अद्भूत रामायण गिरीश द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अद्भूत रामायण

अद्भूत रामायण 
आपल्या वाचनात वाल्मिकी रामायण आले आहे. परंतु रामायण आणि देखील आहेत. कंब रामायण- तामिळ २) रंगनाथ रामायण -तेलगू ३.कागभुषुंडी रामायण. ४. अध्यात्म रामायण. इ.
आता आपण बघणार आहोत अद्भूत रामायण.
नावावरून कळते तसेच यातील विषय अद्भूत आहे.
तो म्हणजे सहस्रमुख रावणाचा सीता देवी कडून वध.
सीतेचे महत्व सांगताना पुरुष व प्रकृति मध्ये फरक नसून दोघे एकच आहेत असे सांगितले आहे.
हे रामायण तीन भागात आहे.
पहिला भाग श्रीराम व सीता यांची जन्मकथा तसेच नारदमुनी यांना गायन विद्येची प्राप्ती कशी झाली ते लिहिले आहे.
दुसरा भाग रावणवधापूर्विचे रामायण.
तिसरा भाग रावणवधानंतर श्रीराम व सीता अयोध्येत येतात व त्यानंतर सहस्रमुख रावणाचा वध ही कथा आहे.
रामायणाची कथा शंभर कोटी श्लोकांची असून ते रामायण ब्रह्म लोकांत प्रतिष्ठित आहे.
पृथ्वीवर जे रामायण देवता, ऋषी व सर्व लोकांच्या ऐकण्यात किंवा वाचनात आहे ते पंचवीस हजार श्लोकांचे आहे. परंतु मोठ्या रामायणात एक गुप्त गोष्ट आहे जी लोकांना माहीत नाही.
प्रचलित रामायणात नसलेले सीतेचे महान असे चरित्र आपण आता जाणून घेणार आहोत. 
सीता उर्फ जानकी ही सृष्टीतील मुलभूत महागुणसंपन्न प्रकृति आहे.
तप, ऐश्वर्य आणि सिद्धी चे ती मुर्तिमंत रुप आहे.
जेव्हा धर्म संकटात सापडतो किंवा अधर्म वाढतो तेव्हा प्रकृतिची उत्पत्ती होते. 
श्रीराम हे साक्षात परमपुरुष आहेत. सीता व राम यामध्ये भेद नाही. ज्या संतांना हे तत्व कळते ते ज्ञानी होतात व संसारातील जीवन मरणाच्या फेऱ्यातून सुटतात.
श्रीराम नित्य, सर्वसाक्षी, व सर्व लोकांचे उत्पत्ति कर्ता , पालनकर्ता व संहारक आहेत. 
हे अद्भूत रामायण वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या सर्वांचे कल्याण होते.
त्रिशंकूची पत्नी पवित्र व शुभलक्षणी होती. ती नेहमी विष्णूंचे स्मरण व पुजा अर्चा करत असे.
पुजा करताना फुलांच्या माळा करणे, गंध उगाळणे, धुप दिप या सर्व क्रिया ती स्वतःच्या हाताने करीत असे आणि नारायण, अनंत इत्यादी नावे घेऊन स्मरण करीत असे.
दहा हजार वर्षांनी एक दिवस नारायण तीच्या समोर आले व विचारले तुला कोणता वर हवा आहे तो माग.
तेव्हा तीने मला तेजस्वी, पराक्रमी, व विष्णू प्रती भक्ती भाव असणारा असा पुत्र लाभु दे असे सांगितले.
तेव्हा त्यांनी तीला एक फळ दिले. नंतर तीने हा सर्व वृत्तांत पतीला सांगितला व ते फळ गृहण केले .
योग्य वेळी सर्व शुभ चक्र चिन्हानी युक्त अशा पुत्राचा जन्म झाला. सर्व धार्मिक विधी केले गेले व त्याचे नाव अम्बरिष असे ठेवले.
त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर त्याला राज्याभिषेक केला पण त्याने राज्य मंत्रिमंडळाच्या ताब्यात दिले व एक हजार वर्षे पुरुषोत्तमाचा जप केला.
एक दिवस श्रीविष्णु आले पण त्यानी‌ इंद्राचे रुप घेतले आणि म्हणाले मी इंद्र आहे, तुला काय वरदान देऊ. तेव्हा राजा म्हणाला, मी आपल्या साठी तप केले नाही, मी नारायणाचे तप केले आहे कृपया आपण जाऊ शकता.
 तेव्हा विष्णूनी आपले गदा चक्र धारी रुप प्रगट केले.
राजा म्हणाला, हे जगन्नाथ, आपण आदि, अनादी, अनंत, पुरुष आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. विष्णू म्हणाले, मी भक्त प्रिय आहे, तुला पाहिजे तो वर माग. 
राजा म्हणाला, माझी बुद्धी कायम आपल्या भक्तीत राहूदे. काया वाचा मनाने मी आपली सेवा‌ करत राहूदे.
मी सर्वांना विष्णू भक्ती चा उपदेश करत व वैष्णवांचे रक्षण करत पृथ्वीचे पालन करणार आहे.
विष्णूंनी वर दिला की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील . माझं सुदर्शनचक्र शत्रू, रोग, शाप इ. सर्वांपासून तुझे रक्षण करेल व तुला सर्व सुखे प्राप्त होतील.
त्यानंतर राजाने नगरीत प्रवेश केला व सर्वांना योग्यते प्रमाणे कामे करण्यासाठी नियुक्त केले.
अनेक यज्ञ करून तो पृथ्वीवर राज्य करीत होता. त्या राज्यात अन्न, चारा, इत्यादी मुबलक होते. लोक रोगराई पासून मुक्त होते. 
राजाला सुलक्षणी व रुपवती अशी श्रीमती नावाची कन्या होती. एकदा राजाकडे नारदमुनी व पर्वत ऋषी आले. त्यानी विचारले ही देवतेसमान कन्या कोण आहे. तेव्हा राजाने ती आपली कन्या असल्याचे व तीच्या साठी वर शोधत असल्याचे सांगितले.