श्रापीत गाव.... - भाग 4 DEVGAN Ak द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्रापीत गाव.... - भाग 4

        कमलाकरने  आपले जड पडलेले डोळे कसेबसे उघडले . डोळ्यांसमोर अजूनही अंधारी होती. त्याने उठण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण शरीर दगडासारखे जड पडले होते.  हवेत एक प्रकारचा उग्र दर्प पसरला होता. अचानक कोणाचा तरी आवाज आला. कमलाकरने आपले डोळे तिकडे फिरवले तोच त्याला त्याचे आई-वडील बसलेले दिसले जे जोर जोरात मंत्र उच्चार करत होते. कमलाकरने संपूर्ण खोलीत नजर फिरवली तो हादरलाच.त्याच्या डोळ्यातून अश्रु ओंघळू लागले, तो रडक्या सुरात म्हणाला ,"  बाबा! हे सर्व काय आहे ? आपण असे कसे करू शकता ?" श्वेतकमलने खाडकन आपले डोळे उघडले. तो जागचा उठला व समोरच पडलेला एक रक्ताळलेला खंडग उचलला. त्याने बायकोला  आरती करण्याचा इशारा दिला.  बाजुलाच हळदीकुंकवाने माखलेल्या नरकंकालाचा एक वर्तुळ होता , त्या सर्व कंकालांवरती पेटते कापराचे तुकडे होते. कमळाने मधोमध ठेवलेली मानवी कवटी उचलली व त्या पेटत्या कंकालाने ती शैतानाला ओवाळू लागली." विस वर्षे, विस वर्षे वाट पाहावी लागली ह्या क्षणाची....", श्वेतकमल एक मोठे हास्य करत म्हणाला .कमलाकरच्या डोळ्यातुन आसवांच्या धारा वाहत होत्या तो म्हणाला," एवढ्या माणसांना मारुन तुम्हाला काय भेटले, एक कलंक फक्त, ब्राह्मण असून एका शैतानी दैवताची पुजा करता , माणसांचा नरबळी देता , आपल्या सारख्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून आज मला पच्छताप होत आहे, नेमके तुम्हाला काय भेटले हा नरसंहार करून ?"" अमरत्व भेटेल आम्हाला ....", असे म्हणत श्वेतकमलने एक जोरदार वार समोरच पडलेल्या आपल्या सुनेच्या मानेवर केला. खासकण ! असा एक आवाज झाला माण तुटली डोके दुर उडाले व मानेतून रक्त भळाभळा ओंघळू लागले.कमलाकर असाह्य पणे समोरच घडणाऱ्या  घटनेकडे पाहत होता . श्वेतकमलने  परत एकदा खंडग हवेत फिरवले  , कमलाकरने एका भयानक मृत्यूच्या कल्पनेने डोळे बंद केले. एक जोरदार वार  मानेवर झाला  , एक असाह्य वेदना उठली व क्षणात विलोप पावली.समोर तडफडणाऱ्या आपल्याच मुलाच्या शरीराकडे डोळे फाडुन दोघे बघत राहिले ...........

" आपण सांगितल्या प्रमाणे मी माझ्या मुलाचा बळी दिला, तरी मला अमरत्व प्राप्त झाले नाही.", श्वेतकमल  तांत्रिकाने थोडा वेळ विचार केला , तो म्हणाला," तुझे अजुनपर्यंत शंभर बळी पुर्ण झालेले नाहीत , तुला शंभर बळी पुर्ण करावे लागतील , त्यानंतर तो शैतान तुला तुझ्या कृत्याचे फळ देईल."     गावात आणखीनच आतंक माजला. श्वेतकमल फारच शक्तीशाली झला होता. आता गावकऱ्यांचे घराबाहेरही निघने कठीण झाले होते, ते लगेच श्वेतकमलच्या भ्रमात , मायाजालात अडकत . गावकरी फारच त्रासले होते त्यांनी परत साधुकडे धाव घेतली." गावात फारच गोंधळ माजलाय  , दिवसा सुध्दा गावकरी बेपत्ता होतात , आमचे घरातुन निघने सुध्दा कठीण झाले आहे. आपणच आता काहीतरी मार्ग काढा", गावकरी साधुला म्हणाले.साधू थोडे विचार करत म्हणाला," ही समस्या फारच कठीण दिसते , ही समस्या मला सोडवने कठीण आहे . तरीही तुम्हाला मदत करणे माझे कर्तव्य आहे ; मला फक्त दोन दिवसांचा कालावधी द्या , माझे गुरुजीच ह्या समस्यांचे  मुळ शोधू शकतात . तोपर्यंत आपण फारच सतर्क राहा."गावकरी निराशेने मागे फिरले.साधुने लगेच आपल्या गुरूजींकडे प्रस्थान करायचे ठरविली. त्यांना जायला व यायला दोन दिवस व दोन रात्रींचा कालावधी लागणार होता.  त्यांनी आपल्या घोड्यावर मांड ठोकली  . दुसऱ्या दिवशी ते एका मोठ्या नगरात येऊन पोहोचले. त्याच नगरात, त्याच्या गुरूंचे आश्रम होते ." प्रनाम गुरूजी", गुरूजींच्या पायावर मस्तक ठेवत साधू म्हणाले.गुरूजी हसत म्हणाले "अरे गंधर्व कसे येणे केलेस, ये ! .. बस ! .. थोडी विश्रांती घे !"" गुरूजी फार मोठी समस्या आहे, माझ्या गावातील माणसे अचानक बेपत्ता होत आहेत, त्याचे कारण मी आपणाकडून जाणुन घेण्यासाठी आलेलो आहे.  आपण भुत  , भविष्य , वर्तमान पाहु शकता , कृपया मला मदत करा गुरूजी.", साधू म्हणाले.गुरूजी," ठिक आहे"असे म्हणत गुरूजी कुटीत शिरले . त्यांनी त्या गावात नेमके काय घडत आहे हे पाहण्यासाठी   त्या गावाचा भुतकाळ पाहण्यास सुरुवात केली.कितीतरी वेळ गेला. गुरूजी ध्यानातच होते. काही वेळातच साधूला गुरूजींचे बोलावने आले.गुरूजींचा चेहरा गंभीर दिसत होता . साधूने विचारले ," काय झाले गुरूजी , आपणाला काही उलगडले का ?"गुरूजी," गंधर्व, तुझ्या गावातील ब्राम्हण व त्याची बायको हे सगळे करत आहे.  ज्याला तुनी आपली मुलगी देऊन फार मोठी चूक केली आहेस , कारण त्यांनी तुझ्या मुलीचा व त्याच्या मुलाचा केव्हाच बळी चढवला आहे."हे सगळे एकूण साधू एकदम हादरला . आपल्या एकुलत्या एक मुलीचा त्यांनी बळी दिला हे सर्व ऐकून साधू रागाने लालबुंद झाला होता . तो रागाच्या भरात उठला," गुरूजी मी त्या शैतानाला नाही सोडणार, माझ्या तपाने मी त्याला कायमचे नष्ट करणार."गुरूजी," ते शक्य नाही गंधर्व, कारण त्या ब्राम्हणाचे रक्षण स्वत:  तो शैतान करतो . त्याच्या वाईट शक्तींपुढे तु काय मी पण काही करूं शकत नाही."साधू ," मग काही मार्ग नाही का गुरूजी?"गुरूजी," तुला आता जे काही करायचे ते विचारपूर्वक करायचे आहे."साधू ," ठि आहे." असे म्हणत साधूने गुरूजींचा आशीर्वाद घेतला व लगेचच साधूने गावाकडे प्रस्थान केले.

दुसऱ्या दिवशी साधू  गावात परतला . त्याने सगळ्या गावातील लोकांना जमवले व त्यांना श्वेतकमलची सगळी हकीकत सांगितली. प्रत्येक गावकरी सुडाने पेटून उठला होता, त्यांच्या डोळ्यातून अंगारे बरसत होते .त्यातल्या प्रत्येकानेच आपली जवळची व्यक्ती गमावली होती. कोणाची बायको ,मुले ..... पण ते सर्व काहीच करू शकत नव्हते, करण तो शैतान फारच शक्तीशाली बनला होता .गावकरी," काय करायचे ? महाराज , त्याला जिवंत सोडता कामा नये, आमच्या बायको, मुलांची त्याने क्रुरपने हत्या केली आहे."साधू म्हणाले," माझ्या एकुलत्या एक मुलीची त्याने हत्या केली आहे. पण मी सुद्धा त्याचे काहीच करू शकत नाही , कारण तो फार शक्तीशाली आहे."गावकरी," परंतु काहीतरी मार्ग असेल."साधू ," आपण रात्री त्याचे काही बिघडवू शकत नाही, तो रात्री ‌ फारच शक्तीशाली होतो. सकाळी जेव्हा तो शैतानाची पुजा करतो तेव्हाच आपण काहीतरी करु शकतो." गावकरी....," काय करायचे ?"," त्याला फारच भयानक मृत्यू आला पाहिजे."," त्याच्या घरात शिरुन त्याची मुंडकी ऊडवूया."," नाही ते शक्य... नाही.."," त्याचे घर पेटवुया .."," होय! , त्याचे  घर पेटवुया....."  दुसऱ्या दिवशी सकाळी...... सर्वत्र धुके पसरले होते . अजूनपर्यंत सुर्य उगवला नव्हता , परंतु त्याचा तेज आकाशात उजळू पाहत होता . पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता, गार वारा अंगाला झोंबत होता.गावकऱ्यांनी आपली पावले झपाझप उचलली होती. ते सर्व श्वेतकमलच्या घराजवळ येऊन पोहोचले होते. घरातुन अस्पष्ट असा मंत्र उच्चार त्यांच्या कानावर पडत होता.आपल्या सोबत आणलेले तेल  त्यांनी घराच्या चौहोबाजूला शिंपडले . दुसऱ्यांनी मशालीने  त्या घराला आग लावली. बघता.....बघता  घर आगीच्या लोंढ्यात समावू लागले.

👹👹👹👹👹👹

कथेचा भाग वाचून आपला अभिप्राय जरूर कळवा, फक्त कथा आवडली किंवा नाही एवढेसे तरी माझ्यासाठी पुरे... होय कथेला रेटिंग्ज द्यायला विसरू नका नाहीतर मी पुढचा भाग टाकायला विसरून जाईन हं !

कथा वाचल्या बद्दल .....                              🌹 आभार 💐 धन्यवाद 💖