क्षमा - 4 Harshad Molishree द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्षमा - 4

जोराचा पाऊस पडत होता, पोलिसांनी नमनच्या हाताला हातकडी लावली आणि त्याला गाडीत बसवलं.....

घरातून रुग्णशिबिका वर दोन मृत देह रुग्णवाहीका मध्ये ठेवले..... एकी कडे बातमीदार, जोर शोराने बातम्या रेकॉर्ड करत होते.....

"नाव".... इन्स्पेक्टर विजय ने विचारलं

" नमन नारंग पवार".....

"तुम्ही दोन हत्या केले.... तुम्हाला मान्य आहे"....???? Vijay

"हो मान्य आहे".....

"हत्याचा कारण".... विजय ने विचारलं

नमन जरा विचारात पडला....

"हत्याचा कारण".... विजय ने पुन्हा एकदा विचारलं

"साहेब माझी मुलगी ती ठीक आहेना, तिला मी बोललो होतो आजी कडे जायला"....

"मुलगी".... विजय हसायला लागला, नमन त्याचा कडे त्याला हसताना पाहून त्याला रागाने बघायला लागला.

"काय बघतो रे... हत्या करताना मुलीचा विचार नाही आला का.... ती मुलगी २ दिवस त्या घरात एकटी होती, दोन मर्डर केलेस तू त्या लहान मुली समोर, मुलीची येवडी काळजी होती तर तिला सोबत घेऊन जायचं होतं ना.... त्या भयानक कांड नंतर तिला त्या भयावय परस्तिती मध्ये एकटीला सोडून निघून गेला"........

विजय ने नमनला जोरात लात मारली, नमन अगदी भिंतीला जाऊन आपटला.....

"त्या मुलीचा भीतीमुले, भुके मुले.... त्या घाणेरड्या वासात स्वाश कोंबून जीव जाऊ शकतो असा विचार नाही आला का तुला".... विजय ने असं म्हणत नमनला अजून एक लात मारली

"उठ... उठून बस इथं समोर.... चल चल लवकर, बस समोर..... दोन हत्या केलेस तू मुलीला जिवंत का सोडला, तिकडं का सोडलस तिला एकटीला सडून मारण्यासाठी सोडून गेला जोरात का".....???? असं म्हणत विजय ने नमनला डोक्यावर जोरात टपली मारली आणि त्या नंतर प्रश्न विचारात त्याला खूप मारला....

"बायकोला मारलस तुझा.... ठीक आहे, तो माणूस कोण होता.... तिचा बॉयफ्रेंड होता का"....???? विजय ने विचारलं

नमनला फार दुखत होतं, इतकं मार खाल्यानंतर त्याचा तोंडातून शब्द फुटत नव्हते, त्याला भीती ही वाटत होती....

विजय ने त्याला जोरात चापट मारली..... "बोल उत्तर दे".....

"हो सर.... मला काही दिवसा आधी कळलं की माझ्या बायकोचा अफैर चालू आहे..... त्या दिवशी मी जेव्हा घरी आलो बघितलं तर घरी कोण नव्हतं.... माझी बायको माझ्या मुलीला घेऊन दुसऱ्या दिवशी परत आली.... मी तिच्या सोबत बोललो, आमचं या गोष्टीवरून खूप भांडण झाला"....

"तिला माझ्यासोबत नव्हतं रहायचं मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केलं...... पण ती ठाम होती.... शेवटी माझा कडे काय पर्याय नाही उरला"....

"त्या दिवशी पण मी तिला खूप समजावलं.... पण ती एैकायला तयार नव्हती, रागा रागात माहित नाही कुटून माझ्या हातात सूरी आली आणि माझ्या हाताने तिची हत्या झाली"....

नमन रडत रडत बोलत होता, बोलताना त्याची बोबडी वळत होती.....

"मी विनाच्या देहाला कुठे तरी लपवायचं प्रयत्न करत होतो तेव्हाच घराची बेल वाजली, मला काही सुचलं नाही म्हणून मी तिला भिंतीला टेकून बसवून दिलं आणि मी पुढे काय करेन त्या आधीच विहान आला त्याच्या कडे घराची दुसरी चावी होती त्याच्या, त्याने दार उघडलं आणि तो आत बेडरूम, मध्ये आला, त्याला yetana बघून मी कपाटाच्या मागे लपलो".....

"विनाला तश्या अवस्था मध्ये बघताच त्याला संशय आला.... तो विनाच्या जवळ गेला, तिला हात लावताच, ती सरकून खाली पडली"....

"मी पटकन मागून त्याच्या वर अटक आणि सूरी ने त्याच्या पाटीवर घाव केला...... पण तो मला ढकलून पडायला लागला.... मी पण पटकन उठलो आणि त्याच्या मागे धावलो आणि त्याच्या पाटीवर सतत घाव केले, शेवटी तो खाली पडला".....

नमन एक दम शांत झाला..... एका क्षणा साठी शांतता पसरली, विजय सोबत बाकी चे पोलिसवाले नमन कडे एक टाक बघत होते.....

"तुझी मुलगी.... ती कुठे होती येवडा सगळं घडलं तिला जरासा पण आवाज नाही आला, संशय नाही अजिबात".... विजय बोलला

"ती झोपली होती..... तिच्या बेडरूम मध्ये"

"झोपली होती.... बरं", विजय संशात्मक नजरेने नमनला पाहू लागला

"मग.... काय केलंस तू..... पोरीचा विचार नाही आला तुला"....??? विजय ने विचारलं

"नाही मी खूप घाबरलो होतो, मला काहीच सुचत नव्हतं.... मला असं वाटत होतं की माझी बायको आणि विहानचा भूत माझ्या मागे लागले आहे म्हणून मी घाबरून पडून गेलो"..... नमन बोलला

"पडून कुठे गेलास"..... विजय

"लॉजला.... कृष्णा लॉज, पण तिथं पण मला सारखी भीती वाटत होती, सारखं मला माझ्या बायकोचं चेहरा दिसायचं, सतत कानात तिचा आवाज ऐकू येत होता.... म्हणून मी शेवटी वैतागून घरी परत आलो"....

"जेव्हा घरी येऊन क्षमाला बघितलं.... मला समजलं की मी किती मोठी चूक केली, म्हणून मी स्वता तुम्हाला खबर केली"......

"सर माझी मुलगी कुठे आहे.... ठीक आहे ना ती"..... नमन च्या बोलण्यात अगदी काळजीचा भाव होता

"आहे.... आहे ती ऍडमिट आहे हॉस्पिटल मध्ये, घाबरली आहे.... भीती मुले ना कोणाशी बोलते मला कोणाला भेटायला मांगते.... येवढ सगळं घडलं पण तरी तिला फक्त तुला भेटायचं आहे तिच्या तोंडात फक्त एक नाव आहे बाबा".....

हे एैकून नमन.... खुप रडायला लागला

तिथं दवाखान्यात क्षमा.... झोपली होती तिची आजी तिच्या जवळ होती, डॉक्टर म्हणाले.... "तिला आरामाची गरज आहे सोबतच तिला या सगळ्या प्रकरण पासून लांब ठेवा, तिच्या बाळ मनावर परिणाम झालेला दिसतोय..... तिला तुम्ही उदया तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता पण काळजी घ्या".......

नमनला इथं तुरुंगात झोप लागत नव्हती...... सतत त्याच्या डोळ्यासमोर तेच द्रिष्य येत होता, त्याला सतत क्षमाचा आवाज एैकु येत होता.... मधीच त्याला असं वाटायचं की विना त्याचा समोर बसली आहे.....

नमन साठी रात्रीचा वेळहा सरता सरत नव्हता.... पण शेवटी ही काळी रात्र सरली.

सकाळी.... विजय आणि त्याची टीम, विचारपूस करायला, विनाच्या आई कडे गेले....

"मला तर अजूनही विश्वास बसत नाही की.... नमन हे करू शकतो, त्याचं खूप प्रेम होतं विना वर"..... विना ची आई (सुलेखा )

"आणि.... तुमच्या मुलीचा, तिच्या affair बदल.... तुम्हाला काही ठाऊक"..... विजय ने विचारलं

"सुलेखा ने ठाम पणे उत्तर दिला.... या विषयी ती कधीच माझासोबत बोलली नाही".... सुलेखा बोलली

"तुम्ही जे म्हणताय त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे..... पण ठीक आहे काय खरं काय खोटं याची माहिती आम्ही करून घेऊ"..... विजय अगदी खंबीरपणे बोलला

विजय ने क्षमा सोबत बोलण्याच्या प्रयत्न केला पण.... "आई" हे शब्द ऐकताच क्षमा ने तिचे डोळे घाट मिटून घेतले आणि खूप घाबरली.... हे बघून सुलेखा पण ओरडली विजयला आणि विजय शेवटी.... तिथून निघाला

सुलेखा ने क्षमाला सवारला.....

विजय.... नमन ने सांगितलं त्या लॉजला गेला.... तिथून त्याची सगळी डिटेल्स घेतली आणि परत पोलीस स्टेशनला आला....

विजय येऊन बसलाच होता तितक्यात एक हवालदार आत आला.... "सर autopsy report" रिपोर्ट बघताच विजय बोलला हे "कसं शक्य आहे, नाही विजय काय तरी.... सुटतंय तुझाकडून काय तरी आहे जे गुपित ठेवलं जातं आहे "......

To be continued..........