व्हिक्टोरिया 405 भाग 1
भाग 1]
कथेवाटे कोणत्याही धर्माला गालबोट लावल गेलं नाही! मनोरंजन होईल ह्या दृष्टीने कथा लिहिली गेली व मनोरंजन होईल ह्या दृष्टीनेच कथा वाचा!
लेखक कोणाच्या ही भावना दुखावात नाहीये !
त्यामुळे उगीचच कोणीही पर्सनलल मेसेज करून ज्ञान पाजलू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल!
शाळेतल्या मुलांना एन दिवाळीची सुट्टी लागली होती .
दिवाळीची सुट्टी घालवण्यासाठी भाविक वय तेरा वर्ष, शहरातून आपल्या मामाच्या गावी आला होता.
भाविक तस शहरातला मुलगा होता.
-शहरात, गावातल्या दिवाळीसारखी मज्जा मुळीच नसायची- म्हंणूनच तो दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीची मज्जा लूटण्यासाठी मामाच्या गावी यायचा ..ह्या ही वर्षी आला होता.
आज लक्ष्मीपुजन होत.
गावातल्या रसत्यांवर गावची लहान- मोठी पोर फटाके फोडत होते . कोणी बियरच्या बाटलीत मोठ मोठाल रॉकेट लावत होते-
बॉम्बचा धडाड आवाज, रॉकेटचा शिट्टी वाजवत वर जाणारा आवाज वातावरणात असे कित्येकतरी फटाक्यांचे आवाज घुमत होते.
लहान - लहान मुल मुली हातात फुलबाजे घेऊन गोल फिरवत होते - पाऊसाचा उंच फव्वारा उडत होता ..तिथेच बाजुला उभ राहून लहान मुल टाळ्या पिटत उड्या मारत होते. तर कुठे कोणी चक्री पेटवत होत- फुर्र्र..फुर्र..आवाज करत चक्री फीरत होती.
मोठ मोठी पोर हातात फटाके घेऊन स्टंटबाजी करत होती.लहानगी मुल त्यांच्याकडे मोठ्या आश्चर्यकारक नजरेने पाहत होती- त्यांच्यासाठी हे एक सुपरहिरो सारख काम होत.
गावातल्या घरांबाहेर कोणी रंगीबेरंगी लाईट पेटवली होती . -तर कोणी आकाशकंदील लावले होते. लाईटसचा पावसारखा झगमगाहाट पसरला होता.
एक दूमजली घर दिसत होत.
घराच्या दरवाज्यातून आत प्रवेश करताच - 12x 12 चा हॉल होता.
त्या हॉलमध्ये टिव्ही- तिच्या समोर सोफा होता..सोफ्या बाजुला फुलदाणीच टेबल होत.
भिंतीवर एक सफेद मांजराच फोटो असलेली फ्रेम सुद्धा लावलेली होती.
हॉलमध्ये समोरच एक उघडी चौकट होती- तिथे किचन होत - ओट्यासमोर एक पन्नाशी गाठलेली स्त्री .. गैसवर ठेवलेल्या कढईत चकल्या तळत होती.
" भाविक? सूजय? अरे किती उशीर लावताय ? लवकर या पाहू खाली." किचनच्या दरवाज्यापासून पाच पावळां पूढे डाव्या बाजुला स्टीलच्या रेलींगचा L आकाराचा जिना होता.
जिन्याच्या पाय-या वर चढुन गेल्यावर उजव्या बाजुला एक कोरिड़ॉर लागत होती.
कोरिड़ॉरमध्ये तीन रूम होत्या - दोन डाव्या बाजुला होत्या आणि एक समोर होती.
त्याच समोरच्या रूम मध्ये ...
खोलीत पांढ-या शुभ्र लाईटचा प्रकाश पड्ला होता.
एक पलंग दिसत होत -त्यावर दोन मुले बसली होती-
दोघांच्या हातात गेमचे रिमोट होते.
समोरच भिंतीवरची चौकोनी स्मार्ट टिव्ही होती- टिव्हीवर ड़ब्लु ,ड़ब्लु, ई(wwe)2K22 गेम सुरु होती.
" मामा ! तुला हरवेल मी?"
भाविक म्हंणाला. त्याच्या बाजुला बावीस वर्षीय तरूण बसला होता - ज्याच नाव सूजय होत .
तो भाविकचा एकूलता एक मामा होता.
सद्या इंजीनियरिंगच शिक्षण घेत होता - त्यासहितच तो एक भयकथा लेखक होता.
ऑनलाईन स्टोरीजच्या प्लेटफॉर्मवर तो लिखाण करायचा -लाखोंवर त्याचे फॉलोवर्स होते - महिन्याला भरपूर मानधन मिळत होत -
भाविकला त्याच्या मामाच्या भयकथा खुप आवडायच्या -तसंही त्याला भूतांबद्दल खुप रूची होती. सुजय मामाकडून भूतांबद्दल वेगवेगळ्या माहीती जाणुन घेण त्याला खुप आवडायचं.
" तू आणी मला हरवणार थांब तुला दाखवतो !"
सूजय अस म्हंणाला होताच की टिव्ही बंद झाली.
" अरे ह्या टीव्हीला काय झालं? " भाविक म्हंणाला.
" लाईट गेली वाटत ! वाचलास? पन पुढच्या वेळेस नाहीस माझ एंडरटेकर तुझ्या जॉन सेनाला सोडणार नाही लक्षात ठेव!" सूजय एंडरटेकसारखे डोळे वर घेऊन जात म्हंणाला.
" हा बघून घेऊ! तुझ्या एंडरटेकरला नाही ना त्याच्याच कास्केट मध्ये झोपवल तर नाव नाही सांगणार ..भाविक..!"
" अरे ए पोरांनो !" सूजयच्या मातोश्रीनी रविनाबाईंनी किचनमधुन पुन्हा हाक दिली.
" हा मामा आणि भतीजा एकच पोतीचे मणी !
काय ते गेम खेळत बसतात दिवसभर."
" आज्जी!" भाविक ने आवाज दिल.
मामा भतीज्या दोघेही जिन्यावरून चालत खाली आले.
" कुणाशी बोलतेस आज्जी ? मामाच्या गोष्टीतल भुत तर नाही ना झोंबल !" भाविक मस्करी करत म्हंणाला.
" मला कश्याला भुत झोंबेल आधीच दोन दोन भुत आहे घरात !" रविनाबाई म्हंटल्या.
" काय सांगतेस आज्जी ! कुठे आहेत." भाविक आजुबाजूला पाहत होता.
" ए ईकड ईकड आपल्याला बोलतीये ती!"
सूजय किचनमध्ये असलेल्या डायनिंग टेबलवर बसला.
" आज्जी आज काय स्पेशल?"
भाविक सूजयमामाच्या बाजूला बसला.
" चकल्या! सांगा पाहू कश्या झाल्यात"
रविनाबाईंनी दोघांनाही एका प्लेटमध्ये चकल्या खायला दिल्या.
दोघांनीही एक एक ऊचल्ली...तिचा लचका तोडला..कर्र कर्र करत हाड तोडली.
" वा वा वा वा..वा..! काय मस्त झाल्या चकल्या ह..हा...हा.हा .!" भाविकने स्तुती केली.
रविनाबाई त्याच्या स्तुतीवर खुष झाल्या.
" बघ सुज्या - अशी तारीफ करायची असते!
रविनाबाईंनी सुजयाला टोमणा हाणला.
" हा मस्त झाल्यात चकल्या , सो स्वीट!"
सूजयने दातविचकत हे वाक्य उच्चारल.
पुन्हा खाण्यात व्यस्त झाला.
" सूजय मला दुकानातून जरा अनारस्यांच पीठ आणून देतोस का ? "
" आई तुच आणना ग , हातभर अंतरावरच तर आहे ना दुकान."
" अरे तिथे नाहीये ना पीठ,मीच गेले होते थोड्यावेळापुर्वी - पन नाही आहे तिथे!"
" औह, मग?"
" मग काय? बाजुच्या गावातून आणून दे !"
" काय?.." सूजय एकदम उडालाच.
" अंग काय बोलतेस तू ? अंग जंगलातून जाव लागेल आता , आणी तुला माहीतीये ना - किती काळोख असतो तिथे ! आणी आता तर वेळ पण खुप झालीये..!"
' अरे काही नाही होत -तू ना त्या भुताच्या गोष्टी लिहून लिहून - तांत्रिक झाला आहेस - "
" खिखिखिखिखी!" भाविक मध्येच दात काढत हसत होता.
" जास्त हसू नको -चकली अटकल घशात !"
" अरे तु एक काम कर ना ? भाविकला सोबत घेऊन जा, तसंही गाडीवरच तर जायचं!" रविनाबाई म्हंणाल्या.
"बर बर येतो घेऊन , पन हा मला अनारसे जास्त द्यावी लागतील !"
" हो रे बाबा जा !"
" चल भाविक ..!" सूजयने टेबलावरची
गाडीची चावी उचल्ली.. सुजयने दोन- तीन चकल्या उचलून खिशात कोंबल्या..
" येतो आज्जी!"
म्हंणत तो दरवाज्यातून बाहेर पडला.
अंगणात सुजय त्याच्या हिरोहोंडा स्प्लेंडर प्लसवर बसला होता.
भाविक बाहेर आला तसे त्याने की - वरून गाडी स्टार्ट केली.
इंजिनचा ढोल बदडावा तसा आवाज झाला.
" नीट या हां !" रविनाबाई दरवाज्यातूनच म्हंणाल्या.
" हो आज्जी!" भाविक म्हंणाला.
सुजयने दोन गियर शिफ्ट आधीच केले होते - त्याने फक्त क्ल्च सोडल गाडी निघुन गेली.
.....
8:30 pm...
आकाशात चंद्राची अर्ध कोर उजळत होती.
विषारी काळे ढ़गांचे पुंजके त्या अर्ध कोरेजवळून जातांना दिसत होते-
रात्रीच्या अंधारात जंगलातल्या झाडांचे शेंडे टोस्कूली पाषाणी हत्यारांसारखे दिसत होते.
हा जंगली इलाकाच होता - दुर दुर पर्यंत स्टेच्यु झालेल्या झाडांची रांग दिसत होती.
त्या रांगेमधुन एक मातीचा तांबडसर रस्ता पुढे जातांना दिसत होता.
झाडांची पिकलेली पाने गळून खाली जमिनिवर पडली होती .
त्यांचा खच साचला होता.
त्याच पानांच्या खचांवरून एक काळ्या रंगाचा विषारी नाग सळसळत पुढे जात होता.
तोच त्याच्या अंगावर एका हेडलाईटच पिवळसर प्रकाश पडला-
फणा काढुन सर्पाने वर पाहिल..
समोरून एक टूव्हीलर जातांना दिसली-
टूव्हीलरवर ड्राईव्ह सीटवर सुजय बसला होता आणि त्याच्या मागे भाविक..
तपकीरी रंगाचा मातीचा रस्ता कापत गाडी वीस पंचवीस मिनिटांत हव्या त्या ठिकाणी पोहचले.
क्रमश: