राजकारण - भाग 2 Ankush Shingade द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राजकारण - भाग 2

राजकारण कादंबरी भाग दोन          वसीमला आठवत होता निवडणुकीपुर्वीचा काळ. सत्तेत अनेई साऱ्या पार्ट्या होत्या व त्या एकत्र येवून निवडणूक लढवीत होत्या. त्यामुळंच त्यांचे दोन गट बनले होते. पहिला गट होता महाविकास आघाडी व दुसरा पक्ष होता मित्रपक्ष. मित्रपक्षात तीन प्रमुख पक्ष व इतर,लहानमोठे पक्ष होते. तर महाविकास आघाडीतही तीच स्थिती होती. नुकताच एक बदलाव झाला होता. महाविकास आघाडीतील दोन पार्ट्या होत्या, त्यांना न्यायालयानं दोन नवीन चिन्हं दिलं होतं. तर त्यांच्याच पक्षाचं असलेलं जुनं चिन्हं हे मित्रपक्षाच्या पार्टीला दिलं होतं. त्यामुळंच संभ्रम होणार होता. तसाच फरकही पडणार होता. हे वसीमला माहीत होतं. परंतु वसीम ती गोष्ट कोणाला सांगून आपल्या पार्टीचं पितळ उघडं पाडू पाहात नव्हता. कारण त्यात त्याचा फार मोठा स्वार्थ होता.             वसीम एक कार्यकर्ता म्हणून पार्टीचं काम करु लागला होता. तसं पार्टीला जिंकायचं असल्यानं त्याची पार्टी आश्वासनंही भरपूरच देत होती. आगामी येत असलेल्या तारखेला विधानसभा निवडणूक होवू घातलेली होती. निवडणूक पक्ष जनतेला मतदान करायला लावत होतं. त्यासाठी मागील लोकसभेसारखी जनजागृती देखील करीत होते. लोकांनी मतदान करावे म्हणून ही जनजागृती होती. शालेय स्तरावरही विद्यार्थ्यांच्या मार्फत जनजागृतीपर काही उपक्रम राबविण्यात येणार होते. ज्या विद्यार्थ्यांना राजकारणापासून दूर ठेवावे असा कयास असतांनाही आताही विद्यार्थी आपला अभ्यास सोडून सर्वांनी मतदान करावं हे आवर्जून सांगणार होते. त्यासाठी भित्तिपत्रकासह विविध उपक्रम शाळेचे विद्यार्थी राबविणार होते. हे सर्व प्रयत्न मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी होते. नेतेही निवडणूकीत निवडून येण्यासाठी आश्वासने देत होते. मी अमुक करेल मी तमूक करेल. मात्र ही आश्वासनं लाभ देण्यासाठी आहेत की देशाचा विकास करण्यासाठी? हाच प्रश्न संभ्रम निर्माण करणारा होता व त्याचं उत्तरही अनाकलनीयच होतं. वसीमही आपल्या भाषणातून सत्य गोष्टी वदत होता. तो आपल्या भाषणात सांगत होता.           'मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे व या माध्यमातून देश चालवायला दिला जाणार आहे नेत्यांना. नेते कोण तर ते आपले प्रतिनिधी. ज्याला जनता निवडून देणार आहे. जनता असा नेता निवडणार आहे की जो इमानदार असणार. ज्यावर कोणतेच भ्रष्टाचाराचे आरोप नसणार. जो काम करणारा असणार. जो कर्तव्यनिष्ठ, नम्र व सुस्वभावी असणार. परंतु आजपर्यंत तरी असं घडलं काय? खरंच इमानदार असलेले, काम करणारे, भ्रष्टाचारी नसलेले नेते निवडून आले काय? याचा विचार केल्यास आजपर्यंत जनतेला असे नेते सापडलेच नाहीत. प्रत्येकांनी निवडणूक लढवली व निवडणूक लढवीत असतांना मी किती इमानदार आहे हेच दाखवले. परंतु पडद्याआड मात्र संपत्ती वाढली व मालमत्ताही तेवढीच वाढली. ही वाढलेली मालमत्ता कुठून आली? असा विचार केल्यास त्याला उत्तर दिसत नाही.          घराणेशाहीबाबत उत्तर देतांना आजही एक नेता व त्या नेत्याच्या घरचेच त्याचे नातेवाईक, असे सर्वचजण निवडणूकीच्या रिंगणात उभे राहात असतात. कधी पती, पत्नी एकमेकांविरुद्ध, तर कधी पिता पुत्र एकमेकांविरुद्ध, कधी बहिण भाऊ एकमेकांविरुद्ध, तर कधी नातू व आजे एकमेकांविरुद्ध, कधी सासरे व सुनादेखील निवडणूकीत एकमेकांविरुद्ध उभे राहात असतात. अन् जनताही अशांना निवडून देत असते, एक प्रकारचा विश्वास दाखवून. त्यावेळेस जी मंडळी निवडणूकीच्या रिंगणात असतात. तेव्हा मोठमोठी आश्वासनं देत असतात. मात्र जेव्हा अशी मंडळी निवडून आली की त्या नेत्यांनी दिलेलं आश्वासन कुठं जातं तेच कळत नाही. आश्वासन गायब होतं, अन् त्याठिकाणी स्वार्थ जागा होतो. मग ज्या नेत्याजवळ कालच्या घडीला काहीही नसलं तरी आज त्याच नेत्यांजवळ गडगंज संपत्ती उभी राहते. ही अशी नेत्यांची संपत्ती. नेते निवडणूकीतून मालामाल होत असतात आणि जनता बेहाल होत असते.            सरकार....... सरकार कोणतेही असो, निवडणूक सुरु असतांना काही गोष्टी नेमक्या दरवेळेस त्यांच्या आश्वासनात असतात. वीज बिल कमी करु, वृद्धांना पेन्शन देवू, शेतकरी आत्महत्या थांबवू, शेतकरी वर्गाला कर्जमाफी देवू, सिलेंडरचे दर कमी करु, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करु, रोजगार निर्मीती करु, रोजगार देवू, अमूक करु, ढमूक करु. निव्वळ आश्वासनंच. जनतेची दिशाभूल करणारी आश्वासनं. त्यावर जनता भाळते व मतदान करते. त्यानंतर सरकार निवडून येताच काही आश्वासनांची प्रतिपुर्ती होते. काहींची होत नाही. शिवाय अशी प्रतिपुर्ती होत असतांना एखादी योजना आणली जाते. त्या योजनेचा लाभ दोनचार लोकांना तेवढा दिला जातो आणि सांगितलं जातं व मोठ्या प्रमाणात जाहीरात होते की आम्ही अमूक योजनेचं आश्वासन दिलं होतं. ते आम्ही राबवलं व पुर्ण केलं. आता यावर विचार करण्याची ही गरज आहे की जे आश्वासन निवडणूकीच्या वेळेस दिलं जातं, ते आश्वासन केवळ चार दोन लोकांनाच दिलं जातेय की सर्वांनाच. जर ते आश्वासन सर्वांनाच दिलं जातं तर मंग त्या आश्वासनाचा लाभ एकदोघांनाच का? सर्वांना का नाही? असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. आश्वासनाच्या परीपुर्तीत जनतेला राशन निःशुल्क दिलं जातं, महिलांना व वृद्धांना निःशुल्क बससेवा दिल्या जातात. वृद्धांना पेन्शन, निराधार असलेल्या विधवांना पेन्शन, कलावंतांना पेन्शन. या सर्व गोष्टी केल्या जातात. परंतु या सर्व गोष्टींचा लाभ नेमका कोण घेतात? यावर विचार केला जात नाही. खरंच ज्या विधवांना पेन्शन मिळते, त्या विधवा खरंच खऱ्या विधवा असतात का की पेन्शन पुरत्याच विधवा असतात. रेशन दुकानात सर्वांनाच अन्नधान्य मोफत मिळते. जे खरे लाभार्थी असतात, त्यांनाही आणि जे लाभार्थी नसतात, त्यांनाही. मग दुसर्‍याच दिवशी गाडी फिरते, रेशनचे तांदूळ विकत घेण्यासाठी. जे लाभार्थी रेशन दुकानातून लाभाचा तांदूळ उचलतात. तो तांदूळच ते खात नाहीत. विकून टाकतात नव्हे तर त्यातून पैसा कमवतात व घरी बसून ऐषआराम भोगतात.           सरकारच्या बऱ्याच योजना अशाच आहेत. जनतेला काम करण्याची गरजच नाही. काही लोकांना विधवा नसतांना विधवा म्हणून मिळणारी पेन्शन, एसटीचा मोफत प्रवास, लाभार्थी नसूनही रेशनचे मिळणारे मोफत धान्य, वृद्ध नसतांनाही वृद्ध असल्याचा दाखला सादर करुन  मिळविलेली रक्कम, बस प्रवास, निराधार नसतांनाही निराधार म्हणून मिळविलेली रक्कम. अन् या सर्व प्रकरणाची शहानिशा केल्यास सत्य आढळून येतं की हे रेशनचे लाभार्थी खरे नाहीत. त्यांच्याकडे चारचाकी गाड्या आहेत, मोठमोठे बंगले आहेत, निराधाराच्या लाभार्थ्यांना चार चार मुलं आहेत, वृद्ध पेन्शनधारकाचे वय वर्षे पंच्चावन आहे, शिवाय या सर्वांच्या घरात नोकरचाकर आहेत, काही विधवांना पतीही आहेत. मात्र अशी शहानिशा करुन सत्य जरी आढळून आलं तरी कारवाई होवूच शकत नाही. कारण शहानिशा करणारेही डकैतीच असतात. एखादा व्यक्ती अशा प्रकरणात दोषी आढळून आल्यास त्यांच्याकडून लाच म्हणून रक्कम घेतली जाते व सोडून दिले जाते. ती प्रकरणं तिथल्या तिथंच निपटवली जातात. कोणावरच कारवाई होत नाही. असे जर वारंवार घडत असेल तर लाभार्थी का घाबरतील? ते घाबरणारच नाही. त्यांनाही माहीत आहे की कारवाई होईल तेव्हा होईल, आताचं पाहा, समजा एखाद्यावेळेस कारवाई झालीच तर आपण आंदोलन करु. नेत्यांना जाब विचारु. विचारु की त्यांनी भ्रष्टाचार केला नाही काय? विचारु की त्यांच्याजवळ एवढा पैसा कुठून आला? अन् त्यावरही सरकार ऐकत नसेल तर सरकारला निवडणूकीच्या वेळेस धडा शिकवू. आमच्यावर कारवाई केली ना. मग आता बघा, तुम्हाला आम्ही निवडणुकीतून कसा धडा शिकवला.          काही काही लाभार्थी असेच वागत असतात. काही काही लाभार्थी लोकांचं असं वागणं. असं वागणं बरं नाही. तरीही काही काही लाभार्थी असेच वागत असतात. तसेच तेच लाभार्थी कोणतं सरकार कसं राहील. देशाचा विकास करेल की नाही. याचा विचार करीत नाहीत. फक्त लाभातून आमचं पोट कसं भरेल, याचाच विचार करीत असतात. मात्र देशाचा विकास जनतेला अशा लाभाच्या योजनेतून होत नाही. उलट देश अशा योजनेतून बरबाद होत असतो. कारण ज्यांना योजना मिळतात. त्यांच्यातील काही लोकं खरे लाभार्थी असतात की ज्याचे प्रमाण मोजले तर बोटावरच मोजण्याइतके असते. काही लाभार्थी असेही असतात की जे खरे लाभार्थी नसतात व सरकार अशाच लोकांमुळं निवडून येत असते निवडणुकीत. परंतु यातून इतर सर्वच बऱ्याच लोकांचे नुकसान होत असते. जे लोकं कर रुपात पैसा भरतात. कारण अशा लाभार्थ्यांना देण्यात येणारा पैसा हा काही सरकार आपल्या खिशातून देत नाही तर तो पैसा जनतेच्याच खिशातून कर रुपात वसूल केल्या जात असतो. ज्यातून जनतेच्या खिशाला कात्री पडत असते. हा दरोडाच असतो जनतेच्या पैशावर, दिवसा ढवळ्या टाकलेला.            खरं तर, अशा लाभार्थी योजना देण्यातून लोकं आळशी बनतात. ते कामं करीत नाहीत, ही वास्तविकता आहे. त्यामुळं अशा योजना देण्यापेक्षा जर देशाचा विकास खऱ्या स्वरुपात करायचा असेल तर अशा योजना देवूच नयेत. त्या बदल्यात वीज बिलाचे दर कमी करावेत. सिलेंडरचे दर कमी करावेत. देशात उद्योग निर्मीती करुन लोकांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवावेत. प्रवासी भाडे कमी करावेत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावेत. शिक्षण निःशुल्क करावं. एवढंच नाही तर शेतीसाठी सिंचन योजना राबवाव्यात की जेणेकरुन देशातील शेती समृद्ध होईल. विदेशातून कोणताच माल निर्यात करावा लागणार नाही. ज्याचा लाभ तळागाळातील सर्वच लोकांना घेता येईल, ज्यात गरीब, श्रीमंत असा भेदभाव दिसणार नाही,  निर्माणही होणार नाही व देश तेवढाच खऱ्या अर्थानं सृजलाम सुफलाम होईल यात शंका नाही.         आमचं येणारं सरकार हेच करणार आहे. आम्ही वीज बिल माफ करु वा निदान वीज बिलाचे दर तरी कमी करु. शिक्षण निःशुल्क करु. शेतीसाठी सिंचन योजना राबवू. बेरोजगारांचे प्रश्न सोडवू. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करु.'          वसीमनं आपल्या भाषणातून आपलं मत प्रदर्शित केलं होतं. त्यालाही वाटत होतं की त्याचीच पार्टी सत्तेवर यावी. जी सत्तेवर होती. जेणेकरुन त्याची पार्टी सत्तेवर आल्यास त्याची चांदीच चांदी होईल.           ही निवडणूक प्रतिष्ठेची की सुधारणा करण्याची. असा प्रश्न जनसामान्यांना पडला होता. कारण या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. काही लोकं म्हणत होते की विकास झाला. तर काही लोकं म्हणत होते की विकास झालाच नाही. तसं पाहिल्यास निवडणूक म्हटली की हौसे, नवशे व गवसे निवडणूकीला उभे राहात असतात. त्यांना माहीतही असते की मी जर निवडणुकीत उभा राहिलो तर अजिबातच निवडून येणार नाही. तरीही ते निवडणुकीला उभे राहात असतात व पैशाचा अपव्यय करीत असतात.            पैशाबाबत सांगायचं झाल्यास जे उमेदवार निवडणुकीला उभे राहात असतात. त्यांच्याजवळ इमानदारीचा स्वकष्टानं कमवलेला पैसा असतोच असे नाही. त्यातील बरेचसे उमेदवार हे वाईट मार्गानं पैसे कमवीत असतात. ज्यातून निवडणूकीसाठी थोडेसे पैसे उधळले, तरीही त्यांना फरक पडत नाही. कारण हा पैसा कष्टाचा नसतो. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या मालमत्ता विक्री करणाऱ्या सोसायटी मालकाचं देता येईल. त्यानं विकलेल्या एका मालमत्तेचा पैसा तो निवडणूकीला लावू शकतो. कारण त्याचेजवळ असे कितीतरी मालमत्ता असतात. त्यांना फरक पडत नाही. दुसरं उदाहरण पेट्रोल पंपधारक मालकाचं देता येईल. तो आपल्या पेट्रोल पंपावर सेटिंग करुन पैसे कमवीत असतो. तो दाबलेला पैसा हा अवैध मार्गानं कमविलेला पैसा असतो. त्यालाही फरक पडत नाही. तिसरं एक उदाहरण म्हणजे गतकाळात असाही एक संस्थाचालक निवडणुकीला उभा झाला होता. कारण त्याचेजवळ फुकटचा पैसा आला होता. जो पैसा त्याच्या संस्थेत जे शिक्षक कर्मचारी होते, त्यांच्यापासून लुटला होता. आजही तीच गत आहे. एखादा शाळेतील संस्थाचालक निवडणुकीला उभा राहिलाच तर त्याच शाळेतील शिक्षकांकडून देण म्हणून पैसा गोळा केला जातो. जो पैसा निवडणूकीत खर्च केला जातो व असा पैसा निवडणूकीत खर्च करतांना काहीच वाटत नाही.            निवडणूकीत पैसा खर्च करणं म्हटलं तर असा अवैध पैसा खर्च करणं आलंच. कारण निवडणुकीला पैसा लागतोच. अलिकडे निवडणूक अधिकारी पैशाचा हिशोब मागत असतात आणि निवडणूकीत उभा राहणारा उमेदवारही खर्चाचं विवरण देत असतो. जो पैसा कमी खर्च झालेला दाखवला जातो. मात्र प्रत्यक्षात कितीतरी पैसा खर्च झालेला असतो. ते कोणीही पाहात नाही व पाहू शकत नाही. कारण तो पैसा प्रत्यक्षात कार्यकर्त्यांमार्फत खर्च केला जातो. असे कार्यकर्ते, जे आपल्याच घराजवळ एखाद्या अज्ञात व्यक्तीच्या घरी जेवनखावण अर्थात पार्ट्या ठेवत असतात. त्या पैशाचं मोजमाप केलं जात नाही. काही ठिकाणी तर मतदारांनी आपल्याला मतदान करावं, म्हणून त्यांना एक नोट व दारुची एक बाटलही वाटली जाते. यात या सर्व गोष्टींसाठी जो पैसा खर्च होतो, तो मोजला जात नाही. काल हे सर्रास घडत होतं. कारण त्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणा काल नव्हत्या. आज तशी परिस्थिती उरलेली नाही. आज सीसीटीव्ही कॅमेरे बारीक नजर ठेवतात. तरीही आज असे नेत्यांचे धंदे चालतात. जे धंदे उजागर होवू शकत नाहीत.         नेते मंडळी हिरीरीनं निवडणूकीत उभे राहात असतात. त्यासाठी लाखो रुपये देखील खर्च करतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे, संपत्ती मिळवता येणं. निवडणूकीच्या माध्यमातून एक साधारण व्यक्ती निवडून आल्यास त्याचेजवळ पाच वर्षाच्या कार्यकाळात एवढा पैसा येतो की त्याच्या सात पिढ्या या बसून खावू शकतात. ही वास्तविकता आहे. म्हणूनच निवडणूकीला हौसे, नवशे, गवसे उभे राहात असतात. मग निवडणूकीत निवडून नाही आले तरी चालेल. विचार असतो की नशिबानं साथ दिला आणि निवडणूकीत निवडून आलो तर. कधीकधी कावळा फांदीवर बसल्यागत व फांदी मोडल्यागत अवस्था होते. तो चमत्कारच असतो की मातब्बर माणसं निवडणूकीतून पडतात व ज्याची शाश्वती नसते, तेच निवडणूकीत निवडून येत असतात.           दरवेळेस निवडणूक येत असते व ती पार पडत असते. याहीवेळेस निवडणूक आली होती व ती पार पडणार होती. मात्र यावेळेसची निवडणूक ही वेगळीच होती. या निवडणूकीत प्रतिष्ठा दावावर लागलेली असून ही निवडणूक प्रतिष्ठेची ची की सुधारणा करण्याची तोच विचार करायला मार्ग उरला नव्हता.          येत्या काही दिवसांत राज्यात निवडणूक होवू घातली होती व त्या निवडणूकीचा निकाल लवकरच लागणार होता. त्यातच सर्व राजकीय पक्षाचा कस लागणार होता. निवडणूकीबाबत सांगतांना एवढंच सांगता येईल की या निवडणूकीतून दोन पैलू दिसत होते. पहिला म्हणजे गतकाळात ज्या ज्या राजकीय पक्षानं राज्याच्या राजकारणात कुरघोडी केली वा जनतेच्या भावनांशी ते खेळले. त्या सर्वांना ही निवडणूक अद्दल घडवणार आहे की काय? असे वाटायला लागले होते व दुसरा पैलू म्हणजे ही निवडणूक अशाच राजकारण्यांच्या पाठीशी उभी राहून पुन्हा त्याच लोकांना निवडणूकीत निवडून देते की काय? हेही वाटायला लागलं होतं. कारण हे राजकारण होतं व या राजकारणाबाबत काळच सांगणार होता. तूर्तास आता निवडणूकीबाबत प्रचार करण्याची संधी असल्यानं सर्वांनी अगत्यानं प्रचार करणं गरजेचं होतं.            गतकाळात जे सरकार होतं. त्याला फाटा देत हे सरकार बाहेर निघालं होतं. तसं पाहिल्यास देशात लोकशाही असल्यानं बरेचदा नेत्यांमध्येच वाद सुरु असतात. कारण ते कोणाचे गुलाम नसतात. त्यातच एकमेकांचे आचार विचार एकमेकांना पटत नाही व ते एका पक्षातून बाहेर पडतात. ते दुसऱ्याच पक्षात जातात. याला पक्षबदल म्हणतात.            हेच घडलं राज्यातील दोन पार्ट्यात. मग कलगीतुरा बराच गाजला व एक सरकार पडलं आणि दुसरं सरकार, सरकार स्वरुपात विकास पावलं. त्याला दुसर्‍याच एका पार्टीनंही मदत केली व दोघांनी मिळून राजकारण गाजवलं. त्यानंतर चिन्हांवरुन वाद झालेत. पहिलं पदचिन्हं कोणाला द्यायचं? तोही वाद न्यायालयानं मिटवला व पहिलं पदचिन्हं हे  एका सरकारला मिळालं. त्यानंतर दुसऱ्याही गटानं चिन्हं प्राप्तीचा दावा केला व त्या पक्षाला दुसरं चिन्हं मिळालं. त्यानंतर वाद मिटला, तरीही आरोप प्रत्यारोप सुरुच राहिले.           काही दिवस बरे गेले व काही दिवसानंतर त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती घडली. दुसर्‍याच आणखी एका पार्टीचा वाद सुरु झाला व पहिल्या पार्टीसारखे तुकडे दुसऱ्या पार्टीचेही झालेत. त्यांनी आपले काही विश्वासू आमदार घेतले व ते जुन्या पार्टीतून बाहेर पडले. एवढंच नाही तर चिन्हांवरही दावा केला. ज्यात नवीन व्यक्तीच्या पक्षाला जुनंच चिन्हं मिळालं आणि जुन्या व्यक्तीच्या पक्षाला जुनं चिन्हं मिळालं. .            राज्याच्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात एक नवीन वाद तयार झाला होता. त्यातच दोन त्रिकुट तयार झाले होते. त्यानुसार नवी पार्टी कोणाची वा जुनी कोणाची? त्यानंतर तो वाद मिटल्यावर जुनं चिन्हं कोणाचं? हाही एक वाद तयार झाला होता. त्यावरही उपाय निघाला व आता एक नवीनच वाद तयार झाला होता अस्मितेचा. त्यातच लोकसभा निवडणूक झाली व लोकसभेत अस्मिता दिसून पडली. परंतु त्यात स्पष्टता नव्हती. ही विधानसभा होती व या विधानसभेत कोण किती मातब्बर, याची कसोटी लागली होती. ही परिक्षाच होती, नेत्यांच्या अस्मितेची. आता या निवडणुकीत लोकं एका त्रिकुटाला निवडून देणार होते की दुसऱ्या त्रिकुटाला निवडून देणार होते, हे सांगता येणे कठीण होते. परंतु एक विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीला प्रतिष्ठेची निवडणूक समजून कामाला लागले होते. आपआपले नेते जिंकावेत. म्हणून आपआपल्या पक्षातील उमेदवाराचा प्रचार ते हिरीरीनं करु लागले होते. ज्यात वसीमचाही समावेश होता. ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असून कोण किती मातब्बर होते हे कळणार होते. परंतु हे जरी खरं असलं तरी वसीम लोकांना सांगत होता की जनतेनं या निवडणूकीत भाग घेतांना नेत्यांच्या प्रतिष्ठेपणावर विश्वास ठेवू नये. त्यांनी मतदान करतांना जो नेता सुधारणा करु शकतो. त्यांनाच निवडणूकीत निवडून द्यावं. कारण आपल्यासाठी त्या नेत्यांची प्रतिष्ठा महत्वाची नाही. आपल्यासाठी महत्वपुर्ण बाब आहे राज्याचा विकास. जो व्यक्ती आपल्या राज्याचा विकास करु शकेल, असे जर वाटत असेल तर जनतेनं त्यालाच निवडणूकीत निवडून द्यावं. इतरांना निवडून देवू नये. मग त्यासाठी हा व्यक्ती अमूक मोठ्या पार्टीचा आहे, याचाही विचार करु नये. केवळ व्यक्ती बघावा. मग तो लहानच पार्टीतील असो वा मोठ्या गणमान्य पार्टीचा असो. आपल्यासाठी फक्त विकास महत्वाचा आहे. त्यासाठी सर्वांनी घराघरातून निघून मतदान केंद्रावर जावं व सर्वांनीच मतदान करावं म्हणजे झालं.                 ************************************************            रक्षा घराच्या पारावर बसली होती. तोच तिला आठवला तिचा भुतकाळ. आज वसीमसोबत ती आनंदात होती व तिनं मुस्लीम धर्म स्विकारला होता. वसीम ज्यावेळेस प्रचारात पडला एक कार्यकर्ता म्हणून. त्यावेळेस तो भाषणंही द्यायचा. त्याच भाषणानं रक्षा प्रभावीत झाली होती. तिला वसीम आवडायला लागला होता. ती प्रेम करु लागली होती त्याचेवर. मात्र यात धर्म आडवा येत होता. तिचं ते प्रेम करणं वसीमला माहीत नव्हतं. याचाच अर्थ तिचं त्याचेवर एकतर्फी प्रेम होतं.            ते गाव व त्या गावात हिंदू मुसलमान एकोपा होता. परंतु आंतरजातीय विवाहाला आताही विरोधच होता. त्यातच आंतरधर्मीय विवाह तोही नकोच होता. लोकं मुस्लिमांशी विवाह करणे टाळत असत. रक्षाला ते माहीत होतं. परंतु ते तिचं तारुण्याचं वय. त्या वयात प्रेम कोण टाळणार? प्रश्न होता. शिवाय रक्षाला वाटत होते की तो तिला केव्हा भेटेल, केव्हा नाही. परंतु त्याबाबत संधी ती शोधतच होती. अशातच तशी ती एक संधी चालून आली.            आज मतदानाचा दिवस होता व वसीम मतदानाची चिठ्ठी घेवून रक्षाच्या घरी आला. त्यानं तिच्या हातात ती एक चिठ्ठी देण्यापुर्वी दार ठोठावलं. तोच रक्षानं दार उघडलं व पाहते काय, वसीम दारात उभा. तिनं त्याला पाहिलं व म्हणाली,            "कोण? वसीम."           "होय, वसीमच."           "कसा काय इकडं भटकलाय?"           "चिठ्ठी आणलीया तुही काळून."           "तू मतदान करावं व तुले मतदान सुलभ जावं म्हणून आणलीया."            "ओके. थॅंक्स."            "असं थॅंक्स नाय. मतदान करुन. अन् माईत हाये न तुले कोणाले मतदान करायचं हाये ते?"            "हो माईत हाये. परंतु मतदान झाल्यावरचं काय?"            "म्हणजे?"             "पार्टी."             "काय पार्टी पाह्यजे तुले?"             "एकट्यात भेट. मंग सांगेन."             "ठीक हाये. भेटेन एकट्यात. आतं लय घाई हाये मले. मी जातो."             वसीम आल्यापावले निघून गेला. तसे रक्षाच्या मनात तरंग उठू लागले होते. ती स्वप्न पाहू लागली होती. ते स्वप्न होते विवाहाचे. परंतु क्षणातच ती भानावर आली व ती निवडणुकीत मतदान करण्याचा विचार करु लागली होती.          रक्षालाही आवडत होतं राजकारण. ती घरी दुरदर्शन लावून बसली होती. तसं तिनं वसीमच्याच पक्षाला मतदान केलं होतं. त्यामुळंच थोडीशी उत्सुकता शिगेला पोहोचली होतीच. त्यातच वाटत होतं की वसीमची पार्टी जिंकावी. कारण वसीम तिच्या ओळखीचा होता. मंग त्या पार्टीनं विकास केला की नाही गतकाळात हे तिला पाहायचं नव्हतं.              आज दिलेल्या तारखेला निवडणूक पार पडली व त्याचा निकालही आला होता. निकालानुसार मित्रपक्ष मोठ्या फरकानं जिंकला होता. तसंच महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला होता. वसीमची पार्टी हारली होती. मात्र वसीम ज्यांच्या बाजूनं उभा होता. तो उमेदवार निवडणूकीत निवडून आला होता. मग प्रतिक्रियेचा पाऊस पडला पडला. मित्रपक्ष वाले स्वतःला शेर समजत प्रतिक्रिया देवू लागले होते. त्यातच एका मोठ्या नेत्यानं एका वाहिनीवर म्हटलं, 'आमच्या  लाडक्या बहिणींनी आपल्या सावत्र भावाला जोडा मारला.' अशी प्रतिक्रिया. प्रतिक्रिया तशा भरपूर आल्यात. ज्यात कोणी म्हणत होतं, 'आमच्यावर आमच्या लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवला.' तर कोणी म्हणत होतं की आमच्या लाडक्या बहिणींनी त्यांना धडा शिकवला.' तर कोणी म्हणत होतं, 'आमच्या बहिणींनी विकास पाहिला.'         मित्रपक्षाकडून या संदर्भात जशा प्रतिक्रिया आल्या. तशाच प्रतिक्रिया या महाविकास आघाडीतील काही समर्थक असलेल्या सामान्य लोकांकडून आल्या. ज्यात महिलांची अक्कल घुटन्यात असते, असे म्हणत होते काहीजण व ते म्हणत असतांना त्यांची कीव येत होती. त्याचं कारण होतं, महिलांनी आतापर्यंत केलेल्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती. एक महिला असलेल्या इंदिरा गांधींनी देश चालवला. एक महिला असलेली कैसर विल्यम अंतराळात गेली. एक महिला असलेली ताराबाई औरंगजेबाशी विरश्रीनं लढली आणि एक महिला असलेल्या जिजाऊनं शिवबा घडवला. एवढंच नाही तर सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची गंगा सर्व स्रियांपर्यंत पोहोचवली. तिही एक स्त्रीच होती. अशा बऱ्याच स्रिया होत्या की त्यांनी आतापर्यंत कितीतरी कामं केली व आपली नावे अजरामर केलीत. तरीही आजचीही मंडळी स्रियांची अक्कल काढत सुटले होते. म्हणत होते की स्रियांची अक्कल घुटन्यात असते. हा घुटना म्हणजेच गुडघा होय. ही पहिली प्रतिक्रिया. दुसरी प्रतिक्रिया आली होती, ती म्हणजे चिन्हांचा संभ्रम. काही लोकं म्हणत होते की चिन्हं आम्हाला कळलंच नाही. आम्ही आमच्या चिन्हाला मित्रपक्षाचंच चिन्हं समजत होतो. आम्हाला आमचं चिन्हं समजलच नाही. नाही तर आम्ही आमच्याच चिन्हावर मतदान केलं असतं. सारखी तीच प्रतिक्रिया. काहीजण म्हणत होते की आम्हाला आमच्या पक्षाचं चिन्हं दिसलंच नाहीत. म्हणून आम्ही मित्रपक्षाला मतदान केलं. त्यातच काही म्हणत होते की न्यायालयानं दोघांनाही वेगवेगळी चिन्हं द्यायला हवी होती. आघाडीला जसं नवीन चिन्हं दिलं. तसंच नवीन चिन्हं मित्रपक्षालाही द्यायला हवं होतं. म्हणजे एवढा फरक दिसला नसता. यावर उत्तर देतांना मित्रपक्षातील काही लोकं म्हणत होते की जनता काय एवढे दिवस झोपून होती काय की त्यांना चिन्हं कळलेच नाही. अन् जनता काय एवढी अज्ञाणी आहे काय की त्यांना चिन्हं कळत नाही. त्यातच त्यांना जरी चिन्हं वेगवेगळे मिळाले असतील तरी त्यांनी आपलं चिन्हं मतदारांना व्यवस्थीत पटवून का दिलं नाही? त्यामुळंच वरील प्रतिक्रिया योग्य वाटतच नाही. असं विरोधकांचं म्हणणं.          त्या  प्रतिक्रिया. त्यातच आणखी प्रतिक्रिया आली नव्हे तर ते नेहमीचं तुणतुणं होतं. जे म्हणणं होतं, इव्हीएम मशीन मध्ये सेटींग केली गेली, हॅक केली गेली. असं ते म्हणणं. ते तर तुणतुणंच होतं. तरीही निवडणूक यंत्रणेनं निवडणूक पारदर्शक करण्यासाठी मॉकपोल यंत्रणा ठेवली होती. त्यातच व्हि व्हि पॅट योजना ठेवली होती. ज्यात कोणाला मतदान केलं, ते जनतेला दिसत होतं. एवढंच नाही तर आता कोणताच घोळ होवू नये म्हणून मतदान कक्षात सी सी टि व्ही कॅमेरेही बसवले होते. तरीही इ व्हि एम हॅक केल्या गेली हे लोकांचं सारखं तुणतुणं. ते कधीच विरोधकांच्या डोक्यातून जाणार. हे कळत नव्हतं. वसीमला वाटत होतं की पराभव झाल्यावर असे प्रश्न येणारच. लोकंच नाही तर विरोधकच ते. ते तर काही बाही म्हणणारच. आपणही तसे काही कमी नाही बोलायला. आपणही बोलतोच. परंतु जिंकलेल्या लोकांनी मात्र त्यांचेवर प्रतिक्रिया देवू नये. कारण तशी प्रतिक्रिया दिल्यास वाद तयार होईल.             वसीमही त्या प्रतिक्रिया हिरीरीनं ऐकत होता. त्याची पार्टी सत्तेवर आली होती. तसा त्याच्याही मनात संभ्रम निर्माण झालाच होता. तसा तो त्याबद्दल जाणीवपूर्वक विचार करीत होता. त्याला जे वाटत होतं. ते तो लोकांना नाही तर आघाडीच्या नेत्यांना सांगत होता.            "प्रतिक्रिया या असणारच. चांगल्या व वाईटही. कधी सामान्य लोकांकडून तर कधी नेत्यांकडूनही. जिंकलेल्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्याच व हरलेल्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्याच. तेव्हा जिंकलेल्यांनी कोण काय बोलतोय यांचा विचार करु नये. त्यांना जनतेनंच धडा शिकवलाय. हे निकालातून दिसलं. ते दुःखच आहे. महादुःख. तेव्हा त्या गोष्टीचा विचार न करता व ती गोष्ट मनात न ठेवता जिंकलेल्यांनी त्यांनाही आपलाच भाऊ समजावं व चिडीचं राजकारण करु नये. त्यांच्यासाठी वेगळ्याच अशा विशेष प्रतिक्रिया देवू नये. कारण हारजीत व पराभव चालतच राहणार. कोणी पप्पू म्हणणार तर कोणी खरबुजा म्हणणार. कोणी स्रियांची अक्कलही काढणार. कोणी इव्हीएमवर शंका घेणार. कोणी चिन्हांवर आक्षेप नोंदविणार. ते सगळं विसरुन सरकारनं जनतेसाठी कामं करावीत. जनतेनं आपल्याला निवडून दिलंय ना. मग ज्या लाडक्या बहिणीनं निवडून दिलं. तिची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तिला कोणताही त्रास होवू नये याची. तिला त्रास कोणता असणार? यावर विचार करतांना एवढंच सांगता येईल की तिची चूल ज्या गोष्टींवर अवलंबून असते. त्या सिंलेडरचे दर व मसाला आणि तेलाचे दर कमी करावे लागेल. दुसरं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी निवडून दिलं, तो शेतकरी आत्महत्या करणार नाही, याचा विचार करावा लागेल. त्यासाठी खते व बी बियाण्याच्या किंमती कमी कराव्या लागतील. त्यातच त्यांच्या शेतातील निघणाऱ्या मालाला योग्य भाव द्यावा लागेल. तिसरं काम म्हणजे ज्या युवकांनी निवडून दिलंय. त्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्या लागतील. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात निदान पाच तरी मोठमोठे उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात उभे करावे लागतील. चवथं काम म्हणजे ज्या वयोवृद्ध लोकांनी निवडून दिलंय. त्यांच्या आरोग्यासाठी व उपचारासाठी रुग्णालय तेही निःशुल्क स्वरुपात उभे करावे लागतील. या व्यतिरीक्त तुमची लाडकी बहिण सुरक्षीत असायला हवी म्हणून पोलीस ठाणे उघडावे लागतील. कोणीही केव्हाही, रात्री, अपरात्री तिच्यावर बलात्कार करणार नाही यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या सामान्य, गरीब लोकांनी मतदान केलं, त्यांच्या मुलासाठी आपल्याला निःशुल्क शिक्षणाची व्यवस्था करावी लागेल. मगच आपल्याला पुढील काळातही ही जनता अशाच स्वरुपाच्या भरघोष मतानं निवडून देईल. कारण आता बरेचसे लोकं चूक मंजूर न करता म्हणत आहेत की आम्हाला चिन्हं समजलेलं नाही. मात्र पाच वर्षानं त्यांना चिन्हं समजेलच. मग आपण जर काम केलं नाही तर कदाचीत चिन्हं माहीत झाल्यानं लोकं डोळस होवू शकतात. ते नक्कीच विचार करु शकतात की आपण किती कामं केलीत. त्यातच कामानुसार ते आपल्याला नक्कीच जागाही दाखवू शकतात. मात्र आपलं जर काम असेल तर आपण तरुन जावू. नाहीतर नक्कीच मागं पडू. त्यानंतर पश्चातापाची वेळ नक्कीच येवू शकते. असं होवू नये म्हणून आज जी संधी आपल्याला मिळालेली आहे. जनतेनं जी संधी आपल्याला दिलेली आहे. त्या संधीचं आपण सोनं करावं. जनता आजच्यासारखी आपणाला कधीच विसरणार नाही. अन् आपण काम न केल्यास हीच जनता आपल्याला नेस्तनाबूत करायलाही मागेपुढे पाहणार नाही. कारण ही जनता आहे जनता. तेव्हा वेळीच सावधान होवून काम केलेलं बरं."         वसीमचं म्हणणं बरोबर होतं. कारण कोणतंही सरकार हे निवडणुकीत निवडून येताच हुरळून जातं. कोणी कोणी काम करतं आणि कोणी कोणी करीत नाही. त्यावर वसीमचं संभाषण म्हणजे एक बोलकी प्रतिक्रियाच होती.           वसीमनं राजकारण सांभाळत आपल्या पार्टीसाठी बोलकी प्रतिक्रिया दिली होती. भावीकाळात आपल्यालाही निवडणुकीची तिकीट मिळेल व आपल्यालाही निवडणुकीतून भाग घेवून निवडून येता येईल यासाठी. परंतु कटेंगे आणि बटेंगे वाद. तो वाद निवडणूक झाली व निकाल लागला तरी क्षमला नाही. तो चिघळतच गेला. ज्या वादानं गावातील हिंदू मुस्लीम एकता तुटली होती. आता गाव एकमेकांविरुद्ध धर्माविरुद्ध संशयतेनं पाहात होते. ज्याचा त्रास वसीमलाही होत होता.           वसीमसह काही मुस्लीम लोकं राहात होती गावात. ती मुस्लीम मंडळी वसीमला आवर्जून सांगायची की त्यानं गावातील हिंदू लोकांशी संबंध ठेवू नये. जास्त जवळीक साधू नये. कामापुरता मामा असं वर्तन ठेवावं. शिवाय त्यानं मित्रपक्ष पार्टीचं काम करु नये. कारण ती पार्टी हिंदूंची आहे. आपल्या मुस्लिमांची नाही. त्यामुळं त्या पार्टीत काम केल्यास ती पार्टी सत्तेत राहील. ज्याचा त्रास आपल्यालाच होत राहील.           त्या बिरादरीतील लोकांचं वसीमला सांगणं. परंतु वसीम त्यांचं कसं काय ऐकणार होता. तसं पाहिल्यास त्याचं तर,प्रेमच होतं रक्षावर. जी एक हिंदू मुलगी होती व जिनं आपला धर्म सोडून केवळ प्रेमाखातर वसीमशी विवाह केला होता.            वसीम आपल्या बिरादरीतील लोकांचं ऐकत नव्हता. तीच बाजू धरुन वसीमला लोकांनी वाळीत टाकलं. आता वसीमशी त्याची अख्खी बिरादरी बोलत नव्हती. ज्याचा त्रास वसीमलाच होवू लागला होता. मात्र त्याचं पक्षप्रेम त्यानं कमी केलं नाही. तीच पक्षनिष्ठा ठेवली होती आणि जरी त्याच्या बिरादरीतील लोकांचं त्याला सहकार्य नसलं तरी तो मित्रपक्षाचीच पार्टी धरुन होता.             दिलेल्या तारखेला विधानसभेची निवडणूक पार पडली व त्याचा निकालही लागला. निकालानुसार मित्रपक्षाला भरघोस मतं मिळाली. तशी महाविकास आघाडीला मतं मिळाली नाहीत. त्यानंतर विजयाचं गणित साकार झालं. मित्रपक्षातील लोकं लाडक्या बहिणीला विजयाचे शिल्पकार समजायला लागलेत तर महाविकास आघाडीतील लोकं इव्हीएम मशीनला दोष देवून तो मशिनीचा घोळ आहे असं समजायला लागले. परंतु पराभव तो पराभवच. तसं पाहिल्यास कोणत्याही युद्धात ते युद्ध जिंकण्यासाठी साम, दाम, दंड भेद या रणनीतीचा वापर केला जातो. तसाच वापर मित्रपक्षानं केला व ती पार्टी सत्तेत आली. जनतेनं महाविकास आघाडीतील उमेदवारांना नाकारलं.           महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या पराभवाची अनेक कारणे जरी असतील तरी एकमात्र आणि एकमेव कारण होतं ते म्हणजे लाडकी बहिण योजना. लाडक्या बहिणीला मित्रपक्ष सरकार दिड हजार रुपये महिना देत होते गतकाळात. ती एक योजना होती व त्याच योजनेला महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आधीच विरोध केला होता. म्हटलं होतं की हा जनतेचा पैसा आहे. यातून राज्यातील आर्थिक स्थिती ढासळेल. राज्यावर कर्जाचा भार होईल. परंतु त्यावर मात करुन मित्रपक्षातील सरकारनं लाडक्या बहिणींना दिवाळीची भेट दिली. जो काही पैसा आला. त्या पैशातून लाडक्या बहिणींनी दिवाळी साजरी केली. त्यापुर्वी दिवाळी साजरी करतांना प्रश्न पडायचा की पुढे दिवाळी आहे. आपण पैसा कुठून आणायचा. तो प्रश्न यावेळच्या दिवाळीत उरला नव्हता. त्यातच दिवाळी साजरी झाल्यानंतर लाडक्या बहिणीच नाही तर त्यांचा परिवारही खुश झाला व लागलीच दिवाळीनंतर निवडणूक लागली. ज्यात ताजंताजंच काम होतं. शिवाय त्याबाबतीत युट्युब चॅनलवर जाहिरातीही होत्या. आपण याच सरकारला निवडून आणायचं. नाही आणल्यावर आपली लाडकी बहिण योजना पुढं सुरु राहणार नाही. आपल्याला लाडकी बहिण योजना मिळणार नाही.           लाडकी बहिण योजना हे एक आश्वासनच होतं. परंतु ते आश्वासन जरी असलं तरी त्यात भावना होती. ऐन दुःखाच्या वेळेस मदत झाल्याची व लाडक्या भावानं पैसा पुरविल्याची भावना. त्याचाच परिणाम झाला व या वेळेस भुतो न भविष्यती भरघोस मतदान झालं. महिलांची टक्केवारी वाढली व महिलांनी स्वतः मतदान केंद्रावर जावून तासभर रांगेत लागून मित्रपक्षाला मतदान केलं. याचाच अर्थ असा की मित्रपक्षाची सत्ता आली. त्याचं कारण म्हणजे लाडकी बहिण व सोबतीला होता महिलांना राज्यातील एसटी मध्ये असलेला मोफत प्रवास, म्हाताऱ्यांना राज्यातील एसटीचा असलेला मोफत प्रवास, मोफत राशनच्या धान्याची व्यवस्था, शिवाय तीन मोफत सिलेंडरची व्यवस्था. या सर्व व्यवस्था जनतेसाठी असल्यानं लोकांनी महागाईकडे पाहिलं नाही. लोकांनी राज्यातील इतर कोणत्याच समस्येकडे पाहिलं नाही. त्यांना शेतकरी आत्महत्या दिसल्या नाहीत. त्यांच्या शेतात पीक पिकतं काय? कामावर मजूर मिळतांना हेळसांड होते काय? आमच्या बाळाला पुरेसं शिक्षण निःशुल्क मिळते काय? हे दिसलं नाही. बेरोजगारीवर त्यांनी विचार केला नाही. आरोग्ययंत्रणेवर विचार केला नाही. शेतमालाला योग्य भाव मिळतो काय? याचाही विचार केला नाही. एवढंच नाही तर राज्यात उद्योगधंदे विकसीत आहेत काय? महिला सुरक्षीत आहेत काय? प्रशासनव्यवस्था चांगली आहे काय? आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटले काय? सरकारी नोकरीतील अनुशेष दूर झाला काय? हे काहीच दिसलं नाही. दिसला फक्त निःशुल्कपणा. अन् तीच गोष्ट मित्रपक्षानं विशेष बाब म्हणून आपल्या जाहिरनाम्यातही आवर्जून दाखवली. दाखवला विकासाचा जाहिरनामा. चकाकणारे रस्ते आणि ते जनतेसाठी राबवत असलेल्या योजना. त्याची जाहिरात केल्या गेली. जे मतदान करण्यापुर्वी जनतेच्या नजरेत राहिल, तेच दाखवलं महायुतीनं. अन् त्याच प्रदर्शनाच्या आधारावर महायुती जिंकली. कारण मतदारात सामान्य लोकं होते. जे वरच्या स्तराचा विचारच करीत नव्हते. जे नेते सांगतील, करतील, योजना देतील, त्यावर विश्वास ठेवणारे होते.            वसीम शिकलेला होता. तो अंधश्रद्धा पटत नव्हत्या, तरीपण तो नित्यनेमानं, नमाजही पठन करीत असे. मात्र त्याला काही त्याच्याच धर्माच्या प्रथा पटत नव्हत्या.  शिवाय पटत नव्हती ती बुरखापद्धत. ज्याचा तो ती पद्धत पटत नसतांनाही विरोध करु शकत नव्हता. त्याला पटत नव्हत्या आपल्या धर्मात असलेल्या काही अंधश्रद्धा. त्यातच त्याला हिंदू धर्मातीलही काही अंधश्रद्धा पटत नव्हत्या.            वसीमला वाटत होतं की आज शिक्षण आहे. सर्व मतदारांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे. काही लोकं जरी कमी शिकलेले असतील तरी निदान बरेचसे दहावी बारावी झालेले आहेत. पर्यायानं सांगायचं झाल्यास मतदार हे शिकलेले आहेत. परंतु मतदार जरी शिकले सवरले असतील तरी विचारी नाहीत. ते जर शहाणे असते तर आज ज्या काही प्रथा परंपरा अंधश्रद्धेच्या रुपानं सुरु आहेत, त्या राहिल्या नसत्या. आज रजस्वाचा विटाळ होत नसतांनाही बऱ्याचशा शिकलेल्या कुटूंबात तोच मानला जातो. मरणाचाही विटाळ तसाच जन्माचाही विटाळ मानला जातो. आजच्या काळात कितीही लोकं शिकले असले तरी मांजर आडवी जाताच रस्ता पार करीत नाहीत. आजही सत्यनारायण घातला जातो व माणूस जीवंत असतांना हीच शिकलेली माणसं त्याला वृद्धाश्रमात टाकतात व मेल्यावर कावळ्याची वाट पाहात बसतात. तो कावळा येवून पात्रातील वा पिंडावर ठेवलेले पिठाचे गोळे खाल्ले तर आपण आपल्या मायबापाची सेवा नाही केली तरी पापातून मुक्ती मिळाली असे मानले जाते. तेच निवडणुकीतही दिसून आलं होतं. निवडणुकीत लोकांनी परस्पर विचार न करता मतदान केलं होतं. जे उमेदवारांनी सांगितलं. त्यावर विचार न करता विश्वास ठेवला होता. असं वसीमला वाटत होतं.           बरेच मतदार हे असेच असतात. विचार न करता मतदान करणारे आणि राजकीय पक्ष हे धुर्त असतात. मगरासारखे. याबाबतीत एका मगराची कथा प्रसिद्ध आहे. एक मगर एका माकडाला म्हणत असते की तू माझ्या पाठीवर बस. मी तूला जिथे नेईल, तिथे स्वर्ग आहे. माकड त्यावर विश्वास करतो व तो त्या मगराच्या पाठीवर बसतो. मगर त्याला खोल पाण्यात नेते. तसा माकड घाबरतो. कारण त्याला पोहता येत नाही. तो घाबरतो व विचारतो की कुठाय स्वर्ग. त्यावर मगर म्हणते की मी तुला इथं आणलं स्वर्ग दाखविण्याचं आमीष देवून. कारण मला तुझं काळीज खायचं आहे. परंतु माकड हुशार असते. ते म्हणते की तू वेडा आहेस. मला जर असं आधीच सांगीतलं असतं तर मी माझं काळीज त्या काठावरुन आणलं असतं सोबत. आता परत जावं लागेल की नाही. त्यावर क्षणाचाही विलंब न करता मगर त्या माकडाला पाण्याच्या काठावर आणते. त्यानंतर ते माकड टणकन उडी मारुन झाडावर चढतं आणि म्हणतं की तू खरंच मुर्ख आहेस. तूला साधी अक्कल नाही की प्रत्येक प्राण्याचं काळीज हे त्याच्यासोबत असतं. ते पाण्याच्या काठावर नसतं. त्यानंतर मगराला पश्चाताप होतो व ते तिथून निघून जातं. या कथेत मगर म्हणजे मताचा जोगवा मागणारे उमेदवार. जे जनतेला स्वर्ग दाखविण्याचं आश्वासन देत असतात. मात्र त्यांचा डाव वेगळा असतो. ते निवडून आले की आपलीच पोळी शेकत असतात. आपला निवडणुकीत खर्च केलेला पैसा काढत असतात. तो काढून झाला की मग जनतेचं काम. कधीकधी जनता स्वर्ग पाहण्याच्या चक्करमध्ये फसते व त्यांच्या भावनांचा पदोपदी जीव जात असतो. कारण जनता ही माकडासारखी हुशार नसते की काळीज पाण्याच्या काठावर आहे असे म्हणेल. कारण मतदान झालेलं असते व वेळ निघून गेलेली असते.            गत निवडणुकीत मित्रपक्षानं जी आश्वासनं दिलीत. त्यानुसार जनतेनं मित्रपक्षाच्या आश्वासनावर विश्वास ठेवला व त्यालाच मतदान केलं. त्यासाठी इतर कोणत्याच गोष्टी पाहिल्या नाहीत. कारण त्यांना दिसलं की सरकार लाडक्या बहिणीला पैसे देवू केले. ते दिलेच. मोफत सिलेंडर देवू केले. ते दिलेच. मोफत प्रवास देवू केला, तो दिलाच आणि सोबतच रस्तेही चांगले चमकदार केलेच. याउलट महाविकास आघाडीतील लोकांनी या सर्व योजनेला विरोध केला होता. परंतु आता निवडणुकीत तेच सरकार जनतेला लाडकी बहिण योजना देवू पाहात आहेत. जे मित्रपक्षानं दिलेलं आहे. त्याच गोष्टी वाढीव प्रमाणात देवू पाहात आहेत. याच महाविकास आघाडीतील गोष्टी मित्रपक्षानं लोकांच्या मनावर बिंबवल्या. मग बस, त्याचाच परिणाम झाला व मित्रपक्ष एककल्ली बढतीनं निवडणुकीत निवडून आला. हवं तर महाविकास आघाडीतील उमेदवारांनी याव्यतिरिक्त वर दिलेल्या इतर गोष्टी लोकांना सांगितल्या असत्या वा त्या बिंबवल्या असत्या तर कदाचीत काहीसा फरकही पडला असता. परंतु योजना त्याच, जाहिरनामेही तेच. अन् कार्यदिशाही तीच. यामुळेच गोंधळ उडाला व महाविकास आघाडीतील उमेदवारांचा धज्जा उडाला आणि मित्रपक्ष भरघोस मतानं निवडून आला. आता एकमेकांवर आगपाखड करुन वा इ व्हि एमला दोष देवून काही उपयोग नव्हता. कारण ही एक लढाई होती. ती जिंकणे आवश्यक होते. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल. तेच करणे मित्रपक्षाला जमले. महाविकास आघाडीला ते जमले नाही. म्हणूनच मित्रपक्ष जिंकला. महाविकास आघाडी नाही.                   ************************************************                    रक्षाला आठवत होता तो बालपणीचा काळ. रक्षा आज सकाळीच उठली होती. तिला आज अचानक तिच्या बालपणाचं स्वप्न पडलं होतं सहलीचं. लहानपणची सहल. त्यावर्षी सहल गेली होती. ज्या सहलीत तिही त्या बसमध्ये होती. ज्या बसला अपघात झाला होता व त्या अपघातात तिचीच एक मैत्रीण मृत्यूमुखी पडली होती. निर्वाणी तिचं नाव होतं. तीच स्वप्नात आली होती रक्षाच्या.           आज सकाळी उत्साह होता. कित्येक वर्ष झाली होती घटना होवून. आपण सहलीला जाणार. मजा करणार. नवंनवं पाहायला मिळणार. आपल्या सवंगड्यासोबत गप्पा मारायला मिळणार. शिक्षकांसोबत नृत्य करायला मिळणार, भेंड्या खेळायला मिळणार, गाणी म्हणायला मिळणार. तीच ती शाळा असणार नाही. तोच तो कंटाळवाणा अभ्यास असणार नाही. निसर्ग रम्य वातावरण असेल आणि त्यात सर्वांना रमता येईल.          रक्षालाही तेच वाटत होतं व निर्वाणीलाही तसंच वाटू लागलं होतं. तसाच विचार करुन तिनंही शाळेची सहल जाते म्हणून आईवडीलांच्या मागे लागून सहलीचं शुल्क भरलं. तिला काय माहीत होतं की आपण सहलीला जाणार व आपल्याला मृत्यू कवटाळेल. परंतु घात झाला.          निर्वाणी एका विद्यालयात शिकणारी विद्यार्थीनी. तशी ती हुशारच होती. परंतु साधारण. तिचे वडील शिलानंद हे त्याच गावाचे. गतकाळात ते माजी जिल्हा परीषद सदस्य राहिलेले. तशी त्यांची शेतीही होती गावाला. शिवाय सहलीची बस गावातून जाणार असल्याचं कळताच ते तिला निरोप देण्यासाठी सहलीच्या थांबण्याचा स्थळावर आले. त्यांनी तिला पाहिलं. ती सुखरुप आणि आनंदी आहे याचा त्यांना आनंद झाला. तसा आनंद कोणत्या पित्याला होणार नाही. तसा त्यांनाही. त्यांनी तिला बाय बाय केला. मात्र त्यांना काय माहीत होते की तो तिला केलेला बाय बाय अखेरचाच बाय बाय ठरेल. त्यानंतर ते घरी आले. थोडे भावनाहीन झाले. त्यातच अर्धा तास गेला. गाडी गावावरुन निघाली होतीच.          गाडी गावावरुन निघाली. ती सहलीच्या स्थळी जाण्यासाठी निघाली. परंतु त्या अभयारण्यात जाण्यापुर्वी एक घाट लागलं. जिथे उतार होता व चालकाला थोडं गतीनं वाहन चालवणं भाग होतं. कारण गती जर वाहनाला नसेल तर ती मागे जावून अपघात होवू शकतो ही भीती होती आणि गती जर असेल तर नियंत्रण सुटण्याचीही भीती होती. याचाच अर्थ असा होता की इकडे आड होती आणि तिकडे विहीर अशी अवस्था होती. मग काय चालकाने थोड्या गतीनंच वाहन चालवलं. तसं पाहिल्यास चालकानं या ठिकाणी अति दक्षतेनं वाहन चालवणं भाग होतं. परंतु कदाचीत तसं घडलंच नसेल व वेगावरील नियंत्रण सुटलं असेल. बस नियंत्रीत झाली नाही व बस उलटून अपघात झाला. मग काय,  निर्वाणीच्या डोक्याला मार लागला व ती जागीच गतप्राण झाली.          गाडी गावावरुन निघाली होती व अर्धाच तास झाला होता. वडील हायसे होवून घरी बसले होते. तोच फोन खटखटला. समोरुन आवाज होता.          "हॅलो, अपघात झालाय. सहलीची बस आहे. शाळेचं नाव लिहिलंय. त्यात एक मुलगी मरण पावलीय. कदाचीत ती आपलीच मुलगी आहे. परंतु विश्वास ठेवू नका आणि धीरही सोडू नका."          समोरचा आवाज. तो आवाज ऐकताच शिलानंदच्या चेहर्‍यावर जो उत्साह होता. तो अचानक मावळला. त्या उत्साहावर विरंजण पडलं व त्याचं त्याचक्षणी दुःखात रुपांतर झालं. वाटलं की कदाचीत हा फोन खरा ठरु नये. आपली मुलगी मृत ठरु नये. परंतु ते तरी काय करणार? शेवटी काळ जेव्हा येतो, तेव्हा तो कोणालाच सोडत नाही. तसंच झालं. वडीलांचा त्या फोनवर विश्वास बसला नाही. परंतु जेव्हा त्यांनी प्रकरणाची शहानिशा केली. तेव्हा त्यांना त्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागतो. तसाच विश्वास निर्वाणीच्या वडीलांनाही ठेवावा लागला. कालपर्यंत मायबापाच्या डोळ्यासमोर असणारी व बागडणारी निर्वाणी आज मायबापाच्या डोळ्यासमोर नव्हती. तिची आई घटनेच्या दिवशी धाय मोकळून रडली व बेशुद्ध झाली. भावालाही सदमा पोहोचलाच होता. जो त्याच शाळेत सहाव्या वर्गाला शिकत होता. अन् रक्षानं ते प्रत्यक्षात डोळ्यानं पाहिल्यावर तिलाही सदमा पोहोचलाच होता. ती बेशुद्ध झाली होती. ती जेव्हा होशात आली. तेव्हा तिनं निर्वाणीचंच नाव घेतलं होतं. तिला जेव्हा माहीत झालं की निर्वाणी या जगात नाही. तेव्हा अतिशय वाईट वाटलं होतं.          निर्वाणी व रक्षा खास मैत्रीणी होत्या. गावातून त्या बसनं शिकायला जात होत्या शहरात. रक्षा शिकतच राहिली. ती आताही बसनंच जात होती. परंतु आता तिला बसनं जातांना भीती वाटत होती. तसं पाहिल्यास जेव्हा अपघात झाला, तेव्हा ती बरेच दिवस बसनं गेली नव्हती. परंतु शिक्षण शिकायचं असेल तर बसनं जाणं भाग होतं. म्हणूनच नाईलाजास्तव ती आज शिक्षणासाठी बसनं जात होती. आज ती निर्वाणीचीही आठवण विसरली होती. परंतु आज निर्वाणी अचानक तिच्या स्वप्नात आली व तिनं सांगीतलं की आज माझ्या मृत्यूला कित्येक वर्ष झाले. तू मला विसरली होती. मी आजच्याच दिवशी मरण पावली होती. तू कदाचीत विसरली की काय?          सहल....... सहल हा भाग शैक्षणिक दृष्टीनं अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यातून शिक्षकांना जे ज्ञान देता येत नाही, ते ज्ञान सहलीतून देता येतं. त्यासाठीच सहल आयोजन केलं जाते. परंतु सहलीतून प्रत्यक्ष जरी अनुभव देता येत असला तरी सहल ही एक जबाबदारीची गोष्ट आहे. एका अध्यापक विद्यालयात तेथील सहल ही गोव्याला गेली होती व त्या गोव्यात समुद्रात समुद्रलहरीचा आनंद घेत असतांना एक मुलगा त्या लहरीतच सामावला गेला. त्यामुळंच त्या महाविद्यालयात सहल बंदी होती. ती नंतरच्या काळात हटली. ज्या काळात सहल आयोजीत केली होती. परंतु विद्यार्थ्यांना ठासून सांगीतलं होतं की त्यांनी पाण्याजवळ अजिबात जावू नये. परंतु मुलंच ती. ती ऐकणार तेव्हा ना. मुलं त्या सहलीत एक नदी पार करीत असतांना शिक्षकांनी सांगीतलं होतं की पाण्यात जावू नये, तरी ती नावेत बसली व नौकाविहार केलाच. मात्र रक्षाच्या विद्यालयाच्या मुलांसोबत हा जाणूनबुजूनचा प्रकार घडला नाही. अनवधानानं अपघात झाला. परंतु हा अनवधानानं अपघात झाला असं जरी वाटत असलं तरी तो अनवधानाचा अपघात नव्हताच. असं आज रक्षाला वाटत होतं. चालकानं ही बस विद्यार्थ्यांची आहे असा विचार करुनच गाडी चालवायला हवी होती. वळण नियंत्रीत करण्याच्या स्थळावर सावधगिरीनं गाडी वळवायला हवी होती आणि एवढा धोकाच होता तर शाळेनंही त्या ठिकाणी सहल न्यायलाच हवी नव्हती. अशा जबाबदारीच्या सहली काढूच नये.          पुर्वी सहली जायच्या व सहलीत सरकारी बस ठरवली जायची. त्या बसमधून वाहतूक केल्यानंतर असं काही घडलंच तर नुकसानभरपाई मिळायची आणि शक्यतोवर असं घडायचं नाही. कारण सरकारी बसचे चालक हे बस चालविण्यात मातब्बर असायचे. त्यानंतर काळ बदलला तर त्यात खाजगी बसा आल्या. साधारणतः सहलीत खाजगी बसचाही समावेश करण्यात आला. त्यानंतर सहल आयोजनात परवानगी लागते म्हणून खाजगी बसलाच जास्त प्राधान्य देण्यात आलं. आता दरवर्षी शाळेशाळेत सहली जातात. ज्यात आताच्या काळात खाजगी बसमधून सहलीचं आयोजन केलं जातं. त्याचं कारण असतं, दोन पैसे विद्यार्थ्यांचे वाचावेत हा उद्देश असतो.  तसंच झालं. तसं पाहिल्यास खाजगी वाहनाचे चालक हे अतिआत्मविश्वासू असतात व या ठिकाणी चालकाचा अतिआत्मविश्वासच नडला व अपघात झाला. बसचा वेगच अति असल्यानं चालकाचं वाहनावर असलेलं नियंत्रण सुटलं. ती स्थिती सरकारी बसमध्ये नसते. तिचा वेग हा बांधलेलाच असतो.         अलिकडील काळात रस्ते हे रुंद आहेत याची कल्पनाही सर्वांना आहे. असे असतांना वर्तमानपत्रातील बातम्यानुसार हा रस्ता अरुंद आहे, उतार आहे, वळण आहे, या भागात झाडं आहेत, त्यामुळंच वळण घ्यायला धोका आहे व इथे अपघाताच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. मग असे असतांना व सगळीकडे रस्ते रुंद झालेले असतांना प्रशासनानं या भागातील रस्ते अरुंदच का ठेवले? हाही एक प्रश्न अपघाताच्या बाबींवर संशय व्यक्त करतो. तसं पाहिल्यास सदरील घटनेत प्रशासनाचं काय गेलं? गेलं त्या मायबापाचं, ज्यांची मुलगी घटनास्थळीच गतप्राण झाली. त्यांना कसं वाटत असेल, याची कल्पनाही करता येत नाही. शिवाय या घटनेत शिक्षीकेसह पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थी जखमी झाले. काहींना किरकोळ लागलं, तर काहींना गंभीर स्वरुपात दुखापत होती. काहींवर आय सी यु मध्ये उपचार सुरु होते. काही बेशुद्धही होते. महत्वपुर्ण बाब ही की या घटना आहेत. या घटनेत आपण म्हणतो की अरुंद रस्ता होता म्हणून अपघात झाला. चालकानं बस बरोबर चालवली नाही, म्हणून अपघात झाला. समोर झाडं वाढलेली होती. त्यानं रस्ता दिसला नाही म्हणून अपघात झाला. अमूक गोष्टी पाळल्या नाही म्हणून अपघात झाला. तमूक गोष्टी पाळल्या नाही म्हणून अपघात झाला. हे जरी खरं असलं तरी त्यावरही एक विधाता नावाची शक्ती आहे. यात एक बाजू बरोबर आहे की सहल जर नेली नसती व निर्वाणी त्यात गेली नसती व तिचा तिथे मृत्यूही झाला नसता. परंतु दुसरी बाजू पाहिल्यास असं दिसून येतं, जी गोष्ट विधाता आपल्या अंगावर येवू देत नाही. त्यादृष्टीनेच विचार केल्यास समजा निर्वाणीचा मृत्यूच ठरला होता. तर ती जरी सहलीला गेली नसती तरी तो झालाच असता. तो टाळता आला नसताच. त्याचं कारण म्हणजे निर्वाणीचं पृथ्वीतलावरील आयुष्य हे कदाचीत तेवढंच असेल. तिच्या आईवडीलांना सुख देणारं. कदाचीत हेच तिच्या आईवडीलानंही लक्षात घ्यावं. होणारी घटना होवून गेली. तिला टाळता आलं नाही. आता मात्र पश्चाताप होत आहे. तो होणारही आहे. वाटणार आहे की कदाचीत मी माझ्या मुलीला सहलीला पाठवलं नसतं तर असं घडलं नसतं. परंतु तसं काहीच नसतं. मरणं आणि जगणं आपल्या हातात नसतंच. तेच निर्वाणीसोबत घडलं. परंतु तसं जरी घडलं असलं तरी हे लक्षात घ्यावं की काळ जेव्हा येतो तेव्हा आपल्याला काहीच करता येत नाही. काळानं जर मृत्यू त्याच ठिकाणी लिहिला असेल तर तो त्याच ठिकाणी होईलच. आपली इच्छा नसतांना आपण तिथेच जाणार. त्यापुर्वी सहलीत असे मरण पावले असले आणि शाळेची सहल नेण्याची इच्छा जरी नसली तरी शाळा सहल आयोजित करणारच. शिवाय ज्या ठिकाणी मृत्यु ज्यांचा लिहिला असेल, त्यांना तिथंच मृत्यु येणारच. होणारी घटना ही आपण कितीही काही केले तरी टाळता येत नाही. टाळता येणं शक्य नाही. तेच निर्वाणीच्या बाबतीत घडलं. याचा अर्थ असा नाही की शाळेनं सहलीचं आयोजन करु नये. परंतु ते करीत असतांना अतिशय सावधगिरीचे रस्ते कसे आहेत, चालक कसा आहे, गाड्या कोणत्या आहेत, या सर्व बाबींचा विचार करुन आयोजन करावं म्हणजे झालं. अन् शेवटी काळच आहे. ज्या घटना घडायच्या आहेत. त्या घडणारच आहेत. कदाचीत बसमध्ये मुलाला शाळेत पाठवतांनाही घटना घडतातच. तशी सदरचीही घटना घडलेली आहे व आता त्यावर जास्त विचार करणे गरजेचे नाही. मात्र यावर आपण एक करु शकतो आणि करायला हवं. ते म्हणजे इश्वराजवळ प्रार्थना. ईश्वर निर्वाणीच्या आत्म्याला शांती प्रदान करो व तिच्या मायबापाला आणि परीवाराला तिचं दुःख शोषण्याची ताकद प्रदान करो म्हणजे झालं. जेणेकरुन त्यांना निर्वाणीचा झालेला अपघात विसरता येईल व नव्या स्वरुपातील नवं जीवन जगता येईल.          रक्षा उठली. तिनं डोळे मिटले. मनोमन तिनं निर्वाणीला आठवलं व त्यानंतर ती उठून आपल्या कामाला निघून गेली होती.        ************************************************         निवडणूक झाली होती व अपेक्षेनुसार मित्रपक्ष जिंकला होता. निवडणूक ही बॅलेट पेपरवर न होता इ व्हि एम मशिनवर झाली होती. त्यातच मतदानाची टक्केवारीही वाढली होती. लाडक्या बहिण व इतर दोन चार चांगल्या योजनेमुळं लोकांनी मित्रपक्षाला भरघोस मतदान केलं होतं. त्यामुळंच मित्रपक्ष निवडणूकीत निवडून आला होता. मात्र मित्रपक्ष निवडणुकीत भरघोस मतानं निवडून आला असला तरी विरोधी पक्षाच्या मनात शंका होती. कदाचीत इ व्हि एम मशिन तर सेट नसेल ना केली? तशी शंका वसीमच्या मनात नव्हतीच.           पुर्वी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या. त्यातच काही उमेदवार गुंडगिरी करीत मतदान केंद्रावर दहशत माजवायचे व बॅलेट पेपरवर मतदान करीत गठ्ठा मतदान करायचे. ज्यात गुंड प्रवृत्तीची माणसंही निवडून येत. त्यावर वचक बसावा म्हणून इ व्हि एम मशीन आणली गेली. आता इ व्हि मशीनवर मतदान करतांना वेळ लागत असल्यानं तशा गुंड प्रवृत्तीतून गठ्ठा मतदान करणं शक्य होत नाही. मात्र आता लोकांचे आवडते नेते निवडणूक हरले की लोकांना इ व्हि एम मशीनवरच शंका असते. परंतु इ व्हि एम मशीन सेट नसतेच. कारण इ व्हि एम मशीन ही मतदान सुरु होण्यापुर्वी मॉकपोल करुन दाखवते. ज्यात कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळालं हेही सिद्ध करुन दाखवत असते. ते मॉकपोल म्हणजे इ व्हि एम मशीनची विश्वासार्हताच असते. विशेष म्हणजे इ व्हि एम मशीन सेट असूच शकत नाही आणि ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी ती सेट करुन सिद्ध करुन दाखवावी असं न्यायालयाचं म्हणणं. त्याच अनुषंगानं न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयानं महत्वपुर्ण निकाल दिला.            इ व्हि एम बाबत शंका. विरोधी पक्ष जिंकला की शंका नसते आणि मित्रपक्ष जिंकला की शंकाच असते. यावरुनच वाद. तरीही सर्वोच्च न्यायालयात टाकलेल्या इ व्हि एम बाबतीतील जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. तरीही शंका. असंच का आणि तसंच का?           इ व्हि एम बाबत शंका. त्याचं कारणही तसंच होतं. गत काही दिवसात लागलेला निकाल. हा निकाल अभूतपूर्व अनाकलनीय आणि चमत्कारिक असा लागला की ज्या निकालाची कल्पनाच कोणाला नव्हती. हा निकाल एखाद्यावेळेस जादूगार जादू करुन जसा पेटीतून कबूतर काढतो. तसाच लागला होता. जणू ई व्हि एमच्या मशिनीतून जादू केल्यागतच मित्रपक्षाचे उमेदवार जिंकले असंच वाटत होतं. आता ते कसे जिंकले याचे कारण म्हणजे त्यांनी ज्या ज्या योजना राबवल्या. त्या योजनांवर खुश होवून कदाचीत लोकांनी त्या पक्षांवर मतदान केलेलं दिसत होतं.            मतदानात हेराफेरी झाली असं विरोधी पक्षाचं मत होतं. सर्वोच्च न्यायालयानं जनहित याचिकेवर निकाल देवूनही व इ व्हि एम शंकेची याचिका निकाली काढूनही लोकांचं समाधान झालेलं नव्हतं. त्यातच त्या निकालानंतरही त्यांच्या बैठका सुरु असल्याच्या दिसत होत्या. काही लोकांचं छुप्या स्वरुपात मत होतं की जर इ व्हि एम सेट नाही तर मतपत्रिकेवर मत एखाद्यावेळेस घ्यायला काय हरकत आहे. त्यावर उत्तर असं की हे सगळं बरोबर आहे. परंतु इ व्हि एम मध्ये घोळ झाला हे एखाद्यानं तरी सहप्रमाण न्यायालयाला सिद्ध करुन दाखवावे ना. याबाबतीत गतकाळात एकदा एक न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यात तीन लोकांनी त्यावर आक्षेप घेवून इ व्हि एम मशीन सेट होते असा आरोप केला होता आणि ते पुढेही आले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना इ व्हि एम हॅक करणं जमलं नव्हतं. त्यावरुन इ व्हि एम हे विश्वासार्ह आहे हे सिद्ध झालं. तरीही पुन्हा इ व्हि एम बाबतच शंकाच होती.           वर्तमानपत्रात इ व्हि एम सेट करुन मतदानही सेट केलं. त्यासाठी इजराईल तंत्रज्ञान वापरलं गेलं. असा आरोप एका क्षेत्राच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केला होता. त्यांनी मतदानाच्या दिवशी नऊ ते चार दरम्यान काही प्रतिशत मते रुपांतरीत होतील अशी योजना मित्रपक्षानं केली होती. असे आरोपात म्हटले होते. मात्र इ व्हि एम मशीन खरंच मॅनेज करता येते का? यावर कुणाकडेही ठोस असे पुरावे नव्हते. काही लोकांचं म्हणणं असं होतं की इ व्हि एम मशीन ही मोबाईल सारखं यंत्रच आहे. त्यात चीप बसवली जावून सेट केली जावू शकते. परंतु ते कोणीही सिद्ध करायला तयार नव्हतं आणि सिद्धही करु शकत नव्हते. याबाबत आणखी खोलवर विचार केल्यास काही लोकं हेही म्हणत की आमचे उमेदवार जेव्हा प्रचाराला गावागावात गेले, तेव्हा गावागावात आमच्याच उमेदवारांची चर्चा होती. इतरांच्या सभेत लोकांची गर्दी नव्हती व लोकं त्यांच्याबद्दल अनैतिकच बोलत होते. परंतु असं जरी असलं तरी लोकं हे मतदार होते. त्या मतदारांचे दाखवायचे दात नेत्यांसारखेच असतात. ते जसे पक्ष बदलतात व आपला स्वार्थ साधतात. तसा स्वार्थ मतदारांनी साधला होता. शिवाय मतदान प्रक्रिया ही गुप्त असते. खुद्द मतदान कोणाला केलं हे त्याचं तोच जाणतो. ते त्या मतदाराच्या घरच्या कोणालाच माहीत नसतं. कारण मतदान करणं हा एक हक्कंच असतो लोकांना मिळालेला. शिवाय मतदान ज्या घटकानं जास्त केलं. तो स्रीवर्ग होता आणि स्रीवर्ग हा बोलून दाखवत नाही. तो करुन दाखवतो. एक स्री दुसर्‍या घरुन येवून आपल्या पतीच्या घरात स्वतःला मजबूत करते. ते सुरुवातीला मौन पाळूनच. ती पतीचंही ऐकते,  सासूचंही ऐकते, प्रसंगी सासू व पतीचा अत्याचारही सहन करते. परंतु सुरुवातीला बोलून दाखवत नाही. त्यानंतर ती हळूहळू पावलं पसरते व एक वेळ अशी येते की ती त्या घराची सर्वस्व बनते. पती आणि तिची सासूही तिला दलदल घाबरत असते. परंतु असे करण्याची प्रक्रिया ती सुरुवातीला आपल्या पतीजवळ बोलून दाखवत नाही वा सासूला मी पुढे अमुक अमुक करील असेही सांगत नाही. ती प्रक्रिया मनात ठेवते. मौन राहते आणि कृतीतून त्या सगळ्या प्रक्रिया घडवून आणते. हीच किमया साधली निवडणुकीतही महिलांनी. निवडणुकीत महिलांचा टक्का वाढला, त्यावरुन दिसतच होतं की मित्रपक्ष निवडणुकीत निवडून येणार. अन् तेच घडलं. मित्रपक्षच अगदी भरघोस मतानं निवडणुकीत निवडून आला. महिलांनी लाडकी बहिण योजनेंतर्गत प्रभावीत होवून मित्रपक्षाला भरभरून मतदानाचं दान दिलं. या ठिकाणी जरी मतपत्रिकेवर निवडणूक घेतली असती तरी मित्रपक्षक निवडून आला असता. हे नाकारता येत नव्हतं. त्याचं कारण होतं, लाडकी बहिण योजना. त्या योजनेचे पैसे जरी जास्त नसतील तरी त्या योजनेचा व तीन मोफत सिलेंडरचा महिलांना एवढा आनंद झाला होता की त्यांनी महायुती सरकारला निवडून आणलं होतं. शिवाय त्यांचे पतीही त्या योजनेच्या मिळालेल्या पैशानं आनंदीत झाले होते. त्यातच त्या यु ट्युबवर आलेल्या जाहिरातीही अतिशय महत्वपुर्ण ठरल्या. जर हेच सरकार निवडून आले तरच योजना मिळेल, बसचा मोफत प्रवास मिळेल आणि नाही निवडून आल्यास हे सगळं मिळणार नाही. वैगेरे बाबींचा समावेश त्यात होता.          इ व्हि एम बाबत शंका व्यक्त करतांना काही सामान्य मतदार म्हणत होते की विद्यमान अवस्थेतील महाविकास आघाडी जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला समोर गेली. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यावेळेसच मित्रपक्षानं डाव साधला. मशीन त्यावेळेसही सेट केली होती व महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय करण्याचा डाव होता. जर ही आघाडी विजयी झालीच तर येणाऱ्या सर्व जवळपासच असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल. प्रयत्न करणार नाही व आपण सहजच जिंकू शकू. लाडकी बहिण योजना हा फक्त दिखावा आहे. मशीन ही सेटच आहे व लोकसभेतही सेटच होती. लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूनं सेट होती आणि आता विधानसभेत मित्रपक्षाच्या बाजूनं सेट आहे. परंतु हे जरी खरं मानलं तरी मित्रपक्षानं निवडणुकीत निवडून येण्यासाठी केलेले प्रयत्न विसरता येत नव्हते. त्यांनी स्रियांसाठी केलेला मोफत प्रवास, वयोवृद्धांसाठी केलेला मोफत प्रवास, लाडकी बहिण योजना आणि त्याच माध्यमातून लाडक्या बहिणींशी केलेला संपर्क हा तेवढाच महत्वपुर्ण भाग होता, निवडणुकीत निवडून येण्यासाठी. शिवाय काल विरोध करणारी महाविकास आघाडी ही निवडणुकीदरम्यान आम्हीही लाडकी बहिण योजना राबवू व महिलांना आम्ही जास्त पैसे देवू हेच सांगत होती. जे सांगायला नकोच होतं. त्यांनी निवडणुकीत नाही निवडून आलो तरी चालेल, लाडकी बहिण योजना देणार नाही, याच मतावर ठाम राहायला हवं होतं व ती योजना का देणार नाही, त्याचं उत्तर द्यायला हवं होतं. त्याचा थोडासा कदाचीत प्रभावही दिसला असता. महत्वपुर्ण बाब ही की इ व्हि एम मशीनबाबत जरी लोकांच्या मनात शंका असली तरी ती सेट कशी काय होवू शकते? असा प्रश्न वसीमला होता. मात्र मित्रपक्षातील लोकं म्हणत होते की तशी ती सेट नसतेच आणि सेट असते असं ज्यांना ज्यांना वाटतं. त्यांनी आव्हान स्विकारत ती सेट असल्याचं सर्वोच्च न्यायालयाला सिद्ध करुन दाखवावं. जेणेकरुन त्यांच्या आक्षेपांवर सर्वोच्च न्यायालयाचा विश्वास बसेल. शिवाय लोकांनाही त्या आक्षेपावर विश्वास ठेवता येईल. त्यातच दुधाचं दूध व पाण्याचं पाणीही होईल आणि कायमच निवडणुक ही बॅलेट पेपरवर घ्यावी की इ व्हि एम मशीनवर घ्यावी हेही ठरवता येईल. ************************************************           रक्षा ही चांभार समाजाची होती. तिला बाबासाहेबांबद्दल आदर होता. मात्र तिला असलेला आदर ती दाखवू शकत नव्हती आणि दाखवतही नव्हती. त्यातच आज निवडणूक झाली होती व निवडणूकीला मोजकेच दिवस झाले होते. महायुती जिंकली होती आणि अशातच एक महायुतीचा केंद्रातील व्यक्ती बरळला. त्यानं बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह विधान काढलं. त्यामुळंच रक्षाला त्या व्यक्तीचा भयंकर राग आला होता. ते विधान होतं.           "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर ही आता फॅशन झाली आहे.  देवाचे एवढे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेला असता." हेच विधान संसदेत गाजलं. ती संसद. जी संसद ब्रिटीशांनी भारतीयांचे तमाम प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण केली होती. हे विधान केलं देशाला स्थावर सरकार देणार असलेल्या पक्षाच्या नेत्यानं. हे विधान केलं त्या व्यक्तीनं. ज्यांच्याकडे देशातील महत्वाचं पद होतं. याच वक्तव्यावरुन विरोधकांची जुंपली व विरोधक संतापले. कारण विरोधक हे बाबासाहेब आंबेडकरांना मानत. ते देवच होते विरोधकांचे. परंतु खुद्द बाबासाहेबांनी दिक्षा घेतांना म्हटलं होतं की मी देवाला मानत नाही व मी मरणानंतर मलाही कोणी फुलं वाहू नका. म्हणून हे विरोधक त्यांना देव मानत नव्हते. देव अस्तित्व. देव आहे किंवा नाही. याबाबत विरोधकात संभ्रम नव्हताच. ते देवाची पुजा अर्चना करा असेही म्हणत नव्हते. मात्र सत्ताधारी पक्ष जसे देव देव करत होते. तसे ते आंबेडकर आंबेडकर करत आणि तसं त्यांचं करणं काही वावगं नव्हतं. कारण जे कार्य देवालाही जमले नाही. ते कार्य बाबासाहेबांनी करुन दाखवलं होतं. देवांनी तमाम एससी, एसटी, ओबीसी व स्रिया या सर्वांनाच बाबासाहेब होण्यापुर्वीच्या काळात अंधारातच व भेदभावातच ठेवलं होतं. त्यांना उषःकाल दाखवला नव्हता. शिवाय ज्या देवाची ते पुजाअर्चना करायचे. त्यांची पुजा करण्यासाठी या समाजाला मंदिरप्रवेशही नव्हता. मात्र बाबासाहेबांनी जिथं विचारांचा देव विराजमान होतो. त्या देवाच्या गाभाऱ्यात अर्थात संसदेत सर्वच लोकांना जायला संधी मिळवून दिलेली होती. हे सत्ताधारी पक्षांच्या लोकांनी व कोणत्याच तमाम मानवरुपी प्राण्यांनी विसरु नये. असे रक्षा म्हणत होती.           ते भेदभावपुर्ण विधान. सत्ताधारी पक्षातील त्या महत्वपुर्ण नेत्याच्या मनात तसा संभ्रम नसावाच. त्याचं कारण होतं बाबासाहेबांनी केलेलं महान कार्य. शिवाय सत्ताधारी ज्या सदनात अर्थात संसदेत बसत. तेथील नियमही बाबासाहेबांचीच देण होती. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं व त्यात संसदेची रचना व कार्य सांगीतली. त्यानंतर निवडणुकांचीही माहिती संविधानात लिहिली व निवडणूका जाहिर झाल्या. घेतल्या गेल्या व घेतल्या जात.          रक्षानंही मित्रपक्षाच्या नेत्याचं वायफळ बोलणं ऐकलं होतं. ती लोकांना सांगत होती.         "बाबासाहेब हे देवच आहेत विरोधकांसाठी. कारण बाबासाहेब होण्यापुर्वीचा काळ सर्व तथाकथीत लोकांनी अनुभवला. त्या काळात माणसाला माणसांसारखं वागवलं जात नव्हतं. स्रियांचा तर दर्जाच दुय्यम होता. जो आताही काही ठिकाणी आहे असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मग तो कोणताही समाज का असेना. तिथंही माणसांना चटकेच शोषावे लागले आहेत. आजही काही ठिकाणी स्रियांना मंदिरप्रवेश नाहीच.         सध्याच्या काळात प्रसिद्ध असलेले संत ज्ञानेश्वर. त्यांचा बालपणात कोणता गुन्हा होता. त्यांचे तर दुधाचे ओठंही सुकलेले नव्हते. शिवाय आपला कोणता गुन्हा आहे. तेही त्यांना माहित नव्हतं. तसं पाहिल्यास त्यांच्या वडीलांचाही गुन्हा नव्हताच. त्यांचं संन्यास घेणं हा गुन्हा ठरवू नये. त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी संन्यास स्विकारला व नंतर पुन्हा ते संसारात पडले. जो मनुस्मृतीचा नियम होता की एकदा संन्यास स्विकारल्यावर त्यानं संसारात पडू नये. तसा तो गुन्हा नसला तरी त्याची गणणा गुन्ह्यात जरी केली आणि तसा जरी त्याचा अर्थ घेतला तरी त्या काळात तो गुन्हा त्यांच्या वडीलांनी केला होता. तो त्यांनी केला नव्हता. मग संत ज्ञानेश्वरासह त्यांच्या इतरही भावांना व मुक्ताबाईला त्याच समाजानं शिक्षा का दिली? हा एक गंभीर प्रश्न आहे. एवढंच नाही तर येथील तथाकथीत एका विशिष्ट जातीच्या समुदायानं तमाम स्रीवर्गावरही अत्याचारच केला. त्यांना डोक्यावर पदरच ठेवायला लावले होते. त्यांच्या शिक्षणाच्या संधी बंद केल्या होत्या. त्यांना पती निधनानंतर जबरदस्तीनं सती जाण्यास भाग पाडलं होतं. त्यांच्यासाठी केशवेपण प्रथा सुरुच होती. त्यांच्यासाठी देवदासी प्रथाही सुरुच होती. एवढंच नाही तर बालविवाह पद्धतीही तेवढीच सुरु होती. एका बारा वर्षाच्या बालिकेचा विवाह करुन तिच्यावर पन्नास वर्षाचा किंवा त्यापेक्षाही वयोवृद्ध माणूस विवाह करुन एकप्रकारे बलात्कारच करीत होता. मग ती कोणत्याही समाजातील स्री का असेना. विधवा पुनर्विवाह बाबत कायदा होत असतांना तोच समाज विरोध करीत होता की तो कायदा बनू नये. कारण तो कायदा बनल्यानंतर कोणत्याही स्रिया ह्या पती निधनानंतर बलात्काराला मिळणार नव्हत्या. याबाबत त्याच काळातील न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडेंनी विरोध केला होता.         तो काळ व त्या काळातील एका विशिष्ट समुदायानं इतर समाज तर सोडा, त्यांनी आपल्याही समाजावर अत्याचार करणं सोडलं नाही. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वरच आहेत. त्यांना अगदी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घ्यावी लागली. आता ही स्वखुशीची समाधी होती की जबरदस्तीनं त्या काळातील लोकांनी त्यांना घ्यायला लावलेली समाधी होती. ही गोष्ट विचार करण्यालायक आहे. आज आपण सर्व लोकं संत ज्ञानेश्वरांना मानतात. त्यांचे पसायदान वाचतात. परंतु कधीच मागे वळून पाहात नाही की ज्या संताचे पसायदान आपण वाचतो. त्या संताला आपला समाज त्या काळात मानत होता काय? म्हणतात की संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडातून वेद वदवलेत. अन् चित्रपटात एक रेडा उभा करुन त्याला बोलल्याचं दाखवलं जातं आणि आपण त्यावर विश्वास करतो. परंतु आपणाला हेही कळत नाही की ती अंधश्रद्धा आहे. रेडा बोलतो काय की तो वेद वदेल. सत्य बाब ही आहे की रेडे नावाचा माणूस, ज्याला वेदांत कळत नव्हते. त्याला वेदाचे महत्व सांगताच तो वेदांत सांगू लागला असेल.         खरा देव. खरा देव बाबासाहेबच. कारण बाबासाहेबानं दाखवलं की पुर्वीच्या तथाकथीत देवानं दिलेली मोठंमोठी दानं. कोणाला मोठा पर्वत दिला वररुपात. हे सर्व थोतांड होतं. देव अशा मोठ्या दानाच्या रुपात फक्त मोठा केल्या गेला. मानवानं पुराणात लिहून ठेवलं देवाचं मोठेपण. त्यानंच देवाला प्रसवलं. मोठं केलं त्याच्या मोठमोठ्या लीला सांगून. प्रत्यक्षात तशा कृती घडल्या की नाही हे माहीत नाही.           तो काळ व त्या काळात एका विशिष्ट समाजानं, आपल्याच परीसरातील इतर लोकांना मुर्ख बनवून त्यांच्यावर राज्य केलं. त्यांना निरक्षर ठेवलं. कारण त्यांना त्याचं राजकारण कळू नये. त्यासाठी त्यांनी नियम बनवले. असे नियम की जो पाळेल. तो गुलामच राहिल शेवटपर्यंत आणि जो पाळणार नाही. त्याला वाळीत टाकणे, त्याला जबरदस्तीनं संजीवन समाधी घेण्यास भाग पाडणे, त्यासाठी त्याचेबद्दलचा अपप्रचार समाजात पेरणे. या कृती जाणूनबुजून करण्यात आल्या. एखादी स्री जर ते नियम पाळत नसेल तर तिला जाणूनबुजून सती म्हणून देण्याची प्रथा, तिला जाणूनबुजून विद्रूप करण्याची प्रथा होतीच. हा अत्याचार तमाम आजच्या ओबीसी, एससी, एसटी व जे आज स्वतःला ओपन मानतात ना. त्या सर्वांवरच झाले. शिवाय असले अत्याचार सर्वच स्रियांवरही झाले. ते विसरता कामा नये. तसंच ज्या काळात बाबासाहेब हे अस्पृश्यतेची लढाई लढत होते, त्याच काळात त्यांना मदत करणाऱ्या बापूसाहेब सहस्रबुद्धेलाही व तमाम त्यांच्याच वर्गात असणाऱ्या इतर लोकांनाही त्याच समाजानं वाळीत टाकलं. कारण त्यांना येथील माणसांना माणसासारखं वागू देणं. त्यांचं माणूस बनणं आवश्यक वाटत नव्हतं. ते त्यांच्या विरोधातच होते.           आज जरी बाबासाहेब हे एक माणूस असले तरी ते सर्वच लोकांना देव वाटतात. तसेच ते तमाम काही काही उच्चवर्णीय लोकांनाही देवच वाटतात व तेही त्यांच्याच पावलावर पाऊल देवून सिड्याही चढतात. त्यांच्याच नावाचा वापर करुन. मात्र जेव्हा ते आसनस्थ होतात वरच्या पदावर, तेव्हा गरळ ओकतात. मग वाद झालाच तर त्यावर मोठ्याच अक्कलहुशारीनं सफाईदेखील देत असतात. म्हणतात की मी तसं बोललोच नाही. माझ्या बोलण्यातील वाक्याची जाणूनबुजून तोडफोड करण्यात आली. हे असं बरेचदा घडतं. काहीवेळेस माफीही मागितली जाते. त्यानंतर जेव्हा वाद संपतो. तेव्हा पुन्हा एकदा गरळ ओकली जाते. मागे असाच एक संसदेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक महिला म्हणत होती की हा समाज त्याच उष्ट्या पत्रावळी चाटण्याच्याच लायकीचा आहे. यांना तसंच ठेवावं म्हणजे यांना कळेल. अर्थात जागा दाखवावी असं त्यांचं मत होतं. विशेष सांगायचं म्हणजे जी महिला संसदेत तसं बोलत होती. तिलाही माहीत नव्हतं काय की तिच्याच आईबहिणीवरही तिच्याच पुर्वकाळात महिला असल्यानं अत्याचार केला होता. तिला संसदेत जाता आलं केवळ बाबासाहेबांमुळं. त्यांनी जर संविधानात महिला हिताच्या तशा कलमाच लिहिल्या नसत्या तर कदाचीत चित्र काहीसं वेगळंच असतं. तेच घडलं होतं तमाम ओबीसी, एससी, एसटी यांच्याबाबतीत. त्यांच्यावरही त्या काळात त्याच समाजानं अत्याचार केला होता. आज मात्र हाच तमाम एससी, एसटी, व ओबीसी समाज विसरलाय त्याच काळातील त्यांच्याच बांधवांवर झालेला अत्याचार, तमाम त्याच धर्तीवर चालणाऱ्या विशिष्ट लोकांनी केलेला अत्याचार आणि आज गरळ ओकत आहे बाबासाहेबांबद्दल व बाबासाहेबांसारख्या महान महामानवाचा अपमान करीत आहेत, ज्यांनी त्याच लोकांना भेदभावपुर्ण वातावरणातून बाहेर काढले नव्हे तर त्यांना सन्मानानं कसं जगावं वा जगता येईल, याचा मार्ग दाखवला. खरं तर आज आपण अशी गरळ ओकू नये व बाबासाहेबांचा अपमान करु नये व विसरु नये त्यांचं कार्य. तसंच विसरु नये की जे कार्य देवांनी केलेले नाही, ते कार्य बाबासाहेबांनी करुन दाखवले यात शंका नाही.          दि. पंचवीस डिसेंबर. मनुस्मृती दहन दिन. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करुन तमाम भारतीय लोकांना भारत स्वतंत्र्य होण्यापुर्वीच स्वतंत्र्य करुन टाकलं. त्याच मनुस्मृतीच्या दहनानंतर या देशातील तळागाळातील माणूस स्वतंत्र्य झाला होता. याचाच अर्थ असा की मनुस्मृती दहनापुर्वी तळागाळातील माणूस स्वतंत्र्य नव्हता काय? तर त्याचं उत्तर आहे. तो स्वतंत्र्य नव्हताच."          मनुस्मृती दहन का करावी लागली. असा प्रश्न रक्षाच्या मनात पडला होता. ती मनुस्मृतीबद्दल लोकांना सांगत असे,          "मनुस्मृती दहन का करावी लागली बाबासाहेबांना. त्याचं कारण आहे त्यात लिहिलेले अमानवी कायदे. ते कायदे मानवहिताचे नव्हतेच. त्यात लिहिलं होतं की जो व्यक्ती अस्पृश्य असेल आणि त्यानं वेद ऐकले तर त्याच्या कानात उकळतं शिसं टाकावं. जर तो वेद तोंडाने बोलला तर त्याची जीभ कापून टाकावी.           हे झालं अस्पृश्यांबद्दल. स्रियांबद्दल सांगतांना मनुस्मृती एकशे अठ्ठेचाळीसव्या अध्यायात महिलांचा संपत्ती जमविण्याचा अधिकार नाकारते व म्हणते की स्री ही संपत्तीची मालकीण नाहीच. विवाहापुर्वी स्रियांच्या संपत्तीवर वडीलांचा अधिकार, विवाहानंतर पतीचा अधिकार व म्हातारपणात मुलांचा अधिकार. ती स्वतः कमवीत असली तरी. शिक्षणाच्या बाबतीतही मनुस्मृती फक्त ब्राम्हण लोकांना शिक्षणाचा अधिकार प्रदान करते. स्री आणि इतर सर्व लोकांचा शिक्षणाचा अधिकार नाकारते.          मनुस्मृती जेव्हापासून अस्तित्वात आली. तेव्हापासून लोकांनी शिक्षणाचा अधिकार ब्राम्हणांना दिला. तेच पौरोहित्य करीत असत. त्यांनी ज्यांच्याबाबतीत पौरोहित्य नाकारलं. त्यांच्याबाबतीत कोणीच त्यांना उलटसुलट बोलत नसे आणि बोलल्यास कडक शिक्षा केल्या जात. इतरात जरी लेखनाची प्रतिभा असेल तरी त्याला लेखन करता येत नसे. लेखन करण्यासाठी त्याला ब्राम्हण जातीतच जन्म घ्यावा लागत असे. एवढं विकृत स्वरूप मनुस्मृतीचं होतं. स्री आणि पुरुषांना तर मनुस्मृतीनं गुलामच करुन टाकलं होतं. मात्र संविधानानं जागृती केली आहे. प्रत्येक माणसालाच दिशा दाखवली आहे. आयुष्य कसं जगायचं, तेही सांगीतलं आहे.            शुद्रांना तपश्चर्येचाही अधिकार मनुस्मृतीनं नाकारलेला होता. जसं शंभूक नावाचा शुद्र ऋषी तपश्चर्या करीत असतांना आढळला. त्यामुळंच त्याच्या कानात उकळतं शिसं ओतण्यात आलं. हे मनुस्मृतीत लिहिलेल्या नियमानुसार घडलं.           पुर्वी चार वर्ण अस्तित्वात होते. ज्यात ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र. शुद्रांमध्ये एक कृषक जात सोडली तर तमाम बाकी सर्व गोष्टींचा समावेश होत होता.            मनुस्मृतीत जसं लेखन होतं. त्याच स्वरुपाचं लेखन होतं, भाला व संग्राममध्ये. म्हणूनच मनुस्मृती दहनाच्याच दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबरला भाला व संग्राम नावाची दोन्ही पुस्तके जाळण्यात आली. कारण बाबासाहेबांनी तमाम कायदे, जे माणुसकीला काळीमा फासणारे होते. ते सर्व जाळले.           पुढं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान बनवलं. त्यात शिक्षणाचा अधिकार टाकला. जो मनुस्मृतीनं नाकारला होता. त्यानंतर स्रियांच्या अस्तित्वासाठी संविधानात कलमा लिहिल्या व स्रियांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार दिला. जो मनुस्मृतीनं नाकारला होता. याचाच अर्थ असा की ज्या ज्या मानवी स्वातंत्र्याच्या गोष्टी मनुस्मृतीनं नाकारल्या होत्या. त्या त्या सर्व गोष्टी बाबासाहेबानं संविधानात लिहिल्या व सर्वांना कायद्याच्या कक्षेत आणून सर्वांनाच समान न्याय प्रदान केला. आज संविधानातील कलमानुसार सर्वांना समान न्याय आहे. त्यात कोणताच उच्चनीचपणा नाही व मनुस्मृतीत सांगीतल्यासारखा कोणताही एक विशिष्ट वर्ग मोठा नाही व कोणताच विशिष्ट वर्ग लहान नाही. त्यात ना स्त्रीपुरूष भेदभाव आहे ना स्पृश्य अस्पृश्य ना गरीब श्रीमंत. परंतु हीच बाब काही लोकांना आजही खलते. त्यांना वाटते की आमचा वर्ग मनुस्मृती दहन होण्यापुर्वी श्रेष्ठ होता ना. मग आजही त्यालाच सर्वांनी श्रेष्ठ म्हणावं. संविधानात लिहिलेल्या तत्वानं कोणीही चालू नये तर कालची मनुस्मृती आज लागू व्हावी. त्यासाठी आजच पावलं पडायला लागली आहेत. त्या पावलानुसार आज शाळेशाळेत पुस्तकं वाटप करण्याऐवजी देशातील काही नेते मंडळी भजनाचे साहित्य वाटप करण्यावर जास्त जोर देतात. शिवाय शाळेशाळेत संविधान पुस्तकातील काही कलमांचे पुस्तक वाटप करण्याऐवजी मनाच्या श्लोकांचे पुस्तक वाटप करतात. एवढंच नाही तर जागतिक विश्वकोषात विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक पठन करायला लावले जाते आणि त्याची जागतिक दर्जाच्या बुकात नोंद घेतली जाते. जी नोंद संविधान कलम विद्यार्थ्यांना कळावे म्हणून वाचन घ्यायला हवे. परंतु असे होणार नाही. कारण लोकांना बाबासाहेब प्रिय नाही. त्याचंही एक कारण आहे. ते म्हणजे बाबासाहेबांनी मनुस्मृतीला हद्दपार केलं. त्यांचं अर्थात एका विशिष्ट वर्गाचं अस्तित्व नष्ट केलं. त्या वर्गालाही एका विशिष्ट वर्गात न ठेवता सामान्य लोकांच्या पंगतीत बसवलं.           आज संविधान आहे व प्रत्येक माणूस शिकू लागला आहे. मग तो ब्राह्मण का असेना. आज बहुतांश ब्राम्हण मंडळी खासदार आमदार व राष्ट्रपतीही बनतात. मनुस्मृतीच्या निर्देशानुसार पिढीजात असलेल्या व्यवसायाला सोडून.          मनुस्मृती जर असती तर ब्राम्हण व्यक्तीलाही खासदार, आमदार बनताच आले नसते. त्यांना मंदिरातच पौरोहित्य करण्याशिवाय पर्याय उरला नसता. महत्वपुर्ण बाब ही की काल मनुस्मृती अस्तित्त्वात होती, तेव्हा मनुस्मृतीनं क्षत्रीय, वैश्य व शुद्रांनाच नाही तर ब्राम्हण वर्गालाही सोडलं नव्हतं. ब्राम्हणांना प्रथम स्थान होतं. हे जरी खरं असलं तरी ब्राम्हण स्रिया या गुलामच होत्या. संत ज्ञानेश्वर हे ब्राम्हण असले तरी त्यांनाही मनुस्मृतीच्या नियमानं छळलं. एवढंच नाही तर विवेकसिंधू नावाचा आद्य ग्रंथ लिहिणाऱ्या मुकूंदराजांना समाधी घ्यायला याच मनुस्मृतीनं भाग पाडलं. अन् इतर जातीतील लिहिणाऱ्या वा कवने करणाऱ्या लोकांची गाथा नष्ट करायला भाग पाडलं. मात्र संविधानानुसार घडतांना दिसत नाही. विशेष म्हणजे झाली गोष्ट झाली, पार पडली. मनुस्मृती गेली. आज संविधान आहे. तसंच कालच्या मनुस्मृतीचं राज्य गेलं. आज संविधानाचं राज्य आहे. आज नेत्यांनीही संविधानाचं पालन करायची गरज आहे. संविधानानुसार चालण्याची गरज आहे आणि रेकॉर्डच बनवायचा आहे तर संविधानाच्या कलमा विद्यार्थ्यांकडून वाचन करुन घेण्याचा रेकॉर्ड बनवावा. मनाच्या श्लोकाचा नाही. अन् वाटायचंच असेल तर ज्ञान देणारी पुस्तके वाटावीत. भजनाचे साहित्य नाही. त्यात पैसा घालविण्याऐवजी तळागाळातील गोर गरीब लेकरांना वह्या पुस्तकांचे वाटप करावे. जेणेकरुन तेही शिकू शकतील. उच्च पदावर जावू शकतील. तसेच त्यातून कोणी नक्कीच शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ बनून एखादा नवीन शोध लावू शकतील. जे भजनातून साकार होवू शकणार नाही. ते तळागाळातील लेकरांना पुस्तक पुरविल्यानं साकार होईल हे तेवढंच खरं. कारण भजनसाहित्य ज्ञान वाढवू शकत नाही. त्यातून संशोधक व तंत्रज्ञ तयार होवू शकत नाहीत. हं, एवढा बदल नक्कीच होवू शकतो. आधात्म नक्कीच वाढू शकते. ज्याची देशाला पाहिजे तेवढी गरज नाही. जे अंधश्रद्धा वाढवू शकते यात शंका नाही. याचाच अर्थ असा की देशात पुन्हा एकदा मनुस्मृती लागू करुन देशातील नेते कालच्याच मनुस्मृती लागू करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या माणसांसारखे इतर सामान्य लोकांना, स्रियांना गुलाम तर करु पाहात नाहीत. असंच कधीकधी त्यांच्या वागण्यातून व वर्तनावरुन दिसतं. परंतु हे जरी खरं असलं तरी त्यांनी आणि समाजातील तमाम लोकांनी आवर्जून लक्षात घ्यावं की देशातील लोकांच्या मानसिकतेला मनुस्मृतीनं गुलाम केलं होतं जी आजही काही लोकांत कधीकधी दिसते आणि संविधान जागृती करीत असते. तेही प्रकर्षाने जाणवते. असं जर कोणाला वाटत नसेल, त्यांनी दोन्ही ग्रंथ पडताळून पाहावीत. त्याची तुलना करावी म्हणजे कळेल."         रक्षाचं ते अनमोल वचन वदणं अतिशय महत्वपुर्ण गोष्ट होती. कारण निवडणुकीनंतर राज्यातील एका शहरात एक दिवस मनाच्या श्लोकाच्या जागतिक स्तरावर नोंदणी करुन घेण्याचा कार्यक्रम झाला होता. जे रक्षाला खपलं नव्हतं.          आज महापरीनिर्वाण दिन होता. खुद्द बाबासाहेब याच दिवशी मरण पावले होते. त्यातच त्यांना आज श्रद्धांजली वाहण्याचा दिवस होता. मात्र हा त्यांचाच महापरीनिर्वाण दिन नसून त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांनी त्यांच्या कार्यात सहभाग दर्शवला. ज्यांच्या तारखा आपल्याला माहीत नाहीत. जे लोकंही आपल्याला माहीत नाहीत. त्या सर्वांचा महापरीनिर्वाण दिन होता. त्याबद्दल रक्षा म्हणत असे,          "बाबासाहेबांचा महापरीनिर्वाण दिन. म्हणजे तमाम बाबासाहेबांच्या कार्यात मदत करणाऱ्या माणसांचा महापरीनिर्वाण दिन आहे असंच समजावं. जेणेकरुन ही त्यांनाही श्रद्धांजली ठरेल. ज्यांचा महापरीनिर्वाण दिन कोणालाच माहीत नाही. डॉ. बाबासाहेब हे एक महान तत्ववेत्ता होते. ते महान तत्ववेत्ता बनले. त्याचं कारण होतं, त्यांना आलेले अनुभव. ते अनुभव वाखाणण्याजोगेच होते. त्यांना बरेच अनुभव आले होते व त्याच अनुभवाच्या आधारावर त्यांना तत्त्ववेत्ता बनताही आलं.          डॉ. बाबासाहेब हे महान तत्ववेत्ता कसे बनले. शिवाय त्यांना अनुभव तरी कोणते आले? हा प्रश्न जरासा विचार करण्यालायकच आहे. तसं पाहिल्यास डॉ. बाबासाहेबांना बरेच अनुभव आले. जसे लहानपणी ते जेव्हा शाळेत गेले. तेव्हा त्यांना शिकायला वर्गाच्या बाहेर बसवणे किंवा इतर मुलांपासून थोडं दूर बसवणे. तसं पाहता त्या काळात भेदभाव होता. अस्पृश्यांचा स्पृश्य वर्ग अतिशय भेदभाव करीत असत. त्यांना मंदिर प्रवेशच नाही तर गावप्रवेशही नव्हता. गावप्रवेशाबाबत नियम होते की निर्धारीत वेळेसच त्यांनी गावात प्रवेश करावा. तेही कोणी स्पृश्य दिसलाच तर त्याचे समोर घोड्यासारखं किंचळावं. त्याचं कारण म्हणजे कोणताही स्पृश्य व्यक्ती तिथे अस्पृश्य व्यक्ती आहे, हे जाणून घेईल. स्पर्श होणार नाही व स्पर्शाचा विटाळ होणार नाही.            विटाळ...... साधा स्पृश्यांना स्पर्शाचाही विटाळ होत होता. म्हणूनच घोड्यासारखं त्यांचं किंचाळणं आणि एखादा व्यक्ती ते नियम पाळत नसेल तर त्याला अतिभयंकर शिक्षा. त्यातच त्या शिक्षेवर कोणाकडे दादही मागण्याचा अधिकार नव्हता. त्या शिक्षा म्हणजे नग्न करुन पाठीवर वा शरीरावर कुठेही लागेल त्या ठिकाणी चाबकाचे फटके देणे वा एखाद्या शरीरअवयवास इजा पोहोचविणे. यात एवढं सगळं होत असल्यानं व दंडावर अभय नसल्यानं कोणताही अस्पृश्य व्यक्ती स्पृश्यांच्या वाट्याला जात नव्हता. तो मुकाट्यानं दंड स्विकारत असे व स्पृश्यांनी घातलेले नियम पाळत असे.           डॉ. बाबासाहेब जेव्हा शाळेत जात आणि शिकायला बसत. तेव्हा त्यांनी पाहिलं की त्या वर्गात सर्व जातीची व धर्माची मुलं एकत्र बसत. ज्यात मुस्लीम मुलंही असायची. मग विचार यायचा आणि वाटायचं की आपण हिंदू याच धर्मातील लेकरु. अन् ही मुस्लीम मुलं म्हणजे हा दुसरा धर्म. ती त्यांच्यामध्ये बसतात, मिसळतात. अन् आपण हिंदूच असून आणि यांच्याच धर्मातील असून आपला विटाळ. असं का? हाच विचार बाबासाहेबांना त्यांच्या बालपणात पडायचा. वाटायचं की हा कसला हिंदू धर्म? एक समाज हिंदू असतांनाच दुसरा समाजही हिंदू आहे, तरीही त्या समाजाला व्यवस्थीत वागवले जात नाही. यांना इतर धर्म चालतात अन् आपल्याच धर्मातील आपलीच माणसं चालत नाहीत. त्यांच्याबद्दल भेदभावच दिसून येतो यांच्या मनात. तोच त्यांच्या मनातील विचार. त्यातच एक तात्कालिक कारण घडलं. ते म्हणजे त्यांना अस्पृश्य म्हणणं. त्यांच्या मनात भेदभावाचा व विटाळाचा विचार सुरु असतांना कोणीतरी त्यांना अस्पृश्य म्हटलं व ही त्यांना शिवी वाटली. त्यातच बाबासाहेबांचं रक्त खवळलं व तेथूनच खऱ्या अर्थानं समाजातील संबंधीत विटाळ व भेदभाव दूर करण्याचं बाळकडू बाबासाहेबांना मिळालं. त्यानंतर बाबासाहेब भेदभाव व विटाळ दूर करण्याबाबत विचारही करु लागले.            ते लहानगं वय. ते खेळण्याबागडण्याचं वय. परंतु त्या काळात जीवन जगतांना व शिकतांना बाबासाहेबांना विटाळाचा फार मोठा फटका पडला होता. त्याची दररोजची गाऱ्हाणी लोकांकडून रामजीकडे येत. तसं पाहिल्यास रामजी हे इंग्रज सैन्यात सुभेदार होते व ते कामात अतिशय इमानदार असल्याने इंग्रजांचे विश्वासू बनले होते. जेव्हा समाज बाबासाहेबांबद्दल तक्रार घेवून यायचे, तेव्हा रामजी बाबासाहेबांना त्या लोकांसमोर रागावत असत आणि ते लोकं गेल्यावर रामजी बाबासाहेबांना सत्यता विचारत. तेव्हा ते सत्य ऐकल्यावर रामजी बाबासाहेबांना प्रोत्साहन देत. त्यांना परिस्थिती समजावून सांगत व हेही सांगत की परिस्थितीशी तुला बरच झगडावं लागेल. हा विटाळ समुळ नष्ट करावा लागेल. त्यासाठी तुला बरंच काही शिकावं लागेल.          वडीलांचं प्रोत्साहन मिळताच बाबासाहेबांना नवीन उर्जा मिळत असे व ते नव्या जोमानं पुन्हा कामाला लागत असत. त्यातच पुन्हा विटाळावरुन बालसवंगड्यात जुंपायची व पुन्हा पुन्हा तक्रारी रामजीकडे जायच्या. रामजी लोकांसमोर बाबासाहेबांना रागावत असत व लोकं गेले की रामजी बाबासाहेबांना पुन्हा प्रोत्साहन देत. ही कृती वारंवार घडत असे. त्यातच तो स्पृश्य समाज पुर्वीसारखा बाबासाहेबांना स्वतःही दंड देवूही शकत नव्हता. त्याचं कारण होतं बाबासाहेबांचा खोडकर स्वभाव. लहानपणी बाबासाहेब हे जास्त खोडकर होते. ते मोठेपणी बरेच शांत झाले होते.           बाबासाहेबांच्या खोडकर कृती वाढत चालल्या होत्या. त्यातच त्यांच्या कित्येक तक्रारी रामजींना केल्या तरी त्यांच्यात सुधारणा झाली नव्हती. ते पाहून त्याच तक्रारी त्या लोकांनी इंग्रज अधिकाऱ्यांकडे केल्या. लागलीच रामजी व बाबासाहेबांना त्यांच्याकडे हजर व्हावं लागलं. मग कारण विचारण्यात आलं. कारणात इंग्रज अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचं ऐकलं. तसं पाहिल्यास लहानपणापासूनच बाबासाहेब हे हुशारच होते. त्यांनी अशा सफाईनं व अक्कलहुशारीनं भेदभावाची गोष्ट लहानपणीच इंग्रज अधिकाऱ्याला पटवून दिली की त्यांनी त्याचवेळेस बाबासाहेबांना क्लीनचीट दिली व पुन्हा बाबासाहेबांना प्रोत्साहन मिळालं. मग काय, बाबासाहेबांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.           रामजी हे बाबासाहेबांचे वडील. त्यांनी बाबासाहेबांची चाणाक्ष बुद्धी ओळखली व त्या बुद्धीला जे जे लागेल, ते सर्व खावू घातलं. त्याचा परिणाम हा झाला की पुढील काळात बाबासाहेब असे धीट बनले की त्यांनी संपुर्ण अस्पृश्य समाजाला विटाळाच्या जोखडातून बंधमुक्त केलं. समाज विटाळाच्या विळख्यातून बंधमुक्त होणं ही बाबासाहेबांची तर कृपा आहेच. शिवाय ती रामजीचीही तेवढीच कृपा आहे. त्यातच इंग्रजांचीही कृपा आहे. कारण बाबासाहेबांनी केलेले विटाळाविरुद्धचे आंदोलन व त्यात जे जे खटले बाबासाहेबांना लढावे लागले, त्या सर्व खटल्यात बाबासाहेबांनाच विजय मिळाला. ज्यात चवदार तळ्याच्या खटल्याचाही समावेश आहे. मात्र ती केस लढत असतांना त्यांचं परिवाराकडं दुर्लक्ष झालं आणि ते होणारही होतं. परंतु त्याची त्यांनी व परिवारानंही तमा बाळगली नाही. खुद्द चवदार तळ्याचा खटला सुरु असतांना रमाई आजारी असायची. त्यावेळेस कोर्टाची तारीखही असायची. चवदार तळ्याच्या तारखेवर हजर होण्याकरिता त्यांना नाशिकवरुन मुंबईला जावे लागायचे. त्या जाण्यायेण्याला पैसे लागत. समजा बाबासाहेब नसते गेले तर चवदार तळ्याचा खटला ते हारले असते व अस्पृश्यांसाठी कधीच पिण्याचं पाणी खुलं झालं नसतं. बाबासाहेबांनी तीच बाब हेरली व आपल्या पत्नीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे खर्च न करता तो पैसा खटल्याला लावला. ज्यातून खटला जिंकता आला. परंतु दुर्दैवं असं की ज्यातून रमाईचं आजारपण वाढत गेलं व रमाई मरण पावली. बाबासाहेबांनी आपले भेदभावाचे मिशन पार पाडण्यासाठी आपले स्वतःचे पुत्रही गमावलेत. कारण आजारपणाला जो पैसा लागायचा. तो त्यांच्याजवळ नसायचाच. तो खटल्यात वा मिशनमध्ये खर्च होत असे. त्यातूनच मुलं वा पत्नीच्या आजारपणाला पैसा लावता येत नसे. उलट बाबासाहेब हे महान कार्य करीत आहेत, हे लक्षात आल्यानं त्यांची पत्नी रमाई आपलं आजारपण न पाहता आपल्याजवळील पैसा बाबासाहेबांना देत असे व माझं आजारपण हे माझ्या स्वतःपुरतं आहे. आपण जे कार्य करीत आहात, ते लोकांसाठी आहे, असा विचार करुन रमाई बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून बाबासाहेबांबरोबर उभी राहिली व त्या दोघांनीही समाजातील विटाळ एकमेकांच्या सल्ल्यानं दूर केला. पुढं रमाई मरण पावताच बाबासाहेब एकाकी झाले, त्यांचं मन हे जगण्यात रमेनासं झालं. रामजीनंतर रमाई ही एकच आस होती बाबासाहेबांना जगण्यासाठी. त्यानंतर बाबासाहेब सतत आजारी असायचे. त्यांना रमाईचं कमीत्व खलायचं. त्या कमीत्वाला दूर केलं, सविता माईनं. तिनंही बाबासाहेबांना बरीच मदत केलेली होती. ती जरी जातीनं ब्राह्मण असली तरी भेदभाव दूर झालाच पाहिजे असं तिलाही वाटत होतं. म्हणूनच अखेरच्या समयी संविधान बनत असतांना सवितानंच बाबासाहेबांना मदत केली. तिनं त्याच काळात त्यांचं आरोग्य सांभाळलं. म्हणूनच सर्वसक्षम असं संविधान बाबासाहेबांना बनवता आलं.           आज बाबासाहेब जगात नाहीत. त्यांचं महापरीनिर्वाण झालं आहे. त्यांनी केलेलं कार्य जगात आहे व ते आपण आठवतोही. परंतु असं जरी असलं तरी त्यांनी त्या कार्यासाठी केलेला त्याग. त्यांनी भोगलेल्या यातना, त्यातच त्यांच्या पत्नींनी भोगलेल्या यातना, मुलांनी भोगलेल्या यातना, शिवाय रामजींनी भोगलेल्या यातना आज कुणालाही आठवत नाहीत. बाबासाहेबांची मुलं आजारी असायची. परंतु दवाखान्यात पैसे लागतात म्हणून आपलं आजारपण दाखवायची नाहीत तर समजदारीपणच दाखवायची. तसेच  रामजीही बाबासाहेबांना लागणाऱ्या पुस्तकाची गरज भागवत असतांना त्या पुस्तकाला पैसे लागत व ते त्यावर खर्चही करीत असत. त्यावेळेस पैसे खर्च झाल्यानं रामजीच्या घरी उपासाचे फटके पडत असत. ज्यात बाबासाहेबांची अक्का, भाऊ, यांनाही उपाशीच राहावं लागत असे. तसेच त्यांच्या या कार्यात काही अशीही माणसं होती की ज्यांनी बाबासाहेबांच्या कार्यात स्वतः हालअपेष्टा भोगत सक्रीय सहभाग घेतला. ते स्वतः वाळीत पडले. परंतु त्यांनी त्या गोष्टीची तमा बाळगली नाही. ज्यामध्ये खुद्द उच्चवर्णीयही सक्रीयतेनं सहभागी होते.            आज आपण पाहतो की समाज हा आपली पत्नी, आपली मुलं यात गुरफटलेला आहे. त्यांना समाज दिसत नाही व समाजावर होत असलेला अन्यायही दिसत नाही. कुठे एखाद्यावेळेस भांडण होत असल्यास व त्या ठिकाणी भांडणं करणारी मंडळी ओळखीची असल्यास वा एखाद्यावर अन्याय होत असल्यास आपण मदतीला धावून जात नाही. त्याचं कारण म्हणजे माणसं विचार करीत असतात की हे झेंगट विनाकारण आपल्या मागं लागेल. काश! बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करतांना हाच विचार केला असता तर कदाचीत आज अस्पृश्यांना स्पृश्यांच्या बरोबरीनं बसताच आलं नसतं. जे काही आज दिसत आहे, ते बाबासाहेब व त्यांचा परिवार आणि त्यांचे त्याकाळचे काही निवडक मित्रमंडळी यांच्याचमुळं दिसत आहे. त्यांनी केलेला त्याग हा अतिमोलाचा आहे."         आज बाबासाहेबांचा महापरीनिर्वाण दिवस होता. लोकं बाबासाहेबांचा महापरीनिर्वाण दिन साजरा करणार होते. करीत होते व ती त्यांना श्रद्धांजलीही ठरणार होती. परंतु हा त्यांचाच महापरीनिर्वाण दिन असला तरी ही केवळ त्यांनाच श्रद्धांजली नाही तर ती त्यांनाही श्रद्धांजली होती, ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या भेदभाव व विटाळ दूर करण्याच्या कार्यात मदत केलेली होती. मग तो त्यांचा परिवार असो वा त्यांचा मित्रमंडळ. शिवाय याप्रसंगीही रक्षा म्हणत होती की आपण बाबासाहेब व त्यांच्या परिवारानं तसेच त्यांच्या मित्रांनी जेही काही भोगलं, ते जर आपण उदार मनानं आठवत असाल आणि त्यानुसार वागत असाल तरच त्यांच्या कार्याचं सार्थक होईल. तीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजलीही ठरेल. अन् तसं जर आपल्यानं होत नसेल तर त्यांनी व त्यांचा परिवार व मित्रपक्ष यांनी केलेला त्याग, त्या भोगलेल्या यातना. त्या सर्व व्यर्थ गेल्यासारखं होईल यात शंका नाही.          बाबासाहेबांबद्दल रक्षाच्या मनात असलेला अभिमान रक्षाच्या बोलण्यातून आज ओसंडून वाहात होता. तेच विचार होते की जे विचार वसीम मांडत होता. शिवाय त्यांची चर्चा ही नित्यनेमानं घरी होत असे.           ************************************************           वसीमला वाटत होतं की देशात भ्रष्टाचार आहे व तो भ्रष्टाचार निश्चीतच कमी करता येवू शकते. परंतु तो भ्रष्टाचार कमी करण्याची तयारी ही सरकारची असायला हवी. सरकारनंच शोधायला हवं की कोण किती प्रमाणात भ्रष्टाचार करतो. जो भ्रष्टाचार करतो असं आढळून आल्यास त्याला निश्चीतच शिक्षा द्यायला हव्यात.           भ्रष्टाचारावर लगाम लावता येईल काय? असा विचार करीत असतांना वसीमला आठवलं. भारत देश तसं पाहिल्यास भांडवलशाही राष्ट्र. यात मुक्त अर्थव्यवस्था आहे. मुक्त अर्थव्यवस्था यांचा अर्थ सर्वसामान्य लोकांच्या मतानुसार आपल्या मेहनतीनं धन कमवणं. हा अधिकार आपल्याला संविधानानं निर्माण करुन दिला आहे. त्यानुसार आपण धनराशी कमवीत असतो. मात्र संविधानात जरी मुक्त अर्थव्यवस्था सांगीतली असली तरी घटनेच्या अडतिसव्या कलमेनुसार कोणालाही आर्थिक असमानता निर्माण करता येणार नाही वा आर्थिकतेवरुन कुणाचीही हेळसांड करता येत नाही.          भारतात मुक्त अर्थव्यवस्था आहे व घटना ही जरी मुक्त अर्थव्यवस्था सांगत असली तरी ती कधीच कुणाचा अर्थव्यवस्थेवरुन तिरस्कार करायला लावत नाही. परंतु असे असले तरी आजची काही मंडळी ही आर्थिकतेवरुन नेहमी व सतत वाद उत्पन्न करतांना दिसतात. ज्याचेजवळ भरपूर पैसा असतो. अशी मंडळी ही गरीबांना मोजतच नाही व त्यांची सतत हेळसांड करतांना दिसतात. हेच वास्तविक चित्र आज प्रत्येकांना अनुभवायला मिळते.         भारतात मुक्त अर्थव्यवस्था आहे व ती असायलाच हवी होती. त्या अर्थव्यवस्थेचा स्विकार भारतानं भारत स्वतंत्र्य झाल्यावर केला. त्यानंतर संविधान बनलं व संविधानात तशा अर्थव्यवस्थेचा पुरस्कारही करण्यात आला. त्यानंतर त्याच अर्थव्यवस्थेवर आधारीत काही कलमाही बनल्या. ज्या कलमा माणसाला मुक्त अर्थार्जनाची परवानगी देतात. तुम्ही कितीही कमवा. ही आपलीच कमाई असंही सांगते. परंतु हे जरी खरं असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था ही कधीही असा पैसा भ्रष्टाचारानं कमविण्याची परवानगी देत नाही. ती भ्रष्टाचाराला विरोध करते. परंतु हे जरी बरोबर असलं तरी आजची बरीचशी मंडळी ही भ्रष्टाचारी व वाम मार्गाने पैसा कमवते. ती मंडळी पैसा कमविण्यासाठी कोणत्याही स्तराला जात असते. जरी संविधानात कलमांचा अंतर्भाव असला आणि कायद्याचा धाक असला तरी पैसा कमवीत असतांना कायद्याला लोकं आज घाबरत नाहीत, असं चित्र दिसतं. आता पैसे कमविण्यासाठी काही लोकांनी वाममार्गाचे जे प्रकार योजनेले आहेत.           वाममार्गानं पैसा कमविण्याचा पहिला प्रकार आहे,  फसवणूक करणे. ज्यात आता लोकं ऑनलाईन फसवणूक हाही एक प्रकार वापरत असतात. ज्यातून सायबर क्षेत्र असुरक्षीत झाले आहे.            दुसरा प्रकार आहे, अपराध करुन पैसा कमवणे. जसे, कोणाच्या खुनाची सुपारी घेणे. कोणाचे अपहरण करुन पैसा मागणे. चाकूच्या धाकावर खंडणी गोळा करणे.             तिसरा प्रकार आहे, भ्रष्टाचारी मार्ग अवलंबून पैसा कमविणे, हे मात्र सरकारी कार्यालयात होतं. सरकारी कर्मचारी हे कार्यालयातील कोणतेही काम करुन देतांना पैसा घेतात. ती लाचच असते.           भारतात मुक्त अर्थव्यवस्था आहे व भारतीय कायदा अशा अनैतिक मार्गानं पैसा कमविण्याची परवानगी देत नसला तरी भारतीय लोकं हे अशाच प्रकारच्या अनैतिक मार्गानं पैसा कमवितात. जो प्रत्यक्षात दर्शवला जात नाही. उदाहरणार्थ एखादं दुकान. दुकानदार हे आपल्यावर असे प्रसंग उद्भवू नये म्हणून कर भरतात. परंतु ती त्यांच्या कराची रक्कम ही कमी असते. कारण वस्तूची खरेदी किंमत ही जरी स्थिर असली तरी तिच्या विकण्याची किंमत ही स्थिर नसते. अशावेळेस ती वस्तू दुकानातून जेव्हा विकली जाते, तेव्हा त्या वस्तूंची खरेदी किंमत दिसते. परंतु ती वस्तू कितीला विकली हे काही दाखवले जात नाही.  त्यातच वरचा जो अतिरिक्त पैसा मिळतो. तो काळाच पैसा असतो. शिवाय जे लोकं खंडणी रुपात पैसा गोळा करतात. त्यांचाही पैसा हा मोजमाप केला जात नाही. याच पैशातून काही लोकांच्या मालमत्ता गोळा होतात. तोही भ्रष्टाचारच असतो. त्या मालमत्तेचंही मोजमाप होत नाही. आज तर आणखी नवीनच फॅड निर्माण झालं. आता शेजारचा शेजारी कंगाल असतो. त्याचेकडे खायलाही पैसा नसतो आणि अचानक अशी पैशाची कृपा होते की त्याच्याकडे भरमसाठ पैसा येतो. हे त्याच्या वागण्यातून दिसतं. आता तो पैसा कुठून आला? हे कळायलाही मार्ग नसतो. असे बरेचसे महाभाग असतात की ज्यांच्याकडे अशी लॉटरी लागत असते. कोणी अशा भ्रष्टाचारी मार्गानं एका रात्रीतून श्रीमंत होतो तर कोणी एका रात्रीतून एका रात्री खाकही होत असतो. म्हणतात ना की राजाचा रंक व रंकाचा राजा बनतो तसे. मात्र कोणी कोणी संपूर्ण आयुष्यभर राब राब राबत असतात. तरीही एक छदामही शिल्लक पडत नाही.           पैसा कमवावा. तो कमविण्यासाठीच असतो. तो कोणी किती कमवायचा याचं गणित नाही आणि मोजमापही नाही. परंतु आपण जेही काही कमवतो, ते रास्त मार्गानं कमवावं. तो अनैतिक मार्गानं कमवू नये. शिवाय जोही पैसा कमवला, त्यातील काही भाग हा देशासाठी द्यायलाच हवा. कधी कर म्हणून तर कधी स्वखुशीनं दान म्हणून. कारण त्याच पैशानं देशाची अर्थव्यवस्था चालत असते. देशाला बलशाली बनवता येते. देशाचा तळागाळातील विकास करता येतो. त्या पैशातून रस्ते बांधणे, नागरिकांना सेवा पुरवणे इत्यादी गोष्टी घडत असतात. परंतु लोकं तो पैसा दान देण्याचं सोडा, साधा तो पैसा कर रुपातच भरत नाहीत. कित्येक जण असे असतात की जे कर बुडवतात. मग कुठून देशाचा विकास करता येईल? शिवाय याच रांगेत काही नेते असे असतात. मग जनता का बरं तसं करणार नाही. विशेष सांगायचं झाल्यास लोकं असा पैसा कमवितात, जो वाममार्गाचा असतो. तो पैसा लोकं कुठून आणतात ते कळत नाही. कोणी त्याला गुप्तधन मिळालं असंही म्हणतात. तर कोणी मोबाईलवर रमी सर्कल वा खेळ खेळून कमवला असेही म्हणतात. परंतु तो पैसा कोणी कसाही कमवो, त्याचा बाऊ होवू नये. मात्र असा जर पैसा कुणाकडे आलाच तर त्यांनी कधी त्या पैशातून एखादा गरीब मुलगा दत्तक घ्यावा. त्या मुलाचं शिक्षण व पोट त्याच पैशानं भागवावं. जेणेकरुन गरीबाच्याही मुलाला आपल्या ज्ञानाची भूक भागवता येईल व तो शिक्षणाच्या उत्तूंग शिखरावर पोहोचू शकेल. नाहीतर तोच पैसा कररुपात भरुन त्यानं देशाचं तरी भलं करावं. .         आजचा काळ मुक्तअर्थव्यवस्थेचा काळ आहे व या काळात कोणी किती पैसा कमवायचा याला बंधन नाही. मात्र तो पैसा कोणत्या मार्गानं कमवायचा याला बंधन आहे. तो पैसा सन्मार्गानं कमविण्याला प्राधान्य आहे. वाममार्गानं तसा पैसा कमविण्याला जास्त प्राधान्य नाही. असे जरी असले तरी आज बरीचशी मंडळी वाममार्गानं पैसा कमवीत असतात. ते सन्मार्ग जोपासत नाहीत. याच वाममार्गानं पैसा कमवीत असतांना कधी एखादा व्यक्ती अचानक गर्भश्रीमंत होत असतो की त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात सहज शंका निर्माण होते. शिवाय त्या पैशाची विचारणा होत नाही. त्याला इनकमटॅक्सच्या मर्यादेत घेतले जात नाही. शिवाय त्यानं तसा पैसा कुठून आणला? याचं साधं गणितही केलं जात नाही. असं बरंच ठिकाणी घडतं. खरं तर हा देशाचा पैसा असतो आणि असे व्यक्ती असा पैसा अकस्मात उभा करुन देशालाच लुटत असतात. तेव्हा सरकारनं अशाच पैशावर नियंत्रण आणावं. शिवाय अशा व्यक्तीनं तो पैसा कुठून आणला? याची विचारणा करावी. दरवर्षी असा पैसा कोणाजवळ किती आहे, याचं प्रतिज्ञापत्र लोकांकडून भरुन घ्यावं व वाढलेली मालमत्ता वा पैसा कुठून आणला? याची विचारणा व्हावी. प्रत्येक पैशाचा हिशोब मागावा. अन् मग चौकशी. तो पैसा वाममार्गानं कमवला की सन्मार्गानं. सन्मार्गानं असेल तर त्या व्यक्तीची मालमत्ता मुक्त करावी आणि अनैतिक मार्गानं असेल तर तीच मालमत्ता जप्त करावी. जेणेकरुन अशा मोजमापानं मोठमोठे मासे गळाला लागतील. काही लोकं भ्रष्टाचार करणार नाही. भ्रष्टाचारानं पैसे कमविण्यावर भरही देणार नाहीत. शिवाय कालमितीला ज्याचेजवळ काही नव्हते. आज एवढी मालमत्ता कुठून मिळवली? याचंही विवरण मिळत असल्यानं देशातील अर्थव्यवस्था पारदर्शक होईल व देशाची लोकशाही तेवढीच बळकट. तसंच असंच जर घडत गेलं तर देशातील सर्वच लोकांचा आपल्या देशावर विश्वास बसेल. देशाचं जगात नाव होईल व भ्रष्टाचाराला कायमचाच लगाम लावता येईल यात शंका नाही.         भ्रष्टाचार देशात सुरुच होता. त्याचेवर लगाम लागला नव्हता. शिवाय त्यामुळंच की काय, आज भ्रष्टाचारात वाढ झाली होती. त्यातच अर्थव्यवस्था कोलमडली होती.           वसीमला भ्रष्टाचारावर चांगलंच आठवलं होतं. मात्र तो काहीही करु शकत नव्हता. तो फक्त विचारच करु शकत होता. काही करण्याची त्याची इच्छा होती. परंतु त्याला तसं करता येत नव्हतं. कारण तो ना आतापर्यंत कधी निवडणूकीत उभा राहिला होता. ना कधी तो कोणत्या पदावर होता. अशातच सरकार पडलं. कारण सरकारनं आश्वासनाची परिपुर्तता केली नाही. ज्या लाडक्या बहिणीच्या जोरावर सरकार निवडून आलं होतं. त्या लाडक्या बहिणींना पुढे सरकारनं काहीही लाभ दिला नव्हता. कारण अर्थव्यवस्थाच कोलमडली होती. अशातच मध्यावधी निवडणुका लागल्या.          त्या मध्यावधी निवडणुका. त्यातच भ्रष्टाचार कमी करण्याचा विचार करणारा वसीम. त्यानं पार्टीला तिकीट मागितली. कारण आजपर्यंत बरेच दिवसपर्यंत त्यानं पार्टीची सेवा केली होती. एक सक्षम कार्यकर्ता म्हणून त्यानं पार्टीला मदत केली होती. मात्र पार्टीनं त्याची तिकीट नाकारली व सांगीतलं की पुढे देवू.           निवडणुकीचं तिकीट पुढं देवू. पुढं देवू तिकीट, असंच आश्वासन वसीमला आजपर्यंत मिळत आलं होतं. शिवाय एक ना एक दिवस आपल्याला तिकीट मिळेलच असा विचार करुन वसीम चूप बसत होता. तसा तो चूप बसून हिरीरीनं आपली पार्टी जिंकावी म्हणून पार्टीचा प्रचार करीत होता. तसं पाहिल्यास बरेच दिवसपर्यंत त्याची पार्टी सत्तेवर होती.          आज तो म्हातारा झाला होता व याहीवेळेस त्यानं तिकीट मागितली होती. मात्र याहीवेळेस पुढं तिकीट देवू असंच आश्वासन देवून पार्टीनं चालढकल केली होती वसीमच्या बाबतीत. ते एक राजकारणच होतं वसीमच्या बाबतीत घडत असलेलं आणि घडत आलेलं. पार्टीनं त्याच्यासोबत राजकारण खेळून त्याला अखेरपर्यंत कार्यकर्ताच ठेवलं होतं. नेता बनू दिलं नव्हतं.            वसीमला आज पश्चाताप होवू लागला होता. वाटत होतं की ज्या बालपणात आपण राजकारणात जावू. निवडणूक लढू. पुढे जावू असे म्हणत होतो. त्याच राजकारणानं आपल्याला पुढं जावू दिलं नाही. एक कार्यकर्ताच ठेवलं अखेरपर्यंत. याचं शल्य त्याला जाणवत होतं. शेवटी त्यानं ठरवलं की आता आपण राजकारण सोडावं व चूप बसावं.            वसीमनं राजकारण सोडण्याचा विचार केला. परंतु मन मानत नव्हतं. त्यानं राजकारण सोडलं व तो चूप बसला होता. आता पार्टीची मंडळी येत कधीकधी. त्यानं पार्टीचा प्रचार करावा यासाठी त्याला विनवणी करीत. परंतु तो आता टस चा मस करीत नसे. त्यातच आता त्याची पार्टी बुडली होती व पार्टीचं अस्तित्वही समाप्त होईल की काय? असंच वाटायला लागलं होतं. शेवटी त्यानं ठरवलं. पार्टीचं अस्तित्व मिटू नये. ज्या पार्टीत आपण आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलं. पार्टीला नावारुपाला आणलं. निदान तिला जीवंत ठेवण्यासाठी तरी काम करावं. मग एक कार्यकर्ताच म्हणून का असेना.          तो त्वेषानं उठला व तो पार्टीसाठी काम करायला सज्ज झाला. पुन्हा एकदा कार्यकर्ताच बनून. आज त्याला पक्कं माहीत झालं होतं की आपल्याला मरेपर्यंत कार्यकर्ताच बनून राहायचं आहे.           ती निवडणूकीची तिकीट. वसीमला निवडणुकीची तिकीट मिळाली नव्हती आजपर्यंत. मात्र आजपर्यंत पार्टीनं काहींना पार्टी फंडच्या नावानं तिकीट दिली होती, ज्यानं जास्त फंड पार्टीच्या खात्यात गोळा केला होता तर काहींना ओळखीच्या नावानं तिकीट दिली होती तर काहींना त्यांचं बाहुबल पाहून तिकीट दिली होती. वसीम शेवटपर्यंत, अखेरच्या श्वासापर्यंत कार्यकर्ताच राहिला होता. त्याचं कारण होतं राजकारण. पार्टीनं त्याला तिकीट देतांना त्याचेसोबत राजकारणच खेळलं होतं.           ते त्याचं कार्य. वसीमनं कार्यकर्ता म्हणून पार्टीसाठी जीवनभर केलेला संघर्ष. पार्टी मोठी झाली होती. परंतु तो काही मोठा झाला नव्हता. अशातच त्याला आठवला त्याचा भुतकाळ. रक्षा जेव्हा त्याच्या घरी आली होती. त्यावेळेस त्याच्या घरी त्याचे अब्बू होते. अब्बूला त्याचं प्रेम माहीत झालं होतं. तोच त्यानं त्याला शहरात पाठवलं होतं काही दिवस. परंतु तो शहरातही रुळावला नाही. काही दिवसानं तो परत आला होता. ज्यावेळेस मुकेश म्हातारा झाला होता. त्याच्यानं उठणं बसणंही नीट होत नव्हतं. अशातच परत आलेल्या वसीमनंच रक्षापेक्षा त्याची जास्त सेवा केली होती. मात्र ती सेवा घेतांना मुकेशला त्याचा रागच येत असे. परंतु जेव्हा तो मरण पावला होता. तेव्हा त्या दिवशी त्यानं वसीमला बोलावलं. त्याच्या हातात तिजोरीच्या चाब्या दिल्या व म्हटलं,           "वसीम, मला माफ कर. मी तुझी निवड करतांना कालप्रवाहात चुकलो होतो. कदाचीत माझ्या मनातील हिंदू नावाच्या कंपूनं. आम्ही शाळेत हिंदू मुस्लीम एक आहोत असंच शिकवतो आणि प्रत्यक्ष जीवनात आम्ही हिंदू मुस्लीम भेदभाव करतो. म्हणतो की मुस्लीम आपले शत्रू आहेत आणि तुमच्या धर्मातही सांगीतलं जातंच की हिंदू आपले शत्रू आहेत. परंतु वास्तविकता ही वेगळीच आहे. हे जहर. विचारांचं जहर पाजतात आपल्या आपल्या धर्मातील काही प्रकांड पंडीत की ते चुकीचे आहे. काल जसा मनुस्मृती ग्रंथ लिहून हिंदूंनी हिंदूंना छळलं तसं. आज मला कळलं की मुसलमान हा माझा शत्रू नाहीच. माणूसच माणसाचा शत्रू आहे. मग तो हिंदू का असेना. हिंदूंचा हिंदूच शत्रू आहे.  मुस्लीम नाही. आज तेच मला कळलं आहे. आता मी मरतांना सुखाने मरेन व जेव्हा परमेश्वराकडे जाईल. तेव्हा त्याला विनंती करेल की हे विधात्या पृथ्वीवर धर्माची माणसे जन्माला घालू नको की जे भेदभाव करतात. तिथं मानव जन्माला घाल. असा मानव जन्माला घाल की जो भेदभाव करणार नाही."          मुकेश मरण पावला होता. तो देवाकडे गेला की नाही हे वसीमला काही माहीत नव्हतं. परंतु माणूस काही बदलला नव्हता. तो नवेनवे डाव रचत होता. माणसांचे माणसाविरुद्ध. ज्याला राजकारण म्हटलं जात होतं. आजही कटेंगे बटेंगे वाद क्षमला नव्हता. तो कधीकधी मुंडके बाहेर काढत असे, जेव्हा निवडणूक आली तर.            गावं मात्र आज शांत झालं होतं. ते बदललं होतं. जेव्हा अख्ख्या गावात मुकेश नावाच्या एका हिंदू व्यक्तीची वसीम नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीनं नव्हे तर त्याच्या बिरादरीतील माणसांनी केलेली सेवा पाहिली. आता देशात कटेंगे, बटेंगे वाद व्हायचे. मात्र त्याचे वणवे गावात पेटत नसत, ना त्याची झळ गावापर्यंत पोहोचत होती. जरी निवडणूक देशात येत असली तरी. देश स्तरावर लोकं वेगवेगळ्या लोकांना मदत करीत असत मतदान करुन. ते वेगवेगळ्या लोकांना मतदानही टाकत असत. परंतु पार्टीवरुन त्यांचं भांडणाचं राजकारण नसायचं. आज हिंदू मुस्लीम वाद गावात नव्हता. गावात एकोपा निर्माण झाला होता. ज्या एकोप्यासाठी वसीम आणि रक्षानं प्रयत्न केला होता. धर्मभेद मिटला होता. मात्र जातीभेद सुरु होता व तो फोफावत चालला होता.            ************************************************       *****************************समाप्त**************