रहस्य - 5 (अंतिम भाग) Harshad Molishree द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रहस्य - 5 (अंतिम भाग)

हरी, सोनू आणि गायत्री विचार करत होते की तिथून कसं निघायचं कसं तेव्हाच तिथं स्वरा आली....

स्वराने हरीच्या डोळ्यावरची पट्टी खोलली आणि हाथ पण.....

"स्वरा..... आता आलीस तू खूप चांगलं फसवलं यार तू".... हरी

"काय ताई आली आहे... ताई"..... गायत्री एकदम उत्सुकता ने बोलली

"हरी शांत हो आवाज करू नको, आधी गायत्री आणि सोनूला सोडव आणि निघ इथून".... स्वरा

हरीने पटकन गायत्री आणि सोनूच्या हातातली रसी सोडली....

"ताई कुठे आहे".... गायत्री

"हां ताई सोबतच आहे तू चल आधी"..... हरी

हरी सोनू आणि गायत्रीला जस तस गुफाच्या बाहेर घेऊन आला, स्वरा हरीला रस्ता दाखवत होती.... हरी स्वराच्या मागे चालत होता, सोनू आणि गायत्री हरीच्या मागे..... चालता चालता ते लोक खूप पुढे निघून आले

"थांबा इतच इथं ते लोक येणार नाही".... स्वरा

"थांबा इथं"..... हरी

"बर आहे.... मी खूप थकली, आता काय माझ्यात हिम्मत नाही चालायची".... सोनू असं म्हणत खाली बसली

"माझी पण".... हरी पण तिथंच बसला

"हरी ताई कुठे आहे.... तू तिला तिथं सोडून आलास का"...??? गायत्री

गायत्री सारखं.... तिच्या ताई बदल विचारात होती, शेवटी हरीने सोनूला सगळं सांगितलं, गायत्री सगळं ऐकल्या नंतर रडायला लागली.....

"हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, मी उगाच तो नक्षा पाठवला".... गायत्री

सोनू ने गायत्रीला समजवलं आणि शांत केलं.....

"हरी ताई आता इथं आहे का"..... गायत्री

"हो तुझ्या समोरच थांबली आहे".… हरी

"ताई please sorry मला माफ कर"..... गायत्री

"हरी तिला सांग राडू नको जे झालं ते झालं"..... स्वरा

हरी ने गायत्रीला समजवलं.... गायत्री शांत झाली

"हरी तिला विचार त्या नक्षाचा रहस्य काय आहे"..... स्वरा

"हा गायत्री आता सांग हे लोक कोण आहेत, कशासाठी तुला अस बांधून ठेवलं होत, त्या नक्षा च्या मागे काय रहस्य आहे".... हरी

"जेव्हा मी इथं आली तेव्हा मला field work दिलं होतं, एक दिवस जेव्हा मी माझ्या co - worker सोबत इथं वनात काही झाडांचा निरक्षण करत होती तेव्हाच आम्हाला काही लोक दिसले, आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि पाठलाग करत आम्ही त्या गुफा जवळ पोचलो, मी जेव्हा आत मध्ये लपून पाहिलं तर तिथं खूप सारे मोठे मोठे box होते ज्यात सोन्याची बिस्कीटं होती"...

"ही बातमी मी जाऊन माझ्या सरांना सांगितलं, त्याने म्हटलं की ठीक आहे ते लोक नकीच आतंकवादी किंवा नकसलवादी असतील.... आम्ही कारवाई करू".....

"त्या दिवशी मी खूप खुश होती, की मी एवढं मोठं काम केलं.... मी तर मोठे मोठे स्वप्न बघत होती की आता माझं पेपर मध्ये नाव येईल असं तसं..... मला झोप लागत नव्हती, म्हणून मी बसल्या बसल्या त्या जागेचा एक नक्षा तयार केला आणि ते ताईला पाठवलं"....

"पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लेटर पोस्ट करून ऑफिस मध्ये आली तेव्हा मला सरांनी सांगितलं की तुझं प्रोमोशन झालं आहे, तुला आता इतःच बसून काम करायचं आहे, मी त्यांना जेव्हा त्या लोकांबदल विचारलं तर सरांनी सांगितलं के ते मी बघतो"....

"बरेच दिवस निघून गेले मी सरांना रोज विचारायची पण नेहमी एकच उतर भेटायचा.... कामावर लक्ष दे ते मी बघून घेईल, पण वर्क दिवस दुपारी ऑफिस मध्ये मी त्या माणसाला बघितलं ज्याला मी त्या गुफा मध्ये पाहिलं होतं, तो आमच्या सरांसोबत त्याच सोन्याची तस्करी ला घेऊन बोलत होता, मला हे जाणून खूप दुःख झालं की सर पण त्यांच्या सोबत मिळून काम करत होते आणि हेच कारण होतं की ह्याच्या बदल कधी कोणाला कळलं नाही".....

"पण मी गप्प बसली नाही मी दुसऱ्याच दिवशी त्या गुफावर गेली ईतल्या forest officer ला घेऊन, पण तो त्याच्याच माणूस निघाला आणि त्यांनी मला तिथं बंधक बनवून एक कोपऱ्यात टाकून दिलं".....

"अच्छा अस व्हय"….... हरी

"पण मग आपण ह्यांना असच सोडू शकत नाही ना"...?? सोनू

"एकदा इथून निघालो की बस्स, मग त्यांना दाखवुया आपण"….. हरी

बोलता बोलता रात्र झाली होती.....

"हरी मला खूप भीती वाटतेय,आपण फटाफट निघुयात इथून"..... सोनू

"नाही रात्र झाली आहे, आता अंधारात आपल्याला रस्ता पण मिळणार नाही, आणि जनावरांची पण भीती आहे"..... गायत्री

"मग तुझं काय म्हणणं आहे इतच थांबायचं"..... हरी

"हो वनाच्या ह्या भागात जनावर खूप कमी येतात, मग काळजी करायची गरज नाही....आपण रात्र इथं काढू शकतो"... गायत्री

"आणि जर चुकन ऐकादा जनावर आला तर"... सोनू

"तर मी आहेना.... मी वाचवेन तुम्हाला"..... स्वरा

"गप मला तर तुझवर भरोसा ऱ्हाईलाच नाहीये".....हरी अगदी चिडून बोलला

"हरी मी आहे ना".... स्वरा

"नाही ही वेळेवर गायब होते माहीत आहे ना".... हरी

"हरी ताई आता अस नाही करनार, मी सांगते ना".... गायत्री स्वराची बाजू घेत म्हणाली

"हो हरी इथच थांबूया, दुसरा काय पर्याय पण नाही आहे".... सोनू

"बर ठीक आहे"..... हरी

सोनू समोर जाऊन एका झाडाला टेकून बसली, तेच हरी आणि गायत्री पण तिथे जाऊन बसले, थोडा वेळ नंतर तिघ झोपले.... अचानक रात्री हरीला सिंहच्या गर्जनाचा आवाज ऐकू आला, हरी घाबरून उठला बघितलं तर स्वरा समोरच होती

"काय नाही हरी... झोप मी आहे".... स्वरा अगदी प्रेमाने बोलली

"पण हा आवाज कसा आला".... हरी

"कसा आला म्हणजे, आता जंगलात काय तुला गाणं ऐकू येणार आहे इतक्या रात्री".... स्वरा

"हा ते पण आहे.... तू जाऊ नकोस हा थांब इतःच".... हरी

"हो इतःच आहे मी झोप तू"... स्वरा

हरी झोपला.... सकाळ झाली हरी जसाच उठला त्याने पाहिलं की समोर साहिल थांबला आहे हातात बंदूक घेऊन त्याच्या ३ माणसांसोबत, हरीने पटकन गायत्री आणि सोनूला उठवलं.....

सोनू आणि गायत्री डचकल्या साहिलला बघून.....

"मी तर तुला खूप साधा समजत होतो, पण इत परंत आलास तू"..... साहिल

"स्वरा... स्वरा".... हरी स्वराला हाक मारू लागला

"हरी काय करतोय".....सोनू

"स्वराला बोलवतोय अजून काय".....हरी

"ही कोण आहे तुमच्यासोबत"..... साहिल

"ही... ना कोण नाही, अशीच मैत्रीण आहे सोनूची".... हरी

"झालं, आता खर सांग".... साहिल

"हरी, तुला साधं खोटं बोलता येत नाही"....सोनू

"भांडून घे... नाही आधी तू भांडून घे, हा नंतर मारेल आधी तूच मार"....हरी

"ऐ.... झालं का तुमचं, आता सांग ही कोण आहे".... साहिल

"ही... गायत्री आहे"..... सोनू

"गायत्री म्हणजे स्वरा ची बहीण"....साहिल

"हा"..... हरी आणि सोनू दोघ एकत्रच म्हणाले

"मग तर मस्त काम झालं, तशी साला हा नक्षा काय कामाचा नाहीये.... आता तूच घेऊन चल आम्हाला त्या गुफा पर्यंत".... साहिल

"नाही आम्ही परत कुठे".... हरी

गायत्री काहीच बोलत नव्हती, तेच सोनूला सुचत नव्हतं की काय करावं सोनू सारखं मनातल्या मनात स्वराला आठवत होती पण स्वरा काय माहीत कुठे गायब झाली होती...

"चला... चला".... म्हणत साहिल चे माणसं त्यांना पुढे ढकलायला लागले...

"हरी ताई कुठे आहे"..... गायत्री हळूच बोलली

"बघितलं तुझ्या ताईला नेहमी असच फसवते मला"..... हरी

"ऐ हे खुसुर फुसुर बंद करा".... साहिल

"देवा काय चालय.... नाही म्हणजे एकदाच ठरवं की काय करायचं आहे तुला माझ्या सोबत, एकत्र इतक्या मुश्कील ने तिथून सुटून आलो होतो आणि आता हा.... परत तितच घेऊन चालला आहे"..... हरी मनातच बोलला

साहिल त्यांना जबरदस्ती त्या गुफावर घेऊन गेला, गुफच्या आत मध्ये गेल्यानंतर साहिल ने पाहिलं की तिथं boxes मध्ये भर भरुन सोनं होतं..... साहिल तर ते सोनं बघून वेडाच झाला, पम तेव्हाच ते तस्करी वाले तिथं पोचले.... साहिल आणि त्या गुंडांची मुदभेड झाली ते लोक एक मेकांना त्या सोन्या साठी होते, तेव्हाच वेळ पाहून सोनू गायत्री आणि हरी तिथून पळून गेले.....

पुढे आल्यावर हरीला स्वरा दिसली.....

"तू आता आलीस, तू काय मागच्या जन्माला पोलिसवाली होती.... नेहमी उशिरा येते"... हरी

"हरी चल धाव फटाफट बोलत काय बसला आहेस तू"..... सोनू

"हा... हा".... हरी परत धावायला लागला, गायत्री आणि सोनू पण हरीच्या मागे मागे धावत होते आणि ते लोक वाणाच्या बाहेर रस्त्यावर पोचले....

"हरी आता सगळ्यात आधी गायत्रीला पोलीस कडे घेऊन जा आणि इथं काय चाललं आहे ते सगळं नीट सांगून पोलिसांना इथं घेऊन ये".... स्वरा

"हो".... हरी

हरी तिथून गायत्री आणि सोनूला घेऊन तिकडच्या लोकल पोलीस स्टेशन ला पोचला आणि त्यांनी त्या सोन्याच्या तस्करी बदल सगळं सांगितलं....

पोलीस पटकन त्या गुफावर आली हरी सोबत.... तिथं येऊन बघितलं तर ते लोक सगळे खाली पडले होते, त्यांच्या पैकी काय लोक मारा मारी करताना मेली आणि जे लोक जिवंत होते त्यांना पोलिसांनी पकडलं, साहिलला पण मात्र त्यांनी जिवंत पकडलं, गुफेतलं सगळं सोनं पोलिसांनी जप्त करून टाकलं.... ते ही नाही कारवाई नंतर पोलिसांना खात्री झाली की वनविभागातले काही उच्च अधिकारी पण ह्या तस्करी मध्ये शामिल होते पोलिसांनी त्यांच्यावर पण अटक केली.....

सगळं आता आधी सारख झालं होतं.... गायत्री हरी आणि सोनू सोबत मुबईला परत आली....

गायत्रीची बहीण स्वरा जिवंत नव्हती पण तिला सोनू च्या रुपात एक नवीन बहीण भेटली, सोनू गायत्रीला तेवढच लाड करायची.... आणि हरी पण....

स्वरा अजून पण आहे तशीच आहे, अजून पण स्वरा हरीला कधी कधी झोपुदेत नाही, खूप हैरान करते, स्वराला नुसतीच मज्जा येते जेव्हा हरी चिडतो, हरीला पण आता सवय झाली आहे ह्या सगळ्यांची, हरीला आता स्वराची भीती नाही वाटत पण सोनूशी मात्र अजूनही घाबरतो.....

धन्यवाद....!

― हर्षद मॉलिश्री ―

------------------------------------------------------ Happy Ending ---------------------------------------------------------------------