आर्या ( भाग १३) suchitra gaikwad Sadawarte द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आर्या ( भाग १३)

   सगळे निःशब्द होते . ही घटना जणू आपल्या समोर घडत आहे असं वाटत होतं .सर्वत्र भयाण शांतता होती. सर्वांच्या डोळ्यात पाणी होत . तितक्यात जोरात रडण्याचा आवाज आला . तो आवाज आर्याचा होता .

आम्ही सगळेच धावत प्रिन्सी आणि आर्या कडे धावत गेलो . अनुराग सर्वात आधी रूम मध्ये पोहचला . तेव्हा त्याने जे बघितलं त्यानंतर त्याला प्रिन्सी अजूनच जवळची वाटत होती . नंतर सगळे आले .श्वेता तर घाबरली होती . तिला माहित आर्या ने काहीतरी केलं असावं असं! श्वेता आली तेव्हा सर्व नॉर्मल होतं . पण तिने अनुराग ला विचारलं, काय झालं होत इथे ? तो कोणत्या तरी विचारांमध्ये गुंतलेला होता . श्वेता ने त्याला हात लावून हलवलं, काय झालं ? अनुराग म्हणाला , आपण प्रिन्सी ला दत्तक घेऊया का ? तुला काय वाटतंय ? 

श्वेता थोड्यावेळासाठी शांत झाली . तितक्यात आजी आजोबा ही तिथे आले होते .त्यांनी ही विचारलं काय झालं या मुलींचं? 

अनुराग म्हणाला , बाबा आर्या ना स्वतःला बॅलन्स नाही करू शकत. हे मला आणि श्वेताला माहित आहे . हा ते प्रिन्सी ला माहित नसेल . जेव्हा प्रिन्सी काहीतरी घेण्यासाठी तिच्या जागेवरून उठली तेव्हा आर्या बेड वरून खाली पडली असावी .

हे ऐकल्यानंतर श्वेता एकदम घाबरुन गेली आणि आजी आजोबा ही ! तितक्यात अनुराग म्हणाला , हो! असच झालं मी आलो तेव्हा आर्या खाली पडली होती पण प्रिन्सी ने तिला अगदी तिच्या जवळ मिठीमध्ये घेतलं होत . तिला विचारत होती , 'कुठे लागलं नाही ना तुला ? तिला प्रत्येक ठिकाणी स्पर्श करत विचारत होती , इथे दुखतय का असं !' श्वेता ला आता अनुराग च्या आधीच्या प्रश्नाचा अर्थ चांगलाच लक्षात आला होता ! ती थोडी शांत झाली आणि आर्या ला जवळ घेऊन बसली .

आजी प्रिन्सी ला थोडं बोलू लागली, ’ बेटा, तू  आर्याकडे लक्ष द्यायचं ना , अशी कशी तू ?' प्रिन्सी तिच्या गोड आवाजात , म्हणाली आई सॉरी! पण आर्या ते खेळणं मागत होती ! त्यासाठीच मी उठले आणि ती लगेच खाली पडली ! हे बोलताना ती घाबरली होती!' तितक्यात अनुराग तिच्या जवळ गेला .तिला जवळ घेतलं आणि म्हणाला , अगं बेटा, तू खूप गोड आणि हुशार आहेस ! तुझी काही चुकी नाही !'थोड्याच वेळात श्वेता म्हणाली , आता आपण निघूया का अनुराग ? अनुराग म्हणाला , "हो निघूया ना ! त्याआधी आपण बाहेर जाऊन या ! आर्या ला त्या आईकडे देऊन ये चल !"

  श्वेता आर्याला प्रिन्सीच्या आजीकडे देऊन अनुराग च्या मागोमाग घराबाहेर निघाली . बाहेर येताच श्वेता अनुराग ला म्हणाली , काय झालं ? नक्की काय आहे तुझ्या मनात ? एकदा बोलून घे ! तुझं वागणं मला वेगळंच वाटत आहे ! आता तरी तु बोलणार आहेस का ?" अनुराग ने होकारार्थी मान हालवली – पुढे म्हणाला, " हे बघ श्वेता, तुला हे किती आवडेल हे मला माहित नाही आणि कळत ही नाही ! आणि तुला आवडेल की नाही ते ही कळत नाही . तुला माझा निर्णय ऐकून काय वाटेल या विचारानेच मला जास्त अस्वस्थ वाटत आहे..' 

श्वेता पुढे म्हणाली , तू माझा विचार करत आहेस आणि ते ही फक्त नकारार्थी ? एकदा बोलुन तर बघ .

तितक्यात अनुराग म्हणाला," श्वेता तुला काय वाटतंय, आपण प्रिन्सीला दत्तक घेऊ शकतो का? की मी चुकीचा विचार करत आहे का? मला त्या मुलीच भविष्य हा तिच्या भूतकाळ आणि वर्तमान काळ या पेक्षा खूप वेगळा आणि चांगला बनवायचं आहे ! इतक्या गोड , समजूतदार मुलीचे आपण आई–बाबा होऊया का ? अगं आर्या पडली असताना , ती काळजीने तिला जवळ घेणारी प्रिन्सी मी जवळून बघितली ! तिच्या डोळ्यात ती काळजी , प्रेम मी बघितल आहे ! पण तू तुझं निर्णय घे आणि मला सांग ....

तितक्यात प्रिन्सी जोरात आवाज देते . काकी आर्या रडत आहे ...तिला भूक लागली आहे वाटतंय .. लवकर या...

पुन्हा एकदा दोघांमधील बोलणं अर्धवट ठेवून श्वेता घाईघाईने आतमध्ये जाते ...