जागतिक पोहे दिवस ? Vrishali Gotkhindikar द्वारा अन्न आणि कृती मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जागतिक पोहे दिवस ?

सकाळच्या नाश्त्यासाठी महाराष्ट्रीयन घरातला सर्वाधिक आवडीचा खाद्य पदार्थ म्हणजे पोहे. पोहे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे. प्रत्येक खाद्यसंस्कृतीनुसार, पोहे बनवण्याची पद्धत बदलते. कधी फोडणीचे पोहे कधी वरून फोडणी घातलेले कडक पोहे तर कधी लावलेले पोहे कधी दूध गुळ पोहेकधी ताक मितकुट पोहे कधी दही पोहे कधी कोळाचेपोहे 🌿 ज्याची त्याची आवड म्हणायची मात्र त्या त्या व्यक्तीला अगदी तसेच पोहे लागतात बरं..जरा इकडे तिकडे चालत नाही फोडणीचे पोहे सुद्धा अनेक प्रकारे केले जातात कुणाला त्या पोह्यात फक्त शेंगदाणे घातलेले आवडतात दुसरे काही नको कोणी बटाटे पोहे शौकीन फोडणीत खरपूस बटाटे तळून त्यावर पोहे टाकून केले की फर्मास चव येते माझी आई टोमॅटो पोहे छान करीत असे माझ्या सासरी हा पदार्थ ठाऊक नव्हता मी सुरू केल्यावर सर्वांना असे पोहे आवडू लागले आणि मग आठवड्यातून एकदा तरी याची फर्माईश होऊ लागली काही लोकांना फक्त कांदे पोहे आवडतात बारीक चिरलेल्या कांदा मिरचीच्या फोडणीत केलेले हे पोहे फर्मास लागतात कोणी वांगी पोहे करतात कोणी फ्लॉवर पोहे तर मटार सिझन मध्ये मटार पोहे चार पाच वेळा केले जातातच फोडणीच्या पोह्यांवर ओले खोबरे आणि कोथिंबीर हवीच शिवाय फोडणीत ताजा कढीलिंब हवाच.सोबत लिंबाची फोड.वरुन भाजलेले शेंगदाणे शेव असल्यास उत्तम डाळिंब दाणे सुद्धा वापरले जातात 🌿 काही ठिकाणी पोह्यावर ओलं खोबरं टाकून दिले जाते तर कुठे तेलाची तिखट तर्री, शेव टाकून पोहेखाल्ले जातात 🌿 सगळ्यांच्या अगदी दिल के पास असलेला पदार्थ..😋🌿 दडपे पोहे...दडपे पोहे अनेक प्रकारे करता येतात. काहीजण पोह्यात कच्चे तेल वापरतात, काहीजण लिंबाऐवजी ताक वापरतात. आपल्या आवडीनुसार बदल करता येतात.🌿 मी आज पातळ पोह्यात कोथिंबीर, ओले खोबरे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो फोडी घालून मोहरी हिंग  कढीलिंब थोडी हळद घालून फोडणी केली 🌿 ती फोडणी गार झाल्यावर पोह्यांवर ओतलीथोडा लिंबू रस, साखर, चवीपुरते मीठ व माझ्याकडे असलेले मिरचीचे लोणचे घालून हलक्या हाताने पोहे कालवूनथोडेसे हाताने दडपून ठेवले(म्हणूनच दडपे पोहे म्हणतात 🙂🙂)कोरडे वाटल्यास थोडा पाण्याचा हबका मारणे बहुधा लागत नाही..🌿 पाच दहा मिनिटात खायला घेतलेयाचा गट्टीतला साथीदार म्हणजे दही 😀बस माहोल जुळून येतो ❤️🌿 असंख्य प्रकारे हे पोहे करतातप्रत्येकाच्या कलात्मकते नुसार हे तयार होतातकाहींना या पोह्यांवर परत भरपुर ओले खोबरे आवडते काहींना त्यावर रस्सा अथवा कट आवडतो 🌿 याची एक आठवण आहे... आमचे एक साहेब जे पुण्याचे होते आणि कोल्हापूरला एकटेच रहात होतेते एकदा रविवारी माझ्या घरी आले असतामी दडपे पोहे केले होतेत्यांना एवढे आवडले की ते दर पंधरा दिवसाला येणाऱ्या हाफ डे शनिवारी त्याची फर्माईश करीतमग बँकेच्या आठ दहा स्टाफ साठी मी भल्या मोठ्या पातेल्यात पोहे घेउन जात असेया साठी मला एक तास उशिरा यायची मुभा होती 😀हे पोहे असलेले पातेले , खायला डिश हे साहित्य घेउन जायला दोन शिपाई मोटर सायकल घेउन येत असत 😀मी पोह्यांवर फोडणी घालुन साखर मीठ घालून आणायचेबँकेतील कोणी एक स्टाफ खोबरे आणायचाकोणी चिरलेला कांदाकोणी कोथिंबीरकोणी लिंबूकोणी त्यावर घालायला शेव...अशी कामे इतर स्टाफ वाटून घेत असेत्यामुळें हे काम सोप होत असेमग जेवणाच्या सुट्टीत मी ते सर्व साहित्य एकत्र करून पोहे कालवत असेदुपारी सर्वजण त्या पोह्याचा आस्वाद घेत असूमोठे पातेले भर पोह्यांचा दहा मिनिटात फडशा पडत असे..हा कार्यक्रम दोन वर्षात पाच सहा वेळ तरी झाला🙂🙂 या पोह्याचे अनेक प्रकार...🌿 कधी फक्त बारीक मिरची कोथिंबीर साखर लिंबू ओले खोबरे..कांदा नाही बस... फोडणीत हळद पण नाही🌿 कधी थोडे तिखट टोमॅटो हळद.. मिरची नाही,🌿 कधी नारळ पाण्याचा हबका मारूनतर कधी पातळ ताक हबका मारून🌿 कधी साध्या मिरची ऐवजी खारातली मिरची घालूनतर कधी भरून वाळवलेली मिरची तळुन घालून🌿 कधी काकडी कोचूनतर कधी फळांच्या बारीक फोडी घालून ..🌿 हे पोहे दडपून ठेवल्यावर मात्र अर्ध्या तासाच्या आत खाऊन घ्यायचे नाहीतर त्याची खुसखुशीत चव लागणार नाही आणि ते कोरडे होतील 🌿 असे हे दडपे पोहे...🙂