राघव आणि तन्वीचे मुंबईहून देवगडकडे येणारे प्रवास सुरू झाला होता. हा हिवाळ्याचा सुरुवातीचा काळ होता, आणि हवा ताजीत आणि थंड होती. कारमधून सौम्य संगीत वाजत होते, तर तन्वी खिडकीतून बाहेर बघत होती. झाडांच्या ओळी, शेतांमध्ये वाहणारे छोटे नदिया, आणि समुद्राची येणारी वास – वातावरण अत्यंत शांत आणि ताजेतोड होते.
“तुझा गाव नक्कीच खूप सुंदर असणार,” तन्वी उत्साहाने म्हणाली, तिचं चेहरा हसत चमकत होता.
“हो, देवगड खास आहे. मी बरेच हिवाळ्याचे सुट्ट्या तिथे घालवलेल्या आहेत. तीन वर्ष नंतर मी माझ्या घरी जातोय,” राघव म्हणाल, त्याच्या आवाजात एक गोड आठवण होती.
गावाच्या जवळ आले की, राघव अचानक शांत झाला. तन्वीने हे लक्षात घेतले, पण ती काहीही बोलली नाही, आणि बाहेरच्या दृश्यात रमली.
---
कार अखेर राणे कुटुंबाच्या वारशाच्या घराजवळ थांबली. ते एक मोठं दगडी वाडा होतं, ज्यात एक प्राचीनता आणि सौंदर्य होतं. पण, त्याच्या मागे काही अंतरावर, दुसरी एक वाडा होता. त्याचे तुटलेले खिडक्या, गडद भिंती, आणि त्याभोवती वाढलेली झाडे, त्याला एक भुताटकीचं रूप देत होती.
“त्या वाढतात… तिथे कोण राहतं का?” तन्वी कुतूहलाने विचारलं.
राघव थकला होता, त्याने तिचं प्रश्न टाळलं आणि पुढे चालू लागला.“तिथे कोण नाही. चला, सगळे आत थांबले आहेत,” तो म्हणाला.
वाड्यात प्रवेश करताच, राघव आणि तन्वीला राणे कुटुंबाने उबदार स्वागत केले. त्यांनी राघवच्या आई, काका-काकींची आशीर्वाद घेतली. सगळे आनंदी होते, त्यांच्या विवाहाबद्दल, त्यांचं काम काय आहे हे विचारत होते. घराच्या भिंतीवर जुने छायाचित्रं होती, आणि प्राचीन लाकडी फर्निचर घराला एक ऐतिहासिक रूप देत होते.
“आता तुम्ही आलात, तर मजा सुरू होईल. लग्नाची तयारी जोरात सुरू होईल!” राघवच्या काकांनी उत्साहाने सांगितलं.
राघव आणि तन्वी त्यांच्या खोलीत गेले. खिडकीतून, तो वाडा स्पष्टपणे दिसत होता. तन्वी, आपलं कुतूहल थांबवू शकली नाही, ती पुन्हा विचारली, “हा वाडा इतका ओसाड का दिसतो? तिथे कोणी राहतं का?”
“कोणी नाही. मी जेव्हा शेवटचा आलो होतो, त्या वेळी त्या वाढ च मलखा हृदयविकाराने मृत्यू झाला,” राघव म्हणाला “तो फक्त एक जुना, विसरलेला ठिकाण आहे.”
राघवच्या आवाजातली तणाव तन्वीला आश्चर्यचकित करतो.
---
दुपारी, एक चांगल्या जेवणानंतर, राणे कुटुंबं लिव्हिंग रूममध्ये एकत्र आली होती. राघव आणि तन्वी, सगळं सोबत चहा पित होते, आणि चर्चेचा विषय आगामी कुटुंबाच्या लग्नाबद्दल वळला.
“तर, कधी आहे लग्न? काका?” तन्वीने विचारलं, घरात सुरू झालेल्या तयारींच्या लहरीतेला पहात.
विश्वनाथ काकांनी आपल्या खुर्चीत बसून मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने उत्तर दिलं, "२० तारखेला ठरवण्यात आले आहे, माधवीला शोभेल, असा मुलगा बघितलेला आहे, जवळ गावा आहे त्याचा, हुशार आणि सुंदर, मुंबईमध्ये काम करणारा"
"माधवी पण आमची काय कमी नाही आहे सर्व गुण संपन्न आहे जेवण, काम, सगळं काही जमत तिला उत्तम आहे ती, तिने तिच्या आयुष्यात सु भेटू" राघवच्या आई म्हणाली, तिच्या आवाजात उत्साह आणि चिंता दोन्ही जाणवत होत्या.
राघव जाणतो की या लग्नाचा महत्त्व त्याच्या कुटुंबासाठी, विशेषतः त्याच्या आईसाठी, खूप आहे. माधवी तिच्या आईला प्रिय असल्याने, अनेक तयारी लांबून सुरू झाल्या होत्या.
“पण, एक गोष्ट नक्की आहे, कुटुंब एकत्र येताना पाहून आनंद होतोय,” तो म्हणाला.
“दोन कुटुंबं जरा एकत्र येत आहेत हे खूप महत्वाचं आहे,” राघवची आई पुढे म्हणाली. “लग्न फक्त एक सोहळा नाही, पण दोन परंपरा, दोन इतिहासांचा मिलाप आहे. आपल्या कुटुंबात एक जुनी म्हण आहे—‘लग्नाच्या घंटा वाजतात, तेव्हा भूतकाळाच्या सावल्या शांत होतात.’”
तन्वी, काहीतरी खोल अर्थ समजून विचारलं, “तुम्ही काय म्हणत आहात?”
विश्वनाथ काकांनी हसून सांगितलं, “आ, ही एक जुनी म्हण आहे. तुम्ही पुढील काही दिवसांत ती ऐकाल. देवगडमध्ये लग्नांची परंपरा अशीच आहे—एक मिश्रण आनंद आणि गंभीरतेचं. पण असंच असतं, इथे.”
चर्चा हलकी झाली आणि लग्नाचे कपडे आणि जेवणाबद्दल बोलायला सुरूवात झाली. तन्वीला अजूनही असे वाटत होते की कुटुंबाच्या शब्दांत काही गोड वळण आहे, काही गुप्त अर्थ लपलेला आहे. पण सध्या, ती त्यावर विचार करणं थांबवून चांगला वेळ घालवू इच्छित होती.
---
पुढील सकाळी, तन्वी आणि राघव गावात फिरायला गेले. स्थानिक लोक चांगले होते, त्यांना नवविवाहित जोडप्याशी बोलायला आवडत होतं आणि त्यांच्या शहरातील जीवनाबद्दल विचारत होते. मात्र, वाडा च्या उल्लेखावर त्यांचे चेहेरे गडद होऊन जात होते.
“त्या ठिकाणी जाऊ नका,” एका वृद्ध महिलेने तन्वीला चेतावणी दिली. “तो जागा शापित आहे.”
“अरे, हे फक्त गोष्टी आहेत,” राघव हसत उत्तरला. “त्यात काही नाही.”
---
दुपारी, तन्वी आणि राघव वाड्याच्या अंगणात बसले होते. सौम्य सूर्यप्रकाशात तन्वीचे चेहरा चमकले, तिचं हसू आणखी तेजस्वी बनलं. ती गावाबद्दल अनेक प्रश्न विचारत होती, आणि राघव तिला एकेक प्रश्नाचे उत्तर धीराने देत होता.
“तुमचा गाव खूप सुंदर आहे, राघव. आपण इथे लवकर का आलो नाही?” तन्वी म्हणाली.
“हो, पण तेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात नव्हता, आणि हे गावात आपला आहे तू आता माझीच आहेस” राघव सौम्य हसत म्हणाला.
त्यांचं ते खास क्षण होतं. जरी त्यांचं लग्न नविन होतं, तरी एकमेकांवरील त्यांचं प्रेम जणू अनंत काळाचं वाटत होतं. तन्वीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून.
“आणि आता जेव्हा तुम्ही इथे आहात, मला काहीही दुसरं पाहिजे नाही,” राघव हळूच म्हणाला.
“माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, राघव,” तन्वी म्हणाली.
“माझाही खूप खूप खूप जास्त प्रेम आहे तुमच्यावर.”
पण त्यांच्याच त्या गोड संभाषणाच्या पलीकडे, त्या वाड्यात ती सावली त्यांचे संभाषण ऐकत होती
रात्रीच्या जेवणानंतर, सगळे आरामात बसले होते आणि गप्पा मारत होते. अचानक एक तिव्र वाऱ्याची लहरी आली, आणि दिवे विझले. काही क्षणांसाठी, सगळे गप्प झाले.
_____
Me first time Mazya life madhe Marathi story lihata aahe i know khup mistake astil but I'll try my best to improve it and I hope you guys will loved this story
Thank you for reading ♥️