सप्तपदी - 1 Rachana द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सप्तपदी - 1

आज त्या सेव्हन स्टार अशा आलिशान हॉटेल च्या आवारामध्ये विखुरलेल्या पानांची अवस्था सैरावैरा धावायला जागाही कमी पडेल अशी झाली होती . . . 

संपूर्ण परिसरात धूळ उडवत ते हेलिकॉप्टर हॉटेलच्या आवारात लँड झालं होतं . . . एका व्यक्तीने येऊन उजव्या बाजूच दार उघडताच चंद्रालाही लाजवेल अशी सुंदर मुलगी बाहेर आली . . . लाल लेहंगा त्यावर  मोती कलर ची ओढणी , कोपरा पर्यंत मेहंदी जी अगदीच गडद रंगलेली होती . . .  तिच्या प्रियकराच तिच्यावर असलेलं प्रेमच जणू तो रंग सगळ्यांना सांगू पाहत होता . . . त्यावर असलेला चुडा , पायात नाजूक पैंजण - जीचा चालताना आवाज अगदी मनाला मोहून टाकणारा होता . . .  नाकात नथ अगदी शोभून दिसत होती . . . कपाळावरील चंद्रकोर तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत होती . . . 


अशी ती आपली आर्या , हेलिकॉप्टर मधून पाय खाली ठेवताच पायाखाली गुलाबाच्या पाकळ्यांचा गालिचा अंथरलेला होता . . . जे पाहून तिच्या चेहऱ्यावर बर्गर वर कोल्ड्रिंक्स फ्री वाली स्माइल होती . . . एका हाताने ती लेहंगा सावरत होती , तितक्यात तिच्या समोर एका  राजकुमाराचा हात आला . . . तो अगदी प्रेमाने तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होता . . . जणू किती जन्मांच प्रेम सत्यात उतरलं होतं . . . तिने हसत त्याच्या हातात हात दिला . . . दोघेही त्या गुलाबाच्या पाकळ्यांचा पायघड्यांवरून लग्न मंडपाकडे चालत जाऊ लागले . . . तेवढ्यात त्या नवरदेवाकडचे नववधूच्या स्वागतासाठी आरती च ताट घेऊन उभे असलेले तीला दिसले . . . 

" या , या सुनबाई , स्वागत आहे तुमचं . . . " असं म्हणून ओवाळत तिच्या सासूने हसत तिचं स्वागत केलं . . .  दोघेही मांडवाच्या दिशेने जाऊ लागले तसं डिजे वाल्याने '

" बहारो फुल बारसावो , 
मेरा मेहबूब आया है ,
मेरा मेहबूब आया है " 

हे गाणं लावलं . . . जसे ते दोघे वधू वर मांडवाच्या दिशेने जात होते . . . तसे तिथे ड्राय आइस वाल्या मटका स्मोक मधून जाताना स्वर्गात चालत असल्याचा जणू भास होत होता . . . सम्पूर्ण हॉल निरनिराळ्या महागड्या फुलांनी सजविण्यात आला होता . . . त्याचा सुगंध संपूर्ण हॉलमध्ये पसरला होता . . . 

स्टेज वर जाताच दोघे वधुवर एकमेकांच्या समोर हातात जयमाला घेऊन उभे राहिले . . . मंगलाष्टंकं सुरू झालीत . . . 

"स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री , गिरीजात्मकम , सुरवरदम , विघ्नेश्वरम् , ओझरम ।
ग्रामो रांजण , संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान || " 

गुरुजींनी शुभ मंगल सावधान म्हणताच फुलांचा आणि अक्षदांचा वर्षाव त्या दोघांवर होऊ लागला . . . गुरुजी पुढचे मंत्र म्हणू लागले . . . आणि जसा शेवटचा मंत्र सुरू झाला ,

"आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।
गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।
दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता , दोघे करावी उभी।
वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।
कुर्या सदा मंगलम , शुछ मंगल सावधान ll "

होते नव्हते ते सर्व अक्षद त्यांच्यावर येऊन पडले . . . बाहेर बँड चा नाद घुमू लागला . . . फटाके फुटू लागले . . . स्टेज वर फायर क्रॅकर सुरू झाले . .  लगेच नवरदेवाच्या मित्रांनी हातातील पॉपर उंच धरून फोडले , तसे सर्व रंगीत कागदं हवेत विखुरले . . . संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटात गुंजला होता . . . 

" चला वधुवरांनी एकमेकांच्या गळ्यात जयमाला टाकायच्या आहेत . . . आधी  वधू वराच्या गळ्यात हार टाकेल . . . " गुरुजींचा आवाज आला  . . .  आपली आर्या लाजत नवरदेवाच्या गळ्यात हार टाकणार तेवढ्यात त्याच्या मित्रांनी त्याला वर उचललं . . . 

" घ्या वहिनी आता माळा टाकून दाखवा . . . " असं म्हणताच सगळे जण हसायला लागले . . . आर्या आता काय करू या विचारात असताना लगेच तिच्या काही मित्रांनी तिला ही वर उचलून घेतलं व वेळ न घालवता लगेच तिने थोडं पुढे झुकत वराच्या गळ्यात माळ घातली . . . तसे सर्व टाळ्या वाजवू लागले . . .

आता वेळ नवरदेवाची होती . . . सगळे मित्र आर्या ss आर्या ss म्हणून ओरडत होते व आर्या लाजत होती . . . आणि तिने काही सेकंद लाजून डोळे बंद केले . . .  तेवढ्यात तिची जिवलग मैत्रीण अनु तिथे आली आणि आर्या च्या खांद्याला एक चापट मारून म्हणाली ,

" ये ढप्पो , अग बघतेस काय अशी , घाल की त्यांच्या गळ्यात माळ . . . " तसे सर्व आर्या वर हसू लागले . . . 

" ये ढप्पो काय ग . . . ?? नीट बोल ना , लग्न आहे यार माझ आज . . . "

" अच्छा लग्न आहे का . . . ??  हिला ना नेहमी लग्नचीच स्वप्न दिसतात . . . " असं म्हणून अनु ने सरळ एक जग भरून पाणी आर्याच्या तोंडावर ओतलं , तशी आर्या खडबडून जागी झाली . . . दोन्ही हाताने तोंडावरचं पाणी निपटत अनु ला शिव्या देतच उठली . . . 

" ये आगाऊ कार्टी , तुझी काय दुश्मनी आहे का ग माझ्याशी . . . ??  प्रत्येक वेळेस हेच आहे तुझं . . .  तो श्रीमंत मुलगा माझ्या गळ्यात हार टाकणारच असतो , की तेव्हाच तू मला असं काहीतरी खोळ्या करून उठवून देतेस . . . जळकुकळी मेली . . . " आर्याने तोंड वाकडं करत  तिला एक उशी फेकून मारली . . . 

" हो हो झालं लग्न , हनिमून पण झालं आणि पोरं पण झालीत . . . मी तुझी पोर सांभाळते पण तू आंघोळीला जा पटकन . . . विसरलीस का तुझा इंटरव्यू आहे आज म्हणून . . . ?? " 

" अगं हो ग 😳  मग जे मुद्द्याच आहे ते आधी नाही का सांगायचं , बसली भाषण देत . . . " आर्या पायावरचं ब्लॅंकेट दूर फेकत लगेच पलंगाच्या खाली उतरली व स्वतःचे ओले कपडे झटकले . . . 

" आवर पटकन , मी निघते पुढे . . .  तू ये नंतर . . . नाहीतर उगाच मला लेट मार्क लागेल . . . " अनु तिची पर्स घेत म्हणाली . . . 

" हो हो , तू जा रिक्षाने , मी तर माझ्या नवऱ्याच्या मर्सडीज मध्ये येणार आहे . . . " आर्या तिचे समोर आलेले केस मागे झटकत म्हणाली . . . 

" आत्ता जातेस का आंघोळीला , की काढू तुझी मर्सडीज इथेच . . . " अनु तिथेच असलेली एक पाण्याची बॉटल तिच्या अंगावर फेकत म्हणाली तशी ती लगेच बाथरूमच्या दिशेने पळाली . . . 

" ढप्पो ss , चहा करून ठेवलाय ग . . .  गरम करून पिऊन घे . . . " एवढ बोलून अनू ऑफिसला निघून गेली . . . 


🔸👌🔸💫🔸👌🔸👌🔸💫🔸💫🔸


तर ही आहे आपली आर्या , आर्या पाटील . . . एक प्रचंड आळशी पण क्युट आणि कायम स्वप्नात राहणारी दिलखुलास मुलगी . . . 

हळूहळू आपण तिला जाणून घेऊच . . . कोण असेल तिच्या स्वप्नातला राजकुमार . . . ?? लग्न मंडपात कायम तिच्या समोर उभा असलेला तो मर्सडीज वाला . . . की एखाद्या साधारण मुलाशी होईल तिचं लग्न . . . ?? 

जाणून घेण्यासाठी वाचत राहा एक नवी कथा मालिका
" बरसुनी रंग प्रेमाचे " . . .  आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया कायम समीक्षा द्वारे कळवत रहा . . .