बकासुराचे नख - भाग २ Balkrishna Rane द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बकासुराचे नख - भाग २

 -----कोण होती ती गूढ स्त्री....यक्षिणी..आसरा ...हडळ की एखादी नागीण...? या  परीसरात अद्भुत शक्ती वावरताहेत असं मला वाटलं.मी झपाझप पावले टाकत खाली उतरायला लागलो.आता मला मागे वळून बघियचीही हिंमत होत नव्हती.--------******------*****-------*****----बकासुराचे नख भाग ३लवकरच मी महंतो व योगेशला गाठलं. चालताना सुध्दा मी सगळ्या घटनांची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न करत होतो.पण काहीच कळत नव्हते.तो बुटका माणूस....त्या दगडी गुहा...तो भला मोठा सांगाडा...तो साप...ती गूढ स्त्री... आणि योगेशने पाठविलेले ते अमानवीय नख...कसलाच मेळ लागत नव्हता." कुठं अडकला होता?" महंतोनी विचारले." नाही...सहजच...." मी म्हणालो. मी जे बघितले ते यांना सांगायचे की नाही याचा निर्णय मी करत होतो.शेवटी योगेश असताना सांगणं बरोबर वाटेना म्हणून मी गप्प राहिलो.  रेस्ट हाऊसवर आलो तर तिथे गडबड चालू होती.रखमा आम्ही ज्या खोलीत राहत होतो तिच्या दरवाज्या जवळ उभी होती.ती खूपच घाबरलेली दिसत होती.आत वनविभागाचे दोन कर्मचारी हातात काठ्या घेऊन काहीतरी शोधत होते." काकू,काय झालं?" मी विचारलं." मघाशी ...एक.. एक..म...मोठी नागीण सरसरत ह्या... ह्या...खोलीत शिरली. मीया ..बघलय...पिवळी धमक होती पहिल्यांदाच एवढा मोठा जनावर बघलय."मी सुन्न झालो.म्हणजे मला दिसलेली नागिण इथे येऊन गेली होती.मी खोलीत शिरलो." तुम्ही सापाला पाहिलत?"" होय, वेगळच जनावर होत. आम्ही आत आल्यावर कुठे गायब झालं कळलंच नाही." त्यातला एक म्हणाला." एक काम करा शोध थांबवा.ती निघून गेलीय.आता सापडणार नाही." मी म्हणालो." तरीसुद्धा काळजी घ्या.गरज लागल्यास आम्हाला बोलवा.मोठा , चपळ व तेजस्वी नाग होता तो." तो म्हणाला.याचा अर्थ मी जे पाहिले तो भास नव्हता.ती नागीण आमच्या पाठलागावर आहे....पण का?... आणि तो बुटका राक्षस त्याचा या सगळ्यांशी काय संबंध? मला काहीच अर्थ लागत नव्हता.    रखमाने जेवणाची तयारी केली. ती अजूनही घाबरलेली दिसत होती.जेवण झाल्यावर महंतो सांगाड्याचे फोटो पाहू लागले.त्यांनी आपली डायरी काढली व त्यात त्या सांगाड्याच्या विविध भागांची रेखाटने काढू लागले.मोबाईल बघता बघता ते म्हणाले..." कोल्हापूरातून मेसेज आलाय...ते नख पाच हजार वर्षांपूर्वीच आहे..."" म्हणजे कदाचित महाभारतकालीन...?"" हो... असेलही... अजूनही त्यांचे डिटेल्स येतील...."थोडी विश्रांती घ्यावी म्हणून मी तिथल्या खाटीवर पहुडलो.पण मी सावध होतो.माझ्या यापूर्वीच्या अनुभवावरून मी धोका पत्करायला तयार नव्हतो.साधारण अर्ध्या तासानंतर मला कसलीशी चाहूल लागली. मी खिडकीतून बाहेर पाहिले.एका झाडाकडे तो बुटका राक्षसा सारखा इसम उभा होता. आता तो अधिक स्पष्ट दिसत होता.त्याच डोकं भल मोठ होत...तोंड रूंद..होत ... ओठांच्या दोन्ही टोकांकडून बोटभर लांबीचे सुळ्यांसारखे दात बाहेर आले होते.काळी कुळकुळीत त्वचा...कमरेला गोणपटासारख वस्त्र गुंडाळलेल होत.तो हाताने...व चेहरा हलवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. अचानक तो घाबरल्या सारखा झाला.झपकन वळून दगडांवरुन उड्या मारत तो जीवाच्या आकांताने पळू लागला.मी उठून खिडकीजवळ उभ राहून पाहू लागलो. मला ती दिसली...होय ती तीच नागीण होती जी सकाळी मला गुहेजवळ दिसली होती.ती त्या बुटक्या राक्षसाचा पाठलाग करत होती.... फुत्कार सोडत होती.बघता- बघता दोघे गर्द झाडीत नाहिसे झाले.मी मागे वळलो." सर, आज इथे आलेली नागीण... त्यानंतर मला गुहेत शिरताना दिसली होती...तुम्हाला पटणार नाही पण ती मानवी रूपही घेऊ शकते." मी महांतोना म्हणालो.ते काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले व म्हणाले..." माझा तुमच्यावर विश्वास आहे.पण याचा उलगडा झाला पाहिजे."आम्ही अस ठरवलं की गावातील एखाद्या वयस्कर माणसांकडून काही माहिती मिळते का पाहावं त्यासाठी रखमाला विचारले.तिने आम्हाला आपल्या पतिकडे नेले.तिचा नवरा साधारण सत्तर वर्षाच्या असावा. राजाराम असं त्यांचं नाव होत.तो सुरुवातीला गावातच पोस्टमन म्हणून काम करायचं नंतर तो पोस्टमास्टर झाला.त्याला गावाची खडानखडा माहिती होती. आम्ही त्यांना आमच्या येण्याचा उद्देश सांगितला.ते बोलू लागले -" पांडव एकचक्रा नगरीत थांबले असता तिथल्या ग्रामस्थांना बकासुरापासून वाचविण्यासाठी भीम गाडाभर अन्न, पाणी व विविध पदार्थ घेऊन गेला तिथे त्याचे बकासुराशी घनघोर मल्लयुध्द झाले.भीमाने त्याचा एकेक अवयव निखळून काढून फेकला व शेवटी त्याच्या देहाचे मर्दन करून लोळागोळा केला व नगराच्या वेशीवर टांगून ठेवला. इथपर्यंतची कथा सगळ्यांनाच माहीत आहे. ती एकचक्रा नगरी म्हणजे हे ऐणारी गाव होय अशी इथल्या लोकांची धारणा आहे. वरील कथेला जोड म्हणून इथे आणखी एक लोककथा ऐकवली जाते."एवढ्यात तिथे योगेश आम्हाला शोधत आला व आमच्या सोबत बसला." आम्हाला पुढची कथा ऐकायची आहे." महंतो म्हणाले.राजारामांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली." मला ही कथा माझ्या आजोबांनी ऐकवली... बकासुराचा वध झाला पण परीसरात त्याचे साथीदार होते.भविष्यात हे राक्षस ग्रामस्थांना त्रास देणार होते.त्यामुळे दुसर्या दिवशी पुन्हा पांडव वनात म्हणजे आज जिथे गुहा आहेत तिथे गेले.भीम व अर्जुनाने अनेक राक्षसांचा वध केला पण शिल्लक उरलेले  तीन -चार राक्षस युधिष्ठीराला शरण गेले.युधिष्टीराने त्यांना अभय दिले.त्यामुळे भीम व अर्जुनाचा नाईलाज झाला.हे सारे राक्षस धष्टपुष्ट व जवळपास पंधरा फूटापेक्षा जास्त उंच होते.युधीष्टिरांने त्यांना अभय देताना शापही दिला की हळूहळू त्यांची उंची कमी होत जाईल. त्यांची ताकद व मायावी शक्ती कमी होत जाईल.पण अर्जुनाचा या राक्षसांवर विश्वास नव्हता.त्याने नागास्त्र सोडून एक दिव्य नागीण तयार केली व म्हणाला...या राक्षसांचा कुलक्षय होईपर्यंत तू यांच्यावर नजर ठेव या गुहेच्या बाहेर यांना पडू देवू नकोस.जर यांनी नागरिकांना त्रास दिला तर त्यांना तू शासन कर."" काय म्हणालात? दिव्य नागीण! पण अशी नागीण तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांनी कधी पाहिली होती का?" मी उत्सुकतेने विचारले." नाही बा. अहो ही एक लोककथा आहे खरंच असं घडलं होतं की नाही कुणास ठाऊक." ते म्हणाले.पण महंतोनी मात्र माझ्याकडे बघत मान हलवली.ही लोककथा खरी असेल तर तो राक्षस बुटका का? याच उत्तर मिळत होतं . गेल्या हजारो वर्षात या राक्षसांची उंची धर्मराजाच्या शापामुळे कमी होत गेली असावी.तसेच त्या नागीणीच्या अस्तित्वाची तर्कसंगती लागत होती. पण मग गेली हजारो वर्षे यांचं अस्तित्व कुणाच्याच कसे लक्षात आले नाही. तो बुटका राक्षस आताच का दिसतो? तो योगेश व मलाच का दिसतोय इतरांना त्याच अस्तित्व का जाणवत नाही?  तो गुहेच्या बाहेर कसा पडला?ती नागीण त्या बुटक्या राक्षसाचा का पाठलाग करत होती? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. पण याचा शोध घ्यायचा अस मी ठरवले." योगेश,गावकरी बैलगाडीतून अन्न पाणी दरवर्षी ठेवतात सोबत आणखी काय असते?" मी योगेशला विचारले." दरवर्षी विशिष्ठ दिवशी प्रत्येक घरातून एक प्रतिकात्मक गाडीतून अन्न पाणी व  काही गोणपाट ठेवली जातात.पूर्वी सोबत बोकड पाठवले जायचे पण काही वर्षांपूर्वी गावाने देवाचा कौल घेऊन हे बंद केले."म्हणजे त्या बुटक्या राक्षसाने कमरेभोवती गुंडाळलेले गोणपाट लोक ठेवत असलेल्या गोणपाट टांपैकी होते.पण मग असे आणखी राक्षस सध्या गुहेत असतील का? ते का दिसत नाहीत?     बुटका राक्षस व ती नागीण आता दिसणे हे कशाचे तरी संकेत असावेत. एक तर ते भयावह असेल किंवा एखादी चांगली घटनाही त्यातून घडेल. या सगळ्यांशी आम्ही तिघे जोडले गेलो होतो.आज रात्री गुहेजवळ जाऊन काही धागे - दोरे मिळतात का हे पाहावे असे मी ठरवले.मी माझा विचार महंतो व योगेशला बोलून दाखवला." सर, रात्री नको.काळोख पडल्यावर तिथे जायला बंदी आहे.गावात कळलं तर मोठा गोंधळ होईल.हा अलिखित नियम आहे व तो काटेकोरपणे पाळला जातो."" ठिक आहे.मग सायंकाळी जाऊया" " चालेल "दोघेही म्हणाले.  आता दुपारचं दोन वाजले होते.थोडी विश्रांती घेऊन बाहेर पडावं लागणार होत.मला मात्र प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.त्याबरोबरच एक अनामिक भिती व धाकधूक मनात निर्माण झाली होती.******-----*****-----****------******-------------*****-------*****-------******-----पुढेआम्ही तिघे दुपारी तीन वाजता गुहेवर जाण्यासाठी बाहेर पडलो.आम्ही पूर्ण तयारीनिशी बाहेर पडलो होतो.हेडलाईटस ...टॉर्च......पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी मोजण्यासाठी लागणारी उपकरणे... खोदकामात लागणारी छोटी उपकरणे इत्यादी सगळं सोबत घेतलं होतं.वळणं घेत जाणारी पायवाट आम्ही चढत होतो.अचानक महंतोनी माझा खांदा पकडून मला मागे खेचले. मी थोडा धडपडलो. तेवढ्यात समोरच्या एका  फणसाच्या झाडाची मोठी फांदी धाडकन खाली कोसळली.आमच्या तिघांच्याही काळजात धस्स झाले.क्षणभर उशीर झाला असता तर जीवावर बेतले असते.ना वारा ना पाऊस मग फांदी कशी कोसळली ते कळेना.आमचा पुढे जाण्याचा मार्ग बंद झाला होता." कुणीतरी आपल्याला अडवतय. पण आपल्याला जावंच लागेल.योगेश , दुसरा मार्ग आहे.?" मी विचारलं." होय ,पण वळसा घालून जावे लागेल."     आता योगेश पुढे व आम्ही पाठीमागून चालू लागलो.झाडीतून वाट काढताना खूप सावधगिरीने जावं लागत होतं.वेलींवरच्या फुलांवर भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे.... पक्ष्यांचे आवाज....घुमणारे होले... यामुळे वातावरण मजेशीर होते. आता भन्नाट वारा सुरू झाला.पानाची सळसळ सुरू झाली... गळणारी पाने वार्यावर गिरक्या घेत खाली येत होती." अचानक वारा कसा काय सुरू झाला?" योगेशने विचारले." जानेवारी महिना आहे....या महिन्यात असा वारा सुटतो." महंतो म्हणाले." हो, पण कोणाला तरी वाटतयं की आपण गुहेत पोहचू नये." मी हसत म्हणालो.थोडं वर सरकल्यावर समोर गुहा दिसू लागल्या.तेवड्यातच नाग आणि नागिणीची एक जोडी गुहेतून बाहेर आली.समोरच्या दगडावर चढून फूटभर उंच फणा उभारून नृत्य करू लागली.नजर स्थिरावणार नाही एवढ्या चपळाईने ते दोघ आपले शरीर हलवत होती.मध्येच फुत्कार सोडत होती.अंगावर काटा आणणारं ते दृश्य होतं.ते लयदार नृत्य काही काळ चालल व नंतर अचानक ते समोरच्या झाडीत शिरून नाहिसे झाले.स्तब्ध उभे असलेले आम्ही सुस्कारत जागेवरून हललो." सर,आत जायचं की नाही?" योगेशने विचारले." तू घाबरलास?"" नाही.तसा मी सर्पमित्र आहे.आजपर्यंत अनेक सापांना  मी पकडल आहे."" छान, पण हा वेगळा प्रकार आहे.हे साप आपल्याला गुहेत जाण्यापासून रोखताहेत ." मंहतो म्हणाले." आपण आज कालच्या गुहेत जाणार नाही तर त्याच्या बाजूच्या गुहेत जाणार आहोत." मी म्हणालो.दोन्ही गुहा अगदी काटकोनात दगड कापून तयार केल्या होत्या . आम्ही डाव्या बाजूच्या गुहेत आत शिरलो.आत आणखी तीन खोल्या दगड कापून तयार केलेल्या दिसत होत्या.आम्ही आत शिरलो तसा वटवाघळांचा एक थवा भिरभिरत बाहेर पडला." अजूनही आत वटवाघळे असणार थोडा धूर करूया." योगेश म्हणाला." खबरदारी घे,वारा आहे आग भडकेल." महंतो म्हणाले.योगेशने लाकडे गोळा गेली.त्यावर सुकलेला पाचोळा टाकला .लायटरने आग पेटवली बर्यापैकी धूर संपूर्ण गुहेत पसरला. धूर सहन न झाल्याने अनेक वटवाघळे झपाट्याने बाहेर पडली.आम्ही हेडलाईटस् चालू केले.आतल्या खोल्यांतून जाताना मी भिंतीच निरीक्षण करत होतो." रत्नाकर, इथे भिंत ठोकल्यावर डब-डब आवाज येतोय.निश्चितच इथून एखादा दरवाजा असणार... जो नंतर बंद करण्यात आला असणार." महंतोनी मला हाक देत सांगितले.मी व योगेश तिथे गेलो.भिंत चुनखडी दगडाची होती.मी ठोकून बघितल. बहुतेक पलिकडे पोकळ भाग होता." सर, या सगळ्या डोंगराच उत्खनन होणे गरजेचे आहे." योगेश म्हणाला." मी तसं पुरातत्व विभागाला कळवतो." महंतो म्हणाले.आम्ही आमच्या जवळच्या हत्यारांनी भिंतींचा काही भाग गोलाकार असं खोदायला सुरूवात केली.एक मोठ छिद्र करून पलीकडे नेमके काय आहे हे पहायचे होते.अर्ध्या तासानंतर थोडंफार छिद्र पडले. वितभर लांबीच्या त्या छिद्रातून मी पलीकडे डोकावलो.आत अंधुक दिसत होतं.मी टॉर्च चालू करून प्रकाशझोत आत टाकला.पण जे घडलं ते माझ्या समजण्याच्या पलीकडचं होत. टॉर्चचा प्रकाश त्या छिद्रातून पलीकडं जात नव्हता.कुठाच्यातरी  अदृश्य अपारदर्शक पदार्थांवर प्रकाश किरण पडून मागे फिरत होते.जणू प्रकाशाला आत शिरण्यास मज्जाव होता.मी पॅरानाॅर्मल हालचाली नोंदवणार उपकरण चालू केले." एखादी अमानवीय शक्ती इथे असेल तर यातील दिवे पेटवून दाखवा."सुरुवातीला काही काळ काहीच घडलं नाही.पण नंतर एकाचवेळी लाल,पिवळा निळा व हिरवा दिवे अतिशय प्रखरतेने लागू लागले." रत्नाकर, आपल्या आसपास त्या शक्ती फिरताहेत." महंतो म्हणाले.योगेश थोडा घाबरलेला दिसला मी त्याचा खांदा थोपटला व त्याला धीर दिला." हे बघा, तुम्ही जे कोणी असाल  इथे....तुम्हाला त्रास देण्याचा आमचा जराही उद्देश नाही.तुमच्या कुठच्याही कामात आम्ही ढवळाढवळ करणार नाही.फक्त अज्ञात इतिहास जगासमोर आणायचा आहे. आम्हाला तुमची मदत लागेल. या भिंती पलीकडे काय आहे ते आम्हाला पहायचं आहे.कृपया मदत करा." मी त्या अज्ञात शक्तींना आवाहन केले.अचानक तिथे वार्याची सळसळ सुरू झाली.कुणीतरी आमच्या आजूबाजूला वर खाली हवेतून फेर्यात भारतीय असं वाटलं.योगेशने माझा हात घट्ट धरून ठेवला होता.महंतो आपल्या उपकरणांनी तिथला प्रत्येक क्षण टिपत होते. काही वेळ असाच गेला.त्यानंतर त्या झरोक्यापलीकडे लख्ख प्रकाश पडला.आम्हाला जे दिसलं त्यांने आमची बोबडी वळली.समोर तो बुटका राक्षस एका दगडी खांबाला जखडलेल्या होता.त्याचे हात पाय सर्पबंधनाने घट्ट बांधलेले होते.लाल...हिरवे ...पिवळे...जांभळे साप त्या बुटक्या राक्षसाच्या सर्वांगावर वरून खाली वळवळत होते.तो प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत होता.ते विषारी साप आपल्या हिरव्या जीभा तोंडाबाहेर फेकत फुत्कारत होते.त्या खोलीत जमीनीवर सुध्दा असंख्य साप फिरत होते सगळं दृश्य भयानक व हादरवणार होत.महत्वाच म्हणजे आम्हा तिघांनाही ते दृश्य दिसत होत." हे...हे काय आहे?" महंतो अडखळत म्हणाले.'ही त्याची शिक्षा आहे.' एक अस्पष्ट आवाज हवेवर तरंगत आला." तुम्ही त्या दिव्य नागीण तर नाहीत ना? आम्हाला सगळं जाणून घ्यायच आहे." मी धीर करून विचारले.काही काळाच्या भीषण शांततेनंतर आमच्या समोर सरसरत एक भली मोठी दिव्य कांतीची नागीण प्रकट झाली. आम्ही तिघे श्वास रोखून समोर बघत होतं.किंचतही हरण्याची आमची हिंमत होत नव्हती.ती नागीण आमच्या समोर रिंगण धरून फिरू लागली.माझ्या एक लक्षात आलं की तिचा आम्हाला इजा करण्याचा विचार नव्हता.ती मला सकाळी दिसलेली नागीण होती. अचानक एक विलक्षण सुगंध सर्वत्र पसरला.आम्ही भारावल्यागत झालो. ती नागीण हळूहळू दिव्य अश्या स्री रूपात बदलू लागली. बघता बघता समोर एक अलौकिक सौंदर्य असलेली स्त्री उभी ठाकली.तिच्या डोक्यावर असलेल्या मुकूटावर लखलखीत असा गुलाबी मणी होता.त्याच्या प्रकाशात सारी गुहा उजळली होती. तिच्या हाता पायात व कमरेला सुवर्णखचित दागीने होते. अति तेजस्वी चेहर्यावरचे निळसर असे डोळे आमच्याकडे रोखून बघत होते." हे सगळं काय आहे?" मी नम्रपणे खाली वाकत हा जोडून विचारले.ती हसली.अने छोट्या घंटा किणकिण द्या सारख्या वाटल्या." तुम्हाला बकासुराच्या वधाची कथा माहीत असेलच.अर्जुनाने बकासुराच्या उरलेल्या पिलावळीवर लक्ष ठेवण्यासाठी मला निर्माण केलं होतं.हा आत दिसतोय तो बकासुराचा शेवटचा वशंज. तो असेपर्यंत मला ह्या पृथ्वीवर थांबाव लागणार आहे."" पण त्याला ही शिक्षा का?" मी विचारलं." दर हजार वर्षांनी तो काही दिवसांसाठी मुक्त होतो.पण त्याला मानवांशी संपर्क करण्याची परवानगी नाही.पण हा गुहेतून बाहेर पडून खाली गावात जाऊ लागला.ह्या..ह्या मुलांशी...( योगेशकडे बोट करत) संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. .. म्हणून त्याला मी सर्प बंधनात ठेवले आहे. त्याचा मोकळेपणाचा काळ संपल्यानंतर मी सर्पबंधन काढून घेईन.हा अजून काही शतके जगणार आहे.तोपर्यंतमी त्याच्यावर नजर ठेवणार आहे. आता हे छिद्रही बंद होईल."" आम्ही इथल्या अवशेषांचे संशोधन करू शकतो का?"" हो. पण काही मर्यादा पाळूनच. आता माझ्या जाण्याची वेळ झालीय."ती दिव्य स्त्री पुन्हा नागरूपात गेली व नाहिशी झाली.योगेश व महंतों झोपेतून जागे झाल्यासारखे डोळे चोळत एकदम म्हणाले..." कोण होती ती? काय सांगितले तिने?""म्हणजे तुम्हाला काहीच आठवत नाही?"" नाही." महंतो म्हणाले." ती ह्या गुहेची राखणदार आहे. आम्हाला संशोधन करण्याची परवानगी तिने दिलीय."मी इतर गोष्टी सांगणे टाळले.मी वळून त्या भिंतीवरच्या भगदाडाकडे पाहिले पण तिथे काहीच नव्हते.****____*****_____*****_____****___पुढचे चार दिवस आम्ही रोज गुहेंवर जाऊन संशोधन करत होतं. महंतोनी अनेक वस्तू गोळा केल्या होत्या त्यात हाडे ...दगडी हत्यारे... भींतीवरच्या शिल्पांची छायाचित्रे... काही भांडी होती.या चार दिवसांत आम्हाला ना तो बुटका राक्षस दिसला ना ती नागीण दिसली. पण ते तिथे होते व पुढेही राहणार होते.आज माझ्या वस्तुसंग्रहालयात ते भलंमोठं नख होत.खरच ते बकासुराचे नख होत की दुसर्याच्या कुठच्या राक्षसा की आदिमानवाच होत ते निश्चितपणे सांगता येत नव्हते.*****_____*****_____******____****समाप्त.