प्रेमावर बंधन नकोच Ankush Shingade द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमावर बंधन नकोच

प्रेमावर बंधन ; असावेच?         

           तो राजेशाहीचा काळ व त्या काळात अनैतिक कृत्य केल्यास मिळणारी शिक्षा. ती शिक्षा काही आजच्यासारखी नव्हतीच. त्या काळात कोणत्याही व्यक्तीनं अनैतिक कर्म केल्यास कोणताही राजा न्याय करतांना सरळ मृत्यूदंडच द्यायचा. तसं पाहिल्यास त्या काळात प्रेमाला कोणत्याही स्वरुपाचा वाव नव्हताच.        

           तो काळ व त्या काळात लोकसंख्याही कमी प्रमाणात होती. गाव होतं व गावाचीही लोकसंख्या जेमतेमच असायची. त्यातच प्रेमाला बंधन होतं. प्रेम जर झालं आणि असं आढळून आलं तर गावपंचायत बसायची. ज्यात पाठीवर कोडे मारले जात. ज्यामुळं शरीर रक्तबंबाळ व्हायचं. वळ यायचे,  दुखणं भरायचं व ते दुखणं कितीतरी दिवस पुरायचं. काही काही ठिकाणी प्रेम आढळून आल्यास वाळीतही टाकलं जात असे, तेही संपुर्ण बिरादरीला. काही काही ठिकाणी सरळ मृत्युदंड. तसे गावातील कायदेही महाभयंकर स्वरुपाचे होते.           प्रेम हे जातीतल्याच तरुणासोबत होत असे असं नाही तर ते प्रेम इतरही जातीच्या मुलासोबत व्हायचं. शिवाय असं प्रेम झालंच आणि तसं आढळून आल्यास पुरुषसत्ताक पद्धती असल्यानं पुरुषांना जबाबदार धरलं जात नसे तर जबाबदार धरलं जात असे स्रियांना. जरी स्रियांचा दोष त्यात नसला तरी. मात्र पुरुषच स्रियांना फुस्स लावत असत. असंच प्रेम होतं व नाईलाजानं आपल्याला वाळीत टाकलं जातं व समाजाचा रोष सहन करावा लागतो म्हणून लोकं आपल्या मुलीचा विवाह अगदी बालवयातच लावून देत. त्याचं कारण होतं कुटूंबाची होणारी बदनामी. कुटूंबाची बदनामी होते म्हणून ती मंडळी बालविवाहच नाही तर एखादी स्री गरोदर असली तर तिच्या पोटालाच कुंकू लावून देत. मुलगी जर झाली तर आम्ही तिचा आपली स्नुषा म्हणून स्विकार करु. त्यानंतर त्या मुलीचा विवाह होताच तिच्यावर बारीक नजर ठेवली जात असे. परंतु असंही जरी झालं तरी प्रेम होत नव्हतं असं नाही. कितीही कडक बंधनं असली तरी प्रेम व्हायचंच. प्रेमाला जरी बंधन असलं तरी त्या काळातही लोकांचं प्रेम करणं बंद नव्हतं. लोकं प्रेम करतच असत.           असेच गावातील प्रेमी युगल. ते युगल वयात येताच प्रेम करायचे नव्हे तर त्यांच्यातही प्रेम व्हायचंच, जरी वाळीत टाकण्यासारख्या गोष्टी होत असल्या तरी. अशातच समजा एखाद्या मायबापाची मुलगी पळून गेलीच तर तिनं नाक कापले असं समजलं जाई व ती आपल्यासाठी मरण पावली असे समजून तिची तेरवी, चौदावी वा तिसरा दिवस तिच्या जीवंतपणीच केलं जाई. त्यानंतर त्या मुलीच्या कार्यकक्षा संपत व ती मुलगी पुन्हा कधी परत कुटूंबात येत नसे. ती मुलगी लागस विहीरीत जीव देवून आत्महत्या करीत असे. परंतु परत येत नसे कुटूंबाचा आधार घ्यायला. शिवाय एखादी मुलगी अशी पळून गेलीच तर काही मायबाप आपल्याला तोंड दाखवायला जागाच राहिली नाही. असा अर्थ घेवून तेही खुशाल आत्महत्याच करीत असत.         तो प्राचीन काळ व त्या काळात असलेला स्रियांचा दुय्यम दर्जा. स्री ही उपभोग्य वस्तू आहे असंच मानलं जायचं. शिवाय प्रेमाला बंधन होतं. तरीही प्रेम करणारे लोकं होतेच. ते लपूनछपून प्रेम करीत असत. परंतु त्या काळात ते लपूनछपून प्रेम जरी असलं तरी त्या प्रेमातून काही समस्या उभ्या राहात. ज्या समस्या होत्या गर्भपात न होणं वा गर्भपात करता न येणं. शिवाय अशा प्रेमातून समजा एखाद्या स्रिला गर्भपात राहिलाच तर ती आपला गर्भपात करु शकत नसे खुल्यामनाने. त्याची औषधही घराघरात माहीत नव्हती ना त्या काळात तंत्रज्ञानाची आधुनिक काळात जशी आहेत, तशी साधनं उपलब्ध नव्हती. शिवाय अशी स्री एखाद्या घरी आढळून आल्यास तिला कुलथा वा डायन समजलं जाई व अशा डायन समाजात नसाव्यात वा असं कोणीही करु नये म्हणून तिला मारुन टाकलं जाई विना अपराधानं. तो अपराध नसतांना अपराधच समजला जात असे.         गर्भपात हा गुन्हाच होता त्या काळात. मग ती राजकन्या का असेना. गर्भपातावरही त्याही काळात उपाय होताच. तो उपाय एखादा मांत्रीक करीत असे. परंतु त्यात तो गुन्हा धरला जात असल्यानं त्या स्रिची समाजात बदनामी होत असे व त्यातच विटंबनाही. कधीकधी एखाद्यावेळेस एखाद्या स्रिचा हाही अपराध क्षम्य होत असे, जर ती स्री एखाद्या राजाची कन्या असेल तर..... शिवाय त्या काळात ती मुलगी गरोदर आहे, हे आजच्यासारखी तंत्रज्ञान साधनं उपलब्ध नसल्यानं लवकर कळत नसे व गर्भपात होत नसल्यानं तिला नाईलाजानं त्या बाळासकट आत्महत्या करावी लागत असे वा एखाद्या बंद खोलीत बाळ विकसनाचे नऊही महिने राहून बाळाला जन्माला घालावे लागत असे. ज्यात बाळ जन्मानंतर ते बाळ मारुन फेकलं जाई वा त्या बाळाला बंद पेटीत ठेवून ते नदीप्रवाहात सोडून दिलं जाई. गर्भपात हा त्या काळात गुन्हाच होता समाजानं ठरवून दिलेला. आजही तो गुन्हाच आहे. काल प्रेमाला बंधन होतं व कालच्यासारखं बंधन असलेलं प्रेम आजही कोणत्याच मुलीला खुलेपणानं करता येत नाही. ते प्रेम अनैतिक स्वरुपाचं मानलं जातं, जरी आज समाजसुधारणा झाली असली तरी. आजही काही काही ठिकाणी अशा प्रेमातून मुलीच्या आत्महत्याच झालेल्या दिसतात तर काही काही ठिकाणी तिचाया आईवडीलांच्या होत असलेल्या वा घडूनायेत असलेल्या आत्महत्याच आढळून येत असतात. महत्वपुर्ण सांगायचं झाल्यास आजही कालसारखी प्रेमाला बंदी असल्यानं मुलांमुलींनी वयात आल्यावर प्रेम करु नये काय? तर त्याच उत्तर नाही असंच देता येईल. त्याचं कारण आहे आज समाजाचं प्रेमाबाबतीत असलेलं बंधन. काल जसं युवक युवतीचं वयात आल्यावर प्रेम व्हायचं. मग तो गर्भ पडायचा नाही. शिवाय पुरुष असलेला मुलगा हा तिला अकाली सोडून द्यायचा. तिला प्रसंगी साथ द्यायचा नाही व मदतही करायचा नाही. कधीकधी तर तिला जंगलात नेवून तिचीच हत्याही करायचा, आपली बदनामी होवू नये म्हणून. कधी तो सोडून गेल्यास तिलाच असे भोग भोगावे लागायचे. समाजाचा तिच्याकडे पाहायचा दृष्टिकोन हा तिरस्काराचाच असायचा. ज्यातून आयुष्यभर एका कुलथेचं जीवन जगावं लागायचं. कधी मायबाप तर कधी तिचे मृत्यू. म्हणूनच त्या काळात प्रत्येक मायबाप आपल्या मुलीला तशा स्वरुपाचे पाऊल टाकूच देत नसत. ते प्रेम टाकायची मनाई होती. कारण त्यांना समजत असे प्रेमाचा अंत व प्रेम केल्यावर आपली दुर्दशा काय होते ती.            आज समाजसुधारणा झाली व अत्याधुनिक गर्भपात करण्याची साधनं आलीत. गर्भपाताबाबत निरनिराळ्या औषधीदेखील आल्या. त्यानुसार आज प्रेमही खुल्यास्वरुपानं व्हायला लागले आहेत. परंतु काळ बदलला आहे का? तर त्याचंही उत्तर नाही असंच येईल. कारण आजही काळ बदलला नाही व आजही कोणाच्याही मुलीला एक स्री म्हणून खुल्यामनानं प्रेमही करता येत नाही. त्याचं कारण कालसारखंच आहे. काल जशी प्रत्येक मायबापाच्या मनात वा प्रत्येक स्त्रिच्या मनात भीती होती की मी एखाद्या मुलावर प्रेम केल्यास मला आत्महत्या करावी लागेल, माझ्या आईवडिलाला आत्महत्या करावी लागेल.  माझे आईवडीलाला समाज वाळीत टाकेल. मला समाज कुलथा ठरवेल. तीच परिस्थिती आजही आहे. आज समाजसुधारणा झाली आहे व मुली खुल्यामनानं प्रेमही करु शकतात. त्यानंतर त्या मुलीचं काय होतं? हे कोणालाच माहीत नाही. असे प्रेम झाल्यानंतर जे अनैतिक स्वरुपाचे संबंध घडून येतात. त्यातून गरोदर पण येतं व गर्भपात न झाल्यानं मुलींना मुलं चक्कं कालसारखीच सोडून जातात. जरी कायद्याची त्यावर नजर असली तरी कायदाही काहीच करु शकत नाही. कायदा म्हणतो की हे कृत्य करीत असतांना मला विचारलं काय? त्यातून तिच्या आत्महत्याच घडतात कधीकधी मुलं मदत करीत नसल्यानं. कधीकधी प्रेम झाल्यावर ही मुलं त्याच आपल्या प्रेमीकेवर सामुहीक बलात्कार घडवून आणतात नमस्कार पैसे कमवतात. वेदना मात्र एक स्री असल्यानं तिलाच. कधीकधी ही मुलं आपल्याच प्रेमिकेला एखाद्या वेश्यालयात विकून टाकतात. त्यावेळेस ते विचार करीत नाहीत की या मुलीनं आपल्यासाठी आपल्या मायबापालाही सोडलं. कधी यातून काही समजदार मुलं विवाह करतात. हे विवाह कधी आंतरजातीय तर कधी आंतरधर्मीय स्वरुपाचे असतात. परंतु असा विवाह केल्यानंतर तो मुलगा काय करतो? त्या मुलीचं जीवन कसं होतं? याचा विचार कधीच केल्या जात नाही. हे तपासूनच पाहिलं जात नाही. मात्र ज्या मुलीचे असे विवाह होतात किंवा जी मुलगी असा विवाह करते व वेदना भोगते. तीच मुलगी पुढं सांगते की बाबारे आता तरी सावधान व्हा. विवाहासारखा तरी निर्णय आपल्या मायबापाच्या मर्जीनंच घ्या. कारण अशा मुलीला विवाह केल्यानंतर ती मुलं त्याच मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतात व आपण एकाच ठिकाणी बसून ऐषआराम भोगत आपलं संपुर्ण आयुष्य काढत असतात. ते दारुही पीत असतात व त्याचेही पैसे त्या स्रीकडूनच वसूल करीत असतात. बिचाऱ्या मुलीला त्या गोष्टीचा एवढा त्रास होतो आणि पश्चातापही की तिला वाटते आपण असा विवाह केला नसता तर अगदी बरं झालं असतं  परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कधीकधी काही मुलं ही आपल्यावर प्रेम करणाऱ्या त्या मुलीला चक्कं विकून टाकतात वेश्यालयात. आपल्या विनाकारणची मागं कटकट लागू नये म्हणून. हे विशेषतः घडत असतं आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मुलांत. ही वास्तविकता आहे.          आज समाजाला या गोष्टी सांगितल्याच जात नाही. आजच्या समाजाला माहीतच आहेत या गोष्टी. शिवाय हेही माहीत आहे की आज जरी समाजसुधारणा झाली असली तरी काळ बदलला नाही व मानसिकताही बदलली नाही. ती मानसिकता तशीच आहे. म्हणूनच तेच मायबाप आपल्या मुलीला बालपणापासूनच असे संस्कार देतात की त्यांनी कुणावरही प्रेम करु नये. असे प्रेम जर केले गेले तर त्याचे परिणाम गंभीर होतात. हेच सांगत असतात पदोपदी आपल्या मुलीला  परंतु त्या गोष्टी प्रत्येकच वयात येणारी मुलगी ऐकेल तेव्हा ना. प्रत्येक मुलगी त्या गोष्टी ऐकत नाही. ज्यातून आजच्या काळात गुन्हे घडतात व दररोज वर्तमानपत्रात लिहून येतं की अमुक ठिकाणी सामुहीक बलात्कार झाला. अमूक ठिकाणी अनैतिक संबंधातून कत्तल झाली.         महत्वपुर्ण बाब ही की आज जरी समाजसुधारणा झाली असली तरी कोणीही प्रेम करु नये वा प्रेम करुन विवाह करु नये. कारण काळ बदललेला नाही. काळाचं परीवर्तन नक्कीच झालं. परंतु त्यात सुधारणा होण्याऐवजी अधोगती झाली व त्यानुसार आज त्याचे स्वरुप महाभयंकर, विनाशक बनलं. ते असं विनाशक बनलं की ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. हे तेवढंच खरं.           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०