आर्या... ( भाग ४ ) suchitra gaikwad Sadawarte द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आर्या... ( भाग ४ )

  आर्या च्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात झाली होती . अनुराग आणि श्वेता तिच्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवत असे . कधी कधी आनंदाने पण कधी कधी काळजीने आणि चिंतेने ! आर्याच्या जन्माच्या आधी डॉक्टरांनी जे सांगितलं होत ते अजून ही सगळ्यांच्या मनात घर करून होतच! म्हणून तिच्या प्रत्येक हालचालींवर घरातील प्रत्येक जण नकळत का होईना पण लक्ष ठेवत असे !    श्वेता आर्या सोबत खूप खुश होती .तिला तिचा पूर्ण दिवस कसा जात असे कळत ही नसे ! बऱ्याचदा आर्या रात्री जागवत असे . श्वेता ला थकल्यासारख होत असे पण आर्या पूर्ण डोळे उघडुन टकमक बघत असायची आणि तिच्या त्या चेहऱ्यावर असणाऱ्या तेजाला पाहून हीची काही झोपायची इच्छा नाही व्ह्यायची . अनुराग ला ही जागण्यासाठी आवडत असे ! विशेष करून आर्या आणि श्वेता ला बघण्यासाठी जागणे खूप आवडत असे . पण शेवटी सकाळी श्वेताला न उठवता तो कामासाठी जाऊ शकत होता पण कामाला जाण्यासाठी त्याला रोज उठावं लागत असे ! म्हणुन तो जास्त जागरण करत नसे .    आर्या आता नवनवीन गोष्टी करू लागली होती . कोणाचं ही लक्ष तिच्याकडे वेधून जाणार इतकं तेज तिच्या चेहऱ्यावर आणि हसु तिच्या ओठांवर नेहमी असे .

तिला आवाज स्पष्ट ऐकू जात होता . ती कोणाच्या ही हाकेला प्रतिसाद देऊ लागली होती. आवाजाच्या दिशेने पाहू लागली होती . तिच्या अशा नवनवीन कृती श्वेता , अनुराग आणि कुटुंबातील प्रत्येकाला आनंद आणि समाधान देत असे .

बघता बघता आर्या आता चार महिन्यांची झाली होती . एका रात्री श्वेता अनुराग ला ' आपण आर्याला एकदा डॉक्टर कडे दाखवून या अस बोलली ! ' त्याने काळजीने तिच्याकडे बघितले , काही झालं का ? आर्या ठीक आहे ना ? काही नवीन जे मला माहित नाही ?' 

  श्वेता पुढे म्हणाली , मला तिच्याकडे बघून अस्वस्थ वाटत , काहीतरी चुकल्यासारखं वाटत असत ! ती थोडी रडली तर माझा जीव कासावीस होतं !  जर तिला दूध देऊन ही ती शांत झाली नाही तर मी रडायला येते रे ! सतत कसली तरी भीती वाटते !' ( असं बोलून ती तिच्या डोळ्यांतील पाणी स्वतःची हाताने पुसत असते )

अनुराग तिच्या भावना , प्रेम , भीती , काळजी तिने व्यक्त न करता ही समजत असे . आता तरी व्यक्त केल्यानंतर त्याच्या डोळ्यात ही पाणी होत . तो ते पुसत श्वेता ला जवळ घेत म्हणतो , 'ठीके! मी उद्या सुट्टी घेतो , आपण सकाळीच डॉक्टर कडे जाऊया ! काही घाबरु नकोस ! मी नेहमीच तुम्हा दोघींसोबत आहे आणि असेल ! '

तितक्यात आर्या चा रडण्याचा आवाज येतो आणि दोघे ही तिला उचलून घेण्यासाठी पुढे जातात . अनुराग म्हणतो ," मी उद्या सुट्टी घेतो आहे तर मी आज रात्रभर माझ्या परीसोबत खेळणार ! तू मस्त झोप हा ! आम्ही मस्त मज्जा करू !" श्वेता हसत म्हणाली ,'  हो ..हो .. का नाही ! पण आता तिला भुक लागली आहे , तिला दूध देते आणि मी झोपते हा !' श्वेता आर्या ला पोटभर दूध पाजते आणि अनुराग च्या हातात देते , आणि त्याला आर्या ला कस सांभाळायचं याच्या बऱ्याच सुचना आणि मार्गदर्शन देऊन ती शेवटी झोपते ! 

पण तिची झोप ही फक्त एक डोळ्यांना आराम देण्याची कृती होती कारण ती तर कोणत्या ही छोट्या छोट्या गोष्टींनी दचकून उठत होती , लगेच आर्या ला आवाज देत होती . 

अनुराग शेवटी ओरडला , ' तु शांत झोपणार आहेस की नाही ? नाहीतर मी आणि आर्या दुसऱ्या रूम मध्ये जाणार ?' नाही .. नाही म्हणतं, श्वेता झोपी गेली . खरं तर तिला आर्याची खूप काळजी होती , ती अशा पहिल्यादांच तिला पप्पा कडे देऊन , झोपली होती . 

 अनुराग तिच्याकडे एकटक पाहत होता . एकटाच बडबडत होता , कशी असते ना आई ! आधी तर श्वेता अशी नव्हती ! माझ्या सोबत भांडून मला झोपायच आहे , अजून झोपायच आहे अस ओरडत असे . किती बदलून गेली आहे ही या चार महिन्यामध्ये ! एक मुलगी जेव्हा मी बघितली तेव्हा हिला किती समजावून घ्यावं लागेल असं वाटल होत ! पण तिने बायको म्हणून ही आणि आज आई म्हणून ही समजून घेण्याची वेळ आणली नाही . फक्त तिच सगळ समजून घेते आणि नेहमी सर्व गोष्टी एकटीच करत बसते जरी त्याने स्वतःला किती ही त्रास झाला तरी !" अशा विचारत असतानाच आर्या च्या रडण्याचा  आवाज झाला आणि अनुराग त्याच्या विचारंमधून आणि श्वेता झोपेतून जागी झाली . लगेचच आर्याच्या जवळ घेत म्हणाली , बघ अनुराग तू विसरला मला उठवायला ! तिला भुक लागली ना , शेवटी तिनेच मला उठवलं ! ' अनुराग काहीना बोलता तिच्या कपाळावर एक किस करतो आणि म्हणतो आता मी झोपतो ! 

उद्या डॉक्टर कडे जायचं आहे ना ...गुड नाईट अस म्हणत तो आर्याला ही गोड गोड किस करतो !


continue ....