आर्या... ( भाग १ ) suchitra gaikwad Sadawarte द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आर्या... ( भाग १ )

आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी !  आर्याच्या जन्माची कथा .... आई ही एक सुशिक्षित घरातील स्त्री होती . जी एक मेहनतीने शिक्षण घेऊन तिच्या पायावर उभी झाली होती . आर्या चे वडिल ही एक चांगल्या सुसंस्कृत घरातील मुलगा होता आणि तो सुद्धा त्याच्या पायावर स्वकष्टाने  उभा राहिला होता . दोघांच्या कुटुंबातील एका मध्यस्थी च्या मदतीने दोघांचे लग्न जुळून आले होते . दोघांचा संसार खूप चांगला चालला होता . लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर त्या दोघांना हि घरातून नातवंडासाठी विचारू लागले . ते नेहमी उडवा उडवी ची उत्तर देऊन विषय संपवत असत ! काही दिवसांनी श्वेता ला तिचे पिरेड्स मिस झाल्याचे लक्षात येते . ती कोणाला ही काही सांगण्या आधी प्रेगंनसी किट घेऊन चेक करते आणि किट वर दोन गुलाबी गडद रेषा दिसतात !  श्वेता आणि अनुराग च काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं पण त्यांनी याबद्दल ही कधी विचार केला नव्हता.

श्वेता लगेच च अनुरागला फोन करून ऑफिस मधून लवकर घरी येण्यासाठी सांगते . त्याला काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय आपल्याला श्वेता अस बोलवणार नाही याची कल्पना येते . तो लगेच घरी जाण्यासाठी निघतो . श्वेता दारासमोर बसून त्याची वाट बघत असते . काही वेळात च अनुराग घरी पोहचतो आणि काळजीने श्वेता समोर जाऊन उभा राहतो . तिच्याकडे आणि घराकडे पाहत तो तिला विचारतो,  काय झालं ? सगळं ठीक आहे ना ? मला अचानक का घरी बोलवलं ? तितक्यात श्वेता त्याच्या हातामध्ये प्रेग्नंसी किट ठेवते.  तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो , हे काय आहे आणि नक्की तुला काय सांगायचं आहे ? ती खाली मान घालून म्हणते तू बाबा होणार आहेस ! अनुराग आश्चर्याने म्हणतो काय !!! ती पुढे म्हणाली , तू सांग करायचं ते ? तीच म्हणणं अर्धवट तोडत तो म्हणाला , काय करायचं म्हणजे ? मी बाबा आणि आई होणार !!! याच काय करायचं असं का विचारते तू मला ? श्वेता घाबरत म्हणालो , पण तुझे स्वप्न ! तुला हे सगळ इतक्या लवकर नको होत ना ! अनुराग हसत तिला मिठीत घेतो आणि म्हणतो , " अग्ग वेडा बाई ! माझी स्वप्न सोड ! तुझ सांग ! तुला नको ना ! चल आपण उद्या डॉक्टर कडे जाऊया !" तितक्यात श्वेता , नाही नाही करत मिठी सोडवते !!! ती म्हणते मला तर आई व्हायचं आहे ...पण मी तुझ्यासाठी... ( अस म्हणून शांत बसते !) तितक्यात अनुराग आनंदाने ओरडू लागतो , मी बाबा आणि तू आई होणार आहेस हे नक्की आणि खर आहे तर !! आपण आत्ताच डॉक्टर कडे जाऊया चल !!

डॉक्टर ही श्वेता ला चेक करतात आणि ती खरचं प्रेग्नंट असल्याचं दोघांना सांगतात ! आणि पुढे श्वेता ची काळजी घेण्यासाठी सांगतात ! सगळ व्यवस्थित समजावून घेतल्यानंतर ते दोघे निघतात ! रस्त्यामध्ये च असताना दोघे आपापल्या घरी फोन करून आनंदाची बातमी देतात !!! दोघांच्या ही घरचे खूप आनंदी होतात कारण हे त्यांचं खूप दिवसांच स्वप्न असत. दुसऱ्याच दिवशी दोघांच्या ही घरचे अनुराग आणि श्वेता ला अभिनंदन करण्यासाठी सगळे घरी जमतात .

अनुराग हा श्वेता सोबत नोकरी साठी बाहेर राहत असतो आणि आई बाबा गावी ! श्वेता चे आई बाबा हि गावीच असतात ! ते चौघे ही खूप आनंदी असतात ! ते यांना भेटून , यांचे अभिनंदन करून तसेच श्वेता आणि अनुराग ला खूप काही गोष्टी शिकवून निघून जातात ..

श्वेता आणि अनुराग ही खूप आनंदी असतात . अनुराग तिची खूप जास्त काळजी घेऊ लागला असतो . त्याने त्याच्या कामाची वेळ ही कमी करून घेतली असते . तिची ट्रीटमेंट तो एक मोठ्या प्रसिद्ध डॉक्टर कडे ठेवायचं ठरवतो.  तिला सगळ हवं नको ते पाहतो . डॉक्टर सांगेल त्याप्रमाणे सगळ च तो करत असतो . श्वेता च्या पहिली सोनोग्राफी मध्ये बाळाची वाढ होते हे दिसले आणि हे पाहून ती खूप आनंदी झाली . ते बाळाची खूप वाट पाहत होते , खूप स्वप्न रंगवत होते .  असे करत  करत श्वेता ची पाचव्या महिन्याची सोनोग्राफी आली . अनुराग आणि श्वेता दोघे ही उत्सुकतेने गेले होते आणि सोनोग्राफी करत असताना डॉक्टर एकदम शांत झाले . ते थोड्या वेळातच श्वेता आणि अनुराग ला तुम्हाला ही बाळ ठेवता येणार नाही , वाढवता येणार नाही हे समजावू लागल्या ! हे ऐकून दोघांच्या ही पायाखालची जमीन सरकली. श्वेता तर रडू लागली आणि अनुराग रडू आवरू लागला . डॉक्टर समजावू लागले की सोनोग्राफी मध्ये स्पष्ट दिसत आहे की बाळाची वाढ तर होत आहे पण बाळ अपंग होऊ शकतो किंवा बाळामध्ये काहीतरी दोष असेल हे नक्की म्हणून आपण आत्ताच आपल्या हातात आहे की आपण एक तर गर्भपात करू शकतो !  पुन्हा बाळाची वाढ जास्त झाली तर आपण गर्भपात करू शकत नाही त्यानंतर श्वेता आणि बाळ या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून तुम्हाला दोघांना लवकरात लवकर काही तो निर्णय घ्यावा लागेल . दोघेही शांत होऊन जातात !  दोघांनाही काही सूचेनास होतं !  तितक्यात अनुराग आणि श्वेता आम्ही तुम्हाला सांगतो , असं म्हणून तिथून निघून जातात . 

दोघेही खूपच चिंतेमध्ये असतात अनुराग अनुरागच्या आई-वडिलांना बोलावून घेतो आणि श्वेता सुद्धा ! सगळ्यांचा आनंद एका क्षणामध्ये दिसेनासा होतो . पण श्वेताची आई  धाडसाने अनुराग आणि श्वेताला समजावू लागते हे बघा कदाचित हे बाळ तुमच्या नशिबामध्ये नसू शकतं ...उदास होऊन खचून जाऊन वेळ पुढे जात आहे .. आपण  लवकरात लवकर निर्णय घेऊन ते बाळ नको अस्सल तर आत्ताच गर्भपात करूया म्हणजे श्वेताच्या जीवाचा धोका कमी होईल . बाकीच आपण सर्व एकत्र मिळून दुःखाला सामोर जाऊया ...

त्यामध्ये इतकं नाराज होण्यासारखं काही नाही आहे !  आपल्या हातात आहे आपण लवकरात लवकर निर्णय घेऊ शकतो. अनुराग ची आई सुद्धा या विषयाला दुजोरा देऊन हो आपण लवकरात लवकर निर्णय घेऊ या आणि गर्भपात करूया !  पुढे पुन्हा बाळ होऊ शकतं पण श्वेताचा जीव महत्त्वाचा आहे असं म्हणून त्यांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी अनुराग ने  श्वेताच्या गर्भपात करण्यासाठी ची अपॉइंटमेंट घेतली. पण डॉक्टर ने श्वेता आणि बाळ व्यवस्थीत चेक केल्यानंतर डॉक्टर अनुराग ला बोलवून म्हणाले , मला माफ करा पण आपण गर्भपात करू शकत नाही !!! बाळाचे वजन हे जास्त आहे !! आणि श्वेताच्या रिपोर्टनुसार जर तिचा गर्भपात आपण केला तर तिच्या जीवाला धोका असू शकतो बाळाच्या जीवापेक्षा जास्त धोका श्वेताच्या जीवाला असल्यामुळे आपण आता गर्भपात करू शकत नाही !!!!

Continue.....