आर्या आता वैतागून गेली होती . तिची चीड चीड होत होती . म्हणून अनुराग ने घाई घाई मध्ये डॉक्टर सोबत बोलून घेतले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट आल्यानंतरच आपण बोलूया. असा उद्देश दिसत होता . श्वेता , अनुराग , आर्या आणि आजी, आजोबा सगळे घरी जाण्यासाठी निघाले .घरी जात असताना आर्या श्वेता च्या कुशी मध्ये झोपी गेली . श्वेता थोडी तिच्या काळजी ने अनेक विचारांमध्ये गुंतली होती. अनुराग आणि हीचे आई वडील ही काळजी मध्येच होते . म्हणून कोणी कोणासोबत बोलत नव्हते . श्वेताच्या आई ने पुढे होऊन सगळ्यांना विचारलं,' जेवणासाठी काय बनवू ?'सगळेच थकलेले होते आणि थोडे फार चिंतेत ही होते म्हणुन कोणी काही नवीन खाण्यासाठी इच्छा व्यक्त करत नव्हते .त्यांनी ही स्वतःहून सगळ्यांसाठी डाळ खिचडी बनवली . आर्या झोपेतून उठली होती . तिला ही भुक लागली होती . श्वेता ने आधी तिला भरवून घेतल. नंतर सगळे जेवणासाठी बसले . श्वेता च्या आई ने तिला आणि अनुराग ला मध्येच आवाज देऊन विचारलं, काही हवं आहे का ? पण ते एकदम शांतपणे नाही बोलले . तिच्या आईला या दोघांना अस उदास पाहून कस तरी वाटत होते . म्हणून त्या मध्येच म्हणाल्या ," काहीही झालं नाही ! फक्त आपण स्वतःहून एक टेस्ट केली आहे , जी तुम्हाला दोघांना करावीशी वाटली ! ती मुलगी बघा ! किती खुश आहे ! एकटीच खेळते आहे , हसत आहे ! तिला याची काही कल्पना ही नाही की तिला काही आजार आहे किंवा होणार असेल ! तुम्ही दोघे मात्र रिपोर्ट येण्याआधीच आपल चिंतेमध्ये बसले आहेत ! आर्या कडे बघा! तिला तुमची गरज आहे , तुम्ही दोघेच छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरून जाता ! हे ऐकून श्वेता च्या डोळ्यांतील काळजी बाहेर आली , ती खूप अस्वस्थ होती ! बरेचसे विचार तिच्या डोक्यात होते आणि हे सगळ ऐकून तिला अनावर झालं आणि ती रडू लागली , तिची आई पुढे आली आणि तिला मिठी मध्ये घेऊन म्हणाली ," अग ! बाळ तू आता एक आई आहेस ! ते ही आर्या ची ! तू अशी हळवी राहून होणार नाही ! तुला आता प्रत्येक वेळी कठोर राहायचं आहे ! प्रत्येक वेळी आर्या चा आधार व्हायचं आहे ! समजलं!" अनुराग ला हे थोड बर वाटल होत. हे सगळ ऐकून त्याच्या डोक्यातून ही सगळ निघून गेलं होत . दोघे ही आर्या कडे जातात , अनुराग तिला उचलून घेतो . तिच्या त्या चेहऱ्यावरील हास्याने श्वेताला पुन्हा भरून येत ! पण अनुराग तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला सावरतो .
तिला या कल्पनेने जास्त त्रास होत होता की उद्या आपल्या आर्याला काहीतरी आजार हे ऐकायला येणार आहे ! आणि एक आई म्हणून तिला काय वाटत असेल तर सगळ्यांना च कळत होत . सगळे आर्या सोबत मस्ती मजा करत . आपला वेळ घालवतात . आणि नंतर शांतपणे झोपतात .
दुसऱ्यदिवशी श्वेताला सकाळी जाग आल्या बरोबरच आठवत आर्या च्या रिपोर्ट बद्दल ! ती लगेच अनुरागला ही आवाज देऊन उठवते . तो एकदम असा घाबरून उठतो , आणि जोरात श्वेताला म्हणतो , काय झाल ? श्वेता त्याला , कान पकडून खरचं... खूप खूप सॉरी अस म्हणते ! तो म्हणतो , पण काय झालं ? का उठवलं मला ?
ती पुढे म्हणाली ," तू विसरलास का ? आज आर्याचे रिपोर्ट येणार आहेत ! " अनुराग ला तिला काय उत्तर द्यावं कळल नाही , पण तो म्हणाला , इतकी लवकर कोण उठत ? आणि कोण इतक्या लवकर रिपोर्ट देत ? अस म्हणून त्याने पुन्हा झोपून घेतल !
श्वेता ने रात्र कशी बशी बाजूला केली होती .पण तिला आता चैन पडेना ! ती उठून बसते आणि काम आवरायला लागते . ती सतत आर्या आणि तिचे भविष्य याबद्दल विचार करत होती . थोड्या वेळात अनुराग चा फोन वाजतो . श्वेताच फोन उचलते . फोन हॉस्पिटल मधून आर्याच्या रिपोर्ट साठी आला होता ! समोरून एक स्त्री चा आवाज येतो . ती फक्त इतकंच म्हणते आर्याचे वडील बोलतायत का ? समोरून काही प्रतिउत्तर येण्याआधीच ती पुढे म्हणते ... तिचे रिपोर्ट्स आले आहेत . आज तुम्हाला डॉक्टरांनी भेटण्यासाठी बोलवलं आहे , १० वाजता अपॉइंटमेंट आहे तुमची वेळेत हजर व्हा ...!( असं म्हणून तिने खाडकन फोन ठेवून दिला )
श्वेता ने अनुराग ला खूप जोरात आवाज दिला आणि त्याच्या अंगावरच ब्लँकेट खाली फेकून दिलं . तो म्हणाला , "काय आहे हे ? काय झालं ? तुला काही होतय का श्वेता ? " ती रागात म्हणाली , किती झोप आले तुला अशी ? किती दिवस झोपला नाहीस तू ? कधी पासून उठवता तुला , फोन आला होता तरी उठला नाहीस ? " अनुराग काळजी ने विचारतो , काय फोन ? कोणाचा फोन ?
श्वेता ने रागाच्या स्वर्गातच उत्तर दिले , हॉस्पिटल मधून फोन होता ! आपल्या आर्याच्या रिपोर्ट आले आहेत ! दहा वाजता डॉक्टरांनी आपल्याला बोलवलं आहे ! आता तरी उठणार आहेस का ? तितक्यात अनुराग काही न बोलता बेड वरून उतरून उभा राहिला . घड्याळात पाहिले तर ९ वाजले होत ! तो खूप घाई घाई मध्ये त्याच आवरू लागला अगदी श्वेता ची ही मदत न घेता !
आर्या ला श्वेता च्या आई बाबा सोबत ठेवून अनुराग आणि श्वेता डॉक्टरांना भेटण्यासाठी गेले . श्वेता च्या आई ने त्या दोघांना आधीच खूप बजावून पाठवलं होत . कोणत्याच गोष्टीची काळजी न करता त्यावर मात कशी करता येईल याचा विचार करण्याची क्षमता त्यांच्या मध्ये हे तिने त्यांना पटवून दिलं होत .
हे दोघे ही हॉस्पिटल मध्ये पोहचताच . त्यांना लगेच डॉक्टरांच्या केबिन मध्ये पाठवतात . डॉक्टर अगदी हसत दोघांना हि आतमध्ये बोलवतात. " आणि या बसा! अस म्हणतात ! आणि आधी दोघे ही निवांत बसा ! कोणत्याही प्रकारच्या तणावामध्ये बसू नका ! अस ते त्यांना स्पष्ट सांगतात ! " हे ऐकल्यानंतर दोघांना थोड बर वाटत आणि काहीतरी चांगली बातमी असल्याचा अंदाज येतो . डॉक्टर पुढे म्हणतात , रिपोर्ट खूप चांगले आले आहेत ! तुम्हाला आणि मला वाटले होते तसे नाहीत रिपोर्ट ! हे ऐकून अनुराग आणि श्वेता दोघे ही खुपच आनंदी होतात . आणि डॉक्टरांना धन्यवाद बोलू लागतात . पण ते त्यांना थांबवत पुढे म्हणतात , श्वेता आणि अनुराग पूर्ण ऐका , रिपोर्ट आपल्याला वाटले होते तसे आले नाहीत हे खर आहे पण , रिपोर्ट नॉर्मल ही नाहीत !हे ऐकून त्या दोघांच्या चेहऱ्याचा रंगच उडून जातो .
डॉक्टर म्हणतात हे बघा , तुमच्या प्रेगन्सी च्या आणि आताच्या रिपोर्ट नुसार आर्या ही इतर मुलांसारखी नाही हे खर आहे !
हा आजार तीन प्रकारचा असतो ... सौम्य , मध्यम आणि दीर्घ ..
आपल्यासाठी चांगली बातमी आहे की आर्याच्या आजार हा सौम्य प्रकारचा आहे . .....
continue ....