Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 25

भाग. ४ 


        " ठक...ठक..!"   
दार ठोठावण्याचा आवाज  येताच माधुरी बाईंनी खाडकन डोळे उघड़ले , अंथरुणातच उठुन बसल्या.. 

    " ईतक्या रात्री कोण असेल?" 
माधुरीबाई स्वत:शीच म्हंटल्या.  

      " ठक..ठक...!" 
पुन्हा दारावर ठोठावल गेल.

  माधुरीबाई हळूच जागेवरुन उठल्या  , दरवाज्यापाशी पोहचल्या आणि दरवाजा उघड़ण्यासाठी त्यांनी कडीवर हात ठेवला.. 

        पन माधुरीबाईंनी कडी उघड़ली नाही, कारण      
त्यांना वेळीच आपल्या आईची एक गोष्ट लक्षात आली होती..      

     की   भुतखेत , दोनदाच दरवाजा ठोठावतात ..तिस-यांदा ठोठवत नाही,  ह्या सृष्टीच्या रचेत्याचे -निर्मात्याचे काही नियम आहेत , ज्या नियमांना  बाळगूणच त्या आनिष्ठ शक्तिंना ईथे आसरा मिळाला आहे.. 

        दोनदा दार ठोठावण्यात आल होत, तिस-यांदा मात्र चिडीचूप शांतता पसरली होती. 

       पाच मिनिटे ऊलटून गेली होती, पन दारावर पुन्हा थाप पडली नव्हती..

        पन बाहेरुन धप.धप धप असा पाय आद्ळत डाविकडून उजवीकडे कोणितरी फेरी मारत आहे असा आवाज येत होता..

        मध्येच काठी आपटल्यासारख आवाज सुद्धा माधुरीबाईंनी ऐकला होता.. 

        माधुरीबाईंना  दारापल्याड नक्कीच काहीतरी भयाण उभ आहे , हे त्यांच्या जागृत झालेल्या सिक्सथ सेंस इंद्रीयांमार्फत कळाल होत.. 

      बाहेर काहीतरी भुत खेत ह्या श्रेणीत मोडणा-यांमधल उभ आहे , ह्या नुसत्या कल्पनेनेच
त्यांच्या अंगावर भीतिने निवडुंगाचे काटे फुटले होते.. 

  एकवेळ माधुरीबाईंच्या मनात हा विचार सुद्धा  आला , की समिररावांना उठवाव..

        पन त्यांनी जर तो दरवाजा उघड़ला ? आणी काही भसकन आत घुसल तर? शेवटी ही कल्पना त्यांनी सोडून दिली, आणी लागलीच देव्हा-याजवळ आल्या..  

        देवांसमोरचा संध्याकाळी लावलेल दिव केव्हाचंच विझला होता..!  

        त्याच दिव्यात पुन्हा तेळ ओतून माधुरीबाईंनी पुन्हा दिवा पेटवला, महादेवाच्या तसबीरीला पाहत हात जोडले , मनोभावे महादेवाचा धावा केला.. 

       बाजुलाच उपासनेसाठी ठेवलेली रुद्राक्षांची माळ होती, तीच माळ माधुरीबाईंनी उचळली. 
      आणी बाहेर आल्या,  त्यांनी दरवाज्यासमोर 
येताच दोन्ही हात जोडले आणि तोंडातून महा मृत्यूंजय मंत्राचा जप केला..
    

"    ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुव: स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ! " 

त्या मंत्रांच्या एक - एका ओळीसहित बाहेर ते जे काही उभ होत , ते रागाने भुईवर पाय आपटू लागल, हिंस्त्र जनावरासारख गुरकू लागल, तो  गुरगुरण्याचा आवाज भयंकर होता.. 

        मंत्र बोलून होताच , माधुरीबाईंनी हातातली 
रुद्राक्षांची माळ दरवाज्याच्या कडीला बांधली.. 

        आणी अंथरुणात आल्या, डोळे घट्ट मिटुन पडून राहिल्या...

        केव्हातरी मध्यरात्री त्यांचा डोळा लागला होता.

        त्यांच्या डोळ्यांच्या बंद पापण्यां आडून दरवाज्याच्या कडीला बांधलेली ती रुद्राक्षांची माळ ज्वालाहिंत प्रकाश फ़ेकत चकाकून उठली होती, 


        जणू त्या अभद्राच्या मधोमध एका शक्ति कवचाच्या भिंतीच काम ती दैवी माळ करत असावी? 
     जिला ते ध्यान घाबरुन दुर पळाल होत..

       काही दिवसांनी माधुरीबाईंची आई  त्यांना बाळंतपणासाठी  माहेरी नेहायला आली होती.. 

       माधुरीबाईंच्या आईच नाव रमाबाई हेमचंद्र सावंत वय वर्ष  पंचेचाळीस ..! 

        रमाबाईंनी माधुरीला अमरची तब्येत कशी आहे ते विचारल , तेव्हा मात्र माधुरीबाईंना रडूच कोसळल..

        माधुरीबाईंनी आपल्या आईला अमरला होणारा त्रास सांगितला, डॉक्टर वगेरे सर्व करुन झालं आहे पन काहीच फायदा होत नाहीये, शेवटी माधुरीबाईंनी त्या रात्री घडलेला तो भयंकर प्रकार  आपल्या आईला ऐकवला.. आणी तेव्हा रमाबाई म्हंटल्या.. 

        "  तरी मला वाटलंच होत पोरी, आपल्या अमरला बाहेरचीच बाधा झालीये , त्या रात्री अमर अंगण्यात बेशुद्ध झाला ना तेव्हाच काहीतरी झालं अशणार , बर तू काळजी करु नको , तुझ्या पप्पांच्या ओळखीचे एक बाबा आहेत ,ज्यांच्याकडे सिद्धी आहे..! त्यांना भुताखेतांपासून वाचण्याचे उपाय माहीतीयेत, आपण आजच त्यांच्याशी बोलूयात..!" 
रमाबाई म्हंटल्या. 


क्रमशः 

टीप :  कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे -  पण लेखकाच समाज्यातअंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !
आपला प्रिय लेखक   मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही !   

       
  सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच ,शहराच नाव आणि   हे जरी सत्य असल तरी सुद्धा तिथली परिस्थिती सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत   सर्वच्या सर्वच परिस्थितीच काल्पनिक नजरेने पाहावी- आणी 

    फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

      ह्या कथेत लेखकाने  गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या   कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह   वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून  कडक, एक्शन घेतली जाईल!


        सदर कथेचे सर्व हक्क लेखकाकडे अगदी सुखरुप आहेत - कथा कॉपी पास्ट करुन आपल्या नावे
खपवून घेणा-या चोरांवर दया दाखवली जाणार नाही !
त्यांवर ऑनलाईन कारवाई केली जाईल