणे सुरुच ठेवले होते. पुन्हा कधीतरी अवकाश यात्रा करुन पाण्याचा शोध लावण्यासाठी नव्हे तर जीवसृष्टी वसविण्यासाठी आणि त्यासाठीच पाऊल उचलण्यासाठीच.
जॉन व जोल आज सुखरुप परत आले होते अवकाश यात्रेतून. जया नव्हती त्यात. आज ते बर्‍याच वर्षानं वेगवेगळे झालेले एकाच गावातील रहिवासी एकाच यानात बसून अवकाशाची माहिती मिळविण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांची यानातच ओळखही पटली होती.
जॉन सांगत होता आपल्या नातवंडांना अवकाश यात्रेच्या कहाण्या. जो त्यानं प्रवास केला होता अंतराळाचा. जॉन म्हणत होता,
"आपली ही पृथ्वी कशी तयार झाली? या प्रश्नाचं उत्तर सांगतांना मी म्हणेल की धूळ आणि वायू यांपासून बनलेल्या चक्राकार ढगापासून आपल्या पृथ्वीची सुरुवात होते.
सुमारे साडेचार अब्ज वर्ष अगोदर आपली पृथ्वी ही विविध वायूंचा गोळा होती, जसा आज बुध व शुक्र ग्रह आहे. इथंही ॲसिडचाच पाऊस पडत होता. जसा ॲसिडचा पाऊस शुक्र व बुध ग्रहांवर पडतो. जो वायूचा गोळा, जो सतत जळत आहे अशा स्वरुपाची होती. आजप्रमाणे झाडे, झुडपे, माती, ऑक्सिजन, पाणी असं काहीही आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात नव्हतं. त्यावेळेस पृथ्वीचं तापमान हे जास्त होतं. आपली पृथ्वी ही एका लाव्हाच्या गोळ्यासारखी होती. आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग खवळलेल्या लाव्ह्याने झाकला गेला होता. पृथ्वीचं तापमान बाराशे अंश सेल्सीअस इतकं होतं. पृथ्वीवर सतत लघुग्रहांचा मारा होत असे. ज्यामुळे पृथ्वीवर खवळत्या लाव्ह्याच्या नद्यांची निर्मिती होत होती. काळानुसार आपल्या पृथ्वीवरील वातावरणात वेगाने बदल होत गेले. पृथ्वीचं स्वरुप प्रचंड वेगाने बदलत गेलं आणि अचानक, अचानक एका ग्रहानं आपल्या पृथ्वीला धडक दिली आणि आपल्या पृथ्वीचे दोन तुकडे झाले. त्या दुसऱ्या तुकड्याला आपण आज चंद्र म्हणतो. तोही अनेक तुकड्यात फिरत होता आपल्या पृथ्वीभोवती. काही काळानं ते तुकडे एकत्र झाले व त्याचा आपल्याला दिसत असलेला चंद्र बनला. त्यावेळी चंद्र हा आपल्या पृथ्वीला खूप जवळ होता. पृथ्वीप्रमाणे चंद्रावरही लाव्हाच्या नद्या वाहत होत्या. अंदाजे तीस हजार वर्षांनी चंद्रावरील काही गोष्टीत बदल झाला. त्यामुळे चंद्राला डाग पडलेत व चंद्रावरील पाण्याचा अंश संपला. त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असल्या कारणामुळे त्याचा गुरुत्वाकर्षण प्रभाव पृथ्वीवर टाकत होता. त्यावेळी पृथ्वीवरील दिवस सहा तासांचा होत होता. काही काळाने चंद्र हा आपल्या पृथ्वीच्या दूर जात गेला आणि हळूहळू आपल्या पृथ्वीवरील लाव्ह्यच्या नद्याही काळानूरुप शांत झाल्यात आणि हळू हळू पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झाला.
पृथ्वी ज्यावेळेस लाव्हारसाच्या रुपात होती. त्यावेळी पृथ्वीच्या वातावरणात फक्त एकच वायू अस्तित्वात होता आणि तो म्हणजे मिथेन. पृथ्वीवर त्यावेळी सतत लघुग्रह आणि उल्कापिंडांचा वर्षाव होत असे. त्यांनी त्यांच्यासोबत पाण्याचे परिवहन केले. जसं जसं आपल्या पृथ्वीचं तापमान कमी होत गेलं, तसंतसं पृथ्वीवर पाणी साचत गेलं. त्यानंतर काही काळ आपल्या पृथ्वीवर पुर्णपणे पाण्याचं साम्राज्य निर्माण होत गेलं.
लघुग्रहांच्या माऱ्यामुळे पृथ्वीवर फक्त पाण्याचेच परिवहन झाले नाही, तर त्यासोबत अनेक प्रकारचे मिनरल, कार्बन, प्रोटीन, अमिनो ॲसीड आणि वायू पृथ्वीवर आलेत. त्याकाळी संपुर्ण पृथ्वीवर पाणी होते. लघुग्रहांसोबत आलेल्या कार्बन आणि प्रोटीन यांच्यात खोल पाण्यात अभिक्रिया झाली आणि त्यातून पहिल्या एकपेशीय जीवाची निर्मीती झाली. हे एकपेशीय जीव एक प्रकारचे जीवाणू होते. त्यानंतर कित्येक वर्षपर्यंत या जीवाणूची विकासप्रक्रिया सुरु होती. संपुर्ण पाण्यामध्ये या जीवाणूचं साम्राज्य निर्माण झालं होत. करोडो वर्षांच्या विकास प्रक्रियेनंतर या जीवाणूचं रुपांतर प्रकाशसंश्लेषणधारी जीवामध्ये झालं. सुर्यप्रकाशाचा वापर करुन हेच प्रकाशसंश्लेषणधारी जीव त्यांचं अन्न स्वतःच तयार करीत असत. आज त्या प्रक्रियेला आपण प्रकाशसंश्लेषण म्हणतो. या प्रक्रियेत ते एक प्रकारचा वायू उत्सजीत करत होते आणि तो म्हणजे ऑक्सिजन. यानंतर पुढे दोन अब्ज वर्ष पृथ्वीवर ऑक्सिजनची पातळी वाढत राहिली. त्यानंतर पृथ्वीवर संपुर्ण पाणी आणि छोटे छोटे द्वीप यात गोळा होत राहिलं. त्यानंतर पृथ्वीच्या रचनेमध्ये अचानक बदल होवून सर्व महाद्वीप एकमेकांना जोडले गेले. त्यापुर्वी पृथ्वी ही अनेक तुकड्यातुकड्याने सुर्याभोवती फिरत होती. त्यावेळेस पृथ्वीचं तापमान साहजीकच कमी झालं होतं. यावेळी पृथ्वीचं तापमान तीस डिग्री सेल्सियस होतं व पृथ्वीचा एक दिवस हा अठरा तासांचा होता.
पृथ्वीवर अनेक उल्कापींड धडकत होते व सतत उल्कापात होतच होता. अशातच काही कोटी वर्षाअगोदर परिस्थिती बदलली, पृथ्वीवर पुन्हा एक मोठा धमाका झाला. एक उल्कापींड पृथ्वीला येवून धडकला व पुन्हा पृथ्वीचे दोन भाग बनले आणि शांत झालेला लाव्हा पृथ्वीच्या बाहेर आला. पृथ्वीवर पुन्हा तापमान वाढण्यास सुरुवात झाली. धमाक्यामुळे पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि उष्णता यामुळे त्यावेळी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आम्ल वर्षा झाली आणि कार्बन डायऑक्साईडचे थर हे पृथ्वीवरील खडकांवर निर्माण झाले. या सर्व प्रक्रियेमुळे पृथ्वीवरील तापमान हे झपाट्याने कमी झाले आणि आपल्या पृथ्वीवर पहिल्या हिमयुगाची सुरुवात झाली. हे हिमयुग सर्वात जास्त वेळ राहणारे हिमयुग होत. हे हिमयुग संपल्यानंतर काही काळानं पृथ्वीवर अजून एक हिमयुग आलं. परंतु या सर्व प्रक्रियेतून पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण होण्यास सुरुवात झाली.
पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली होती. आता आपण खोल पाण्याखाली पाहिलं तर त्या एकपेशीय जीवांचं रुपांतर अनेकपेशीय जीवांमध्ये झालेलं दिसते. समुद्रात विविध विचित्र जीवासोबत समुद्री झुडुपांचं अस्तित्व निर्माण झालेलं दिसते. तसेच काही बहुपेशीय जीव निर्माण झालेलेही दिसतात. म्हणतात की पुर्वी सर्वात प्रथम एकपेशीय जीव निर्माण झाले. तेही पाण्यात. ज्याला पाठीचा कणा नव्हता. त्यानंतर जमीनीवर निर्माण झालेले प्राणी. ज्यांना पाठीचा कणा होता. हा असा दुसरा जीव होता की ज्यात आपण मानवामध्ये असलेला पाठीचा कणा होता. त्यानंतर आपली पृथ्वी ओळखण्यासारखी सदाहरीत झाली. पण अजूनही आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर झाडं, झुडूपं नव्हती. त्याला कारण म्हणजे सूर्याची अतिनील किरणे. काही काळानंतर पृथ्वीच्या वातावरणात बदल झाले आणि ओझोन वायुची निर्मीती झाली. ओझोनमुळे पृथ्वीभोवती एक कवच निर्माण झालं. त्यामुळे पुढे पृथ्वीवर झाडांच्या निर्मितीस पोषक असं वातावरण निर्माण झालं आणि आता पाण्यातील जलचरानं जमिनीवर येण्याचा निर्णय घेतला.
काही वर्षानंतर हा जलचर जो जमीनीवर आला होता, तो विकसीत झाला आणि त्याचं रुपांतर पुढे महाकाय डायनासोर मध्ये झालं. पुढं काही सस्तन प्राणीही बनत गेले.
पृथ्वीच्या वातावरणात सतत बदल होत होते. त्यावेळी परत एकदा तापमान वाढले आणि पृथ्वीवर मोठा दुष्काळ पडला. या दृष्काळात पृथ्वीवरील बहुतांश प्राणी मरण पावले व काही झाडंही नष्ट झालीत. त्यावेळी जीवंत राहण्यासाठी काही प्रजातींनी जमिनीमध्ये राहायला सुरुवात केली. ते काळाच्या ओघात टिकले व त्यांनी आपलं अस्तित्व टिकवलं. मात्र काही प्राण्यांना पृथ्वीच्या गर्भात जाता येत नव्हतं. ते मरण पावले. ज्यात डायनासोर सारख्या प्राण्यांचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात बदल झाला व हा बदल होवून पृथ्वीवर पुन्हा एकदा नव्यानं झाडे उगायला सुरुवात झाली होती. जीवसृष्टी जी पंच्यान्नव प्रतिशत मरण पावली होती, पृथ्वीचं तापमान वाढून. त्यानंतर पृथ्वीवर जीवंत राहिलेल्या पाच टक्के प्रजातींचा विकास अतिशय जलद गतीनं झाला होता. त्यांचं रुपांतर लहान प्राण्यांमध्ये झालं होतं. इथूनच आपल्या पृथ्वीवर एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. यानंतर काही अब्ज वर्षांनी पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व निर्माण झालं.
आम्ही अवकाश यात्रा केली. त्यासाठी यानंही नेलं अवकाशात. त्यासाठी करोडो, अब्जो रुपये खर्चही केला आम्ही. परंतु जीवसृष्टी वसविण्याबद्दल आम्हाला तिथं काहीच गवसलं नाही. आम्ही खाली हातानं परत आलो. परंतु एक निश्चित गोष्ट आम्हाला कळली. ती म्हणजे बाजूच्याच बुध आणि शुक्र ग्रहांवर आज जरी तापमान जास्त असलं आणि तिथं ॲसीडचाच पाऊस आज जरी कोसळत असला तरी उद्या तेच ग्रह शांत होतील. तिथं पाणीही निर्माण करता येईल. तशीच तिथं पृथ्वीसारखीच झाडंही निर्माण करता येतील आणि तिथं पृथ्वीसारखीच जीवही निर्माण होतील. मग त्यानंतर पृथ्वीवासीयांचाही अधिवासाचा प्रश्न सोडवता येईल. यात शंका नाही."
जॉन बोलून गेला होता. आपल्या मनातून तो तसं बोलला होता. जे अंतीम सत्य होतं.

***********************************************

आज जया जीवंत नव्हती. परंतु जॉनला आठवत होती जया आणि आठवत होत्या त्या अवकाशयानातील आठवणी. ते अवकाशयान पृथ्वीवरुन झेपावलं होतं. ज्यात जोल व जयाही होती. ती जया, ज्या जयानं पुष्कळ यातना भोगल्या होत्या पृथ्वीवर.
ते यान झेपावलं होतं पृथ्वीवर. तसा जॉननं विषय छेडला.
"मैडम, आपलं नाव काय आहे?"
"जयश्री. माझं नाव जयश्री आहे." जया नाव बदलवत म्हणाली.
"कुठल्या आहात?" हा जॉनचा प्रश्न. तसं तिनं उत्तर दिलं.
"मी अमूक अमूक गावची. तिथं माझं बालपण गेलं."
"तू त्या गावची. मीही त्याच गावचा."
"हो का?"
"होय." जॉन म्हणाला. तसे ते दोघंही बोलते झाले होते. तो म्हणाला,
"मीही त्याच गावात शिकलो. परंतु जास्त शिकलो नाही. माझे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्या बदल्या व्हायच्या. अशीच बदली त्याही गावला झाली व मला तिथे चार वर्ष राहता आलं. त्यानंतर माझ्या वडीलाची बदली झाली व मी शहरात राहायला आलो. मग आम्ही तिथंच स्थिरावलो व माझं पुर्ण शिक्षण तिथंच झालं."
जॉननं आपलं जीवन पुर्णतः सांगून टाकलं होतं. त्यानंतर तो म्हणाला,
"का गं जयश्री, तुझं कसं काय गेलं बालपण?"
"माझं बालपण? माझं बालपण विचारुच नका."
"म्हणजे? असं काय झालं होतं तुझ्या बालपणात? सांगावे ते प्रसंग. मन हलकं होतं."
"नाही. ते काय बालपण होय! तसंही बालपण की आपल्या स्वतःला अश्रू कोसळावेत."
"मग सांग ना तर...... असं काय घडलं तुझ्या बालपणात? कदाचीत..... कदाचीत ते सांगून काहीतरी नवीन घडणार असेल तर......." जॉन म्हणाला.
"ठीक आहे. तर ऐका माझी कहाणी." ती म्हणाली व ती आपलं जीवन सांगू लागली आणि ते दोघंही ती कहाणी ऐकू लागले शांतपणे.
"माझं जीवनच मुळात उकीरड्यावरचंच समजा. माझे आईवडील दोघंही मरण पावले माझ्या लहानपणी. जेव्हा मी सहा वर्षाची होती व माझा भाऊ दहा वर्षाचा. परंतु माझे आईवडील जरी मरण पावले असले लहानपणी. तरी मला त्याबद्दल सहा महिने तरी काहीच वाटलं नाही. कारण एक भाऊ होता दहा वर्षाचा. तोच भाऊ माझ्या आईवडीलानंतर माझा आधार बनला होता. परंतु त्याला माझ्याजवळ राहायला सहा महिनेच झाले असतील. तो अचानक गायब झाला. त्यानंतर तो कधीच परतलाच नाही. मग मी एकाकी झाले. तशी मी फार घाबरणारी होती लहानपणी. साधी अंधाराला घाबरायची. मग अंधार पडू लागला. मला आगपेटीही पेटवता येईना. तशी मी फार घाबरली. ओक्साबोक्सी रडू लागली. शेजारी गेली. तशी मला भूक फारच लागली होती. परंतु अंधार पडल्यानं रडता रडता झोपी गेली. काही वेळानं उठली. भूक लागल्यानं जेवन शोधलं. मग थोडीशी खिचडी होती शाळेतील. ती खाल्ली व रडता रडता झोपी गेली. झोप केव्हा लागली तेही काही कळलं नाही.
दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवशीही रात्री भूक न शमल्यानं भूक लागलीच होती. तशी मी अन्न शोधायला घराच्या बाहेर पडली. शेजारी गेली. त्यांनी जेवन न देता हाकलून दिलं. त्यानंतर निघाले मी एकटी. तर एका उकीरड्यावर कुत्री व काही डुकरंही काहीतरी खात होते. मलाही भूक फार लागलीच होती. मीही गेले मग उकीरड्यावरच आणि उकीरड्यावरचंच अन्न खाल्लं. कारण मला स्वयंपाक वैगेरे त्या वयात बनवताच येत नव्हतं. आगपेटीही साधी पेटवता येत नव्हती."
"उकीरड्यावरचंच अन्न खाल्लं म्हणता तर मग शाळा कशा काय शिकल्या?"
"मी आधीच सांगीतलंय की मला स्वयंपाक करताच येत नव्हता. म्हणूनच मी उकीरड्यावरचंच अन्न खालंय आणि अन्नाचीच सोय करण्यासाठी मी शाळेत जायची. तेथे खिचडी मिळायची. ती खिचडी तिथंही भरपेट खायची आणि डब्यात भरुनही आणायची. म्हणजेच खिचडी खात खातच जीवन गेलं माझं आणि बालपणही."
"ते सगळं बरोबर आहे. परंतु खिचडी तर आठवीपर्यंतच होती. नंतर कसा खर्च केला? कारण आठवीपासून तर खिचडी बंदच झाली असणार."
"होय. नंतर खिचडी बंदच झाली होती मिळणं. मग शेतातील कामं करुन वा कोणाच्या घरची धुणीभांडी करुन शिकले मी दहावीपर्यंत."
"ठीक आहे दहावीपर्यंत. परंतु पुढील शिक्षण?"
"पुढील शिक्षण शहरात केलं."
"पण कसं?"
"शहरात चक्कं भीकच मागीतली रेल्वे स्टेशनवर. अन् शिकतही गेले."
"त्यानंतर पुढचा प्रवास?"
"बापरे! तुमचं जीवन तर संघर्षमयच आहे अगदीच."
"ते तर काहीच नाही. पुढचं ऐका. ते तर अती खतरनाकच आहे."
"सांगा तर. आम्ही ऐकतोच."
"पुढं नोकरी लागली. मग प्रेम झालं अब्दुल नावाच्या एका मुर्दाडाशी. त्यानं तकादा लावला होता." तिनं एक आवंढा गिळला. तसा जॉन म्हणाला,
"काय म्हणत होता तो?"
"म्हणे नोकरी सोड."
"मग सोडली का नोकरी?"
"नाही. मी नोकरी सोडलीच नाही. ते पाहून त्यानं मला विदेशात नेलं. तिथं एका कमऱ्यात बंद केलं. मग माझ्यावर अत्याचार केले. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी माणसं आणली माझ्यावर अत्याचार करायला."
"बापरे ! काय तुझी कहाणी आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच कहाणी आहे तुझी?"
"होय."
"मग तू इथं कशी काय आली?"
"असाच एके दिवशी माझ्यावर अत्याचार करायला त्यानं एक व्यक्ती आणला. तो माझ्याच देशातील वाटत होता व तोही मुस्लीमच होता. त्याला मी माझी कहाणी सांगीतली. तशी त्यानं माझी मदत केली व मी इथंवर आले. त्यानंतर एक जाहीरात आली पेपरला की अंतराळात महिलांनी जायचं आहे. जी तयार आहे. तिनं आवेदन करावं. मी ती जाहीरात वाचली. आवेदन केलं व लागली या नोकरीला. त्यानंतर मी इथंवर आले."
ती बोलत होती आपल्या गतकाळाविषयी. गतकाळातील आठवणी सांगत होती ती. तिचंही मन भरुन आलं होतं. परंतु तिचे अश्रू सुकले होते. ते आले नव्हते.
ती बोलत होती आणि तिचा भाऊ जोलही ते सगळं लक्ष देवून ऐकत होता. त्यानं ओळखलं होतं तिला. परंतु त्यानं तिला आपली ओळख दाखवली नव्हती. तिला आपली ओळख दाखवू नये असं त्याला वाटत होतं. कारण तो आताही एक सुधारगृहातीलच कैदी होता. जो सुधारगृहातून सुटल्यानंतर गावी गेला होता. त्यानं आपल्या बहिणीची चौकशी केली होती व ती आढळून न आल्यानं त्यानं आपलं हे जीवन काही कामाचं नाही. आपल्या जीवनाला लोकांनीच बिघडवलं. म्हणून त्यानं गुन्हे करणे सुरु केले होते. आज तो देशातीलच एका मोठ्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. ज्या तुरुंगातून त्याला बोलावणं आलं होतं प्रक्षेपण यान तयार करण्यासाठी व जॉनच्या म्हणण्यानुसार तो आता अवकाशयानात विराजमान होता.
जोलला पुर्वी जगावंसं वाटत नव्हतं, जेव्हा त्यानं आपल्या बहिणीची चौकशी केली होती. परंतु आता त्याला त्याची बहीण मिळाल्यानं हायसं वाटत होतं. शिवाय त्याच्यात आज जगण्याची उमेदही निर्माण झाली होती.
जया बोलत होती जॉनशी अवकाश यात्रेदरम्यान. तसं दररोजचं त्यांचं बोलणं वाढत चाललं होतं. तसं त्यांच्यात प्रेमसंबंधही वृद्धींगत होवू लागले होते.
जॉन हा आजही अविवाहितच होता. त्याला शास्रज्ञ म्हणून काम करता करता विवाह करण्याचा योगच आला नाही व त्यानं शास्रज्ञ म्हणून काम करीत असतांना विवाहाचा विचारही केला नाही. परंतु आता अवकाशात त्याच्या मनात विवाहाचे विचार घोळू लागले होते.
जॉन ख्रिश्चन धर्माशी संबंधीत होता. तसं पाहिल्यास जया मात्र विवाहाचा विचार करीत नव्हती. ना ही तिच्या मनाला विवाह करतांना आपल्या धर्माव्यतिरीक्त इतर धर्माशी विवाह करावेसे वाटत होते. तिला वाटत होतं की तिनं गतकाळात असाच आपला धर्म सोडून परधर्मीय पुरुषांशी विवाह केला व ती फसली. आता सोचून समजून विवाह करतांना आपण योग्य तो निर्णय घ्यावा असं वाटत होतं तिला.
विवाहाचा त्या दोघांचाही विचार. तो प्रश्न घोळत होता जॉनच्या मनात. तसा जॉनच्या मनात विवाहाचा विचार येताच एकदा संधी साधून तो तिला म्हणाला,
"जयश्री, एक प्रश्न विचारु काय?"
"विचार, काय विचारायचे आहे ते."
"अगं तू हा प्रवास झाल्यावर विवाह करशील का?"
"तसं ठरवलं नाही मी अजून. परंतु मी ठरवेल आणि करेल विवाह. परंतु एवढं उत्सुकतेनं विचारायला काय झालं असं?"
"नाही सहजच विचारलं." ती विचार करु लागली. विचार करु लागली की कोणी असं सहसा विचारु शकत नाही. काही ना काही उद्देश असतोच. तसं तिनं भापलं की कदाचीत जॉनच्या तर मनात माझ्याशी विवाह करण्याचा विचार नाही. तशी त्याची पुष्टी करण्यासाठी ती जॉनला म्हणाली,
"सहसा असं कोणी विचारत नाही. नक्कीच काही ना काही उद्देश असतो कुणाचा. बोल का विचारलं असं?"
"नाही गं. अगदी सहज." तो म्हणाला व तो तेथून निघून गेला.
जॉन तेथून निघून जाताच जयाच्या मनात विचार आला. तो विचार धर्माबद्दलच होता. तसं तिला कळून चुकलं होतं की जॉन तिच्याशी विवाहबद्ध होवू पाहात आहे. म्हणूनच त्यानं तसा प्रश्न विचारलाय. तसा तिच्या मनात विचार आला तो धर्माचाच. तशी ती हिंदूधर्मीय होती. ती विचार करीत होती की आता आपण आपल्या धर्माचा व्यक्ती सोडून विवाह करु नये. मागं आपण अब्दुलशी विवाह केला. तरीही लोकं सांगत होते की तो मुस्लीम आहे. ते लोकं चांगले नसतात. विवाह करु नको त्याचेशी. तुला नंतर पश्चाताप होईल. परंतु मी जबरदस्तीनं केला त्याचेशी विवाह. तो गोडगोड बोलला. म्हणे चांगला शिकलेला आहे. चांगली नोकरी आहे. अन् विवाह केल्यावर फसले मी. तसे लोकं म्हणतात की मुस्लीम लोकं चांगले नसतात. ते त्यानं खरं करुन दाखवलं. तसे मुस्लीम चांगले नसतीलच. मग हा जॉनही चांगला असेल कशावरुन? तो तर ख्रिश्चन आहे.
धर्माबाबतीतील तिचा विचार. तोच तिच्या मनात दुसरा विचार तरवळला. तो विचार रहिमचा होता. ती विचार करु लागली की मुस्लीम लोकं वाईट असतात. लोकंही म्हणतात आणि मीही प्रत्यक्षात तसंच भोगलं. मग रहिम तर मुसलमान होता. त्यानं तर मला बहीण मानलं. मला ठेवलं त्यानं लपवून सहा महिने. बहिणीसारखं सांभाळलं मला आणि बहिणीसारखीच माझी रवानगीही करुन दिली या हिंदुस्थानात. तोही मुस्लीमच. परंतु त्यानं एक मुस्लीम असूनही तो अत्याचारी स्वभावानं वागला नाही. तर त्यानं चांगल्या गुणांचा परीचय दिला. दाखवून दिलं की कोणत्याही धर्माची माणसं वाईट नसतातच. वाईट असते प्रत्यक्षात प्रत्येक माणसाची मनोवृत्ती. अब्दुल जरी मुसलमान असला तरी तो मनोवृत्तीनं वाईट होता. यावरुन त्याचा धर्म वाईट नव्हता. आपल्याही धर्मात असंच आहे. काही लोकं आपल्याही धर्मात चांगले नाहीतच. मी लहान असतांना व सहाच वर्षाची बाळ असतांना आपल्याही धर्मातील काही लोकांनी मला सहारा दिला नाही. तेव्हा तर मला साधी आगपेटीही पेटवता येत नसे. तरीही शेजारच्यानं मला मदत केली नाही. कोणत्याच हिंदूधर्मीय माणसानं मला मदत केली नाही. यावरुन माझा धर्म मी वाईट समजू काय? यावरुन हे लक्षात येतं की धर्म हा वाईट नसतो. वाईट असतात त्या माणसांचे विचार. जे विचार रसातळाला गेलेले असतात. जॉन जरी ख्रिश्चन धर्माचा असला तरी तो प्रेम करतो ना माझ्यावर. शिवाय त्याचे विचारही चांगले दिसतात. परंतु आपण त्याला सध्याच होकार दर्शवू नये.
जयाचा तो विचार. तो विचार तिच्याच मनात होता. तिच्याही मनात जॉनबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. परंतु तुर्तास तरी ती त्या प्रेमावर पडदा ठेवून होती.
आज अवकाशात जोराचं वावटळ सुटलं होतं. त्यांचं अवकाश यान डळमळत होतं. वाटत होतं की आपण सहज सुखरुप पृथ्वीवर पोहोचणार की नाही की इथंच आपलं यान ध्वस्त होणार आणि आपली अवकाशातच समाधी बनेल. परंतु तसं काहीच घडलं नाही. वावटळ लवकरच आटोक्यात आलं व यान सवरलं. परंतु ते विचारांचे वादळ. जे वादळ जया व जॉनच्या मनात तयार झालं होतं विवाहाबद्दलचं. ते काही केल्या क्षमलं नव्हतं. अशातच एक दिवस जॉन म्हणाला,
"जयश्री, माझी इच्छा आहे की आपण अवकाशात विवाह साजरा करावा. कदाचीत माझी तरी अंतीम इच्छा पुर्ण होईल. कारण मला नाही वाटत की आपण पृथ्वीवर पोहोचू. जर आपण पृथ्वीवर नाही पोहोचलो तर आपल्या मनातील साऱ्या इच्छा जशाच्या तशा राहतील. आता तू ठरव की तुझी इच्छा काय? बरं झालं की आज आलेलं वावटळ क्षमलं. नाहीतर आजच आपण या अवकाशात सामावून गेलो असतो. दिसलो ही नसतो कुणाला."
जॉन म्हणाला व निघून गेला. मात्र ती विचार करु लागली. विचार करु लागली की जॉन म्हणतोय ते काही वाईट नाहीच. त्याची गोष्ट खरी आहे. जर आपण पृथ्वीवर नाही पोहोचलो. तर त्याचीही मनातील इच्छा मनातच राहील. आपलं काय? आपला तर विवाह झालाय. परंतु जॉनचा? तो कुवाराच मरेल बिचारा. त्याचं पाप लागेल मला. परंतु हो तरी कसं म्हणावं? ती विचारच करीत होती. तोच तिथं जोल आला. म्हणाला,
"मॅडम, काय सुरु आहे. लई विचारात दिसत आहात. बोला, कोणता विचार आहे आपल्या मनात. सांगा, मी काहीतरी मार्ग सुचवेलच नक्की त्यावर."
जोल बोलत होता तिच्याशी. त्यालाही माहीत झालं होतं की ती त्याचीच बहीण आहे. परंतु त्यानंही ओळख दाखवली नव्हती. तसं त्याचं बोलणं संपलं होतं. त्यावर ती विचार करीत होती. तसा जोल पुन्हा म्हणाला,
"बोला, बोला. लाजू नका. आपलं मत तर व्यक्त करा."
तो जोलचा प्रश्न. तशी ती विचार करु लागली. विचार होता की जोलला काय सांगावं आपल्या मनातलं. तो काय आपल्याला सल्ला देणार. परंतु दुसरा विचार तिच्या मनात आला. जर या माणसाच्या अंगात रहिम बसला असेल तर....... तो रहिम सारखाच वागेल. आपल्याला बरोबर सल्ला देईल. विचारुनच पाहावं याला.
जयाचा तो विचार. ती विचारु लागली होती जोलला. म्हणाली,
"दादा, जॉन माझ्याशी विवाह करु पाहतोय. परंतु ते शक्य आहे का या प्रवासात. तसं मी त्याला म्हणणार होतीच. परंतु तोच म्हणाला की या प्रवासातून आपण सुखरूप पृथ्वीवर पोहोचू याचा अंदाज नाही. माझी इच्छा ती इच्छाच राहील. इच्छा पुर्ण व्हायला हवी विवाहाची. परंतु हा विवाहाचा निर्णय आहे. तो कसा घेवू मी? आहे का यावर काही उपाय. असेल तर सांग बरं."
तिचा तो प्रश्न. त्यावर उत्तर देत जोल म्हणाला,
"होय, यावर उत्तर आहे."
"कोणतं उत्तर आहे बरं?"
"तू विवाह करुन टाक जॉनशी."
"विवाह!"
"होय, विवाहच. कारण आपण आता पृथ्वीवर नाही. आपण अवकाशात आहोत. पृथ्वीपासून कितीतरी दूर अशा ठिकाणी. कदाचीत येथून परत जावू की नाही जावू याचा विश्वास नाही. केव्हा काय होईल व केव्हा आपण संपून जावू याचाही अंदाज नाहीच. तेव्हा यावर उपाय तोच आहे. बिचाऱ्याची इच्छा तर पुर्ण होईल आणि तुलाही काही काळाकरीता का असेना सुख मिळेल. मरतांना एकमेकांच्या कुशीत मराल दोघेही. अन् ते भविष्य कोणं पाहिलं की आपण सुखरूप घरी पोहोचू? हं, विधात्यानं चाहलं तर आणि तरच आपण पुन्हा एकदा पृथ्वीवर पोहोचू शकतो. मात्र एक सांगतो आणि तेच सत्य असेल की आपण शक्यतोवर नव्यान्नव प्रतिशत पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही. हा आजवरचा इतिहास आहे. हं, चांद्रयान मोहीमेतील सर्वजण पोहोचले पृथ्वीवर. कारण ते फक्त चांद्रयान मिशन होतं. हे तर साऱ्या ग्रहांचंच मिशन आहे. जॉन खरंच चांगला आहे व तुझ्या लायक तोच योग्य जोडीदार ठरु शकतो."
जोलनं तिला केलेलं मार्गदर्शन. तिला आता हायसं वाटत होतं. त्यानंतर तिच्याही मनात प्रेम उचंबळून आलं होतं. ते काहूर माजले होते स्वप्नांचे. शिवाय त्या विवाहाच्या अवकाशात ढग उठले होते प्रेमाचे. ते विवाहाचा पाऊस पाडल्याशिवाय सोडणार नव्हतेच.
जोलनं केलेलं मार्गदर्शन. त्यानंतर तिला कधी होकार देतो आणि कधी नाही असंच होवून गेलं होतं. शिवाय तिला त्या दिवसापासून झोपही येत नव्हती. त्यानंतर एक दिवस संधी पाहून ती जॉनला म्हणाली,
"जॉन, मी तयार आहे तुझ्याशी विवाह करायला. मात्र माझी एक अट आहे. समजा आपण जर सुखरुप पृथ्वीवर परत गेलो वा मी कदाचीत या प्रवासात मरण पावलोच तर माझा जसा स्विकार करणार तू. तसाच माझ्या मुलीचाही स्विकार करशील. तिला आपली मुलगी याच हेतूनं वागवशील. तिला माझ्यासारखं जीवन नको जगू देशील."
तिचं ते बोलणं. जॉननं होकार दिला. तो होकार देताच त्या दोघांचाही विवाह अंतरीक्षातच पार पडला व दोघंही पती पत्नी बनले आणि त्या विवाहाचा साक्षीदार म्हणून जोल होता आणि तेही होते दोनचार जणं. जे अंतरीक्षात आले होते अवकाश यात्रेचा प्रवास करायला नव्हे तर पृथ्वीवासीयांचा अधिवासाचा प्रश्न सोडवायला. ती सर्व मंडळी पृथ्वीवासीयांचं जीवन समृद्ध करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अंतरीक्षाच्या प्रवासाला निघाले होते.
तो प्रवास व ते अवकाशातील दिवस आज उरले नव्हते. कित्येक वेळेला अवकाशात वादळं यायची आणि कित्येक वेळेला ती वादळ क्षमायची. कधी विचारांचं काहूर माजायचं. कधी तापमान वाढायचं अवकाशयानातील. कारण ते सतत फिरायचं नाही तेव्हा. कधी बिघाड यायचा. परंतु तरीही त्या एकंदर सर्व परिस्थितीवर मात करून ते अंतरीक्षयान बऱ्याच वर्षानंतर पृथ्वीच्या कक्षेत परतलं होतं.
ते अवकाशयान पृथ्वीच्या कक्षेत परतलं होतं आणि अशातच पृथ्वीच्या कक्षेत येताच एक मोठ्या स्वरूपात वावटळ उठलं.
ते वावटळ भयानक होतं. त्या वावटळात जॉनचं अवकाश यान डगमगलं. त्याचा तोल गेला व ते अवकाश यान क्रॅश झालं.
ती दुर्घटना झाली होती. फार मोठी दुर्घटना होती ती. परंतु ती पृथ्वीच्या सीमेलगत झाली होती. त्यामुळंच त्या सर्वांचे शरीर सापडले होते.
ती दुर्घटना. ती दुर्घटना पृथ्वीच्या कक्षेत असतांना अगदी जमीनीलगतच झाली होती. त्या अवकाशयानानं संपुर्ण विश्वाची प्रदक्षिणा केली होती. परंतु दुर्दैवच ते की ते अगदी पृथ्वीच्या जवळ येताच क्रॅश झालं. ज्यात सर्वांची शरीरं सापडली असली तरी सर्व जीवंत नव्हते. ज्यात जया मरण पावली होती. तिच्यासोबत आणखी बरेच जण मरण पावले होते जे अवकाशयानात होते. मात्र जोल आणि जॉन, हे दोघंही तेवढेच वाचले होते. जोलला काहीही झालं नव्हतं. परंतु जॉन अपंग झाला होता.
ती दुर्घटना झाली होती. तशी ती यान दुर्घटनेची माहिती आणि जया मरण पावल्याची बातमी जगातील सर्व वर्तमानपत्रातून छापून आली होती होती. ती बातमी सर्वांनी वाचली होती. त्याचबरोबर वाचली होती अब्दुलनं. अब्दुल आज सुधारला होता. ती त्याला सोडून जाताच त्याचं डोकंही ठिकाणावर आलं होतं. आज त्याला वाटत होतं की हिंदू लोकं बदमाश नाहीत. तर ते अतिशय शांत आहेत. तसाच कोणताही धर्म वाईट नसतोच. वाईट असतात माणसांचे विचार. शिवाय माणसांचे माणसांनाच भडकविणे वाईट असते.
अब्दुल सुधरला होता. त्याला कारणीभूत होती त्याची मोठी मुलगी. जिचं नाव झरीना होतं. त्या झरीनानं एका हिंदू मुलाशीच विवाह केला होता. जो तिचा पती तिची चांगलीच काळजी घेत होता.
अब्दूल आज म्हातारा झाला होता. तेव्हा तो आपल्या मुलीजवळच राहात होता. मात्र त्याला अर्धांगवायूचा झटका आलेला होता. अर्धांगवायूनं संपुर्ण शरीरच घेरलं होतं. परंतु मेंदू अजूनही शाबूत होता. तो मेंदू सतत विचार करु शकत होता.
आज त्याला त्यानं केलेले पाप आठवत होते आणि आठवत होती जया. जिच्यासोबत राहून आणि तिच्याच पैशावर जगून त्यानं तिच्यावर अत्याचार केले होते. त्याच पापाची शिक्षा तो आज भोगत होता. शिवाय त्याला मरणप्राय यातना होत होत्या. तो मरणही मागत होता अल्लाला. परंतु त्याला मरण येत नव्हतं. तसं पाहिल्यास त्याला आजही पावलोपावली जयाच आठवत होती.
जॉन व जोल या अवकाश यानाच्या दुर्घटनेतून वाचला होता. ती दुर्घटना जेव्हा झाली व जॉन ज्यावेळेस खाली पडला आणि त्याचं शरीर जेव्हा लोकांना सापडलं. तेव्हा जॉन बेशुद्धच होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आलं व एक अंतराळवीर म्हणून त्याची चांगली सेवा शुश्रुषा करण्यात आली. काही दिवसानंतर तो जेव्हा होशात आला. तेव्हा त्यानं सर्वात प्रथम जयाची आठवण केली. जेव्हा जया त्याला जीवंत नसल्याचं कळलं. तेव्हा त्याला फार पश्चाताप झाला होता. त्यावेळेस तो हरहळत होता.
जॉन जेव्हा होशात आला, तेव्हा ती गोष्ट जोलला माहीत झाली. तेव्हा जोलही त्याची भेट घेण्यासाठी रुग्णालयात आला. त्यावेळेस त्यानं पाहिलं की जॉन जयाच्या मृत्युवर हरहळत आहे. तेव्हा तो म्हणाला
"माहीत आहे जॉन, तू फक्त आपली पत्नीच हरवली. मी माझी बहीण हरवली आहे. होय, माझी सख्खी बहीण की जिला मी तिचा सख्खा भाऊ आहे हे सांगीतलं सुद्धा नाही."
जोल जे बोलायचं ते बोलून गेला. मात्र त्यावर जॉन विचार करु लागला व विचारु लागला की तो तिचा सख्खा भाऊ कसा? शिवाय त्यानं तिला खरी ओळख का सांगीतली नाही? त्यावर जोल म्हणाला,
"मी जेव्हा लहान होतो आणि आपल्या मायबापाच्या मृत्युनंतर आपल्या बहिणीला सांभाळत होतो. त्यावेळेस मी भीक मागत होतो. तेव्हाच मला पोलिसांनी उचलून नेलं. मी गयावयाही केली. परंतु मला त्यांनी सोडलं नाही व मला सुधारगृहात टाकलं. परंतु मी जेव्हा सुधारगृहात होतो व ती शिक्षा पुर्ण केल्यावर मी जेव्हा सुटलो. तेव्हा मी गावाला गेलो. त्यानंतर मी जयाचा शोध घेतला. ती दिसली नाही कुठेच. मग हरहळलो व मला नेणाऱ्या यंत्रणेचा मला राग आला. त्यानंतर मी असा गुन्हा केला की अजूनही त्याची शिक्षा भोगत आहे. मी गुन्हेगार असल्यानं ती गोष्ट मी मनात दाबून ठेवली. मला माहीत पडलं होतं अवकाशयानात की जया ही माझीच बहीण आहे व तुही माझाच जुना बालपणाचा मित्र. तरीही मी माझी प्रतिमा तुमच्यासमोर आणली नाही. कारण मला वाटत होतं की जी माझी बहीण एवढ्या संकटावर मात करुन एवढं मोठं शिक्षण शिकली. आज अंतराळवीर बनली आणि आज विवाहबद्ध होत आहे त्या जॉनशी. जो जॉन तिला चाहतो. कदाचीत त्या जॉनला जर माहीत झालं की तिचा भाऊ एक गुन्हेगारी जगताची शिकार आहे. तर तो तिच्याशी विवाहबद्ध होणार नाही किंवा तिला सोडून देईल विवाहानंतर. म्हणूनच मी चूप बसलो व तिलाही ती गोष्ट सांगीतली नाही. परंतु आज ती नसल्यानं ती गोष्ट तुला सांगाविशी वाटली. जी गोष्ट माझ्या मनात खदखदत होती आजपर्यंत. मला आजपर्यंत तीच गोष्ट सतावत होती. मला ती गोष्ट झोपही घेवू देत नव्हती पुरेशी. आज ते सत्य सांगताच थोडं मन हलकंही झाल्यासारखं वाटतं."
जॉननं ते जोलचं बोलणं ऐकलं. तसा तो म्हणाला,
"तर तू गुन्हेगारी जगताची शिकार आहे तर?"
"होय, मी गुन्हेगारच आहे."
"मग मी सोडवणूक करणार तुझी या गुन्हेगारी जगातून. ती माझी जबाबदारी."
जॉन बोलून गेला. तसा जोल तेथून काहीही न बोलता निघून गेला. त्यानंतर काही दिवसांतच तो सुधारला व त्यानं जोलचा अंतराळवीराचा हवाला देत त्याची केस न्यायालयात सादर केली व त्याला बा इज्जत बरी केले. त्यानंतर त्याला आठवलं की जयाची एक मुलगीही होती की जिची व्यवस्था एका आश्रमात करण्यात आली होती. जयानं समजा मला काही झाल्यास तिची जबाबदारी सरकारनं उचलावी असं सरकारकडून शपथपत्र करुन घेतलं होतं. त्या मुलीला त्यानं आपल्याजवळ आणलं व तिचा सांभाळ तो आपली मुलगी म्हणून करु लागला होता.
जोलला कधी कधी जयाची आठवण येत असे. तेव्हा तो जॉनला भेटायला जात असे. त्यानंतर तो जॉनशी गप्पा मारत असे व तो आपल्या भाचीलाही भेटत असे. तिला पाहताच तो गदगद होवून जात असे. कारण तिच्यातच त्याला त्याची इवलीशी सहा वर्षाची बहीण दिसत असे. ज्या वयात त्यानं तिचा साथ सोडला होता. जणू आपल्या दुर्दैवी प्रारब्धामुळंच.
आज ती अवकाश यात्रा पार पडली होती व त्याला बरेच दिवस झाले होते. ज्यातून जयासह कित्येक अंतराळवीरांचे जीव गेले होते. आज जॉन आणि जोलही जीवंत नव्हता. परंतु ते बलिदान वाया गेलं नाही. कारण काही दिवसानं बुध आणि शुक्रावरील ॲसीडचा पडणारा पाऊस हळूहळू शांत झाला होता व तिथं आता पृथ्वीसारखीच जीवसृष्टीही दिसू लागली होती. तसंच मंगळावर गतकाळात पाणी जरी नसलं तरी पृथ्वीवासीय लोकांनी मंगळावरही वस्ती वसवली होती व तिथंही पाणी निर्माण केलं होतं.
आज पृथ्वीवासीय लोकं राहायला केवळ मंगळावरच पोहोचले नव्हते तर त्याही पलिकडे युरेनस व नेपच्यून ग्रहांवर पोहोचलं होते. व्यतिरीक्त त्यांनी दुसऱ्याही आकाशगंगेवर ताबा मिळवला होता. हे सर्व जॉनच्या अवकाशीय प्रवासानं शक्य झालं होतं. कारण जॉननं अवकाश यात्रा करुन अवकाशातून अशी माहिती पृथ्वीवर आणली होती की त्या माहितीच्या आधारावर परग्रहांवरही वस्ती करता येणं शक्य झालं होतं. आकाशगंगेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आज शास्रज्ञांनी कितीतरी आकाशगंगा शोधल्या होत्या आणि शोधत होते. त्या आकाशगंगेचं निरीक्षण करुन शास्रज्ञांनी त्या आकाशगंगेला कितीतरी प्रकारची नावेही दिली होती. जसं, सर्पील आकाशगंगा, ज्या दुर्बीणीतून पाहिल्यास सर्पाच्या आकाराच्या दिसायच्या. अंडाकार आकाशगंगा, ज्या आकाशगंगा अंड्याच्या आकाराच्या दिसायच्या. तशाच गोलाकार आकाशगंगा, या आकाशगंगा ह्या गोलाकारच दिसायच्या. शिवाय त्या त्या आकाशगंगेनुसार त्याचं त्याचं गुरुत्वाकर्षण असायचं आणि त्या गुरुत्वाकर्षणानं त्या त्या आकाशगंगेतील ताऱ्यांचे पुंजके एकमेकांशी घट्ट चिपकून राहायचे. ज्यात काही ग्रह, धुमकेतू आणि उपग्रहही असायचे. आज जॉन नव्हता. परंतु जॉननं म्हटलं होतं की अवकाशात अशीही एक शक्ती कार्यरत आहे. जिला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणता येईल. त्याच शक्तीला ब्रम्हांड शक्ती असं दुसरंही नाव देता येईल की ज्या शक्तीद्वारे त्या त्या आकाशगंगेनं आपलं एक वेगळं कुटूंब बनवलं आहे व ती स्वतंत्र्यपणे अवकाशात विहार करीत असते. जसे आपल्या पृथ्वीवर आपण आपल्या कुटूंबात एकमेकांशी नात्याच्या धाग्यात घट्ट गुंफले गेलेलो असतो. तेही गुरुत्वाकर्षणच असतं नात्याचं. त्याला नातलग असं नाव आहे व तोही एक गुरुत्वाकर्षणाचाच प्रकार आहे. तसंच आपल्या आकाशगंगेच्या बाहेर ज्या नवीन आकाशगंगा गुरुत्वाकर्षणानं एकमेकांना घट्ट चिकटून आहेत, त्यालाही नाव आहे. ते नाव म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि या सर्वांची गुरुत्वाकर्षण शक्ती जरी वेगवेगळी असली तरी त्या सर्व शक्तींना एकच नाव दिलं गेलं आहे ब्रम्हांड शक्ती. ही ब्रम्हांड शक्ती ज्याप्रमाणे, आपल्या घरी आपले वडील किंवा आई आपल्या घरातील मुखिया असतात. तशीच एक शक्तीही सर्व आकाशगंगेतील गुरुत्वाकर्षण शक्तीची मुखिया शक्ती आहे. जिला ब्रम्हांड शक्ती असं म्हणतात. हेच तत्वज्ञान प्रसवलं होतं जॉननं.
आज जॉन जगात नव्हता आणि तो कित्येक पिढीपुर्वी मरण पावला होता. परंतु त्यानं प्रसवलेलं तत्वज्ञान व त्यानं केलेलं अवकाशीय निरीक्षण आज विद्यार्थ्यांना शाळेत शिकवलं जात होतं आणि विद्यार्थी ते तत्वज्ञान अगदी आनंदानं शिकत होते. मग ते कोणत्याही ग्रहांवरील रहिवासी का असेना. सोबतच जोल आणि जयाचीही कहाणी शिकवली जात होती वर्गावर्गात. ज्यात जयानं आपलं पोट भरण्यासाठी काय काय केलं. उकीरड्यावरच्या अन्नानं व खिचडीनं तिला कसं जगवलं? तसाच जोलचा गुन्हा नसतांनाही तो गुन्हेगार कसा बनला? याचं वर्णन असायचं. खरं तर हे तिन्ही जण ब्रम्हांडाचे सोबतीच बनले होते. कारण त्यांनी संपुर्ण ब्रम्हांडाचीच यात्रा केली होती.
जॉनची ती अवकाश यात्रा ब्रम्हांड यात्राच होती. कारण त्यांनी आपल्या अवकाशयात्रेदरम्यान सर्व आकाशगंगा पाहिल्या होत्या आणि भाकीत केलं होतं की त्या आकाशगंगेतही असे बरेचसे ग्रह आहेत की ज्या ग्रहांवर वस्ती करता येवू शकते आणि त्याच भाकीतानुसार आज पृथ्वीवासीय लोकं वस्ती करायला गेले होते.
आज लोकांचा लोकसंख्येचा प्रश्न सुटला होता नव्हे तर सोडवता आला होता. कारण परग्रहावर लोकांना वस्ती करता आली होती. तसाच पाण्याचाही प्रश्न सुटला होता. कारण परग्रहावर वस्ती करतांना माणसानं पाणीही आपल्या तंत्रज्ञानानं सहज उपलब्ध केलं होतं नव्हे त्यांनी आपल्या अधिवासानंतर परग्रहावरही जीवसृष्टी निर्माण केली होती.
आज हिंदू मुस्लीमांची भांडणही होत नव्हती. ते सर्व एकोप्यानं राहात होते. त्याचं कारण होतं संकट. जेव्हा पृथ्वीवर पाण्याचं संकट निर्माण झालं होतं आणि तापमान वाढलं होतं. त्यातच माणसं मरु लागताच त्यांना त्या संकटांशी दोन हात करण्याची वेळ आली होती. त्यावेळेस माणसांनी माणुसकी जागवून त्या संकटांवर मात करण्याचा विचार केला होता. त्यातच त्यांनी तो प्रश्न सोडवला होता व इतर ग्रहांवर आपली वस्ती वसवली होती. धर्म धर्म करीत बसले नव्हते. तशीच इतर ग्रहांवर वस्ती वसविणारी मंडळी ही जात पात मानणारी नव्हती. ती ना धर्मही मानत होती. संघर्ष हा नव्हताच तिथं. कारण त्या ग्रहांवर वेगळाच परीसर होता व वेगळीच जीवसृष्टीही होती.
आज असा कोणताच अब्दुल अवकाशातील परग्रहावर जन्म घेत नव्हता की जो दुसऱ्याचे विचार ऐकून आपल्याच विचारात विष कालवेल. तसाच असेही कोणी नव्हते की जे अब्दुलच्या विचारात विष कालवतील. शिवाय असाही त्या परग्रहावर समाज नव्हता की तो जयासारख्या लहान मुलींना अनाथाचं जीवन जगायला लावेल. शिवाय जोलला गुन्हेगार ठरवेल. परग्रहावर तोच माणूस वसला होता. ज्यात माणूसकी होती. प्रेम होतं. माया होती. तसाच शत्रुत्वाला थारा नव्हता की जो त्या शत्रुत्वानं एकमेकांना संपवून टाकेल. तेथे वसलेल्या सर्व माणसांनी भोगला होता पृथ्वीवरील विनाश. तो विनाश त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला होता. म्हणूनच ते सुधरले होते व आता परग्रहावर वस्ती केल्यावर कोणी कोणाशी झगडत नव्हते.
त्या लोकांनी भोगला होता पृथ्वीवरील विनाश. तो त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला होता. तो विनाश झाला होता, माणसानं माणुसकी सोडल्यानं हे त्यांना माहीत होतं. माणसानं जंगलं कापली होती. त्यामुळंच झाडं कमी झाले होते. प्राणीही संपले होते. झाडं संपली असल्यानं ऑक्सिजनचा साठाही संपून गेला होता. त्यामुळंच ओझोन वायूचा थर पातळ झाला होता व ओझोन वायूच्या थराला अनेक छिद्र पडून सुर्याची अतिनील किरणं पृथ्वीवर थेट पोहोचत असल्यामुळे तापमान वाढले होते. अशा तापमानानं जलस्तर सुकला होता. त्यातच माणसं होरपळून मरण पावली होती. जी काही वाचली होती. ती परग्रहांवर वस्ती करण्यासाठी निघून गेली होती. आता परीवर्तन झालं होतं सृष्टीचं. सृष्टीनंही परीवर्तन केलं होतं. ते परीवर्तन म्हणजे पृथ्वीवर आता सतत ॲसीडचा पाऊस पडत होता आणि बुध व शुक्रावर तसेच इतर ग्रहांवर पडणारा ॲसीडचा पाऊस शांत होवून त्याचं रुपांतर शुद्ध पाण्यात झालं होतं. ज्याचा उपयोग तेथेच पृथ्वीवरील वसलेल्या माणसांना होत होता. जो प्रश्न जॉन, जोल आणि जयानं अवकाशाची यात्रा करुन सोडवला होता. ज्यांनी स्वतःच्या आपल्याच जीवावर उदार होवून तो प्रश्न सोडवला होता.

*************************************************************************समाप्त *****************